ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 137
订阅者
-524 小时
-167
-4130
帖子存档
photo content

CMO Maharashtra Tweets: रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूर येथे स्व. सौ. संगीता मिनेश लाड यांच्या स्मरणार्थ ‘कॅन्सर स्क्रिनिंग मोबाईल व्हॅन’चे लोकार्पण करण्यात आले. #Maharashtra #DevendraFadnavis #NationalHealthCare

CMO Maharashtra Tweets: ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा 2026’ : परंपरा, वारसा आणि विकासाचा संगम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित 'गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026'चा भव्य शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील नद्या एकमेकांशी जोडून राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. भविष्यात राज्यात कुठेही दुष्काळ राहणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मल आणि अविरल गोदावरीला प्राधान्य देत त्र्यंबकेश्वरमध्येही गोदावरी बारमाही वाहती राहील, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू झाली आहे. त्याच आधारावर पुढील विकास कसा असेल यासंदर्भात या यात्रेची रचना करण्यात आली आहे. देशातल्या उत्तम शासकांमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मंदिर, घाट किंवा बारव यांचे निर्माण करताना किंवा एकंदरीत जलसंधारण या विषयात त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. महिला शिक्षणापासून ते रोजगारापर्यंत महिलांना सक्षम करणाऱ्या आणि महिला सैनिकांची तुकडी तयार करण्याचे श्रेयही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनाच जाते. कायदा आणि सुव्यवस्था कशी उत्तम राखता येऊ शकते, याचे उदाहरण देखील त्यांच्या काळात पाहायला मिळते असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीष महाजन, मंत्री छगन भुजबळ, आमदार रविंद्र चव्हाण, प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर, आचार्य तुषार भोसले, डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, ह.भ.प. संजयनाना धोंडगे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज युवराज यशवंतराव होळकर, आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik #JalYatra #RiverLink

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या पत्नीचे आज दुःखद निधन झाले. नाशिक येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना आदरांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. ॐ शांती 🙏

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प! नदी जोड़ परियोजना के माध्यम से महाराष्ट्र को सूखा-मुक्त करने का हमारा संकल्प! (गोदा ते नर्मदा आयोजित जल यात्रे'चा भव्य शुभारंभ | नाशिक | 25-4-2026) #Maharashtra #Nashik #JalYatra

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ‘गोदा ते नर्मदा जल यात्रा’ ही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विचार आणि वारशावर आधारित आहे. ‘गोदा से नर्मदा जल यात्रा’ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर इनके विचारों और विरासत पर आधारित है। (गोदा ते नर्मदा आयोजित जल यात्रे'चा भव्य शुभारंभ | नाशिक | 25-4-2026) #Maharashtra #Nashik #JalYatra

photo content

photo content

photo content

*CMO Maharashtra Tweets:* अवघ्या 6 वर्षांची चिमुकली मणिकर्णिका देशपांडे हिने हिमालयातील उत्तुंग असे केदारकंठ शिखर सर करत अद्वितीय विक्रम आपल्या नावे केला असून आज नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला. #Maharashtra #ManikarnikaDeshpande #MountainClimber

photo content

CMO Maharashtra Tweets: नाशिक महानगरपालिका अंतर्गत ‘उन्नत नाशिक अभियाना'च्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीष महाजन, नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, प.पू. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज युवराज यशवंतराव होळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #Nashik #JalYatra #RiverLink

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026' या कार्यक्रम गीताचे अनावरण करण्यात आले. #Maharashtra #DevendraFadnavis #Nashik

photo content

photo content

Devendra Fadnavis - Telegram 频道 @devendragfadnavis 的统计与分析