ch
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

显示更多
4 155
订阅者
无数据24 小时
-17
-4730
帖子存档
photo content

CMO Maharashtra Tweets: व्हिएतनाम येथे झालेल्या अंडर-23 आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत 62 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासह महाराष्ट्राचा झेंडा उंचावणाऱ्या कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. ट्रिपल महिला महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी असलेल्या भाग्यश्रीच्या या अभिमानास्पद कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. #Maharashtra #AsianWrestlingChampionship #DevendraFadnavis

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्रालय, मुंबई येथे 'जागतिक योग स्पर्धा 2026' मधील सुवर्णपदक विजेत्या डॉ. ज्योती देऊरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे या नेत्रदीपक व प्रेरणादायी कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: आनंदाची बातमी! महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने 733.28 कोटी रुपयांची योजना मंजूर केली आहे. या योजनेत 60 टक्के निधी केंद्र सरकार तर 40 टक्के निधी राज्य सरकार देईल. महाराष्ट्र पोलिस दलासाठी इतका मोठा निधी मंजूर केल्याबद्दल मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मा. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचा अतिशय मनापासून आभारी आहे ! सागरी सुरक्षा, ड्रग्जविरोधी मोहीम, सायबर सुरक्षा, एआय तंत्रज्ञानाचा अधिक वापर, नागरिकांची सुरक्षा, आधुनिक शस्त्र, वाहने अशा अनेक दृष्टीने महाराष्ट्र पोलिस दल अधिक सुसज्ज करणे यातून शक्य होणार आहे. #MaharashtraPolice #Maharashtra

photo content

CMO Maharashtra Tweets: 20 मे 2026 रोजी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (8848 मीटर) यशस्वीपणे सर करणाऱ्या मुलुंड, मुंबई येथील 21 वर्षीय गिर्यारोहक सानिका शाह यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या मोहिमेदरम्यान त्यांनी माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यमचा अनोखा नृत्याविष्कारही सादर केला होता. सानिका यांनी यापूर्वी आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो, युरोपमधील सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रस आणि नेपाळमधील 7126 मीटर उंचीचे शिखर माउंट हिमलुंग हिमाल यशस्वीरित्या सर केले होते, जे एव्हरेस्ट मोहिमेच्या तयारीसाठी उपयुक्त प्रशिक्षण शिखर म्हणूनही ओळखले जाते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सानिका यांच्या या अद्वितीय आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार मिहीर कोटेचा उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #SaanikaShah #Everest2026

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त) #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 'परिवर्तनाचा वाटसरू' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य व मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MSRTC

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: हा केवळ श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाचा स्टॉल नाही, तर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. यह केवल श्री वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघ का स्टॉल नहीं, बल्कि कोल्हापुर जिले के किसानों के स्वाभिमान का प्रतीक है। (दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री केंद्राचे उदघाटन | मुंबई | 16-6-2026) #Maharashtra #Mumbai #Warana

photo content

photo content

photo content