ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
🎯 *करिअर : सायकोलॉजिस्ट* *LetsUp I Career* आकडेवारीचा विचार केला तर भारतातील तब्बल ७ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या मानसिक आजारांनी ग्रस्त आहे. गेल्या काही महिन्यांचा विचार केला तर यात आणखी भर पडली असेल. भारतात इतर रोगांचे अनेक तज्ज्ञ असले तरी मानसिक आजारांवर प्रभावी उपचार करणाऱ्या मनोचिकित्सकांची अजूनही कमतरता आहे. त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता. 🤓 *कामाचे स्वरूप* : मानसिक रुग्णांना कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी मदत करणे, त्याचे मानसिक संतुलन व्यवस्थित राखणे. या रुग्णांचा व्यवहार सामान्य करणे, गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देणे ही कामे मनोवैज्ञानिकाला करावी लागतात. 💁 *रोजगाराच्या संधी* : समाजकल्याण संस्था, संरक्षण क्षेत्र, सार्वजनिक आरोग्य केंद्र, तुरुंग, रुग्णालय, एनजीओ, थेरपी सेंटर, कौन्सिलिंग सेंटर, विद्यापीठे, शाळा, औद्योगिक कार्यालये इत्यादींमध्ये समुपदेशक म्हणून नोकरी मिळू शकते. कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्याला नामांकित मनोवैज्ञानिक/कौन्सिलरच्या हाताखाली प्रॅक्टिस करण्याचीही संधी मिळते. तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट व्यसनमुक्ती केंद्रातही समुपदेशक म्हणून काम करू शकतो. शिक्षक, मनोवैज्ञानिक सल्लागार, करिअर कौन्सिलर, सायकोलॉजिस्ट, मॅरेज कौन्सिलर, चाईल्ड कौन्सिलर आदी पदांवर काम करण्याची संधी मिळते. विविध औद्योगिक कार्यालयांत सायकोलॉजिस्ट विषयातील तज्ज्ञांना कामगार कल्याण अधिकारी पदावर नियुक्त केले जाते. शिक्षक म्हणूनही खासगी आणि आता तर शासकीय शाळांमध्ये सायकोलॉजिस्ट नियुक्त करण्याचे चलन वाढत आहे. *पात्रता* : ग्रॅज्युएशननंतर तीन वर्षांचा बी.ए. (ऑनर्स) कोर्स उपलब्ध आहे. तसेच उमेदवाराला नामांकित संस्थांमध्ये परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला जातो. अभ्यासक्रमात सायकोलॉजी, स्टॅटिस्टिक्स, इंट्रॉडक्शन टू कौन्सिलिंग, कौन्सिलिंग सायकोलॉजी, व्होकेशनल गायडन्स, चाइल्ड सायकोलॉजी, बिहेव्हिअर सायन्स, कौन्सिलिंग प्रोग्राम, रिसर्च मेथडोलॉजी आदी विषयांवर आधारित प्रश्न विचारले जातात. 🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😋 *मँगो केक* *LetsUp I Recipe* *साहित्य* : दीड कप कणीक, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, 100 ग्रॅम बटर, 200 ग्रॅम कंडेंस्ड मिल्क, 1 कप मँगो प्युरी, 3-4 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून व्हेनिला इसेंस. *कृती* : ● सुरुवातीला ओव्हनला 180 डिग्री सें. वर 15 मिनिटापर्यंत प्रीहीट करा. ● कणकेला बारीक चाळणीने चाळून घ्या. ● यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिसळून वेगळे ठेवा. ● एका बाऊलमध्ये बटर, मँगो प्युरी, कंडेंस्ड मिल्क, साखर आणि व्हेनिला इसेंस फ्लफी होईपर्यंत फेटून घ्या. ● आता यात कणीक मिसळून एकाच दिशेने परत फेटा. या मिश्रणाला केक टिनमध्ये घाला. ● प्रीहीट ओव्हनमध्ये केक टीनं ठेवून 40 मिनिटापर्यंत बेक करा. 🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *भारत-चीन मधील तणाव वाढला* *LetsUp l Update* ⚡ भारत व चीन यांच्यात लद्दाखमध्ये तणाव वाढला आहे. चीनचे अध्यक्ष सतत भारतीय भागात त्याच्या विस्तारावर भर देत आहेत. दरम्यान, चीनने लद्दाख सीमेवर पेट्रोलिंग वाढवल्याची माहिती मिळाली आहे. 💁🏻‍♂️ *पेट्रोलिंगही वाढवले* : पॅनोंग त्सो तलावाजवळ चीनने अधिक नौका उतरवल्या आहेत. यासह चीनने येथे पेट्रोलिंगही वाढवले आहे. चीन पेइचिंग लद्दाखमधील भारताचे बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न करीत आहे. 🧐 *आरोप* : चिनी हेलिकॉप्टर या विवादित सीमेजवळ पाहण्यास मिळाले. चीन बीजिंगच्या सीमेवर खूप आक्रमक होत आहे. त्याचवेळी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक निवेदन जारी करत भारतावर सीमा उल्लंघनाचा आरोप केला आहे. 👀 *चीनचे मत* : 'चीनच्या हद्दीत प्रवेश करण्यासाठी भारतीय सैन्याने चीन-भारत पश्चिम विभाग आणि सिक्किम विभागाची सीमा ओलांडली.' भारताने त्वरित सैन्य मागे घ्यावे आणि आहे त्या स्थितीत रहावे. आधीही अनेकवेळा भारताने सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप चीनकडून केला गेला आहे. 📌 भारतीय लष्कराकडून सीमेवर गस्त वाढविण्यात आली आहे. सध्या सीमेवर भारत-चीन सैन्यात झालेल्या चकमकींबद्दल माहिती मिळालेली नाही, मात्र अद्याप सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

photo content
+5

🧐 *युनियन बँकेत चोरीचा प्रयत्न; दोघाना अटक* *LetsUp l Ahmednagar* लॉकडाऊनच्या काळात नगर शहरातील युनियन बँक ऑफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना पकडण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. कोम्बिंग ऑपरेशन करत पोलिसांनी या दोन चोरांना अटक केली. उसवाल इंपीरियल चव्हाण, सेन्थाँल अस्तंनदुर काळे (दोघे रा.कुरणवस्ती, वाळुंज, ता.नगर), असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक विकास वाघ, गुन्हे शाखेचे पोसई सतिष शिरसाट, पोसई मनोज कचरे, पोना गणेश धोत्रे, नितीन शिंदे, शाहीद शेख, पोकाँ सुजय हिवाळे यांनी ही कारवाई केली. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *तंबाखूच्या गोडाऊनवर एलसीबीची धाड...* *LetsUp | Beed* शहरातील इमामपूर रोडवर आज दुपारी एलसीबीच्या टीमने तंबाखूचा गोडावूनवर धाड टाकली.यावेळी त्या ठिकाणी जवळपास अडीचशे पोते तंबाखूचा साठा आढळून आल्याचे समजते. सदरील साठा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यासंदर्भात एलसीबीकडे विचारणा केली असता कारवाई झाल्याचे सांगितले मात्र अधिक माहिती देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. शहरातील इमामपूर रोड भागात एका गोडाऊनमध्ये तंबाखूचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने या ठिकाणी कारवाई केली. गोडाउनमध्ये जवळपास 250 पोते तंबाखू आढळून आली. टेम्पो मागवून साठा पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो साठा पेठ बीड पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. दरम्यान सदरील तंबाखू ही सुटी विक्री करण्याची असून संबंधित मालकाने मात्र हा माल फेब्रुवारीमध्ये मागवला होता असे सांगून पोलिसांना जीएसटी बिलासह पावत्या दाखवल्याचे समजते. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

photo content

🗞 *जिल्हानिहाय ठळक घडामोडी* *LetsUp l Sangali* सांगली : कोतीज येथील मुंबईस्थित 55 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील 11 जणांची कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह ▪ सातारा : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली घटना, गुन्हा दाखल --------------------- *Advertisment On LetsUp* *Contact* : 7798655655 ---------------------- ▪ राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 17 हजार 974 वर पोहचली; आरोग्यमंत्री राजेश टोपे ▪ एकजुटीने संकटातून राज्याला बाहेर काढू, सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *रिक्षाचालकांसाठी माणुसकीचा हात* *LetsUp l Pimpri chinchwad* लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे. हे लक्षात घेवून थेरगाव सोशल फाऊंडेशनतर्फे रिक्षाचालकांना पंधरा दिवस पुरेल इतके अन्न धान्य भाजी पाल्याचे किट देण्यात आले. गेल्या दीड महिन्यापासून रिक्षा चालकांची रिक्षा वाहतूक बंद आहे. हॉस्पिटलला जायचे, ऑफीसला जायच आहे, मुलांना शाळेत सोडायच आहे, घरातला किराणा माल आणायचा आहे प्रत्येक सुख दुःखात धाऊन येणार्‍या रिक्षा चालकांना थोडासा हातभार म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *नाशिक शहरात कोरोनाचे नवे 15 रुग्ण, पन्नाशीकडे वाटचाल* *LetsUp l Nashik* मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरात देखील कोरोनाने विळखा घातला आहे. शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात 15 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे. यामुळे शहरातील आकडा 41 झाला आहे. नाशिक शहरात देखील गेल्या तीन दिवसांपासून रोज कोरोना हे रुग्ण पॉझिटिव्ह येत आहे. शहरात कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली असून आता नवीन आलेले रुग्ण हे आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहे. त्यातच आता जिल्हा प्रशासनाने खाजगी अस्थापनांनाही दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिल्याने बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. हा संसर्गजन्य आजार असल्याने शहरवासीयांनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय सकाळ पासूनच दारू दुकानावर मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. दरम्यान सकाळी आलेले पॉझिटिव्ह रुग्ण हे सातपूर, सिडको, पाथर्डी फाटा आणि अन्य परिसरातील असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. शहरात आता पर्यंत 41 रुग्ण असून लवकरच शहर पन्नाशी पूर्ण करेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मालेगावमधूनच नाशिक मध्ये कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *नांदेडात आणखी तिघांना कोरोनाची लागण* *LetsUp l Nanded* मागील काही दिवसांपासून नांदेडात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढ आहे. त्यातच शुक्रवार दि. ८ रोजी आणखी तीन नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. राज्यभरात सुरूवातीला रुग्णांची संख्या वाढत असतांना मात्र, नांदेड जिल्हा तब्बल एक महिना ग्रीनझोन मध्ये होता;परंतु शहरातील पीरबुह्रानगर येथे 22 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजघडीला अबचलनगर परिसर कोरोना संसर्गाचा केंद्रबिंदू ठरला अाहे. सर्वाधिक रुग्ण गुरुद्वारा परिसरात आढळत आहेत. दि. ७ मे रोजी २३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. यापैकी २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका महिलेसह अन्य दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्व रुग्ण अबचलनगर येथील पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात आले. तिघांनाही शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😰 *लॉक डाऊननंतर पुन्हा ऑफिसला जाण्याबाबत 95 टक्के लोक चिंतेत* *LetsUp | Special* 😷 कोरोना विषाणू संसर्गामुळे 24 मार्चपासून देशात लॉक डाऊन सुरु आहे. 17 मे नंतर लॉकडाऊन संपण्याची अपेक्षा करीत आहेत. 🔎 लॉक डाऊननंतर ऑफिसला जाण्यासाठी देशातील 95 टक्के भारतीय चिंतेत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. 💼 कोरोना व्हायरसच्या भीतीने लॉक डाऊन संपल्यावरही ऑफिसला जाण्याचा तणाव लोकांवर असल्याचे दिसून आले आहे 🧹 त्याचबरोबर, 85 टक्के कर्मचार्‍यांची इच्छा आहे की ते पुन्हा कामावर परत येण्यापूर्वी, संपूर्ण कार्यालय परिसर स्वच्छ केला जावा. 🏤 हे सर्वेक्षण 560 कंपन्यांच्या कर्मचार्‍यांवर हेल्थ-टेक कम्युनिटी प्रोडक्ट एफवायआयआय आणि माइंडमॅप अ‍ॅडव्हान्स रिसर्चने केले आहे. 👫🏻 कंपनीने सर्वेक्षण केलेल्या कर्मचार्‍यांपैकी 85 टक्के कर्मचारी पुरुष आणि 15 टक्के महिला आहेत. 🤒 सर्वेक्षणात उघड झालेल्या आकडेवारीनुसार 59 टक्के कर्मचारी आपल्या आरोग्याबद्दल चिंतेत आहेत, 🧐 25 टक्के कर्मचार्‍यांनी सांगितले की ते त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे घाबरले आहेत, तर 16 टक्के लोक या आपत्तीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भीतीखाली आहेत. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *लॉकडाउनमध्ये Jio चा तिसरा मोठा करार* *LetsUp | National* ⚡ अमेरिकेतील व्हिस्टा इक्विटी पार्टनर कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडमध्ये 11 हजार 367 कोटींची गुंतवणूक करणार आहे. 📣 व्हिस्टा कंपनीने जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा 2.3 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने आज याची घोषणा केली. 💰 ही गुंतवणूक जिओ प्लॅटफॉर्मच्या 4.91 लाख कोटींच्या किंमतीवर असेल आणि एंटरप्राइझ मूल्य आता 5.16 लाख कोटी असेल. 👍 जगातील पाचवी सर्वात मोठी ‘एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर’ बनवणारी कंपनी म्हणून व्हिस्टाची ओळख आहे. 💵 या करारामुळे तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 60,596 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. 💫 तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत हा जिओ प्लॅटफॉर्मचा तिसरा मोठा करार आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *दोन तरुणांच्या आत्महत्या...* *LetsUp | Beed* तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावात तरुणांनी आत्महत्या केली असून एकाने नापिकीला कंटाळून तर एकाचे कारण कळू शकेल नाही. भागवत पांडुरंग पाष्टे, २२ वर्ष रा. मोठीवाडी ता. माजलगांव ७ गुरुवार रोजी रात्री उशिरा शतातिल चिंचाचे झाडास दोरिने गळफास घेऊन आत्महत्या केली असून सततची नापिकीमुळे तसेच बँकेच्या कर्जा मुळे ही आत्महत्या केली. याविषयी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास ग्रामिण पोलिस करत आहेत. तर दुसरी घटना तालुक्यातील आनंदगाव येथे घडली असून आनिल उत्तमराव घायाळ, ३० वर्ष रा.आनंदगांव ता.माजलगांव यांनी ७ गुरुवार रोजी रात्री उशिरा घरातच लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्याचे कारण कळू शकेल नाही. या प्रकरणी दिंडुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात येत असून पुढील तपास दिंद्रुड पोलिस करत आहेत.त्याचे पश्चात आई वडील व चार भाऊ आहेत. नेमके कारण कळाले नाही. दरम्यान या दोन तरुणाच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *ऑनलाईन मद्यविक्री करणाऱ्या जाहिरातीं फेक* *LetsUp | Satara* सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारच्या मद्यविक्रीवर पुढील आदेशापर्यंत निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे जिल्हयामध्ये सर्व प्रकारची मद्यविक्री सर्व प्रकारे बंद असून या परिस्थितीचा सायबर गुन्हेगार फायदा उठवित असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा गुन्हेगारांनी सोशल मिडीयामध्ये विविध साईटसवर बनावट दारुविक्रीच्या जाहिराती प्रसारित केलेल्या असून ऑनलाईन मद्यविक्री सुरु असून घरपोच दारू मिळणे संबंधित मोबाईल क्रमांक दिलेले आहेत . अशा क्रमांकावर फोन केल्यानंतर खरेदी करण्यात येणाऱ्या मद्याच्या अर्धी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले जाते. परंतु त्यानंतर विविध कारणांनी अजून रक्कम मागितली जाते व कोणतेही मद्य शेवटपर्यंत ग्राहकास दिले जात नाही . जिल्हयामध्ये कोणत्याही प्रकारे मद्यविक्री सुरू नसून अशा प्रकारे ऑनलाईन मद्यविक्री करणाऱ्या जाहिरातींमध्ये दिलेले मोबाईल क्रमांक ७०९९३५९५४० , ७५७६८२६९१९ , ९०९०५६१८५९ , ९८६४८२४९६० , ९०५७९१८५३६ या व यासारख्या अन्य कोणत्याही मोबाईल क्रमांकावर संपर्क करू नये. तसेच मोबाईल क्रमांक कोणत्याही मद्यविक्री दुकानदारांचे नसून सायबर गुन्हेगारांचे आहेत. अशाप्रकारे आपली फसवणुक करून आर्थिक नुकसान सायबर गुन्हेगारांमार्फत केले जावू शकते .असे आवाहन सातारा पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😱 *राज्यातील 495 पोलीस कोरोनाग्रस्त* *LetsUp | Corona Live* ⚡ राज्यभरातील पोलीस कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. कारण एका दिव
😱 *राज्यातील 495 पोलीस कोरोनाग्रस्त* *LetsUp | Corona Live* ⚡ राज्यभरातील पोलीस कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. कारण एका दिवसात तब्बल 38 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. 👉 त्यामुळे राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 495 वर पोहोचली आहे. यामध्ये 50 अधिकारी आणि 445 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 😷 अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. 42 अधिकारी आणि 414 कर्मचारी अशा एकूण 456 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. 💫 दुसरीकडे आठ अधिकारी आणि 27 पोलीस कर्मचारी असे एकूण 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने चार पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला 'एवढ्या' कोटींची मदत* *LetsUp | Update* ⚡ कोरोना विरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, विविध कंपन्या आणि व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत. 💰 मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान तसेच माजी न्यायाधीश, कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 कोटी 51 लाख रुपयांची मदत केली आहे. 🙏 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्व आजी-माजी न्यायधीश, कर्मचारी तसेच न्यायिक अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या मदतीसाठी धन्यवाद दिले आहेत. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🥃 *या राज्यांमध्ये आजपासून उघडणार दारूची दुकानं* *LetsUp | National* ⚡ दारूची दुकानं उघडण्यासंदर्भात गृहमंत्रालयानं काही गाइडलाइन जारी केल्या आहेत. 🏪 या गाइडलाइनुसार कंटेनमेंट झोन म्हणजेच कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणी दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत. 💁‍♂️ रेड झोनमध्ये काही ठिकाणी तर ऑरेंज आणि ग्रीन या तीनही झोनमध्ये दारूची दुकाने उघडली जातील. 📍 पण या दुकानांमध्ये जाताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यावश्यक असल्याचं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. ▪️ *दिल्ली* : L-6, L-8 सार्वजनिक क्षेत्रातील मद्य आणि दारूचे किरकोळ विक्रेत्यांना परवानगी दिली आहे. ▪️ *कर्नाटक* : कोरोनाग्रस्तांची संख्या ज्या परिसरात जास्त आहे तो भाग सोडून संपूर्ण राज्यात दारू विक्री सुरू केली आहे. ▪️ *महाराष्ट्र* : राज्यात आजपासून कंटेनमेंट झोन वगळता संपूर्ण राज्यात दारू विक्री सुरू होणार आहे. ▪️ *गोवा* : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार गोव्यातही दारूची दुकाने उघडण्यात आली आहेत. राज्यात दारूची दुकाने सुरू झाल्यानंतरही पर्यटनावरील बंदीमुळे दारूची विक्री 70०% पर्यंत कमी होऊ शकते. ▪️ *केरळ* : राज्यात दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे निर्बंध फक्त काही काळापुरते लावण्यात आले आहेत, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* :

😢 *ब्रेकिंग! ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन* *LetsUp । Breaking* ⚡ बॉलिवूड मधील दिग्ग्ज अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. 🏥 ऋषी कपूर यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला आहे. 📍 दरम्यान काल बुधवार रोजी अभिनेते इरफान खान यांच्या मृत्यूच्या शोक सागरातून बॉलिवूड कलाकार सावरलेही नाही तोच हि दुःखद घटना घडली आहे. 👉 ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे. 🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *दुकाने सुरु होण्याविषयी अद्याप निर्णय नाही* *LetsUp I Update* ⚡ देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असल्यामु
💁‍♂️ *दुकाने सुरु होण्याविषयी अद्याप निर्णय नाही* *LetsUp I Update* ⚡ देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण असल्यामुळे केंद्राच्या परवानगीनंतरही राज्यात दुकाने सुरू करण्याबाबत राज्य सरकारचा अद्याप निर्णय झालेला नाही. 👉 कोरोनासाठीचे हॉटस्पॉट, कंटेंटमेंट झोन आणि बाजारपेठा वगळून देशात सर्वत्र दुकाने सुरू करण्याची परवानगी एका आदेशान्वये केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. 🧐 केंद्र सरकारने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करायची की नाही, यावर राज्य सरकारचा अद्याप विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. 📍 महाराष्ट्र सरकारने आधीच राज्यातील कंटेंटमेंट झोन नसलेल्या भागांत उद्योगधंदे सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. तसेच ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया केंद्र, पीठाची गिरणी सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp