LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
😍 *देशभरात आजपासून दुकाने उघडणार!*
*LetsUp l National*
⚡ कोरोनाला रोखण्यासाठी महिनाभरापासून संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात काही अटींवर दुकाने उघडण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली असून या निर्णयामुळे लाखो दुकानदारांना दिलासा मिळणार आहे.
💁♂️ *परवानगी* : गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
🛍️ *मॉल्स बंदच* : आज (दि.25) सकाळपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत. मात्र शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे सर्व मॉल्स तूर्तास बंदच राहणार आहेत.
🧐 *अटी* :
● जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार.
● दुकानात 50 टक्के कर्मचारीच काम करू शकणार.
● सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचे आहे.
● मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक.
🗣️ *गृहसचिव अजय भल्ला म्हणाले* : पालिका व नगरपरिषद हद्दीतील बाजारपेठांमधील दुकाने उघडण्यास मनाई आहे. ही दुकाने 3 मे पर्यंत उघडता येणार नाहीत. सिंगल ब्रॅण्ड व मल्टिब्रॅण्ड मॉल्स उघडण्यासही परवानगी नाही. त्याचवेळी पालिका वा नगरपरिषद हद्दीबाहेरील दुकाने उघडता येणार आहेत, असे गृहसचिव अजय भल्ला यांनी स्पष्ट केले.
📌 कोरोना हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागांत दुकाने उघडण्याची मुभा मिळणार नाही, असे आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🧐 *गोव्यानंतर 'ही' दोन राज्य कोरोनामुक्त!*
*LetsUp l Update*
⚡ देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असतानाच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गोव्यानंतर आणखी दोन राज्य कोरोनामुक्त झाली आहेत.
💁♂️ *राज्य* : गोवा देशातील ग्रीन झोन ठरणारे पहिलं राज्य ठरले, त्यानंतर आता मनिपूर आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यांनी कोरोनाच्या विळख्यातून सुटका केली आहे. एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच गोवा, त्रिपुरा व मनिपुर या राज्यांनी कोरोनावर मात केली आहे.
👀 त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी ट्विट करून राज्य कोरोनामुक्त झाल्याची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, त्रिपुरात कोरोनाचे दोन रुग्ण होते. हे दोन्ही रुग्ण बरे झाल्याने त्रिपुरा राज्य आता कोरोनामुक्त झाले आहेत.
🙏🏻 *आभार* : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिपलब कुमार देब यांनी याविषयी माहिती देताना, हॉस्पिटल कर्मचारी, पोलीस दल आणि सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *संगमनेरमधील कोरोनाबाधित तबलिगीच्या कार्यक्रमातील...*
*LetsUp | Ahmednagar*
💫 संगमनेरात सापडलेल्या चौघे कोरोनाबाधित हे विदेशी नागरिक आहेत. हे तबलिगीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर विविध भागातून प्रवास करत ते संगमनेर शहरात दाखल झाले होते.
👉 १ एप्रिलला रहेमतनगर परिसरात पोलिसांना हे विदेशी चौदा नागरिक आढळले असून हे विदेशी नागरिक नेपाळमधील आहेत. यातीलच चौघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
⚡ त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून ‘कोरोनामुक्त’ झाल्याच्या अविर्भावात मनसोक्त फिरणार्या संगमनेरकरांच्या हृदयाचा ठोका चुकला आहे.
👉 हे चौदा विदेशी नागरिक चंदनापुरी घाटातील रुग्णालयात ‘क्वॉरंटाईन’ करण्यात आले होते.
📍 त्यातील चौघांची दुसरी चाचणी सकारात्मक (पॉझिटीव्ह) आल्याने संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३७ वर पोहोचली आहेे.
📌 दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून संगमनेर शहर १४ दिवस बंद करण्यात येत आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *त्यामुळे ग्राहक, व्यापारी हैराण...*
*LetsUp | Pune*
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने शहरातील मुख्य भाजी मंडई बंद ठेवून ठिकठिकाणी मोकळ्या मैदानात तात्पुरत्या स्वरुपात मंडई सुरू केल्या आहेत.
परंतु, मंडईची वेळ भर दुपारच्या उन्हात असल्याने नागरिक आणि व्यापार्यांची उन्हात थांबण्याची वेळ येत आहे.
भाजी विक्रेत्यांना मांडव देखील पालिकेने घालू न दिल्याने भाज्याही उन्हाने लवकरच खराब होत आहेत. त्यामुळे भाजी खरेदी करताना नागरिकांच्या तक्रारीही वाढत आहेत.
सध्या पुण्यासह पिंपरी चिंचवड शहर सील करण्यात आले आहे. या परिस्थितीत दिलेल्या वेळातच अत्यावश्यक खरेदीसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.
त्यासाठी सकाळी १० ते २ या वेळातच मोकळ्या जागेतील मंडई सुरु ठेवण्यात आली आहे.
मात्र या मंडईत असलेल्या व्यापार्यांना डोक्यावर छत्री देखील उभारण्यास महापालिकेने मनाई केली आहे.
या वेळातच उन्हाची तीव्रता अधिकाधिक असल्याने भर उन्हात भाजी विक्री करताना व्यापार्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🎰 *खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम*
💰 *SHOWLION* मिळवा लाखों जिंकण्याची संधी...
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
🎳 खेळा *BEST ONLINE CASINO* स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!*
🤩🤩🤩🤩🤩
👨💻 *FREE ₹500 ON SIGNUP!*
🤹♀🤹♀🤹♀🤹♀🤹♀
🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा!
🎟 तर, मग विचार कसला करता!
🥳 *नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा :* 👉 https://urlzs.com/JqThM
(Advt)
6 624
💥 *देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 21 हजारांवर*
*LetsUp | Corona Live*
💫 जगभरासह देशात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून देशभरातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या आता २१ हजार ७००, तर २४ तासात ३४ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे.
✨ देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या बुधवारी ६५२ झाली असून बाधितांची संख्या २० हजार ४७१ इतकी झाली.
⚡ मंगळवारच्या तुलनेत बळींच्या संख्येत ४९ ने तर संसर्ग झालेल्यांच्या संख्येत १९८६ ने वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
👉 कोरोनाच्या सक्रीय प्रकरणांची संख्या १५ हजार ८५९ इतकी असून ३९५९ लोक बरे होऊ त्यांनी सुटी देण्यात आली आहे.
📌 दरम्यान, एक रुग्ण स्थलांतरित झाला असून आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी १९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
👮 *गावी जाणारे नागरिक पोलिसांच्या ताब्यात*
*LetsUp I Nashik*
💁♂️ राज्यात सर्वत संचारबंदी असल्याने मोलमजुरी, श्रमिक आणि होतकरू नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदी काळात हाताला काम नसल्याने अनेक जण गावी जाण्यासाठी इच्छुक आहे. अशाच मुंबईहुन मध्यप्रदेश मधील आपल्या गावी जाण्यासाठी शेकडो नागरिक हे नाशिक मार्गे पायी जात होते.
🧐 *प्रकरण काय? :*
▪️ उड्डाण पुलावरुन हे नागरिक जात असताना ही बाब मुंबई नाका पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच या नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. यात महिलांचाही सहभाग लक्षणीय आहे.
▪️ शेकडोच्या संख्येने आलेल्या या सर्व नागरिकांना गंगापूर रोडच्या आनंदवली इथं तयार करण्यात आलेल्या शेलटरमध्ये हलवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
▪️ काही दिवसांपूर्वी पहाटेच्या सुमारास मुंबईहून आलेल्या कंटेनर मधील 400 लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सुद्धा गावी जात असताना अंबड पोलिसांनी त्यांना शेलटर मध्ये प्रस्थापित केले होते. त्यापैकी एका जणाला 15 दिवसांनी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
📍 दरम्यान, आता नव्याने ताब्यात घेतलेल्या लोकांची सुद्धा तपासणी महापालिका प्रशासनाला करावी लागणार आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप :* http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *संगमनेर हॉटस्पॉट केंद्र जाहीर...*
*LetsUp | Ahmednagar*
संगमनेर शहर हॉटस्पॉट केंद्र जाहीर करण्यात आले असून त्याच्या परिघात २ किमीचा परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केलेला आहे.
शहरात ०४ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने या भागातील प्रतिबंधात्मक आदेशात ७ मेपर्यंत करण्यात आले आहे.
त्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तु विक्री इत्यादी ७ मे रोजीच्या रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
या क्षेत्रातील नागरीकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेशात म्हटले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ध्वनिक्षेपकद्वारे आदेशाची माहिती द्यावी. कंट्रोल रुम स्थापन करुन २४ x७ कार्यरत ठेवावी.
सदर ठिकाणी ३ ते ४ अधिकारी/कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येवून प्रत्येक शिफ्टमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे मोबाईल क्रमांक प्रसिध्द करण्यात यावेत.
जिवनावश्यक वस्तुंचे सुक्ष्म नियोजन करावे, असे या आदेशात म्हटले असून या क्षेत्रातील इतरत्र कर्तव्यार्थ असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधीत क्षेत्रातून कर्तव्याच्या ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास, अशा व्यक्तींची त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी वास्तव्याची सुविधा संबंधित आस्थापनांनी उपलब्ध करुन दयावी, असेही आदेशात म्हटले आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🗺️ *'हा' भाग 'बफर झोन' म्हणून घोषित*
*LetsUp I Beed*
😷 बीड जिल्हयातील आष्टी तालुक्याच्या लगत असलेल्या जामखेड ता.जि.अहमदनगर हद्दीमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळून आलेला आहे.
💁♂️ बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पुढील प्रमाणे फौजदारी प्रक्रिया दंड सहिता 1973 चे कलम 144 जामखेड तालुक्यातील या गावापासून 04 कि.मी. परिसरावरील (आष्टा ह.ना., शिदेवस्ती, चिंचपुर, भातोडी.कन्हेवडगांव व मातकुळे) हया गावांचा परिसर 'बफर झोन' म्हणून घोषित करण्यात येत आहेत.
👉 वरील सर्व गावे अनिश्चित कालावधीसाठी पुर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात येत आहे. बीड जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिताचे कलम 144 (1) (3) मनाई प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप :* http://bit.ly/Letsupapp
6 624
😷 *सातारा जिल्हा: कोरोना अपडेट्स*
*LetsUp I Satara*
💁♂️ *दिनांक 23.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*
■ क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा -524
■ कृष्णा हॉस्पीटल, कराड-351
■ एकूण दाखल -875
■ प्रवासी-140, निकट सहवासीत 556, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-179 = एकूण 875
■ 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-12
■ कोरोना नमुने घेतलेले एकूण-887
■ कोरोना बाधित अहवाल -21
■ कोरोना अबाधित अहवाल -772
■ अहवाल प्रलंबित -77
■ डिस्चार्ज दिलेले-775
■ मृत्यू- 2
■ सद्यस्थितीत दाखल-98
■ आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 22.4.2020) -1173
■ होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -1173
■ होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -741
■ होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –432
■ संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-197
■ आज दाखल-9
■ यापैकी डिस्जार्ज केलेले-110
■ यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-10
■ अद्याप दाखल -77
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप :* http://bit.ly/Letsupapp
6 624
😷 *जिल्ह्यात आजपर्यंत ६२३४ व्यक्तींची तपासणी*
*LetsUp I Latur*
💁♂️ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत २३ एप्रिल २०२० रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत कोरोना (कोविड १९) बाह्यरुग्ण विभागात ५८ व्यक्तींची तपासणी केली.
👉 आजपर्यंत ६२३४ व्यक्तींची तपासणी केली असून त्यापैकी २०१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील १९२ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले.
🧐 *काय आहे परिस्थिती? :*
▪️ पॉझिटीव्ह आलेल्या ८ रुग्णांची १४ दिवसानंतर तपासणी केली. त्या सर्व ८ रुग्णांचे अहवाल १८ एप्रिल २०२० रोजी निगेटिव्ह प्राप्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
▪️ एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित आहे. २०१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी १९२ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. नऊ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
▪️ पॉझिटिव्ह आढळलेले व्यक्ती परराज्यातील आहेत. तेही निगेटिव्ह आल्याने सध्या लातूर जिल्ह्यात कोरोना साथीची परिस्थिती फारसी चिंताजनक नाही, अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्ष प्रमुख तथा औषध वैद्यकशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मारुती कराळे यांनी दिली.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप :* http://bit.ly/Letsupapp
6 624
💁♂ *Letsup I General Knowledge*
▪️ कोणती संस्था कोविड-19 जीनोम सीक्वेन्सिंग प्रक्रिया चालविणारी भारतातली द्वितीय संस्था ठरली?
उत्तर : गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर
▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘एअर इव्हॅक्युएशन पॉड’ विकसित केले आहे?
उत्तर : भारतीय नौदल
▪️ कोणत्या संस्थेनी स्वयंचलित ‘मिस्ट बेस्ड सॅनिटायझर डिस्पेन्सिंग युनिट’ हे उपकरण विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था
▪️ केंद्र सरकारने नेमलेल्या कोविड19 साठीच्या उच्चस्तरीय कृती दलाचे नेतृत्व कोणाकडे दिले गेले आहे?
उत्तर : विनोद पॉल आणि के. विजयराघवन
▪️ निधन झालेल्या जीन डिच यांनी कोणत्या कार्टून मालिकेचे दिग्दर्शन केले होते?
उत्तर : टॉम अँड जेरी
▪️ कोविड-19 याच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी कोणत्या संस्थेनी ‘कोविड FYI’ संकेतस्थळ तयार केले?
उत्तर : IIM कोझिकोड
▪️ कोणते राज्य कोविड19 जलद चाचणी पद्धतीचा अवलंब करणारे देशातले पहिले राज्य ठरले?
उत्तर : राजस्थान
▪️ कोणत्या राज्य सरकारचा ‘आयू’ अॅपसोबत करार झाला आहे?
उत्तर : राजस्थान
▪️ कोणत्या कंपनीने “प्लाझ्मा बॉट” उपकरण तयार केले?
उत्तर : मायक्रोसॉफ्ट
▪️ ‘जिओटॅग’ प्राप्त सामुदायिक स्वयंपाकगृह असलेले देशातले पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : उत्तरप्रदेश
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🎰 *खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम*
💰 *SHOWLION* मिळवा लाखों जिंकण्याची संधी...
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
🎳 खेळा *BEST ONLINE CASINO* स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!*
🤩🤩🤩🤩🤩
👨💻 *FREE ₹500 ON SIGNUP!*
🤹♀🤹♀🤹♀🤹♀🤹♀
🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा!
🎟 तर, मग विचार कसला करता!
🥳 *नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा :* 👉 https://urlzs.com/JqThM
(Advt)
6 624
🧐 *'पालघरच्या घटनेचे राजकारण नको'!*
*LetsUp l Update*
पालघरमध्ये झालेले हत्यांकांड अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. अशी घटना घडायला नको होती. या घटनेचा आणि करोनाचा काहीही संबंध नाही. काही लोक आता या घटनेचे राजकारण करत आहेत.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचं चित्रं निर्माण केले जात असून हे चुकीचे आहे, असे सांगतानाच पालघरच्या घटनेचे राजकारण करू नका, राजकारण नंतरही करता येईल. कोरोनाच्या संकटाविरोधात एकजुटीने लढू या, अशा शब्दांत शरद पवार यांनी विरोधकांना टोलवले.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🗣️ *टेस्टिंग लॅबवरून श्रेयवाद सुरू*
*LetsUp I Nashik*
😷 नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या संशयित रुग्णांचे तपासणी अहवाल हे धुळे आणि पुण्याला पाठविण्यात येत होते. परिणामी अहवाल येण्यास उशीर होत होता.
👉 नाशिक शहरात काल नागपूरच्या आयुर्विज्ञान संस्थेने कोरोना तपासणी लॅबला अखेर परवानगी दिली आणि अखेर कोरोना टेस्टिंग लॅब ही नाशिकला आली.परंतु या लॅबवरून आता श्रेयवाद सुरू झाला आहे.
🧐 *श्रेयवादाची लढाई :*
▪️ नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रकडे पाठपुरावा करून या लॅब ला मंजुरी मिळवून दिली, अशा पोस्ट शिवसेनेकडून सोशल मीडियावर टाकण्यात आल्या आहेत.
▪️ तर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या समर्थकांनी सुद्धा सेनेवर पलटवार करत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याच पाठपुराव्यामुळे या लॅबला मान्यता देण्यात आल्याचा गाजावाजा केला आहे.
▪️ तर केंद्रात सत्ता असलेल्या भाजपाच्या मध्य नाशिकमधील आमदार देवयानी फरांदे यांनीही सेना-राष्ट्रवादीच्या सोशल वॉरमध्ये उडी घेत आपल्याच सततच्या पत्र व्यवहारामुळे ही लॅब नाशिकला आणण्यात यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
📍 दरम्यान, लॅब आणण्यासाठी राजकीय पातळीवर श्रेयवादाची लढाई असली तरी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सर्वच लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🧐 *पार्किंगवरून दोन सख्ख्या भावांची हत्या!*
*LetsUp l Mumbai*
⚡ मुंबईतील शिवडी येथे दुचाकी पार्किंगवरून झालेल्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली असून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
💁♂️ शिवडी येथील हनुमान रोडवरील चाळीत राहणाऱ्या पटेल आणि शेख कुटुंबात सोमवारी रात्री दुचाकी पार्क करण्यावरून जोरदार भांडण झाले. ही दोन्ही कुटुंबं शेजारी राहतात.
👀 त्यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी रात्री सुरू झालेल्या वादातून हाणामारी झाली. शेख कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या चाकूहल्ल्यात शाहिद रजाक पटेल (वय 20), साहिल रजाक पटेल (वय 16) आणि अदनान पटेल हे तिघे जखमी झाले.
📌 जखमींना केईएम रुग्णालयात दाखल केले मात्र, उपचारादरम्यान शाहिद आणि साहिल यांचा मृत्यू झाला.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💁♂️ *'त्या' १८ जणांचे अहवाल निगेटिव्ह*
*LetsUp l Nanded*
भोकर तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील रहाटी तपासणी नाक्यावर एका कोरोना पाॅझिटिव्ह ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह १८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
आंध्र प्रदेशातील करीमनगर येथील ट्रक चालक आंबा घेऊन दि.१६ एप्रिल रोजी पहाटे भोकर तालुक्यातील रहाटी चेकपोस्टवर आला होता. पुढे तो बुलढाणा आणि नाशिक येथे गेला. पोलिसांनी चेकपोस्टवर त्याची तपासणी केली होती.
आंबा उतरविल्यानंतर तो पुन्हा परतीच्या प्रवासासाठी दि.१८ एप्रिल रोजी याच तपासणी नाक्यावरून जात होता. तत्पूर्वी आंध्र पोलिस त्या ट्रक चालकाचा शोध घेत असल्याची माहिती भोकर पोलिसांना मिळाली.
ट्रक चालकाला पकडून आंध्र पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ट्रक चालकाच्या संपर्कात आलेल्या भोकर येथील ३ पोलिस अधिकारी, ९ पोलिस कर्मचारी, २ होमगार्ड एक स्वयंपाकी.
आणि आरटीओ तपासणी नाक्यावरील ३ कर्मचारी अशा १८ जणांचे नमुने घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. सोमवारी या १८ जणांसह अन्य अहवालही निगेटिव्ह आले आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
