LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
🐯 *जागतिक व्याघ्र दिन : जाणून घ्या या काही खास गोष्टी*
*LetsUp | Special*
💁♂️ वाघांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रजातीला जपण्यासाठी जागतिक स्तरावर 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो.
😍 *जागतिक व्याघ्र दिन निमित्त जाणून घ्या वाघांबद्दल इंटरेस्टिंग गोष्टी*
● वाघ हा पृथ्वी स्तरावर तिसरा मोठा मांसाहारी प्राणी आहे.
● सायबेरियन टायगर हा सुमारे 660 पौंड वजनाचा समजला जातो.
● जंगलात मोकळ्या फिरणार्या वाघांपेक्षा बंदी असलेले वाघ अधिक आहेत.
● जगभरात प्राणीसंग्रहालय, सर्कस तर अमेरिकेमध्ये घरातही वाघ बंदिवान केले जातात.
● वाघ हा सिंहाप्रमाणे कळपात राहत नाही. तो बराच काळ एकटं राहणं पसंत करतो.
● वाघांमध्ये पुढच्या पायांच्या तुलनेत मागचे पाय अधिक लांब असतात. त्यामुळे त्यांना लांब झेप घेण्यास मदत होते.
● एकावेळात 30 फूट लांबीचा टप्पा ते ओलांडू शकतात. तर त्यांच्या शेपटीचा झुपका देखील वैशिष्ट्यपूर्ण असतो.
● कोणत्याही दोन वाघांच्या अंगावर सारखेच पट्टे नसतात, ते प्रत्येकामध्ये वेगवेगळे असतात.
● जंगलात राहणार्या वाघाचं आयुष्यमान 10-15 वर्ष असतं. तर बंदी केलेले वाघ 20 वर्षांपर्यंत जगू शकतात.
● वाघांच्या जीभेवरील लाळेत अॅन्टी सेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे जखमेला जीभ लावून ते जखम ठीक करू शकतात.
● पाणवठ्याजवळ वाघ जास्त आढळतात. तर दिवसभरात 18 तास ते झोपू शकतात.
● सायबेरियन टायगर आपण वाचवू शकलो नाही तर पुढील 10 वर्षात ते संपू शकतात.
💫 *विशेष* : भारतामध्ये वाघांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी विशेष मेहनत घेतली जात आहे.
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💁♂️ *राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 2 लाखांच्या उंबरठ्यावर*
*LetsUp | Corona Live*
⚡ राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 484 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
👍 दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यत एकूण 1 लाख 94 हजार 253 झाली आहे.
😷 आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 17 लाख 37 हजार 716 नमुन्यांपैकी 3 लाख 47 हजार 502 नमुने पॉझिटिव्ह (20 टक्के) आले आहेत.
🏠 राज्यात 8 लाख 74 हजार 267 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 44 हजार 222 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🎰 *खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम*
💰 *Jungle Raja* वर मिळवा लाखों जिंकण्याची संधी...
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
🎳 खेळा *BEST ONLINE CASINO* स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!*
🤩🤩🤩🤩🤩
👨💻 *FREE ₹500 ON SIGNUP!*
🤹♀🤹♀🤹♀🤹♀🤹♀
🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा!
🎟 तर, मग विचार कसला करता!
🥳 *नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा :* 👉🏻 https://bit.ly/3ejZ3fW
(Advt)
6 624
💥 *अबब! कोरोनाचा कहर काही थांबेनाच...*
*LetsUp | Corona Live*
💫 जगभरासह देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिकच वाढत चालला असून देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या 11 लाख 92 हजारांवर पोहचली आहे.
⚡ तर देशभरात 28 हजार 732 जणांचा कोरोना विषाणूने मृत्यू झाला असून 7 लाख 53 हजारांपेक्षा अधिक जण ठणठणीत बरे झाले आहेत.
📍 तसेच देशभरातील 4 लाख 11 हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु असून अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत आहे.
📌 दरम्यान, देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार चोवीस तास अविरत कार्यरत आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💫 *राज्यसभा खासदारांचा शपथविधी संपन्न*
*LetsUp l Update*
⚡ राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात आज (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली.
💁♂️ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेस नेते राजीव सातव, भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले, शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी आणि भाजपच्या भागवत कराड या महाराष्ट्रातील सहा खासदारांनी शपथ घेतली.
🧐 आठवले आणि उदयनराजे यांनी इंग्रजी, शरद पवार यांनी हिंदी, तर कराड, सातव, चतुर्वेदी यांनी मराठीतून शपथ घेतली.
👉 *अनुपस्थित* : महाराष्ट्रातून सात जणांची मार्च महिन्यात खासदारपदी नियुक्ती झाली. त्यापैकी सहा जणांनी शपथ घेतली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित नव्हत्या.
👀 उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यांच्या नावाचा पुकारा केला, मात्र त्या गैरहजर असल्याचे समजल्यानंतर शरद पवार यांना शपथ घेण्यासाठी बोलवले.
📌 *आठवण* : उदयनराजेंनी इंग्रजीत शपथ घेतल्यानंतर 'जय भवानी जय शिवाजी' असा नारा दिला, मात्र सदनात कोणत्याही घोषणा चालत नाहीत, हे यापुढे लक्षात ठेवा, अशी आठवण व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना करुन दिली.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💫 *दिलासा! देशात अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक*
*LetsUp l Update*
⚡ लॉकडाउन करुनही भारतात अजूनही कोरोना नियंत्रणात आला नाही. उलट दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गत २४ तासात संपूर्ण देशभरात ३७ हजार १४८ जणांना कोरोनाची लागण झाली असून ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे.
💁♂️ *समाधानकारक* : कोरोनाची रुग्ण संख्या वाढण्यामागे चाचण्या हे देखील एक कारण आहे. देशभरात चाचण्यांचा वेग वाढवल्याने कोरोना बाधित सापडण्याचे प्रमाणही वाढत आहे. मात्र देशात समाधानाची बाब म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे.
👉 *पूर्णपणे बरे* : आतापर्यंत एकूण ११ लाख ५५ हजार १९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ४ लाख दोन हजार ५२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. म्हणजे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, तर सात लाख २४ हजार ५७८ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.
📌 *मृत्यू* : देशात आतापर्यंत कोरोनामुळे २८ हजार ८४ जणांना जीव गमवावे लागले आहेत. सोमवारी देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे बाधित आढळले असून, ६८१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *राजीव गांधी यांची हत्या करणाऱ्या नलिनीचा तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न*
*LetsUp l Update*
⚡ माजी पंतप्रधान राजीव गांधींची यांची हत्या करणाऱ्या नलिनी हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सोमवारी रात्री नलिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती तिच्या वकिलाने दिली आहे.
💁♂️ नलिनी गेल्या २९ वर्षांपासून तामिळनाडूमधील वेल्लोर कारागृहात शिक्षा भोगत आहे. तिथेच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
🧐 *कारण* : २९ वर्षामध्ये प्रथमच नलिनीने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या वकिलाने सांगितले आहे. नलिनीचे तिच्यासोबत जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्यासोबत भांडण झाले होते.
👀 इतर कैद्यांनी हे प्रकरण जेलरपर्यंत नेल्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वकिलाने सांगितले आहे. यावेळी त्यांनी यामागील खरे कारण समोर आले पाहिजे अशी मागणीही केली आहे.
🙏 *दुसऱ्या कारागृहात हलवण्याची मागणी* : दरम्यान राजीव गांधींच्या हत्येच्या कटात सहभागी दोषी नलिनीसोबत कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तिच्या पतीने फोन करुन नलिनीला दुसऱ्या कारागृहात हलवण्याची मागणी वकिलाकडे केली आहे. यासाठी लवकरच कायदेशीर विनंती करणार असल्याची माहिती वकिलाने दिली आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
😍 *ग्राहक संरक्षण कायदा आजपासून देशभर लागू*
*LetsUp | National*
⚡ संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेला Consumer Protection Act 2019 आज (20 जुलै) पासून लागू करण्यात आला आहे.
💁♂️ या नव्या कायद्यामुळे ग्राहकांना संरक्षण मिळणार आहे, सोबतच ग्राहक हक्क संरक्षण न्यायलयांना देखील नियमांचे उल्लंघन करणार्या उत्पादक, विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यासाठी अधिक अधिकार मिळणार आहेत.
🧐 *जाणून घ्या ग्राहकांना मिळणारे अधिकार?*
▪️ जनहित याचिता आता कंज्युमर फोरम मध्ये दाखल करता येणार
▪️ नव्या कायद्यामध्ये आता ऑनलाईन तसेच टेलिशॉपिंग कंपन्यांचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला आहे.
▪️ खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये बनावट केल्यास कंपन्यांना दंड ठोकण्याचा, तुरूंगवासाच्या शिक्षेची सुविधा
▪️ कंज्यूमर मीडिएशन सेल ची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही पक्ष सहमतीने मीडिएशन सेलमध्ये जाऊ
शकतात.
▪️ कंज्युमर फोरम मध्ये 1 कोटी रूपयांपर्यतच्या केस चालवल्या जाऊ शकतात.
▪️ स्टेट कंज्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमीशन मध्ये 1 ते 10 कोटींच्या केस चालवल्या जाऊ शकतात.
▪️ नॅशनल कंज्यूमर डिस्प्यूट रिड्रेसल कमीशन मध्ये 10 कोटींच्या वरील केस चालवल्या जाऊ शकतात.
▪️ कॅरी बॅगचे पैसे आकारणं कायदेशीररित्या चूकीचे आहे.
▪️ सिनेमा हॉलमध्ये खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या वाढीव किंमतीची तक्रार आल्यास कारवाई होऊ शकते.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
*चौघांच्या आत्महत्येप्रकरणी सावकाराला अटक*
*LetsUp | Solapur*
👉 कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी व दोन लहान मुलांना गळफास लावून त्या तिघांचा खून करून अमोल जगताप याने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
👉 याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सावकार व्यंकटेश पंपय्या डंबलदिनी वय 40, रा. हैदराबाद रोड याला शुक्रवारी अटक केली.
👉 जुना पुणे नाका येथील हांडे प्लॉटमध्ये रजपूत वकिलांच्या घरात भाड्याने राहणारे अमोल अशोक जगताप वय 37 हे तालुका उत्तर सोलापूर येथील कोंडी हद्दीत गॅलेक्सी ऑकेस्ट्रा बार चालवित होता.
👉 लॉकडाऊनमुळे सर्व धंदे बंद पडल्यावर अमोल जगताप यांचा ऑकेस्ट्रा बारही बंद होता. त्यामुळे त्यांना कर्ज काढावे लागले होते.
👉 जवळपास 6 लाख रुपये कर्ज झाल्याने अखेर आणखी किती कर्ज काढावयाचे, असा विचार करून अमोल जगताप याने 13 जुलै रोजी सायंकाळी पत्नी मयुरी अमोल जगताप वय 27 हिचा नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून, तर मुलगा आदित्य वय6 व लहान मुलगा आयुश वय 4 या दोघांचा साडीने गळा आवळून खून केला.
👉 त्यानंतर अमोल याने स्वत: घरातील छताच्या हुकास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद मृत अमोल यांचे बंधू राहुल अशोक जगताप यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात दाखल केली.
👉 यावरून पत्नी व दोन मुलांचा खून करून आत्महत्या केल्याप्रकरणी मृत अमोलवर गुन्हा दाखल झाला होता.
👉 याप्रकरणी अमोल याला कर्ज दिलेल्या सावकारास अखेर शुक्रवारी अटक करण्यात आली आहे अधिक तपास पोलिस निरीक्षक संजय साळुंखे हे करत आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *आरक्षण; प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी*
*LetsUp | Update*
💫 अनुसूचित जाती आणि जमातीला देण्यात येणारं राजकीय आरक्षण रद्दच करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
💁♂️ *आंबेडकर म्हणाले :*
▪️ व्होट बँकेचे राजकारण आणि सत्ता जाण्याच्या भीतीने हे आरक्षण रद्द करण्याची कोणत्याच राजकीय पक्षात धमक नाही.
▪️ संविधानात दहा वर्षाच्या आरक्षणाची जी तरतूद आहे, ती केवळ राजकीय आरक्षणाबाबतची आहे. इतर आरक्षणाबाबतची नाही.
▪️ लोकसभा आणि विधानसभेत अनुसूचित जाती आणि जमातीला राजकीय प्रतिनिधीत्व मिळावं म्हणून हे आरक्षण ठेवण्यात आले.
▪️ मात्र, त्यानंतर १९५४ मध्ये स्वत: बाबासाहेब आंबेडकरांनी या आरक्षणाची तरतूद काढून टाकण्याची मागणी केली होती.
📌 राजकीय आरक्षणाची गरज नसल्याचे बाबासाहेब म्हणाले होते, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *देशांत दिवसांत नवे 29 हजार बाधित*
*LetsUp l Corona Live*
⚡ देशात रविवारी एका दिवसांत 28 हजार 637 नवे कोरोना बाधित आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या साडे आठ लाखाच्या घरात पोहोचली.
💁♂️ *मृतांची संख्या* : त्यापैकी दोन लाख 92 हजार 258 सक्रिय बाधित असून बरे झालेल्यांची संख्या पाच लाख 34 हजार 621 आहे. तर मृतांची संख्या 22 हजार 674 वर पोहोचली आहे.
👀 *हॉटस्पॉट* : महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. राज्यातील बाधितांची संख्या दोन लाख 46 हजारवर पोहोचली असून एक लाख 36 हजार 985 जण बरे झाले आहेत.
💫 *बरे होण्याचे प्रमाण* : देशांत बरे झालेल्यांचे प्रमाण 62.92 टक्के असून सक्रियांचे प्रमाण 10.22 टक्के आहे.
📌 11 जुलैपर्यंत एक कोटी 15 लाख 87 हजार 153 चाचण्या घेण्यात आल्या. तर 11 तारखेला एका दिवशी दोन लाख 80 हजार151 चाचण्या घेतल्याचे सांगितले आहे.
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *अट्टल गुन्हेगार पप्पू पडवळची निर्घृण हत्या*
*LetsUp | Pune*
💥 पुण्याच्या कोंढवा भागात घरात घुसून एका अज्ञात टोळक्याने अट्टल गुन्हेगार असलेल्या पप्पू पडवळ याची घरात घुसून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.
💁♂️ *जाणून घ्या घटना :*
▪️ घनश्याम उर्फ पप्पू पडवळ (रा. कोंढवा) असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
▪️ आज (शनिवारी) सकाळी एका अज्ञात टोळक्याने पप्पू पडवळ याच्या घरात घुसून कोयत्याने त्याच्यावर भीषण हल्ला केला.
▪️ या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला आहे. पप्पू पडवळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
▪️ या अगोदरच एका टोळीकडून त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता. पप्पू पडवळ हा अगोदर एक कार चालक होता.
▪️ त्यानंतर त्याने काही दिवसातच व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय सुरू केला, त्याच्यावरून त्याचे अनेकांशी वाद होते.
▪️ त्यातूनच हा प्रकार घडला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
📌 दरम्यान, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
👀 *'कोरोना व्हायरस पुर्णपणे नष्ट होणे अशक्य' : डब्ल्यूएचओ*
*LetsUp l Trending*
⚡ कोरोना व्हायरस सध्या तरी संपुर्णपणे नष्ट होणे अशक्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. डब्ल्यूएचओच्या इमर्जेंसी प्रोग्रामचे प्रमुख डॉ. माइक रयान यांनी हे वक्तव्य केले आहे. रयान म्हणाले की, कोरोना व्हायरस आता वेगाने पसरत आहे.
💁♂️ जिनिव्हामध्ये ऑनलाईन ब्रीफिंग दरम्यान डॉ. माइक रयान म्हणाले की, सध्याच्या स्थितीमध्ये असे वाटत नाही की व्हायरस पुर्णपणे नष्ट होईल. संसर्गाच्या क्लस्टरला थांबवून जग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला आणि पुन्हा लॉकडाऊन करण्याच्या स्थितीला रोखू शकते.
🗣️ रयान यांच्या मतानुसार, काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागू शकते. कारण संसर्गाच्या क्लस्टरमध्ये जंगलात आग लागते, त्याप्रमाणे संसर्ग पसरतो.
👉 अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे की, दुसऱ्या देशातून येणाऱ्यांमुळे तेथेही संसर्ग वाढू शकतो.
📌 डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, दशकातून एकदा येणारी महामारी वेगाने वाढत आहे, जगातील मोठ्या भागात यावर नियंत्रण मिळवलेले नाही.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *देशात सर्वात मोठी कोरोना रुग्ण वाढ*
*LetsUp l Corona Live*
⚡ दर तासाला एक हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण देशात आढळत आहेत. देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे.
💁♂️ *सर्वात मोठी वाढ* : देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाखाच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गत २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
👀 *मृत्यू* : देशात दोन लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत पाच लाख १५ हजार ३८६ रुग्ण बरे झाले आहेत. गत २४ तासांत ५१९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
👉 महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. आठ दिवसांपासून देशात दिवसाला २० हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.
📌 पाच दिवसांपासून देशात २५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या चार दिवसांत देशात एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
😍 *सव्वा लाख कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले*
*LetsUp | Corona Live*
⚡ राज्यात काल (08 जून ) रोजी कोरोनाच्या 4 हजार 634 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यत एकूण संख्या 1 लाख 23 हजार 192 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
🗣️ राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 55.06 टक्के एवढे झाले आहे; अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
🏥 दरम्यान, आज कोरोनाच्या 6 हजार 603 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 91 हजार 65 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
🧪 बुधवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या 11 लाख 91 हजार 549 नमुन्यांपैकी 2 लाख 23 हजार 724 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🧐 *म्हणून जुनी शनाया परत येतेय...!*
*LetsUp I Entertainment*
📍 झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' मध्ये जुनी शनाया म्हणजेच रसिका सुनील परतणार आहे.
💁♂️ यामुळे सध्या रसिकाही भलतीच खूश असून तिनेही एक हटके स्टाईलचे मास्क घालून आपल्या रिएन्ट्रीच्या बातम्यांना दुजोरा दिला आहे.
💫 अगोदर रसिकाने मालिका सोडल्यानंतर इशा केसकरने हा रोल केला. मात्र आता इशा सुद्धा वैयक्तिक कारणामुळे मालिका सोडणार असल्याने हा रोल पुन्हा एकदा रसिकाकडेच आला आहे.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर*
*LetsUp | International*
⚡ कोरोनावरून चीनसोबत असलेल्या वादामुळे अमेरिकेनं जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी याआधी दिली होती.
💁♂️ मात्र आता खरंच अमेरिकेनं औपचारिकता पूर्ण करून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.
🗣️ अमेरिकेचे खासदार बॉब मेनंडेझ यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली.
🧐 ते म्हणाले, "कोरोना साथीमुळे चीनसोबत असलेल्या वादामुळे अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून अधिकृतपणे बाहेर पडली आहे. अशी माहिती कार्यालयाकडून काँग्रेसला मिळाली आहे.''
🤔 *का घेतला निर्णय?*
👉 चीनने कोरोनाबाबत जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली आहे. चीनकडून कायम गोष्टी लपवल्या जात असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला.
👉 चीनला कोरोनावर उत्तर द्यावंच लागेल. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला.
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *मराठा आरक्षण; पंधरा जुलैला होणार निर्णय*
*LetsUp | Update*
💫 मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतिम सुनावणीसाठी येत्या १५ जुलै रोजीची तारीख सुप्रीम कोर्टाने निश्चित केली आहे.
✨ मराठा आरक्षण प्रकरणी आता दररोज सुनावणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला आहे.
📍 तसेच पक्षकारांनी आपले लिखित स्वरुपातील म्हणणे आणि युक्तिवादासाठी कालमर्यादा निश्चित करा, असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहे.
👉 मागील सुनावणीदरम्यान महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला होता. त्यावेळी मराठा आरक्षणाचा निर्णय रोखण्याला सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता.
📌 दरम्यान, यावर्षी मराठा समाजास आरक्षण मिळणार की नाही ? याबाबत सुप्रीम कोर्ट 15 जुलैला निर्णय घेणार आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💁♂️ *हवेतून कोरोना संसर्ग होत असल्याचे पुरावे नाहीत*
*LetsUp l Trending*
⚡ जगभरात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातच यावर कोणतेही औषध अद्याप तरी आलेले नाही. अनेक देशात कोरोना प्रतिबंधक औषध शोधण्यावर अहोरात्र संशोधन सुरु आहे.
💁♂️ *ठोस पुरावे* : दरम्यान कालच 32 देशांच्या शास्त्रज्ञांनी हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा दावा करत जागतिक आरोग्य संघटनेने सुधारित नियम जारी करण्याची मागणी केली होती. यावर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचा संसर्ग हवेतून होत असल्याचे ठोस पुरावे नाहीत.
🧐 *डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी यांची माहिती* : हवेतून कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट पुरावे नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या संसर्ग नियंत्रण विभागाच्या तांत्रिक प्रमुख डॉ. बेनडेट्टा अलेग्रांझी यांनी दिली आहे. 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या.
😷 *मास्क वापर* : हवेतून पसरणारा संसर्ग दीर्घकाळ हवेत टिकून राहत नसल्यामुळे मास्क वापरणे आणि एकमेकांपासून १ मीटरचे अंतर ठेवणे कायम ठेवावे, असे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अर्थात सी.एस.आय.आर.चे महासंचालक शेखर मांडे यांनी सांगितले आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *कोरोना रुग्णसंख्येत मुंबईने चीनला टाकले मागे*
*LetsUp l Update*
⚡ कोरोनाविषयी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. जगभर कोरोना पसरवणाऱ्या चीनलाही मुंबईने कोरोना संख्येत मागे टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
💁♂️ *चिंतेत मोठी वाढ* : मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची आकडेवारी चीनपेक्षाही अधिक असल्याची माहिती समोर आल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.
🧐 *मृत्यू* : चीनमध्ये सध्या ८५ हजार ३२० कोरोनाबाधित आहेत. तर मुंबईत हा आकडा ८५ हजार ७२४ एवढा आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाने ४ हजार ६४८ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत ४ हजार ९३८ लोक कोरोनाने दगावले आहेत.
👀 *सक्रिय रुग्ण* : चीनने काही दिवसांपूर्वी चीन कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही चीनमध्ये रुग्ण आढळले होते. चीनमध्ये एकूण ५०० ते ६०० रुग्ण सक्रिय आहेत. तर मुंबईत सध्या २३ हजार ६२४ रुग्ण सक्रिय आहेत.
📌 यापूर्वी मुंबईने कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चीनच्या वुहान शहरालाही मागे टाकले होते. आता संपूर्ण चीनपेक्षाही मुंबईत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
