LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
📣 *अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 155 जागांसाठी भरती*
*LetsUp l Job*
💁♂️ *पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे* :
● प्राध्यापक : 33
● अतिरिक्त प्राध्यापक : 19
● सहयोगी प्राध्यापक : 39
● सहायक प्राध्यापक : 64
📍 *नोकरी ठिकाण* : भोपाळ
💸 *फी* : General/ OBC: ₹2000/- (SC/ ST : ₹500/-, PWD : फी नाही)
🗓️ *ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत* : दि. 17 ऑगस्ट 2020
👩💻 *अधिकृत वेबसाईट पहा* : https://www.aiimsbhopal.edu.in/
🗞️ *जाहिरात पहा* : https://bit.ly/2AF5mNE
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🧐 *पालकांना फीसाठी दिला जातो कर्जाच्या कंपनीचा सल्ला*
*LetsUp l Nashik*
⚡ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून शाळाही सुरू झाल्या नसल्या तरीही सर्वच खासगी शाळांकडून फी वसुली सुरू झाली आहे. पुढच्या वर्गात प्रवेश निश्चित करण्यासाठी नाशिक शहरासह जिल्ह्यातील खासगी शाळांनी फी भरून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा, अन्यथा मुलाला अॅडमिशन मिळणार नाही, अशी धमकीवजा सूचना शालेय प्रशासनाने दिल्याने अनेक पालक बेजार झाले आहे.
👉 कोरोनाच्या काळात चार महिने लोकडाऊन असल्याने सर्वांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. तरीदेखील खाजगी शिक्षण संस्था फिची सक्ती करत असल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
👉 जुन्या पोलीस आयुक्त कार्यालय शेजारील सिल्वर ओक शाळेत असाच प्रकार सोमवारी घडला, नाशिकमध्ये शालेय शुल्कचा शालेय संस्थांकडून तगादा सुरू असल्याने पालक आक्रमक झाले आहे. कोरोना काळामध्ये आर्थिक परिस्थिती समाधानकारक नसल्याने सिल्वर ओक शाळेच्या प्रांगणात पालकांनी शालेय प्रशासनाच्या धोरणांबाबत गोंधळ घातला.
👉 धक्कादायक बाब म्हणजे शालेय शुल्काबाबत पालकांना शाळा व्यवस्थापाने चक्क कर्जाच्या कंपनीचा सल्ला दिल्याचं पालकांना सांगण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
👉 शालेय वर्ष सुरु झालेलं असलं तरी ऑफलाईन शाळा कधी सुरू होणार याबाबत पालकांसह विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळा नेमक्या कधी सुरू होणार या प्रश्नावर शाळा व्यवस्थापनाकडे समाधान कारक उत्तर नाही.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🧐 *कुवेतमधील 'एवढ्या' भारतीयांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती*
*LetsUp l International*
⚡ कुवेतमधील संसदेत परदेशी कामगारांशी संबंधित अप्रवासी कोटा विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. जर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यास या विधेयकामुळे सात ते आठ लाख भारतीयांना देश सोडावा लागू शकतो.
💁♂️ *प्रयत्न सुरु* : कुवेतमध्ये अधिक प्रमाणात परदेशी कामगार वास्तव्यास आहेत. कुवेतची लोकसंख्या ४३ लाख असून यापैकी परदेशी कामगारांची अधिक आहे. कुवेतमध्ये आपलेच नागरिक अल्पसंख्याक होत असून परदेशी कामगारांवर अवलंबून राहण्याची सवय कमी करण्यासाठी आता प्रयत्न सुरु आहेत.
👉 *भारतीयांची लोकसंख्या* : हे विधेयक घटनेला धरुन असल्याचे कायदेशीर व विधान समितीने संसदेत सांगितले आहे. यानुसार, भारतीयांची लोकसंख्या १५ टक्क्यांहून अधिक असू नये. विधेयक संबंधित समितीकडे वर्ग करण्यात यावे, जेणेकरुन सर्वसमावेशक आराखडा तयार केला जाईल, असे सांगितले आहे.
👀 या विधेयकामुळे जवळपास आठ लाख भारतीयांना कुवेत देश सोडावा लागू शकतो. कुवेतमधील भारतीयांची संख्या जवळपास १५ लाख आहे.
📌 *परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा* : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने कुवेतमध्ये परदेशी प्रवाशांविरोधात आवाज उठू लागला आहे. यानंतर तेथील स्थानिक प्रशासन आणि सरकारी अधिकाऱ्यांनी कुवेतमधून परदेशी नागरिकांची संख्या कमी करण्यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा केली.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *TiKToK सील; देशाला दिले 'अॅप चॅलेन्ज'*
*LetsUp । NewsUpdate*
💫 स्वावलंबी भारत आता इनोव्हेशन चॅलेन्ज लॉन्च करत असून मेड इन इंडिया अॅप तयार करण्यासाठी तांत्रिक, स्टार्टअप समुदायामध्ये मोठा उत्साह असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरद्वारे सांगितले.
💁♂️ *पंतप्रधान म्हणाले :*
▪️ जर तुमच्याकडे एखादे प्रोडक्ट असेल, किंवा काही चांगले करण्याचा दृष्टीकोन आणि क्षमता आहे, तर तुम्ही टेक कम्युनिटीला नक्कीच जोडले जाऊ शकता.
▪️ आता एक पाऊल पुढे टाकत भारताला अॅप निर्मितीत स्वावलंबी बनवण्याची योजना तयार करणे सुरू केले आहे.
📌 दरम्यान, या निर्णयानंतर चीनला तिळपापड झाला असून टिकटॉक आणि यूसी ब्राउझर या भारतात अत्यंत लोकप्रिय अॅपचाही यामध्ये समावेश आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *देशात आतापर्यंतची सर्वात मोठी कोरोना रुग्णवाढ*
*LetsUp l Corona Live*
⚡ देशात २४ तासांत २२, ७७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.
💁♂️ *एकूण रुग्ण संख्या* : रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने देशाच्या चिंतेत भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४८ हजार ३१५ इतकी झाली आहे.
🧐 *मृत्यू* : दोन लाख ३५ हजार ४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन लाख ९४ हजार २२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. २४ तासांत देशात ४४२ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत देशभरात १८, ६५५ लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
😷 *बरे होण्याचे प्रमाण* : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६०.७२ टक्के झाले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा १.५ लाखांनी जास्त आहे.
📌 गेल्या 24 तासांमध्ये २ लाख ४२ हजार ५७६ नमुना चाचण्या झाल्या असून, एकूण ९५ लाख ४० हजार ७४९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🗞 *जिल्हानिहाय ठळक घडामोडी*
*LetsUp | Jalgaon*
▪️धक्कादायक ! जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट ; एकाच दिवसात प्रथमच आढळले २०९ कोरोना बाधित रूग्ण
▪️निगेटीव्ह अहवालानंतर कोविडची लक्षणे
----------------------
*लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क* : 9623174556
----------------------
▪️जळगाव शहरात एका डॉक्टरसह २२ नवे बाधित
▪️जलवाहिनीच्या कामाबाबत दोन्ही गटाच्या नगरसेवकांकडून संताप चाळीसगाव पालिका सभा : ६० विषयांना मंजुरी, रस्त्यांचा प्रश्नही गाजला
▪️जिल्ह्यात ६०० आॅक्सिजन बेड १५ दिवसात कार्यान्वित - जिल्हाधिकारी अभिजित राऊत
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *इंदोरीकर महाराजांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश*
*LetsUp | Update*
💫 प्रसिद्ध समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर दाखल झालेल्या फिर्यादीवर आज सुनावणी झाली.
👉 इंदोरीकर महाराजांनी किर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याची फिर्यादी दाखल होती.
✨ न्यायालयाने फिर्यादीची दखल घेत ७ ऑगस्टला इंदोरीकर महाराज यांनी स्वतः न्यायालयासमोर हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.
⚡ इंदोरीकर महाराजांनी गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली होती.
👉 समितीने सर्व पुरावे पीसीपीएनडीटी सल्लागार समितीकडे सादर केले होते. जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील पुरावे दिले होते.
📍 सदरील तक्रार राज्य आरोग्य विभागाकडेदेखील करण्यात आली होती. पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकर महाराज यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करण्यास हिरवा कंदील दिला.
👉 तदनंतर १९ जूनला संगमनेर येथील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी फिर्याद आणि पुराव्याचे कागदपत्रे संगमनेरच्या प्रथम वर्ग -१ न्यायालयात दाखल केले होते.
📌 दरम्यान , निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) महाराज यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः ७ ऑगस्टला हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *राज्यात रुग्ण संख्येने गाठला उच्चांक!*
*LetsUp l Corona Live*
⚡ राज्यात पुन्हा रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. दिवसभरात ५ हजार ५३६ नवीन रुग्ण आढळल्यांनी नोंद झाली आहे. तर एकूण रुग्णसंख्या आता २ लाखांच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत १ लाख ८० हजार २९८ रुग्ण सापडले आहेत. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
💁♂️ *मृत्यूदर* : राज्यात १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून, यापैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत. तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीत असून राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के आहे.
😷 *बरे होण्याचे प्रमाण* : दिवसभरात २२४३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ९३,१५४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१.६७ % एवढे झाले आहे.
👀 *मृत्यू* : मुंबईत दिवसभरात ६९ रुग्णांचे मृत्यू झाले असून, मीरा- भाईंदर-२६, ठाणे मनपा-१७, कल्याण-डोंबिवली- ४, जळगाव-३, पुणे-३, नवी मुंबई-१, उल्हासनगर-१, भिवंडी- १, पालघर- १. वसई विरार-१, धुळे-१ आणि अकोला शहरात १ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
📌 यामुळे राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ८,०५३ इतकी झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
🔎 *सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
👀 *देशात करोना रुग्णसंख्या 6 लाखांवर*
*LetsUp | Corona Live*
⚡ देशातील करोना रुग्णांची संख्या 6 लाखांवर (6,05,220) गेली आहे.
● कोरोना मुक्त : 3,59,896
● कोरोनाने मृत्यू : 17,848
● उपचार सुरू : 2,27,410
● बरे झाले : 3,59,896
💁♂️ *देशातील सर्वाधिक रुग्ण व टॉप 5 राज्य* :
● महाराष्ट्र : 1,80,298
● तामिळनाडू : 94,049
● दिल्ली : 89,802
● गुजरात : 33,318
● उत्तर प्रदेश : 24,056
🔎 *सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *देशभरात कोरोनाचा कहर काही थांबेना...!*
*LetsUp | Corona Live*
💫 जगभरासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशभरात आत्तापर्यंत 5 लाख 85 हजारांपेक्षा अधिक कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत.
✨ त्यापैकी 17 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले असून 3 लाख 47 हजार 979 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.
📍 तसेच देशभरात 2 लाख 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून कोरोनाने बरे झालेल्यांच्या संख्येत अधिक प्रमाणात वाढ झाली आहे.
📌 दरम्यान, केंद्र सरकारकडून अनलॉकचा दुसरा टप्पा सुरु झाला असून प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त सर्व बंद करण्यात आले आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🗞️ *'चीनकडून भारतीय वेबसाईट्स व वृत्तपत्रांवर बंदी*
*LetsUp | International*
⚡ भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमं तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत.
💁♂️ चिनी सरकारचं मुखपत्र असणाऱ्या वेबसाईट्स तसंच वृत्तपत्रांमधील माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात आहे.
🚫 यादरम्यान चिनी सरकारने नवी खेळी करत भारतीय प्रसारमाध्यमं आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत.
⚔️ 15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.
📌 चीनने भारतीय वृत्तपत्र आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचा निर्णय भारताने 59 अॅपवर बंदी घालण्याच्या आधीच घेतला असल्याचं रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
*'लालबागचा राजा'चा ऐतिहासिक निर्णय*
*LetsUp | Trending*
💁♂️ मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
👍 राज्यावर कोरानाचं संकट असल्याने यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना न करता 'आरोग्योत्सव' साजरा करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
🧐 कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशमूर्तींच्या उंचीवरुन लागणारी चढाओढ टाळत अनेक मंडळांनी मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
📌 मात्र, 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने थेट गणपती बाप्पाची मूर्ती न बसवण्याचे ठरवले आहे.
👏 त्याऐवजी 11 दिवस रक्तदान आणि प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवला जाणार आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *महाराष्ट्रात करोनाचा उद्रेक*
*LetsUp | Corona Live*
⚡ गेल्या 24 तासात महाराष्ट्रात एकूण 4878 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत.
🗣️ राज्यात आता एकूण कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 74 हजार 761 झाली असल्याचे माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
😱 गेल्या 13 दिवसांपासून राज्यात रोज 3000 हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत.
👍 एकीकडे कोरोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण जरी वाढले असले तरीही दुसरीकडे कोरोनापासून मुक्ती मिळवणार्या रुग्णांची संख्याही वाढती आहे.
🧪 नुकतीच एका रुग्णावर केलेली प्लाझ्मा थेरपी सुध्दा यशस्वी झाली आहे. तसेच करोनावर उपायकारक असणाऱ्या Remdesivir च्या 10000 vial इंजेक्शन महाराष्ट्र सरकार खरेदी करत आहे.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🚩 *मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल रखुमाईची महापूजा*
*LetsUp | Update*
⚡ कोरोनामुळे विविध नियम बंधनांमध्ये पंढरपुरात बुधवारी पहाटे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.
💁♂️ यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर आदी उपस्थित होते.
👏 'महाराष्ट्रासह अवघ्या देशाला कोरोनामुक्त कर आणि माझ्या बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे' असे साकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी आज घातले.
👴🏻 तसेच यंदाचा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मिळाला.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *नगर शहरात ०७, भिंगारमध्ये तिघांना कोरोना; जिल्ह्यात १९ रुग्ण*
*LetsUp l Ahmednagar*
⚡ जिल्ह्यात आज एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. नगर शहरातील ०७, भिंगारमधील ०३, संगमनेरमधील ०३, नगर तालुक्यातील ०२, श्रीरामपूर, पारनेर, जामखेड आणि शेवगावमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. भिंगार शहरात पहिल्यांदाच रुग्ण आढळून आले आहेत.
💁♂️ संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बागरोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुडके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, सिध्दार्थनगर येथील ३८ वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील ४० वर्षीय महिला बाधित आढळून आली.
👉 भिंगार येथील ३५ वर्षीय पुरुष, ४९ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय आणि ३८ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. याशिवाय आलमगीर (नागरदेवळे ग्रामपंचायत ता. नगर) येथील ३० वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.
👉 श्रीरामपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभूळ वाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभाय वाडी येथील ३२ वर्षीय व्यक्ती ( कल्याण वरून प्रवास करून आलेला) आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील ३० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🧐 *ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!*
*LetsUp l Update*
⚡ राज्य सरकारच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर न केल्यास किंवा तसे करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा कर्मचारी व अधिकाऱ्यांची पगारवाढ रोखली जाणार आहे.
📄 *पत्रकात म्हटले आहे* : मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाने याविषयीचे परिपत्रक जारी केले आहे. मंत्रलायासोबतच सरकारची सर्व विभागीय कार्यालये व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयातील सर्व कामकाज व पत्रव्यवहार मराठीतूनच व्हावेत. योग्य कारण असले तरच या नियमाला अपवाद केला जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.
💁♂️ *स्पष्ट* : मराठी भाषेचा वापर न करणाऱ्याला कर्मचाऱ्याला वा अधिकाऱ्याला सुरुवातीला इशारा दिला जाईल किंवा त्याच्याबद्दलच्या गोपनीय अहवालात याबद्दल नोंद केली जाईल, किंवा एक वर्षासाठी त्याची पगारवाढ थांबवली जाईल, असे पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
👀 *तक्रारी* : महाराष्ट्र सरकारच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा वापर सतत कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा नागरिकांसाठी सातत्याने सरकारी पातळीवरून सूचना व पत्रके काढली जात होती, तेव्हा ही बाब प्रकर्षाने पुढे आली.
📌 *अडचणी* : लॉकडाऊन काळात अपवाद वगळता बहुतांश सूचना या इंग्रजीत काढल्या गेल्या होत्या. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येत आहेत.
🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💁♂️ *TikTok, Helo सह 59 चायनीज अॅपवर बंदी*
*LetsUp | Breaking*
⚡ देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली 59 चायनीज मोबाईल अॅपवर बंदी घालायचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.
👉 TikTok आणि Helo या लोकप्रिय अॅप्सचा यात समावेश आहे. देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे.
📝 चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
🧐 देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 59 अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
📍 मालवेअर आणि शंकास्पद अॅप्सची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ही अॅप्स डाऊनलोड करू नये, असा इशारा देण्यात आला आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *चोवीस तासांत 77 पोलीस कर्मचारी बाधित*
*LetsUp | Corona Live*
💫 राज्यात मागील 24 तासांत पोलिस दलातील कोरोनाबाधितांची संख्या 77 पर्यंत पोहोचली असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
✨ महाराष्ट्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी असणाऱ्यांनाच कोरोना विषाणूने झपाटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
📍 राज्यातील कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला असून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
📌 दरम्यान, देशभरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अविरत कार्यरत आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
