MPSC SIMPLIFIED(official)
前往频道在 Telegram
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified
显示更多📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览
频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 715 名订阅者,在 教育 类别中位列第 5 604,并在 印度 地区排名第 11 972 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 715 名订阅者。
根据 08 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -73,过去 24 小时变化为 3,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 6.34%。内容发布后 24 小时内通常能获得 3.17% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 138 次浏览,首日通常累积 1 068 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified”
凭借高频更新(最新数据采集于 09 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
33 715
订阅者
+324 小时
-317 天
-7330 天
帖子存档
1840 मध्ये गव्हर्नर सर जेम्स कर्नाक यांनी कोणाला "जस्टिस ऑफ पीस" ही पदवी देऊन सन्मानित केले ?
गंगाधर गाडगीळ यांसारखे अर्थशास्त्राचे विद्वान कोणाला "आधुनिक भारताचे शिल्पकार" मानतात?
"बॉम्बे असोसिएशन"या संस्थेचे पहिले सरचिटणीस म्हणून कोणी काम पाहिले?
Watch "Simplified | Daily Current Affairs | 22 June 2021 | लोकसत्ता, म.टा, लोकमत, THE HINDU, INDIAN Express" on YouTube
https://youtu.be/PAeOYrq-cnc
🟪ध्वज सत्याग्रह
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 18 जून 2021 रोजी मध्यप्रदेशाच्या जबलपूर येथे ‘ध्वज सत्याग्रह’ चळवळीचा वर्धापन दिवस साजरा करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला.
🦋इतिहास.
‘ध्वज सत्याग्रह’ किंवा ‘झेंडा सत्याग्रह’ ही स्वातंत्र्यसैनिकांची चळवळ होती, जी 1923 साली झाली. या चळवळीची सुरुवात जबलपूर (मध्यप्रदेश) व नागपूर (महाराष्ट्र) येथे झाली होती.
भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकवण्याचा नागरिकांचा हक्क बजावण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. नागपूरशिवाय भारतातील इतर काही ठिकाणीही लोकांनी यात भाग घेतला होता.
🟪आंतरराष्ट्रीय योग दिवस: 21 जून.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात 21 जून 2021 रोजी सातवा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात आला.
2021 साली योग दिवस “योग फॉर वेल-बीइंग” या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला.
▪️योग दिनानिमित्त भारतातील कार्यक्रमे.
भारतीय टपालविभागाने त्याच्या 810 मुख्य टपाल कार्यालयांच्या माध्यमातून विशेष कॅन्सलेशन शिक्का याचे अनावरण केले.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने 'योग-एक भारतीय वारसा’ या अभियानाच्या अंतर्गत देशातील 75 सांस्कृतिक ठिकाणी हा दिवस साजरा केला. 45 मिनिटे योगाभ्यास त्यानंतर 30 मिनिटांचे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आले.
▪️योग विषयी.
निरोगी जीवनासाठी योग एक महत्वाचा भाग आहे. एक उपचार पद्धती म्हणून योग अतिशय लोकप्रिय ठरत आहे. अनेक रोगांवर उपचार म्हणून योगमध्ये क्षमता असल्याचे मोठ्या प्रमाणात झालेल्या वैज्ञानिक अभ्यासातून पुढे येत आहे.
भारतात 2016 साली 63 टक्के मृत्यू हे जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या असंसर्गजन्य रोगांमुळे झाले, असा जागतिक आरोग्य संघटनेचा दाखला आहे. जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या व्याधी टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण राखण्यासाठी योग हे सुलभ आणि प्रभावी साधन ठरते.
🟪हिंद-प्रशांत क्षेत्रातील स्थिरतेसाठी भारत-इटली-जपान यांची भागीदारी.
भारत, इटली आणि जपान ही राष्ट्रे हिंद-प्रशांत क्षेत्रात शांतता राखण्यासाठी आणि तेथील स्थिरतेसाठी एकत्र आली आहेत.
या त्रिपक्षी भागीदारीसाठी 18 जून 2021 रोजी करार करण्यात आला.
♦️जपान देश.
जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. टोकिओ हे देशाचे राजधानी शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.
आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत. यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते
♦️इटली देश.
इटली हे यूरोपच्या दक्षिणेकडील, आल्प्सपासून भूमध्य समुद्रात शिरलेले, बुटासह पायाच्या आकाराचे प्रजासत्ताक राष्ट्र आहे. हा देश यूरोप व आफ्रिका यांना जवळजवळ जोडणारा दुवा आहे. त्याच्यामुळे भूमध्य समुद्राचे दोन भाग पडतात. इटलीच्या सरहद्दी वायव्येकडे फ्रान्स, उत्तरेकडे स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि ईशान्येकडे यूगोस्लाव्हिया यांच्याशी संलग्न आहेत. इटलीची राजधानी रोम आहे. इटलीमघ्ये युरो / लिरा हे अधिकृत चलन आहे.
⭕️⭕️रिबेका ग्रीनस्पॅन: संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेच्या (UNCTAD) प्रथम महिला प्रमुख..⭕️⭕️
🌐रिबेका ग्रीनस्पॅन यांची संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेच्या (UNCTAD) महासचिव पदावर निवड झाली. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेने त्यांच्या नामांकनाला मंजूरी दिली.
🌐रिबेका ग्रीनस्पॅन या कोस्टा रिका देशाच्या अर्थशास्त्रज्ञ आहेत. ती संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषदेची (UNCTAD) पहिली महिला प्रमुख ठरली आहे.
🌀UNCTAD विषयी...
🌐संयुक्त राष्ट्रसंघ व्यापार व विकास परिषद (UNCTAD) याची स्थापना 30 डिसेंबर 1964 रोजी झाली. त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. संघटनेला 16 एप्रिल 1985 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेनी स्वीकारले आणि 22 डिसेंबर 2015 रोजी त्याला सुधारित केले गेले.
🌐ही संघटना व्यापार, गुंतवणूक आणि विकास मुद्दे संबंधित क्षेत्रातली एक प्रमुख संस्था म्हणून कार्य करते. सध्या, 194 राज्ये आणि देश UNCTAD चे सदस्य आहेत.
🌀संयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी...
🌐आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.
🌐1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.
🌐संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.
संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.
🌐UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.
🌐संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.
🌀संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -
🗝UN महासभा (General Assembly)
🗝UN सुरक्षा परिषद (Security Council)
🗝UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ECOSOC)
🗝UN सचिवालय
🗝UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि
🗝UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).
