mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
428
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+77 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
🔴 अर्थसंकल्प 2026-27 नुसार विविध तूटींचे प्रमाण पुढीलप्रमाणे अपेक्षित आहे -
राजकोषीय तूट - 4.30%
महसुली तूट - 1.50%
प्राथमिक तूट - 0.70%
परिणामकारक महसुली तूट - 0.30%
🔥 अर्थसंकल्प 2026-27 नुसार, शासनाच्या एकूण जमेपैकी सर्वाधिक जमा शासनास कर्जे व दायित्वे (24%) या घटकातून प्राप्त होणे अपेक्षित आहे.
🔴 विविध घटकांपासून शासनास प्राप्त होणारे उत्पन्न उतरत्या क्रमाने पुढील प्रमाणे असेल-
कर्जे व दायित्वे - 24%
आयकर - 21%
महामंडळ कर - 18%
वस्तू व सेवा कर - 15%
केंद्रीय उत्पादन शुल्क - 6%
#Updated Current Eco
सहकार घटक
पुणे जिल्हा सहकारी दूध संघाला दादा चे नाव देण्यात आले सहकार क्षेत्रामध्ये अजितदादांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. ((अजित दादा पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ कात्रज पुणे)) असे नाव देण्यात आले. ❤️❤️
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कृषी संबंधी सहकारी सोसायटी पुणे विभागात आहे व त्यामध्ये दुग्ध उत्पादक संघ यांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्र मध्ये एकूण सहकारी सोसायटी विचारात घेतल्यास गृहनिर्माण सोसायटी यांची संख्या जास्त आहे व सर्वाधिक कोकण विभागात आहे मुंबईमुळे कारण मुंबईमध्ये गृहनिर्माण सोसायटी यांची संख्या जास्त आहे.
ग्रॅमी पुरस्कार 👆👆◆ "Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama" या पुस्तकासाठी दलाई लामा यांना 'सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग' या श्रेणीत ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
+1
अमेरिका परस्पर शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करेल. भारतही अमेरिकेविरुद्धचे त्यांचे शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे शून्य करण्याच्या दिशेने त्याचप्रमाणे वाटचाल करेल.
#Updated Eco Current
पीएम धन-धान्य कृषी योजनेला (PM Dhan Dhanya Yojana)
योजनेला मंजुरी: 16 July 2025
6 वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100 जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित.
या योजनेअंतर्गत 100 जिल्हे विकसित करण्याची तरतूद 2025-26च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही योजना 11 विभागांमधील 36 विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासह स्थानिक भागीदारीद्वारे राबविली जाईल.
भविष्यात होत असलेल्या सर्वच परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारला जावु शकतो.
१) उपमुख्यमंत्री हे घटनात्मक पद नाही.
२) एका वेळी कितीही व्यक्ती उपमुख्यमंत्री होवु शकतात.
धन्यवाद 🙏
अर्थसंकल्प 2026/27 यानुसार सर्वाधिक अर्थ मंत्रालय व त्यानंतर संरक्षण मंत्रालय निधी देण्यात आला आहे.
कार्लोस अल्काराझने घडवला इतिहास
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न पार्क येथे स्पेनच्या कार्लोस अल्काराझने नोवाक जोकोविचचा पराभव करत 2026 च्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून अल्काराझने 'करिअर ग्रँड स्लॅम' (चारही प्रमुख ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणे) पूर्ण केले. [असा पराक्रम करणारा तो जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.]
अर्थसंकल्प 2026 27 मध्ये सर्वाधिक निधी तरतूद प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना या योजनेसाठी केलेली आह
राज्य शासनाने दिलेल्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग करून कमी कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरची उत्कृष्ट वास्तू उभारली आहे.
👉 त्यामुळे वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमी सुरू झाली आहे.
👉देशातील असा पहिलाच निर्णय आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 01 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. [या अर्थसंकल्पाचे मुख्य ब्रीदवाक्य : 'विकसित भारत']
तेलंगणाच्या श्रीनिवासने पटकावली चॅलेंजर्स ट्रॉफी
तेलंगणाच्या के. श्रीनिवास याने तिसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] महाराष्ट्रातील पहिले ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर नवी मुंबई येथे सुरु करण्यात आले आहे.
2] भारताचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवईजी यांच्या हस्ते मुंबई येथे 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट ट्रेनिंग आणि रिसर्च सेंटर'चे उदघाटन झाले आहे.
रयबाकिना ऑस्ट्रेलियन ओपनची नवी सम्राज्ञी
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या कझाकिस्तानच्या एलेना रयबाकिनाने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.
एलेना रायबाकिनाने जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या अरायना सबालेन्काचा पराभव करून तिचे पहिले ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद जिंकले.
'फेड'चे अध्यक्षपद केविन वॉर्श यांच्याकडे
अमेरिकी मध्यवर्ती बँक 'फेडरल रिझर्व्ह' च्या अध्यक्षपदी बँकेचे माजी गव्हर्नर केविन वॉर्श यांची नियुक्ती करण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. [विद्यमान अध्यक्ष : जेरोम पॉवेल]
