mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
427
المشتركون
+124 ساعات
+47 أيام
+630 أيام
أرشيف المشاركات
♦️महाराष्ट्रातील मतदारसंघ वाढ
🏛 विधानसभा
➡️ सध्याची संख्या : 288
➡️ प्रस्तावित संख्या : 432
📈 वाढ : +144
🏛 लोकसभा
➡️ सध्याची संख्या : 48
➡️ प्रस्तावित संख्या : 72
📈 वाढ : +24
👉संयुक्त राष्ट्र विद्यापीठाचे (UNU-INWEH) संचालक आणि जलतज्ज्ञ प्रोफेसर कावेह मदनी (Kaveh Madani) यांची २०२६ च्या प्रतिष्ठित 'स्टॉकहोम वॉटर प्राइज' (Stockholm Water Prize 2026) साठी विजेते म्हणून निवड झाली आहे .
⭕️ गुंतागुंतीच्या जलप्रणाली समजून घेणे आणि शाश्वत जल व्यवस्थापनातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना हा "पाण्याचा नोबेल पुरस्कार" जाहीर झाला आहे.
🌍 जागतिक हवामान दिन (World Meteorological Day)
📅 दिनांक: दरवर्षी २३ मार्च रोजी साजरा केला जातो.
📌 पार्श्वभूमी: हा दिवस World Meteorological Organization (WMO) या संस्थेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
WMO ची स्थापना २३ मार्च १९५० रोजी झाली.
🎯 उद्देश:
हवामानशास्त्रज्ञ (Meteorologists) यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणे
हवामान, पाणी आणि वातावरणाशी संबंधित जागतिक सहकार्य वाढवणे
हवामान बदल (Climate Change) आणि नैसर्गिक आपत्तींबाबत जागरूकता निर्माण करणे
🌦️ महत्त्व:
अचूक हवामान अंदाजामुळे शेती, वाहतूक आणि आपत्ती व्यवस्थापनाला मदत होते
पूर, चक्रीवादळ, दुष्काळ यांसारख्या आपत्तींचा पूर्व इशारा मिळतो
पर्यावरण संरक्षणासाठी वैज्ञानिक माहिती उपलब्ध होते.
▶️ जागतिक जल दिन 2026 (World Water Day) दरवर्षीप्रमाणे 22 मार्च 2026 रोजी साजरा केला जात आहे.
⭕️ संकल्पना 2026 : 'पाणी आणि लिंग' (Water and Gender) अशी असून, पाणीटंचाईचा सामना करताना लिंगभाव समानता आणि पाणी व्यवस्थापनात महिलांचा सहभाग यावर भर दिला जात आहे.
⭕️ गोड्या पाण्याच्या संवर्धनासाठी आणि जनजागृतीसाठी हा दिवस साजरा होतो.
⭕️ उद्देश: पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करणे आणि गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे रक्षण करणे.
👉IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन
👉नवीन Base Year: 2022–23
जुना Base Year: 2011–12
👉अंमलबजावणी: मे 2026 पासून नवीन सिरीज जाहीर होणार
Current Eco
स्रोत: नीती आयोग
2023/24 महाराष्ट्रामध्ये स्थूल मूल्यवर्धन यामध्ये विचार केल्यास...
सेवा क्षेत्राचा हिस्सा (59.5%)
उद्योग क्षेत्रात हिस्सा (26.5%)
शेती क्षेत्राचा हिस्सा (14%)
राज्यात उभारली जातेय जगातील तिसरी लिगो वेधशाळा
जगातील तिसरी आणि अमेरिकेबाहेरील पहिली 'लिगो' (LIGO -Laser Interferometer Gravitational-Wave Observatory) प्रयोगशाळा महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे उभारली जात आहे.
उद्देश : अवकाशातील गुरुत्वीय लहरींचा (Gravitational Waves) शोध घेणे आणि त्यावर संशोधन करणे.
पुण्यभूषण पुरस्कार 2026
फोर्स मोटर्सचे (Force Motors) अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना वाहन उद्योग क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी 2026 चा प्रतिष्ठित 'पुण्यभूषण' पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या समितीने हा निर्णय घेतला असून, या पुरस्काराचे हे 38 वे वर्ष आहे.
पुरस्काराचे स्वरूप : पुरस्कारात 2 लाख रुपये रोख, बालशिवाजींची सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेली प्रतिकृती आणि स्मृतीचिन्ह दिले जाते.
जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026
जागतिक दहशतवाद निर्देशांक 2026 नुसार पाकिस्तान प्रथमच जगातील सर्वाधिक दहशतवादग्रस्त देश ठरला आहे.
ग्लोबल टेररिझम इंडेक्स (GTI) 2026 नुसार, भारतात दहशतवादी घटनांमध्ये 43% घट झाली असून भारत 13 व्या स्थानावर आहे.
Global Terrorism Index (GTI) 2026 अहवाल प्रसिद्ध करणारी संस्था Institute for Economics & Peace (IEP) ही आहे.
जागतिक क्षयरोग दिन : 24 मार्च
दरवर्षी 24 मार्च रोजी 'जागतिक क्षयरोग दिन' (World Tuberculosis Day) साजरा केला जातो.
2025 ची थीम : “Yes! We Can End TB: Commit, Invest, Deliver.”
2026 ची थीम : "Yes! We Can End TB"
उद्देश : क्षयरोगाबद्दल (TB) जागरूकता पसरवणे आणि या आजाराचा सामना करण्यासाठी जनजागृती करणे
24 मार्च 1882 रोजी डॉ रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा शोध लावला होता.
पहिला जागतिक क्षय दिवस अधिकृतपणे 1983 मध्ये साजरा करण्यात आला
राज्यात पहिल्यांदाच धावणार 'एआय लॅब ऑन व्हील्स !'
नागपूर जिल्हा परिषदेने "AI Lab on Wheels" किंवा 'ज्ञानरथ'हा उपक्रम सुरू केला आहे. [मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'ज्ञानरथ'चे लोकार्पण झाले.]
उद्देश : ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence - AI) आणि डिजिटल शिक्षण पोहोचवणे हा आहे
जागतिक हवामान दिन : 23 मार्च
जागतिक हवामान दिन (World Meteorological Day) दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो.
जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) 23 मार्च 1950 या स्थापना दिनाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. [WMO चे मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड येथे आहे.]
2025 ची थीम :- "पूर्व चेतावणी अंतर एकत्र करणे" [Closing the Early Warning Gap Together]
2026 ची थीम : "हवामान कृतीचे भविष्य" [The Future of Climate Action]
Note : जागतिक हवामान संघटना (WMO) चे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे.
68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026
विजेता : हर्षवर्धन सदगीर (नाशिक - गादी विभाग)
उपविजेता : महेंद्र गायकवाड (सोलापूर - माती विभाग)
ठिकाण : वाघोली, पुणे (रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित)
रामकृष्ण सातव पाटील कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे आयोजित 68 व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा (2025-26) नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने जिंकली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला, जिथे विजेत्याला मानाची गदा आणि फॉर्च्युनर गाडी बक्षीस म्हणून देण्यात आली.
Note : नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर या पैलवानाने जानेवारी 2020 मध्ये पुणे याठिकाणी झालेली 63 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली होती.
जागतिक जल दिन : 22 मार्च
जागतिक जल दिन (World Water Day) दरवर्षी 22 मार्च रोजी साजरा केला जातो
2025 ची थीम : "Glacier Preservation" [हिमनदी संवर्धन]
2026 ची थीम : "Water and Gender" [पाणी आणि लैंगिक समानता]
पहिला जागतिक जल दिन 22 मार्च 1993 रोजी साजरा करण्यात आला.
उद्देश : स्वच्छ आणि ताज्या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे, जलसंधारणाविषयी (पाणी वाचवणे) जागरूकता निर्माण करणे आणि शाश्वत व्यवस्थापनाचा संदेश देणे.
परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] जल शक्ती मंत्रालय "जल महोत्सव 2026" (8 मार्च - 22 मार्च 2026) साजरा करत आहे.
2] 23 मार्च 2026 रोजी नवी दिल्लीत 'विश्व जल दिवस परिषद' आयोजित केली जाणार आहे, ज्याचा मुख्य विषय "Industry for Water" हा असेल.
