ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 866 مشتركاً، محتلاً المرتبة 1 282 في فئة التعليم والمرتبة 2 493 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 866 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 730، وفي آخر 24 ساعة بمقدار 70، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 32.41‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 19.47‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 34 315 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 20 613 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 64.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 866
المشتركون
+7024 ساعات
+3437 أيام
+1 73030 أيام
أرشيف المشاركات
लवकरच या चॕनेल वर रयत प्रबोधिनीच्या चालुघडामोडी,इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाच्या नोट्स शेअर केल्या जातील..

भारतातील पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूंपैकी ६९% मृत्यू हे कुपोषणामुळे होतात असे युनिसेफच्या बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. ‘जगातील मुलांची स्थिती २०१९’ या शीर्षकाच्या अहवालामध्ये युनिसेफने म्हटले आहे, की या वयोगटातील दोनपैकी एक मूल कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या कुपोषणामुळे बाधित आहे. यामध्ये वाढ खुंटणे (३५%), अवयवांची झीज (१७%) आणि वजन जास्त असणे (२%)यांचा समावेश होतो. केवळ ४२% मुलांना (६ ते २३ महिने वयोगटातील) पुरेशा वेळांना खाऊ घातले जाते आणि २१% मुलांना पुरेसे वैविध्य असलेला आहार मिळतो. ६-८ महिने वयोगटातील केवळ ५३% अर्भकांसाठीच पूरक आहार वेळेवर चालू केला जातो. भारतीय महिलांच्या आरोग्याबद्दल, असे म्हटले आहे की दोनपैकी एका महिलेला रक्तक्षय आहे. पाच वर्षे वयाखालील मुलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण सर्वाधिक आहे. किशोरवयीन मुलींमध्ये त्याचे प्रमाण किशोरवयीन मुलांच्या दुप्पट आहे, भारतीय मुलांना उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा जुनाट विकार आणि मधुमेहपूर्व अवस्था यासारख्या प्रौढांमध्ये होणाऱ्या विकारांचे निदान होऊ लागले आहे. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सूक्ष्म पोषद्रव्यांच्या कमतरतेचा त्रास होत असल्याचेही डेटामधून दिसते. पाच वर्षांखालील दर पाचव्या मुलाला अ जीवनसत्त्वाची कमतरता असून तीनपैकी एका मुलाला जीवनसत्त्व बी१२ ची कमतरता आहे आणि प्रत्येक पाच मुलांपैकी दोघांना रक्तक्षय आहे. अहवाल असेही म्हणतो, की पोषण अभियान किंवा नॅशनल न्यूट्रिशन मिशन याची भारतातील पोषणासंबंधीची निर्देशके सुधारण्यात मोठी भूमिका आहे. जगभरातील सर्व सरकारांनी कुपोषणासाठी घेतलेल्या कार्यक्रमांमध्ये ऍनिमिया मुक्त भारत कार्यक्रमाला सर्वोत्तम कार्यक्रमांपैकी एक म्हणून गौरवण्यात आले आहे. ऍनिमिया चाचणी आणि उपचाराचा वापर आरोग्यपूर्ण आहारांबाबत माहिती पुरवण्यासाठी प्रवेश बिंदू म्हणून करणे यासाठी कार्यक्रमाच्या ६X६X६धोरणाला (सहा लक्ष्यित लाभार्थी गट, सहा हस्तक्षेप आणि सहा संस्थात्मक यंत्रणा) अधोरेखित करण्यात आले आहे. अती वजन आणि स्थूलता यामुळे शाळेच्या वयातील मुले आणि किशोरवयीन मुले यांच्यामध्ये बालपणामध्येच मधुमेहासारख्या (१०%) संसर्गजन्य नसलेल्या आजारांचा धोका वाढतो आहे. शहरी भारतामध्ये लोकांच्या अनारोग्यपूर्ण अन्न खाण्याच्या सवयी वाढत आहेत, ज्यामुळे मुलांच्या अन्न निवडीवर परिणाम होत आहे आणि त्याचे लोण ग्रामीण भागातही पसरत आहे. भारतातील अन्न सेवनाच्या पद्धतींमुळे मुलांच्या आहारामध्ये प्रथिनांची आणि सूक्ष्मपोषकांची मोठी कमतरता असते. त्यांच्या आहारावर घरातील (प्रौढांच्या) अन्न निवडीचा प्रभाव असतो. अनेक दशके, उत्पन्नामध्ये वाढ होत असूनही प्रथिनाधारित कॅलरींची संख्या कमीच आहे, त्यात काहीही बदल झालेला नाही आणि फळे व भाज्यांकडून मिळणाऱ्या कॅलरींचा वाटा कमी होत आहे. अहवाल म्हणतो, जगभरात ७७% प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांच्या विक्रीवर केवळ १०० मोठ्या फर्मचे नियंत्रण आहे. जागतिक परिस्थितीच्या बाबतीत, युनिसेफचा अहवाल म्हणतो की पाच वर्षांखालील तीनपैकी किमान एक एक मूल – किंवा २० कोटी मुले – एकतर कुपोषित आहेत किंवा स्थूल आहेत. अहवालात नमूद केल्यानुसार, सहा महिने ते दोन वर्षे वयाच्या जवळजवळ दोन तृतियांश मुलांना त्यांचे शरीर आणि मेंदू ज्या वेगाने वाढतात त्याला अनुसरून अन्न दिले जात नाही. यामुळे त्यांना मेंदूचा विकास चांगला न होणे, शिकण्याची क्षमता कमी होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, अधिक प्रमाणात जंतुसंसर्ग, आणि अनेक वेळा मृत्यूचीही जोखीम असते. युनिसेफने यापूर्वी २० वर्षांपूर्वी असा अहवाल प्रसिद्ध केला होता. पीटीआय द वायर मराठी.

photo content

​​⚡️अर्थशास्त्राचं नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी आहेत तरी कोण, जाणून घ्या 👇👇👇👇👇👇 अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातला नोबेल मिळवणारे दुसरे भारतीय अर्थशास्त्रज्ञ 🔸भारतीय वंशाचे अभिजित बॅनर्जी यांना २०१९ चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’च्या माध्यमातून प्रयत्न केल्याबद्दल बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.   हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. अभिजित यांच्याबरोबरच त्यांची पत्नी इस्थर डफलो आणि सहकारी मायकल क्रेमर या या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जागतिक दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रायोगिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्यांचा हा गौरव असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. जाणून घेऊयात कोण आहेत अभिजित बॅनर्जी… 🔸अभिजित बॅनर्जी यांचा जन्म २१ फेब्रवारी १९६१ रोजी कोलकात्यामध्ये झाला. 🔸कोलकत्ता येथील सेंटर फऑर स्टडीज इन सोशल सायन्समध्ये अभिजित यांची आई निर्माला या प्राध्यापक होत्या. तर वडील दिपक हे कोलकात्यामधील प्रेसिडेन्सी महाविद्यालयामधील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते. 🔸सध्या ते अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एमआयटी) फोर्ड फाऊण्डेशन इंटरनॅशनलचे प्राध्यापक म्हणून काम करतात. 🔸अभिजित हे ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅब’चे संस्थापक आहेत. इस्थर डफलो आणि सेंडील मुल्लीनाथन यांच्या सोबतीने बॅनर्जी यांनी या संस्थेची स्थापना केली आहे. गरिबीवर मात करण्यासाठी काय करता येईल यासंदर्भातील संसोधन ही संस्था करते. 🔸अभिजित यांनी १९८१ साली आपली अर्थशास्त्रमधील बीएस पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनातर त्यांनी १९८३ साली जवाहरलाल नेहरु विद्यापिठामधून एमएची पदवी घेतली. त्यानंतर १९८८ साली ते पीएचडी करण्यासाठी हार्वर्ड विद्यापिठात गेले. 🔸हार्वर्ड विद्यापीठ आणि प्रिन्सटॉन विद्यापिठामध्ये प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर आता ते मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतात. 🔸विकासावादी अर्थव्यवस्था हा अभिजित यांचा कोअर सबजेक्ट आहे. अर्थव्यवस्थेशी आधारित विविध घटकांचा तिच्यावर कसा परिणाम होतो याचा त्यांनी अभ्यास केला आहे. 🔸२००४ साली त्यांना अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अॅण्ड सायन्सची फेलोशीप मिळाली. 🔸आर्थिक क्षेत्रातील संसोधनासाठी २००९ साली त्यांना इन्फोसेस पुरस्काराने गौरवण्यात आले. 🔸२०१२ मध्ये अभिजित यांना ‘पूअर इकनॉमिक्स’ या पुस्तकासाठी सह-लेखक एस्तेर ड्यूफलो यांच्यासमवेत ‘जेरल्ड लोब अवॉर्ड’ सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळाला. 🔸२०१३ मध्ये संयुक्त राष्ट्राचा सरचिटणीस बान की-मून यांनी २०१५ नंतरची विकास उद्दिष्टांसंदर्भात काम करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीमध्ये अभिजित यांनी नियुक्ती केली होती. 🔸२०१९ मध्ये त्यांनी एक्सपोर्ट-इंपोर्ट बँक ऑफ इंडियामार्फत आयोजित एका कार्यक्रमात सामाजिक धोरणांची पुन:बांधणी या विषयावर एक लेक्चर दिले होते. 🔸अभिजित यांनी एमएयटीमध्ये प्राध्यापिका असणाऱ्या डॉ. अरुंधती बॅनर्जी यांच्याबरोबर लग्न केले. हे दोघेही बालपणापासून मित्र होते. या दोघांना २० फेब्रुवारी १९९१ रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली. मात्र नंतर अभिजित आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाला. २०१६ साली त्यांचा एकुलता एक मुलगा कबीर याचा आकस्मिक मृत्यू झाला. 🔸अभिजित यांनी त्यांची सहकारी इस्थर डफलो यांच्यासोबत २०१५ साली लग्न केले. मात्र त्याआधीपासूनच ते एकत्र राहत होते. २०१२ साली त्यांना एक मुलगा झाला. त्यानंतर तीन वर्षांनी ते लग्न बंधनात अडकले. अभिजित यांनी लिहिलेली पुस्तके १)Volatility And Growth २)Understanding Poverty ३)Making Aid Work. Cambridge: MIT Press ४)Poor Economics: A Radical Rethinking of the Way to Fight Global Poverty ५)Handbook of Field Experiments, Volume 1 ६)Handbook of Field Experiments, Volume 2 ७)A Short History of Poverty Measurements अभिजित यांना अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी अॅक्शन लॅबसाठी मिळालेली संस्था करते काय अभिजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांने स्थापन केलेली ही संस्था म्हणजे एक संसोधन केंद्र आहे. येथे जगातील गरिबीवर मात करण्यासाठी काय करता येईल याबद्दल विज्ञानाचा आधार घेऊन संशोधन केले जाते. ही संस्था देशभरातील अनेक सरकार, सेवाभावी संस्था, स्वयंसेवक आणि वेगवेगळ्या संस्थांच्या सोबतीने गरिबी हटवण्यासंदर्भात काय काय करता येईल याबद्दलचे काम करते. २०१८ पर्यंत ४०० दशलक्ष लोकांनी या संस्थेशी संबंधित कामाचा फायदा झाला आहे.

photo content

photo content

तब्बल ४तासाहुन अधिक वेळ Discussionला बसत आपण आज दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार.. अशीच साथ आणि विश्वास असु द्या..पुढेही माझे १००% देत राहिन.. उमेश कुदळे.. विषय सोपा झाला पाहिजे..😊😊 प्राचीन भारत सिरीज लवकरच update करतो

रयत प्रबोधिनीचा राज्यसेवा पुर्व परीक्षा Test series चा पेपर पार पडला . या पेपर मधील इतिहास विषयाचा पेपर आणि त्याचे Discussion खाली जोडत आहे.. हे प्रश्न prediction based आहेत नक्की फायदा होईल.. धन्यवाद..😊😊

History.pdf

Test - 1 - _Pre_ 2020 _GS_ - Answerkey-2.pdf4.86 KB

sci-3.pdf1.04 MB

Polity-1.pdf1.03 MB

History-1.pdf1.02 MB

eco-2.pdf1.03 MB