ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Vrushali Honrao

Vrushali Honrao

الذهاب إلى القناة على Telegram

UPSC / MPSC / COMBINE परीक्षेबद्दल सर्वात सुसंगत माहिती देणे. परीक्षेचा Approach विकसित करून घेणे. We are here to Help you to achieve your GOAL.👍 All d best

إظهار المزيد
7 160
المشتركون
-624 ساعات
-357 أيام
-9230 أيام
أرشيف المشاركات
16000 + 🔥🔥 "तयारी ही विजयाची पायाभरणी करते. जेव्हा संधी मोठी असते, तेव्हा त्यामागची स्पर्धा आणि संघर्षही तितकाच प्रखर असतो." स्पर्धा परीक्षा असो किंवा कोणतीही नोकरीची भरती, जाहिरातीत जागांची संख्या मोठी असली की उमेदवारांमध्ये एक अनाकलनीय गाफीलपणा पाहायला मिळतो. "जागा भरपूर आहेत, त्यामुळे सहज नंबर लागेल" हा एक अत्यंत घातक आणि आत्मघाती गैरसमज आहे. जरी जागा जास्त असल्यामुळे कट-ऑफ गुण अपेक्षेपेक्षा कमी येऊ शकतात, तरीही थेट आणि हमखास निवडीची हमी कोणीही देऊ शकत नाही. जागांची संख्या वाढली की साहजिकच अर्जदारांचा ओघही प्रचंड वाढतो. आजच्या बेरोजगारीच्या युगात एका जागेसाठी शेकडो, नव्हे तर हजारो पात्र आणि अभ्यासू तरुण स्पर्धा करत असतात. त्यामुळे जागा जास्त असल्याचा अर्थ गुणवत्तेचे निकष शिथिल होतात असा होत नाही. उलट, जागांच्या संख्येवर हुरळून जाऊन जर गाफील राहिलात, तर कमी कट-ऑफचा लाभ हुशार आणि सातत्यपूर्ण अभ्यास करणाऱ्या हुशार उमेदवारांनाच मिळतो, आणि आपण मागे पडतो. थोडक्यात सांगायचे तर, जागांची संख्या ही केवळ संधीची व्याप्ती वाढवते, निवडीची खात्री देत नाही. यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम, अचूक रणनीती आणि सातत्य हेच अंतिम निकष असतात. भ्रम बाळगण्यापेक्षा प्रत्येक जागेवर स्वतःचा दावा मजबूत करण्यासाठी गुणात्मक तयारी करणे हीच यशाची खरी किल्ली आहे. 👍👍👍👍👍

Repost from ANJANEY ACADEMY
👉 कंबाईन गट क पूर्व 2026 साठी यापूर्वीची प्रश्नपत्रिका निर्माण करण्याची कार्यवाही रद्द करून नवीन कार्यवाही द्वारे नवीन प्रश्
👉 कंबाईन गट क पूर्व 2026 साठी यापूर्वीची प्रश्नपत्रिका निर्माण करण्याची कार्यवाही रद्द करून नवीन कार्यवाही द्वारे नवीन प्रश्नपत्रिका छापण्याची तसेच नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गाची मुख्य परिक्षेचे आभ्यासक्रम जाहिर करण्याची शिफारस समितीने केलेली आहे... चालू घडामोडी या ऑक्टोबर 2026 पर्यंत करावे लागतील.....🙏🙏

🌟 कम्बाईन गट क पूर्व 2026 🌟 (तलाठी / Clerk / Tax Assistant / RTO AMVI ) 🪄 प्रयास टेस्ट सिरीज 🪄 🎀 यशाची अंतिम पायरी 🎀 ⚜️
🌟 कम्बाईन गट क पूर्व 2026 🌟 (तलाठी / Clerk / Tax Assistant / RTO AMVI ) 🪄 प्रयास टेस्ट सिरीज 🪄 🎀 यशाची अंतिम पायरी 🎀 ⚜️ पुढील लिंकला क्लिक करून जॉईन करा 👇🏼 https://shardacompetitiveforum.akamai.net.in/new-courses/33?type=20 🔺 एकूण 25 सराव पेपर 🔺 20 पेपर टॉपिकनुसार 🔺 5 पेपर संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 🔺आयोगाच्या धर्तीवर प्रश्नांची रचना 🔺प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण 🔺 सर्व pdf प्रिंट करू शकता. 🔔 सुरुवात - 12 नोव्हेंबर पासून 👍🏼 टेस्ट फी - 199/- 😍 मार्गदर्शक - वृषाली मॅडम & प्रशांत सर 🔔 Download App From Playstore - Vrushali Honrao 👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac&pcampaignid=web_share 🙋🏼‍♀️ Contact - 7350353865

❄️Breaking News MPSC अतिरिक्त अध्यक्ष पदाचा कार्यभार सतीश वाघोले यांच्या कडे

5_6224320949584405049.pdf9.74 KB

photo content

🔥 सन्माननीय तुकाराम मुंढे सर आयोगाच्या चौकशी समितीचे सचिव म्हणून काम बघणार आहेत.......❤️❤️❤️❤️❤️ बऱ्याच दिवसानंतर काहीतरी चा
🔥 सन्माननीय तुकाराम मुंढे सर आयोगाच्या चौकशी समितीचे  सचिव म्हणून काम बघणार आहेत.......❤️❤️❤️❤️❤️ बऱ्याच दिवसानंतर काहीतरी चांगली बातमी आज ऐकायला मिळाली...🙏🙏

MPSC वरती असणारा पूर्वीचा विश्वास पुन्हा यायलाच पाहिजे.... MPSC भरती प्रक्रिया पारदर्शक हवी म्हणजे हवीच..
MPSC वरती असणारा पूर्वीचा विश्वास पुन्हा यायलाच पाहिजे.... MPSC भरती प्रक्रिया पारदर्शक हवी म्हणजे हवीच..

BIG UPDATE MPSC सचिव सचिन हरपाळकर यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे

⏳ चालू घडामोडी 2026 👍 भाग - 1 प्रश्न 1 ते 25 https://youtu.be/5SqA2SUvi6c https://youtu.be/5SqA2SUvi6c https://youtu.be/5SqA2SUvi6c 🫶 निश्चय 2500 प्रश्नाचा....

Exam postponed...
Exam postponed...

record-1789037199639.wav1.62 MB

👆 बघा मग लक्षात येईल... 😳 305 गुण मिळाले आहेत प्रथम क्रमांक मिळालेल्या स्पर्धकाला.... 😢 कळत नाही कुठे पोहोचलाय आयोग आमचा.... 🫣

014-2026 Clerk-Typist - GML (1).pdf4.98 MB

✨✨ आयोगाच्या निर्णयामुळे आज कित्येक जणांच्या डोळ्यात पाणी  आले आहे. जेव्हा खरी गरज होती तेंव्हा पेपर पुढे नेला नाही आणि आज विनाकारण😔😔 Postponment च प्रसिद्धीपत्रक बघून काळजात धस्स झालं. आयोगा का रे निसर्गासारखा कठोर झालास😢😢

📌📌पेपर पुढे गेल्याने अजून जास्त जागा वाढायला संधी आहे.. 📌📌 पुढे गेल्याने निराश होऊ नका.. सर्वांचे दुःख समजण्याजोगे आहे..
📌📌पेपर पुढे गेल्याने अजून जास्त जागा वाढायला संधी आहे.. 📌📌 पुढे गेल्याने निराश होऊ नका.. सर्वांचे दुःख समजण्याजोगे आहे.. 📌📌मेगा लॉट मध्ये 100% नोकरी ला लागणार तुम्ही.. कोणी टेन्शन घेऊ नका ❤️❤️🙏🏻🙏🏻 📌📌वाईट खूप वाटतय असल्या कोणत्या ही तडकाफडकी निर्णयानी.. काय करावं आपण आपल्या हातात काही नाही 😞😞😞

🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली आणि कळकळीचे आवाहन 🙏 आजची ही बातमी मन हेलावून टाकणारी आहे… MPSC ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आपले ज
+1
🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली आणि कळकळीचे आवाहन 🙏 आजची ही बातमी मन हेलावून टाकणारी आहे… MPSC ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने आपले जीवन गमावल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. या दुःखद घटनेबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली. 🕯️🙏 पण माझी सर्व MPSC विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती आहे... कितीही मोठं संकट असलं, कितीही अपयश आलं किंवा परिस्थिती कितीही कठीण झाली तरी कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. 🙏 एक परीक्षा, एक निकाल किंवा एक संधी तुमच्या संपूर्ण आयुष्यापेक्षा मोठी नाही. आज परिस्थिती कठीण वाटत असेल तर एकटे राहू नका; आई-वडील, मित्र, शिक्षक किंवा विश्वासातील व्यक्तीशी मन मोकळं करा. तुम्ही एकटे नाही… तुमचं आयुष्य अनमोल आहे. ❤️ 🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली.... 🙏

व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल
व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे. ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया. त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा. या सर्व बाबी आपण मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत. महत्त्वाचे: जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी. ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏

🇮🇳 सबका साथ, सबका विश्वास 🔥

विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.... मी कधीच कोणत्याही आंदोलनात किंवा मोर्च्यात आजपर्यंत सहभागी नव्हते झाले... पण आज ज्या उद्देशा
+2
विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.... मी कधीच कोणत्याही आंदोलनात किंवा मोर्च्यात आजपर्यंत सहभागी नव्हते झाले... पण आज ज्या उद्देशासाठी आजचा मोर्चा होता त्याला मी डावलू शकली नाही... आणि तिथे सहभागी झाल्यावर कळलं माझा निर्णय चुकला नाही... हा तुमचा आक्रोश मोर्चा खरंच सत्ताधारी पक्षाला हलवून टाकणारा झाला... असेच सोबत लढा देऊ आपण...