Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 110
المشتركون
-224 ساعات
-247 أيام
-3430 أيام
أرشيف المشاركات
4 111
CMO Maharashtra Tweets:
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹5000 अग्रीम मदत देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#Maharashtra #DevendraFadnavis #DroughtRelief
14 أكتوبر, 04:23
4 111
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses of a day marking a new chapter in UK–Maharashtra growth partnership, filled with faith and festive fervour while visiting various Navratri mandals and seeking the blessings of Maa Jagdamba.
यूके-महाराष्ट्र विकास भागीदारीतून नव्या पर्वाची सुरुवात करणाऱ्या व नवरात्रोत्सवानिमित्त विविध मंडळांना भेट देऊन आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धा आणि उत्साहाने भारलेल्या दिवसातील काही खास क्षण…
(मुंबई | 13-10-2026)
#Maharashtra #UKMaharashtraGrowthPartnership #Navratri2026
14 أكتوبر, 03:01
4 111
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕛 11.55am | 14-10-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/gX1343hKZ_I?si=goiofnwrVwsjewpa
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1088526473918316
https://x.com/Dev_Fadnavis/status/2110255854822084933?s=20
14 أكتوبر, 02:28
4 111
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मतदारयादीतील नाव, पत्ता आणि इतर तपशील आजच तपासा!
SIR प्रक्रियेबाबतचे गैरसमज दूर करा, योग्य माहिती जाणून घ्या आणि आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!
❌गैरसमज: SIR मध्ये पात्र मतदारांची नावे सरसकट वगळली जातात.
✅ वस्तुस्थिती: SIR चा उद्देश मतदारयादी अद्ययावत करणे आहे. आपले नाव तपासा; चुकीने वगळले असल्यास दुरुस्तीसाठी अर्ज करा.
❌ गैरसमज: मतदारयादीत नाव नसेल, तर पुन्हा समाविष्ट करता येत नाही.
✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक Form 6 द्वारे नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतात. नोंदणी प्रलंबित ठेवू नका.
❌ गैरसमज: प्रत्येक मतदाराला कागदपत्रांसाठी कार्यालयात जावे लागते.
✅ वस्तुस्थिती: काही प्रकरणांत BLO मार्फत कागदपत्रे देता येतात; आवश्यक असल्यास सुनावणीला उपस्थित राहावे लागू शकते. अधिकृत सूचनांकडे दुर्लक्ष करू नका.
❌ गैरसमज: नाव समाविष्ट किंवा वगळण्याचा निर्णय AI आपोआप घेतो.
✅ वस्तुस्थिती: AI साधने समान नोंदी ओळखण्यास मदत करतात; वैधानिक निर्णय ERO घेतो. आपल्या नोंदी तपासणे महत्त्वाचे आहे.
❌ गैरसमज: एकाच व्यक्तीची नावे अनेक ठिकाणी असली तरी चालतात.
✅ वस्तुस्थिती: कायद्यानुसार दुबार नोंदींना परवानगी नाही. आपल्या नोंदींची अचूकता तपासा.
❌ गैरसमज: नवीन मतदारांना SIR पूर्ण होईपर्यंत थांबावे लागते.
✅ वस्तुस्थिती: पात्र नागरिक निर्धारित पात्रता दिनांकानुसार Form 6 द्वारे अर्ज करू शकतात.
❌ गैरसमज: मतदारयादीतील चुकीचे तपशील दुरुस्त करता येत नाहीत.
✅ वस्तुस्थिती: नाव, पत्ता किंवा इतर तपशील दुरुस्त करण्यासाठी Form 8 द्वारे अर्ज करा.
❌ गैरसमज: मतदारयादीतील निर्णयाविरोधात अपील करता येत नाही.
✅ वस्तुस्थिती: लागू नियमांनुसार अपील करता येते. मदतीसाठी अधिकृत पोर्टल किंवा 1950 हेल्पलाइनचा वापर करा.
आपले नाव मतदारयादीत आहे का? आजच तपासा. पात्र मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा!
#Maharashtra #SIR #ElectionCommission
14 أكتوبر, 00:36
4 111
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026
उद्योगांच्या गुंतवणूक परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/218702/
कचऱ्यापासून सीबीजी प्रकल्पांसाठी टास्क फोर्स स्थापन करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/218684/
#Maharashtra #DevendraFadnavis
13 أكتوبر, 14:18
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आमदार कॅप्टन आर. तमील सेल्वन यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹10,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
13 أكتوبر, 12:52
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ट्रान्स इंडिया एबी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सॉल्युशन्स प्रा. लि. यांच्यावतीने राजेंद्र राजन यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹25,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
13 أكتوبر, 12:51
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ट्रान्स इंडिया एबी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सॉल्युशन्स प्रा. लि. यांच्यावतीने राजेंद्र राजन यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹25,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
13 أكتوبر, 12:50
13 أكتوبر, ~12:50
4 111
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
“वोट चोरी”च्या 'फेक' नरेटिव्हला जनतेचं 'थेट' उत्तर !!
कितीही कांगावा करा.. जनता शांतपणे बघते आणि मतपेटीतून उत्तर देते.. माननीय अमितभाई शाह यांचे हे शब्द ऐकाच !!
“वोट चोरी” के फेक नरेटिव्ह पर जनता का सीधा जवाब !!
कितनी भी उछल-कूद कर लो.. जनता देखती है और मतदान से उत्तर देती है.. माननीय अमितभाई शाह जी के शब्द बहुत कुछ कह जाते हैं.. गौर से सुनिए..
#ShahExposesRahul
13 أكتوبر, 12:46
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे नगरसेविका हेतल गाला यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,07,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund@DevendraGFadnavis
13 أكتوبر, 12:30
4 111
Full_Speech_नवरात्रीनिमित्त_विविध_नवरात्रौत्सव_मंडळांना_भेट,_मुंबई.mp414.62 MB
13 أكتوبر, 12:03
4 111
CMO Maharashtra Tweets:
महाराष्ट्र आणि यूकेमधील भागीदारीतून गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीला चालना
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार विषयक राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्या हस्ते मुंबई येथे व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी शासनस्तरीय समन्वय आणि उद्योग-व्यवसायाभिमुख सहकार्याची सुनियोजित यंत्रणा असलेल्या ‘यूके-महाराष्ट्र ग्रोथ पार्टनरशिप’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.
कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रांतील उद्योगांना गुंतवणुकीसाठी पोषक परिसंस्था निर्माण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल. यूकेमधील सचिव, महापौर आणि अधिकारी यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेट नसून, दोन्ही देशांमधील महत्त्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योजकतेला जागतिक बाजारपेठांशी थेट जोडते. पुणे हे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र बनले आहे. राज्यभरातील कुशल मनुष्यबळ, सक्षम औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या अनुभवी भागीदारांचे मजबूत जाळे ही महाराष्ट्राची ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन’ यांसारखी जागतिक विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. राज्यात उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी, मेडिसिटी आणि एआय इनोव्हेशन सिटीमुळे जागतिक दर्जाचे संशोधन, संस्था आणि प्रतिभा एकत्र येतील.
महाराष्ट्रात औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि साधनसंपत्तीचे पुनर्नवीकरण यांसारख्या क्षेत्रांत स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना मोठा वाव आहे. जागतिक कंपन्यांना त्यांची ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमध्ये नव्या बाजारपेठा आणि ग्राहक मिळविण्याची संधी उपलब्ध होईल. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील संबंध प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी मंत्री जयकुमार रावल, ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ब्रिटनमधील विविध शहरांचे महापौर, ब्रिटन आणि महाराष्ट्रातील नेते व वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग जगतातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #UKMaharashtraGrowthPartnership
13 أكتوبر, 12:01
