LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
Lets Up News Updates
1. पाकिस्तानच्या सीमेवरील नापाक कारवाया सुरुच राहिल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु : लष्करप्रमुख बिपिन रावत
2. नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघात पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी, पाकिस्तानच्या राजदूत मलीहा लोधी यांनी पॅलेस्टिनच्या महिलेचा फोटो काश्मीरमधील पीडित म्हणून दाखवला
---------------------------------------------
सॅमसंगच्या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://bit.ly/samsung-anniversary-sale
---------------------------------------------
3. नवी दिल्ली - दहशतवाद खपवून घेणार नाही; अमेरिकेचा पाकिस्तानवर निशाणा, दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी भारताला पाठिंबा
4. नवी दिल्ली - गुरमीत राम रहिमची निकटवर्तीय हनीप्रीतच्या जामीन अर्जावर निर्णय राखीव, दिल्ली हायकोर्ट उद्या पुन्हा करणार सुनावणी
5. टोकियो - उत्तर कोरियाच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मुदतपूर्व निवडणूक घेण्याची केली घोषणा
6. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 31599.76, निफ्टी : 9871.50, सोने भाव : 30,012 (प्रतितोळा), चांदी : 40,190 (प्रतिकिलो)
7. मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, आरोपी मेजर रमेश उपाध्यायला जामीन मंजूर, 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
8. मुंबई - INS कलवरी पाणबुडी नोव्हेंबर, डिसेंपर्यंत नौदलात दाखल होणार, युध्दनौकाबांधणीतील विलंब मात्र चिंताजनक : व्हाईस एडमिरल गिरीश लुथ्रा, नौदल पश्चिम तळाचे प्रमुख
9. मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर, राज्यातील समृद्धी महामार्गासारख्या प्रकल्पांसाठी कमी व्याज दराचे कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करणार
10. मुंबई - पंतप्रधान मोदींकडून सचिन तेंडुलकर-आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक; स्वच्छता अभियानातील सहभागासाठी केलं ट्विट
11. मुंबई - दिल्लीवारी नंतरही राणेंचा भाजप प्रवेश अद्याप निश्चीत नाही, त्यामुळे राणे आता नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता
12. पुणे - ग्रामीण भागातही होणार रिक्षा परवान्यांचे वाटप, राज्य शासनाने काढला अध्यादेश
13. सोनी कंपनीने थ्रीडी स्कॅनिंगची सुविधा असणारा एक्सपेरिया एक्सझेड 1 हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत केला लाँच, किंमत 44,990 रूपये
14. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजवर लवकरच चित्रपट बनणार, या चित्रपटाचे सर्व हक्क Viacom18 Motion Pictures ने घेतले विकत
15. मुंबई - दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या ‘द सायलेन्स’ चित्रपटात नागराज मंजुळे महत्त्वाची भूमिका साकारणार, येत्या 6 ऑक्टोबरला चित्रपट होणार प्रदर्शित
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाकांक्षी 'सौभाग्य योजने'चे उदघाटन केले, या योजनुसार गरिबांना मोफत वीज जोडणी देण्यात येणार
2. नवी दिल्ली - देशातील काही भागांत पूर आणि काही भागांत दुष्काळी परिस्थिती अशा विषमतेचा फटका यंदाच्या खरीप हंगामाला बसणार, उत्पन्न घटण्याची शक्यता
3. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना; विवेक देबरॉय यांची परिषदेच्या प्रमुखपदी नियुक्ती
4. नवी दिल्ली - देशविरोधी आणि धार्मिक भावना भडकावणारी काश्मीरमधील 115 ट्विटर हँडल बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले
5. नवी दिल्ली - आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आधार घेत एसबीआयने चॅटबोट हा समस्या सोडवणारा रोबो ग्राहकांच्या सेवेत दाखल केला
6. नवी दिल्ली - रेल्वे परिसरात विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर एमआरपीची रक्कम छापणे सक्तीचे, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले आदेश
7. मुंबई - हॉस्पिटलच्या उद्घाटनाचे आमंत्रण देण्यासाठी नारायण राणे अमित शहा यांना भेटले, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही - रावसाहेब दानवे
8. मुंबई - भायखळा महिला कारागृहातील बहुचर्चित वॅार्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता
9. मुंबई - राज्यातील हजारो चतुर्थ श्रेणी शासकीय कर्मचारी 27 सप्टेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाणार
10. बर्लिन - जर्मनीमध्ये झालेल्या निवडणुकीत अँजेला मार्केल यांनी विजय संपादन करत चौथ्यांदा चान्सलरपद भुषविण्याचा मान मिळविला
11. मुंबई - 28 दिवसांसाठी दररोज 3G/4G डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देणारा नवीन डेटा प्लॅन एअरटेलने प्रीपेड ग्राहकांसाठी आणला
12. लखनौ - मुंबईचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉचा विक्रम, दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यात शतक ठोकणारा तो सर्वात तरुण क्रिकेटर ठरला
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. जम्मू-काश्मीर - उरी सेक्टरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 एके 47, 1 एके यूबीजीएल, ग्रेनेड, पेट्रोल बॉम्ब, 2 आयईडी, मोबाइल्स आणि इतर साहित्य केले जप्त
2. नवी दिल्ली - लोकसभा व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी व्हाव्यात याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही, सर्वपक्षीय सहमतीसाठी प्रयत्न करणार
3. नवी दिल्ली - भौगोलिक-राजकीय अशांततेमुळे चालू महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भांडवल बाजारातून तब्बल पाच हजार 500 कोटी रुपये काढून घेतले
4. नवी दिल्ली - अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मॅट्टीस हे 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान नियोजित भारत दौ-यातवर, अमेरिका-भारत संरक्षण संबंध सुधारणार
5. नवी दिल्ली - मोबाईलच्या आयएमईआय नंबरशी छेडछाड करणे आता दंडनीय गुन्हा ठरणार, यामध्ये तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवासही होऊ शकतो
6. नवी दिल्ली - देशातील महिलांमध्ये शिक्षणाबाबत जागृती होत असताना आता विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींचा शिक्षणातील टक्का वाढला
7. मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज पहाटे निधन, काल सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
8. मुंबई - काँग्रेसला साेडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज दिल्लीत जाऊन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार असल्याची चर्चा
9. मुंबई - कर्जमाफीसाठी राज्यभरातून आलेल्या अर्जापैकी 2 लाख 41 हजार शेतकऱ्यांचे आधार क्रमांक नसल्याने त्या सर्व अर्जांची पुन्हा छाननी होणार
10. न्यूयार्क - काश्मीरमध्ये कसे अत्याचार होतात हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने गाझा हल्ल्याचा खोटा फोटो दाखवला, त्यामुळे जगभरात त्यांची नाचक्की झाली
11. मुंबई - बहुचर्चित 'बापजन्म' हा चित्रपट येत्या 29 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून तो परदेशात सुद्धा प्रदर्शित होणार
12. इंदूर - भारतीय संघाने तिसऱ्या वन-डे क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर पाच विकेटनी विजय नोंदविला, भारत वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला भागातील उरी सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान, सोपोरमध्ये बँकेत फेकले ग्रेनेड, 3 जण जखमी
2. फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज; जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काऊंट्स… लिंकवर क्लिक करा आणि शॉपिंग करा बिनधास्त https://goo.gl/Pe1KPk
3. नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट होईल मात्र करांमध्ये कपात केली जाणार नाही : धर्मेंद्र प्रधान
4. नवी दिल्ली - देशामधील पर्यटन वाढवण्यासाठी पुढाकार घ्या, मन की बात मधून पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन
5. भोपाळ - मध्य प्रदेशातील मदरशांना आता वर्षाला 50 हजार रुपयांचे अनुदान मिळणार, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली घोषणा
6. भारत म्हणजे दक्षिण आशियामधील दहशतवादाची जननी आहे, असे पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत मलीहा लोधी यांनी म्हटले
7. गेल्या चार महिन्यांपासून पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड, चिनी गुंतवणूकदारांना तब्बल 154 कोटी रुपयांचा फटका
8. ऑकलॅन्ड - न्यूझीलंड पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून 3 भारतीय निवडून आले, सरदार कवलजीत सिंह बख्शी हे सलग चौथ्यांदा विजयी
9. न्युयॉर्क - अमेरिकेने कोरियावरून भिरकावली अण्वस्त्रवर्षक विमाने, आव्हानांसाठी सज्ज असल्याची स्पष्टोक्ती
10. मुंबई - येत्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे केंद्र आणि राज्य सरकारवर हल्लाबोल करतील, पण सत्ता सोडण्याचं पाऊल ते उचलणार नाहीत, सूत्रांची माहिती
11. मुंबई - राज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान मोदींवर निशाणा, दाऊदचं मोदींना भारतात खेचून आणतानाचे व्यंगचित्र फेसबुक पेजवर पोस्ट
12. नागपूर - वर्तमानात राज्यात केवळ 23 टक्के सिंचन; 40 टक्क्यांपर्यंत सिंचन झाल्यास राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबतील : नितीन गडकरी
13. पुणे - नारायण राणे यांच्याकडे रिमोट कंट्रोल असून ते राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय योग्य वेळी घेतील : नितेश राणे
14. रेनो कंपनीने आपल्या कॅप्चर या क्रॉसओव्हर मॉडेलचे केले अनावरण, येत्या काही दिवसांमध्ये ही कार अधिकृतरित्या बाजारपेठेत येणार
15. नवी दिल्ली - कुलदीप आणि चहलने आपल्या कामगिरीने आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाची उणीव जाणवू दिली नाही : वीरेंद्र सेहवाग
16. मुंबई - अभिनेता अमेय वाघची भूमिका असलेल्या ‘फास्टर फेणे’ चित्रपटाचा दुसरा टीझर लाँच, रितेश देशमुखने त्याच्या फेसबुक-ट्विटरवर केला टीझर पोस्ट
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. न्यूयार्क - मागील 70 वर्षांमध्ये भारताने विकास साधला मात्र पाकिस्तानने दहशतवादी संघटना, जिहादी आणि दहशतवादी तयार केलेत - सुषमा स्वराज
2. नवी दिल्ली - देशातील नागरिकांना 24 तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 सप्टेंबरला नवी 'सौभाग्य' योजना सुरू करणार
3. नवी दिल्ली - बेनामी मालमत्तेबाबत सरकारी तपास यंत्रणांना माहिती देणार्यांना एक कोटी रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस देण्याचा विचार सध्या केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू
4. नवी दिल्ली - ज्येष्ठ पत्रकार के. जे. सिंग आणि त्यांची आई गुरचरण कौर यांची त्यांच्या राहत्या घरी हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर
5. नवी दिल्ली - गोरक्षकांच्या हिंसाचाराचा फटका बसलेल्या पीडितांना नुकसानभरपाई देण्याची जबाबदारी राज्यांची आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले
6. मुंबई - देशाच्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती गंभीर, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे आता दिसतंय, वाढत्या महागाईवरुन शरद पवारांची सरकारवर टीका
7. मुंबई - कर्जमाफी योजनेसाठी मुदतीत म्हणजे 22 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंत राज्यातील 56 लाख 59 हजार 393 शेतकऱ्यांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले
8. मुंबई - दसरा मेळावा ही लोकभावना त्यामुळे याबाबत लवकरच भूमिका जाहीर करू - पंकजा मुंडे यांची माहिती, समर्थक मात्र मेळावा घेण्यावर ठाम
9. यवतमाळ - भाईचंद हिराचंद रायसोनी बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणात बँकेच्या अध्यक्षांसह 14 संचालकांना अटक करण्यात आली
10. मुंबई - शाओमीला फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज या सेलचा मोठा फायदा, शाओमीने दोन दिवसातच 10 लाख स्मार्टफोनची विक्री केली
11. मुंबई - 'न्यूटन' चित्रपटाद्वारे संवेदनशील आणि चांगला विषय हाताळण्यात आल्याने या चित्रपटाला केंद्र सरकार 1 कोटी रूपयांचे अनुदान देणार
12. इंदूर - पहिले दोन सामने जिंकणा-या भारतीय संघाने आज पुन्हा आॅस्ट्रेलियाला धूळ चारून मालिका विजयासह नंबर वन होण्याचे लक्ष्य आखले
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. जम्मू - जम्मूमधल्या भारतीय चौक्या, खेडयांवर पाकिस्तानचा तुफान गोळीबार; BSF च्या दोन जवानांसह पाच नागरीक असे सात जण जखमी
2. नवी दिल्ली - आयआरसीटीसीने रेल्वे तिकीटांच्या बुकिंगकरता स्टेट बँक ऑफ इंडियासह 6 बँकांच्या कार्ड वापरावर बंदी घातलेली नाही, आयआरसीटीसीचा खुलासा
3. नवी दिल्ली - सध्या देशातील काही न्यायालये देश चालवण्याची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. हे काम न्यायालयांनी लोकांनी निवडून दिलेल्या लोकांवर सोडावे : रविशंकर प्रसाद
4. नोटाबंदीच्या अनावश्यक निर्णयामुळे अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. तांत्रिक आणि आर्थिकदृष्या नोटाबंदीची अजिबात आवश्यक नव्हती : मनमोहन सिंग
5. वाराणसी - भाजपसाठी व्होटबँकेचे राजकारण आणि निवडणुकीतील विजयापेक्षा देशाचा विकास महत्त्वाचा आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
6. दोन्ही बाजूंनी दबाव आणण्याची अजित डोभाल यांची रणनिती केव्हाही यशस्वी होणार नाही, अशा शब्दांमध्ये पाकिस्तानने डोभाल यांच्यावर जोरदार टीका केली
7. अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस 26 ते 28 सप्टेंबर पर्यंत भारत दौऱ्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारमण यांची घेणार भेट
8. लंडन - टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या उबर कंपनीचा लायसन्सचे नूतनीकरण न करण्याचा लंडन शहराच्या वाहतूक विभागाचा निर्णय
9. मुंबई - महागाई विरोधात शिवसेना रस्त्यावर; विविध ठिकाणी मोर्चे आणि रास्ता रोको, 'एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला', आंदोलनात शिवसैनिकांची घोषणाबाजी
10. मुंबई - राज ठाकरेंनी 'फेसबुक'वर मांडली स्मारकांबाबत भूमिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधून केवळ दलित मतं आपल्याकडे खेचण्याचा सरकारचा प्रयत्न
11. मुंबई - एकनाथ खडसेंविरोधातील खटले मागे घ्यावेत, यासाठी पाकिस्तानातून धमकीचा फोन; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
12. अमरावती - शिवसेनेनं पाठिंबा काढला तरी सरकार पडणार नाही, त्यांना 15 आमदार मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतली आहे : रामदास आठवले
13. पंढरपूर - पंढरपूरच्या विकासासाठी चक्क कॅनडा सरकारने आर्थिक सहाय्य करण्याची केली घोषणा, कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा केला तयार
14. जपान ओपन सुपरसिरीज स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्यफेरीत भारताचे आव्हान संपुष्टात, प्रणव चोप्रा आणि सिक्की रेड्डी जोडीचा पराभव
15. नवी दिल्ली - धडाकेबाज फलंदाज गौतम गंभीरने दिल्लीच्या रणजी संघाचे कर्णधारपद सोडले, यापुढे दिल्लीच्या नेतृत्त्वाची धुरा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या खांद्यावर
16. मुंबई - 90व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी ऑफिशियल एंट्री मिळवलेल्या अमित मसुरकर दिग्दर्शित न्यूटन या सिनेमाने पहिल्या दिवशी 96 लाखांची केली कमाई
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी वेब साईटवर त्यांची संपत्ती जाहीर केली असून ती 2 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले
2. अब पहली बार मेहंगाई गिरेगी... फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सुरु... जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काऊंट्स… लिंकवर क्लिक करा आणि शॉपिंग करा बिनधास्त https://goo.gl/Pe1KPk
3. नवी दिल्ली - भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रमुख नेते अनिवासी भारतीय होते असे वक्तव्य काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी न्यूयॉर्क येथे केले
4. नवी दिल्ली - दूरसंचार नियामक प्राधिकरणाने मोबाईल इंटरकनेक्शन वापर शुल्क कमी केल्यामुळे लवकरच फोन कॉलचे दर कमी होण्याची शक्यता
5. नवी दिल्ली - काश्मीर प्रश्न हा भारत आणि पाकिस्तानने चर्चेने सोडवावा असे आवाहन चीनने दोन्ही देशांना केले, पाकिस्तानला धक्का
6. नवी दिल्ली - रेल्वेने तिकीट बुकिंगसाठी स्टेट बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह 6 बँकेचे डेबिट अथवा क्रेडीट कार्ड वापरण्यास बंदी घातली
7. नवी दिल्ली - संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आज जैसलमेर आणि जोधपूर येथील सैन्यतळांचा दौरा करणार
8. मुंबई - चर्चगेट येथील आयकर भवनात 3 कोटी रुपयांची लाच घेताना आयकर विभागाचे उपायुक्त जयपाल स्वामीसह तीन जणांना रंगेहाथ अटक
9. मुंबई - शिवसेनेचे 20 ते 22 आमदार आणि 3 ते 4 मंत्री हे भाजपच्या संपर्कात, शिवसेनेने पाठींबा काढताच हे सर्वजण वर्षा बंगल्यावर दिसतील - अपक्ष आमदार रवी राणा
10. मुंबई - राज यांच्या फेसबुक पेजला तब्बल पाच लाखांवर लाइक्स मिळाले असून काही तासांतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 5 लाख 35 हजारांवर पोहोचली
11. लिबिया - येथे एक जहाज बुडून झालेल्या दुर्घटनेत 8 प्रवाशांना जलसमाधी मिळाली तर साधारणपणे 90 जण बेपत्ता, शोध सुरु
12. मुंबई - मराठमोळा तरुण प्रयोगशील दिग्दर्शक अमित मसूरकर याचा 'न्यूटन' हा चित्रपट भारताकडून ऑस्कर पुरस्कारासाठी निवडण्यात आला
13. मुंबई - भारताच्या ऑलिम्पिक स्पर्धेत जागतिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक लवकरच संसदेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती
2. अब पहली बार मेहंगाई गिरेगी... फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सुरु... जबरदस्त ऑफर्स आणि डिस्काऊंट्स… लिंकवर क्लिक करा आणि शॉपिंग करा बिनधास्त https://goo.gl/Pe1KPk
3. नवी दिल्ली - खासगी क्षेत्रात आघाडीची मानली गेलेल्या येस बँकेने यंदा 2500 म्हणजेच एकूण कर्मचार्यांच्या 10 टक्के इतकी कर्मचारी कपात केली
4. मुंबई - माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ ही पाणबुडी भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली
5. मुंबई - खासगी जमिनीवर विकासकांनी वाजवी दरातील घरांची उभारणी केल्यास त्यांना प्रत्येक घरामागे अडीच लाख रुपये देण्यात येणार
6. मुंबई - आयबीच्या चौकशीत इक्बाल कासकरने अनेक खुलासे केले, दाऊदची कराचीत चार घरे असल्याची ही माहिती दिली
7. मुंबई - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, 6 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांसह 16 लाख कर्मचाऱ्यांना होणार लाभ
8. रत्नागिरी - श्रीकृष्ण पाटीलबाबावर जादुटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याचा मठ कायमस्वरुपी बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
9. सोलापूर - उजनी धरणाचे 15 दरवाजे 6 फुटाने उघडले, भीमा नदीतील विसर्ग दुपटीने वाढला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
10. मुंबई - ‘बाबूजी धीरे चलना’सारख्या गाण्याला पडद्यावर अजरामर करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री शकिला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन
11. मुंबई - श्रद्धा कपूरची प्रमुख भूमिका असलेला आगामी आणि बहुचर्चित सिनेमा ‘हसीना पारकर’ विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
12. कोलकत्ता - भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडे मॅचमध्ये टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 50 धावांनी मात, भारताची मालिकेत 2-0 अशी आघाडी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. जम्मू-काश्मीर - पाकिस्तानकडून अरनिया सेक्टरमधल्या आर. एस. पुरामध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन; बनिहालमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, काही जवान जखमी
2. नवी दिल्ली - भ्रष्टाचाराचा तपास नव्या फॉर्म्युल्याने, निवृत्त अधिका-यांची मदत; 180 दिवसांत चौकशी होणार पूर्ण
3. नवी दिल्ली - मॅक्सिकोतील भारतीय दूतावासाशी बोलणं झालंय. मॅक्सिकोमधील सर्व भारतीय सुखरूप आहेत : सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री
---------------------------------------------
आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horo-21-sept
---------------------------------------------
4. नवी दिल्ली - दरवर्षी एक हजार खेळाडूंना प्रत्येकी 5 लाखांची शिष्यवृत्ती, सुधारित 'खेलो इंडिया', 20 विद्यापीठांना विशेष प्रोत्साहन
5. अमृतसर - दोन पाकिस्तानी घुसखोर ठार, पंजाबमार्गे भारतात घुसण्याचा करत होते प्रयत्न, सीमा सुरक्षा दलाची कारवाई
6. अमेरिकला काही धोका निर्माण झाल्यास उत्तर कोरियाला नेस्तनाबूत करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसेल, संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला इशारा
7. मुंबई - मुसळधार कोसळणा-या पावसामुळे राज्यातील 24 धरणे ओव्हर फ्लो, चिंता मिटली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
8. मुंबई - खासगी लोकांना पोलीस संरक्षण देण्यासंदर्भातील धोरणाचा पुनर्विचार करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
9. मुंबई - यावर्षीचा ऊस गाळप हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार, मंत्री समितीच्या बैठकीत निर्णय
10. मुंबई - नवीन गृहनिर्माण प्रकल्पांच्या उभारणीत तब्बल 36 टक्क्यांची घट,तर यावर्षी घरांची विक्री आठ टक्क्यांनी झाली कमी
11. कोलकाता - भारत आणि ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या वन डेसाठी ईडन गार्डन्स सज्ज, मालिकेत भारताची 1-0 अशी आघाडी, सामन्यावर पावसाचे सावट
12. टोकियो - जपान ओपन सीरीजमध्ये सायना नेहवालची विजयी सलामी, थायलंडच्या पर्णपवी चोचुवॉन्गचा 21-17, 21-9 असा उडवला धुव्वा
13. मुंबई - ‘रुख’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, सिनेमात अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री स्मिता तांबे यांची मुख्य भूमिका
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
अब पहली बार मेहंगाई गिरेगी क्योंकी
फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' सेल सुरु
हा सेल 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठी पर्वणीच आहे.
सेलमध्ये काय-काय मिळणार?
* इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, गारमेंट, मोबाइलसह अनेक वस्तूंवर भरघोस सूट
* डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय यासारख्या अनेक ऑफर...
* टीव्ही, एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनसारख्या अनेक वस्तूंवर तब्बल 70% सूट
* फॅशन आणि गारमेंटच्या तब्बल 500 प्रोडक्टचा समावेश असणार...
चला तर मग विचार कसला करताय? तुम्हाला हवंय ते खरेदी करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/YYfp5P
6 624
Lets Up News Updates
1. जम्मू-काश्मीर - पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद
2. नवी दिल्ली - देशाच्या कररचनेत जीएसटीमुळे आमुलाग्र बदल, याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर भारताचा विकासदर 8 टक्क्यांवर जाईल : जागतिक बॅंक
---------------------------------------------
जिओफाय डोंगलवर 1 हजार रूपयांची सूट, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://bit.ly/999-rs-jiofi-dongle
---------------------------------------------
3. नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 3 कोटी 3 लाख 49 हजार 795 रूपयांची सोन्याची बिस्किटे जप्त, एका प्रवाशाला अटक
4. बिहार - भागलपूर जिल्ह्यातील कहलगाव येथे उद्घाटनाच्या 1 दिवस आधीच फुटले धरण; 828 कोटी पाण्यात, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या हस्ते होणार होते उद्घाटन
5. सिरसा - बाबा राम रहिमच्या डेऱ्यात 600 सांगाडे, पोलीस तपासातून माहिती उघड
6. गडचिरोली - नोटाबंदीत नक्षलवाद्यांना सहकार्य केल्याच्या संशयातून आणखी दोघांना घेतले ताब्यात, एका व्यापाऱ्यासह शिक्षकाचा समावेश
7. न्युयॉर्क - फोर्ब्सच्या स्पेशल लिस्टमध्ये 3 भारतीय बिझनेसमननी पटकावले स्थान, लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला यांचा यात समावेश
8. मॅक्सिको - येथे झालेल्या शक्तिशाली भूकंपात आतापर्यंत 248 लोक मृत्युमुखी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
9. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 32400.51, निफ्टी : 10141.20, सोने भाव : 29,760 (प्रतितोळा), चांदी : 40,307 (प्रतिकिलो)
10. मुंबई - मुंबईत कुठलेही वादळ येणार नसून सोशल मीडियावर केवळ अफवा पसरवल्या जात असल्याचा हवामान खात्याचा खुलासा
11. मुंबई - मुंबई नजीक अरबी समुद्रात खनिज तेलाचा मोठा सापडला, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळातर्फे (ओएनजीसी) यासंदर्भातील घोषणा करण्यात आली
12. मुंबई - गणपतीदरम्यान उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक (पीए) मिलिंद नार्वेकर यांनी दिली होती शिवसेनेत येण्याची ऑफर : आमदार नितेश राणे
13. मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावाची 'पद्मभूषण' सन्मानासाठी शिफारस
14. जीमेलकडून आपल्या स्मार्टफोन व वेब आवृत्तीसाठी हायपरलिंक फिचर प्रदान, यामाध्यमातून पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल अॅड्रेसला एका क्लिक करण्याजोग्या लिंकमध्ये परावर्तित केले जाणार
15. मुंबई - संजय ए.पाटील निर्मित 'ड्राय डे' चित्रपटातील 'अशी कशी' हे रोमँटीक गाणे नुकतेच लाँच
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - 20 हजार व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी 3 पोलीस तैनात तर 663 लोकांमागे केवळ एकच पोलीस तैनात असल्याची माहिती
2. नवी दिल्ली - एसबीआयमध्ये विलीनीकरण झालेल्या सहा बँकांचे जुने चेक 30 सप्टेंबरनंतर बंद होणार, नवे चेकबुक घेण्याची एसबीआयची सूचना
3. नवी दिल्ली - भारतात बेकायदा राहत असलेले रोहिंग्या मुसलमान हे देशाच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक असल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली
4. हरियाणा - रामरहिमला शिक्षा सुनावणी दरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी हनीप्रीतसह 43 जणांचा समावेश असलेली मोस्ट वाँटेड गुन्हेगारांची यादी जाहीर
5. गांधीनगर - माजी मंत्री माया कोडनानी विधानसभेतच उपस्थित होत्या, असा जबाब अमित शाह यांनी नरोदा दंगलप्रकरणी कोर्टात दिला
6. लखनऊ - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत मोहनदास हरिद्वारहून मुंबईकडे जाताना रेल्वेतून बेपत्ता
7. पणजी - सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर बंदी, बारनजीक मद्यपान करताना कोणी आढळल्यास बारचा परवाना रद्द होणार, मुख्यमंत्री पर्रीकर यांचा इशारा
8. मुंबई - 20 हजार कोटींचे अतिरिक्त कर्ज उभारण्यास केंद्र सरकारची राज्याला मंजुरी, या निर्णयामुळे 65 हजार कोटींचे कर्ज उभारता येणार
9. मुंबई - खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली दाऊचा भाऊ इक्बाल कासकर यास त्याच्या साथीदारांसह ठाणे खंडणीविरोधी पथकाने अटक केली
10. मुंबई - विवेकानंद आश्रमाने संमेलनाच्या वादानंतर प्रस्ताव मागे घेतल्याने 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता बडोद्यात होणार
11. मुंबई - बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान होणार असल्याची माहिती
12. मुंबई - शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर, ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत दोन वेळा खडाजंगी
13. मुंबई - नालासोपारात एकाच कुटुंबातील चौघांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न, बापलेकीचा मृत्यू तर आई आणि दुसरी मुलगी बचावली
14. बीड - 25 जणांना अन्नातून विषबाधा, परळी उपजिल्हा रुग्णालय व अंबेजोगाई येथे शासकीय रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू
15. मुंबई - आयफोनला टक्कर देण्यासाठी गुगल कंपनी पुढील महिन्यात पिक्सल 2 व पिक्सल 2 एक्सएल हे फ्लॅगशीप स्मार्टफोन लाँच करणार
16. मुंबई - राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त सुरुवात केली, निफ्टीने प्रथमच 10 हजार 150 चा टप्पा पार केला
17. केरळ - मल्ल्याळम अभिनेत्रीला मारहाणप्रकरणी अभिनेता दिलीपला जामीन देण्यास केरळ न्यायदंडाधिकारी कोर्टाचा नकार
18. दुबई - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली टी-20 फलंदाजांच्या आयसीसी रॅंकिंग यादीत अव्वल तर गोलंदाज जसप्रीत बुमराह दुस-या क्रमांकावर
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीनगर - पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील अर्निया सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक भारतीय महिला ठार तर पाच नागरिक जखमी
2. नवी दिल्ली - डिजिटल अर्थव्यवस्थेच्या विस्ताराने देशात 70 लाख राेजगाराच्या संधी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निर्माण हाेतील, माहिती-तंत्रज्ञानमंत्र्यांची माहिती
3. नवी दिल्ली - येत्या दहा वर्षांत जपान आणि जर्मनीला मागे टाकून भारत तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल, ब्रिटनस्थित ‘एचएसबीसी’ कंपनीची माहिती
4. नवी दिल्ली - देशात सोन्याच्या आयातीमध्ये एप्रिल 2016 ते ऑगस्ट 2017 या कालावधीत तिप्पट वाढ झाली, 15.24 अब्ज डॉलरचे सोने आयात
5. नवी दिल्ली - अयशस्वी उपग्रह प्रक्षेपणानंतर इस्रो पुन्हा नव्या दमाने कामाला लागली, येत्या डिसेंबरमध्ये पुन्हा उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात येणार
6. नवी दिल्ली - मसूद अजहर याला जो पर्यंत न्यायालयात उभे केले जात नाही, तो पर्यंत भारत स्वस्थ बसणार नाही, एका वरिष्ठ अधिकाऱ्याची माहिती
7. मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणेच राज्य मंत्रिमंडळाचाही लवकरच विस्तार करण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले
8. मुंबई - दसऱ्याआधी आपण सीमोल्लंघन करणार असल्याचा सूचक इशारा काँग्रेसचे कोकणातील नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला
9. पुणे - पुढील तीन-चार दिवस कोकण, मुंबईत पावसाचा जोर वाढणार, या भागात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
10. काठमांडू - जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टची उंची पुन्हा एकदा मोजणार, अशी माहिती नेपाळच्या सर्व्हे विभागाने दिली
11. मुंबई - श्रद्धा कपूर ही सायना नेहवालच्या आगामी बायोपिकमध्ये दिसणार असून ती सध्या सायनाच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचे धडे गिरवत आहे
12. चेन्नई - टीम इंडियाने चेन्नईच्या पहिल्या वन डेत ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी धुव्वा उडवून पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - चार वर्षात भारताकडील परकीय चलन साठ्यात 45 टक्के वाढ, यामुळे भारताला ब्रेक्झिटसारख्या प्रश्नाची झळ बसणार नाही
2. नवी दिल्ली - स्वच्छ भारत अभियानासाठी सरकारकडे निधी नाही, सरकारने सर्व कॉर्पोरेट कंपन्यांना पत्र लिहून सीएसआरमधून 7 टक्के भाग देण्याची केली विनंती
3. अहमदाबाद - 56 वर्षानंतर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरदार सरोवरचं लोकार्पण, या धरणामुळे चार राज्यांचा विकास होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
4. गडचिरोली - चकमकीत नऊ महिन्यांत ज्योती गावडे हिच्यासह पाच महिला व दोन पुरुष असे एकूण सात नक्षलवादी ठार
5. मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; मंत्र्यांच्या कामगिरीनुसार खातेबदल होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
6. मुंबई - ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र आणि अंगणवाडीच्या ठिकाणी महानेटद्वारे इंटरनेट सेवा देण्यात येणार, 'मी मुख्यमंत्रीबोलतोय' मधून देवेंद्र फडणवीस यांची माहिती
7. मुंबई - दिवाळीत एसटी प्रवास महागणार, सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये 10 ते 20 टक्के दरवाढ, 14 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत भाडेवाढ लागू असेल
8. नंदुरबार - आणखी फक्त आठवडाभरच नागरिकांना लोडशेडिंगचा त्रास सहन करावा लागणार : चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री
9. औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या खात्यात 15 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होतील : रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष
10. सांगली - मिरजेतील अंबाबाई मंदिरातही पशूबळीची प्रथा बंद करण्याचा देवस्थान पंच कमिटीने घेतला निर्णय
11. लातूर - पत्रकाराला (विष्णू बुरगे) शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपचे नेते पाशा पटेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल
12. Flipkart चा बिग बिलियन सेल 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान, अनेक ब्रँडचे स्मार्टफोन स्वस्त दरात मिळणार
13. एयरटेलच्या पोस्ट पेड ग्राहकाला मोफत 60 जीबी डाटा, याची वैधता 6 महिन्यांपर्यंत असेल
14. सोल - भारताच्या पी. व्ही. सिंधूने कोरिया ओपन सुपर सीरिजवर कोरले नाव, जपानच्या नोझोमी ओकुहारावर सिंधूने 22-20, 11-21, 21-18 अशी केली मात
15. भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वनडे, धोनी-पांड्याचे झुंजार अर्धशतक, ऑस्ट्रेलियासमोर 282 धावांचे आव्हान
16. नवी दिल्ली - क्रिस गेलने रचला नवा रेकॉर्ड, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 52 सामन्यांमध्ये लगावले 103 सिक्सर
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
