ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

الذهاب إلى القناة على Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

إظهار المزيد
6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
photo content

Lets Up News Updates 1. जम्मू-काश्मीर - पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमधील अरनिया सेक्टर येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन; तीन नागरिक जखमी 2. नवी दिल्ली - काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग, अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणालाही नाही, भारताने इस्लामी देशांना झापलं 3. नवी दिल्ली - जगातील दुसरे सर्वांत मोठे ठरणाऱ्या सरदार सरोवर प्रकल्पाचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार 4. नवी दिल्ली - हवाईदलाचे मार्शल अर्जन सिंह यांनी 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, पाच स्टार मिळवणारे अर्जन सिंह हे एकमेव अधिकारी होते 5. नवी दिल्ली - सिंधू जल करारावर भारत-पाकिस्तानची चर्चा निष्फळ, दोन्ही देशांदरम्यान यासंबंधी कोणताही समझोता होऊ शकलेला नाही 6. बंगळूर - कर्नाटक सरकारच्या शिक्षण खात्याने मुख्य विकास धोरणाच्या नावाखाली माध्यमिक शिक्षणातील त्रि-भाषा सूत्र धोरण रद्द करण्याचा घाट घातला 7. मुंबई - अल्पसंख्यक समाजातील विद्यार्थ्यांना फी माफी या योजनेअंतर्गत 1 लाख 10 हजार विद्यार्थ्यांना 280 कोटी रुपयांचे वाटप केले - मुख्यमंत्री 8. मुंबई - राणे समर्थक जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वातील सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त, विकास सावंत यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी 9. लंडन - जगातील टाॅप-20 तणावग्रस्त शहरांत भारतातील चार शहरांचा समावेश, दिल्ली 9व्या स्थानी, मुंबई 13, कोलकाता 19, तर बंगळुरू20 व्या स्थानी 10. सोल - पी. व्ही. सिंधूने चीनच्या ही बिंगजियाओ हिचा पराभव करत कोरिया ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये धडक दिली 11. मुंबई - 'जर मी पेप्सी पित नसेल तर मी इतरांना पेप्सी प्यायला का सांगू?.' असे सांगत विराट कोहलीने पेप्सीची जाहिरात करण्यास नकार दिला 12. मुंबई - दुखापतग्रस्त अक्षर पटेलऐवजी भारताच्या वन डे संघात रविंद्र जाडेजाचा समावेश, आज पासून भारत वि. ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामना रंगणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - सर्च इंजिन गुगलने गुगल ट्रान्सलेटमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला 2. नवी दिल्ली - अधिकाधिक कंपन्यांना जीएसटी कक्षेत आणण्यासाठी कर विभागाच्या वतीने लवकरच देशभरात छापेमारी करण्यात येणार 3. नवी दिल्ली - रणजीत सिंह आणि रामचंद्र छत्रपती यांच्या खून प्रकरणात रामरहिमची पंचकूला येथील सीबीआय कोर्टात आज सुनावणी सुरु होणार 4. नवी दिल्ली - राहुल गांधी पुढील महिन्यात काँग्रेस अध्यक्ष होऊ शकतात, असे स्पष्ट संकेत पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी दिले 5. नवी दिल्ली - ऑनलाईन गेम ‘ब्ल्यू व्हेल’वरील बंदीच्या मागणीशी संबंधित याचिकेवर सर्वाेच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली 6. मुंबई - नोव्हेंबर 2016 ते एप्रिल 2017 या अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात शून्य ते पाच वयोगटातील 8 हजार 416 बालकांचे मृत्यू 7. मुंबई - परतीचा पाऊस 15 ते 25 सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले 8. मुंबई - रूळ ओलांडताना मध्य, पश्चिम, हार्बरवर काल एका दिवसातील अपघातातील मृतांची संख्या 12 तर जखमींची संख्या 13 नोंदविली गेली 9. पुणे - पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना भुजंगराव मोहिते यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र 10. बीजिंग - भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादात तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, वादग्रस्त भागात इतर देशांच्या गुंतवणूकीस आमचा विरोध - चीन 11. नवी दिल्ली - सेटिंग नसल्यामुळे आपल्याला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होता आले नाही. यापुढेही कधीच या पदासाठी अर्ज करणार नाही - सेहवाग 12. सेऊल - जपानच्या मिनात्सु मितानीवर विजय साजरा करून पी. व्ही. सिंधूने कोरियन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👉 _*लोडशेडिंग; चर्चा नको सोल्यूशन हवे!*_ _*Lets Up Think Katta*_ लोडशेडिंग आणि भारनियमन या दोन शब्दांनी सध्या महाराष्ट्र चांगलाच हैराण आहे. कुठे पाच तास, कुठे सात तास तर काही जिह्यांत नऊ-नऊ तासांचे लोडशेडिंग सुरू आहे. विशेष म्हणजे जनतेला कुठलीही पूर्वसूचना न देता भारनियमन सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातही 25 ते 40 टक्के भारनियमन सुरू आहे. याच लोडशेडिंगचा घेतलेला आढावा... 👉 _*औद्योगिक वसाहतींना फटका*_ वीजच नसल्यामुळे औद्योगिक उत्पादन ठप्प झाले आहे. राज्याच्या विविध भागात अशीच परिस्थिती आहे. लोडशेडिंगमुळे राज्यभरात उद्योगांना कोटयवधी रुपयांचा फटका बसला आहे. उत्पादनच कोलमडल्यामुळे साहजिकच त्यावरून होणारी कोटयवधी रुपयांची उलाढालही ठप्प झाली आहे. _*5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_ https://goo.gl/j2Ga5a 👉 _*अचानक कोळशाची टंचाई कशी निर्माण झाली?*_ कोळशाची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाल्याने लोडशेडिंगचे संकट कोसळले असं सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र अचानक कोळशाची टंचाई का निर्माण झाली? वीजनिर्मितीच्या प्रकल्पांकडे कोळशाचा किती साठा असायला हवा याचे नियोजन करणारी यंत्रणा गाफील राहिल्यामुळेच भारनियमनाचे संकट राज्यातील जनतेवर कोसळले हे उघड आहे. 👉 _*कागद आणि वास्तव वेगळेच*_ खरे तर सध्या पावसाळयाचे दिवस आहेत. त्यामुळे उन्हाळयाच्या तुलनेत विजेची मागणीही कमी झाली आहे. तरीही उर्जा खाते म्हणा किंवा महावितरण, महानिर्मितीच्या कंपन्या वीजपुरवठा करण्यात कमी पडाव्यात हा प्रकार निंदनीय आहे. राज्यातील विजेची सरासरी मागणी चोवीस हजार मेगावॅट आहे. वीजनिर्मितीची क्षमता म्हणाल तर ती 33 हजार 500 मेगावॅट इतकी आहे. म्हणजेच महाराष्ट्राकडे मागणीपेक्षाही नऊ हजार मेगावॅट वीज जास्त आहे. किमान कागदावर तरी तसेच दिसत़े. त्यातही सध्या पंधरा हजार मेगावॅटवर गेली आहे. निर्मितीक्षमतेच्या निम्म्याहून कमी मागणी असताना तेवढीही वीज जर उपलब्ध करून देता येत नसेल तर काय बोलावं. 👉 _*जलाशय फुल; लोडशेडिंगची झळ*_ उद्योजक, शहरी आणि ग्रामीण जनता व खासकरून शेतकऱयांना या लोडशेडिंगची सर्वाधिक झळ बसते आहे. पावसाळयामुळे जलाशय सध्या भरलेले आहेत, पण पाणी असूनही वीज नसल्यामुळे शेतातील पिकांचे पाणी बंद झाले आहे. तीन महिन्यांत राज्यावर लोडशेडिंगचे संकट कोसळण्याची ही दुसरी वेळ आहे. मे महिन्यात विजेची मागणी वाढली म्हणून लोडशेडिंग झाले आणि आता विजेची मागणी कमी झाली तरी लोडशेडिंगची अंधारयात्रा सुरूच आहे. 👉 _*राजकारण पुरे; सोल्यूशन हवे!*_ विरोधकांनी सध्या ’लोडशेडिंग’वर जोरदार राजकारण सुरू केलंय. नुसती आश्‍वासन, चर्चा आणि आंदोलनाने प्रश्‍न सुटणार नाही. त्यामुळे लोडशेडिंगप्रश्‍नी राजकारण नको; सोल्यशून हवे आहे, अशी भावना सर्व सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. _*5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_ https://goo.gl/j2Ga5a

Lets Up News Updates 1. जम्मू-काश्मीर - हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी जमीर अहमद याला बांदीपुरातून पकडले, त्याच्याकडील हत्यारेही केली जप्त 2. नवी दिल्ली - भारतात ‘शून्या’चा वापर मानले गेले त्याहून सुमारे पाचशे वर्षे आधी म्हणजे तिस-या किंवा चौथ्या इसवी शतकात झाला असावा, संशोधनावरून स्पष्ट 3. नवी दिल्ली - जपानमधील ‘ज’ आणि इंडियातील ‘इ’ मिळून ‘जय’ हा शब्द तयार होतो, असे सांगून जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांनी ‘जय जपान व जय इंडिया’चा नारा दिला 4. नवी दिल्ली - आता गुगलवरूनही आॅनलाइन पेमेंट करता येणार कारण गुगल लवकरच भारतात ‘तेज’ नावाने आपली मोबाइल पेमेंट सेवा सुरू करत आहे 5. नवी दिल्ली - भारतीय नागरिक स्विस बँकेपेक्षा आशियांतील बँकांमध्ये पैसे जमा करत आहेत, ‘बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटस्’च्या अहवालातून माहिती समोर 6. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या एप्रिल महिन्यातील अहवालानुसार राज्यात एप्रिल या एकाच महिन्यात एकूण 1 हजार 236 बालमृत्यूंची नोंद 7. मुंबई - शेतकरी कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत वाढवली, आता 22 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरता येणार, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती 8. मुंबई - 91 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन बुलडाण्यातील हिवरा आश्रमात घेण्याचा प्रस्ताव मागे, शुकराज महाराजांच्या विवेकानंद आश्रमाचा निर्णय 9. मुंबई - म्हाडाच्या 819 सदनिकांच्या लॉटरीची सोडत 10 नोव्हेंबरला तर 16 सप्टेंबरपासून अर्ज भरता येणार, सोडतीसाठी उद्या जाहिरात प्रसिद्ध होणार 10. सोलापूर - अकलूज येथील अवैध गर्भपात प्रकरण ताजे असताना माळशिरस परिसरात 9 महिलांच्या अवैध गर्भपात प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल 11. सेऊल - संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियावर काही निर्बंध लादल्यानंतरही त्यांनी जपानच्या क्षेत्रावरून पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागले 12. पेरु - 2024 आणि 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी यजमान शहरांची निवड, 2024 साठी पॅरिस, तर 2028 साठी लॉस एंजेलिसच्या नावावर शिक्कामोर्तब न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

👉 NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे काय? Lets Up Useful Info भारतात पैसे पाठवणे प्रक्रिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखी खाली चालते. सध्या भारतात विविध प्रकारच्या पैसे पाठवणे प्रक्रिया अस्तित्वात आहेत. त्यात NEFT, RTGS आणि IMPS या प्रक्रियांचा समावेश होतो. बँकेत किंवा ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना तुम्ही NEFT, RTGS आणि IMPS बद्दल ऐकलं असेल. पण कधी तुम्ही विचार केलाय का, NEFT, RTGS आणि IMPS म्हणजे नेमकं काय आहे? त्यांच्यामधील फरक काय? चला तर आज जाणून घेऊया... 1) NEFT (National Electronic Fund Transfer) : भारतातील प्रमुख पैसे हस्तांतरणापैकी हि एक प्रणाली एक आहे. यात पैसे लगेच ट्रान्सफर होत नाहीत. यामध्ये प्रत्येक तासाचा टाइम स्लॉट बनवलेला असतो आणि त्यानुसार पैसे दुसऱ्याला पाठवले जातात. हे इलेक्ट्रॉनिक संदेशाच्या माध्यमाने वापरले जाते. नोव्हेंबर 2005 मध्ये ही प्रणाली सुरु करण्यात आली. ही सुविधा देशाच्या जवळपास 30000 बँकांमध्ये उपलब्ध आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup 2) RTGS (Real Time Gross Settlement) : या माध्यमातून पैसे लगेच हस्तांतरीत करता येतात. या पद्धतीमध्ये OK बटण दाबल्यावर लगेच पैसे समोरच्याच्या खात्यामध्ये जमा होतात. त्यामुळे देशातील 95% देवाणघेवाण याच प्रणाली मधून होते. ही जगात सर्वात जास्त वापरली जाणारी प्रक्रिया आहे. 3) IMPS (Immediate Payment Service) : यात एका बँक खात्यामधून दुसऱ्या बँक खात्यामध्ये पैसे कधीही पाठवता येऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून देखील या सेवेचा वापर करता येतो. NEFT आणि RTGS च्या वापरावर मर्यादा आहे, तर दुसरीकडे IMPS चा वापर मात्र दिवसाच्या 24 तासांत कधीही आणि सुट्टीच्या दिवशीही करता येतो. ह्या सेवेचे व्यवस्थापन NationalPayment Corporation Of India (NPCI) द्वारे केले जाते. भारतामध्ये 22 नोव्हेंबर 2010 रोजी सार्वजनिकरीत्या ही सेवा सुरु करण्यात आली. 👉 IMPS सुविधा कशी वापरावी? 1) IMPS सुविधा वापरासाठी IMPS सुविधा पुरविणाऱ्या बँकेतील खात्यास मोबाईल क्रमांक नोंदवावा व बँकेकडून MMID मिळवावा. IMPS सुविधेसाठी नोंदणी केल्यानंतर बँकेकडून 7 अंकी क्रमांक देण्यात येतो त्याला MMID (Mobile Money Identifier) म्हणतात. 2) इतर बँकेमधून IMPS मार्फत रक्कम मागविण्यासाठी, IMPS नोंदणीवेळी बँकेत नोंदविलेला मोबाईल क्रमांक व बँकेमधून मिळालेला MMID रक्कम पाठविणाऱ्यास द्यावा. साधारणतः बँकांमध्ये IMPS व Mobile Banking सुविधा Android मोबाईलवर वापरण्यासाठी Application उपलब्ध करून देण्यात येत आहे. 👉 NEFT आणि RTGS मध्ये फरक काय? i) NEFT च्या माध्यमाने छोटे बचत खाते धारक पैसे हस्तांतरीत करतात. तर RTGS चा उपयोग मोठमोठ्या उद्योगसंस्था आणि कंपन्या करतात. ii) NEFT मधून किमान पैसे पाठवण्याची मुभा असते, परंतु RTGS मधून कमीत-कमी 2 लाख रुपये हस्तांतरीत करणे अनिवार्य असते. iii) NEFT मधून पैसे हस्तांतरीत होण्यासाठी वेळ लागतो. पण RTGS मधून पैसे त्वरित हस्तांतरीत होतात. iv) NEFT च्या माध्यमातून बँकेच्या कार्यालयीन वेळातच पैसे ट्रान्सफर करता येतात. RTGS मध्ये लगेचच पैसे ट्रान्सफर होतात पण त्यादिवशी बँक चालू असणे गरजेचे असते. 👉 NEFT आणि शुल्क : i) 1 लाखांपर्यंत : 5 रुपये + सेवा कर ii) 1 लाखांपेक्षा जास्त आणि २ लाखांपेक्षा कमी : 15 रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर iii) 2 लाखांपेक्षा जास्त पैसे पाठवण्यासाठी : 25 रुपयांपेक्षा जास्त नाही + सेवा कर 👉 RTGS आणि शुल्क : i) 2 लाख ते 5 लाखांपर्यंत देवाणघेवाण करण्यासाठी : प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 30 रुपये. ii) 5 लाख रुपयांपेक्षा जास्तची देवाणघेवाण करण्यासाठी : प्रत्येक ट्रान्सफरला कमाल 55 रुपये. 👉 RTGS व NEFT प्रणाली मार्फत रक्कम पाठवण्यासाठी आवश्यक गोष्टी : i) पाठवायची रक्कम. ii) इतर बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचा खाते क्रमांक. iii) लाभार्थी बँकेचे नाव. iv) इतर बँकेत जमा करावयाच्या खातेदाराचे नाव. v) रक्कम पाठवणा-या काढून स्वीकारणा-या साठी काही संदेश असेल तर. vi) IFSC Code (आयएफएससी कोड - RBI द्वारे सर्व बँकांना व त्यांचा शाखांना ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारचा कोड नियुक्त केलेला असतो) vii) रक्कम पाठवणा-याचा मोबाईल क्रमांक. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. नवी दिल्ली - येमेनमध्ये दहशतवाद्यांनी अपहरण केलेले ख्रिश्चन धर्मगुरू फादर टॉम उझुन्नलिल यांची दीड वर्षाने सुटका करण्यात यश 2. नवी दिल्ली - डॉ. एम. जी रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त केंद्र सरकार लवकरच शंभर रुपयांचं नाणं जारी करणार 3. नवी दिल्ली - घटस्फोट मिळण्यापूर्वी अनिवार्य असलेला सहा महिन्यांचा कालावधी (कुलिंग पीरियड) कमी करता येणे शक्य - सर्वोच्च न्यायालय 4. नवी दिल्ली - केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका टक्क्याने वाढवण्याचा निर्णय घेतला, 1 जूनपासूनचा महागाई भत्ता मिळणार 5. नवी दिल्ली - व्यापार व सौहार्द वाढीस लागण्याच्या हेतूने सुरू झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील वस्तुविनिमय व्यापार (बार्टर ट्रेड) बंद होण्याच्या मार्गावर 6. नवी दिल्ली - भारतात सर्वच ठिकाणी घराणेशाहीचा प्रभाव, या विषयावरून काँग्रेसला लक्ष्य करणे चुकीचे असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले 7. मुंबई - येत्या 30 सप्टेंबर रोजी भगवान गडावर पंकजा मुंडे यांच्या होणाऱ्या दसरा मेळाव्याला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारली 8. मुंबई - पुणे, नाशिक मालगाडी आणि पॅसेंजर ट्रेनच्या सुरळीत वाहतुकीसाठी दौंड-मनमाड रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाला केंद्राने मंजुरी दिली 9. मुंबई - ग्रामपंचायत निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता 14 ऐवजी 16 ऑक्टोबर रोजी, तर मतमोजणी 17 ऑक्टोबर रोजी होणार 10. कॅलिफोर्निया - अॅपलचा बहुप्रतीक्षित आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन स्मार्टफोन लाँच करण्यात आले 11. मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत 80 वर्षांच्‍या वृध्‍देच्‍या भूमिकेत दिसणार, चित्रपटाचे नाव 'तेजू' असून कंगना स्‍वत: हा चित्रपट दिग्‍दर्शित करणार 12. नवी दिल्ली - विराट कोहली पराभवाला कधीही भीत नाही. तो विजयासाठी आक्रमकतेने संघाचं नेतृत्त्व करतो - मायकल क्लार्क न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. जम्मू-काश्मीर- पाकिस्तान लष्कराकडून पुंछ सेक्टरमध्ये पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय लष्कराचंही चोख प्रत्युत्तर 2. नवी दिल्ली - 'ब्ल्यू व्हेल गेम'मुळे आतापर्यंत 200 जणांनी आत्महत्या केली असून या गेमवर देशात बंदी घालावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल 3. नवी दिल्ली - देशातील 7 खासदार आणि 98 आमदारांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे आढळल्याबाबत तपास करण्यात येत असल्याची माहिती 4. नवी दिल्ली - सहारा समुहाला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा दणका दिला, अँबी व्हॅलीचा लिलाव थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिला नकार 5. तामिळनाडू - रामेश्वरम किनारपट्टीजवळ श्रीलंकन नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना घेतले ताब्यात, तीन बोटी केल्या जप्त 6. छत्तीसगड - सुरक्षा दलांवर हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या 5 नक्षलवाद्यांना दंतेवाडातील अरनपूरमध्ये अटक करण्यात आली 7. मुंबई - वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत अडचणी येत असल्यामुळे कालपासून राज्यात तात्पुरतं भारनियमन करण्यात येत आहे 8. मुंबई - बीडमधील 106 बोगस स्वातंत्र्यसैनिकांच्या पाल्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा, राज्य सरकारचे आदेश 9. पुणे - राज्यातील 'स्वाइन फ्लू' मृत्यू रोखा, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे सरकारी, खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश 10. मुंबई - लाँचिंगपूर्वीच सॅमसंग गॅलक्सी नोट 8 हा फोन खरेदी करण्यासाठी आतापर्यंत अडीच लाख ग्राहकांनी नोंदणी केली 11. मुंबई - झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून 27 सप्टेंबरपासून ‘संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका सुरु होणार 12. चेन्नई - ऑस्ट्रेलियन संघ आज भारताच्या अध्यक्षिय संघाविरुद्ध सराव सामना खेळणार, या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया संघाचा हा एकमेव सराव सामना न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. जम्मू-काश्मीर - पोलिसांना लवकरच बुलेटप्रूफ वाहने आणि जॅकेटस् मिळणार असून, केंद्र सरकारने या वाहनांच्या खरेदीसाठी निधी दिला 2. नवी दिल्ली - देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प उभारला जात असून या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा शुभारंभ 14 सप्टेंबर रोजी होणार 3. नवी दिल्ली - केंद्र सरकारने आधारकार्ड मोबाईल सिमकार्डशी लिंक करण्यासाठी फेब्रुवारी 2018 पर्यंतचा कालावधी निश्‍चित केला 4. नवी दिल्ली - आगामी काळात दहशतवाद्यांकडून देशावर रासायनिक हल्‍ला होऊ शकतो, असा केंद्रीय गृह मंत्रालयाने इशारा दिला 5. नवी दिल्ली - महाराष्ट्रासह देशातील 17 राज्यांमधील 225 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ पडण्याचा प्राथमिक अंदाज केंद्र सरकारच्या संबंधित यंत्रणेने व्यक्त केला 6. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक 12 सप्टेंबरला बोलावली 7. मुंबई - राज्यभरातील आयटीआयमध्ये जवळपास 84.45 टक्के जागा भरण्यात आल्या असून सुमारे 33 हजार जागा शिल्लक राहिल्या 8. पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला, 10 डिसेंबर रोजी होणार निवड 9. उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आता प्रवेश पास अनिवार्य, कालपासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली 10. न्यूयार्क - एक नवे औषध विकसित करण्यात आले असून त्याच्या वापराने ‘हार्ट अ‍ॅटॅक आणि कॅन्सर’चा धोका कमी केला जाऊ शकतो, अमेरिकन संशोधकांचा दावा 11. पुणे - पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत अंतिम फेरीत न्यू आर्टस् कॉलेज अहमदनगरच्या 'माईक' या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला 12. न्यूयॉर्क - स्लोआन स्टीफन्स अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीची नवी विजेती ठरली तर अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद राफाल नदालने पटकावले न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

👉 _*सिम आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत फेब्रुवारी 2018 पर्यंत!*_ _*लेट्सअप ब्रेकिंग न्यूज*_ फेब्रुवारी 2018 पर्यंत सिम आणि आधार एकमेकांशी जोडले न गेल्यास, त्याचे व्हेरिफिकेशन न झाल्यास सिम कार्ड बंद होणार आहे. आधार-सिम व्हेरिफिकेशन ग्राहकहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. --------------------------------------------- IND-AUS वनडे सिरीजसाठी टीमची घोषणा, सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा http://bit.ly/team_indian_17 --------------------------------------------- या प्रकरणी लोकनिती फाउंडेशनने केलेल्या याचिकेवर फेब्रुवारी महिन्यात सुनावणी झाली होती. त्यावेळी माजी सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारला ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसारच, देशातील 100 कोटींहून अधिक मोबाइल ग्राहकांची ओळख पडताळून पाहण्यासाठी सिम कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली आहे. _*5 लाखांपेक्षा जास्त युझर्स असलेले ‘LetsUp - Digital Magazine’ जॉईन करा आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या WhatsApp वर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा*_ https://goo.gl/SWpvGa

Lets Up News Updates 1. जम्मू-काश्मीर - शोपियानमध्ये इमाम साहेब भागात दहशतवाद्यांचा लष्कराच्या गाडीवर हल्ला, प्रतिउत्तरात एका दहशतवाद्याला कंठस्नान 2. नवी दिल्ली - काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या घरावर आणि कार्यालयांवर सीबीआयचे छापे 3. नवी दिल्ली - जीएसटी परिषदेने इडली पीठ, फुटाणे, रेनकोट, रबरबँड आणि पेंड यांसारख्या दैनंदिन वापराच्या 30 वस्तूंवरील करात कपात केली 4. गोवा - नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेने आज जगप्रवासाला रवाना होणार 5. मुंबई - राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून ‘माझी कन्या भाग्यश्री’ सुधारित योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला 6. पुणे - स्वयंपाकिणीने सोवळं मोडल्याची तक्रार करणाऱ्या डॉ. मेघा खोले यांनी एक पाऊल मागे येत तक्रार मागे घेतली 7. पालघर - बालमृत्यू रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असताना गेल्या 8 महिन्यांत पालघर जिल्ह्यात 313 बालकांचा मृत्यू 8. मुंबई - ‘क’ आणि ‘ड’ वर्ग महापालिकेत महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा विचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 9. औरंगाबाद - राज्यातील रस्ते डिसेंबरअखेर खड्डे मुक्त करू त्यासाठी 550 कोटींची तरतूद, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा 10. मुंबई - पाच वर्षांपेक्षा अधिक काळात कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या राज्यातील तीन लाख निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द होणार 11. मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टी आपल्याला बाहेरून वाटते, तेवढी उदारमतवादी नाही, अभिनेत्री पूजा भट यांनी मांडली कैफियत 12. मुंबई - आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या तीन वनडेंसाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड होणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा (रियाझ अहमद) खात्मा; सोपोरे भागातील शैक्षणिक संस्था बंद, इंटरनेट सेवाही स्थगित 2. नवी दिल्ली - संरक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, सैन्यात जवळपास 800 महिलांची भरती केली जाणार, यामध्ये 52 महिला जवानांची भरती दरवर्षी केली जाईल 3. नवी दिल्ली - जीएसटी रजिस्ट्रेशन केल्यास एअरटेल फ्री डेटा देणार, जीएसटी फाईल करण्यासाठी तुम्हाला www.airtel.in/gst-advantage येथे जावे लागणार 4. नवी दिल्ली - शाळेच्या बस कंडक्टरनेच (अशोक कुमार) केली 7 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या, त्याने मुलावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता 5. संयुक्त राष्ट्र - जम्मू कश्मीर भारताचे अभिन्न अंग आहे व भविष्यातही काश्मीर भारताचाच भाग असेल, UN मध्ये भारताने पाकला पुन्हा ठणकावले 6. इस्लामाबाद - काश्मीर प्रश्न हा द्विपक्षीय चर्चेतून सुटू शकतो, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी व्यक्त केले मत 7. सिरसा - ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयाची झाडाझडती सुरू, मृत्यूच्या दाखल्यांशिवाय डेरा सच्चा सौदाकडून 14 मृतदेहांचे दान, मुख्यालयात फटाक्यांचा अवैध कारखाना 8. कोलकाता विमानतळावर विमानातील 100 प्रवासी थोडक्यात बचावले, भूतान एअर लाइन्सच्या विमानाच्या एका इंजिनाला लागली होती आग 9. चेन्नई - वीरपत्नी स्वाती महाडिक भारतीय लष्करात दाखल, दिमाखदार दीक्षांत समारंभात महाडिक लेफ्टनंटपदी रुजू 10. पाटणा - बिहारच्या पुरातून एनडीआरएफच्या जवानांनी वाचवले 102 गर्भवती महिलांचे प्राण, 3 महिलांची बोटीतच प्रसूती 11. ठाणे - हागणदारीमुक्त ठाणेसाठी पालिकेने घेतली गुगलची मदत, त्यानुसार शहरातील तब्बल 11 हजार 217 सार्वजनिक शौचालयांची माहिती आता गुगलवर उपलब्ध होणार 12. मुंबई - वातानुकूलित बस गाड्यांमुळे बेस्टचा घाटा वाढल्याने या 259 वातानुकूलित बसगाड्या बंद, आता या बसगाड्या भंगारात काढल्या जाणार 13. मुंबई - लालबागच्या राजाची फसवणूक; दानपेटीत मिळाल्या चलनातून रद्द झालेल्या 1000 रुपयांच्या 110 जुन्या नोटा 14. रायगड - जिल्ह्यात एकूण 502 अर्भकांचा तर 81 बालकांचा वर्षभरात मृत्यू, तसेच 25 मातांचाही मृत्यू 15. बीएसएनएलने कॉर्पोरेट ई-मेल सेवा केली सादर,याचा बेसिक प्लॅन एक रूपये प्रति-दिवस इतका किफायतशीर असेल 16. नवी दिल्ली - आपल्यात अजून आठ ते दहा वर्षांचं क्रिकेट बाकी : कर्णधार, विराट कोहली 17. मुंबई - सोनी टिव्हीवर 'मेरा साई' या साई बाबांच्या आयुष्यावर आधारित हिंदी मालिकेत अभिनेता वैभव मांगले झळकणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Lets Up News Updates 1. बंगळुरू - कर्नाटक सरकारने पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याबाबत पोलिसांना माहिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले 2. नवी दिल्ली - नोटबंदीनंतर मार्च 2017 पर्यंत 2 हजार 451 कोटी रुपये कर जमा तर 4 हजार 900 कोटी रुपये इतका काळा पैसा उघड - आयकर विभाग 3. नवी दिल्ली - अप्रत्यक्ष करात मोठे बदल केल्यानंतर इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स व प्रत्यक्ष कर कायद्यातही बदल करण्याचा सरकारचा विचार 4. चंदीगड - राम रहिमच्या सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात सापडली 5 मुले, विना लेबल औषध, 2 खाेल्याभर नाेटा व प्लास्टिक मनी 5. मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने 13 वर्षीय बलात्कार पीडित मुलीच्या गर्भपाताची परवानगी दिल्यानंतरही तिने मुलाला जन्म दिला, दोघेही सुखरूप 6. मुंबई - भारतातील किरकोळ क्षेत्रातील उद्योग 2021 पर्यंत 85 लाख कोटींचा होणार असल्याचा अंदाज फिक्की आणि डेलोइट या संस्थांनी व्यक्त केला 7. मुंबई - महाराष्ट्र हिरवागार करण्यासाठी 26 सिंचन प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला, नितीन गडकरींची माहिती 8. सातारा - शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक आजपासून देशसेवेत रुजू होणार, स्वाती महाडिक आज लेफ्टनंट पदाची शपथ घेणार 9. पुणे - पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्रात मुसळधार तर पुण्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 10. मेक्सिकोमध्ये समुद्र किनाऱ्याजवळ 8.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला असून इमारती आणि घरे कोसळल्याने 32 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी 11. मुंबई - जर गौरी लंकेश यांच्यासारख्या वैचारिक व्यक्तींच्या हत्या होत असतील तर हा माझा भारत नाही, प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचं वक्तव्य 12. मुंबई - भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक असलेल्या वाल्थेरुस मरीजिने यांनाच पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

Lets Up News Updates 1. श्रीनगर - दहशतवाद्यांनी शहरातील वर्दळीच्या जहांगिर चौकामध्ये ग्रेनेडहल्ला केला, एका नागरिकाचा मृत्यू तर तीन पोलिसांसह 15 जण जखमी 2. नवी दिल्ली - निर्मला सीतारामन यांनी 8685 माजी सैनिक, हुतात्मा जवानांच्या विधवा आणि कुटुंबीयांसाठी 13 कोटींच्या निधीला मंजुरी दिली 3. नवी दिल्ली - बीएसएनएल तर्फे पुढील वर्षी मार्च महिन्यापासून मोबाइल जगतात क्रांती घडवून आणणाऱ्या ‘फाइव्ह-जी’ सेवेच्या चाचण्या घेण्यात येणार 4. पाटणा - रेल्वे हॉटेल टेंडर प्रकरणात लालू प्रसाद यादव आणि त्यांचे चिरंजीव माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सीबीआयने समन्स बजावले 5. हरियाणा - हिंसा घडवून आणण्यासाठी डेरा सच्चा सौदाने आंदोलकांना 5 कोटी रूपये दिले, एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती उघड 6. मुंबई- जुहु परिसरातील बांधकाम सुरु असलेल्‍या 13 मजली इमारतीला तळमजल्‍यावर सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्‍यामुळे 6 जणांचा मृत्‍यू झाला 7. मुंबई - राज्यातल्या बैलगाडी शर्यतींवर लागू असलेली बंदी मुंबई हायकोर्टाने आणखी तीन आठवड्यांसाठी कायम ठेवली 8. पुणे - टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकाविला 9. मुंबई - महिलेबाबत अपशब्द वापरल्याचा आरोपप्रकरणी अंजली दमानिया यांच्या तक्रारीवरून एकनाथ खडसे यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल 10. नाशिक - गेल्या पाच महिन्यात तब्बल 187 नवजात अर्भकांचा मृत्यू, देशातील सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण असलेलं रुग्णालय म्हणून नाशिक जिल्हा रुग्णालय बदनाम 11. मुंबई - शाहरुख खानला नायक, खलनायकानंतर आता हॉरर चित्रपट करायचा आहे, आपण अशा चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची त्याने इच्छा व्यक्‍त केली 12. मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

photo content

Lets Up News Updates 1. म्यानमार - देशहितासाठी कठोर निर्णय घेतच राहणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा म्यानमारमध्ये भारतीयांशी संवाद 2. नवी दिल्ली - भारत लवकरच रशियाकडून S-400 एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार, यामुळे हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार 3. नवी दिल्ली - लष्करच नव्हे तर संपूर्ण देशाला चीन आणि पाकिस्तानसोबतच्या एकत्र युद्धाला तयार राहायला हवं : बिपीन रावत, लष्करप्रमुख --------------------------------------------- आजचे राशीभविष्य जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/horo_7_Sept --------------------------------------------- 4. नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने 13 वर्षांच्या एका 31 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातासाठी दिली परवानगी 5. नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या सुरक्षा ताफ्यातील बेपत्ता कमांडो सापडला, आर्थिक विवंचनेमुळे राकेश कुमार घरी परतला नव्हता 6. वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राजकारणातील श्रेष्ठ नेत्यांची यादी जाहीर, 5 भारतीय नेत्यांची वर्णी, यात अमेरिकेची राजदूत निक्की हेली, सीमा वर्मा, वकील नील कत्याल, अर्थशास्त्री अर्पणा माथुर आणि वकील नियोमी राव यांचा समावेश 7. मुंबई - 1993 सालचा बॉम्बस्फोट खटला, कुख्यात गुंड अबू सालेमसह 5 जणांच्या शिक्षेचा निर्णय आज 8. मुंबई - गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये केलेल्या कथित घोटाळ्याची चौकशी राज्याच्या लोकायुक्तांमार्फत करण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिली मंजुरी 9. मुंबई - राज्यात सप्टेंबर महिन्यात हलका ते मध्य स्वरूपात काही ठिकाणी पाऊस पडणार, कुलाबा वेधशाळेने वर्तवली शक्यता 10. मुंबई - मुंबई विद्यापीठाची निकालाकरता 19 सप्टेंबर नवी डेडलाईन, बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकालाला उशीर झाल्याचा दावा 11. मुंबई - परदेशी शिष्यवृत्तीसाठी आपल्या मुलीची निवड निकषांनुसारच, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा दावा 12. नवी मुंबई - सोसायटीमधील वादातून जमावाकडून चौघांवर कोयत्याने हल्ला, एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी, ऐरोली सेक्टर 2 मधील भर रस्त्यात घडली घटना 13. मुंबई - वेगवेगळ्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी, महाराष्ट्र राज्य सरकार चतुर्थ श्रेणी कर्मचारी 21 आणि 22 सप्टेंबरला संपावर जाणार 14. स्मार्टफोन बाजारात सध्या जोरदार स्पर्धा, विक्रीमध्ये अॅपलची तिसऱ्या स्थानी घसरण तर सॅमसंग आजही पहिल्या स्थानावर कायम 15. कोलंबो - भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून दणदणीत विजय, कर्णधार विराट कोहलीने 82 धावांच्या खेळीच्या जोरावरच मालिकावीर आणि सामनावीराचा पुरस्कार पटकावला 16. मुंबई - बजेट वाढल्याने बॉलिवुड अभिनेत्री बिपाशा बासुची वेब सीरीज सुरु होण्याधीच बंद, चाहत्यांची निराशा न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUpp Marathi - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @letsup