LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारची स्थापना, मुल्ला हसन अखुंद पंतप्रधानपदी
LetsUpp | Trending
⚡ अफगाणिस्तानमध्ये नव्या तालिबान सरकारची घोषणा करण्यात आली आहे. तालिबानने आपले मंत्रिमंडळ देखील जाहीर केले आहे. अफगाणिस्तानमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांच्या नेतृत्वाखाली तालिबानचं सरकार स्थापन झालं आहे.
👉 अफगाणिस्तानचे पंतप्रधान हे मुल्ला मोहम्मद हसन अखूंद हे असणार आहेत. तालिबानचे नंबर दोन नेते म्हणून मुल्ला गनी बरादर उप पंतप्रधानांच्या भूमिकेत असतील.
🗣️ बरदार यांच्यासह मुल्ला अब्दास सलाम यांनाही मोहम्मद हसन अखुंद यांची उपपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तालिबानच्या प्रवक्त्यानं मंत्रिमंडळाची घोषणा पत्रकार परिषदेत केली.
📍 दरम्यान, तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी सांगितलं की, मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा सरकारचे पंतप्रधान असतील आणि मुल्ला अब्दुल गनी बरदार सरकारचे उप पंतप्रधान असतील.
*तालिबानचं नवं मंत्रिमंडळ कसं असेल?* :
● पंतप्रधान - मुल्ला मोहम्मद हसन अखुंद
● उपपंतप्रधान - मुल्ला गनी बरादार
● गृहमंत्री - मुल्ला अब्दास सलाम गृहमंत्री
● संरक्षण मंत्री - सिराजुद्दीन हक्कानी
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/u2DlBU3rnjb
6 624
आधार कार्डावरुन आता नात्यांची ओळख मिटणार
LetsUpp l Trending
💫 देशातील सर्वात महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आधार कार्ड यामध्ये काळानुसार अनेक बदल होत आहेत. आता आधार कार्डामध्ये जर तुम्ही बदल करणार असाल तर वडिलांशी किंवा पतीशी असलेल्या नात्याची ओळख कार्डमध्ये उघड होणार नाही.
📌 आधार कार्डावरुन आता नात्यांची ओळख पटणार नाही. आता याचा वापर केवळ ओळख पटवण्यासाठीच होईल. आधार कार्डावर आता वडिल किंवा पतीच्या नावासमोर 'केयर ऑफ' लिहून येईल.
'केअर ऑफ' म्हणून वडिल, पतीऐवजी कोणाचंही नाव देणं शक्य
⚡ आधार कार्ड अपडेटसाठी अधिकृत CSC चे व्यवस्थापक संचालक दिनेश त्यागी यांनी सांगितले की, आता आधार कार्डासाठी वडील, मुलगा, मुलगी यांच्याऐवजी 'केअर ऑफ' असं लिहून येणार आहे. अर्जदार यामध्ये कोणाचंही नाव देऊ शकत नाही.
💁♀️ आधार कार्डावर कोणातंही नातं दर्शविलं जाणार नाही. तसेच अर्जदार आधार कार्ड फक्त नाव आणि पत्ता देऊन अपडेट करू शकतात. आधार कार्ड कोणतेच संबंध निश्चित करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं आहे.
... म्हणून केला गेला बदल
💁♂️ UIDAI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये आधार कार्डाबाबत सुप्रीम कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. ज्यात लोकांच्या खाजगी आयुष्याबाबत म्हटलं गेलं होतं. त्याच निर्णयाच्या आधारे कार्डावर अर्जदाराचे नातेसंबंध स्पष्ट केले जाणार नाही.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/joumk74Eljb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● विद्यार्थ्यांना कायम घरी ठेवल्याने मानसिक धोका, राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत बालकांच्या टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना
● सणासुदीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका, अन्न व औषध प्रशासन विभागाचा व्यावसायिकांना इशारा
● रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; अनेक ठिकाणी पाणी साचलं! दापोली शहर परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने चिंता वाढली
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● गणेशोत्सवानिमित्त मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ! कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
● प्रतिक्षा संपली! 2 वर्षांनंतर डोंबिवलीचा कोपर पूल खुला होणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार
● राज्यात "पंचगव्य क्रांती अभियानाची" सुरवात; आयुर्वेद गोविज्ञान काऊंसिल व काऊवेदा वेलनेस या दोन संयुक्त संस्थांच्या विद्यामानाने हे अभियान राबविले जाणार
● तळकोकणात लसीचे दोन डोस पूर्ण नसणाऱ्या तसेच आरटीपीसीआर अहवाल नसणाऱ्या प्रवाशांची ॲन्टीजेन टेस्ट होणार : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
● काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधींच्या नावाला पसंती, भारतीय युवक काँग्रेसच्या बैठकीत निर्णय
● गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुकेश अंबानी मोठी भेट देणार! सर्वात स्वस्त स्मार्टफोन बाजारात येणार
● टीम इंडियाचा ओव्हलवर 50 वर्षांनी ऐतिहासिक विजय, इंग्लंडचा 157 धावांनी पराभव, मालिकेत भारताची 2-1 ने आघाडी
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/CJDjiAnsljb
6 624
केरळमध्ये निपाहने एकाचा मृत्यू; आपल्याला काळजी करायची गरज आहे का?
Letsupp | National
● कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच केरळमध्ये चिंता वाढवणारी अजून एक बातमी समोर आली आहे. कोझिकोडमध्ये रविवारी १२ वर्षांच्या एका मुलाची निपाह विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. एका वृत्तपत्रातील बातमीनुसार अजून दोन जणांना निपाहचा संसर्ग झाल्याचंही स्पष्ट झालं आहे.
● केरळमध्ये निपाहचे रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारच्या नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)ची एक टीम राज्याच्या आरोग्य विभागाला तांत्रिक सहकार्य देण्यासाठी रवाना झाली आहे. केरळच्या आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासन सर्व खबरदारी घेत असल्याचं म्हटलं आहे.
● मात्र या पार्श्वभूमीवर इतर राज्यांनी काळजी करण्याचं कारण आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर निपाह विषाणू वर आतापर्यंत त्वरित नियंत्रण मिळवले गेले आहे. बांगलादेशमध्ये, जिथे निपाहचा उद्रेक सर्वाधिक वारंवार झाला आहे, काही महिन्यांनंतर प्रसारण थांबले आहे.
● निपाह विषाणू सार्स-सीओव्ही -२ पेक्षा खूप कमी संसर्गजन्य आहे, त्याचे मनुष्यापासून मनुष्यापर्यंत प्रसारण इतके सोपे किंवा जलद नाही. त्यामुळे इतर राज्यांनी काळजी करण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट होत आहे.
देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप
https://letsup.app.link/QUV8Hyg7jjb
