806
Obunachilar
-124 soatlar
-67 kun
+1130 kun
Postlar arxiv
806
निमित्त मराठी चित्रपट
"आम्हाला मराठी भाषा अभिजात हवी, पण आपण तिला टिकवतोय का?"
ट्रेलर आणि इंस्टाग्राम वर गाजत असलेली गाणी, त्यातली काही हृदयाला साद घालणारी दृश्य पाहून मी या चित्रपटाकडे आकर्षित झालो. पण संपूर्ण दिवसात केवळ एकच शो ठेवलेला. वाईट ही वाटलं, आणि ताबडतोब बुकिंग केलं. इतका जबरदस्त ट्रेलर असलेला चित्रपट म्हटल्यावर गर्दी तुफान असेल हा भ्रम थिएटर मध्ये गेल्यावर तुटला. 25 पेक्षा अधिक प्रेक्षक नव्हते. थिएटर मालकाने मग का प्राईम टाईम वर शो लावावा?
चित्रपट मात्र अतिशय दमदार, गुंतवून ठेवणारा, प्रश्न विचारणारा आणि मराठी शाळेला वाचवण्यासाठी, नव्हे नव्हे खरंतर मराठीपण जपण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी केलेली खटपट दाखवणारा अतिशय सुंदर कुटुंबासह बघावा असा चित्रपट.
इंग्रजीला विरोध नाही, पण ती सुद्धा केवळ एक भाषाच आहे. ज्या माणसाला स्वतःची मातृभाषा नीट बोलता येत नाही, त्याचे वैभव त्याला माहित नाही, त्याने दुसरी भाषा कशी आत्मसात करावी? जगातली सगळी संशोधने सांगतात, ज्या देशाने स्वतःची मातृभाषा जपली, त्यांनीच स्वतःची सांस्कृतिक ओळखही टिकवली आहे. आपण जगतो मराठी भाषेतून, विचारही मराठीतून करतो ना, मग आधी मातृभाषा नंतर हव्या तेवढ्या भाषा शिकल्या पाहिजे ना?
मराठी चित्रपट, मराठी नाटक, मराठी पुस्तके, मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती याची ओळखच नव्या पिढीला आपण करून देणार नसू तर उद्या मराठी भाषेचे आपण वारसदार असूनही, भाषा नामशेष करण्यात आपलाच वाटा असेल.
उत्तम इंग्रजी शिकवणाऱ्या पण मराठी माध्यमाच्या शाळा का नकोत? घरात आपल्या सभोवती जी भाषा बोलायला सुद्धा कुणी नसत, त्या भाषेचे माध्यम आपण का स्वीकारतो? विषय म्हणून इंग्रजी शिका ना, शिकण्याचे माध्यम मातृभाषाच असली पाहिजे हे अध्यापन शास्त्र, मानसशास्त्र आणि जगभरातली संशोधने सांगत आहेत. विषयापेक्षा इंग्रजीचा भाषिक लोड देऊन आपण समज संपवून टाकली आहे. भाषेतील संवादाचा, त्यातील आशयाचा गळा घोटून टाकला आहे, केवळ पोपटपंची करणारी, रुक्ष शिक्षण घेणारी पिढी आपण घडवत आहोत.
चित्रपटाच्या शेवटी येणारी मराठी शाळेत शिकलेल्या दिग्गजांची नावे वाचल्यावर मराठीत शिकल्याने गुणवत्ता मिळत नाही ही तद्दन खोटी दिशाभूल गळून पडली. मराठी किंवा मातृभाषेत शिकवणारी मराठी शाळा (मग ती शासकीय असो की खाजगी संस्थेची असो) पालक म्हणून आपण टिकवली पाहिजे. वाढवली पाहिजे हे नक्की. मराठी चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पाहिल्याशिवाय कसे हो हाऊसफुल होतील आपले मराठी चित्रपट??
806
#Expected notification#
Upcoming month RBI Assistant and RBI Attendant notification expected
RBI Assistant expected vacancies - 560
RBI Attendant expected vacancies - 640
Expected Pre exam dates- 22 Feb and 23 Feb 2026
806
🚨 RRB Group D (Level-1) Recruitment 2025 – BIG UPDATE! 🚨
🎯SHORT NOTICE OUT
✅ 22,000+ Vacancies (Approx.)
💰 Pay: ₹18,000 (7th CPC)
🎓 Eligibility: 10th / ITI (Post-wise)
🎂 Age: 18–33 Years
🗓 Apply Online: 21 Jan 2026
⏰ Last Date: 20 Feb 2026
806
✅लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (LDCC) जाहिरात प्रसिद्ध..
लिपिक - 250
Local : 175
Other : 75
शिपाई - 115
वाहनचालक - 10
👉एकूण - 375
अर्ज कालावधी - 18 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2025
806
SBI TO HIRE 16000 people each fiscal/financial Year
https://www.thehindubusinessline.com/money-and-banking/sbi-to-hire-around-16000-people-each-fiscal-open-200-300-branches-in-fy26-chairman/article70376106.ece
