MPSC Value Addition by Sohel Shaikh
Kanalga Telegram’da o‘tish
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
Ko'proq ko'rsatish4 658
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-137 kun
-7730 kun
Postlar arxiv
चौरीचौरा घटना ..अप्रकाशित बाजू ..
५ फेब्रुवारी १९२२ मुंदेरा बाजार या ठिकाणी आंदोलन करण्यारा भगवान अहिर,रामरूप बराई,आणि महादेव या नागरिकांना जबरदस्त मारहाण करणाऱ्या गुप्तेश्वर सिंह या पोलिस सब इन्स्पेक्टरला जाब विचारायला गेलेल्या नागरिकांना जेव्हा या पोलिसांनी मारहाण केली तेव्हा शांतपणे असहकार चळवळ करणाऱ्या जमावाने रागाच्या भरात पोलिस ठाणे पेटवून दिले ज्यात २३ पोलिस मृत्युमुखी पडले आणि ज्या घटने मुळे असहकार आंदोलन मागे घेण्यात आले होते
यापैकी *भगवान अहिर* हे ब्रिटिश सैन्यामध्ये काम केलेले निवृत्त सैनिक होते अन् अश्या प्रकारे एक निवृत्त सैनिकच ब्रिटिश विरोध करत आहे हे पाहून
गुप्तेश्वर सिंह याने भगवान अहिर यांना केलेली मारहाण हे खरे या घटनेच्या मागचे कारण ठरले .
या घटनेमध्ये तब्बल १९ जणांना फाशीची शिक्षा झाली.ब्रिटिश न्यायाधीशाने सुडबुद्धिने दिलेल्या शिक्षा कमी करण्यासाठी जे लढले ते पंडित मदन मोहन मालवीय होते हे विशेष महत्त्वाचे.ज्यांच्या मुळे या घटनेमध्ये जाणीवपूर्वक आरोपी केले गेलेले लोकांना न्याय मिळू शकला.
या घटनेला या वर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहेत हे लक्षात असू द्या
उमेश कुदळे सर
रयत प्रबोधिनी, पुणे
🛑 मित्रांनो आपल्या सर्वांना विनंती आणि आपल्यातील काहीजणांना इशारा....
आम्ही सर्वजण आमच्या अनुभवाचा उपयोग आपल्याला व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत...
यामध्ये सर्वांचे नुकसान होणार आहे त्यामुळे आपल्यासोबत इतरांचे नुकसान होऊ नये याकरिता जबाबदारीचे भान ठेवून बोलावे..
जर आपण अधिकारी होण्याची स्वप्न पाहून असंविधानिक भाषेत कंमेंट करत असाल तर आम्हाला हे चॅनेल आणि हा कार्यक्रम बंद करावा लागेल...
🛑यश अपयश हे परिस्थिती आणि वेळ ठरवत असते.
🛑मित्रांनो यशाची व्याख्या काय असते याविषयी नंतर कधी बोलेन...
असो परीक्षा जवळ आहे अभ्यासावर फोकस करावा🙏
आपला
सोहेल शेख
⭕️♦️येणाऱ्या Combine पुर्वसाठी इतिहासाचे पुढच्या 45 दिवसांचे नियोजन आणि Startegy काय असावी??
✳️ Combine पुर्व साठी अजून 45 दिवसांचा अवधी आहे. पुढच्या 45 दिवसांच्या काळात तुम्ही योग्य नियोजन केल तर आरामात इतिहासाची 2 पूर्ण revisions घेऊ शकतात. ज्या लोकांनी अजून काहीच वाचन नाही केल असे लोक सुद्धा इतिहासात अजून चांगले मार्क्स मिळवू शकतात.
✳️ Combine पुर्व इतिहासामध्ये 15 प्रश्नापैकी आयोग भारताच्या इतिहासावर साधारण 4-5 आणि महाराष्ट्र इतिहासावर 9-10 प्रश्न विचारते.. पण एक खूप महत्वाचा मुद्दा मला इथे नमूद करावासा वाटतो तो म्हणजे भारताच्या इतिहासाला अजिबात दुर्लक्षित करू नका कारण आयोगाने 2018 च्या combine पुर्व मध्ये भारताच्या इतिहासावर 8 प्रश्न विचारले होते. त्यामुळे दोन्ही भागाला तेवढच महत्व द्या.
तर आपण इतिहासाचे महत्वाचे टॉपिक्स बघुयात जे तुम्ही अजिबात skip नाही केले पाहिजेत.
♦️भारताचा इतिहास -
- 1857 चा उठाव- भारत व महाराष्ट्र.
- ब्रिटिशांनी केलेले कायदे -( 1773 ते 1947)
- गव्हर्नर general.
- काँग्रेस( factual coverage )
-वृत्तपत्रे- भारत व महाराष्ट्र.
( संपादक, वर्ष, व वृत्तपत्र विषय )
-स्वातंत्र्य चळवळ-( असहकार ते छोडो भारत)
महाराष्ट्र च्या angle ने या चळवळी व्यवस्थित करा.
- मवाळ आणि जहाल युग-
मवाळ/जहाल नेते व्यवस्थित करून ठेवा.
- शिक्षण व जमीन सुधारणा-
महाराष्ट्र शिक्षण व्यवस्थित करा.
जमीन महसूल वरती आयोग हमखास प्रश्न विचारताना दिसतो.
- सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी-
समाधान महाजन सरांच्या book मध्ये व्यवस्थित दिल आहे हे.
♦️महाराष्ट्र इतिहास महत्वाचे टॉपिक्स -
- क्रांतिकारी चळवळ - भारत व महाराष्ट्र.
- शेतकरी व कामगार चळवळ - भारत व महाराष्ट्र.
- दलित चळवळ - फक्त महाराष्ट्र.
- महिला चळवळ - महाराष्ट्र.
- आदिवासी चळवळ - भारत व महाराष्ट्र.
- संयुक्त महाराष्ट्र.
जास्त deep नका करू हा टॉपिक. सोपे facts बघून घ्या.
➖समाजसुधारक -
प्रारंभिक समाजसुधारक -10 लोक.
स्टेट बोर्ड मधून cover होतात चांगले.
नाना शंकर शेठ ते वलंगकर.
➖महत्वाचे समाजसुधारक-
- महात्मा फुले, रानडे, टिळक व आगरकर, कर्वे, शाहू महाराज, आंबेडकर, वीरा शिंदे, पंडिता रमाबाई etc..
इथं फोकस राहू द्या.
अश्या प्रकारे वरती दिलेले टॉपिक्स जरी व्यवस्थित केले तरी 15 पैकी 11-12 प्रश्न cover होतील.
♦️इतिहासाचे नियोजन आणि Booklist -
✳️ तुम्ही भारतासाठी कुठलेही एक book आणि महाराष्ट्र साठी कुठलेही एक book read करू शकता. Source कुठलाही असू द्या त्याच्या अंतिम काळातल्या revisions खूप महत्वाच्या असतात. So कमीतकमी 2 Revisions target ठेवा.
✳️ एका Revisions ला 4 दिवसांनपेक्षा जास्त वेळ नको. म्हणजे उरलेल्या 45 दिवसांनमधला 7-8 दिवसांचा वेळ तुम्हांला इतिहासाला द्यायचा आहे. त्यापेक्षा कमी नको किंवा जास्त पण नको..
✳️ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वाचन करत असताना pyq compulsory solve करा. कारण अलीकडे इतिहासाचे खूप सारे pyq repeat होत आहेत किंवा जुन्या प्रश्न ना धरून नवीन प्रश्न आयोग frame करत आहे.
✳️ So अश्या प्रकारे वरती दिलेले महत्वाचे टॉपिक्स, 2 revisions आणि pyq analysis व्यवस्थित झाले तर नक्कीच इतिहासाला आपण 10+ score करू शकतो.
सर्वाना शुभेच्छा.
👉The Achievers Mentorship..
Ram Chavan Sir
UPSC CAPF Interview 2019
Combine मुख्य 2018,2019,2020.
अधिकाऱ्यांमार्फत संचालित
एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र -निरव दा पुणे.
MPSC Combine गट ब पूर्वपरीक्षा टेस्ट सिरीज - 2022
टेस्ट सिरिज जॉईन करताना
आपल्या चॅनेल वरील उमेदवारांनी
👇 coupan code apply करा.
Cupon code - VALUEADDITION
( Flat 199/- Discount)
Admision Link- https://www.niravda.com/combine-prelims-test-series-2022
"स्त्री पुरुष तुलना" भारतीय स्त्रीवादाचा पहिला आवाज🤞🙏
8 janevari 2022 लोकसत्ता
Join @mpsc_value_addition
⭕️♦️राज्य सरकारच्या आजच्या नवीन नियमांनुसार ज्या परीक्षांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत किंवा ज्या परीक्षांची हॉलतिकीट issue करण्यात आलेली आहेत त्या परीक्षा घेतल्या जातील.
👉नवीन परीक्षांसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापणाची परवानगी लागेल.
👉त्यामुळे राज्यसेवा आजच्या Guideline नुसार राज्यसेवा पुर्व किंवा Combine मुख्य होण्यासाठी जास्त अडचण येणार नाही असं प्रथमदर्शी वाटत आहे. त्यामुळे गाफिल राहू नका. अभ्यास चालू राहू द्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpsc_value_addition
उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे नियम लागू..
MPSC/ UPSC साठी स्क्रीनशॉट no 4 मध्ये बघा..
सकाळी ५ ते रात्री ११ राज्यात जमावबंदी लागू..
रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू.
मैदाने उद्याने पर्यटन स्थळे बंद राहणार.
रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत सुरू राहणार.
२ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार.
राज्यातील शाळा आणि कॉलेजेस १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार.
खासगी कंपन्यांमध्ये २ डोस घेतलेल्यांनाच परवानगी.
खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
लग्नासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांनाच परवानगी.
हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा.
लग्न समारंभांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांनाच परवानगी..
➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @mpsc_value_addition
Scheduled Maintenance and Upgrade Mode of Online Application system
कालावधी:- शनिवार दिनांक 8 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रविवार, दिनांक 9 जानेवारी, 2022 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ऑनलाईन अर्जप्रणाली उपरोक्त कालावधीमध्ये देखभाल / अपग्रेड मोडमध्ये असेल.
सदर कालावधी विचारात घेऊन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असलेल्या जाहिरातींकरीता अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात येईल.
🛑 MPSC मार्फत आगामी काळातील होणाऱ्या परीक्षा कायम डोळ्यासमोर असू द्या👍
जॉईन-
https://t.me/MPSC_Value_Addition
