cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

मित्र-मैत्रिणींनो बोलते व्हा...आपल्याही भावना आमच्यापर्यंत पोहचवत जा..... ........तुमच्याकडे असणारी पुस्तके, व आपल्याला सुचलेली वाक्ये,विचार,कविता,चारोळ्या आम्हाला पाठवत जा ........ @timiratunitejakade4141 - अ.ल.खाडे (राज्य कर सहायक)

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
3 044
Obunachilar
+324 soatlar
+67 kunlar
-1230 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

बहिष्कार.....🖤 ✍️"पुणे, मुबंई, संभाजीनगर या वेगवेगळ्या ठिकाणी मी राहिलेलो आहे अश्या ठिकाणी रोज सकाळी नास्ता करण्यासाठी किमान 50रुपये तरी लागतात 1500/2000रुपये महिन्याला केवळ चहा नास्ता यासाठी जातात,स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणारे विद्यार्थी प्रामुख्याने शेतकरी आणि गरीब लोकांची मुलं आहेत.अश्या विद्यार्थ्यांना हे अजिबात परवडत नाही कारण नास्ता 1500रुपये रूम भाडे 2500हजार, मेस 2500हजार आणि लायब्ररी 1000/1500 म्हणजे महिना 8000 हजार केवळ राहण्याचा /जेवणाचा खर्च आहे.. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच कंबरड मोडून जातं..अलीकडे या विरोधात संभाजीनगर मधील विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं चहा, नाश्त्याच्या दुकानावर सामूहिक बहिष्कार टाकण्यात येतं आहे...बाहेर कुठे चहा नास्ता करण्यापेक्षा रूमवरच नाश्त्याची सोय विद्यार्थी करत आहे.. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.. जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही.. # संभाजीनगर एकता मंच... # महागाई विरोधी आंदोलन...
Hammasini ko'rsatish...
👍 5
जीवक... ✍️"हजारो वर्षापूर्वी एक वेश्या व्यवसाय करणाऱ्या शालवती नामक स्त्रीला एक मुलगा झाला. वेशेला हा मुलगा कोणापासून झाला? हे लोक विचारतील याची लाज तीला वाटली. म्हणून तीने त्या मुलाला कचऱ्याच्या ढिगारात जंगलात फेकून दिलं. पण सुदैवाने राजा बिंबीसार पुत्र अभयने त्याला पाहिलं आणि कचऱ्यातून उचलून त्या बाळाला दरबारात आणलं.त्याला लहानच मोठं केल. आणि हाच जिवक पुढे तक्षशिला याठिकाणी शिक्षण घेवून एक प्रसिद्ध वैद्य डॉक्टर बनला.. भगवान गौतम बुद्ध यांचा खाजगी डॉक्टर होता जीवक यांच जीवकने राजा बिंबीसार याला झालेल्या भयंकर अश्या भगंदर नामक रोगापासून बरे केले.भारतात खूप वर्षांपूर्वी डोक्याच्या कवटीचीं आणि आतड्याच्या जुनाट रोगाची शस्त्रक्रिया ऑपरेशन करणारा डॉक्टर म्हणून जीवकचीं नोंद डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात आहे.अश्या या महान व्यक्तीला आजच्या डॉक्टर दिनी विनम्र अभिवादन.. 🙏🙏 आणि सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!" ✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) लिखाण दी.1जुलै 2024 ✍️संपर्क -:@ABCs1432
Hammasini ko'rsatish...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
🍁 प्रकाशाच्या वाटा 🍁
Hammasini ko'rsatish...
Photo unavailableShow in Telegram
क्रिकेट ✍️" खरतर मी क्रिकेट कधीच बघत नाही... आतापर्यंत एकही Match मी बघितलेली नाही.. आणि भविष्यात बघणार नाही.. क्रिकेट मध्ये कोण जिंकल?कोण हरलं?यांचे अपडेट मी रोज वर्तमान पत्रात वाचत असतो. काल T20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवत दणदनित विजय मिळवला, याबद्दल टीम इंडियाच मनःपूर्वक अभिनंदन.. भारत जिंकला हे प्रत्येकासाठी अभिमानास्पद आहे...याचा मलाही अभिमान आहे. मला इतकंच वाटतं कि, क्रिकेट सारख्या खेळावर जितका पैसा, वेळ, ऊर्जा आपण खर्च करतो तितकाच पैसा,वेळ इतर खेळावरही खर्च केला तर निश्चिन्तच भारत World कपच नाही तर, ऑलिम्पिक मध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकेल,ऑलिम्पिक मधली आपली कामगिरी म्हणावी तितकी समाधानकारक नाही.. क्रिकेटच्या बाबतीत जो क्रिकेटवेडेपणा भारतीयांमध्ये दिसतो तो इतर खेळाच्या बाबतीत दिसत नाही.. येणाऱ्या काळात भारत सरकार सर्व क्रीडा प्रकारासाठी एक सामान सूत्र बनवेल हिच आशा..ऑलिम्पिक सारख्या जागतिक स्पर्धेत भारताने जास्तीत जास्त सुवर्ण पदकं जिंकण ही काळाची गरज आहे..!" ✍️ लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC )❤️ ✍️संपर्क -:@ABCs1432
Hammasini ko'rsatish...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
कलाकृती....🙏🚩🚩 ✍️सुंदर कलाकृती या नेहमी कलाकारांच्या सुंदर मनातून तयार होतात आणि त्यांच्या सुंदर कुंचल्यातून साकारल्या जातात...!" ✍️ ABC's Diaries 📚 राजर्षी शाहू महाराज कलाकृती रेखाटन -: शरद वाकोडे,बुलढाणा )
Hammasini ko'rsatish...
👍 6
Photo unavailableShow in Telegram
देव, आत्मा,भूत याबद्दल बुद्ध काय म्हणतात? नक्की वाचा.... ✍️ "एकदा भगवान गौतम बुध्दाला एका भिक्षुने एक प्रश्न विचारला कि देव, आत्मा,भूत यावर तुमचा विश्वास आहे का..? याबद्दल तुमच काय मत आहे? त्यावर बुध्दाने उत्तर दिलं कि, जेवण करण्याअगोदर आपण जे अन्न खाणार आहे ते आपण अगोदर आपल्या जिभेने चाखून बघतो, भाजी खारट आहे कि तिखट आहे...? खारट आणि तिखट यांच अस्तित्व तुमची जीभ तुम्हाला पटवून देते. अगदी त्याप्रमाणे या जगात देव, भूत, आत्मा या गोष्टी आहे कि नाही? हे प्रत्यक्ष अनुभवल्या शिवाय त्यावर विश्वास ठेवू नका.. कोणी सांगितल आहे किंवा कोण्यातरी धर्मग्रंथात लिहलेलं आहे म्हणून ते सत्त्य आहे असं नाही.. सत्त्य ते आहे जे तुम्ही डोळ्याने बघितलं, कानाने ऐकलं आणि तुमच्या डोळे, जीभ, हृदय या सर्व इंद्रियांनी त्याचा अनुभव घेतला त्यालाच सत्त्य माना... मी रात्री,अपरात्री या जंगलात एकटाच फिरतो पण मला कधी भूत दिसलं नाही.. आणि देवाची आणि माझी सुद्धा कधी भेट झाली नाही त्यामुळे यावर माझा विश्वास नाही..!" # बुद्धवाणी
Hammasini ko'rsatish...
👍 9 1
Photo unavailableShow in Telegram
लोकराजा... ✍️"यशवंत जयसिंगराव घाटगे अर्थात राजर्षी शाहू महाराज अफाट उंची लाभलेला बलदंड शक्तीशाली राजा म्हणजेच राजर्षी शाहू महाराज.. शाहू महाराजाची उंची 5फूट 11इंच होती. म्हणजे जवळपास 6फूट त्याकाळात इतकी मोठी शारीरिक उंची कोणाचीही नव्हती. आणि शाहूची सामाजिक, राजकीय उंची तर कोणीच मोजू शकतं नाही.. शाहूशिवाय महाराष्ट्राचा इतिहास अपूर्ण आहे..असा हा 20व्या शतकातला लोकप्रिय,लोकराजा आरक्षणाचे जनक, कुस्तीचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन... 🙏🙏🌹🌹🌹 ✍️ शब्दरचना -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) (लेखक ABC डायरी ) दि.26जून 2024 ✍️संपर्क -:@ABCs1432
Hammasini ko'rsatish...
3
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.