uz
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Ko'proq ko'rsatish
4 154
Obunachilar
-224 soatlar
-107 kunlar
-5130 kunlar
Postlar arxiv
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: गिरगांवच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे जनक, स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष, प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते, संघ परिवारातील अनेक कार्यकर्ते घडवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री पराग वेदक यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात महाआरतीचे जनक, मुंबईतील शिक्षण क्षेत्रात अनेक आंदोलनांचे नेतृत्व, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य म्हणून दोन टर्म केलेली अप्रतिम कामगिरी, संघ परिवारासोबतच राजकीय संघर्र्षात गिरगावातील भाजपा कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे राहणारे श्री पराग वेदक यांच्यासारखा कार्यकर्ता गमावणे ही समाजाची मोठी हानी आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शांति 🙏🏽

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 31 मे 2026 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन https://mahasamvad.in/202637/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Absolute pleasure to visit you, Hon Union Minister Ram Mohan Naidu Kinjarapu ji ! We had a great discussion on many topics pertaining to Maharashtra. Also gifted a Ganesha idol to him. #NewDelhi https://x.com/Dev_Fadnavis/status/2061112000831508680?s=20

CMO Maharashtra Tweets: शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये! राज्यात 1 जूनपासून काही भागांत वादळी पावसाची शक्यता असली, तरी त्याचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळ येथे पोहोचलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश तसेच कोकणातील काही भागांत दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असली, तरी पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम राहू शकतो. शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे. विजांच्या कडकडाटाच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी. झाडाखाली, टिनशेडखाली, वीज खांब, ट्रान्सफॉर्मर किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळा. स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. #Maharashtra #MonsoonUpdate #WeatherAlert #MaharashtraWeather

Today's News_31-05-2026.pdf5.71 KB

Today's News_30-05-2026.pdf1.17 MB

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात भारताची समृद्ध परंपरा आणि स्थानिक उत्पादनांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी कडक उन्हाळ्यात आरोग्यदायी पेयांचे महत्त्व सांगत कोकण आणि गोव्याची प्रसिद्ध सोलकढी तसेच कोकम सरबत यांची विशेष दखल घेतली. यासह मा. पंतप्रधान मोदीजी यांनी महाराष्ट्र आणि कोकणातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा गावापासून जागतिक बाजारपेठेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित केला. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इन्होंने आज ‘मन की बात’ कार्यक्रम में भारत की समृद्ध परंपराओं और स्थानीय उत्पादों को रेखांकित किया। उन्होंने भीषण गर्मी में स्वास्थ्यवर्धक पेयों के महत्व बताते हुए कोकण और गोवा की प्रसिद्ध सोलकढ़ी एवं कोकम सरबत की विशेष चर्चा की। साथ ही, मा. प्रधानमंत्री मोदी जी इन्होंने महाराष्ट्र और कोकण के विश्वविख्यात हापुस आम की गांव से वैश्विक बाजार तक की प्रेरणादायी यात्रा का उल्लेख किया। (मन की बात | 31-5-2026) #MannKiBaat #Mango #Alphonso #Konkan

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशल प्रशासक आणि प्रजानिष्ठ राज्यकर्त्या, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीच्या पावन प्रसंगी, श्रीक्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथील त्यांच्या स्मारकास पुष्पांजली अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने कुशल प्रशासक एवं प्रजानिष्ठ शासक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर इनकी 301वीं जयंती के पावन अवसर पर श्रीक्षेत्र चौंडी, अहिल्यानगर स्थित उनके स्मारक पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। इस अवसर पर राजस्थान के राज्यपाल हरिभाऊ बागडे, विधानपरिषद के सभापति प्रा. राम शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री दत्तात्रय भरणे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕥 स. १०.२५ वा. | ३१-५-२०२६📍चौंडी, अहिल्यानगर. #Maharashtra #DevendraFadnavis #AhilyaDeviHolkar

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मराठा समाजाला न्याय देणे हीच आमच्या सरकारची भूमिका राहिली आहे. मराठा समाज को न्याय देना ही हमारी सरकार की भूमिका रही है। (अहिल्यानगर | 31-05-2026) #Maharashtra #Ahilyanagar

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: आदर्श लोकप्रशासन घडविणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन. आदर्श लोकप्रशासन की परंपरा स्थापित करने वाली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होलकर इनको विनम्र अभिवादन। (अहिल्यानगर | 31-05-2026) #Maharashtra #Ahilyanagar

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: अहिल्यानगर येथे विविध विषयांवर माध्यमांशी संवाद... (अहिल्यानगर | 31-05-2026) #Maharashtra #Ahilyanagar

photo content