Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 156
Obunachilar
+224 soatlar
-47 kunlar
-4730 kunlar
Postlar arxiv
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
#EidAlAdha wishes to all!
ईद मुबारक!
#ईद_मुबारक #EidAlAdha #EidMubarak #Maharashtra
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Honouring the legacy of a Poet, Reformer, and Revolutionary, Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on his Birth Anniversary!
प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!
#स्वातंत्र्यवीर_गौरव_दिन #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर #स्वातंत्र्यवीर_सावरकर #SwatantryaVeerGauravDin #SwatantryaVeerSavarkar #Maharashtra
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Remembering Swatantryaveer Vinayak Damodar Savarkar on his Birth Anniversary! His immense contribution to India's freedom struggle and unwavering dedication to the nation’s progress have inspired generations.
स्वातंत्र्यदेवीचे सच्चे उपासक, हिंदुत्वाची विज्ञाननिष्ठ विचारधारा, सशस्त्र क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान 'स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर' यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!
#स्वातंत्र्यवीर_गौरव_दिन #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर #स्वातंत्र्यवीर_सावरकर #SwatantryaVeerGauravDin #SwatantryaVeerSavarkar #Maharashtra
4 156
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 27 मे 2026
ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/202450/
जलजीवन मिशन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/202432/
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/202415/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Decisive Steps for Farmer Welfare: Strengthening the Backbone of Maharashtra’s Agriculture
Attended a high-level review meeting regarding issues related to sugarcane and onion producing farmers, chaired by Hon Union Home and Cooperation Minister Amitbhai Shah, along with Hon Union Minister Shivraj Singh Chouhan ji and Hon Union Minister Pralhad Joshi ji in New Delhi today.
The positive discussions held today regarding crucial issues such as increasing the Minimum Support Price (MSP) for sugar, raising ethanol quotas, debt restructuring, interest subvention, direct onion procurement from farmers, produce grading and surcharges on onion seeds will provide significant relief to the state's farmers. Positive discussions were held on significantly increasing the ethanol quota within two months and work jointly on debt restructuring. A decision was also made to release interest subvention payments immediately. Furthermore, a state-prepared proposal on ‘Price Control’ will be submitted soon to resolve key challenges in the sugar industry.
Key decisions for onion farmers include direct procurement by NAFED and NCCF from farmers, an export surcharge on seeds and efforts to further increase procurement prices. To ensure fair treatment, manual grading will be replaced by specialized machinery. Additionally, following a proposal for mango farmers, Hon Union Minister of Agriculture and Farmers Welfare Shivraj Singh Chouhan ji assured a review of insurance conditions to provide relief to producers.
Together, we are dedicated to empowering the farmers who serve as the backbone of Maharashtra’s prosperity.
DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Ministers from the Government of Maharashtra and other dignitaries were present.
#NewDelhi #Sugarcane #OnionFarmers
https://x.com/Dev_Fadnavis/status/2059683385136861307?s=20
4 156
CMO Maharashtra Tweets:
साखर, इथेनॉल आणि कांदा प्रश्नांवर केंद्र सकारात्मक; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे ऊस व कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात उच्चस्तरीय बैठक पार पडली.
साखरेच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करणे, इथेनॉल कोटा वाढवणे, कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचे ग्रेडिंग, कांदा बियाण्यांवरील अधिभार आदी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत आज झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, याबाबत केंद्र सरकार लवकरच अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणे गरजेचे असल्याचे सहकार मंत्री अमित शाह यांनी मान्य केले आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या दोन महिन्यांत निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून, कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य सरकारसोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यासह व्याज सवलतीचे (इंटरेस्ट सबव्हेंशन) पैसे तात्काळ देण्याचेही मान्य करण्यात आले आहे. ‘क्वेल प्रायसिंग’ (किंमत नियंत्रण) संदर्भात केंद्राने एक प्रस्ताव मागवला असून, राज्य सरकारकडून तो तयार करण्यात आला आहे व लवकरच सादर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे साखर कारखानदारीचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल.
नाफेड आणि एनसीसीएफने सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात व्यापाऱ्यांकडून न होता, थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे, ही मागणी मान्य करण्यात आली आहे. 2 लाख टनांऐवजी 10 लाख टन कांदा खरेदी नाफेड आणि एनसीसीएफने करावी, यावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. सध्या कांद्याचे बियाणे मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने देशांतर्गत कांद्याला एक्सपोर्ट मार्केट उरत नाही. यासाठी कांदा बियाण्यांवर मोठ्या प्रमाणात ‘एक्सपोर्ट सरचार्ज’ लावला पाहिजे, ही मागणीदेखील मान्य करण्यात आली आहे. तसेच कांद्याचा खरेदी भाव नुकताच वाढवून ₹15.80 करण्यात आला आहे. तो आणखी कसा वाढवता येईल, यावर चर्चा झाली. कांद्याच्या बियाण्यांवर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
नाफेड किंवा एनसीसीएफमध्ये ग्रेडिंगच्या नावाखाली माल निकृष्ट दर्जाचा दाखवून खरेदी नाकारली जाण्याबाबत शेतकऱ्यांची तक्रार असते, यावर उपाय म्हणून आता यंत्रसामग्रीच्या माध्यमातून ग्रेडिंग केले जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळणार आहे. आंबा आणि हापूस आंब्यासंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही यावेळी निवेदन देण्यात आले. विमा कंपन्यांनी घातलेल्या जाचक अटींमध्ये बदल केल्यास आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळू शकतो, हे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. यावर केंद्रीय कृषी मंत्री यांनी विमा कंपन्यांची बैठक घेऊन योग्य मार्ग काढण्याचे आश्वासन दिले असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते.
#NewDelhi #DevendraFadnavis #Sugarcane #OnionFarmers
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Accelerating Maharashtra’s Water Security: Strategic Roadmap for a Drought-Free State
Chaired a review meeting of the State Water Resources Department and Jal Jeevan Mission in the presence of Hon Union Minister C R Paatil ji in New Delhi today.
Assured that every possible effort would be made to make Maharashtra drought-free by prioritising the Jal Jeevan Mission, Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana, Jal Sanchay Jan Bhagidari and various state-level water conservation and irrigation schemes. Reviewed the ongoing irrigation projects in the state under the Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana. The Central Government has responded positively to the state’s request for additional support in strengthening water infrastructure across Maharashtra.
Assured that Maharashtra will make every possible effort to realise Hon PM Narendra Modi Ji’s visionary Jal Jeevan Mission and work towards a drought-free Maharashtra through irrigation projects, water conservation initiatives and public participation.
Initiatives such as Jaltara and Jalyukt Shivar are being strengthened to further enhance water conservation efforts across the state. Also discussed giving priority to major river-linking projects, including the Wainganga–Nalganga river linking project, the project to divert Western flowing rivers to Marathwada and North Maharashtra, which can play an important role in making drought-affected regions water secure.
DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Girishbhau Mahajan, Minister Radhakrishna Vikhe Patil ji, Minister Gulabrao Patil ji and senior officials were present.
#NewDelhi #WaterResources
https://x.com/Dev_Fadnavis/status/2059675663205077040?s=20
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Called on the Hon Home Minister and Minister of Cooperation Amit Shah Ji, in New Delhi, earlier today.
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष एवं सांसद मा. नितिन नबीन जी इनसे आज नई दिल्ली में भेंट की।
#NewDelhi
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
साखरेचा एमएसपी आणि इथेनॉल कोटा वाढीसंदर्भात मा. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितभाई शाह यांनी अतिशय सकारात्मक निर्णय घेतला आहे.
चीनी के एमएसपी और इथेनॉल कोटा बढ़ाने के संबंध में मा. केंद्रीय गृह एवं सहकार मंत्री अमितभाई शाह इन्होंने बहुत ही सकारात्मक निर्णय लिया है।
(नवी दिल्ली | 27-5-2026)
#NewDelhi #Farmer
4 156
CMO Maharashtra Tweets:
सिंचन, जलसंधारण आणि नदीजोड प्रकल्पांना नवी गती; जलयुक्त आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नवी दिल्ली येथे राज्याच्या जलसंपदा विभागाची आणि जलजीवन मिशनची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारचे जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, जलसंचय जनभागीदारी तसेच राज्यातील विविध जलसंधारण आणि सिंचन योजनांच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राज्यात सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली असून, त्यास केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. जलजीवन मिशनमधील उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देण्याचे आश्वासन या बैठकीत देण्यात आले. राज्यातील 75% पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसेच 50% ते 75% पर्यंत पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्याने निधी दिला जाणार आहे. या पाईपलाईन आणि पाणी पायाभूत सुविधांच्या योजनांना गती देऊन त्या पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून अंदाजे ₹6800 कोटी मिळण्याची अपेक्षा असून, पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनांचे स्थानिक गावे, ग्रामपंचायती, तालुके आणि जिल्हा पातळीवर अचूक प्रमाणीकरण करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी 90% योजनांचा सविस्तर आढावा घेतला आहे. सद्यस्थितीत आढळून आलेल्या त्रुटी दूर केल्या जात असून, जलस्रोतांचे बळकटीकरण केले जात आहे. जलजीवन मिशन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यासाठी केंद्र सरकारकडून अधिकाधिक सहकार्य अपेक्षित असून, त्यानुसार प्रलंबित बाबी मार्गी लावून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. महाराष्ट्रातील दुष्काळनिवारण करण्यासाठी जलसंधारण आणि लोकसहभाग हाच दीर्घकालीन उपाय आहे. ‘जलतारा’सारख्या उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्यावर भर देण्यात येणार असून, सीएसआर आणि मनरेगा निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे केली जातील. तसेच, जलताराचे स्ट्रक्चर्स वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून कामे सुरू असून, कन्व्हर्जन्स करून हे काम पूर्ण केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यांतर्गत असलेल्या नदीजोड प्रकल्पांना प्राधान्य दिले जावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भाग्य बदलू शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिपादन केले.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प आणि पश्चिम वाहिनी नद्यांमधून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राकडे पाणी वळविण्याचे प्रकल्प पूर्ण झाल्यास राज्यातील सध्याचा दुष्काळग्रस्त भाग दुष्काळमुक्त होऊ शकतो. वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून दरवर्षी समुद्रात जाणाऱ्या 100 टीएमसी पाण्यापैकी 62 टीएमसी पाणी वळविण्याचे नियोजन आहे. तसेच, उल्हास खोऱ्यातील 350 टीएमसी पाण्यापैकी 75 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याची योजना आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक सर्व अभ्यास आणि अहवाल पूर्ण झाले असून, केंद्रीय जल आयोगाची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येतील. या मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्र शासनाच्या मदतीची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारदरम्यान ‘मेगा रिचार्ज’ प्रकल्पासंदर्भात करार झाला असून, भूजल पुनर्भरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प देशासाठी आदर्श ठरू शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री गिरीष महाजन, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गुलाबराव पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#NewDelhi #DevendraFadnavis #WaterResources
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
आम उत्पादक किसानों को मदद दिलाने के लिए प्रयास जारी हैं।
(नवी दिल्ली | 27-5-2026)
#NewDelhi #Agriculture
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
