Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
4 154
Obunachilar
-224 soatlar
-107 kunlar
-5130 kunlar
Postlar arxiv
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'खासदार क्रीडा महोत्सवा'च्या माध्यमातून नागपूरसह विदर्भामध्ये क्रीडा संस्कृती तयार करण्याचे काम झाले आहे.
'खासदार क्रीडा महोत्सव' के माध्यम से नागपुर समेत विदर्भ में खेल संस्कृति तैयार करने का कार्य हुआ है।
(खासदार क्रीडा महोत्सव 2026 | नागपूर | 7-6-2026)
#Maharashtra #Nagpur #KhasdarKridaMahotsav2026
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, आपले मनःपूर्वक आभार!
मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी, आपका हृदय से आभार!
(खासदार क्रीडा महोत्सव 2026 | नागपूर | 7-6-2026)
#Maharashtra #Nagpur #KhasdarKridaMahotsav2026
4 156
CMO Maharashtra Tweets:
खासदार क्रीडा महोत्सव : खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देणारे व्यासपीठ!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे 'खासदार क्रीडा महोत्सव 2026'चा समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘खासदार क्रीडा महोत्सवा’त दरवर्षी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. हा केवळ क्रीडाउत्सव न राहता युवकांचा लोकोत्सव बनला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी आणि प्रशिक्षण मिळत आहे. तसेच युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला असून, यातून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होत आहेत. यामुळे नागपूरसह विदर्भात क्रीडा संस्कृती रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात ‘खेलो इंडिया’सारखे उपक्रम राबवले जात असून, या माध्यमातून होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. नागपूरच्या मानकापूर स्टेडिअमला राज्य क्रीडासंकुलाचा दर्जा देण्यात आला असून ते देशातील अत्याधुनिक क्रीडा संकुलांपैकी एक म्हणून विकसित केले जात आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जागतिक स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा असतील. याशिवाय येथे आधुनिक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारण्याचे कामही सुरू असून, त्यातून मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासमवेत महोत्सवातील विविध खेळांमधील विजेत्या खेळाडूंना व क्रीडा क्षेत्रातील इतर मान्यवरांना ‘क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान केले. यावेळी पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संपूर्ण टीमचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले. तसेच 'खासदार क्रीडा महोत्सवा'च्या माध्यमातून खेळाडूंना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष आभार मानले.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #KhasdarKridaMahotsav2026
4 156
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the closing ceremony of 'Khasdar Krida Mahotsav 2026'.
Union MoS Raksha Khadse, Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLA Krishna Khopde, MLA Pravin Datke, Nagpur Mayor Neeta Thakre and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची 'खासदार क्रीडा महोत्सव 2026 समारोप समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी 'खासदार क्रीडा महोत्सव 2026 समापन समारोह' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधायक संजय भेंडे, विधायक कृष्णा खोपडे, विधायक प्रवीण दटके, नागपुर की महापौर नीता ठाकरे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕛 11.50am | 7-6-2026📍Nagpur | स. ११.५० वा. | ७-६-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #KhasdarKridaMahotsav2026
4 156
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕝 2.40pm | 7-6-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/WAGTk2JcLog?si=ejNo3Zfs5jz42LGm
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1494690231581766
https://x.com/Dev_Fadnavis/status/2063549120598757510?s=20
4 156
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 'खासदार क्रीडा महोत्सव 2026' समारोप सोहळा
🕐 दु. १२.५३ वा. | ७-६-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #Nagpur #KhasdarKridaMahotsav2026
https://www.youtube.com/live/mK3DiFkehmo?si=xCwqMlSqKTMpCFe1
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/36737438345847345
https://x.com/Dev_Fadnavis/status/2063522647196180648?s=20
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses from the day of unveiling the grand statue of the Greatest King Chhatrapati Shivaji Maharaj at Navi Mumbai International Airport and the launch of 'Timeline', a book inspiring positivity.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या अनावरणासह, सकारात्मकतेचा संदेश देणाऱ्या ‘टाइमलाइन’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमातील काही खास क्षण...
(नवी मुंबई व मुंबई | 6-6-2026)
#Maharashtra #ChhatrapatiShivajiMaharaj #BookRelease
4 156
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #KKM2026 | 'खासदार क्रीडा महोत्सव 2026' समारोप सोहळा | नागपूर
https://www.youtube.com/live/mK3DiFkehmo?si=MulOoq_pi_zkJ9OM
4 156
CMO Maharashtra Tweets:
किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.
दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :-
✅आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.
✅विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.
#Maharashtra #DevendraFadnavis #Rain #Monsoon
4 156
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 6 जून 2026
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
https://mahasamvad.in/203228/
‘टाइमलाइन’ हे समाजात सकारात्मकता पेरणारे पुस्तक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/203212/
#Maharashtra #DevendraFadnavis
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
