LetsUpp Marathi
Kanalga Telegram’da o‘tish
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Ko'proq ko'rsatish6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - प्रद्युम्न हत्या प्रकरण, 'अल्पवयीन आरोपील सज्ञान मानले जावे', ज्युवेनाईल कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2. नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कटाच्या आरोपांवरून विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिल्याने राज्यसभेचे कामकाज तहकूब
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - आरके नगरची पोटनिवडणूक पुढे ढकलण्यास हायकोर्टाचा नकार, निवडणूक उद्याच पारदर्शी पद्धतीने घेण्याचे कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश
4. नवी दिल्ली - आयडीबीआय कर्मचाऱ्यांना मिळणार पगारवाढ, कामगार आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत व्यवस्थापनाचे आश्वासन, 27 डिसेंबरचा बँक संप तूर्तास स्थगित
5. नवी दिल्ली - पत्नीच्या हत्येप्रकरणी 'इंडियाज मोस्ट वॉन्टेड' क्राइम शोचा प्रसिद्ध अँकर सुहैब इलयासीला जन्मठेप, 11 जानेवारी 2000 ला केली होती हत्या
6. नवी दिल्ली - ‘गुजरात निवडणुकीत 150 जागांचा दावा करणाऱ्या मोदी-शहांचा अहंकार उद्ध्वस्त’, जिग्नेश मेवानीची भाजपवर कडाडून टीका
7. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 33777.38, निफ्टी : 10444.20, सोने भाव : 28,500 (प्रतितोळा), चांदी : 37,610 (प्रतिकिलो)
8. पुणे - सनबर्न फेस्टिव्हला उच्च न्यायालयाची परवानगी, नियमांचे पालन करण्याची अट
9. पुणे - किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातर्फे देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारुती चितमपल्ली यांना जाहीर
10. अहमदनगर - खर्डा येथील नितीन आगे खून खटल्यातील तेरा फितूर साक्षीदार जिल्हा न्यायालयात हजर, म्हणणे मांडण्यास मागितली मुदत, 5 जानेवारीला पुढील तारीख
11. मुंबई - मोटोचे दोन स्मार्टफोन मोटो G5S आणि मोटो G5S प्लस यांच्या किंमतीत दोन हजारांची सूट
12. हयूस्टन - फेसबुकने आता लाईक्स आणि पोस्ट शेअरिंगचे आवाहन करणाऱ्यावर चाप बसवण्याची केली तयारी सुरु
13. मुंबई - नुकतेच अक्षय कुमारच्या आगामी बहुचर्चित ‘पॅडमॅन’ या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - लवकरच मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीसाठी ग्राहकांना मोजावे लागणार कमी पैसे, यासाठीचा प्रस्ताव दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) मांडला
2. नवी दिल्ली - नुसता जल्लोष करू नका. आत्मपरीक्षणही करा. ही जागे होण्याची वेळ आहे, गुजराती नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आत्मपरीक्षणाचा सल्ला
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. शोपियान - जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार, एक जवान जखमी
4. वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर निघालेल्या अंतराऴ यानाच्या दुर्घटनेत तीन अंतराळ यात्री ठार, नासाने दिली माहिती
5. वॉशिंग्टन - वॉशिंग्टनमध्ये हायस्पीड रेल्वे रुळावरुन घसरली, 3 जणांचा मृत्यू, 70 हून अधिक प्रवासी जखमी
6. गांधीनगर - गुजरात विधानसभा निवडणुकीत जवळपास साडे पाच लाखांहून अधिक मतदारांनी 'नोटा'चा पर्याय स्वीकारला
7. गांधीनगर - गुजरातमध्ये 25 तारखेला मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पार पडणार, सरदार पटेल स्टेडिअमवर पार पडणार शपथविधी सोहळा : सूत्र
8. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 33836.74, निफ्टी : 10463.20, सोने भाव : 28,457 (प्रतितोळा), चांदी : 37,520 (प्रतिकिलो)
9. नागपूर - भूखंड घोटाळ्याच्या आरोपामुळे मंत्रिपद गमवावे लागलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
10. पुणे - ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांचे भांडारकर रस्त्यावरील बंद घरात चोरी, याप्रकरणी पोलिसांनी अद्याप काहीच कारवाई केलेली नाही
11. रिलायन्स जिओ टिव्ही आता वेबवर दाखल, जिओचा कुणीही युजर आपल्या संगणकावरून याच्यावरील विविध कार्यक्रम पाहू शकणार
12. मुंबई - मला नाही वाटत अजिंक्य रहाणेचा फॉर्म चिंताजनक आहे, तो एक चांगला खेळाडू आहे : सौरव गांगुली
13. मुंबई - अभिनेता, सुपरमॉडेल मिलिंद सोमण पुढच्या वर्षी गर्लफ्रेंड अंकिता कोवरसोबत विवाहबंधनात अडकण्याची शक्यता
14. मुंबई - 'सैराट' फेम रिंकू राजगुरु सध्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त, मकरंद मानेंच्या सिनेमातून ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर अवतरणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - हवाई दलाच्या 'सुखोई-30' प्रकारच्या 40 लढाऊ विमानांवर ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे बसवण्याची प्रक्रिया सुरू, हवाई दलाची माहिती
2. नवी दिल्ली - भाजपावर दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल धन्यवाद, दोन्ही राज्यांच्या विकासासाठी पुरेपूर प्रयत्न करणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - इव्हीएमशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही, हे मी खात्रीपूर्वक सांगतो : मुख्य निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती
4. अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे आपण निराश झालो नाही : राहुल गांधी
5. अहमदाबाद - माणसाच्या शरीरात जर डॉक्टर बदल करू शकतात, तर ईव्हीएम मशिनमध्ये बदल का होऊ शकत नाही : हार्दिक पटेल
6. ठाणे - जव्हार नगरपरिषद निवडणूक निकाल, शिवसेना - 9, भाजप - 1, राष्ट्रवादी - 6, प्रतिष्ठान - 1
7. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 33601.68, निफ्टी : 10388.80, सोने भाव : 28,372 (प्रतितोळा), चांदी : 37,447 (प्रतिकिलो)
8. मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व समीर कुलकर्णी यांची रिट याचिका हायकोर्टाने फेटाळली
9. मुंबई - साकीनाका येथे एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत 12 कामगारांचा होरपळून मृत्यू
10. मुंबई - भविष्यात कलानगरवाल्यांना 'डिपॉझिट' वाचवण्याचं मशिन घ्यावं लागेल; आशिष शेलारांचा शिवसेनेवर घणाघात
11. मुंबई - लोकांच्या समस्या मग ती शेतकऱ्यांची असो, व्यापाऱ्यांची की बेरोजगारांची, या सगळ्या आघाड्यांवर केंद्र सरकार अपयशी : खासदार संजय राऊत
12. पुणे - पुण्याच्या माजी महापौर चंचला कोद्रे (वय 42) यांचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13. मुंबई - विवो कंपनीने विवो व्ही 7 या स्मार्टफोनची एनर्जेटीक ब्ल्यू ही नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना सादर करण्याची केली घोषणा
14. पर्थ - ऑस्ट्रेलियाने पर्थ येथील तिसऱ्या कसोटीत एक डाव आणि 41 धावांनी मिळवला विजय, 5 कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेमध्ये 3-0 ने घेतली विजयी आघाडी
15. मुंबई - आयसीसी वनडे क्रमवारी जाहीर, या क्रमवारीत भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने पहिल्या पाचमध्ये मिळवले स्थान
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - इस्लामाबाद दुतावासातील तीन भारतीय अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून गोपनीय माहिती काढण्याचा पाकिस्तानचा डाव उधळला
2. नवी दिल्ली - डेबिट कार्डच्या साहाय्याने डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढविण्यासाठी केंद्र सरकारने काही प्रमाणात अनुदान देण्याचा घेतला निर्णय
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - वैद्यकीय प्रवेशात पारदर्शकता आणण्यासाठी आणि या प्रक्रियेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मेडिकल काऊन्सिल आॅफ इंडिया केली बरखास्त
4. नवी दिल्ली - विधानसभा निवडणूकांचा परिणाम आगामी अर्थसंकल्पावर होणार : अरुण जेटली
5. नवी दिल्ली - नोव्हेंबरमध्ये करण्यात आलेल्या कोळसा आयातीत 40 टक्के वाढ झाली असून 19.18 दशलक्ष टन आयात करण्यात आली
6. इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकीत दहशतावाद्यांसोबत हातमिळवणी करण्याची केली जाहीर घोषणा
7. न्यूयॉर्क - अमेरिकेने पृथ्वीला भेडसावणाऱ्या यूएफओ म्हणजेच उडत्या तबकड्यांच्या शोधासाठी लाखो डॉलर्स खर्च केल्याचे आले समोर
8. अहमदाबाद - गुजरातमध्ये 140 अभियंत्यांकडे 5 हजार इव्हीएम हॅक करण्याचे काम : हार्दिक पटेल
9. हैदराबाद - ‘गांधी’ आडनावामुळेच कमी वयात दोनवेळा लोकसभा खासदार बनण्यास मदत : वरुण गांधी
10. हैदराबाद - हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, टॉलीवूड अभिनेत्रीसह पश्चिम बंगालमधील महिला टीव्ही कलाकारही अटकेत
11. मुंबई - पूर्णपणे विजेवर चालणाऱ्या देशातील पहिल्या 'टेस्ला' कारची नोंदणी; ताडदेव आरटीओ ऑफिसमध्ये एस्सार ग्रुपचे सीईओ प्रशांत रुईया यांनी केली नोंदणी
12. मुंबई - भारती एअरटेल कंपनीने फोरजी हॉटस्पॉट 999 रुपये इतक्या किमतीत केला उपलब्ध
13. तिसरी वनडे, श्रीलंका 215 धावांत गारद, कुलदीप यादव व युझवेंद्र चहलचे प्रत्येकी 3-3 बळी, मालिका विजयासाठी भारतासमोर 216 धावांचे आव्हान
14. मुंबई - अनेक उत्तमोत्तम नाटकांचा निर्माता, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून ओळख असलेला अभिजित साटम आता मराठी टेलिव्हिजनवर कमबॅक करणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - खासदार आणि आमदारांवरील प्रलंबित गुन्हेगारी प्रकरणाचा जलदरित्या निकाल लावण्यासाठी देशात 12 नव्या विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार
2. नवी दिल्ली - एका उमेदवाराने दोन मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असे मत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयासमोर केले व्यक्त
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - तुमचे बँकेतले पैसे पूर्णपणे सुरक्षित, फायनान्शियल रेझ्यूलेशन अॅण्ड डिपॉझिट विधेयकवर (FRDI) अरुण जेटलींचे स्पष्टीकरण
4. नवी दिल्ली - टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच दाखवाव्यात, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिले आदेश
5. श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये हिमकडा कोसळला, या दुर्घटनेत तीन जवान बेपत्ता, लष्कराने सुरु केले शोध अभियान
6. लंडन - भारतीय न्यायव्यवस्थेच्या तटस्थेवर विजय माल्ल्याच्या वकिलांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह; म्हणे, भारतीय न्यायव्यवस्था, सर्वोच्च न्यायालय आणि प्रसारमाध्यमे निष्पक्ष नाही
7. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 33227.99, निफ्टी : 10240.20, सोने भाव : 28,173 (प्रतितोळा), चांदी : 36,960 (प्रतिकिलो)
8. मुंबई - महापालिका शाळांमध्ये गेल्या 4 वर्षांत विद्यार्थी संख्येत तब्बल 90 हजारांची घट, प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीचा अहवाल प्रेस क्लबमध्ये जाहीर
9. मुंबई - इव्हेंट शोमध्ये अँकरिंग करणाऱ्या तरूणीची आत्महत्या; अर्पिता तिवारी या तरूणीने 15व्या मजल्यावरून उडी घेत संपवला जीव
10. सांगली - अनिकेत कोथळे खून प्रकरणी, आता निलंबित पोलिस अधिकारी युवराज कामटेच्या मामेसासऱ्याला (बाळासाहेब कांबळे) अटक
11. पुणे - बेबी डायपरमधून सोन्याची तस्करी होत असल्याचा प्रकार पुण्यात उघड, पुण्यातील लोहगाव विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केली कारवाई
12. मुंबई - फेसबुकने अलिकडेच आपले एक खास फिचर 'टिकर' हटवले, फेसबुक हेल्प टीमच्या एका सदस्याने याबाबत माहिती दिली
13. मुंबई - व्हील हबमध्ये बिघाड, मारुती सुझुकीने 21,494 डिझायर कार परत मागवल्या, या सर्व कार 20 फेब्रुवारी 2017 ते 10 जुलै 2017 मध्ये तयार करण्यात आल्या
14. नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाने सराव सामना न खेळण्याचा घेतला निर्णय, त्याऐवजी सराव सत्राला भारतीय संघ उपस्थित राहणार
15. लाहोर - पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज नासीर जमशेदवर बारा महिन्यांसाठी बंदी, पाकिस्तान सुपर लीगदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आढळला दोषी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - आशियाई परिषद; चीन विरोधात भारत, जपान एकत्र, 10 देश होणार सहभागी, या माध्यमातून अॅक्ट ईस्ट पॉलिसीला ताकद मिळण्याच्या दृष्टीने नवे पाऊल टाकले जाणार
2. नवी दिल्ली - नोटाबंदीनंतरही गेल्या वर्षभरात 45 टक्के लोकांनी दिली लाच, 'ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल' या संस्थेने 11 राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून बाब उघड
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. बगदाद - आयएसआयएस (ISIS) चा इराकमधून खात्मा, इराकच्या पंतप्रधानांनी केली युद्धसमाप्तीची घोषणा
4. इस्लामाबाद - पाकिस्तानी हद्दीत शिरणाऱ्या अमेरिकन ड्रोन्सना पाडण्याचे पाकिस्तानचे हवाई दलाचे प्रमुख सोहेल अमान यांचे आदेश
5. मुंबई - शेतकरी कर्जमाफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामाला वेग, आज याच कामासाठी राज्यातील सर्व बँकांच्या शाखा सुरु होत्या
6. मुंबई - बँकेत चेक जमा केल्यावर ते पैसे खात्यात वटण्यासाठी लागणारा अवधी लवकरच कमी होणार, चेक क्लिअरिंग हाऊस नावाची संकल्पना आता हद्दपार होणार
7. मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियासोबतच्या सहयोगी बँकांची विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने, एकूण 1300 शाखांची नावे आणि IFSC कोड बदलले
8. मुंबई - आता गोरेगावहून थेट पनवेलला जाता येणार; छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून गोरेगावपर्यंत लवकरच हार्बर मार्ग सुरु होणार
9. नवी मुंबई - खारघरमधील रिक्षाचालकांचे आंदोलन 20 व्या दिवशी मागे, खारघरवासियांनी सोडला सुटकेचा निश्वास
10. नागपूर - बडोदामध्ये होणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लक्ष्मीकांत देशमुख यांचा विजय
11. जळगाव - 7 बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर खात्मा; वरखेडे गावाजवळ शिकारीसाठी आलेल्या बिबट्याला गोळ्या घालून केले ठार
12. मुंबई - 'दंगल गर्ल' झायरा वसीमसोबत विमानात छेडछाड; आम्ही झायरा वसीमसोबत आहोत, झालेल्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे; विस्तार एअरलाइन्सचा खुलासा
13. नवी दिल्ली - आयडिया आपल्या 357 रुपयांच्या रिचार्जवर 100 टक्के कॅशबॅक ऑफर देतेय, एकदा 357 रुपयांचे रिचार्ज केल्यावर तुम्हाला 51 रुपयांचे सात व्हाऊचर मिळतील
14. पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेचा भारतावर 7 गडी राखून दणदणीत विजय, 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी
15. मुंबई - अभिनेत्री आयेशा जुल्का फार मोठ्या गॅपनंतर बॉलीवूडमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, दिग्दर्शक अनिल शर्मा यांच्या नव्या प्रोजेक्टमधून ती कमबॅक करणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - येत्या 1 जानेवारीपासून केवळ एका 'ओटीपी'च्या आधारे आधार कार्ड मोबाईल क्रमांकाशी लिंक करता येणार
2. नवी दिल्ली - भाजप सरकारने आपल्या कार्यकाळातील मात्र साडेतीन वर्षात तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये जाहिरातींवर केला खर्च, माहिती अधिकारातून धक्कादायक बाब समोर
------------------------
ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्या फ्लिपकार्ट सोबत. त्यासाठी क्लिक करा https://goo.gl/ZLZ9ru
------------------------
3. नवी दिल्ली - माझे आई-वडिल कोण आहेत विचारणाऱ्यांनो हा देशच माझं सर्वस्व, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काँग्रेसला उत्तर
4. नवी दिल्ली - 22 वर्षापासून गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे. पंतप्रधानांच्या भाषणातून विकासाचा मुद्दा गायब आहे. ते केवळ भाषणंच करत आहेत. त्यांचं 'भाषण' हेच 'शासन' आहे काय? : राहुल गांधी
5. ब्रुसेल्स - युरोपियन युनियन आणि ब्रिटनमध्ये करार; युनियनमधून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा मार्ग मोकळा
6. राजस्थान - राजसमंद येथील प्रेमप्रकरणातून जीवंत जाळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत जाहीर
7. मुंबई - मी 2017मध्येच मंत्री होणार, गुजरात निवडणुकीत काहीही होऊ दे, माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही : नारायण राणे
8. मुंबई - भारताच्या पहिल्या महिला फोटो पत्रकार असणाऱ्या होमाई व्यारावाला यांची 104 वी जयंती, यानिमित्त गुगलने डुडलद्वारे वाहिली आदरांजली
9. नाशिक - मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; मुख्यमंत्री सुखरूप
10. मुंबई - लवकरच व्हॉट्सअॅपचं बिझनेस अॅप होणार लॉन्च, हे अॅप आशिया खंडासाठी असणार, व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती
11. नवी दिल्ली - टी-20 क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल 800 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज ठरला
12. मुंबई - बिग बॉसच्या 11व्या पर्वानंतर 'दस का दम' या शोच्या तिसऱ्या पर्वात सलमान खान दिसणार, हा शो जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसारित केला जाईल
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्याची मुदत वाढवली, 31 मार्च, 2018 पर्यंत आधार-पॅन लिंक करता येणार
2. नवी दिल्ली - 2016 मध्ये रेल्वेचे सामान चोरणारे 11 लाख चोर पकडले, महाराष्ट्र अव्वल, यानंतर उत्तर प्रदेशचा नंबर लागतो
------------------------
ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्या फ्लिपकार्ट सोबत. त्यासाठी क्लिक करा https://goo.gl/ZLZ9ru
------------------------
3. नवी दिल्ली - "एखाद्या महिलेने दुसऱ्या धर्मातील पुरुषाशी लग्न केलं तर तिचा धर्म बदलणार नाही. अशाप्रकारचा कोणताही कायदा भारतात नाही," : सर्वोच्च न्यायालय
4. नवी दिल्ली - ‘वंदे मातरम’ म्हणण्यास नकार देणाऱ्यांवर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी साधला निशाणा, म्हणाले ‘तुम्ही आईला नाही तर, अफझल गुरुला सलाम करणार का?’
5. नवी दिल्ली - भाजपचे खासदार नाना पटोले यांचा खासदारकीचा राजीनामा, लोकसभा अध्यक्षांकडे राजीनामा केला सादर
6. इस्लामाबाद - कुलभूषण जाधव यांना कुटुंबाला भेटता येणार, पत्नी आणि आई 25 डिसेंबरला कुलभूषण जाधव यांची भेट घेणार, कुलभूषण हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या ताब्यात
7. लंडन - स्टेट बँक ऑफ इंडियाला माल्ल्याने घेतलेल्या कर्जाच्या रकमेतील 80 टक्के रक्कम देऊ केली होती, पण त्यांचा प्रस्ताव बँकेने नाकारला, विजय माल्ल्याच्या वकिलांनी केला दावा
8. अहमदाबाद - सौराष्ट्र-कच्छमध्ये भाजपने किमान दहा जागा जिंकून दाखवाव्यात पटेलांसाठी सुरू केलेलं आरक्षण आंदोलन मागे घेईन : हार्दिक पटेल
9. अहमदाबाद - जीएसटीमधील वस्तूंच्या करपातीचा मुद्दा निवडणूक प्रचारात वापर करू नका, निवडणूक आयोगाने भाजपला दिले आदेश
10. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 33250.30, निफ्टी : 10265.70, सोने भाव : 28,513 (प्रतितोळा), चांदी : 37,000 (प्रतिकिलो)
11. मुंबई - Huawei कंपनी लवकरच आपला एक जबरदस्त स्मार्टफोन बाजारात लॉन्च करणार, यामध्ये तीन लेंस असलेला 40 मेगापिक्सल कॅमेरा असणार
12. नवी दिल्ली - दर्जेदार तेज गोलंदाज, अष्टपैलूची उपस्थिती आणि तोडीचे फिरकी गोलंदाज असलेल्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेचे मैदान मारण्याची संधी : राहुल द्रविड
13. मुंबई - अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या ‘आम्ही दोघी’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - गव्हर्नर उर्जित पेटल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने द्वैमासिक पतधोरण केले जाहीर, त्यानुसार रेपो दर 6 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 5.75 टक्के कायम
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
2. नवी दिल्ली - केंद्र सरकार ‘फायनान्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स बिल’ आणण्याच्या तयारीत, यानुसार बँक बुडत असल्यास बँकेला खातेदारांचा पैसा वापरण्याचा हक्क असेल
------------------------
ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्या फ्लिपकार्ट सोबत. त्यासाठी क्लिक करा https://goo.gl/ZLZ9ru
------------------------
3. नवी दिल्ली - सरकार आता लवकरच गॅस सबसिडीबाबत मोठा घेणार निर्णय, ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे त्यांची घरगुती गॅस सिंलेंडरवरची सबसिडी रद्द होण्याची शक्यता
4. नवी दिल्ली - भीम अॅपद्वारे रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या पाच लकी प्रवाशांना त्याच महिन्यात मोफत प्रवासाची संधी मिळणार, 1 डिसेंबर ते 31 मार्चपर्यंत ही योजना असेल लागू
5. नवी दिल्ली - बनावट कागदपत्रांच्या मदतीने रोहिंग्यांना दिलं जातंय भारतीय नागरिकत्व; गुप्तचर यंत्रणेची माहिती
6. नवी दिल्ली - देशभरात पेटीएम बँकींग सेवेचा विस्तार करण्यासाठी पेटीएम पेमेंटस बँक देशभरात 1 लाख एटीएम बँकींग आऊटलेट सुरू करणार
7. नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदीही सोशल मीडियात चांगलेच सक्रिय, 2017 मध्ये त्यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या फॉलोअर्स प्रमाण 51 टक्क्यांनी वाढले
8. श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यांना अटक
9. लंडन - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट उधळण्यात मेट्रोपॉलिटन पोलिसांना यश, याप्रकरणी दोन जणांना अटक
10. गडचिरोली - चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान, मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त, अहेरी तालुक्यातील कल्लेड जंगलातील घटना
11. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 32597.18, निफ्टी : 10044.10, सोने भाव : 29,009 (प्रतितोळा), चांदी : 37,752 (प्रतिकिलो)
12. मुंबई - रेरा कायद्याविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या; बिल्डरांना धक्का, कोर्टाचा सरकार आणि ग्राहकांना मोठा दिलासा
13. मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने छगन भुजबळांची आणखी 20 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता केली जप्त, ही मालमत्ता काळा पैसा बाळगल्यासंदर्भातील कायद्यातंर्गत केली जप्त
14. मुंबई - इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला महिनाभरात सुरुवात होईल, टेंडर निघाले आहे, मुख्यमंत्र्यांची चैत्यभूमीवर माहिती
15. नवी दिल्ली - लोंबार्गिनीची धाकड एसयूव्ही ऑरस बाजारात दाखल, पुढच्या वर्षात ही कार बाजारात विक्रीसाठी येणार, तिची किंमत आहे 1 कोटी 29 लाख रूपये
16. नवी दिल्ली - तिसरी कसोटी अनिर्णित, विराट कोहली मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सिरीज, भारताने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 1-0 ने जिंकली
17. अॅडलेड - अॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या दिवस-रात्र कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 120 धावांनी मिळवला विजय
18. मुंबई - हॉकी टिमचे कॅप्टन संदीप सिंग यांच्या जीवनावर आधारित 'सूरमा' या चित्रपटातील अभिनेत्री तापसी पन्नूचा फर्स्ट लूक समोर
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - पाकिस्तानकडून यावर्षी 720 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन, मागील सात वर्षांतील शस्त्रसंधी उल्लंघनाचा हा सर्वांत मोठा आकडा
2. नवी दिल्ली - भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना गमवावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - नव्या नोटा हाताळण्यात अंधांना अडचणी येत असल्याने उच्च न्यायालयाकडून सरकारला नोटीस
4. नवी दिल्ली - एका फसवणुकीच्या प्रकरणात महिलेला न्याय देण्यास उशीर झाल्यामुळे चक्क सर्वोच्च न्यायालयाने या महिलेची मागितली माफी
5. नवी दिल्ली - देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाहिली आदरांजली
6. नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी 4 डिसेंबर रोजी पक्षाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार, यावेळी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, कार्यसमितीचे सदस्य उपस्थित राहणार
7. लाहोर - पाकिस्तानच्या राजकारणात हाफिज सईदची एन्ट्री; सार्वत्रिक निवडणूक लढवणार
8. उस्मानाबाद - भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडणारा त्यांचा धाकटा भाऊ प्रवीण महाजनचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, पत्नी सारंगी महाजन यांनी केला दावा
9. राजकोट - राजकोटमध्ये राडा, खासदार राजीव सातव यांना अटक, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप
10. सांगली - अशोकराव हे चांगले नेते आहेत. चांगली कामं करतात, पण मध्येच काही घोटाळेही करतात : पतंगराव कदम
11. पुणे - पुणे मॅरेथॉन अखेर ‘पार’ पडली; इथोपियाचा गेटाचेव बेशा विजयी, ढिसाळ आयोजन आणि स्पर्धकांचा अल्प प्रतिसाद
12. नवी दिल्ली - मारूती सुझुकी सिलेरिओ एक्स भारतात लॉन्च, या नव्या सिलेरिओ व्हर्जन कारची किंमत 4.57 लाख रूपये ते 5.42 लाख रुपये दरम्यान
13. नवी दिल्ली - भारताचा पहिला डाव 536 धावांवर घोषित, विराटचे आणखी एक द्विशतक, दिवसअखेर श्रीलंका 3 बाद 131
14. मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि सुपरस्टार रजनीकांत यांच्या मच अवेटेड 2.0 या बिग बजेट सिनेमाची रिलीज डेट जाहीर, 27 एप्रिल 2018 रोजी होणार रिलीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - रस्ते अपघातांमधील मृत्यूंमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट, रस्ते अपघातांमधील मृतांची आकडेवारी राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीवरुन समोर
2. नवी दिल्ली - नेस्ले कंपनीची 'MAGGI' (मॅगी) पुन्हा एकदा फेल, त्यामुळे नेस्लेला तब्बल 45 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - वॉसाँग-15 ची चाचणी पाहिल्यानंतर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने अणवस्त्र संपन्न राष्ट्र होण्याचे आपले उद्दिष्टय पूर्ण झाल्याचे अभिमानाने केले जाहीर
4. उस्मानाबाद - तिहेरी तलाकच्या निर्णयात सरकारने हस्तक्षेप करु नये, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तिहेरी तलाकवरच्या बंदीला दर्शवला विरोध
5. कराची - मी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सर्वात मोठा समर्थक आहे, लष्कर-ए-तोयबा संघटनेलाही मी आवडतो : परवेझ मुशर्रफ
6. 'लश्कर-ए-तोयबा'चा समर्थक अब्दुल नईम शेखला वाराणसीमधून अटक, अब्दुल हा मराठवाड्यातील औरंगाबादचा रहिवाशी
7. वॉशिंग्टन - अमेरिकेमधील कोलोराडामधील न्यायालयाने एका व्यक्तीला (ब्रॉक फेंकलिनला) 472 वर्षांच्या कारावासाची सुनावली शिक्षा
8. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 33602.76, निफ्टी : 10361.30, सोने भाव : 29,400 (प्रतितोळा), चांदी : 38,630 (प्रतिकिलो)
9. मुंबई - कोपर्डी प्रकरणी न्यायालयाने दोषींना कठोर शिक्षा सुनावल्यामुळे अनेक नराधम यातून धडा घेतील आणि अशा स्वरुपाचे अत्याचार करण्याची हिंमत कोणी करणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
10. मुंबई - येत्या रविवारी 3 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या रात्री आकाशात 'सुपरमून' दिसणार, खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांची माहिती
11. सोलापूर - विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यावर बलात्काराच्या आरोपीला मदत केल्याचा आरोप, याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
12. पुणे - दहावी, बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च तर दहावीची परीक्षा 1 ते 24 मार्चपर्यंत
13. पुणे - महाराष्ट्र प्लास्टिक बंदीसाठी येत्या गुढीपाडव्याला राज्यात प्लास्टिक बंदीचा कायदा करणार : रामदास कदम, पर्यावरण मंत्री
14. मुंबई - ओपोने आपला नवा स्मार्टफोन ओपो F5चं नवं व्हर्जन केले लाँच, याची किंमत जवळजवळ 17,835 रुपये
15. कोलंबो - श्रीलंका क्रिकेट बोर्डाने (एसएलसी) उपुल थरंगाला वन डे आणि ट्वेण्टी-20 संघाच्या कर्णधारपदावरुन हटवले, त्याच्याजागी अष्टपैलू थिसारा परेराकडे संघाचे नेतृत्त्व सोपवले
16. मुंबई - ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता सिद्धार्थ जाधवची प्लास्टिक बंदी निर्णयाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्य सरकार सदिच्छा दूत म्हणून निवड करणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - आयसिस या दहशतवादी संघटनेत आतापर्यंत 100 भारतीय सामिल, सुरक्षा यंत्रणांची धक्कादायक माहिती
2. नवी दिल्ली - जीएसटीतून मिळणाऱ्या उत्पन्नात ऑक्टोबरमध्ये 10 टक्क्यांनी घट, पहिल्यांदाच उत्पन्न 90 हजार कोटी रुपयांच्या खाली
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्ये 25 लाखांहून अधिक रक्कम जमा करणाऱ्या 1 लाख 16 हजार लोकांना आयकर विभागाने बजावली नोटीस
4. नवी दिल्ली - सीबीआयच्या विशेष संचालकपदावरुन राकेश अस्थाना यांची नियुक्ती रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार
5. नवी दिल्ली - राजकारण प्रवेशाच्या प्रश्नावर माझं स्पष्ट उत्तर 'नाही' असंच आहे. कारण, राजकारण प्रवेशाला माझ्या बायकोचा ठाम विरोध आहे : रघुराम राजन
6. नवी दिल्ली - पद्मावती सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणण्याची वकील मनोहर लाल शर्मा यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
7. वॉशिंग्टन - 'नासा' अवकाश कचऱ्यासंदर्भात महत्वपूर्ण मोहिम हाती घेणार, नासा येत्या 4 डिसेंबरला एक सेंन्सर लॉन्च करणार
8. इस्लामाबाद - दहशतवादी यादीतून नाव वगळण्यासाठी 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची संयुक्त राष्ट्र संघात याचिका
9. सेऊल - पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये गुंतवणूक करु नका, दक्षिण कोरियाचा कंपन्यांना आदेश
10. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 33618.59, निफ्टी : 10370.30, सोने भाव : 29,410 (प्रतितोळा), चांदी : 39,129 (प्रतिकिलो)
11. मुंबई - भाजपने घेतलेली भूमिका मला मान्य असून मी लवकर आमदार होईल : नारायण राणे
12. सांगली - अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, अनिकेतच्या दोन्ही भावांचा अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले दोघांनाही ताब्यात
13. अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील आंदोलनाची तारीख निश्चित, 23 मार्चला होणार दिल्लीत आंदोलन
14. पुणे - छगन भुजबळ ही लढवैय्या व्यक्ती आहे. त्यामुळे गोरगरिब जनतेसाठी, संघर्ष करण्यासाठी ते तुरुंगातून बाहेर यायला हवेत, राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळेंचे खळबळजनक विधान
15. नवी दिल्ली - भारताचा ऑफस्पिनर आर अश्विन सध्याच्या काळातील जगातला सर्वश्रेष्ठ स्पिनर, मुरलीधरनने अश्विनवर उधळली स्तुतीसुमने
16. मुंबई - लवकरच भारतात बनलेली पहिलीवहिली स्पेस मुव्ही पाहायला मिळणार, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने ‘स्पेस मूव्ही’ बनवली
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) चालू वित्त वर्षात पीएफमध्ये जमा रकमेवरील व्याजदरात कपात करण्याची शक्यता
2. नवी दिल्ली - शाळांतील लैंगिक शोषणाचे प्रकार टाळण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आखतेय नवे धोरण
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - देशातील कोर्टांत कामकाजाचा वेग कळावा म्हणून न्याय विभागात जस्टिस क्लॉक, न्यायालयाची रँकिंग तयार करण्यासाठी ही यंत्रणा येणार कामात
4. नवी दिल्ली - आयसीएमआर प्रमुख सौम्या स्वामिनाथन डिसेंबरमध्ये डब्ल्यूएचओचे उप महासंचालकपद स्वीकारतील
5. जकार्ता - इंडोनेशियामधील बाली बेटावरील एगंग पर्वतामधील ज्वालामुखीच्या हालचाली तीव्र, केव्हाही उद्रेकाची शक्यता
6. अहमदाबाद - देशाच्या प्रगतीत खोडा घालणे आणि खिल्ली उडवणे एवढेच काँग्रेसला चांगले जमते : अरूण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री
7. हैदराबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व व्यापार सल्लागार इव्हांका तीनदिवसीय उद्योजक परिषदेसाठी भारतात येणार, सुरक्षेसाठी 10 हजार जवान तैनात
8. मुंबई - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपतर्फे नारायण राणेंना उमेदवारी मिळणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले स्पष्ट, काँग्रेसचे माने, भाजपचे भंडारी यांच्यात लढत?
9. मुंबई - विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी
10. नागपूर - आता आरक्षणामुळे संपन्न झालेल्या मागासवर्गीयांनी आरक्षणाचा लाभ घेणे अपेक्षित नाही. ती एक प्रकारे लाचारी ठरेल : सुशीलकुमार शिंदे
11. विटा - राज्यात तुम्ही नाही तर सरकारच लाभार्थी आहे, सत्ता भोगायला तुम्ही जनतेने दिली आहे. तुम्हाला काही नाही पण सरकारला सगळं मिळतंय : उद्धव ठाकरे
12. पुणे - ऑनलाईन' औषध विक्री स्टोअर सुरु करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव विचाराधीन, औषध विक्रेत्यांमध्ये अस्वस्थता
13. मुंबई - अॅप्पल लवकरच आयफोनचे नवीन मॉडेल लॉन्च करणार, याची स्क्रीन लहान असणार, या फोनचे नाव आयफोन एसई 2 असे असणार
14. मुंबई - भारताने पुरुष आणि महिलांची आशिया कप कबड्डी स्पर्धा जिंकली, पुरुष गटात भारताने पाकिस्तानला तर महिलांमध्ये भारताने कोरियाला नमवले
15. मुंबई - बॉलिवू़ड अभिनेता सलमान खान आगामी 'रेस 3' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त, चित्रपटासाठी सलमान वजन कमी करणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - ‘ईपीएफओ’चे केंद्रीय आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ईपीएफओ’ने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अकौंटिंग धोरणाला दिली मंजुरी
2. शोपियन - सुट्टीत घरी आलेल्या 23 वर्षीय जवानाची काश्मीरमध्ये गोळया झाडून हत्या, इरफान अहमद दार असे मृत जवानाचे नाव
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. वॉशिंग्टन - जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला तातडीने अटक करा, अमेरिकेने पाकिस्तानला खडसावले
4. सिनई - इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट आणि अंधाधूंद गोळीबारात 235 ठार, अनेक जखमी
5. ठाणे - ठाण्यातल्या दिवा परिसरात 9 किलोची स्फोटकं जप्त, याप्रकरणी तीन जणांच्या टोळीला पोलिसांनी केली अटक
6. मुंबई - दहावीतील कलेच्या गुणांच्या नियमामध्ये राज्य सरकारकडून बदल, नव्या नियमानुसार जास्तीत जास्त 15 गुण मिळणार
7. मुंबई - डॉक्टरांनी आता आजारावर उपचार करण्यासाठी ब्रँडेड औषध लिहून देताना त्याबरोबरच त्या औषधाचे जेनेरिक नाव लिहिणे बंधनकारक
8. मुंबई - मुंबई ते गोवा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रूझ प्रवासाला आता नाताळचा मुहूर्त, 25 डिसेंबरला हा जलप्रवास प्रवासी आणि पर्यटकांसाठी सुरु होणार
9. कराड - शिवसेना फसव्या लोकांबरोबर राहते कशाला? जर एकत्र नांदता येत नसेल तर वेगळे व्हा : शरद पवार
10. सांगली - आम्ही सत्तेतून बाहेर पडताच राष्ट्रवादी भाजपाबरोबर नांदायला जाईल : उद्धव ठाकरे
11. पुणे - नाभिक समाजाचे नियोजित आंदोलन मागे, मुख्यमंत्र्यांच्या माफीनाम्यानंतर महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटनेचा निर्णय
12. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी, दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 312 धावा, भारताची श्रीलंकेवर 107 धावांची आघाडी
13. मुंबई - 'टायगर जिंदा है' च्या ट्रेलरला आणि 'स्वॅग से स्वागत' या दोन्ही व्हिडियोंना युट्युबवर तुफान प्रतिसाद, येत्या 22 डिसेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवर काही लिहिलेले असले तरी आता चिंता करण्याची गरज नाही, त्या नोटाही बँकांना स्वीकाराव्या लागतील : रिझर्व्ह बँक
2. नवी दिल्ली - अखेर संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित, 15 डिसेंबर ते 5 जानेवारीदरम्यान अधिवेशन चालणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - कलम 45 हे घटनाबाह्य असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मनी लॉन्ड्रिंग कायद्यातंर्गत तुरुंगात असणाऱ्या अनेक आरोपींची लवकरच सुटका होण्याची शक्यता
4. नवी दिल्ली - गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार डोकलाममधल्या वादग्रस्त भागाच्या मागच्या बाजूला चीनने 400 मीटर उंचीची भिंत उभारली
5. नवी दिल्ली - फेरीवाल्यांसंबंधी संजय निरुपम यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, उच्च न्यायालयाचा निर्णय ठेवला कायम
6. लाहोर - काश्मीरसाठी लढा सुरू ठेवणार, भारताने अमेरिकेच्या मदतीने पाकवर दबाव टाकला : हाफिज सईद
7. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 33679.24, निफ्टी : 10389.70, सोने भाव : 29,430 (प्रतितोळा), चांदी : 39,409 (प्रतिकिलो)
8. मुंबई - भारतीय स्टेट बँकेने UONO (यू ओन्ली नीड वन) नावाचे मोबाईल अॅप केले लॉन्च, दररोजच्या व्यवहारातील 60 सेवा एकाच ठिकाणी वापरण्याची संधी ग्राहकांना मिळणार
9. मुंबई - परिवहन विभागाने टाकले एक पाऊल पुढे, परवाना काढतानाच करू शकाल अवयव दानाची इच्छा व्यक्त
10. नवी मुंबई - कळंबोलीत अनधिकृत बांधकामांवर सिडकोची कारवाई, कारवाई रोखण्यासाठी गेलेले कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील यांना अटक
11. पुणे - नवीन बायो-इंधन धोरण लवकरच; ग्रीन एनर्जीचे नेतृत्व पुण्याने करावे, पेट्रोलिअम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे पुण्यात आवाहन
12. पुणे - डीएसके फसवणारा माणूस नाही, त्यांना संपवण्याचे षडयंत्र, अमराठी व्यावसायिकांना पुढे आणण्याचा डाव : राज ठाकरे
13. औरंगाबाद - शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द, निवणुकीत गैरप्रकार प्रकरणी हायकोर्टाने ठरवले अपात्र
14. मुंबई - आशिया पॅसिफिक स्क्रीन पुरस्कार सोहळ्यात न्यूटनमधील अभिनयासाठी राजकुमार रावचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरव
15. नागपूर - भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा अवघ्या 205 धावांत खुर्दा उडवला, दिवसअखेर भारताच्या 1 बाद 11 धावा
16. केप टाऊन - ‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसला गर्लफ्रेण्ड रिव्हा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी दक्षिण आफ्रिकेच्या सुप्रीम कोर्टाने 13 वर्षे पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची ठोठावली शिक्षा
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीनगर - काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन, चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश
2. बेंगळुरू - 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक नंदन नीलेकणी व रोहिणी नीलेकणी या दाम्पत्याने त्यांच्याकडील अर्धी संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्याचा घेतला निर्णय
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. न्यूयॉर्क - भारताचे दलवीर भंडारी पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी, भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
4. पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कुणी आवाज उठवला तर त्याचा हात तोडून टाकू, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष नित्यानंद राय यांचे वादग्रस्त वक्तव्य
5. मुंबई - शेअर बाजार : सेन्सेक्स : 33478.35, निफ्टी : 10326.90, सोने भाव : 29,342 (प्रतितोळा), चांदी : 39,306 (प्रतिकिलो)
6. मुंबई - बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत राज्याच्या निधीतून खरेदी केलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तूरडाळीची स्वस्त धान्य दुकानातून विक्री करण्यास मान्यता; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
7. मुंबई - राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना देण्यासाठी साध्या यंत्रमागधारकांनी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात पाच टक्के सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
8. पुणे - मी सगळयांचे पैसे परत करणार आहे. माझ आयुष्य पारदर्शक असून मी कधीही काहीही लपवलेल नाही. कोणालाही फसवलेले नाही : डी.एस.कुलकर्णी
9. सांगली - अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, युवराज कामटेसह इतर आरोपींना आणखी 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे कोर्टाचे आदेश
10. बंगळूरू - शाओमी देशातील 100 स्मार्टअपमध्ये पुढील पाच वर्षांच्या कालावधीत 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार
11. नवी दिल्ली - श्रीलंकेच्या विरोधात दुसऱ्या कसोटीसाठी भुवनेश्वर कुमारच्या जागेवर तामिळनाडूचा ऑलराऊंडर विजय शंकर सहभागी होणार
12. आगामी काळात भारत आणि पाकिस्तान हे संघ हॉकी सामन्यात समोरासमोर उभे ठाकू ठकतात, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटेनेचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी भारत-पाक हॉकी सामन्यांना दर्शवला पाठिंबा
13. मुंबई - ‘नो एन्ट्री‘ च्या सिक्वलमध्ये आता सलमान खानचे एक्झिट आणि अक्षय कुमारची होणार एन्ट्री
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - एक अब्ज आधार क्रमांक एक अब्ज बँक खाती आणि एक अब्ज मोबाईल क्रमांकांना जोडण्यासंदर्भातील योजनेवर केंद्र सरकारचा विचार सुरु
2. श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पाकिस्तानचाच भाग असून त्यांनी हातात बांगड्या भरल्या नाहीत : फारुख अब्दुल्ला
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. वॉशिंग्टन - अमेरिकेने एच-1बी व्हिसाधारकांच्या किमान वेतनात 30 हजार डॉलरची केली वाढ
4. मुंबई - माझ्या छकुलीचे जसे लचके तोडले, तसेच त्या नराधमांचेही लचके तोडा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नगरच्या निर्भयाच्या आईने केली व्यक्त
5. मुंबई - कोपर्डी प्रकरणात रक्तगट ठरला महत्त्वाचा पुरावा, पीडित मुलीच्या रक्ताचे डाग आरोपीच्या कपड्यांवर होते, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची माहिती
6. मुंबई - कोपर्डी निकाल, कोर्टाच्या निकालानंतर पीडितेला न्याय, कोर्टाने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा करावी, शिक्षेनंतर कुणीही अत्याचाराला धजावणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
7. मुंबई - जीएसटी दर कमी केल्यानंतरही ग्राहकांना लुटणाऱ्या हॉटेल्सवर होणार कारवाई
8. अहमदाबाद - काँग्रेस नेत्यांकडून दुर्लक्षित केलं गेल्यामुळे नाराज झालेल्या पाटीदार नेत्यांनी काँग्रेसला दिला 24 तासांचा अल्टिमेटम
9. मुंबई - राधेश्याम मोपलवार कथित ऑडिओ प्रकरणात ट्विस्ट, अमरावतीचे पोलिस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांच्या चौकशीची शक्यता, मांगलेला मदत केल्याचा संशय
10. मुंबई - मुंबईत रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या महिला मजुरांना ट्रेनने उडवले, यात 3 महिलांचा मृत्यू तर एका महिलेची प्रकृती गंभीर
11. मुंबई - स्किलसीखो डॉट कॉम या ऑनलाईन लर्निंग स्टार्ट अपने, स्टार्टअप्स संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी मराठी भाषेतील पहिला ऑनलाईन प्री-इनक्युबेशन कोर्स केला सुरु
12. सांगली - अनिकेत कोथळे प्रकरण, निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह आणखी पाच पोलिस सेवेतून बडतर्फ
13. लातूर - केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी काढला एक अध्यादेश, तेलबियांवर आयात शुल्क वाढवण्यात आलेले असून त्याचा परिणाम सोमवारी बाजारात दिसून येईल
14. फेसबुकने अतिशय दर्जेदार व्हिडीओ निर्मिती सुलभ पद्धतीने करण्यास मदत करणारे टुल क्रियेटर या स्मार्टफोन अॅप्लीकेशनच्या स्वरूपात केले सादर
15. भारत वि. श्रीलंका कसोटी, पहिल्या डावात भारताच्या सर्वबाद 172 धावा, श्रीलंकेच्या 4 बाद 165 धावा, कमी दृश्यमानतेमुळे खेळ लवकर थांबवण्यात आला
16. मुंबई - साऊथचे सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी "पसायदान" सिनेमात दिसणार, जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून सिनेमाचे शूटिंग सुरु होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर पॅन कार्डच्या (पर्मनन्ट अकौंट नंबर) अर्जामध्ये तब्बल 300 टक्क्यांनी वाढ, केंद्रीय डायरेक्ट टॅक्स बोर्डाने दिली माहिती
2. नवी दिल्ली - नोकरीच्या बढतीत एससी, एसटींना आरक्षण असावे की असू नये यावर सर्वोच्च न्यायालयाचे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय घेणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - दिल्लीत ऑटोमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी एप्रिलपासून बीएस-6 इंधन मिळणार
4. श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टीला प्रारंभ, तापमानात मोठ्या प्रमाणात घट, श्रीनगर शहराचे तापमान 2.2 अंश सेल्सियस इतके घटले
5. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो पुढील वर्षाच्या सुरुवातीला येणार भारत दौऱ्यावर, फ्रान्सच्या भारतातील राजदूतांनी दिली माहिती
6. गुजरात निवडणुकीसाठी उमेदवार निवडीबाबत होणार असलेली काँग्रेसची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक शुक्रवारपर्यंत लांबणीवर
7. राजस्थान - डुंगरपूर येथील शासकीय शाळेत गोळीबार, 3 विद्यार्थी जखमी, आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक, जमिनीच्या वादातून गोळीबार
8. मुंबई - शीना बोरा हत्या प्रकरणाला नवे वळण, पीटर आणि ड्रायव्हर श्यामवर राय यांनी कट आखून शीनाची हत्या केल्याचा इंद्राणी मुखर्जीने केला दावा
9. मुंबई - संजय लिला भन्साळी यांनी पद्मावती चित्रपट रिलीज केल्यास त्यांच्या इतर चित्रपटांना आमची संघटना पाठिंबा देणार नाही, भाजपा आमदार राम कदम यांचा इशारा
10. रत्नागिरी - 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील खड्डे बुजविले नाही तर आंदोलन करणार, एक जरी खड्डा दिसला तरी मंञ्यांना राज्यात फिरू देणार नाही, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा
11. पुणे - राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यादरम्यान 4 हजार 797 जणांना डेंग्यूची लागण; 23 मृत्यूमुखी, राज्याच्या आरोग्य विभागाची माहिती
12. मुंबई - मोझिलाने (Mozilla) आपल्या फायरफॉक्स या ब्राऊजरची नवी आवृत्ती फायरफॉक्स क्वांटम (Firefox Quantum) केली लॉंच, गुगल क्रोमला देणार टक्कर
13. कोलकाता - भारत- श्रीलंका पहिली कसोटी आजपासून, माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा समालोचन करताना दिसणार
14. कोलकाता - मलाही विश्रांतीची गरज असते, मी रोबोट नाही, हवं तर माझी कातडं कापून बघा, त्यातून रक्त येईल आणि मी माणूसच असल्याचं कळेल : विराट कोहली
15. मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा पुन्हा प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा, परंतु ही थट्टा असल्याचे नंतर समोर
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठी कर्मचारी कपात, एसबीआयने गेल्या 6 महिन्यांमध्ये 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना बसवले घरी
2. नवी दिल्ली - चीनच्या अलिबाबा ग्रुपने तयार केलेले यूसी ब्राउजर अॅप गुगलने प्ले स्टोअर्समधून हटवले
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. जम्मू-काश्मीर - पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय लष्कराने दिले उत्तर, गोळीबार सुरुच
4. बीजिंग - दक्षिण-पूर्व चीनमधील ख्रिश्चन लोकांना तेथील अधिकाऱ्यांनी काढले अजब फर्मान, येशू ख्रिस्ताचे फोटो हटवून त्याऐवजी राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे फोटो लावण्यास सांगितले
5. लखनौ - अयोध्येतील राम जन्मभूमी वादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घेतली भेट
6. अहमदाबाद - भाजपला निवडणूक आयोगाचा जोरदार झटका, 'पप्पू' शब्दाचा वापर असलेली भाजपची एक व्हिडिओ जाहिरात निवडणूक आयोगाने धरली रोखून
7. गडचिरोली - दोन्ही पक्षांनी समंजसपणाची भूमिका घेतल्याशिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी होणार नाही : शरद पवार
8. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 32760.44, निफ्टी : 10118.00, सोने भाव : 29,641 (प्रतितोळा), चांदी : 39,876 (प्रतिकिलो)
9. मुंबई - 'दाऊदची मालमत्ता कोणी ताब्यात घेतली तर मुंबईत 1993 च्या बॉम्बस्फोटाची पुरावृत्ती घडवून आणू, मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट करू,' दाऊदच्या साथीदाराने दिला इशारा
10. मुंबई - आर्थिक गर्तेत असलेल्या बेस्ट प्रशासनाने बस तिकीट आणि पास दरात वाढ करण्याचा घेतला निर्णय, यामुळे येत्या काळात मुंबईकरांचा बस प्रवास महागणार
11. मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'इफ्फी'मध्ये होणार सन्मान; 'पर्सनॅलिटी ऑफ द इयर' पुरस्काराने करणार सन्मानित
12. रत्नागिरी - गुजरात काबीज करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 50 सभा घेतल्या, एवढं करूनही गुजरात हरले तर मोदींना देशात थारा असणार नाही : उद्धव ठाकरे
13. औरंगाबाद - भाजप प्रवेशासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची पाच कोटी रुपयांची ऑफर, शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा गौप्यस्फोट
14. सोनीचा मिररलेस A7R III कॅमेरा लाँच, किंमत 2,64,999 रुपये, याचे शूटिंग स्पीड 10 फ्रेम प्रति सेकंद आहे
15. नवी दिल्ली - 2018 च्या आयपीएल हंगामासाठी संघमालकांसाठी खेळाडू कायम ठेवण्याचे धोरण जाहीर, चेन्नई सुपरकिंग्जमध्ये धोनी, अश्विन कायम, तर रैनावर प्रश्नचिन्ह
16. मुंबई - नवाझुद्दीन सिद्धीकीच्या आगामी ‘मॉन्सून शूटआऊट’ या चित्रपटाचा टीझर रिलीज, टीझरच्या प्रत्येक शॉटमध्ये नवाझ खतरनाक लूकमध्ये दिसतोय
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - जीएसटीमध्ये झालेले बदल गुजरात निवडणुकीशी जोडणे म्हणजे बालिश राजकारण : अरुण जेटली, अर्थमंत्री
2. जम्मू काश्मीर - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. कोलकाता - रसगुल्ला बिकानेरचा नाही, तर पश्चिम बंगालचा असं म्हणावं लागणार आहे, रसगुल्ला हा मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा न्यायालयाचा निर्णय
4. बिजिंग - चीनमध्ये एक आगळा वेगळा आणि अवाढव्य असा ड्रोन बनवण्यात आला, या ड्रोनचा वापर लष्करासह इतर नागरी आणि सागरी वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी करण्यात येणार
5. रियाध - सौदी अरेबियाने योगचा स्वीकार करताना योगला दिला खेळाचा दर्जा, सौदी प्रशासनाकडून तशी अधिकृत मान्यता
6. मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दक्षिण मुंबईतल्या तिन्ही मालमत्तांचा 11 कोटींना लिलाव
7. मुंबई - एक लिटर मूत्रामागे एक रुपया द्यावा आणि युरिनपासून युरिआ तयार करावा, सेंद्रीय खतासाठी नितीन गडकरिंची अभिनव संकल्पना
8. मुंबई - महाराष्ट्र सरकार पळपुट्या विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊस अर्थात विश्रामगृह देण्याच्या तयारीत
9. मुंबई - 25 हजार कोटी रुपयांच्या गायींच्या पतंजलीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकार 800 एक जमीन देणार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
10. मुंबई - मुंबईतील वॉर्ड क्रमांक 21 च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजप उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा देण्याचा घेतला निर्णय
11. मुंबई - यापुढे 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना बोलवणार नाही : अजित पवार
12. मुंबई - 'न्यूड', 'एस दुर्गा' चित्रपट माहिती व प्रसारण मंत्रालयाने महोत्सवातून वगळल्याच्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी दिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ज्युरी प्रमुखपदाचा राजीनामा
13. परभणी - रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं वादग्रस्त विधान
14. मिलान - तब्बल चार वेळा चॅम्पियन ठरलेला इटलीचा संघ 60 वर्षात पहिल्यांदाच फिफा विश्वचषकासाठी अपात्र
15. मुंबई - मोटोरोलाचा Moto X4 भारतामध्ये दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च, सुपर ब्लॅक आणि स्टर्लिंग ब्ल्यू या दोन रंगांमध्ये उपलब्ध
16. मुंबई - अभिनेता सलमान खानने ‘रेस 3’ चित्रपटातील आपला फर्स्ट लूक ट्विटर अकाउंटवरून केला रिलीज, ‘रेस 3’ हा चित्रपट 5 जूनला ईदच्या दिवशी रिलीज होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
