LetsUpp Marathi
Kanalga Telegram’da o‘tish
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Ko'proq ko'rsatish6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; दिवसभरातील महत्वाच्या बातम्या!
LetsUpp | Bulletin
● ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय; आंध्र प्रदेश, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर राज्यात ओबीसी आरक्षणासाठीचा अध्यादेश काढण्याचा निर्णय
● "सरकारनं आता तरी जागं व्हावं...!"; मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर खासदार छत्रपती संभाजीराजेंचं आवाहन, परतूर तालुक्यातील तरूणाची नैराश्यातून आत्महत्या
● चक्रीवादळांच्या तडाख्याचा कायमस्वरुपी बंदोबस्त करणार, ३ हजार कोटींची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय; पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्ये योजना
● ऊस तोडणी कामगारांच्या जिल्हानिहाय संख्येचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहांची उभारणी करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या
● ओबीसी आरक्षणासाठी सरकारने अध्यादेश आधीच काढायला हवा होता :विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
● सोनू सूदच्या घरी इन्कम टॅक्सची धाड, सलग १४ तासांपासून चौकशी सुरु! मुंबईतील एकूण ६ जागांवर आयकर विभागाचे अधिकारी दाखल
● नरभक्षक वाघाचा धुमाकूळ:गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी, शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला
● डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण वाढल्यावर औरंगाबाद महापालिका सक्रीय, विविध झोनमध्ये स्वच्छता व औषध फवारणीसाठी विशेष मोहिम
● जोडप्याला संरक्षण नाहीच:मंदिरात प्रेम विवाह करून आलेल्या जोडप्यास संरक्षण देण्यास हायकोर्टाचा स्पष्ट नकार, विधी पूर्ण केल्यानंतरच विवाह वैध मानला जाईल! ग्वाल्हेर खंडपीठाचा निर्णय
● “मी एकवेळ इतर विचारधारांची तडजोड करू शकतो. पण आरएसएस आणि भाजपाच्या विचारधारेशी मी कधीही तडजोड करू शकत नाही”, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/6ICj5odJzjb
6 624
शिवद्रोही श्रीपाद छिंदमला पोलिसांकडून अटक; जाणून घ्या सविस्तर
LetsUpp | Ahmednagar
💁🏻♂️ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केलेले नगरचे माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय 36) यांना पुन्हा एकदा तोफखाना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
📍 अटक होण्यामागचे कारण? जाणून घ्या सविस्तर प्रकरण
▪️ शहरातील दिल्ली गेट परिसरात टपरी चालक भागीरथ भानुदास बोडखे याला जातीवाचक शिवीगाळ करून तसेच त्याच्या ज्युस सेंटर मधील साहित्य फेकून देऊन त्याच्या गल्यातील 30 हजार रुपये हिसकावून घेतले होते.
▪️ या आरोपावरून माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम आणि त्यांच्यासह इतर 30 ते 40 जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरी आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.
▪️ या प्रकरणात फरार असलेला श्रीपाद छिंदम याचा शोध पोलीस घेत असताना छिंदम मंगळवारी शहरामध्ये दाखल झाला असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली. त्यानुसार तोफखाना पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे.
▪️ तोफखाना ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी आम्ही या दोघांना अटक केली असून त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत आहोत. तसेच याप्रकरणातील दोन जणांना अटक पूर्व जामीन मिळाल्यामुळे त्यांची सुद्धा चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/bAYvb0Pizjb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp | Bulletin
● आता एका डोसमध्ये कोरोनापासून मिळेल संरक्षण; ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने स्पुटनिक लाईटला भारतामध्ये ट्रायल करण्याची दिली मंजूरी
● राज्यात भाजपचा एल्गार; जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
● ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधल्या मतदार याद्यांमधील घोळ उघडकीस आला असून, तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ उडाली आहे
● लसीचे दोन्ही डोस घेतले, तरीही मुंबईत 23 हजार जणांना कोरोनाची लागण; वृद्धांचा आकडा अधिक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली
● भारत सरकारने लागू केलेला आयटी कायदा हा व्यापक राजकीय धोरणाचा भाग; व्हॉट्सअॅपच्या सीईओचे मत
● दहशतवादी महाराष्ट्रात, मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचं एटीएस झोपलं होतं का भाजपा आमदार आशिष शेलार यांचा राज्य सरकारला सवाल
● 'जगात सगळ्यात सभ्य आणि सहिष्णू फक्त हिंदूच',भाजप-आरएसएस वरील वक्तव्यावर जावेद अख्तर यांचे रोखठोक मत
● गणेशोत्सवानंतर मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा धोका, मुंबई महापालिकेकडून चिंता व्यक्त
● केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंह थोडक्यात बचावल्या, पक्षी धडकल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लॅण्डिंग
● मुस्लिम व्यक्तीनं हिंदू स्त्रीसोबत केलेला दुसरा विवाह अवैध; गुवाहाटी उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/bsLYC3M9yjb
