LetsUpp Marathi
Kanalga Telegram’da o‘tish
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Ko'proq ko'rsatish6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
6 624
LetsUp I News Updates
🔸 नवी दिल्ली - युनिसेफने केलेल्या सर्वेक्षणातून बालविवाहांवर प्रतिबंध घालण्यात दक्षिण आशियात भारत आघाडीवर
🔸 नवी दिल्ली - आधार जोडणीची 31 मार्चपर्यंतच्या मुदतीत वाढ करण्याचे केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात संकेत
👌 'फ्लिपकार्ट'वर जबरदस्त ऑफर्स सुरु. ऑफर्स चा फायदा घेण्यासाठी क्लिक करा 👉 http://fkrt.it/PmgXZLuuuN
🔸 नवी दिल्ली - नागालँडच्या मुख्यमंत्रीपदावर नेफ्यू रियो, मेघालयच्या कोनराड संगमा तर त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदावर विप्लवकुमार देव
🔸 मॉस्को - रशियाच्या लष्कराचे मालवाहू विमान सिरियात कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 जण ठार झाले
🔸 मुंबई - सॅमसंगने गॅलक्सी S9 आणि S9 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात लाँच केले, किंमत 57,900 रुपयांपासून सुरु
🔸 मुंबई - जीएसटी कायदा बनल्यानंतर देशात पहिल्यांदाच या कायद्यान्वये दोघा व्यावसायिकांना अटक
🔸 मुंबई - यापुढे कोणत्याच महापालिकेला कचरा डेपोसाठी जमीन देणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
🔸 मुंबई - वीज चोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी गृहविभागाने राज्यातील 132 पोलीस ठाण्यांमध्ये परवानगी दिली
🔸 कोलंबो - निदाहस करंडक टी-20 तिरंगी मालिकेच्या सलामीच्या लढतीत यजमान श्रीलंकेकडून भारताचा पराभव
(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )
जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190
6 624
🚫 पाडव्यापासून राज्यात प्लॅस्टिकबंदी!
LetsUp I Updates
राज्यात येत्या गुढीपाडव्यापासून संपूर्ण प्लॅस्टिक तसेच थर्मोकोल व त्यापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील प्रारुप अधिसूचनेचा आराखडा तयार करण्यात आला असून तो शासनाच्या राजपत्रात लवकरच प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.
आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप. क्लिक करा 👉 https://goo.gl/k4uWHP
⚡
6 624
👉 ...तर भारताचा सीरिया होईल - श्री श्री रविशंकर
LetsUp I Updates
आयोध्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर भारताचा सीरिया होईल, असे खळबळजनक विधान आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप. क्लिक करा 👉 https://goo.gl/4jc4Ko
⚡
6 624
LetsUp I News Updates
🔅 आगरतळा - दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील लेनिनचा पुतळा भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडला
🔅 नवी दिल्ली - काश्मीरमधील सुंजवा लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुफ्ती वकासचा खात्मा
🔅 नवी दिल्ली - आयोध्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर भारताचा सीरिया होईल - आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर
🔅 नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील 21 पैकी 11 बँकांवर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध, आणखी पाच बँकांवर निर्बंध येण्याची शक्यता
🔅 पणजी - मनोहर पर्रिकरांकडून घरातून फाईल्स क्लिअर, उपचारांसाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता
🔅 मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन फॉर्म भरता न आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, 31 मार्चपर्यंत फॉर्म भरता येणार
🔅 मुंबई - राज्याचा पारा आणखी वाढणार, पुढील दोन ते तीन दिवस शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन
🔅 मुंबई - माजी वनमंत्री पतंगराव कदम यांना लीलावती रुग्णालयातील आयसीयू विभागात हलवले
🔅 श्रीलंका - टी-20 तिरंगी मालिकेला आजपासून सुरुवात, सलामीची लढत भारत आणि श्रीलंकेदरम्यान रंगणार
(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )
जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190
6 624
📥 फोटो डिलीट झालेत? मग नक्की वाचा...!
LetsUp I Updates
अनेकदा नकळत महत्वाचे फोटो डिलीट होत असतात. अशावेळी आपण परेशान होऊन जातो मात्र आता चिंता करू नका. कारण आम्ही आज अशा काही अॅप्सची नावे सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून डिलीट झालेले फोटो, व्हिडिओ तुम्ही पुन्हा मिळवू शकता.
👉 DiskDigger Photo Recovery
हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करू शकता. या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला डिलीट झालेले सर्व फोटो पुन्हा मिळवता येऊ शकतात.
👉 Restore Image (Super Easy)
हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुन मोफत डाऊनलोड करु शकता. याचे सर्व फीचर्स फ्री असून या अॅपच्या मदतीने तुम्ही डिलीट फोटो लगेच रिकव्हर करू शकता.
👉 Dumpster: Undelete & Restore Pictures and Videos
हे एक जबरदस्त अॅप असून याच्या माध्यमातून तुम्ही फोटो आणि व्हिडिओ दोन्ही रिकव्हर करु शकता. या अॅपच्या माध्यमातून अगदी कमी वेळात रिकव्हरीचे काम होऊन होते.
आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप. क्लिक करा 👉 https://goo.gl/Uvn6Zr
⚡
6 624
💥 फेसबुकचे नवीन फिचर; स्टेटस अपडेट होणार सोप्पे
LetsUp I Updates
फेसबुक सध्या भारतात 'अॅड व्हॉइस क्लिप' या नवीन फीचरची चाचणी घेत आहे. या नवीन फीचरमुळे युजरला छोटी ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करण्याची सुविधा मिळणार असून हे फीचर स्टेट्स अपडेटच्या मॅसेज कम्पोझिंग मेन्यूमध्ये दिसणार आहे. जगभरात टायपिंगमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन फेसबुकने या नवीन स्टेटस फीचरची निर्मिती केली आहे.
आता ब्रेकिंग न्यूज तुमच्या 'व्हॉट्सअॅप'वर, त्यासाठी जॉइन करा लेट्सअप. क्लिक करा 👉 https://goo.gl/VyhZYE
⚡
6 624
✌ भाजपाच्या त्रिपुरातील यशात 'मराठमोळा' हाथ
LetsUp I Updates
25 वर्षांपासूनची डाव्यांची सत्ता उलथवून टाकून त्रिपुरा हे ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य भाजपाने काबीज केले आहे. या विजयाचे शिल्पकार आहेत त्रिपुराचे भाजपचे प्रभारी 'मराठमोळे' सुनील देवधर. त्रिपुरामध्ये त्यांनी गेल्या 3 वर्षांपासून निवडणुकीची तयारी चालवली होती. गावागावात जाऊन त्यांनी भाजपचा प्रचार केला होता. त्यांच्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात...
👉 सुनील देवधर मूळचे रत्नागिरीतील गुहागरचे रहिवासी आहेत.
👉 त्यांचा जन्म पुण्यात झाला तर मुंबईत शिक्षण पूर्ण झालं.
👉 52 वर्षांचे देवधर अविवाहित आहेत.
👉 लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते राहिले आहेत.
👉 1991 साली देवधर संघाचे पूर्णवेळ प्रचारक झाले.
👉 1991 पासून 8 वर्षं त्यांनी मेघालयात काम केले.
👉 'माय होम इंडिया' या स्वयंसेवी संस्थेची त्यांनी स्थापना केली.
For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/Lwmhxd
⚡
6 624
🌧 वातावरण ढगाळ; पावसाची शक्यता?
LetsUp I Updates
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने आगामी काळात राज्यातील तापमानात बदल होणार असून कोकणातील काही भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/2xMUCR
💥
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - देशातील 68 टक्के जनतेवर एनडीएचे राज्य, तर यूपीएचे केवळ 8 टक्के जनतेवर राज्य
🔅 नवी दिल्ली - एप्रिल 2013 ते जून 2016 दरम्यान बँक कर्मचार्यांचा सहभाग असलेले 2450 कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस
🔅 नवी दिल्ली - व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाई कुआंग हे तीन दिवस भारत दौर्यावर, आण्विक ऊर्जा सह तीन करारांवर स्वाक्षरी
🔅 नवी दिल्ली - दिल्ली दूर आहे असा ईशान्येकडील जनतेचा समज होता पण दिल्ली स्वत: चालत ईशान्येच्या दरवाज्यापर्यंत गेली - पंतप्रधान
🔅 नवी दिल्ली - देशातल्या 10 सर्वाधिक तापलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्राची पाच शहरे, अकोला आणि चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमान
🔅 बीड - केज तालुक्यात बारावी गणित पेपरच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
🔅 मुंबई - एक एप्रिलपासून बेस्ट प्रवास महागणार, सहा किमीपासून पुढील अंतरासाठी 1 ते 12 रुपयांपर्यंत भाडेवाढ
🔅 मुंबई - अनुष्का शर्माचा हॉरर चित्रपट 'परी'ला पाकिस्तानात विरोध, काही दृश्यांवर पाक सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप
🔅 मुंबई - पहिल्यावहिल्या सांघिक स्नूकर वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 3-2 ने नमवून विजेतेपद पटकावले
(आता ब्रेकिंग न्यूज सोबत मिळवा माहिती आणि मनोरंजन तुमच्या WhatsApp वर त्यासाठी जॉईन करा LetsUp - डिजिटल मॅगेझीन, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/KGP2Ly )
जाहिरातीसाठी संपर्क : 7875190190
6 624
⚡ मोदी, चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट
PNB घोटाळा करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात विशेष PMLA न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच या दोघांची संपत्ती जप्त करण्याचा विचार युद्धपातळीवर सुरू आहे. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून ईडीने या दोघांचे नियंत्रण असलेल्या 41 स्थावर मालमत्तांवर टाच आणली आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🇺🇸 अमेरिका लावणार पोलादावर आयात शुल्क!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोलाद आणि अॅल्युमिनियमवर आयात शुल्क लावण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोर अमेरिका व्याज दरात वाढही करणार आहे.
या कारणामुळे अमेरिकेसह जागतिक शेअरबाजारात गेल्या दोन दिवसांपासून घसरण सुरू आहे. तसेच जागतिक पातळीवर व्यापारयुद्ध सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚡ Election Results – 2018
त्रिपुरा (60 जागांपैकी 59 जागांचे निकाल) :
👉 सीपीएम + : 18 I भाजप : 41 I काँग्रेस : 0 I अन्य : 0
नागालँड (60 जागा) :
👉 भाजप+ : 25 I NPF : 29 I काँग्रेस : 2 I अन्य : 4
मेघालय (60 जागा) :
👉 काँग्रेस : 18 I NPP : 19 I अन्य : 19 I भाजप - 3
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📣 बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे बारावीच्या विविध विषयांच्या तब्बल 80 लाख उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. यामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता आहे.
शिक्षक महासंघ आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात झालेल्या बैठकीत काही निर्णयांवर शासन आदेश काढण्यात आले. मात्र शिक्षक संघटनांनी महत्वाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🌧 यंदा सरासरी इतका पाऊस!
यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. ला नीनाच्या प्रभावामुळे मान्सूनची स्थिती सुधारली आहे.
शिवाय, पाऊसकाळ चांगला राहण्याची शक्यता वाढली आहे. ला नीनाची ही स्थिती मे महिन्यापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस जूनपर्यंत दाखल होईल आणि पाऊस चांगला होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्य भारतातील राज्यांची सत्ता कुणाला मिळणार याचा फैसला आज (शनिवार) होणार
● नवी दिल्ली - महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपकडून प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या तिघांची नावं निश्चित
● रायपूर - छत्तीसगडमध्ये कमांडरसह 10 नक्षली ठार, एक जवान शहीद, तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांनी केली संयुक्त कारवाई
● बेंगळूरू - ज्येष्ठ पत्रकार आणि समाजसेविका गौरी लंकेश हत्याप्रकरणी एकाला अटक
● मुंबई - पंजाब नॅशनल बँकेचे माजी चीफ ऑडिटर बिष्णुब्राता मिश्रा यांना 14 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
● मुंबई - यंदा राज्यात सरासरी इतका पाऊस पडणार, भारतीय हवामान खात्याने म्हणजेच आयएमडीने वर्तवला अंदाज
● मुंबई - कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकल्यामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षांचा निकाल लांबण्याची शक्यता
● मुंबई - मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रविवार, 4 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार
● मुंबई - देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) अनेक वर्षांपासून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत सुरू असलेली वजा गुणपद्धती बंद होणार
● नवी दिल्ली - आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू नवजोत कौरला सुवर्ण
● मुंबई - 'सोनू के टिट्टू की स्वीटी' चित्रपटाची बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई, भारतामध्ये 41 कोटींचा पल्ला गाठला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
💸 131 भारतीय अब्जाधीश...
हुरून ग्लोबलने जारी केलेल्या यादीनुसार जगातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत 131 भारतीय अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश असणाऱ्या देशात भारत तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. यात भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश केल्यास हा आकडा 171 च्या घरात जातो.
चीन 819 अब्जाधीशांसह अव्वलस्थानी असून त्यापाठोपाठ अमेरिकेचा (571 अब्जाधीश) नंबर लागतो. भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचे प्रमख मुकेश अंबानी (45 अब्ज) अव्वलस्थानी आहेत. लक्ष्मी मित्तल (1.17 लाख कोटी) दुसऱ्या स्थानावर आहेत. तर सनफार्माचे प्रमुख दिलीप सांघवी (96.2 हजार कोटी) तिसऱ्या स्थानावर आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📽 _*रजनी-नानाच्या 'काला' चा टीझर रिलीज*_
सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर यांचीही प्रमुख भूमिका आहे.
पी ए रंजीत यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात हुमा कुरेशी, संपथ राज, सयाजी शिंदे यासारखी स्टारकास्ट आहे.
टिझर पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/xdPWdR
------------------------
🧢 _*BnB रिंग कॅप (Pack of 4) खरेदी करा आणि वाढत्या उन्हापासून स्वतःला सुरक्षित ठेवा. फक्त 242/- रुपयांत हि अप्रतिम ऑफर फ्लिपकार्टवर खरेदी करण्यासाठी क्लिक करा*_ 👉 https://goo.gl/dfs8f5
------------------------
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💰 जीपीएफ सहज काढणं शक्य!
केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खूशखबर दिली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना सहजासहजी प्रॉव्हिडंट फंड अर्थात जीपीएफ काढता येणार आहे.
जीपीएफमधून सहजपणे पैसे काढण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीपीएफ ऑनलाईन नावाची सुविधा लाँच केली आहे. यानुसार जीपीएफ अकाऊंट एम्प्लॉई आयडीसोबत जोडण्यात येईल, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पैसे काढणे सोपं होईल.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🛰 आता चंद्रावरही मिळणार 4G
LetsUp I Updates
चंद्रावर पुढील वर्षांपर्यंत 4G नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे असे व्होडाफोन या ब्रिटिश टेलिकॉम कंपनीने म्हटले आहे. यात नोकिया कंपनीला तंत्रज्ञान भागीदार करण्यात आले असून या फोर जी सेवेसाठी लागणारे उपकरण नोकिया तयार करणार आहे.
For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/LAKJnZ
💥
6 624
👉 शिवस्मारकाचे काम तीन वर्षात पूर्ण होणार?
LetsUp I Updates
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जागतिक कीर्तीच्या स्मारकाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होणार आहे. या शिवस्मारकाचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एल अँड टी कंपनीला देण्यात आले. त्यानुसार तीन वर्षांत हे स्मारक पूर्ण होईल. यासाठी सुमारे अडीच हजार कोटी रूपये खर्च येणार आहे.
For Breaking News, Jobs & Infotainment on WhatsApp Join LetsUp. To Join Click 👉 https://goo.gl/kqpvN7
⚡
