uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Kanalga Telegram’da o‘tish

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Ko'proq ko'rsatish
6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
LetsUp News Updates ● नवी दिल्ली - ई-वाहनावर हिरव्या, खासगी वाहनावर पांढऱ्या आणि टॅक्सीवर पिवळ्या रंगात नंबर प्लेट लिहिता येतील : नितीन गडकरी ● नवी दिल्ली - अफगाणिस्तानात अपहरण झालेल्या भारतीयांपैकी 4 झारखंडचे; कुटुंबीयांनी भारत सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी केली ● नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद 10 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील सियाचिन बेस कॅम्पचा दौरा करणार, जवानांचीही भेट घेणार ● दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला; अफगाणिस्तान-तजाकिस्तान-पाकिस्तान पट्ट्यात 6.2 रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंप ● बंगळुरु - कर्नाटकात फ्लॅटमध्ये सापडली 9 हजार 746 बनावट ओळखपत्रे, भाजपने निवडणूक रद्द करण्याची केली मागणी ● मुंबई - राज्यात आज 1280 केंद्रावर होणार सीईटीची परीक्षा, अभियांत्रिकी, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी परीक्षा ● मुंबई - आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समीर भुजबळांना तूर्त जामीन नाही; 15 मे रोजी पुन्हा सुनावणी ● ओप्पो कंपनीने आपल्या एफ 7 या स्मार्टफोनची डायमंड ब्लॅक या रंगातील क्रिकेट लिमिटेड एडिशन भारतीय ग्राहकांसाठी केली सादर ● मुंबई इंडियन्सचा कोलकाता नाईट रायडर्सवर 102 धावांनी दणदणीत विजय, ईशान किशन ठरला सामनावीर ● मुंबई - बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या बहुप्रतिक्षित बकेट लिस्ट या मराठी सिनेमातील पहिले गाणे 'होऊन जाऊ द्या ' झाले प्रदर्शित For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ जाणून घ्या ‘अँड्रॉईड पी’ चे फिचर्स Letsup I Techno Update गुगलने आय/ओ परिषदेत अँड्रॉईड या ऑपरेटींग सिस्टीमची पी या नवीन आवृत्ती बाबत घोषणा केली. या प्रणालीच्या फीचर्सवर एक नजर टाकुयात... ▫ यात आयफोनप्रमाणे अतिशय सुलभ अशी नेव्हिगेशन प्रणाली देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत होम या बटनवर क्लिक करून एकाच ठिकाणी सर्व अ‍ॅप्स पाहणे शक्य आहे. ▫ यात स्वतंत्र डॅशबोर्ड देण्यात आला असून यात युजरने आपला स्मार्टफोन कितीदा अनलॉक केला? यातील कोणत्या अ‍ॅपचा कितीदा वापर केला? दिवसभरात किती नोटिफिकेशन्स आलेत? याची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी पाहता येईल. ▫ यात कोणत्याही अ‍ॅपचा दररोज नेमका किती वापर करावा? याची काल मर्यादा आखता येणार आहे. या मर्यादेनंतर ते अ‍ॅप आपोआप बंद होईल. यामुळे विशेष करून स्मार्टफोनवर तास-न-तास घालविणाऱ्या बालकांना शिस्त लावण्यासाठी हे फिचर उपयुक्त ठरू शकते. ▫ या प्रणालीत शुश हे स्वतंत्र फिचर देण्यात येणार आहे. यात कुणीही आपला स्मार्टफोनचा स्क्रीन आपल्या नजरेच्या विरूध्द बाजूस केल्यास डू नॉट डिस्टर्ब हे फिचर आपोआप सुरू होणार आहे. ▫ या प्रणालीतील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे अ‍ॅडाप्टीव्ह बॅटरी होय. यात कृत्रीम बुध्दीमत्ता आणि मशीन लर्नींगच्या मदतीने स्मार्टफोन युजरच्या दैनंदिन वापराचा पॅटर्न लक्षात घेतला जातो. यानंतर संबंधीत युजरच्या कोणत्या अ‍ॅपसाठी किती उर्जा लागणार असल्याचे त्याला सांगण्यात येते. ▫ या प्रणालीत अ‍ॅडाप्टीव्ह ब्राईटनेस ही सुविधादेखील देण्यात आली आहे. यात प्रत्येक युजरच्या दैनंदिन वापरावरून त्याची बॅटरी दीर्घ काळपर्यंत चालावी यासाठी सजेशन देणार आहे. ▫ या प्रणालीत अ‍ॅप अ‍ॅक्शन हे फिचर देण्यात आले असून याच्या मदतीने युजरने कोणतेही अ‍ॅप वापरण्यास प्रारंभ करताच त्याच्याशी संबंधीत बाबी आपोआप स्क्रीनवर येणार आहेत. तसेच याच्याच जोडीला स्लाईसेस हे फिचरदेखील दिले आहे. तर डेव्हलपर्ससाठी या फिचर्सचा आपापल्या अ‍ॅपमध्ये समावेश करण्यासाठी एमएल किटदेखील सादर केले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 आता सर्वच मराठीत, सरकारचा निर्णय! Letsup I Update राज्य सरकारने नवव्यांदा शासन निर्णय काढत, सरकारी कामकाजात मराठीचाच वापर करण्यास बजावले आहे. तसेच मराठी न वापरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. मंत्री, सचिव व अधिकाऱ्यांनी शेरे व अभिप्राय मराठीतच लिहणे आवश्यक असून आपल्याकडे येणारी सर्व प्रकरणे मराठीतूनच यावी, असा आग्रह त्यांनी धरावा. सरकारी कार्यालयातील सर्व पत्रव्यवहार मराठीतूनच करण्यात यावा. पत्रके, निमंत्रण पत्रिका, परवाने, नोंदवह्या, नियम पुस्तिका, सर्व प्रकारच्या टिपण्या, धोरणे, अधिसूचना, प्रारुप, बैठकांची कार्यवृत्ते मराठीतच असावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार ‘जीएसटी’, बँकांचा बिघडलेल्या ताळेबंदाचा भारतीय अर्थव्यवस्थेला फटका तसेच 2018 मध्ये भारताचा विकास दर 7.2 टक्के असेल ● नवी दिल्ली - कावेरी व्यवस्थापन योजनेसह कोर्टात हजर राहा, सर्वोच्च न्यायालयाची केंद्रीय सचिवाला सूचना ● नवी दिल्ली - रेल्वे विभागातील ईशान्येकडील 10 स्थानकांची जबाबदारी पूर्णपणे महिलांना सोपवली जाणार ● पाकिस्तान - नॅशनल ब्युरो ऑफ अकाउंटेबिलीटीने भारतात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या चौकशीचे दिले आदेश ● कॅलिफोर्निया - 'गुगल I/O 2018' परिषदेत होणार आर्टिफिशिल इंटेलिजन्स तंत्राच्या भविष्यासंदर्भातल्या अनेक घोषणा होण्याची शक्यता ● मुंबई - कर्जमाफीसाठी 2 लाख शेतकरी करणार जेल भरो, 14 मे रोजी राज्यव्यापी आंदोलन ● मुंबई - राज्यातील सर्वच 41 हजार 928 गावांचे, 98 हजार 356 वाड्यापाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे 1 कोटी 37 लाख 92 हजार घरांचे झाले विद्युतीकरण ● पुणे - पेपरफुटीची फेरपरीक्षा नाशिकपुरतीच, पुणे व नगरमधील विद्यार्थ्यांचा सुटकारा ● राजस्थान रॉयल्सचा पंजाबवर 15 धावांनी विजय; पंजाबच्या के.एल. राहुलची 95 धावांची नाबाद खेळी व्यर्थ, जोस बटलर ठरला सामनावीर ● टीम इंडियाची घोषणा, अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा, नायर, कुलदीपचं पुनरागमन For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🌏 पृथ्वीवर सूर्यावरचं वादळ धडकणार! Letsup I Update पृथ्वीला सोलर स्टॉर्म धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैज्ञानिकांच्या मते, सूर्याला एक कोरोनल होल होईल. ज्यामुळे सूर्यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर येईल. या दरम्यान ब्लॅकआउट सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. या दरम्यान उपग्रहाशी संबंधित सर्व सेवा जसे मोबईल, टीव्ही, जीपीएस सेवा देखील बंद होऊ शकते. याशिवाय रेडिएशनचा धोका देखील वर्तवला जातो आहे. नॅशनल ओशन अ‍ॅण्ड अॅटमॉस्फियर असोसिएशनचे म्हणणे आहे की, हा सोलर स्टॉर्म जी-1 कॅटेगरीचा आहे. म्हणजे या वादळाची तीव्रता कमी असेल. पण यामुळे देखील मोठं नुकसान होऊ शकते. जी-1 कॅटगरीमध्ये पावर ग्रिडवर सर्वाधिक प्रभाव पडेल. मायग्रेटरी बर्ड्सवर देखील याचा गंभीर परिणाम होईल. याचा सर्वाधिक प्रभाव यूएस आणि यूकेमध्ये पडण्याची शक्यता आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - भारतात गेल्या 6 वर्षांमध्ये दत्तक घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या मुलींची, हे प्रमाण 60 टक्के असल्याची सरकारी आकडेवारीवरुन माहिती समोर ● नवी दिल्ली - येत्या काही दिवसांत देशातील चलन टंचाई दूर होऊन सर्व व्यवहार सुरळीत होतील : सुभाष चंद्रा गर्ग, अर्थ सचिव ● नवी दिल्ली - कठुआ हत्याकांड प्रकरण पठाणकोटला हस्तांतरीत, बंद कॅमेऱ्यात रोज सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीवरील स्थगितीही मागे घेतली ● वॉशिंग्टन (अमेरिका) - अमेरिकेच्या हवाई राज्यातील किलाउआ ज्वालामुखीचा उद्रेक, ज्वालामुखीतून 200 फूट उंच लाव्हा उसळला ● राजस्थान - 33 पैकी 26 जिल्ह्यांना पुढचे दोन दिवस धुळीच्या वादळाचा धोका ● मुंबई - MPSC उमेदवारांना प्रोफाईल तातडीने आधार कार्डशी लिंक करावे लागणार, त्यासाठी 31 मेपर्यंतची मुदत ● मुंबई - कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा राज्य सरकारने काढला आदेश ● फेसबुकने आता ई-कॉमर्स मार्केटमध्येही एन्ट्री करण्याचे ठरवले, यासाठी फेसबुकने काही नामांकित ब्रँड्ससोबत केली चर्चा सुरु ● मुंबई - टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अफगानिस्तान विरुद्ध टेस्ट मॅच खेळणार, अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपद ● सनरायझर्स हैदराबादचा सनसनाटी विजय, बंगलोरवर पाच धावांनी मात, केन विल्यमसन ठरला सामनावीर For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📣 पेटीएमचे टॅप कार्ड ऑफलाईन वापरा! Letsup I Update पेटीएमने आता टॅप कार्ड सादर केले असून याचा वापर ऑफलाईन देखील करता येणार आहे. याची खासियत म्हणजे यामध्ये इंटरनेटविना म्हणजेच ऑफलाईन पध्दतीने व्यवहार केले जाणार आहेत. टॅप कार्डमध्ये निअर फिल्ड कम्युनिकेशन म्हणजेच एनएफसी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याच्या मदतीने अतिशय वेगवान आणि सुरक्षित पध्दतीने व्यवहार करणे शक्य आहे. कंपनीच्या पॉईंट ऑफ सेल म्हणजेच पीओएस मशिन्सवर याचा वापर करता येणार आहे. याच्या मदतीने कुणीही आपल्या पेटीएम अकाऊंटवरून पैशांना ऑफलाईन ट्रान्सफर करू शकतो. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎯 लवकरच आंतरजातीय विवाह कायदा Letsup I Update राज्यात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना "ऑनर किलींग' सारख्या प्रकारांपासून संरक्षण देण्यासाठी राज्य सरकार लकवरच एक कायदा करणार आहे. सामाजिक न्याय राज्य मंत्री राजकुमार बडोले यांनी याबाबत सांगितले. आंतरजातीय आणि आंतरधर्मिय जोडप्यांच्या अपत्यांना शुल्क माफीसारख्या विशेष सवलती सरकारच्यावतीने दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🌞 आजपासून अनुभवा ‘शून्य सावली’ दिवस Letsup I Update राज्यात आज सोमवारपासून टप्प्याटप्प्याने शून्य सावली दिवस अनुभवता येणार आहे. म्हणजे सूर्य आपल्या डोक्यावर असताना भरदुपारी 12 वाजल्यानंतर सावली गायब होणार आहे. वर्षातून दोनदा उद्भवणारी ही स्थिती संपूर्ण राज्यातील नागरिकांना 26 मेपर्यंत अनुभवता येणार आहे. 👉 जाणून घ्या आपल्या शहरातील शून्य सावली दिवस : 7 मे : कोल्हापूर, सांगली, मिरज I 10 मे : सातारा, अक्कलकोट I 11 मे : वाई, महाबळेश्वर I 12 मे : बार्शी, बारामती I 13 मे : लातूर I 14 मे : पुणे, दौंड, अलिबाग I 15 मे : मुंबई I 16 मे : नगर, कल्याण, नांदेड, ठाणे I 18 मे : पैठण I 19 मे : जालना I 20 मे : औरंगाबाद, नाशिक I 21 मे : मनमाड For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - देशातली 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधले हवामान आज सोमवारी खराब असणार, वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस आणि गारपीटीची शक्यता ● नवी दिल्ली - 2017-18 या आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीच्या जमा रकमेवर 8.55 टक्के व्याज मिळण्याची शक्यता ● नवी दिल्ली - सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 100 अॅपल आयफोन एक्स केले जप्त, प्रवाशाला अटक ● जम्मू-काश्मीर - दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले आहे, मात्र त्यांच्याकडून गोळीबार करण्यात येत आहे; शोपियान पोलिसांची माहिती ● काबुल - अफगाणिस्तानमध्ये सहा भारतीय अभियंत्यांचे अपहरण, यांच्यासोबत एका अफगाणिस्तानमधील व्यक्तीचाही समावेश ● अज्ञात हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे गृहमंत्री अहसान इक्बाल जखमी, द डॉन या वृत्तपत्राने दिले वृत्त ● मुंबई - वैद्यकीय कारणास्तव राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला ● जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर येथील न्यायालयात आज सुनावणी, शिक्षेला स्थगिती देण्याची सलमान खानची मागणी ● मुंबई - कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा 13 धावांनी शानदार विजय, किंग्ज इलेव्हन पंजाबचा राजस्थान रॉयल्सवर सहा गडी राखून विजय ● मुंबई - मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ईशाचं लग्न ठरले, पिरामल ग्रुपचे चेअरमन अजय पिरामल यांचा मुलगा आनंदसोबत तिचा विवाह होणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 रजनीकांतच्या घरी बॉम्ब लावण्याची धमकी! Letsup I Update ▪ तामिळनाडू पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या घरी बॉम्ब लावण्याची दिली धमकी ▪ फोन आल्यानंतर काही वेळासाठी खळबळ उडाली होती, मात्र यापूर्वीही अशाप्रकारे फोन आले असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली, प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💐 ज्येष्ठ गायक अरुण दाते यांचे निधन Letsup I Breaking ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते (85 वर्ष) यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांनी मुंबईतील कांजूरमार्ग येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. शुक्रतारा मंदवारा, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी यासारखी असंख्य गाणी अरुण दाते यांनी अजरामर केली होती. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🍽 भांड्यांचा येणारा वास दूर करण्यासाठी... Letsup I Kitchen Tips सर्वप्रथम किचनची स्वच्छता हा मुद्दा लक्षात घेतला तर भांडी स्वच्छ असणे आवश्यक आहे. कारण त्यातच आपण अन्न शिजवतो, साठवतो. पाणी भरतो, पितो. पण अनेकदा भांड्यांना येणारा वास काही केल्या जात नाही. भांडी घासल्यानंतरही तो कायम राहतो. मग अशावेळी काय करावे? खालील घरगुती उपाय नक्की ट्राय करा! 1) भांड्यांना येणारा माशांचा वास दूर करण्यासाठी लिंबाची साल भांड्यावर घासा आणि 20 मिनिटे भांडे तसेच ठेवा. त्यानंतर भांडे धुवा. 2) भांड्यांचा वास घालवण्यासाठी आधी भांडे साबणाने घासून स्वच्छ करा. त्यानंतर भांड्यात एक चमचा व्हिनेगर घालून ठेवून द्या. काही वेळाने पाण्याने भांडे धुवा. 3) भांडी संत्र्याच्या सालीने घासा. 30 मिनिटांनंतर लिक्विड सोपने धुवा. भांड्यांना येणारा वास दूर होईल. 4) मासे शिजवून झाल्यानंतर भांडे पाण्याने स्वच्छ करा आणि त्यानंतर सफरचंदाचे एक स्लाईस भांड्यावर घासा. यामुळे देखील भांड्यांना वास येणार नाही. 5) भांड्याचा वास दूर करण्यासाठी भांड्यात काही वेळ गरम पाणी घालून ठेवा. त्यानंतर लिक्विड सोपने घासा. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 माधुरीच्या 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर रिलीज Letsup I Videos 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितचा पहिला वहिला मराठी सिनेमा 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'बकेट लिस्ट- माझी, तुमची.. आपल्या सगळ्यांची' अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. हा सिनेमा 25 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/iKT7XP For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏏 IPL; विजयाने मुंबई संघाच्या आशा कायम! Letsup I IPL Updates कृणाल पांड्याच्या आक्रमक खेळीमुळे (12 चेंडूंत 31 धावा) मुंबई इंडियन्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर रोमहर्षक विजय मिळवला. त्यामुळे आता मुंबईला आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये धडक मारायची असेल, तर उर्वरित पाचही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. पहिल्या डावात पंजाबला 20 षटकांत सहा बाद 174 धावांचीच मजल मारता आली. मग पंजाबचे 175 धावांचे आव्हान घेऊन मुंबईकडून एविन लुईसचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी उत्तम धावगती राखली. त्यामुळे मुंबईला सहा चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजय साजरा करता आला. सलामीला येऊन 57 धावांची खेळी उभारुन मुंबईच्या विजयाचा पाया रचणाऱ्या सूर्यकुमार यादवला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्यासाठी जीएसटी समितीला विनंती केली : पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान ● नवी दिल्ली - साखरेवर सेस लावण्याचा निर्णय जीएसटी काऊन्सिलने टाळला ● स्टॉकहोम - सेक्स स्कँडलध्ये अडकल्यानंतर पुरस्कार प्रदान करणाऱ्या समितीने 2018 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार न देण्याचा घेतला निर्णय ● मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जामीन मंजूर, मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यास किमान एक आठवडा लागणार, सूत्रांची माहिती ● मुंबई - आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा विद्यार्थ्यांचे मेडिकलचे निम्मे शुल्क सरकार भरणार, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती ● मुंबई - राज्यात शहरांमधील 31 डिसेंबर 2015 पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना सशर्त संरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविषयीचा निकाल मुंबई हायकोर्टाने राखून ठेवला ● मुंबई - अण्णाभाऊ साठे महामंडळातील फाईल गहाळप्रकरणी महामंडळाचे महाव्यवस्थापक नागेश जुंबाडे निलंबित ● सोनी कंपनीने भारतीय बाजारपेठेत फोर-के रेझोल्युशन क्षमता असणाऱ्या स्मार्ट टिव्हींची नवीन मालिका केली सादर ● मुंबई इंडियन्सचा किंग्ज इलेव्हन पंजाबवर सहा विकेट्स राखून दणदणीत विजय, सूर्यकुमार यादव ठरला सामनावीर ● मुंबई - अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट'चा ट्रेलर प्रदर्शित For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 कसा आहे 102 Not Out? Letsup I Movie Review उमेश शुक्ला दिग्दर्शित अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर अभिनित 102 नॉट आऊट सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात अशा बाप- लेकांची कथा सांगण्यात आली आहे ज्यात वडील 102 वर्षांचे असतात तर मुलगा 75 वर्षांचा असतो. दोघंही वृद्धापकाळात असले तरी त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र फार वेगळा असतो. तो कसा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पहावा लागेल. हा सिनेमा गुजराती नाटकावर आधारित आहे. या नाटकाचे नावही 102 नॉट आऊट असेच होते. या सिनेमाचे दिग्दर्शन उमेश शुक्ला यांनी केले आहे. या सिनेमाचे लेखन सौम्या जोशी यांनी केले आहे. जर तुमचा मूड हलका-फुलका सिनेमा पाहायचा असेल तर 102 नॉट आऊट हा उत्तम पर्याय आहे. (रेटिंग : 3.5 / 5) या चित्रपटाची तिकिटे BookMyShow वर बुक करण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/AiJjhL For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 मराठीतलं भन्नाट आकपेला गाणं नक्की पहा! Letsup I Videos मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी एका भन्नाट आकपेला गाण्याची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे संगीत तोंडाच्या माध्यमातून दिले आहे. प्रत्यक्षात कोणत्याही संगीत उपकरणाचा यात वापर केला गेला नाही. मराठी चित्रपटातील जवळपास सर्वच कलाकार आणि अनेक गाणी गाण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. अमेय खोपकरची ही निर्मिती आहे. हे गाणं पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/st7FBK For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च 2018) देशातील सोन्याच्या मागणीत 12 टक्क्यांची घट ● नवी दिल्ली - कावेरी पाणी वाद, कर्नाटक सरकारने तामिळनाडूला चार टीएमसी पाणी द्यावे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, 8 मे रोजी होणार पुढील सुनावणी ___ 👌 तुम्ही लोन मिळवण्यास पात्र आहेत का? चेक करण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चेक करा, सोबत मिळवा PayTm कॅश 👉 https://goo.gl/bLAq8A ___ ● नवी दिल्ली - आगामी 48 तासांमध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागांना धुळीच्या आणखी एका वादळाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली ● लखनौ - 12 राज्यांत वादळी पाऊस; 130 जणांचा मृत्यू, 300 हून अधिक लोक जखमी, पिकांचे प्रचंड नुकसान ● मुंबई - न्यायालयीन कर्मचारी भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा, मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती उठवली, दिव्यांगाचा कोटा राखून भरती सुरू ठेवण्याचे आदेश ● मुंबई - केंद्र सरकारने औषधांच्या पाकिटांवर लाल रंगाच्या चौकटीत काळ्या ठळक शब्दांत रुग्णांसाठी सूचना छापणे केले बंधनकारक, या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून ● ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्यासंदर्भातले जारी केले प्रसिद्धी पत्रक ● आयडिया कंपनीने आपल्या फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्कचा विस्तार करत याचा सहा नवीन सर्कल्मध्ये प्रारंभ करण्यात आला ● कोलकाताचा चेन्नईवर 6 गडी राखून विजय, सुनील नारायण ठरला सामनावीर, चेन्नईने अव्वल स्थान गमावले ● मुंबई - बॉलिवूडचं सर्वात लाडकं जोडपं रणवीर- दीपिका नोव्हेंबरमध्ये विवाहबंधनात अडकणार अशा चर्चा सध्या सुरु For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📌 शिक्षणाची गुणवत्ता क्रमवार यादी 2017 Letsup I Statistics Update 1) स्वित्झर्लंड 2) सिंगापूर 3) फिनलंड 5) यू.एस. 16) जर्मनी 20) यूके 26) फ्रान्स 31) जपान 34) भारत 35) इंडोनेशिया 39) चीन 52) रशिया 54) सौदी 74) इराण 94) पाकिस्तान 99) तुर्की 102) मेक्सिको 106) दक्षिण आफ्रिका 119) ब्राझील 120) नायजेरिया 129) इजिप्त (WEF) शिक्षणाची गुणवत्ता क्रमवार यादी 2017 मध्ये भारताचा 34 वा क्रमांक लागतो. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup