uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Kanalga Telegram’da o‘tish

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Ko'proq ko'rsatish
6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
👉 Let's Up Status Katta 👉 ना जाने कितनी अनकही बातें साथ ले जाएंगे... लोग झूठ कहते हैं, कीं खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे। 👉 जमीर काँपता जरूर है, आप कुछ भी कहो जनाब, कभी गुनाह से पहले और कभी गुनाह के बाद। 👉 रूकता नही तमाशा रहता है खेल जारी उस पर कमाल देखिए दिखता नहीं मदारी 👉 गर अहसास बया हो जाते लफ्जों में... तो खामोशियों की तारीफ भला कौन करता...। (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 मुझे हादसों ने संवार कर मेरा रंग रूप बदल दिया... वो जो मिट गया कोई और था, जो बचा हूँ वो कोई और है...। 👉 अपने चेहरे से जो जाहिर है छुपायें कैसे तेरी मर्जी के मुताबिक नजर आयें कैसे? 👉 इंसानों की इस दुनिया में बस यही तो इक रोना है... जज्बात अपने हों तो ही जज्बात हैं, दूजों के हों तो खिलौना हैं...। 👉 सफर तो मुश्किल होना ही था उसूलों का वजन जो साथ है...। 👉 मैं वक्त बन जाऊं... तु बन जाना कोई लमहा... मैं तुझसे गुजर जाऊं... तु मुझमें गुजर जाना... 👉 उम्मीदें, ख्वाहिशें...जरूरतें...जिम्मेदारियां, बडा हुआ तबसे मैं कभी अकेला नहीं रहा। (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

केंद्रीय अर्थसंकल्प 2017 Let's Up Special Update नोटाबंदीनंतर देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देणे, तर दुसरीकडे आर्थिक विकासाला चालना देण्याचे आव्हान घेऊन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत 2017-18 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंतचे काही ठळक मुद्दे... 👉 उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक 👉 देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न: अरुण जेटली 👉 शेतीला पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, सोसायट्या आणि जिल्हा बँकांना कोअर बँकिंगने जोडणार 👉 टेक इंडिया हा सरकारचा आगामी काळातील अजेंडा 👉 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प 👉 पीक विम्यासाठी 9 हजार कोटी कर्ज देणार 👉 ग्रामविकाससाठी 3 लाख कोटी देणार 👉 2019 पर्यंत 50 लाख ग्राम पंचायती गरिबी मुक्त करणार 👉 डेअरी विकासासाठी 8 हजार कोटी 👉 प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 19 हजार कोटी 👉 2019 पर्यंत 1 कोटी घरं बांधणार, त्यासाठी 23 हजार कोटी रुपये 👉 1 मे 2018 पर्यंत सर्व गावात वीज पोहोचवणार 👉 मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी 👉 600 जिल्ह्यात युवा विकास केंद्र उभारणार 👉 तरुणांना ऑनालाईन शिक्षण देण्यासाठी ‘स्वयम’ योजना 👉 ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे 👉 1 कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य 👉 तीन वर्षात 20 हजार कोटी नाबार्डला देणार 👉 2019 पर्यंत 1 कोटी कुटुंबाना घरं देणार, दारिद्र्य रेषेच्या वर आणून त्यांचं जीवनमान उंचावण्याचं लक्ष्य, ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद 👉 2025 पर्यंत टीबी रोगाचा नायनाट करु 👉 डॉक्टर संख्या वाढविण्यासाठी प्रवेशाच्या जागा वाढवणार 👉 IIT, मेडिकल सह सर्व उच्च शैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी ‘राष्ट्रीय परीक्षा बोर्ड’ स्थापन करणार- जेटली 👉 झारखंड आणि गुजरातमध्ये दोन नव्या AIIMS स्थापन करण्याचा अर्थसंकल्पात प्रस्ताव 👉 संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटी (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 दलितांच्या कल्याणासाठी 52, 393 कोटी रुपयांची तरतूद 👉 देशाबाहेर रोजगाराच्या संधी शोधणा-या युवकांसाठी देशभरात कौशल्य केंद्र स्थापन करणार 👉 2022 पर्यंत 5 लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट 👉 जानेवारीपर्यंत विदेशी चलन 361 अब्ज डॉलर्स इतके होते जे 12 महिन्यांच्या गरजेसाठी पुरेसे आहे 👉 दूध प्रक्रिया उद्योगांसाठी 8 हजार कोटींची तरतूद 👉 गर्भवती महिलांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा करणार 👉 14 लाख अंगणवाडी सेंटर्समध्ये 500 कोटी रुपये खर्चून महिला शक्ती केंद्राची स्थापना करणार 👉 60 टक्के गावांमध्ये शौचालये उभारण्यात आली 👉 ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद 👉 ग्रामीण, शेती क्षेत्रासाठी एकूण 1लाख 87 हजार 223 कोटींची तरतूद, मागच्यावर्षीपेक्षा 24 टक्के जास्त तरतूद 👉 600 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र 👉 पारदर्शी व्यवहारांसाठी डिजिटल इकॉनॉमी 👉 वाहतूक क्षेत्रासाठी 2.41 लाख कोटींची तरतूद, भारत नेट प्रोजेक्टसाठी 10 हजार कोटींची तरतूद 👉 पयाभूत सुविधांसाठी 3.96 लाख कोटींची तरतूद 👉 ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार 👉 PPP मॉडेलनुसार छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार 👉 2014-15 पासून 1 लाख 40 हजार किमी लांबीचे रस्ते बांधले 👉 राष्ट्रीय महामार्गांसाठी 67 हजार कोटींची तरतूद 👉 2017-18 मध्ये 3500 किमीचे रेल्वे मार्ग उभारणार 👉 मेट्रो रेल्वेसाठी नवीन धोरण आणणार 👉 500 रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवणार 👉 IRCTCवरून ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही 👉 पाचवर्षात 1 लाख कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी उभारणार 👉 पर्यंटन व तीर्थयात्रांसाठी नवीन खास, गाड्या सुरू करण्यात येणार 👉 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट्सची सुविधा होणार उपलब्ध 👉 ऊस उत्पादनासाठी 9 हजार कोटींची तरतूद 👉 रेल्वे अर्थसंकल्प 1 लाख 31 हजार कोटींचा असणार, 55 हजार कोटी सरकार देणार 👉 मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा 5 हजारने वाढवणार 👉 दलितांच्या कल्याणासाठी 52,393 कोटी रुपये 👉 संरक्षण खात्याचं बजेट 2 लाख 74 हजार कोटी रूपये, सर्वाधिक बजेट असलेलं मंत्रालय 👉 सैनिकांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही 👉 21 लाख 47 हजार कोटींचं बजेट, 25 टक्के भांडवली खर्च 👉 ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ स्मार्ट कार्ड देणार 👉 आधार कार्डद्वारे आता खरेदी शक्य, डेबिड कार्डप्रमाणे वापर करता येणार 👉 2.44 लाख कोटींची कर्जाची योजना, या योजनेत एससी,

एनटी वर्गाला प्राधान्य 👉 भिम अॅप प्रोत्साहनासाठी कॅशबॅक आणि बक्षीस योजना 👉 छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार 👉 गावागावात महिला शक्ती केंद्र उभारणार 👉 सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 2 लाख 41 हजार 346 कोटींची तरतूद 👉 पायाभूत सुविधांसाठी आजवरची सर्वाधिक म्हणजेच 3 लाख 96 हजार कोटी रुपयांची तरतूद 👉 IRCTC चे शेअर्स आता विक्रीसाठी उपलब्ध होणार (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

केंद्रीय अर्थसंकल्प 2017 Let's Up Special Update नोटाबंदीनंतर देशभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व चलनटंचाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देणे, तर दुसरीकडे आर्थिक विकासाला चालना देण्याचे आव्हान घेऊन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज लोकसभेत 2017-18 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंतचे काही ठळक मुद्दे... 👉 उत्पादन क्षेत्रामध्ये भारताचा जगात सहावा क्रमांक 👉 देशातल्या प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न: अरुण जेटली 👉 शेतीला पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्था, सोसायट्या आणि जिल्हा बँकांना कोअर बँकिंगने जोडणार 👉 टेक इंडिया हा सरकारचा आगामी काळातील अजेंडा 👉 5 वर्षात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प 👉 पीक विम्यासाठी 9 हजार कोटी कर्ज देणार 👉 ग्रामविकाससाठी 3 लाख कोटी देणार 👉 2019 पर्यंत 50 लाख ग्राम पंचायती गरिबी मुक्त करणार 👉 डेअरी विकासासाठी 8 हजार कोटी 👉 प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी 19 हजार कोटी 👉 2019 पर्यंत 1 कोटी घरं बांधणार, त्यासाठी 23 हजार कोटी रुपये 👉 1 मे 2018 पर्यंत सर्व गावात वीज पोहोचवणार 👉 मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी 👉 600 जिल्ह्यात युवा विकास केंद्र उभारणार 👉 तरुणांना ऑनालाईन शिक्षण देण्यासाठी ‘स्वयम’ योजना 👉 ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे 👉 1 कोटी कुटुंब गरिबीमुक्त करणं हे सरकारचं लक्ष्य 👉 तीन वर्षात 20 हजार कोटी नाबार्डला देणार 👉 2019 पर्यंत 1 कोटी कुटुंबाना घरं देणार, दारिद्र्य रेषेच्या वर आणून त्यांचं जीवनमान उंचावण्याचं लक्ष्य, ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद 👉 2025 पर्यंत टीबी रोगाचा नायनाट करु 👉 डॉक्टर संख्या वाढविण्यासाठी प्रवेशाच्या जागा वाढवणार 👉 IIT, मेडिकल सह सर्व उच्च शैक्षणिक प्रवेश परीक्षा एकाच संस्थेकडून व्हाव्यात यासाठी ‘राष्ट्रीय परीक्षा बोर्ड’ स्थापन करणार- जेटली 👉 झारखंड आणि गुजरातमध्ये दोन नव्या AIIMS स्थापन करण्याचा अर्थसंकल्पात प्रस्ताव 👉 संकल्प प्रकल्पासाठी 4 हजार कोटी (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 दलितांच्या कल्याणासाठी 52, 393 कोटी रुपयांची तरतूद 👉 देशाबाहेर रोजगाराच्या संधी शोधणा-या युवकांसाठी देशभरात कौशल्य केंद्र स्थापन करणार 👉 2022 पर्यंत 5 लाख लोकांना रोजगारासाठी ट्रेनिंग देण्याचे उद्दिष्ट 👉 जानेवारीपर्यंत विदेशी चलन 361 अब्ज डॉलर्स इतके होते जे 12 महिन्यांच्या गरजेसाठी पुरेसे आहे 👉 दूध प्रक्रिया उद्योगांसाठी 8 हजार कोटींची तरतूद 👉 गर्भवती महिलांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा करणार 👉 14 लाख अंगणवाडी सेंटर्समध्ये 500 कोटी रुपये खर्चून महिला शक्ती केंद्राची स्थापना करणार 👉 60 टक्के गावांमध्ये शौचालये उभारण्यात आली 👉 ग्रामीण भागतील विजेसाठी 4500 कोटींची तरतूद 👉 ग्रामीण, शेती क्षेत्रासाठी एकूण 1लाख 87 हजार 223 कोटींची तरतूद, मागच्यावर्षीपेक्षा 24 टक्के जास्त तरतूद 👉 600 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कौशल्य विकास केंद्र 👉 पारदर्शी व्यवहारांसाठी डिजिटल इकॉनॉमी 👉 वाहतूक क्षेत्रासाठी 2.41 लाख कोटींची तरतूद, भारत नेट प्रोजेक्टसाठी 10 हजार कोटींची तरतूद 👉 पयाभूत सुविधांसाठी 3.96 लाख कोटींची तरतूद 👉 ज्येष्ठ नागरिकांसाठी LIC पॉलिसीवर 8% टक्क रिटर्न मिळणार 👉 PPP मॉडेलनुसार छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणार 👉 2014-15 पासून 1 लाख 40 हजार किमी लांबीचे रस्ते बांधले 👉 राष्ट्रीय महामार्गांसाठी 67 हजार कोटींची तरतूद 👉 2017-18 मध्ये 3500 किमीचे रेल्वे मार्ग उभारणार 👉 मेट्रो रेल्वेसाठी नवीन धोरण आणणार 👉 500 रेल्वे स्थानकावर सरकते जिने आणि लिफ्ट बसवणार 👉 IRCTCवरून ई-तिकीट बुक केल्यास सेवाकर लागणार नाही 👉 पाचवर्षात 1 लाख कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी उभारणार 👉 पर्यंटन व तीर्थयात्रांसाठी नवीन खास, गाड्या सुरू करण्यात येणार 👉 2019 पर्यंत सर्व रेल्वेमध्ये बायोटॉयलेट्सची सुविधा होणार उपलब्ध 👉 ऊस उत्पादनासाठी 9 हजार कोटींची तरतूद 👉 रेल्वे अर्थसंकल्प 1 लाख 31 हजार कोटींचा असणार, 55 हजार कोटी सरकार देणार 👉 मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएटच्या जागा 5 हजारने वाढवणार 👉 दलितांच्या कल्याणासाठी 52,393 कोटी रुपये 👉 संरक्षण खात्याचं बजेट 2 लाख 74 हजार कोटी रूपये, सर्वाधिक बजेट असलेलं मंत्रालय 👉 सैनिकांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही 👉 21 लाख 47 हजार कोटींचं बजेट, 25 टक्के भांडवली खर्च 👉 ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ स्मार्ट कार्ड देणार 👉 आधार कार्डद्वारे आता खरेदी शक्य, डेबिड कार्डप्रमाणे वापर करता येणार 👉 2.44 लाख कोटींची कर्जाची योजना, या योजनेत एससी,

तोंडाची दुर्गंधी? प्रभावी उपाय... Let's Up Health Katta अनेक लोकांसाठी तोंडाची दुर्गंधी खूप मोठी समस्या होऊन बसते. कारण अशा व्यक्तींच्या बाजूला कोणी उभे राहण्याची हिंमत दाखवत नाही. तसेच अशा व्यक्तींवर चारचौघांमध्ये लाजीरवाणे होण्याची वेळ ओढवू शकते. अशा प्रकारे लाजीरवाणे होण्याऐवजी यावर योग्यवेळी उपाय करणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे... 👉 बडीशेप एक उत्तम माऊथफ्रेशनर आहे. बडीशेपमुळे अधिक प्रमाणात लाळ निर्माण होते व जंतूंचा नाश होतो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. 👉 सकाळ-संध्याकाळ टूथब्रश व टूथपेस्टने दात साफ करा. शक्य असल्यास कांदा, लसुन, मासे, मीट असे पदार्थ रात्री खावे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 संत्री, लिंबू या फळांमुळे तुमच्या लाळग्रंथीला चालना मिळते व भरपूर लाळ निर्माण होते. लाळेतील अॅसीड घटकांमुळे तोंडातील मृतपेशी व अन्नघटक दूर होतात. 👉 प्रत्येक ऋतुमध्ये भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. रोज कमीत-कमी 8 ते 10 ग्लास पाणी अवश्य प्यावे. 👉 सकाळी पौष्टिक आहाराचे सेवन करावे. जास्त वेळ रिकाम्यापोटी राहणे टाळावे. 👉 तोंडाचा खुप वास येत असेल तर, लवंग अथवा तुळशीचे पान खावे. 👉 लवंगमुळे तोंडाचा दुर्गंध कमी होतो कारण तिच्यामध्ये अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असतात. तुम्ही कधीतरी एखादी लवंग नक्कीच चघळू शकता. 👉 दालचिनीमध्ये देखील अॅन्टीबॅक्टेरीयल घटक असल्यामुळे त्यामुळे तोंडाची दुर्गंध कमी होते. 👉 वेलचीला एक गोडसर व अॅरोमिक सुगंध येतो. त्यामुळे तुमच्या तोंडाला दुर्गंध येत असल्यास तोंडात वेलची ठेवा. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - इंडियन युनियन मुस्लीम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार ई अहमद यांचं निधन, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता 👉 नवी दिल्ली - जल्लिकट्टू या पारंपरिक खेळाला कायदेशीर परवानगी देणाऱ्या तामिळनाडू सरकारच्या कायद्यास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 👉 पंजाब - भटिंडा येथे काँग्रेसच्या प्रचार रॅली दरम्यान कारच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने तीन जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 न्यूयॉर्क - काळा पैसा पांढरा करण्याच्या रशियात केल्या गेलेल्या व्यवहारांबद्दल डॉएच्च बँक या बलाढ्य जर्मन बँकेला अमेरिका व ग्रेट ब्रिटन या दोन्ही देशांनी मिळून सुमारे 4,221 कोटी रुपये दंड ठोठावला 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत 19 विद्यमान नगरसेवकांचा समावेश 👉 लखनऊ - समाजवादी पक्षातील मोठे नेते शिवपाल यादव यांनी 11 मार्च रोजी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांनी करावयाच्या खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगातर्फे वाढवण्यात आली 👉 मुंबई - निवडणूक कामकाजात शिक्षकांच्या सहभागाला स्थगिती, ठाण्यातील विनाअनुदानित शाळा संघटनेच्या याचिकेनंतर मुंबई हायकोर्टाचा निर्णय 👉 मुंबई - मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या याचिकेवरील अंतिम सुनावणी 27 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता होणार - उच्च न्यायालय 🎯 खेळ घडामोडी : 👉 मुंबई - बांगलादेशविरोधातील कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, अजिंक्य रहाणे व रिद्धीमान साहाचं टीममध्ये पुनरागमन 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - शाहरूख खानला पडली मराठी चित्रपट इंडस्ट्रीची भुरळ, लवकरच मराठी सिनेमाची निर्मिती करणार असल्याची केली घोषणा (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 _*आर्थिक सर्व्हे सादर ; वेगाने विकास दर वाढणार*_ _*Let's Up Current Affair*_ अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देशाचा आर्थिक सर्व्हे सादर केला. यामध्ये विकास दर 2017-18 या वर्षामध्ये 6.75 ते 7.50 टक्के या दरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नोटाबंदीमुळे विकास दर सध्या मंदावला असला तरी याचा फायदा येत्या काळात वेगाने विकास दर वाढवण्यासाठी होईल. *जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/QZwXhe _*देशाचा आर्थिक सर्व्हे काय सांगतो?*_ 👉 गेल्यावर्षीच्या तुलनेत कृषीचा विकास दर वाढला. 👉 नोटाबंदीचा सर्वाधिक फटका रियल इस्टेट क्षेत्राला बसला. तसेच घरांच्या किंमती कमी होऊ शकतात. 👉 रियल इस्टेट क्षेत्राचे नोटाबंदीच्या काळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. 👉 कच्च्या तेलांच्या किंमती 65 डॉलर प्रती बॅलरपेक्षा जास्त वाढल्या तर जागतिक स्तरावर तेलांच्या किंमतीही वाढतात. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर अधिकचा बोजा पडू शकतो. 👉 नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलनकल्लोळ एप्रिलपर्यंत संपेल. 👉 2017-18 या आर्थिक वर्षात रोजगारांमध्ये वाढ होईल. 👉 यंदाच्या मान्सूनवर पुढील वर्षाची दिशा ठरेल. मात्र नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी मोठा त्रास सहन करावा लागला. आर्थिक सर्व्हे हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा अधिकृत अहवाल समजला जातो. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा सर्व्हे दोन्ही सभागृहात सादर केला जातो.आर्थिक सर्व्हे हा अर्थव्यवस्थेसाठी भविष्यातील योजना आणि रणनिती यांचा एक दृष्टीकोन समजला जातो. यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, रणनिती विस्ताराने सांगितली जाते. शिवाय देशाच्या विकास दराचा अंदाजही लावण्यात येतो. अर्थ मंत्रालयाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांसोबत आर्थिक तज्ञांच्या टीमकडून आर्थिक सर्व्हे केला जातो. ( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/QZwXhe । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आज वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वे संसदेत केला सादर, या आर्थिक सर्वेमधून नोटाबंदीचा प्रभाव देशाच्या आर्थिक विकासावर पडल्याचे अधोरेखित 👉 नवी दिल्ली - गेल्या वर्षी सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अतिशय धाडसी : राष्ट्रपती 👉 नवी दिल्ली - नजरचुकीने सीमारेषा ओलांडून पाकच्या हद्दीत शिरलेल्या चंदू चव्हाणवर पाकिस्तान लष्कराने केले अनन्वित अत्याचार, चंदूचा भाऊ भूषण चव्हाणने दिली माहिती 👉 नवी दिल्ली - बार्क इंडियाच्या अहवालानुसार 2016 मध्ये विविध वाहिन्यांवर पतंजलीच्या 11.4 लाख जाहिराती दाखवल्या गेल्या (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॉशिंग्टन - अमेरिकी संसदेत अमेरिकेतील भारतीय नोकरदारांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले एच वन बी सुधारणा विधेयक सादर 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे चित्ररथाद्वारे शहरात ठिकठिकाणी मतदार जागृती 👉 मुंबई - राजा आणि दादू (उद्धव ठाकरे) यांना एकत्र आणण्यासाठी मी बाळासाहेबांना शब्द दिला आहे. मी प्रयत्न करत राहणार : मनसे नेते बाळा नांदगावकर 👉 उल्हासनगर - उल्हासनगर महापालिका निवडणुक, युतीसोबत फारकत घेत रिपाइं आठवले गटाने शिवसेनेसोबत केली हातमिळवणी 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 ठाणे - स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी श्रीमती निर्मलाताई आठवले (ताई) यांचे दु:खद निधन, उद्या बुधवार दि. 1 फेब्रुवारीला 4 वाजता होणार अंत्यसंस्कार 👉 औरंगाबाद - औरंगाबादमध्ये चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण, आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, मोर्चेकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केला सौम्य लाठीचार्ज 👉 पुणे - मेडिकलच्या 'नेक्स्ट' परीक्षेला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राष्ट्रीय शाखेबरोबरच देशातील सर्व शाखा आणि मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा विरोध, उद्या निषेध नोंदवणार 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 27655.96, निफ्टी : 8561.30, सोने भाव : 28,750 (प्रतितोळा), चांदी : 41,883 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 मुंबई - ‘भीम’ अॅप ‘आधार’शी संलग्न, आता भीम अॅप यूजर्स आपला 12 डिजिट आधार कार्डचा नंबर वापरून डिजिटल व्यवहार करु शकतात 🎯 खेळ घडामोडी : 👉 सिडनी - श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व एरोन फिंचकडे 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - झी मराठीवरील अस्मिता मालिकेतून घराघरात पोहोचलेली मयुरी वाघ ही त्याच मालिकेतील तिच्या नवऱ्याची भूमिका साकारणारा पियुष रानडेसोबत अडकणार विवाहबंधनात (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 _*समस्या आणि घरगुती उपाय...*_ _*Let's Up Tips & Tricks*_ आरोग्याच्या कित्येक समस्यांवर तुम्ही घरगुती उपाय करून सहजगत्या मात करू शकतात. तज्ञांच्या मते घरगुती उपचारांचा शरीरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे हे उपाय करणे आधिक फायदेशीर असतात. अशाच काही समस्यांवर घरगुती उपाय पाहूयात... 👉 _*पुदिना*_ : पोटदुखी, शौचास साफ न होणे यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त पोटदुखीवेळी पुदिना तेल गुणकारी ठरते. जर्मनीमधील संशोधकांच्या अभ्यासानुसार तोंडातील फोडांवर आणि उष्णतेच्या उपचारासाठी पुदिन्याचा वापर करता येतो. यात असलेली किटाणू प्रतिरोधक शक्ती संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वाची ठरते. *जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM 👉 _*तेज पान*_ : किड्यांनी चावले असल्यास किंवा त्वचेवर झालेल्या आजारातील सूज कमी करण्यासाठी उपयुक्त तेज पत्त्यामध्ये जखम चिघळण्यास विरोध करणारे (अँटिसेप्टिक) गुणधर्म असल्याने प्राचीन काळापासून याचा वापर केला जातो. 👉 _*ओवा*_ : शरीरातील केमिकलची होणारी हानी टाळण्यासाठी ओवा मदत करतो. ओव्यात असणारे अँटिऑक्सिडेंटस विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी सहायक ठरतात. ओव्याचे तेल प्रतिकाररोधकासारखे असून तो स्टेफिलोकोकस नावाच्या जीवाणूंचा नाश करतो. एका अमेरिकन संशोधनानुसार ओव्यात सफरचंदपेक्षा 42 पट, बटाट्यापेक्षा 30 पट तर संत्र्यापेक्षा 12 पट जास्त अँटिऑक्सिडेंटस असतात. 👉 _*दालचिनी*_ : घसा दुखणे किंवा इतर समस्या दूर करण्याचे काम दालचिनी करते. दालचिनीत असणारे अँटिऑक्सिडेंटस घशात संसर्ग निर्माण करणार्‍या किटाणूंचा नाश करतात. त्याचप्रमाणे या भागातील पेशींना होणारा संसर्गाचा धोका कमी करतात. एक कप पाण्यात दालचिनी टाकून गरम करावे आणि या कोमट पाण्याने चुळा भराव्यात. 👉 _*तुळशीची पाने*_ : चहामध्ये तुळशीची काही पाने टाकावीत. ज्या व्यक्तींच्या तोंडाला चव लागत नाही त्यांनी नियमित हा प्रयोग करावा. 👉 _*तोंडातील फोडांवर उपाय*_ : खडीसाखर आणि कापूर वाटून तोंडातील फोडांवर लावावा. काही दिवसांत आराम मिळतो. 👉 _*काळ्यां डागांवर उपाय*_ : मेथीची पाने किंवा दाणे पाण्यात भिजवून वाटावीत आणि ही पेस्ट डागांवर लावावी. थोड्या वेळानंतर कोमट पाण्याने ते साफ करावे. ( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/XhZsJM । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 एकापेक्षा अधिक पॅन कार्डधारकांनो सावधान! Let's Up Current Affair सध्याच्या कर प्रणालीमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि करचोरी रोखण्यासाठी प्राप्तिकर विभागाची नागरिकांचे एकसारखे पत्ते, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल या सारख्या माहितीच्या आधारे एकापेक्षा अधिक पॅन कार्डधारकांवर नजर आहे. खासगी कंपनीच्या मदतीने अनेक पॅनकार्ड धारकांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. यासाठी मॅनेज्ड् सर्व्हिस प्रोव्हायडर (एमएसपी) ची मदत घेण्यात येईल. एमएसपी विश्लेषणासंबंधी माहिती, आकडेवारी गोळा करणार आहे आणि त्याचे विश्लेषण करण्यात येणार आहे. बँका, टपाल कार्यालये आणि अन्य स्त्रोतांच्या सहाय्याने आकडेवारी आणि बनावट माहिती गोळा करण्यात येईल. या माहितीच्या साहाय्याने घोटाळय़ांचा तपास लावता येईल आणि ही माहिती विभागाला देण्यात येईल. नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर रिटर्न, टीडीएस, कर भरणा या माहितीच्या आधारे पॅनकार्डधारकांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 अर्थसंकल्प ; महिलांची भागीदारी वाढली यंदाच्या अर्थसंकल्पात पूर्वीच्या तुलनेत यावेळी महिलांची भागीदारी वाढली आहे. अर्थसंकल्प तयार करण्याच्या प्रक्रियेत असलेल्या वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांमध्ये 41 टक्के या महिला आहेत. ज्यांच्याकडे एकूण अर्थसंकल्पाशी संबंधीत 52 टक्के काम सोपविण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध केंद्रीय मंत्रालय आणि विभागातील अतिरिक्त सचिव व संयुक्त सचिव स्तरावरील 34 सल्लागारांपैकी 14 महिला सल्लागार आहेत. या महिला अधिकारी अर्थसंकल्पाशी संबंधीत 52 टक्के कामकाज सांभाळत आहेत. केंद्रीय मंत्रालयातील महत्त्वाचे विभाग असलेल्या अर्थ, स्वास्थ आणि कुटुंब कल्याण, मानव संसाधन विकास आणि क्रीडा विभागाच्या अर्थ सल्लागारांनी या अर्थसंकल्पाच्या पूर्व प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. याशिवाय वाहतूक प्राधिकरण, शहरी विकास, रसायन आणि उर्वरक, कोसळा आणि खान, पोस्ट, सामाजिक न्याय, विज्ञान आणि औद्योगिक अनुसंसाधन मंत्रालय आदी विभागातील अधिकार्‍यांचाही अर्थसंकल्पात सहभाग आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

फेसबुकवर 'या' गोष्टी शेअर करू नका!... Let's Up Techno Katta फेसबुकवरून आपल्याला लोकांशी कनेक्ट होता येत असले तरी हे कनेक्शन तुम्हाला महागात पडू शकते. होय, सायबर क्राईमचे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रमाण लक्षात घेता फेसबुकवर माहिती शेअर करताना जागरूक राहणे आवश्यक आहे. विशेषतः फेसबुकवर खालील काही गोष्टी शेअर करू नका... 👉 फोन नंबर : प्रत्येकजण हा काहींना काही कामामुळे फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर आपला मोबाईल नंबर शेअर करत असतो. पण तुमच्या या मोबाईल नंबरचा देखील गैरवापर होऊ शकतो. 👉 डेट ऑफ बर्थ : तुमच्या जन्मदिनी तुम्हाला तुमच्या मित्रांनी विष करावं म्हणून सोशल मीडियावर तुमची जन्मतारीख महत्वाची असते. पण हीच जन्मतारीख तुमच्या फेसबुकवर उपलब्ध असेल तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचे फोटो : सोशल मीडियावर एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा फोटो असणे तुमच्या भविष्यावर परिणाम करू शकतं. त्यामुळे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचे फोटो फेसबुक किंवा इतर सोशल मीडियावर असतील तर आजच काढून टाका. 👉 लोकेशन : प्रवास करताना उत्साहाने आपण आपली लोकेशन शेअर करतो. परंतु आपली लोकेशन पाहून आपल्या घरी कोणी नसल्याचे संकेत नकळपणे आपण इतरांना देत असतो. याचा गैरफायदा घेणाऱ्यांमुळे तुमच्या घराची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. 👉 बॉस : तुमचा बॉस तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असणं तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतं. अशा अनेक गोष्टी झाल्या आहेत ज्यामुळे फेसबूक यूजर्सला त्यांचं मत शेअर केल्यानंतर जॉब गमवावा लागला आहे. त्यामुळे बॉसला फ्रेंडलिस्ट मध्ये ठेऊ नका. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

शेतकऱ्यांचा मित्र; गांडूळ Let's Up Agri गांडूळ हा ओलसर मातीत राहणारा, वलयांकीत, लांब शरीर असणारा, सरपटणारा प्राणी आहे. गांडूळ जैविक पदार्थांचे सुपिक मातीत रुपांतर करतो तसेच जमीन भुसभुशीत करतो त्यामुळे मातीत ऑक्सिजन खेळता राहतो. म्हणून गांडूळाला 'शेतकऱ्यांचा मित्र' असे सुद्धा म्हणतात. शेतक-यांच्या दृष्टीने गांडूळाचे महत्व 👉 इतर रासायनिक खतावर पूर्णतः अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल होते. 👉 जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. 👉 झाडांना, पिकांना पाणी देण्याचे प्रमाण कमी होत असल्याने मिळणारे उत्पादन जास्त व चांगल्या दर्जाचे असल्याने शेतमालाची चांगली किंमत येते. 👉 रासायनिक खताचा खर्च कमी आणि पिकाच्या निरोगी वाढीमुळे कीटकनाशकाच्या खर्चात बचत होते तसेच मजूर वर्गावर होणारा खर्च कमी होतो. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) मातीच्या दृष्टिने गांडूळाचे महत्व 👉 गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो 👉 गांडूळामुळे जमिनीची धूप कमी होते. 👉 गांडूळांच्या बिळांमुळे झाडांच्या मुळांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. 👉 जमिनीत पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते. 👉 जमिनीत हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते. 👉 बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. 👉 जमिनीचा सामू ( पी.एच.) योग्य पातळीत राखला जातो. 👉 गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद पालाश व इतर सूक्ष्मद्रव्ये झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. पर्यावरणाच्या दृष्टीने गांडूळाचे महत्व 👉 माती, खाद्य पदार्थ आणि जमिनीतील पाण्याच्या माध्यमाद्वारे होणारे प्रदुषण कमी होते. 👉 जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होते. 👉 पडीक जमिनीची धूप व क्षाराचे प्रमाण कमी होते. 👉 रोगराईचे प्रमाण कमी होऊन आरोग्य चांगले राहाते. 👉 कच-याच्या विल्हेवाटीने आरोग्यासंदर्भाचे प्रश्न कमी होतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 श्रीनगर - बुऱ्हाण वानीच्या एन्काउंटरनंतर उसळलेल्या हिंसेमुळे बंद करण्यात आलेली काश्मीर खोऱ्यातील प्रीपेड इंटरनेट सेवा आज रात्रीपासून पुन्हा सुरू झाली 👉 श्रीनगर - जम्‍मू काश्‍मीरमधील कुपवाडा जिल्‍ह्यात बर्फाखाली अडकलेल्‍या आणि त्यानंतर बाहेर काढण्यात आलेल्या 5 जवानांचा उपचारादम्‍यान मृत्यू 👉 नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज देशाचे आर्थिक सर्व्हेक्षण संसदेत सादर करणार 👉 मुंबई - वेश्या व्यवसायात सक्रीय असलेल्या सुमारे 200 वेबसाईड आतापर्यंत सायबर सेल व पोलिसांनी बंद केल्या - राज्य शासन (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 लाहोर - जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख आणि मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती 🎯 राजकीय घडामोडी : 👉 पणजी - महाराष्ट्रात भाजपाला समर्थन देण्यासंबंधी केलेले विधान हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत, यासाठी खेळलेली रणनीती होती - शरद पवार 👉 मुंबई - युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर गेलो होतो. लहान भाऊ म्हणून आम्ही युतीसाठी तयार आहोत, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची महिती 👉 सोलापूर - महानगरपालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 18 जणांचा समावेश 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात विराट मूक मोर्चे काढल्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करणार 👉 सांगली - मच्छील सेक्टरमधील हिमस्खलनात कवठे-महांकाळचे रामचंद्र माने, परभणीचे बालाजी आंबोरे आणि साताऱ्यातील गणेश ढवळे या तीन जवानांचा मृत्यू 👉 लातूर - येथील एमआयडीसीतील ऑईल मिलमध्ये अपघात, टाकी साफ करण्यासाठी उतरलेले 9 कर्मचारी बेशुद्ध 👉 नागपूर - जिल्ह्यातुन दरवर्षी 800 कुष्ठरोगींची भर, आरोग्य विभागाने राबविलेल्या तपासणी मोहिमेतून माहिती समोर 🎯 खेळ घडामोडी : 👉 नवी दिल्ली - बीसीसीआय संचालन समितीची जबाबदारी माजी नियंत्रक व महालेखाकार विनोद राय यांच्याकडे सोपविण्यात आली 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मनिला - फिलीपाईन्समध्ये झालेल्या 65 व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत फ्रान्सची आइरिस मितेने विजेती ठरली तर मिस हैती फर्स्ट रनरअप आणि मिस कोलंबिया सेकंड रनरअप ठरली (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

photo content

👉 स्वतःला बदलायचे आहे? Let's Up Think Katta ’सबकुछ खराब है’ म्हणत इतरांना नाव ठेवणं खूप सोपं असतं. पण त्याची जबाबदारी उचलून बदलाची सुरूवात करणं फार अवघडं आणि जो अशी सुरूवात करतो तो निश्‍चितच क्रांती करतो. आपल्या बाबतीतही असंच असतं. आपण जग बदलाची भाषा अगदी मस्तपैकी करतं. पण स्वतःला बदलायची भाषा आपल्या जीभेवर सहसा येत नाही. इथंच सगळं नडतं हो... जगाला बदलण्याची सुरूवात आपल्या स्वतःपासून होत असते हे आपल्या लक्षात येत नाही किंवा आपल्याला ते समजूनही घ्यायचं नसतं. पण स्वतःला बदलणं शक्य आहे. ते कसं? तर टी. क्यू. एम. वापरुन... आता टी. क्यू. एम. म्हणजे काय? तर ‘टोटल क्वॉलीटी मॅनेजमेंट’. जपानी विचार करण्याची पद्धत. ह्या पद्धतीमुळे जपानी क्वॉलीटी सगळया जगात सर्वोत्तम झाली. आपल्याकडेसुदधा बर्‍याच कंपन्या टी. क्यू. एम. वापरतात. टी. क्यू. एम. मध्ये बर्‍याच गोष्टी समाविष्ट होतात. जसे 5 एसः (सेपरेट, सॉट, शाईन, सिस्टमटाईज, स्टान्डरडाईज.); टी. पी. एम.; विश्‍लेषण पध्दती इ. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) टी. क्यू. एम. वापरुन आपण आपल्यात बदल घडवू शकतो. आपण सचिनचे उदाहरण पाहूयात. सचिनला रोज उशीरा ऑफीस व्हायचा. यामुळे सचिनला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. त्याने कितीही ठरवले तरी त्याला लवकर पोहाचणे शक्यच होत नसे. मग तो विचार करू लागला की, आपल्याला लेट का होतं? मग त्याच्या लक्षात आलं. आपल्याला छोट-छोट्या वस्तू ऐनवेळी सापडत नाही आणि त्या सापडण्यात बहुतेकवेळा आपल्याला लेट होतं. मग तो ठरवतो या सर्व वस्तू एकाच ठिकाणी ठेवायच्या. म्हणजे अडचण येणार नाही. मग तो प्रत्येक वस्तूंविषयी विचार करू लागला. आपण कोणती वस्तू कुठे ठेवतो? आणि ती कुठे ठेवली पाहिजे. म्हणजे ती वेळेवर सापडेल... सचिन सारखी आपलीही अशीच गंमत होत असते खूपवेळा... या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे ‘टी. क्यू. एम.‘ मधील का? का? ही विश्‍लेषण पध्दती. यात आपण स्वतःलाच काही प्रश्‍न विचारायचे. जसं की, मला उशीर का होतो? मी काय शोधत असतो. मी वस्तू का शोधतो? वस्तू कुठे असतात? वस्तू का सापडत नाही? काही मंडळी म्हणतील हे असले प्रश्‍न विचार करतं बसायला कुणाला वेळ आहे? तुमचं म्हणणं ही अगदी बरोबर. पण माणसा-माणसात फरक असतो. ज्यांना गोष्टी जागेवर ठेवण्याची सवय आहे. त्यांना उशीर होणारच नाही. गोष्टी जागेवर ठेवण्याची सवय अतिशय चांगली. पण ज्यांना गोष्टी जागेवर ठेवण्याची सवय नाही, त्यांचं काय? सवयही लागत नाही आणि आयुष्यभर नुसत्या शिव्याच खाव्या लागतात. आपण दुसर्‍याला खुप काही विचारत असतो. स्वतःला कधीच काही विचारत नाही. दुसर्‍याला विचारल्यामुळे आपल्याला बर्‍याच गोष्टी कळतात. स्वतःला विचारल्यामुळे आपल्यात बदल घडवता येतात. अशा तर्र्‍हेने मुळ कारणांचा विचार करुन, सचिनने म्हटले तर साध्या, म्हटले तर कठीण अशा समस्येवर तोडगा काढला. आपणही जर स्वतःस का? असा सवाल विचारत गेलो तर, आपल्याला भेडसावणार्‍या समस्यांचे उत्तर शोधु शकतो. समस्या ही वैयक्तिक, कंपनीची, तांत्रिक असो किंवा नवी अथवा जुनी असो,का असा सवाल विचारत गेल्यास आपल्याला उत्तर मिळते. अशा छोटया गोष्टी मोठा फरक घडवुन आणतात. आपल्याला सुद्धा असा बदल घडवायचा असल्यास आपल्या वागण्याचा आढावा घ्या. उत्तर त्यातच मिळेल... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली- 1 फेब्रुवारीनंतर एटीएममधून कॅश काढण्याची मर्यादा पूर्णतः हटवण्यात येणार - RBI 👉 नवी दिल्ली - यंदा अर्थसंकल्पात सेवा करात होणार वाढ, सध्या 15 टक्के दराने आकारला जाणारा सेवा कर जवळपास 16 ते 18 टक्क्यांपर्यंत वाढणार 👉 नवी दिल्ली - कोणत्याही मुद्द्यांवर मतभेद असले तरीही संसदेचे कामकाज चालू रहावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वपक्षीयांना विनंती 👉 नवी दिल्ली - यंदा अर्थसंकल्पात रेल्वेच्या सवलती घेताना आधार क्रमांक बंधनकारक करण्याची घोषणा होण्याची शक्यता 👉 नवी दिल्ली - 31 डिसेंबरच्या संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणाला देशातील हिंदी न्यूज चॅनलच्या इतिहासतला सर्वाधिक टीआरपी मिळाला 👉 नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूचा जामीन अर्ज फेटाळून लावतानाच याचिका केल्याप्रकरणी 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावला 👉 पंजाब - लुधियाना येथे पोलिसांनी जप्त केली 70 लाख रुपयांची रोकड, या रकमेत 20,50,100, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : न्यूयॉर्क - येत्या 5 वर्षांमध्ये आम्ही 10,000 निर्वासितांना नोकरी देऊन ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध करणार आहोत : स्टारबक्स 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - पारदर्शकतेच्या मुद्द्यावर युती तोडल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा आहे, शिवसेनेचे आमदार अनिल परब यांचा प्रतिदावा 👉 कोल्हापूर - मुंबईत भाजपचाच महापौर असेल, 115 जागा भाजप जिंकणारच. सरकारला युती तुटल्याचा धोका नाही आणि शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता नाही : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 ठाणे - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा 3 मार्च रोजी जबाब नोंदवणार, महात्मा गांधींच्या हत्येमागे संघ असल्याच्या वक्तव्याप्रकरणी कोर्टात सुनावणी 👉 औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे चक्का जाम आंदोलनाचे मंगळवारी आयोजन, रास्ता रोको केल्यास गुन्हा दाखल करू, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा 👉 पुणे - पुण्यातील हिंजवडीमध्ये इन्फोसिस कंपनीतील अभियंता तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला (बाबेन सैकिया) केली अटक 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 27849.56, निफ्टी : 8632.75, सोने भाव : 28,390 (प्रतितोळा), चांदी : 41,401 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 नवी दिल्ली - फ्लिपकार्टवर आज पुन्हा रेडमी नोट 4 ची विक्री करण्यात आली, मात्र हा फोन थोड्याच वेळात आऊट ऑफ स्टॉक झाला 🎯 खेळ घडामोडी : 👉 नवी दिल्ली - क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्ये पुढच्या 3 ऑलिम्पिकसाठी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आणि पुलेला गोपीचंद यांचा समावेश 👉 नवी दिल्ली - बीसीसीआयमध्ये नव्या प्रशासकांची नेमणूक, कॅगचे माजी प्रमुख विनोद राय बीसीसीआयच्या अध्यक्षपदी, रामचंद्र गुहा, विक्रम लिमये, महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार डायना एडएलजी यांची प्रशासकपदी नेमणूक 👉 नागपूर - भारताविरुद्धच्या टी- 20 सामन्यात पंचांच्या ढिसाळ निर्णयाचा फटका बसल्याने इंग्लंडचा संघ अंपायर शमशुद्दीन यांची तक्रार करण्याच्या तयारीत 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - बॉक्स ऑफिसवर हृतिक आणि यामीच्या काबिल चित्रपटाचा गल्ला 70 कोटींच्या घरात (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

ब्रेकिंग न्यूज वोडाफोन आयडियामध्ये विलीन होणार... देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या एकत्र येण्याबाबत हालचाली सुरु आहे. वोडाफोन टेलिकॉम कंपनी आयडिया कंपनीत विलीन होण्याबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. आदित्य विक्रम बिर्ला ग्रुपमध्ये विलीन होण्याच्या वृत्ताला वोडाफोन इंडियाने दुजोरा दिला आहे. वोडाफोनच्या इंदूज् टॉवर्समधील 42 शेअर्ससोडून बाकी सर्व शेअर्स वोडाफोनने आडियात विलीन केले आहेत, असे वोडाफोन कंपनीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 _*अंगठा लावा पैसे काढा*_ _*Let's Up Current Affair*_ एटीएममधून पैसे काढण्यासाठी पासवर्डची आवश्यकता असते. पण आता त्याची आवश्यकता भासणार नसून तुम्हाला थेट पैसे मिळणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डचा वापर होईल. मात्र, पासवर्डऐवजी तुमच्या अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. ही सुविधा सुरू करण्यासाठी बँकांकडून खातेदारांचे आधार नंबर लिंक काम सुरू करण्यात आले असून पुढील काही महिन्यांतच तुम्हाला विना पिन किंवा पासवर्ड पैसे मिळणार आहेत. सध्या एटीएमचा पिन किंवा पासवर्ड नंबर चोरून खात्यातील पैसे काढण्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. यासाठी एटीएम मशीनला बायोमेट्रिक उपकरण बसविण्यात येणार आहे. त्यामुळे एटीएममधून पैसे चोरी होण्याच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 _*इराणमध्ये अमेरिकन्सवर बंदी*_ नव्या व्हिसा पॉलिसीच्या आदेशावर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. विदेशी दहशतवाद्यांच्या अमेरिकेतील प्रवेशापासून देशाची सुरक्षा असे या आदेशाचे नाव आहे. या आदेशानुसार इराण, इराक, सुदान, सिरिया, लिबिया, सोमालिया आणि येमेन या देशांतील नागरिकांना 30 दिवसांपर्यंत अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही. अमेरिकेच्या या कारवाईला उत्तर म्हणून इराणनेही अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेशबंदी केली आहे. इराणवर अमेरिकेद्वारे घालण्यात आलेली बंदी जोपर्यंत हटवण्यात येत नाही, तोपर्यंत अमेरिकेच्या नागरिकांना इराणमध्ये प्रवेश देणार नाही अशी भूमिका इराणच्या परराष्ट्रमंत्रालयाने स्पष्ट केली. 👉 _*शास्त्रज्ञांना यश ; नव्या जीवाला जन्म*_ सॅन डियागो येथील साल्क इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल स्टडीज आणि स्पेनच्या कॅथलिक युनिव्हर्सिटी ऑफ मुरिकाच्या संशोधकांनी एक अनोखा प्रयोग केला आहे. माणूस आणि डुकराचे मिश्रण असलेल्या एका नव्या जीवाला जन्म देण्यात या शास्त्रज्ञांना यश आले आहे. मनुष्याच्या पेशी कमी प्रमाणात असलेला भ्रूण त्यांनी प्रयोगशाळेत वाढवला आणि नंतर त्याला नष्टही केले. या तंत्रामुळे डुकर किंवा तत्सम प्राण्यात मानवी अवयव विकसित करता येणार आहेत. त्यातून प्रत्यारोपणासाठी अवयव मिळतील, असा अंदाज आहे. मात्र डुकराच्या भ्रूणात मोठ्या संख्येने मानवी डीएनए टाकण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे मानवी चेहरा असलेले डुक्कर जन्मास येऊ शकतात किंवा डुकरात आढळणारे विषाणू मनुष्यांतही प्रवेश करतील, अशी चिंता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्‍ली - ‘इतर पक्षांकडून पैसे घ्‍या पण मतदान आपला करा’ या वादग्रस्‍त वक्‍तव्यामुळे अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात निवडणूक आयोगाचे एफआयआर दाखल करण्याचे आदेश 👉 पश्चिम बंगाल - बर्दवान जिल्ह्यात पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याप्रकरणी राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्यासोबत 11 जण अटकेत 👉 पानीपत - आरक्षणासहित अन्‍य सहा मागण्‍यांसाठी हरियाणात जाट आंदोलन सुरु, हे जाट आरक्षण संघर्ष समिती यशपाल मलिक गटाच्‍यावतीने करण्‍यात येत आहे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 न्यूयॉर्क - सात मुस्लीम देशांतून स्थलांतर करणाऱ्यांवर अमेरिकेतील प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेतच निदर्शने 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करण्यासाठी इच्छुक असल्याचा निरोप घेऊन मनसे नेते बाळा नांदगावकरांनी गाठली मातोश्री 👉 मुंबई - मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते व गुरूदास कामत गटाचे देवेंद्र आंबेरकर यांचा शिवसेनेत प्रवेश, काँग्रेसला धक्का 👉 मुंबई - मुंबई महापालिकेसाठी भाजपची पहिली यादी 1 फेब्रुवारीला तर दुसरी यादी 3 फेब्रुवारीला, भाजप दोन टप्प्यात यादी जाहीर करणार 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - राज्यातील सर्व चेकपोस्ट होणार हायटेक, राज्यातील सर्व चेकपोस्टवर वाहनांच्या तपासणीसाठी संगणकीकृत पद्धत अवलंबली जाणार 👉 मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त व गृहरक्षक दलाचे महासमादेशक राकेश मारिया उद्या होणार सेवानिवृत्त, त्यामुळे महासंचालक दर्जाची दोन पदे राहणार रिक्त 👉 मुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 'कृष्णा' या 18 वर्षीय मादी बिबट्याचे वय झाल्याने निधन, गेले दोन दिवस होती अत्यवस्थ 🎯 खेळ घडामोडी : 👉 नागपूर - येथील भारत वि. इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या T-20 सामन्यात भारताचा इंग्लंडवर 5 धावांनी रोमहर्षक विजय 👉 मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या अंतिम सामन्यात राफेल नदालचा 6-4, 3-6, 6-1, 3-6, 6-3 अशा सेटमध्ये पराभव करत रॉजर फेडरर विजयी 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - मनवीर गुर्जर ठरला 'बिग बॉस 10' चा विजेता, बक्षिसामधील रक्कमेतील 20 लाख रुपये सलमानच्या 'बीइंग हयुमन' या सामाजिक संस्थेला केले दान (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 _*लठ्ठपणा का वाढतो?*_ _*Let's Up Think Katta*_ हल्ली जीवनशैली बदलीय, धावपळ वाढलीय. सुख-सुविधा आल्या पण नको-नको त्या समस्यांनी आपल्यापैकी कित्येकांना हैराण करून सोडलंय. त्यापैकीच एक समस्या म्हणजे लठ्ठपणा. पण लठ्ठपणा का वाढतो? त्याची काही कारणे पाहूयात... 👉 लठ्ठपणासाठी सर्वात जास्त जबाबदार खाण्या-पिण्याच्या सवयी असतात. जर तुम्ही बेसुमार मिष्ठान्न, तुप, फास्टफुड खात असाल तर लठ्ठुणाला सामोरं जावं लागेल. आपल्या आहारात जास्त फॅटस्युक्त पदार्थ नसावे, याची काळजी तुम्हालांच घ्यायचीय. कारण त्यात कॅलरीची संख्या खूप कमी असते. त्यामुळं ते टाळल्यानं शरीर स्वस्थ आणि लठ्ठपणा विरहीत राहील. जेवताना ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा. *जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM 👉 जेव्हा आपण झोपता, तेव्हा नॅचरली आपल्या शरीरातून चरबी कमी होते. मात्र पोटभर जेवून झोपल्यानं असं घडू शकत नाही. अनेक जण रात्री खूप उशिरानं जेवतात, ज्यामुळं त्यांना पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. सोबतच लठ्ठपणा ही समस्याही निर्माण होते. जर तुम्ही योग्य वेळी जेवणाची सवय लावाल, तर लठ्ठपणा कमी करण्यात मदत होईल. सोबतच रात्री जेवण कमी करावं आणि फळं खावीत. याशिवाय जेवल्यानंतर लगेच झोपू नये. कारण असं केल्यानं जेवण पचत नाही. आपल्या जेवणार्‍या आणि झोपण्याच्यामध्ये कमीत कमी 3 तासांचं अंतर असावं. 👉 जेव्हा आपण घरी किंवा बाहेर जेवता तेव्हा जेवतांना आपल्या ताटाच्या आकाराकडे विशेष लक्ष द्यावं. एका सर्व्हेनुसार जे लोक जेवणासाठी मोठं ताट घेतात, त्यात भरपूर पदार्थ वाढून घेतात. त्यामुळं आपल्या शरीराच्या गरजेपेक्षा जास्त जेवण जेवल्या जातं. जर तुम्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर नेहमी छोट्या प्लेटमध्येच जेवा. यामुळं तुम्ही तुमची ओव्हर इटिंगची सवय बंद करू शकाल. 👉 आपण नेहमी बघितलं असेल की, जेव्हा आपल्या खूप क्रोध येतो किंवा आपण तणावात असाल तर तुम्ही जास्त जेवू लागता. त्यावेळी जेवण चांगलं तर लागत नाही मात्र मनाला शांत करण्यासाठी आणि आणखी काही विचार करण्यासाठी तुम्ही खूप जेवता. त्यामुळं हळुहळु चरबी जमा होत जाते. क्रोध आणि तणाव असतांना जास्त जेवण करणं टाळायचं असेल तर पाणी प्या. आपल्या मित्रांसोबत गप्पा मारा आणि आराम करा. त्याशिवाय इतर कोणत्याही अ‍‍ॅक्टिव्हिटी आपण करू शकता. ज्यामुळं तुम्ही भावूक असतांना एक्स्ट्रा कॅलरीज घेण्यापासून वाचू शकता. 👉 जर आपण दररोज सोडा पित असाल तर सावधान, कारण त्याच्या सेवनानं लठ्ठपणा वाढू शकतो. संशोधनकर्त्यांनुसार दररोज सोडा पिल्यानं लठ्ठपणा जोमानं वाढतो. तर आठवड्यात एक वेळा सोडा पिल्यानं प्रकृतीवर जास्त परिणाम होत नाही. खूप जणांना वाटतं की, डायट सोड्यात कमी कॅलरीज असतात. मात्र या कॅलरीजसुद्धा प्रकृतीसाठी हानिकारक असतात. त्यात साखरेचं प्रमाण अधिक असतं म्हणून जेवतांना सोडा पिणं टाळावं. जर तुम्हाला जेवतांना काही ड्रिंक प्यायचंच असेल तर फळांचा ज्यूस प्या. वरील सर्व कारणांचा विचार करून जर योग्य कृती केली तर आपण लठ्ठपणाला नक्कीच बाय-बाय करू शकतो… ( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/XhZsJM । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)