LetsUpp Marathi
Kanalga Telegram’da o‘tish
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Ko'proq ko'rsatish6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
6 624
🏦 RTGS आणि NEFT च्या वेळेत बदल
LetsUp | National
⚡ ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, RTGS आणि NEFT च्या वेळांमध्ये बदल
💁♂ सकाळी 8 वाजता सुरु होणारे हे व्यवहार आता नव्या नियमानुसार सकाळी 7 वाजता सुरू होणार
🗓 या महिन्यातील 26 तारखेपासून या व्यवहाराची वेळ बदलली जाणार आहे
💫 आरबीआयने ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या वेळांमध्ये हा बदल केल्याने ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार
🧐 RTGS आणि NEFT म्हणजे :
1) RTGS : रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट असे या प्रणालीचे नाव आहे. मोठी रक्कम पाठविण्यासाठी किंवा मिळविण्यासाठी याचा उपयोग केला जातो. यात कमीत-कमी 2 लाख तर जास्तीत जास्त कितीही रक्कम पाठवता येते.
2) NEFT : नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असे या प्रणालीचे नाव आहे. या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात. या व्यवहारांमध्ये 2 लाखांपर्यंत रुपये पाठवता येतात.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🤔 तुम्हाला माहित आहे का?
LetsUp | Do U Know
1. ICC पुरस्कार हा क्रिकेटचा ऑस्कर पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
2. "बॉक्सिंग डे" कसोटी सामना नेहमी ऑस्ट्रेलियात खेळला जातो.
3. चेतन शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू होता ज्याने आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅचमध्ये 'हॅट-ट्रिक' घेतली होती.
4. क्रिकेटशी संबंधित एक प्रसिद्ध पुस्तक केट माय स्टाइल' चे लेखक कपिल देव आहेत.
5. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या आत्मकथेचे नाव 'गोल' आहे.
6. भारतात फ्लाइंग सिख म्हणून मिल्खा सिंह यांना ओळखले जाते.
7. सी. के. नायडू हे भारताचे पहिले कसोटी क्रिकेट कर्णधार होते.
8. क्रिकेटमधील बॅटची कमाल मर्यादा 38 इंच इतकी आहे.
9. क्रिकेटमधील स्टम्पची उंची 27 इंच इतकी असते.
10. फुटबॉलमध्ये गोल पोस्टची रुंदी 7.32 मीटर इतकी असते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 प्रतिक्षा संपणार! येतंय पहिलं राफेल
LetsUp | Update
🎯 बहुचर्चित 'राफेल' विमानांसाठी भारतीय वायूदलाची प्रतिक्षा लवकरच संपुष्टात येणार
✔ येत्या 20 सप्टेंबरला फ्रान्सकडून भारताला पहिले राफेल विमान मिळणार, यामुळे वायूदलाची ताकद वाढणार
👍 हे विमान घेण्यासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि हवाईदलप्रमुख बी.एस. धानोआ फ्रान्सला जाणार
🤝 हे विमान चालवण्यासाठी भारतीय वायदूलातील 24 वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार
🗓 हे प्रशिक्षण मे महिन्यापर्यंत संपेल. यानंतर भारताला मिळालेली राफेल विमाने आकाशात उड्डाण करतील
💫 वायूदलाच्या अंबाला आणि हाशिमारा या तळांवर राफेल विमानांचा प्रत्येकी एक स्क्वाड्रन तैनात असेल
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Updates
● INX घोटाळा : अखेर माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अटक, आज (दि.22) न्यायालयात हजर करणार
● SBI देशभर 10 लाख योनो कॅश पॉईंट लावणार, येत्या 18 महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार
● भारताने 8,589 मीटर उंच कांचनगंगासह हिमालयातील 137 शिखरे परदेशी गिर्यारोहकांसाठी केली खुली
● अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणाऱ्या लष्कराच्या मुख्यालयाची पुनर्रचना करण्यास संरक्षणंमंत्र्यांची मंजुरी
● राफेल विमानासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि वायुदलाचे प्रमुख बीएस धनोआ फ्रान्सला जाणार
● कोहिनूर प्रकरण : राज ठाकरे आज (दि.22) सकाळी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार
● गूगलने सादर केले गो सर्च अॅप, यातून एखादा मजकूर वाचता किंवा अनुवादित करता येणार
● नोकिया कंपनीने नवा फीचर फोन 'नोकिया 105' केला लाँच, फोनची किंमत फक्त 1,199 रुपये इतकी
● भारत Vs विंडीज : पहिली कसोटी आजपासून सुरू, भारतीय संघ व्यवस्थापनापुढे संघ निवडीचा पेच
● ‘झी5’वर प्रदर्शित होणारी आगामी वेब सीरिज ‘सब्र भ्रम है’ मध्ये अभिनेत्री भूमिका चावला दिसणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👴🏻 जेष्ठत्वाकडे वाटचाल करताना...
LetsUp | Special
दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वाचा घटक आहेत आणि त्यांची काळजी किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा यांकडे आपले लक्ष असणे खूप महत्वाचे आहे.
📌 'वृद्धत्व अतिशय कठीण!' असे उद्गार आपण अनेकदा ऐकतो आणि त्यावर वृद्धांच्या मानसिकतेला गृहीत धरतो. परंतु आपण एक गोष्ट बऱ्याचदा पाहतो ती म्हणजे काही जेष्ठ मंडळी त्यांच्याहून वयाने लहान किंवा पुढील पिढीतील मंडळींसोबत मिळून मिसळून राहण्याचा खूप प्रयत्न करतात. त्यांच्या अंतरंगात दु:ख नसतं असं नसतं.
💁♀ मात्र ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे ज्येष्ठांच्या समस्याही त्यांच्या वयानुसार आणि कौटुंबिक स्थितीनुसार वेगवेगळ्या असतात. मुळात ज्येष्ठ नागरिकांनी नव्या पिढीकडे मोकळाढाकळा दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास आणि तरुणांनीही त्यांना समजून घेतल्यास समस्यांची तीव्रताही कमी होईल.
▪ ज्येष्ठांचे देखील तीन प्रकार असतात. साधारण 58 ते 65 वयोगट, 65 ते 75 वयोगट आणि 75 आणि त्यापुढील वयोगट अशा तीन प्रकारांत ज्येष्ठांची विभागणी होते.
👉 आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे वयोमर्यादा वाढली आहे, त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे.
🧐 या समस्यांचेही अनेक पैलू आहेत. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या या समस्या असतात. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. पण बाकी समस्यांसाठी समुपदेशन प्रभावी ठरू शकते.
🎯 1 ते 25 वर्ष ब्रह्मचर्य, 25 ते 50 वर्ष गृहस्थाश्रम, 50 ते 75 वर्ष वानप्रस्थाश्रम त्यानंतर 75 ते 100 वयात संन्यास अशा या स्थिती आहेत. बहुतांश ज्येष्ठ नागरिक वानप्रस्थाश्रमाच्या पुढे गेलेले असतात, पण त्यांची जीवनासक्ती संपलेली नसते. खाणं, पिणं, कपडालत्ता, दागदागिने, प्रवास, लग्न, मुंज, सणवार अशा सर्व गोष्टींत त्यांचा उत्साह टिकून असतो. मग असे ज्येष्ठ मनोमन स्वत:ची तरुण पिढीशी तुलना करतात. बरोबरी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो.
ℹ आपल्याला आवडणारे उद्योग, छंद त्यांनी जोपासायचा प्रयत्न करावा. यातून त्यांचा उत्साह आणि स्वभावातील समाधान जागृत राहील.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
⚽ रोनाल्डोने निवृत्तीचा प्लॅन सांगितला!
LetsUp I Sports
📣 पोर्तुगाल संघाचे प्रतिनिधित्व करणारा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने निवृत्तीबाबत केली मोठी घोषणा
🧐 रोनाल्डोच्या धक्कादायक विधानामुळे जगभरातील फुटबॉल वर्तुळात जोरदार चर्चा सुरू
🗣 रोनाल्डो काय म्हणाला? :
● कदाचित मी पुढील वर्षीही निवृत्ती घेऊ शकतो किंवा मी 40 ते 41 व्या वर्षापर्यंतही खेळू शकतो.
● प्रत्येक क्षणाचा आनंद लुटायचा, हे मी नेहमी सांगत आलो आहे. त्यामुळे मिळालेल्या या वरदानाचा मला आनंद लुटायचा आहे
● माझ्यापेक्षा अधिक विक्रम करणारा कुणी फुटबॉलपटू आहे का? माझ्यापेक्षा अधिक विक्रम नोंदवणारा खेळाडू कुणी असेल असे मला वाटत नाही
📍 रोनाल्डो आणि विक्रम :
● रेयाल माद्रिद : 292 सामन्यांत 311 गोल्स I 95 गोल्ससाठी सहाय्य
● मँचेस्टर युनायटेड : 196 सामन्यांत 84 गोल्स I 45 गोल्ससाठी सहाय्य
● युरोपियन फुटबॉल असोसिएशनच्या चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोल I 162 सामन्यांत 126 गोल्स
● इटालियन क्लब युव्हेंटस (सीरि ए) : 31 सामन्यांत 21 गोल
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🚍 *एसटीच्या व्हीटीएस प्रणालीचा प्रारंभ*
*LetsUp I Update*
🎯 परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा प्रारंभ
👍 या नव्या प्रणालीमुळे एसटी बस कोणत्या ठिकाणी पोहोचली आहे? हे प्रवाशांना समजू शकणार
✔ तसेच बसस्थानकावर एलसीडी टिव्ही संचाद्वारे एसटी गाड्यांची प्रत्यक्ष येण्याची व सुटण्याची वेळ कळणार
🤝 एसटी महामंडळाच्या नाशिक विभाग व मुंबई-पुणे-मुंबई, बोरीवली-पुणे-बोरीवली, ठाणे-पुणे-ठाणे या शिवनेरी सेवेचा व्हीटीएस-पीआयएस प्रकल्पाचा झाला लोकार्पण
👉 पुढील 5 ते 6 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात वाहनांना व्हीटीएस (Vehicle Tracking System) तर सर्व महत्त्वाच्या थांब्यावर पीआयएस संच (Passenger Information System) बसविण्यात येणार
🗣 *परिवहन मंत्री म्हणाले* :
● व्हीटीएस प्रकल्पाच्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व लहान मोठ्या एसटी बस थांब्याचे, गावांचे जीपीएस तंत्रज्ञानाव्दारे अक्षांश व रेखांशाव्दारे नकाशावर स्थान निश्चित करण्यात येत आहे
● तसेच ज्या आंतरराज्य मार्गावर एसटी महामंडळाची सेवा आहे अशा थांब्याचेही स्थान निश्चितीकरण करण्यात येत आहे
● व्हिटीएस-पीआयएस प्रकल्पाच्या अंतर्गत एक मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालय, मुंबई सेंट्रल येथे तयार करण्यात आलेली आहे
● या नियंत्रण कक्षामध्ये व्हिडीओ वॉल तयार करण्यात आली असून तेथे एसटी बसेसचे निरीक्षण करण्यात येणार आहे
● यात वाहनाचा वेग, वाहनाचे आगमन व निर्गमन तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक अहवाल प्राप्त होणार आहे
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Updates
● पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अखेर लोकसभेत प्लॅस्टिक बंदी लागू : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
● आता व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामचा नामविस्तार होणार; दोन्हीच्या नावांत समावेश होणार फेसबुकचा
● कर्नाटकात येडियुरप्पा यांनी आपल्या मंत्रिमडळाचा पहिला विस्तार केला, ज्यामध्ये 17 आमदारांना संधी
● माजी अर्थमंत्री व ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्या घरावर सीबीआयची नोटीस, घरी हजर राहण्याचे निर्देश
● आर्टिकल 370 : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे दाद मागणार : पाक परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी
● काश्मीरच्या संदर्भात भारताविषयी टोकाच्या व प्रक्षोभक वक्तव्यांना लगाम घालावा : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
● Hyundai ची नवीन Grand i10 कार चार व्हेरिअंटमध्ये भारतात लाँच, किंमत 5 लाखांपासून सुरू
● बीसीसीआयने वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतवर घातलेली आजीवन बंदी हटवण्याचा घेतला निर्णय
● पात्रता लढतीतील जोरदार विजयासह जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी सुशील कुमारचे तिकीट पक्के
● अभिनेता आयुष्मान खुरानाने आपल्या 'ड्रीम गर्ल' चित्रपटातील दुसरे गाणे 'दिल का टेलिफोन' केले शेअर
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
💳 SBI डेबिट कार्ड बंद करणार!
LetsUp | Update
🎯 स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) डिजिटल पेमेंटला अधिक प्रोत्साहन देण्साठी नवं पाऊल उचलण्याच्या तयारीत
😇 SBI सध्या प्रचलित असलेली डेबिट कार्ड बंद करण्याच्या विचारात, याऐवजी वेगळी यंत्रणा आणण्याच्या तयारीत
🗣 बँकेचे चेअरमन रजनीश कुमार म्हणाले :
● देशभरात सध्या सुमारे 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडिट कार्ड आहेत
● डेबिट कार्डलेस देश बनवण्यासाठी 'योनो' प्लॅटफॉर्मची भूमिका महत्त्वाची असेल
● या प्लॅटफॉर्मद्वारे कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढता येऊ शकतात किंवा कार्ड स्वाईप न करता खरेदी करता येऊ शकते
● बँकेने आधीच 68 हजार 'योनो' कॅशपॉईंट्स बसवले असून येत्या दीड वर्षात कॅशपॉईंट्सचा हा आकडा 10 लाख करण्याची योजना आहे
● येत्या 5 वर्षात डेबिट कार्डचा वापर मर्यादित होईल. तसेच आगामी काळात ग्राहकांच्या खिशातील क्रेडिट कार्ड हा 'स्टॅण्ड बाय'चा पर्याय म्हणूनच राहिल
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🚀 चांद्रयान-2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश
LetsUp | Breaking
⚡ अखेर चांद्रयान 2 ने आज (दि.20) चंद्राच्या कक्षेत केला प्रवेश, इस्रोकडून याबाबत माहिती
👍 ही ऐतिहासिक कामगिरी इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे
● आता हे यान 31 ऑगस्टपर्यंत चंद्राभोवती फिरत राहणार
● त्यानंतर 7 सप्टेंबरला ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार
● त्यानंतर ते स्पेसक्राफ्टच्या दिशेत 4 वेळ (21, 28, 30 ऑगस्ट तसेच 1 सप्टेंबर रोजी) परिवर्तन करणार
● त्यानंतर चंद्राच्या ध्रुवाहून प्रवास करत जवळपास 100 कि.मीच्या अंतरावर चांद्रयान-2 आपल्या अंतिम कक्षेत दाखल होणार
● यानंतर विक्राम लँडर 2 सप्टेंबर रोजी चांद्रयान-2 हून विलग होऊन चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात येईल
💫 भारताची ही दुसरी चंद्र मोहिम असून चंद्राच्या दक्षिण भागावरील माहित नसलेल्या गोष्टी शोधून काढणे हा या मोहिमेचा उद्देश आहे
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📣 हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये विविध 164 जागांसाठी भरती
LetsUp | Job
💁♂ पदाचे नाव व पद संख्या अशी :
● प्रोजेक्ट इंजिनिअर (मेकॅनिकल) : 63
● प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल) : 18
● प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) : 25
● प्रोजेक्ट इंजिनिअर (इंस्ट्रुमेंटेशन) : 10
● रिफायनरी इंजिनिअर (केमिकल) : 10
● लॉ ऑफिसर : 04
● क्वालिटी कंट्रोल ऑफिसर : 20
● HR ऑफिसर : 08
● फायर & सेफ्टी ऑफिसर : 06
🧐 वयाची अट : 19 ऑगस्ट 2019 रोजी, (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
✔ पद क्र.1 ते 6 : 18 ते 28 वर्षे
✔ पद क्र.7 ते 9 : 18 ते 30 वर्षे
👍 नोकरी ठिकाण : मुंबई
💸 फी : UR/ OBCNC/ EWS : ₹590/- (SC/ ST/ PwBD : फी नाही)
📆 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 16 सप्टेंबर 2019
🗞 जाहिरात पहा : http://bit.ly/31NLoYT
🌐 ऑनलाईन अर्ज : http://bit.ly/2Z4cWfF
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
😱 धक्कादायक! राज्यातील 17.1 टक्के अपंग विद्यार्थी शाळाबाह्य
LetsUp | Update
🔎 राज्यातील 5 ते 19 वयोगटातील 17.1 टक्के अपंग विद्यार्थी आत्तापर्यंत एकदाही शाळेत गेले नसल्याची माहिती समोर
📍 युनेस्कोने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून निष्कर्ष समोर, यासाठी 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आलाय
📝 अहवालात काय-काय? :
● राष्ट्रीय स्तरावर 27 टक्के अपंग विद्यार्थी एकदाही शाळेत गेलेले नाही
● आसाममधील (36.4 टक्के) विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे
● राज्यात 6 लाख 84 हजार 328 अपंग विद्यार्थी, त्यातील 17.1 टक्के विद्यार्थी एकदाही शाळेत गेलेले नाहीत
● आधी कधीतरी शाळेत गेलेल्या मुलांचे प्रमाण 12.6 टक्के, त्यात 12.3 टक्के मुलगे आणि 12.9 टक्के मुली
✔ महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी :
● अपंग विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या स्थानी आहे
● पहिल्या स्थानी गोवा (73.4 टक्के), दुसऱ्या स्थानी केरळ (73.2 टक्के) आहे
🎯 वरील राज्ये वगळता जवळपास सर्व राज्यांमध्ये शाळेत न गेलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 20 टक्क्यांहून जास्त
💫 अहवालात 2011 च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला असल्याने सद्यस्थिती वेगळी असण्याची शक्यता; शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचा दावा
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Updates
● केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60; केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती
● व्होडोफोन-आयडियाच्या सीईओ पदाचा बालेश शर्मा यांनी वैयक्तीक कारणामुळे दिला राजीनामा
● बलात्कार प्रकरणी तरुण तेजपाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; 6 महिन्यांत खटला पूर्ण करण्याचे आदेश
● पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांचा कार्यकाळ 3 वर्षांसाठी वाढवण्यात आला
● ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस समुद्रात मोठी भरती, मुंबईकरांच्या समस्येत आणखी एक भर
● ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे मुंबईतील रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन, ते 92 वर्षांचे होते
● ED ने बजावलेल्या नोटीसीमुळे मनसे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक, अखेर ठाणे बंदची हाक मागे
● इंडियन मोटरसायकलकडून एफटीआर 1200 एस आणि एफटीआर 1200 एस रेस रेप्लिका बाईक्स लॉन्च
● भारताला इस्तोनियात झालेल्या कुमारांच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 3 पदकांवर समाधान मानावे लागले
● ‘आशिकी’ फेम बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर मॉडेल दिवा धवनसोबत करणार साखरपुडा
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
📸 आज जागतिक फोटोग्राफी दिन
LetsUp | Special
दरवर्षी 19 ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो. अव्यक्त भावनांना बोलकं करणाऱ्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी जागतिक फोटोग्राफी दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आज आपण जागतिक फोटोग्राफी दिनाचा इतिहास, आणि साजरा करण्यामागचे कारण जाणून घेऊया...
🎯 जाणून घ्या इतिहास :
● फ्रान्समध्ये सुरूवात झालेल्या जागतिक फोटोग्राफी दिनाला सुमारे पावणे दोनशे वर्षांचा इतिहास आहे.
● लुईस द गेरो आणि जोसेफ नायफोर यांनी 1837 मध्ये दगेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. यामुळे छायाचित्रण सोपे बनले.
● साधारण सन 1800 मध्ये कॅमेरा ही कल्पना विचारात आली.
● त्यानंतर 1839 च्या दरम्यान व्यावसायिक छायाचित्रकेलचा जन्म झाला.
● इलेक्ट्रॉनिक डिजिटल कॅमेरा 1990 मध्ये जन्माला आला.
● सध्या छायाचित्रण व्यवसाय नव्या क्रांतीच्या मार्गावर आहे.
🖼 जगातील पहिला फोटो : जोसेफ निकफेर निएपेस याने 1826 किंवा 27 दरम्यान फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशातील 'ल ग्रास' येथील एका खिडकीतून दिसणार्या दृश्याचे पहिले छायचित्र टिपले.
💁♂ पहिला जागतिक फोटोग्राफी दिन : जगभरातल्या फोटोग्राफर्सनी 19 ऑगस्ट 2010 रोजी पहिला जागतिक फोटोग्राफी दिन आयोजित केला. जगभरातून 270 फोटोग्राफर्सनी यामध्ये भाग घेतला. त्यांचे फोटोग्राफ्स तब्बल 100 देशांमधल्या लोकांनी पाहिले. त्यानंतर दरवर्षी 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस म्हणून साजरा होऊ लागला.
हा दिन साजरा करण्याचा महत्त्वाचा उद्देश आहे की, फोटोग्राफीला प्रोत्साहन देणे व मार्गदर्शन करणे हा आहे. या दिवसामुळे वेगवेगळ्या देशातील विभिन्न संस्कृतीचे लोक एकत्र येतात. फोटो प्रदर्शन, स्पर्धा, व्याख्याने, कार्यशाळा याचे आयोजन केल्यामुळे अनेकांना एक व्यासपीठ मिळते. यानिमित्त या क्षेत्रासाठी ज्या विद्वानांनी योगदान दिले त्यांच्या आठवणी अजुनही ताज्या होतात. त्यातून नवीन छायाचित्रकारांना मार्गदर्शन व प्रेरणा मिळते.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🤔 सतत अॅसिडिटी होते? मग आहाराचे व्यवस्थित नियोजन करा!
LetsUp | Health
अन्न हे पूर्णब्रह्म! हे आपण अनेकदा ऐकतो. कोणी काही खायला दिलं तर 'नाही' न म्हणण्याचे आपली संस्कृती सांगते. मात्र किती खावे आणि कधी खावे? हे मात्र आपली प्रकृती पाहून आपण ठरवायला हवे.
अनेकांना अॅसिडिटीचा त्रास जाणवतो आणि उलटी, मळमळणं या गोष्टी दैनंदिन जीवनाचा हळूहळू भाग होतात. व्यवस्थित खाऊन, तेलकट पदार्थ टाळून देखील त्रास होत असेल तर का बरं अॅसिडिटी होत असेल या विचाराने अनेकजण त्रासलेले असतात. खालील टिप्स फक्त अॅसिडिटीने त्रासलेल्यांसाठी आहेत...
1) आहाराच्या वेळा पाळा :
● सातत्याने अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास आहारांच्या वेळा योग्य आहेत का? याची खात्री करून घ्यावी.
● कितीही कामामध्ये गुंतले असले तरी कामाच्या स्वरूपानुरूप दुपारच्या जेवणाची वेळ पाळणे आवश्यक आहे.
● सकाळची न्याहारी सर्वसाधारणपणे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान घ्यावी.
● न्याहारी आणि दुपारचे जेवण यामध्ये किमान चार ते पाच तासांचे अंतर असायला हवे. हे शक्य नसेल तर न्याहारीमध्ये पोळी-भाजी खावी.
● दुपारचे आणि रात्रीचे जेवण यांच्या मधल्या वेळात हलक्या पदार्थाचे सेवन करावे.
2) पथ्ये पाळायला हवी : सातत्याने अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास पुढील पथ्यांचे पालन केल्यास नक्कीच फरक जाणवतो.
● शिळे पदार्थ, आंबट दही, लोणचे, पापड, तळलेले पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
● भाज्यांमध्ये मेथी, मेथीचे पदार्थ, मुळा आणि मुळ्याचे पदार्थ, सिमला मिरची यांचे प्रमाण कमी असावे.
● हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेली मिरची हे पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत.
3) ट्राय करा घरगुती उपाय :
● रोज एक चमचा मोरावळा खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.
● आवळा पावडर आणि ज्येष्ठमध समभाग एकत्र करून अर्धा चमचा रोज सकाळ-संध्याकाळ दोन वेळा घ्यावी. त्यामुळे छातीतली जळजळ कमी होते.
● डोळ्यांची आग होत असल्यास थंड दुधात कापसाचा बोळा बुडवून डोळ्यांवर ठेवल्यास बराच आराम पडतो.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🏸 आजपासून रंगणार विश्व चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धा
LetsUp | Sports
⚔ आजपासून (दि.19 ) बीडब्ल्यूएफ जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा स्वित्झर्लंडमधील बॅसेल येथे रंगणार
👉 या स्पर्धेत 45 देशांतील 357 तर भारताचे 19 खेळाडू सहभागी होणार
🇮🇳 सिंगल्समध्ये भारताचे 6 खेळाडू असून डबल्समध्ये 8 जाेड्या आहेत
🎯 भारतीय खेळाडू :
● सिंगल्स : पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत, समीर वर्मा, बी. साईप्रणीत, एच. एस. प्रणॉय
● पुरुष दुहेरी : मनू अत्री आणि बी. सुमीत रेड्डी, एमआर अर्जुन आणि रामचंद्रन श्लोक तसेच अरुण जॉर्ज आणि सन्यम शुक्ल
● महिला दुहेरी : अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी, जक्कमपुडी मेघना आणि पूर्विशा एस. राम, पूजा दांडू आणि संजना संतोष
● मिश्र दुहेरी : प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की
--------------------------------------------
🧐 ICC कडून 'या' नियमाचा वापर!
📍 अॅशेसमध्ये इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने टाकलेला बाऊन्सरमुळे दुखापतग्रस्त स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या टेस्टला मुकणार
🧢 आयसीसीच्या नव्या नियमानुसार मार्नस लाबुसचग्ने याला स्मिथचा बदली खेळाडू म्हणून देण्यात आली संधी
✔ नवीन नियमाचा प्रथमच वापर :
● 1 ऑगस्टपासून आयसीसीचे नवे नियम लागू
● त्यानुसार मैदानात खेळाडूला गंभीर दुखापत झाली, तर या खेळाडूला बदली खेळाडू देण्यात येणार
● कनकशन सबस्टिट्यूट, असे नाव या नियमाला देण्यात आलेय
● यामुळे मार्नस लाबुसचग्ने हा पहिला कनकशन सबस्टिट्यूट खेळाडू ठरला
--------------------------------------------
🏏 श्रीलंकेचा न्यूझीलंडवर विजय
⚡ श्रीलंकेने न्यूझीलंडविरूद्धचा पहिला क्रिकेट कसोटी सामना 6 गडी राखून जिंकला
👍 या विजयासह दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली
💁♂ श्रीलंकेकडून विजयासाठी आवश्यक असलेले 268 धावांचे लक्ष्य 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण
🏆 दिमुथ करूणारत्ने लंकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला, त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🚍 येत्या आठवड्यात एसटीत ‘व्हीटीएस’
LetsUp | Update
📣 राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एसटी महामंडळातील लोकोपयोगी प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश
👍 त्यानुसार येत्या आठवड्यात व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीटीएस) प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता
✔ या प्रकल्पांतर्गत एसटीची 'रिअल' वेळेत माहिती मिळावी यासाठी मोबाइल अॅपही प्रवाशांना उपलब्ध होणार
👌 हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास एसटी येण्याच्या 10 मिनिटे आधी प्रवाशांना मोबाईल फोन अॅपद्वारे सूचना मिळेल
🤔 काय-काय लाभ मिळणार? :
● एसटी कुठे आहे? ती कधी येणार? हे कळणार
● चालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार
● डिजिटायझेशनकडे जाणाऱ्या एसटीचा मोलाचा टप्पा असेल
🎯 प्रकल्पाची चाचणी यशस्वी :
● महामंडळाकडून नाशिक विभागात यशस्वी चाचणी, आता मुंबई, पुणे, ठाणे या विभागांत ही सुविधा राबवण्यात येईल
● मुंबईसह नाशिक, पुणे या विभागातील एसटींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा सुरू करण्यात येईल
● यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील बसगाड्यांमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🗞 LetsUp News Updates
● पूरग्रस्त भागात दाव्यांचा त्वरित निपटारा करा, केंद्र अर्थ मंत्रालयाची विमा कंपन्यांना सूचना
● देशभरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तब्बल 269 जणांचा मृत्यू तर 42 जण बेपत्ता
----------------------
🌕 आज संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय : 9.37 Pm
----------------------
● देशातील 9 शहरांत सध्या 45 लाख किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या 4.12 लाख सदनिका तयार
● दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाला पीएम मोदींचं नाव द्या, भाजप खासदार हंसराज हंस यांची मागणी
● पुढील दोन ते तीन आठवडे राज्यात कोरडे हवामान राहणार, हवामान विभागाने वर्तविला अंदाज
● बालभारतीकडून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना तातडीने दीड लाखांहून अधिक पुस्तकं वाटप
● कोहिनूर प्रकरणी राज ठाकरे यांना ईडीची नोटीस; 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
● वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप आज साेमवारपासून बासेल (स्वित्झर्लंड)मध्ये सुरू, भारताचे 19 खेळाडू सहभागी
● प्रो कबड्डी : पुणेरी पलटन-तमिळ थलैवा सामना बरोबरीत तर तेलुगू टायटन्सचा हरयाणा स्टीलर्सवर विजय
● दिग्गज अभिनेत्री झिनत अमानचा मुलगा जहान खान बॉलिवूडमध्ये एक संगीतकार म्हणून करणार पदार्पण
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
🧐 मतदान कार्डही ‘आधार’ला जोडणार!
LetsUp | Update
📍 पॅन कार्डनंतर आता मतदान ओळखपत्रही आधारला जोडण्यात येणार
👉 केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाकडे मतदान कार्ड आणि आधार जोडणीची केली मागणी
📝 निवडणूक आयोगाने कायदा मंत्रालयाला यासंदर्भात लिहिले पत्र
🤔 पत्रात आयोगाने म्हटले :
● मतदान कार्ड ‘आधार’शी जोडल्यास बोगस मतदानासारख्या गैरप्रकारांना आळा बसेल
● लोकप्रतिनिधी कायदा 1950 मध्ये सुधारणा करावी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
⛈ पावसाने मोडला 50 वर्षांचा रेकॉर्ड!
LetsUp | Update
📣 भारतीय हवामान शास्त्र विभागाने आकडेवारी जाहीर केली.
💁♂ त्यानुसार गेल्या 50 वर्षांतील सरासरीच्या तुलनेत या वर्षीच्या 8 ते 14 ऑगस्ट या आठवडाभराच्या काळात देशभरात तब्बल 45 टक्के एवढ्या अधिक पावसाची नोंद.
1) सर्वाधिक पाऊस : तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप, त्याखालोखाल महाराष्ट्र, गोवा आणि राजस्थानात अधिक पावसाची नोंद
2) सामान्य पाऊस : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, त्रिपुरा, मिझोराम
3) अपेक्षेपेक्षा कमी पाऊस : तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागालँड, आसामचा काही भाग, बिहार, हरयाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर
🤔 सध्या परिस्थिती काय? :
● आगामी काळात सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. केवळ हलका पाऊस सुरू राहील.
● दक्षिण मध्य महाराष्ट्रातील इतर भागातही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
● दक्षिण कोकण आणि गोवा येथे मध्यम पावसासह काही जोरदार सरींची शक्यता आहे.
💫 पावसाचे प्रमाण कमी होण्याचे कारण मान्सूनची दुर्बल झालेली लाट आहे. महाराष्ट्राच्या इतर विभागांतही पावसाचा जोर कमी झाला आहे : स्कायमेट
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
