uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Kanalga Telegram’da o‘tish

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Ko'proq ko'rsatish
6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
photo content

'एमपीएससी’ भरतीबाबत मुख्यमंत्र्यांचे सर्व विभागांना निर्देश LetsUpp | Trending ⚡ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळ सेवा भरतीसाठी काही विभागांनी अद्याप मागणीपत्र सादर न केल्याची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. 🗣️ कोणत्याही परिस्थितीत सर्व विभागांनी तात्काळ मंजूर पदांचा आढावा घेऊन आपले मागणीपत्र ३० सप्टेंबरपर्यंत आयोगाकडे पाठवावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्र्यांनी बुधवारी सचिवांना दिले. 💁‍♂️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांचा तपशील ३० सप्टेंबरपर्यंत पाठविण्याचे निर्देश याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. संबंधित विभागांनी बिंदु नामावली तयार करुन, उचित मान्यता घेऊन हे प्रस्ताव ‘एमपीएससी’कडे पाठवायचे होते. 🧐 वारंवार निर्देश देऊनही काही विभागांनी पदांचे मागणीपत्र न पाठविल्याने नवीन पदभरती प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. आत्ता मुख्यमंत्र्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत सर्व विभागांनी मागणीपत्र पाठविण्याचे निर्देश मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिले. 👀 ‘एमपीएससी’च्या पदभरती जाहिरातीला विलंब होत असल्यानेच पुण्याच्या स्वप्निल लोणकर या तरूणाने अधिवेशन सुरू असताना आत्महत्या केली. 📍 या गोष्टीची गंभीर दखल घेत सरकारच्या वतीने एमपीएससीच्या १५ हजार ५११ पदांची भरती केली जाईल, अशी घोषणा करण्यात आली. उपमुख्यमंत्री वारंवार या प्रक्रियेचा आढावा घेत असूनही विभागांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे पदभरती प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/4LuEupd8Ljb

मुंबई-सिंधुदुर्गचा हवाई प्रवास करा अडीच हजारात LetsUpp | Trending ✈️ एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंध
मुंबई-सिंधुदुर्गचा हवाई प्रवास करा अडीच हजारात LetsUpp | Trending ✈️ एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर 9 ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग उड्डाण सुरू करणार आहे. 💰 ’अलायन्स एअर’ने नुकतेच मुंबई ते सिंधूदूर्ग विमान प्रवासाचे वेळापत्रक व तिकीट दर घोषित केले आहे. 💁🏻‍♂️ हा विमान प्रवास 2500 रूपयांत करता येणार असून अवघ्या दीड तासांत मुंबईतून सिंधुदुर्गात पोहोचता येणार आहे. 👍 जाणून घ्या वेळापत्रक : अलायन्स एअरचे फ्लाइट 9 ऑक्टोबर रोजी मुंबईहून 11.35 वाजता उड्डाण करेल आणि 1 वाजता सिंधुदुर्गला पोहोचेल. यानंतर, सिंधुदुर्गहून विमान दुपारी1.25 वाजता उड्डाण करेल आणि 2.50 वाजता मुंबईला पोहोचेल. 💵 असे असणार आहे तिकीट दर : अलायन्स एअरच्या मते, सुरुवातीला सर्व करांसह तिकीट किंमत मुंबई-सिंधुदुर्गसाठी 2,520 रुपये ठेवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग-मुंबई विमानाचे भाडे 2,621 रुपये निश्चित करण्यात आले आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/aDESO5oeMjb

मोठी बातमी! कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार आर्थिक मदत LetsUpp | Trending 💫 कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपयांची सानुग्रह रक्कम मिळेल, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयाला दिली. आधी झालेल्या मृत्यूंसाठीच नव्हे तर भविष्यातील लोकांसाठीही भरपाई दिली जाईल, असे न्यायालयाला सांगण्यात आले. 👉 ही रक्कम राज्य सरकार म्हणजेच राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर एनडीएमएने भरपाईसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. देशात आतापर्यंत ३.९८ लाख लोकांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 💁‍♂️ कोरोनाबळी ठरलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याच्या मागणी करणाऱ्या विविध याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयासमोर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई देऊ शकत नाही असे म्हटले होते. 💁‍♀️ याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही सरकारच्या युक्तिवादाशी सहमती दर्शवली होती. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला स्वतः अशी व्यवस्था बनवण्यास सांगितले होते जेणेकरून मृतांच्या कुटुंबीयांना सन्माननीय अशी रक्कम मिळाली पाहिजे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/qNELFn2aLjb

टॉप 10 हेडलाईन्स! सायंकाळच्या महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ● काळजी घ्या! राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांचे नुकसान होणार ● भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनचं एक पाऊल मागे, नवीन लस धोरणात 'कोव्हिशिल्ड'ला मान्यता ● ‘हे तर अपरिपक्वतेचं परिचायक’, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन फडणवीसांचा टोला ● सोयाबीन जोमात मात्र फळ धारणाच नाही! लातूर जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत ● “मुख्यमंत्र्यांनी पाठवलेलं पत्र म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैवं”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा! ● खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान ● काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी पोलीस कर्मचाऱ्याला गोळ्या घालून केलं ठार ● सार्क देशांच्या बैठकीत तालिबानचा समावेश करण्यासाठी पाकिस्तान आग्रही ● टी - 20 लीग वर पुन्हा करोनाचं संकट?; हैदराबादच्या टी नटराजनला लागण; संपर्कातील सहा जण विलगीकरणात ● चिरंजीवी यांनी रिलीज केला साई धरम तेजच्या ‘रिपब्लिक’ चित्रपटाचा ट्रेलर अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/W9Zfgj16Kjb

photo content

दिलासादायक! देशात सप्टेंबरच्या मध्यापासून घसरली कोरोनाची आर-व्हॅल्यू Letsupp | Positive News ● कोरोनाची तिसरी लाट येणार असे भाकीत केले जात असतानाच देशात मात्र कोरोना कमजोर होत असल्याचे समोर आहे. कोरोनाची देशातील आर व्हॅल्यू १ च्या खाली आहे. कोरोनाचा संसर्ग किती वेगाने पसरतोय हे दर्शविणारी ही आर व्हॅल्यू घसरली आहे. ● सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशातील कोरोना आर व्हॅल्यू ०.९२ टक्क्यांवर आली आहे. ऑगस्टच्या अखेरीस देशाची आर-व्हॅल्यू १.१७ इतकी होती. तर ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरदरम्यान ही आर-व्हॅल्यू १.११ वर आली होती. तेव्हापासून सातत्याने देशाची आर-व्हॅल्यू ही १ च्या खाली आली आहे. ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान देशाची आर-व्हॅल्यू ही ०.८६ होती. ● यामुळे राज्याराज्यांत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा प्रभाव हा या आर व्हॅल्यूवर दिसत असून कोरोनाला रोखण्यात यश येत असल्याचे हे चित्र आहे. देशातील प्रमुख शहरं मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरूमधील आर-व्हॅल्यू १ पेक्षा जास्त आहेत. तर दिल्ली आणि पुण्यात आर-व्हॅल्यू १ पेक्षा कमी आहे. राज्यांचा विचार करता महाराष्ट्र आणि केरळमध्ये आर-व्हॅल्यू ही १ पेक्षा कमी आहे. त्यामुळे असल्याचे हे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र-केरळला काहीसा दिलासा मिळाला आहे.

photo content

*दिलासादायक! देशात सप्टेंबरच्या मध्यापासून घसरली कोरोनाची आर-व्हॅल्यू* Letsupp | Positive News ● कोरोनाची तिसरी लाट येणार असे भाकीत केले जात असतानाच देशात मात्र कोरोना कमजोर होत असल्याचे समोर आहे. कोरोनाची देशातील आर व्हॅल्यू १ च्या खाली आहे. कोरोनाचा संसर्ग किती वेगाने पसरतोय हे दर्शविणारी ही आर व्हॅल्यू घसरली आहे. ● सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशातील कोरोना आर व्हॅल्यू ०.९२ टक्क्यांवर आली आहे. ऑगस्टच्या अखेरीस देशाची आर-व्हॅल्यू १.१७ इतकी होती. तर ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरदरम्यान ही आर-व्हॅल्यू १.११ वर आली होती. तेव्हापासून सातत्याने देशाची आर-व्हॅल्यू ही १ च्या खाली आली आहे. ११ ते १५ सप्टेंबरदरम्यान देशाची आर-व्हॅल्यू ही ०.८६ होती. ● यामुळे राज्याराज्यांत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा प्रभाव हा या आर व्हॅल्यूवर दिसत असून कोरोनाला रोखण्यात यश येत असल्याचे हे चित्र आहे. देशातील प्रमुख शहरं मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळुरूमधील आर-व्हॅल्यू १ पेक्षा जास्त आहेत. तर दिल्ली आणि पुण्यात आर-व्हॅल्यू १ पेक्षा कमी आहे. राज्यांचा विचार करता महाराष्ट्र आणि केरळमध्ये आर-व्हॅल्यू ही १ पेक्षा कमी आहे. त्यामुळे असल्याचे हे चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्र-केरळला काहीसा दिलासा मिळाला आहे.

भाजप आमदारांना दिलासा! अधिवेशनात मतदान करता येणार, पण... Letsupp | Trending ● विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्यामु
भाजप आमदारांना दिलासा! अधिवेशनात मतदान करता येणार, पण... Letsupp | Trending ● विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्यामुळे निलंबित केलेल्या भाजपच्या बारा आमदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ● येत्या ४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत बारा आमदारांना मतदान करता येईल. मात्र मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्यासाठी विधान भवनाच्या बाहेर व्यवस्था करण्यात येणार आहे. ● विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ओबीसींच्या आरक्षणाच्या मुद्दय़ावरून चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत जाऊन जोरदार घोषणाबाजी करीत प्रचंड गोंधळ घातला होता. ● यामध्ये गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे, आशीष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, हरीश पिंपळे, नारायण कुचे, पराग आळवणी, मितेश भांगडिया, राम सातपुते, अभिमन्यू पवार या भाजपच्या बारा आमदारांचा समावेश आहे. अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा https://letsup.app.link/hMsC3d6oKjb

photo content