LetsUpp Marathi
Kanalga Telegram’da o‘tish
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Ko'proq ko'rsatish6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
6 624
🎰 *खेळा ऑनलाइन 'CASINO'! आणि जिंका मोठी रक्कम*
💰 *SHOWLION* मिळवा लाखों जिंकण्याची संधी...
♦♦♦♦♦♦♦♦♦♦♦
🎳 खेळा *BEST ONLINE CASINO* स्लॉट्स आणि जिंका मोठी रक्कम!*
🤩🤩🤩🤩🤩
👨💻 *FREE ₹500 ON SIGNUP!*
🤹♀🤹♀🤹♀🤹♀🤹♀
🎯 केवळ लॉगिन करा व जिंकण्याची संधी मिळवा!
🎟 तर, मग विचार कसला करता!
🥳 *नोंदणी करण्यासाठी आताच क्लिक करा :* 👉 https://urlzs.com/JqThM
(Advt)
6 624
🌎 *जगभरात तब्बल चार लाख रुग्ण झाले कोरोनामुक्त!*
*LetsUp | Corona Live*
🧐 कोरोनाचा प्रसार आणि बळींची संख्या वाढत असतानाच एक आशादायक चित्र देखील पाहायला मिळत आहे.
👍 आतापर्यंत जगभरात तब्बल 4 लाख 4 हजार 32 कोरोनाबाधित रुग्ण उपचारांनंतर पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. एकूण रुग्णांमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण 23 टक्के आहे.
📍 आतापर्यंत मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 8 हजार 828 आहे. म्हणजे एकूण रुग्णांमध्ये मृत्यूंचे प्रमाण हे सहा टक्के आहे.
😷 कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 68 टक्के असून केवळ एकूण कोरोनाबाधितांपैकी केवळ तीन टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे.
🇨🇳 सर्वाधिक कोरोनामुक्त रुग्णांची संख्या चीनमध्ये आहे. आतापर्यंत चीनमध्ये 77 हजार 575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
🌏 *इतर देशांमधील कोरोनामुक्त रुग्ण* : स्पेनमध्येही 59 हजार 109 रुग्ण बरे झाले आहेत. जर्मनीत 57 हजार 400, इराणमध्ये 41 हजार 947, इटलीमध्ये 32 हजार 534, अमेरिकेत 30 हजार453 तर फ्रान्समध्ये 26 हजार 391 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
महाराष्ट्रात लॉकडाऊन 16 दिवसांनी वाढवला, 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.
6 624
💥 *मजुरांचा रस्त्यावर जाळपोळ!*
*LetsUp l Update*
⚡ लॉकडाऊनमुळे गुजरातच्या सूरतमध्ये अडकून पडलेल्या विस्थापित मजुरांनी शुक्रवारी रस्त्यावर जाळपोळ करत धिंगाणा घातला. हे मजूर आपल्याला आपल्या घरी पाठवण्याची मागणी करत आहेत.
💁♂️ प्रशासनावरचा आपला राग व्यक्त करताना या लोकांनी अनेक वाहनांना आग लावली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
👀 दरम्यान, देशातील करोनाबाधितांची संख्या 7 हजार 447 वर पोहचली आहे. यामध्ये 71 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर आत्तापर्यंत देशातील 239 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
🧐 सूरतच्या लसकाना आणि डायमंड बुर्स भागात लॉकडाऊनमुळे हैराण झालेले शेकडो प्रवासी मजूर रस्त्यावर उतरले. या भागात प्रवासी मजुरांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे.
📌 या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे हे मजूर 'घरी जाण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहणार?' असा प्रश्न विचारत आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *कोरोनाबाधित रुग्णाची आत्महत्या!*
*LetsUp l Akola*
⚡ कोरोना संशयित म्हणून अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल एका रुग्णाने आज पहाटे पाचच्या दरम्यान स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
💁♂️ मोहम्मद जहरुल इस्लाम (वय 30) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा आसामच्या नागाव जिल्ह्यातील सालपडा येथील रहिवासी आहे. कोरोना संशयित म्हणून 7 एप्रिलला त्याला रुग्णालयात दाखल केली होते.
👀 शुक्रवारी चाचणी अहवालात सदर रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यानं हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.
📌 आज पहाटे मोहम्मद रक्तबंबाळ अवस्थेत बाथरूममध्ये आढळला. कर्मचाऱ्यांनी ही माहिती रुग्णालय प्रशासनाला दिली. त्यानंतर तत्काळ त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू केली, मात्र, शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *छत्रीच्या कापडापासून पीपीई किट*
*LetsUp | Solapur*
जगभरात पीपीई (पर्सन्स प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किटची खूप मोठ्या प्रमाणात गरज असून या किटचा तुटवडा असताना डॉक्टरांच्या या गरजेतूनच डॉ.माणिक गुर्रम यांनी सेफ्टी किट विकसित केले आहे.
त्यांच्या रुग्णालयातील डॉक्टरांसोबतच इतर रुग्णालयातील डॉक्टर हे किट वापरत आहेत. हे सोलापुरी सेफ्टी किट निर्माण केल्याच्या माहितीचा प्रसार होताच राज्यभरातून किटची मागणी वाढत आहे. या किटमुळे पायापासून ते डोक्यापर्यंत शरीर झाकले जाते.
सुरुवातीला रेनकोटच्या कापडाचा पर्याय समोर होता, पण त्याचे कापड जाड असल्याने आत गरम होईल म्हणून छत्रीसाठी वापरण्यात येणारे कापड पाहिले. या कापडातून हवा व पाणी आत जात नाही, याची खात्री झाल्यावर सेफ्टी किट तयार करण्यात आले.
एक किटसाठी सरासरी सातशे ते आठशे रुपयांचा खर्च येतो. सोडियम हाइड्रोक्लोराइड हे किट स्वच्छ करता येते तर मिथेन आक्साईडने याचे निर्जंतुकीकरण करून किटचा पुनर्वापर करता येतो.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🧐 *आशियाई विकास बँक देशाच्या मदतीला!*
*LetsUp l Update*
⚡ आशियाई विकास बँकेने भारताला 16 हजार 500 कोटी रुपयांची मदत कोरोनाचा सामना करण्यासाठी देण्याचे ठरवले आहे. या बँकेचे अध्यक्ष मासत्सुगु असाकावा यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 2.2 अब्ज डॉलर म्हणजे 16500 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
💁♂️ *प्रशंसा* : असाकावा यांनी सीतारामन यांच्याशी संवाद साधून भारताने कोरोनाविरोधात केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. तसेच कर कपात व इतर सवलतींसह 1.7 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेचेही स्वागत केले आहे.
🗣️ *आसाकावा म्हणाले* : आशियाई विकास बँकेने भारताला 2.2 अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे ठरवले असून त्यातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करता येईल. लघु व मध्यम उद्योगांना सावरण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. गरज वाटल्यास आशियाई विकास बँक भारताला आणखी आर्थिक मदत देईल.
📌 बँकेने यापूर्वी भारतासह काही देशांना 6.5 अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आशिया व पॅसिफिकमधील एकूण 68 देश या बँकेचे सदस्य आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
🧐 *राज्यातील 'कोरोना' रुग्णांची संख्या 1574 वर*
*LetsUp | Corona Live*
😷 देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. राज्यातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता वेगाने वाढत आहे.
😰 *दीड हजाराहून अधिक रुग्ण* : राज्यात काल कोरोनाच्या 210 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1574 वर पोहचली आहे.
🗣️ याचप्रमाणे सध्या राज्यात 1176 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
👍 *दिलासादायक* : आतापर्यंत एकूण 188 कोरोना रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
🏠 *क्वारंटाईन* : सध्या राज्यात 38 हजार 927 व्यक्ती घरगुती विलगीकरणात आहेत, तर 4738 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
📍 दरम्यान, देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशभरात एकूण चार हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💁♂️ *रुग्णांवर लवकरच 'या' थेरपीने उपचार!*
*LetsUp l Update*
⚡ भारतात कोरोनाच्या रुग्णांवर कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा या नव्या पद्धतीने उपचार करण्याची तयारी सुरु आहे. लवकरच या थेरपीच्या क्लिनिकला चाचण्या सुरु होणार आहेत.
🧐 कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये कोरोनामधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अॅंटीबॉडीज असलेले रक्त काढून ते कोरोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. Covid-19 चे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचे अमेरिकन जर्नलमध्ये म्हटले आहे.
👨🔬 भारतातील सर्वोच्च संशोधन संस्था इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कॉनव्हॅलसंट प्लाझ्माच्या चाचणीसाठी कोणती मार्गदर्शक तत्वे असावीत त्यावर काम करत आहे.
👉 मार्गदर्शक तत्वे निश्चित झाल्यानंतर त्यासंबंधीचा आराखडा ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीसीजीआय) अंतिम मंजुरीसाठी सादर केला जाईल. दोन दिवसात हा आराखडा तयार होईल.
🧪 ही नवीन उपचार पद्धती असल्याने त्याच्या चाचण्या आवश्यक आहेत. त्यासाठी डीसीजीआयची परवानगी आवश्यक आहे. करोना व्हायरसवर उपचारासाठी डॉक्टरांकडे अत्यंत कमी पर्याय उपलब्ध असताना ही नवी उपचार पद्धती पूर्णपणे भिन्न आहे.
🗣️ *डॉ. मनोज मुरहीकर म्हणाले* : “दुसऱ्या देशातील व्हेंटिलेटरवर असलेल्या काही रुग्णांवर या उपचार पद्धतीमुळे फायदा झाला आहे. प्रत्येकावर या पद्धतीने उपचार होणार नाहीत. पण कुठल्या रुग्णांवर कॉनव्हॅलसंट प्लाझ्माने उपचार करायचे त्या रुग्णांची आम्ही निवड करु. डॉक्टर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजीचे संचालक आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *पुरवठा करु, राजकारण करु नका!*
*LetsUp l Update*
⚡ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधावरुन जशास तसे उत्तर देण्याची भाषा केल्यानंतर भारतानेही सुनावले आहे. “भारत आपल्या शेजारी देशांना व कोरोनामुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करील. त्यामुळे यावरुन कुठलेही अंदाज बाधू नका तसेच राजकारणही करु नका” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
🗣️ *श्रीवास्तव म्हणाले* : भारतावर अवलंबून असलेल्या शेजारी देशांना आम्ही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांचा पुरवठा करणार आहोत. “COVID19 ची दाहकता लक्षात घेता आंतरराष्ट्रीय समुदायाने मानवतेच्या दृष्टीकोनातून एकजूटता आणि सहकार्य केले पाहिजे ही भारताची सुरुवातीपासून भूमिका आहे.
📌 आमच्यावर अवलंबून असलेल्या देशांना आम्ही हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन व पॅरासीटेमॉल औषधांचा पुरवठा करु, “अनावश्यक वाद निर्माण करु नका. देशांतर्गत गरज पूर्ण झाल्यानंतर अन्य देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करणार असल्याचे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
😷 *'या' मास्कद्वारे प्रसार कमी होऊ शकतो!*
*LetsUp l Trending*
⚡ सर्जिकल मास्क लावल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत मिळू शकते, असा दावा एका संशोधनात केला आहे. हे संशोधन नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.
💁🏻♂️ आतापर्यंत सर्जिकल मास्कचा वापर हा इन्फ्लुएंजा व्हायरसचा प्रसार कमी करण्यासाठी केला जात असे. मात्र कोरोना व्हायरससह अन्य व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी या मास्कच्या वापराबाबत कमी माहिती उपलब्ध आहे.
👨🏻🔬 संशोधकांनी या अभ्यासासाठी श्वासाची समस्या असणाऱ्या 246 रुग्णांवर संधोशन केले. यातील काही जणांना सर्जिकल मास्क घालून आणि काहींना विना मास्क लावता गेसुंडाइट मशीनमध्ये ठेवले होते.
🧪 *संशोधनात आढळले* : संक्रमित 111 लोकांनी शिंकल्यानंतर मास्कद्वारे थेंब बाहेर येण्यापासून रोखले. त्यामुळे अन्य लोकांना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी आहे.
🧐 *हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनुसार* : सर्जिकल मास्कदेखील कोरोना व्हायरसचा प्रसार रोखू शकतो की नाही हे शोधण्यासाठी संशोधन करणे गरजेचे आहे.
📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
💥 *'कोरोनाचे 'हे' तिसऱ्या टप्प्याचे लक्षण'*
*LetsUp l Mumbai*
⚡ राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 868 वर पोहचली आहे. मुंबई शहर उपनगरात कोरोना (कोविड-19) रुग्ण वाढतच आहे. महानगरातील कोरोना बाधितांची संख्या 490 वर जाऊन पोहोचली आहे.
👉🏻 *इशारा* : रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत आहे. शहर उपनगरातील मृतांचा आकडा 34 वर पोहोचला आहे. राज्यभरासह देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे.
👀 *चिंता वाढवणारी* : भारतात काही ठिकाणी कोरोना व्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असल्याची चिंताजनक माहिती डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. 'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी असल्याचे गुलेरिया यांनी सांगितले.
🗣️ *रणदीप गुलेरिया म्हणाले* : संपूर्ण देशाचा विचार केला, तर सध्या भारत दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या मध्यभागी आहे. कोरोनाची लागण कुठून झाली याची कुणतेही माहिती नसलेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे. हे तिसऱ्या टप्प्याचे लक्षण आहे.
😷 मुंबईचा काही भाग आणि देशातले कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कम्युनिटी स्प्रेड इतक्या झपाट्याने होतो आहे अश्या ठिकाणी कोरोनाने आधीच तिसरा टप्पा गाठल्याचे रणदीप गुलेरीया यांनी सांगितले.
📌 मुंबईच्या ज्या भागात कोरोनाने तिसरा टप्पा गाठला आहे त्या ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आली नाही तर कोरोना झपाट्याने पसरेल आणि मुंबईची स्थिती न्यूयॉर्कसारखी होईल असा इशारा रणदीप गुलेरीया यांनी यावेळी दिला.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
*बुलढाणा जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा*
*LetsUp | Buldhana*
कोरोना संसर्गाचा विळखा आता बुलडाणा जिल्ह्यास पडत असून आणखी दोन जणांचे स्वब नमुने पॉझीटीव्ह आले आहेत.
यामध्ये बुलडाण्यातील एक रुग्ण तर शेगावातील एक रुग्णाचा समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे,
परिणामी जिल्ह्यात आता समूह संक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
*गोविंद नगरचा भाग मनपाकडून 14 दिवस प्रतिबंधित*
*LetsUp | Nashik*
नाशिक जिल्ह्यात दुसरा आणि शहरात पहिला कोरोना बाधित दुसरा रुग्ण आढळल्यानंतर मनपा कडून कोरोना बाधित झालेल्या रुग्णाच्या घराजवळचा भाग 14 दिवसांसाठी प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे.
तसे पत्रक मनपाच्या आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आले आहे.
*3 किलोमीटर पर्यंत प्रतिबंध*
शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या मनोहर नगर येथील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झाल्यांनातर त्वरित महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने मनोहर नगर, गोविंद नगर हे केंद्रस्थानी ठेवून 3 किलोमीटर त्रिज्या असलेला परिसर 14 दिवसांसाठी पूर्णपणे प्रतिबंधित परिसर म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे 14 दिवस या भागातील कोणताही नागरिकाला घरातून बाहेर पडता येणार नाही
*तर होणार पोलीस कारवाई*
कोरोना बाधित रुग्णाच्या आजूबाजूचा परिसर 14 दिवस प्रतिबंधित असल्याने या भागात आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
6 624
😱 *अमेरिकेत कोरोनाचा कहर, 24 तासांत 1150 जणांचा मृत्यू*
*LetsUp | Corona Live*
🇺🇸 कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान घातले आहे. अमेरिकेसारख्या महासत्ता देशासह अनेक जगभरातील देशांना कोरोनाचा फटका बसला आहे.
🛅 दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बहुतांश देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे.
😰 *1150 लोकांचा मृत्यू* : अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 11500 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 10000 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
😷 जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत आतापर्यंत 3 लाख 66 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
⏳ यामध्ये गेल्या 24 तासांत 30 हजार कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत 10 हजार 783 लोकांचा मृत्यू झाला आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : http://bit.ly/Letsupapp
