uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Kanalga Telegram’da o‘tish

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Ko'proq ko'rsatish
6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - 10 लाख बँक कर्मचारी आजपासून दोन दिवस संपावर, ग्राहकांनी गैरसोय होऊ नये म्हणून यूपीआय, इंटरनेट बँकिंग वापरावे, असे बँकांनी केले आवाहन ● नवी दिल्ली - कथुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेची माहिती उघड करणाऱ्या बातम्या हटवण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश ● जकार्ता - पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशियामध्ये दाखल, मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशियाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर ● मुंबई - गोंदिया –भंडारा लोकसभा मतदारसंघातील 49 ठिकाणी आज पुन्हा मतदान घेतले जाणार, ईव्हीएम-व्हीव्हीपॅटच्या घोळामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला निर्णय ● मुंबई - राज्यातील शहरी भागातील 600 चौरस फुटापर्यंतच्या बेकायदा निवासी अथवा वाढीव बांधकामांना नियमित करण्यासाठी आकारण्यात येणारी दंडाची रक्कम पूर्णपणे माफ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय ● पुणे- राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2018 दरम्यान घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार ● पुणे - 1 जून पासून राज्यात पुन्हा शेतकरी आंदोलन, किसान सभा राज्यभरातील तहसील कार्यालयांना घेराव घालणार ● फोर्ड मोटर्सने आपल्या इकोस्पोर्ट या लोकप्रिय मॉडेलचे एस आणि सिग्नेचर एडिशन या नावाने दोन नवीन व्हेरियंट ग्राहकांना केले सादर ● मुंबई - आयपीएल दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे भारतीय संघाचा यष्टीरक्षक वृद्धीमान सहा अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यास मुकणार ● मुंबई - अभिनय बेर्डेनेचा दुसरा चित्रपट 'अशी ही आशिकी' लवकरच येणार, या चित्रपटासाठी हिरोईन म्हणून हेमल इंगळेची निवड For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 बारावीच्या निकालाची तारीख जाहीर Letsup I Breaking महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 30 मे 2018 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. खालील बोर्ड वेबसाईटवर देखील निकाल उपलब्ध करुन देणार आहे. शिवाय SMS द्वारे मोबाईलवरही निकाल मिळू शकेल. ▫ www.mahresult.nic.in ▪ www.result.mkcl.org ▫ www.maharashtraeducation.com ▪ www.knowyourresult.com ▫ www.hscresult.mkcl.org For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 भरघोस ऑफरसह आलंय पतंजलीचं सीमकार्ड LetsUp I Update बीएसएनएलसोबत भागीदारी करत योग गुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने 'स्वदेशी समृद्धी सिम कार्ड' लाँच केले आहे. या सिमद्वारे केवळ डेटा आणि कॉलिंग सुविधाच नाही, तर वैद्यकीय सुविधा देणंही आमचे ध्येय आहे, असे रामदेव बाबांनी सांगितले. 👉 जाणून घ्या सिम कार्डची वैशिष्ट्ये : ▫ पतंजलीच्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून सिम मिळणार ▪ 144 रुपयांच्या रिचार्जमध्ये 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा ▫ पंतजलीच्या वस्तूंवर दहा टक्के सूट ▪ सिमधारकांना अडीच लाख रुपयांचा वैद्यकीय विमा आणि पाच लाख रुपयांचा जीवन विमा ▫ विम्याची रक्कम फक्त रस्ते अपघातातील व्यक्तींनाच मिळणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - टेलिकॉम क्षेत्रात पतंजलीचा प्रवेश; समृद्धी सिमकार्ड बाजारात दाखल, हरिद्वारमध्ये या सिमकार्डचे अनावरण ● इस्लामाबाद - पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवृत्त न्यायाधीश नसीर उल मुल्क कार्यभार सांभाळणार ● बंगळुरु - कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सिद्धू न्यामगौडा यांचा रस्ते अपघातात मृत्यू, काँग्रेस आमदारांची संख्या कमी होऊन झाली 77 ● मुंबई - कर्नाटक निवडणुकीनंतर सलग सुरू असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने महाराष्ट्रासह 19 राज्यांना 18,728 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला ● पालघर, गोंदियात 'ईव्हीएम'मध्ये बिघाड; पालघरमध्ये 46 तर भंडारा- गोंदियात 42 % मतदानाचा प्राथमिक अंदाज ● मुंबई - राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी 160 ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करणार, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा ● पुणे - नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) आज मंगळवारी, 29 मे रोजी दक्षिण केरळमध्ये दमदारपणे दाखल होण्याची शक्यता ● वादात सापडलेल्या पेटीएमने आपण युजर्सचा डाटा कोणत्याही थर्ड पार्टीला देत नसून सुरक्षा व गोपनीयतेला प्राधान्य देत असल्याचे दिले स्पष्टीकरण ● नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) केंद्र सरकारला भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत आपली नीती अधिकृतपणे स्पष्ट करण्याची केली विनंती ● मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असलेल्या 'राझी' चित्रपटाने अल्पावधीतच शंभर कोटींचा टप्पा केला पार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📣 CBSE बोर्ड; दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर LetsUp I Update ▫ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर ▪ उद्या मंगळवारी दुपारी 4 वाजता सीबीएसईच्या 10 वी च्या परिक्षेचा निकाल जाहीर होणार ▫ cbse.nic.in या वेबसाईटरवर निकाल पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 सकारात्मक जगण्यासाठी आवश्यक सवयी LetsUp I Motivational ▫ सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल असे काही तरी दिवसभरात एक तरी काम करा. ▪ सकाळी उठल्यावर स्वतःला आरशात पहा आणि स्वत:ला शुभेच्छा द्या. ▫ तुम्ही ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या कायम स्मरणात ठेवा. त्याची उजळणी करत राहा. ▪ डोळे मिटा आणि तुमची स्वप्ने आणि ध्येय शांतपणे पहा. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📣 आता व्हॉट्सअॅपवर मीडिया कंटेंट लपवता येणार LetsUp I Update व्हॉट्सअॅपवर 'मीडिया व्हिजीबिलीटी' हे नवीन फीचर आले आहे. हे फीचर व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड बीटा अॅपच्या 2.18.195 व्हर्जनवर उपलब्ध होणार आहे. या फीचरमुळे व्हॉट्सअॅपवर आलेले फोटो, व्हिडिओ किंवा Gif फाईल्स यांसारखे मीडिया कंटेंट गॅलरीमध्ये हाईड करता येणार म्हणजे लपवून ठेवता येणार आहे. तसेच आणखी एक नवीन फीचर 'कॉन्टॅक्ट शॉर्टकट' आले आहे. या फीचरद्वारे व्हॉट्सअॅपवरून कोणत्याही नवीन कॉन्टॅक्टला अॅड करणे सोपे होणार आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎉 चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन Letsup I Ipl Special चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 साली आयपीएलचे विजेतेपद पटकावले. शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. याबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 👉 अंतिम सामन्यात झालेले काही विक्रम : 1) आयपीएलच्या अंतिम फेरीत धावसंख्येचा पाठलाग करताना शतक झळकावणारा शेन वॉटसन हा पहिला खेळाडू ठरला आहे. वृद्धिमान साहाने याआधी 2014 साली आयपीएलच्या अंतिम फेरीत शतक झळकावले होते, मात्र साहाचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता. 2) एखाद्या संघाने एका संघाला एकाच हंगामात आतापर्यंत 4 वेळा पराभूत केले नव्हते. 2018 साली चेन्नई सुपरकिंग्ज संघाने ही किमया साधली आहे. साखळी फेरीत दोनदा, एकदा क्वालिफायर सामन्यात व एकदा अंतिम फेरीत चेन्नईने हैदराबादवर मात केली आहे. 3) रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत 4 आयपीएल विजेतेपद जमा आहेत. (3 वेळा मुंबई इंडियन्स, 1 वेळा डेक्कन चार्जर्स) या पंक्तीत आता अंबाती रायडू आणि हरभजनसिंह यांनाही स्थान मिळाले आहे. 4) चेन्नई सुपरकिंग्जने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या 3 वेळा विजेतेपद मिळवण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 5) आयपीएल टायटल जिंकण्यासोबतच धोनीने आणखी एक विक्रम नावावर केला. धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करणारा विकेटकीपर ठरला आहे. धोनीने विकेटच्या मागे आतापर्यंत 33 स्टम्पिंग केल्या आहेत. 6) अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जच्या एनगिडी आणि हैदराबाद संघाच्या भुवनेश्वर कुमारने निर्धाव षटके टाकली. 7) धोनी व रैना सातव्यांदा चेन्नईकडून फायनलमध्ये खेळले. धोनी एकदा पुणे संघाकडून फायनलपर्यंत पोहोचला. 8) बक्षीस आणि रोख रक्कम : चेन्नई (विजेता संघ) - 20 कोटी आणि ट्रॉफी I हैदराबाद (उपविजेता संघ) – 12.5 कोटी : I केन विल्यमसन (ऑरेंज कॅप) - 12 लाख आणि ट्रॉफी I अँड्रू टाय (पर्पल कॅप) - 10 लाख आणि ट्रॉफी For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - देशातील सर्व राजकीय पक्ष 'आरटीआय'च्या कक्षेबाहेर, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण, दक्षता आयोगाचे निर्देश धुडकावले ● नवी दिल्ली - किफायतशीर दरात आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा देणाऱ्या जगभरातील आघाडीच्या पाच कंपन्यांमध्ये इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या भारतीय कंपन्यांचा समावेश ● श्रीनगर - पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेनजीकच्या गावांमध्ये तब्बल 5,500 बंकरची उभारणी केली जाणार, तसेच 200 सीमा भवन बांधण्याचे नियोजन ● लंडन - भारत-श्रीलंका संबंधांच्या 195 फाईल ब्रिटनने केल्या नष्ट, संशोधक-अभ्यासकांची चिंता ● इस्लामाबाद - पाकिस्तानात 25 जुलै रोजी निवडणूक होणार, राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी निवडणूक आयोगाच्या प्रस्तावित तारखेला दिली मंजुरी ● तिरुवनंतपुरम - केरळमधील निपाह व्हायरसच्या प्रकोपामुळे संपूर्ण राज्यातील लोकांच्या मनात धास्ती निर्माण, फळांचा व्यापार झाला ठप्प ● मुंबई - पालघर आणि भंडारा-गोंदियातल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान, या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार ● शाओमी कंपनीने आपली मी क्रेडीट ही नवीन सेवा केली सुरु, या माध्यमातून ग्राहकांना इन्स्टंट पर्सनल लोन प्रदान करण्यात येणार ● शेन वॉटसनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमधील आपल्या तिसऱ्या विजेतेपदाची मोहोर उमटविली ● मुंबई - मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट 'आपला माणूस' च्या हिंदी रिमेकमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागण्याची शक्यता For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🍽 भाकरी पिझ्झा Letsup I Recipe भाकरी पिझ्झा शरीरासाठी अतिशय पौष्टीक आहे. चला तर आज भाकरी पिझ्झा कसा बनतो याबद्दल माहिती जाणून घेवूयात. साहित्य : बाजरी / ज्वारीची भाकरी - 1, घट्ट वरण - 1 वाटी, टोमॅटो - 1 (बारीक चिरलेले), काकडी - 1 (बारीक चिरलेली), कांदा - 1 (बारीक चिरलेला), कोथिंबीर - आवश्यकतेनूसार, चीझ - 50 ग्रॅम, तिखट, मीठ, चाट मसाला - चवीनुसार. कृती : घट्ट वरणामध्ये तिखट, मीठ टाकुन मिश्रण तयार करुन घ्या. सर्वात आधी एका बाजूने भाकरीवरील पापुद्रा काढूण टाका. नंतर त्यावर तयार केलेले घट्ट वरणाचे मिश्रण पसरवून घ्यावे. वरण पसरवल्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि काकडी टाकूण पुन्हा घट्ट वरणाचे मिश्रण पसरवून घ्या. नंतर त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. तसेच चवीनुसार चाट मसाला टाका. यानंतर टोमॅटो सॉसने भाकरीवर डिझाईन बनवा, यामुळे ते चांगले दिसेल. त्यानंतर चीझ त्याच्यावर किसून घ्या. यानंतर भाकरीला पिझ्झ्यासारखे कट करुन घ्या. तुमचा भाकरी पिझ्झा आता तयार आहे. टिप : तुम्ही हा पिझ्झा टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी सोबत खाऊ शकतात. भाकरी आधल्या दिवशीच्या असल्या तर पिझ्झ्यामध्ये चांगली टेस्ट येईल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - सन 2012-13 ते 2016-17 या कालावधीत सर्वाधिक 20 हजार 475 आंतरजातीय विवाह महाराष्ट्रामध्ये ● नवी दिल्ली - ई-फायलिंगसाठी 7 आयटीआर फॉर्म जारी; यामुळे करदात्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने परतावा भरणे झाले सोपे ● नवी दिल्ली - सीबीएसई बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, यंदा 83.01% निकाल, निकालात मुलींनी मारली बाजी ● नवी दिल्ली - चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा बुक करणाऱ्या भाविकांना आता 15 ते 16% जास्त भाडे मोजावे लागेल ● दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने कुख्यात गँगस्टर अबु सालेमला 2002 च्या खंडणी प्रकरणात ठरवले दोषी ● आयर्लंडमध्ये अबॉर्शनवरील जनमत चाचणीत 60 टक्के लोकांनी अबॉर्शनवरील बंदी उठवण्याचे केले समर्थन ● एसटीचे दर लवकरच वाढणार, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले संकेत, डिझेल दर वाढीमूळे एसटीला 470 कोटीचा फटका ● विवो कंपनी आपला विवो एक्स-21 हा फ्लॅगशीप स्मार्टफोन 29 मे रोजी भारतात करणार लाँच, याची अगावू नोंदणी सुरू ● IPLचा महामुकाबला आज रंगणार; तिसऱ्यांदा चॅम्पियनसाठी चेन्नई सज्ज तर हैदराबादची नजर दुसऱ्या जेतेपदावर ● मुंबई - बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच 'उधम सिंह' या सिनेमात झळकणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - भारतात 2030 पर्यंत सर्व वाहने इलेक्ट्रिक करण्याचे सरकारने ठेवले उद्दिष्ट, मात्र ते 2050 पर्यंत शक्य होणार ● नवी दिल्ली - आज बारावी सीबीएसई बोर्डाचा निकाल, मनुष्यबळ विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण सचिव अनिल स्वरूप यांची माहिती ● नवी दिल्ली - पेट्रोल-डिझेलपाठोपाठ ग्राहकांना आता बसणार वीज दरवाढीचा शॉक, वीजपुरवठ्याचे संकट निर्माण झाल्यामुळे वीज दरात अनपेक्षित वाढ अपेक्षित ● नवी दिल्ली - भारताने 2022 पर्यंत सौर व पवनऊर्जा क्षेत्रात 175 गिगावॅट वीजनिर्मिती करण्याचे केले उद्दिष्ट, त्यातून 3 लाख कामगारांना रोजगार मिळेल ● नवी दिल्ली - भारतातील सर्वात पहिली प्रवासी क्रूझ सेवा मुंबई ते गोवा जलमार्गावर सुरु, या क्रूझने प्रवास करायचा असल्यास तुम्हाला 7 हजाराहून अधिक पैसे मोजावे लागणार ● बंगळुरु - काँग्रेस-जेडीएस आघाडीने कर्नाटक विधानसभेत बहुमत केले सिद्ध, काँग्रेस-जेडीएस युतीला मिळाली 117 मते ● ठाणे - उद्धव ठाकरेंकडून भर सभेत मुख्यमंत्र्यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप सादर, याध्ये मुख्यमंत्र्यांनी वापरलेली भाषा पक्षासाठी अडचणीचा मुद्दा ठरण्याची शक्यता ● नवी दिल्ली - काऊंटर पॉइंटने दिलेल्या रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओचा फोन 2018 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच जगभरात बेस्ट सेलिंग फीचर फोन म्हणून आला समोर ● ईडन गार्डन्सवरच्या क्वालिफायर टू सामन्यात हैदराबादने कोलकात्यावर 13 धावांनी केली मात, आता विजेतेपदासाठी रविवारी चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद अशी फायनल रंगणार ● मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'रेस 3'मधील दुसरे गाणे 'सेल्फिश' रिलीज, या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे सलमान खानने हे गाणे लिहिले आहे For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💡 मुकेश अंबानींची भन्नाट योजना; कल्पना तुमची गुंतवणूक आमची! LetsUp I Faide Ki Baat तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मुकेश अंबानी यांनी एक योजना आखलीय. त्यानुसार तुम्ही तुम्हाला सुचलेली कल्पना कंपनीला (रिलायन्स इंडस्ट्रीज) पाठवायची. जर तुमची कल्पना कंपनीला आवडली तर कंपनी त्यात गुंतवणूक करणार आहे. सोबत कंपनीकडून तुम्हाला तीन महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाईल. या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यापासून तो यशस्वी करण्यासाठी अनेक गोष्टींचे मार्गदर्शन केले जाईल. 👉 अर्ज कुठे कराल? : या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रथम https://goo.gl/gi665e इथे क्लिक करा. त्यानंतर वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज दाखल करावा लागेल. यामध्ये कंपनीद्वारे विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरेही तुम्हाला द्यावी लागतील. त्यानंतर तुम्हाला एक अर्जही मिळेल. यानंतर कंपनीकडून तुम्हाला संपर्क केला जाईल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 कसा आहे बकेट लिस्ट? LetsUp I Movie Review माधुरी दीक्षितचा पहिला-वहिला मराठी चित्रपट 'बकेट लिस्ट' आज बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन'चा सिनेमा असल्यामुळे यात सगळा व्यावसायिक मसाला पहायला मिळतो. हि कथा आहे सई नावाच्या वीस वर्षीय तरुणीची. हृदयदान करणाऱ्या या तरुणीच्या इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार मधुरा साने (माधुरी दीक्षित) करते. पुढे सईच्या इच्छा पूर्ण करताना येणाऱ्या गंमती आणि अडचणी या बकेट लिस्टमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. आता ही सई कोण, ती माधुरीच्या आयुष्यात का येते आणि तिची बकेट लिस्ट माधुरी का पूर्ण करते? असे प्रश्न पडले असतील, तर त्याची उत्तरे थिएटरमध्येच मिळतील. 'बकेट लिस्ट'मध्ये माधुरीबरोबर मराठीतल्या कलाकारांची तगडी टीम आहे. सर्वानी सुरेख काम केलंय. सिनेमातील गाणीही आशयाला सोबत नेणारी आहेत. प्रेक्षकांना फार विचार करायला न लावणारा, त्यांची मस्त करमणूक करणारा, खळ-खळून हसवणारा आणि मध्येच रडवणारा हा सिनेमा नक्की पहा! (रेटिंग : 3.5 / 5) For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 येत्या 48 तासांत मान्सून अंदमानात LetsUp I Update ▫ मान्सून सक्रीय होण्याच्या दृष्टीने पुन्हा अनुकूल वातावरण निर्माण ▪ येत्या 48 तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल झाल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली ▫ मिकुनू चक्रीवादळाचा मान्सूनच्या प्रवासावर परिणाम नाही ▪ उद्या शनिवारी दक्षिण कोकणात व गोव्यात पावसाची शक्यता For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

_*LetsUp News Updates*_ ● श्रीनगर - जम्मू-काश्मीर पोलिस खात्याच्या जवानांना कामावर असताना स्मार्टफोन बाळगण्यास बंदी ● इस्लामाबाद - पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच तृतीयपंथी उमेदवार सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ● महाराष्ट्रासह 27 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 25 मे पासून राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी ई-वे बिल प्रणाली ● मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ, तर मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, 25 जूनला मतदान, 28 जूनला निकाल ● छत्तीसगड - पुसवाडाजवळ माओवाद्यांचा हल्ला, IED ब्लास्टमध्ये कोब्रा बटालियनचा एक जवान शहीद ● पुणे - येत्या 48 तासात मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने केला व्यक्त ● पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सहायक प्राध्यापक पदांसाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (सेट) निकाल ऑनलाईन जाहीर ● शाओमीचा रेडमी 5A हा स्मार्टफोन तुफान लोकप्रिय, जागतिक बाजापेठेत या मॉडेलने पटकावला तिसरा क्रमांक ● कोलकाता - आयपीएल-11 चा दुसरा पात्रता सामना आज शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराझर्स हैदराबाद दरम्यान रंगणार ● मुंबई - आता बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे शर्मिष्ठा राऊत प्रवेश करणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 SBI मध्ये 10,300 कर्मचाऱ्यांची भरती LetsUp I Job Update देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) 15,762 जागा रिकाम्या झाल्या असून त्यातील 10,300 कर्मचाऱ्यांची भरती बँक येत्या वर्षात करणार आहे. एसबीआयमध्ये सेवानिवृत्ती आणि डिजिटायझेशनमुळे वर्ष 2017-18 मध्ये 15,762 कर्मचारी कमी झाले आहेत. या जागा भरून काढण्यासाठी एसबीआय मार्च 2019 अखेर 10,300 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏏 कोलकात्याची क्वालिफायर-2 मध्ये धडक LetsUp I IPL Special कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सवर 25 धावांनी मात करत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली आहे. आता फायनलच्या तिकीटासाठी कोलकात्याचा मुकाबला हैदराबादशी होईल. हा सामना 25 मे रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरच खेळवण्यात येईल. दरम्यान, एलिमिनेटर सामन्यात कोलकात्याने राजस्थानला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले होते. मात्र राजस्थानला वीस षटकांत चार बाद 144 धावांचीच मजल मारता आली. अवघ्या 25 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचत 49 धावांची निर्णयाने खेळी करणाऱ्या आंद्रे रसेलला सामानावीराचा पुरस्कार देण्यात आला. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - देशात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता मावळली, सोईसुविधांसाठी दरवाढ होतच राहणार, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण ● नवी दिल्ली - घर खरेदी करणाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, दिवाळखोर बिल्डरच्या संपत्ती वाटा मिळणार, बिल्डर दिवाळखोरीत गेल्यास त्यांच्या संपत्तीत वाटा मिळणार ● नवी दिल्ली - आरोग्य सुविधेच्या बाबतीत भारताची स्थिती अत्यंत खराब, 195 देशांमध्ये भारताचा नंबर 145 वा ● नवी दिल्ली - महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांसह नक्षलवादी कारवायांग्रस्त राज्यांत 4,072 मोबाइल मनोरे (टॉवर्स) उभारण्यात येणार ● नवी दिल्ली - 3 लाख टन साखरेच्या बफर स्टॉकची तयारी, साखर राखीव साठ्यासाठी कारखानदारांना किलोमागे 30 रुपये दराची शक्यता ● श्रीनगर - जम्मू-काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांच्या हल्ल्यातून महाराष्ट्रातील 5 आमदार बचावले सुखरूप ● बेंगळुरू - एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे 25 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ, शपथविधी समारंभामध्ये भाजपविरोधी 11 पक्षीय नेत्यांची एकजूट ● इन्स्टाग्रामवर 'म्युट' हे फिचर, यामध्ये आपण ज्या युजरला म्युट करणार आहोत, त्याच्या पोस्ट आपल्याला दिसणार नाही ● कोलकाता नाईट रायडर्सचा राजस्थान रॉयल्सवर 25 धावांनी दणदणीत विजय, आता फायनलच्या तिकीटासाठी कोलकात्याचा हैदराबादशी मुकाबला ● बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा लवकरच छोट्या पडद्यावर करणार पर्दापण For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 मोदी केअर योजनेंतर्गत तपासणी व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात LetsUp I Update केंद्र सरकारच्या मोदी केअर योजनेंतर्गत 1352 प्रकारच्या तपासणी व शस्त्रक्रिया सवलतीच्या उपलब्ध होणार असून नुकतेच त्याचे दर जाहीर झाले आहेत. केंद्रीय आरोग्य योजनेपेक्षाही (सीजीएचएस) या योजनेतील प्रोसिजर, शस्त्रक्रिया व तपासणीचे दर कमी आहेत. मंत्रालयाच्या वेबसाईटवर व एनएचपीएमच्या पोर्टलवर त्याची यादी लवकरच अपलोड केली जाणार आहे. या योजनेत गुडघा प्रत्यारोपणासाठी 90 हजार रुपये, 40 हजारांत स्टेंट तर एक लाख 10 हजार रुपयांत बायपास शस्त्रक्रिया होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने खासगी रुग्णालयांना मोदी केअर योजनेत जोडण्यासाठी व रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी खासगी रुग्णालयांना 30 % इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला आहे. एनएबीएच मान्यताप्राप्त रुग्णालयांना निश्चित केलेल्या दरापेक्षा 10 % जास्त रक्कम दिली जाईल. वैद्यकीय महाविद्यालयांनाही 10 % इन्सेंटिव्ह मिळेल. या सर्व सुविधा मागास भागातील रुग्णालयात असतील तर अशा रुग्णालयांना 30 टक्के इन्सेंटिव्ह मिळेल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup