uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Kanalga Telegram’da o‘tish

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Ko'proq ko'rsatish
6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
🤝 मैत्रीचं नातं अधिक घट्ट करणारा दिवस 'फ्रेंडशिप डे' LetsUp | Special संपूर्ण जगभरात विविध दिवशी 'फ्रेंडशिप डे' साजरा केला जातो. पण भारतासोबतच अनेक दक्षिण आशियाई देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. हल्ली इंटरनेट आणि व्हर्च्युअलच्या जमान्यात आपण एकमेकांच्या 'टच' मध्ये असतो मात्र भेटायचं राहून जातं. चला तर आज आपल्या खास मित्र-मैत्रिणींना भेटण्याचा प्रयत्न करूया. त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करूया. सोबत असलो कि, भेटवस्तू, खास संदेश आणि पार्टी, पिकनिक प्लॅन सगळं होणारच आहे. आज फ्रेंडशिप बँड बांधूच. पण आपली परस्पर बॉण्डिंग वाढवू. आपला रुसवा फुगवा विसरुन नव्याने मैत्रीला सुरुवात करू. हेच या दिवशी अपेक्षित आहे. याच मैत्रीला आणखी घट्ट करणारी अनेक गाणी चित्रपटात चित्रित झाली आहेत. आज या निमित्ताने अशाच काही लोकप्रिय गाण्यांवर एक नजर... 1. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे : http://bit.ly/339MlMF 2. तेरे जैसा यार कहां : http://bit.ly/2MBwikU 3. सलामत रहे दोस्ताना हमारा : http://bit.ly/2MBnr2B 4. यारी है इमान मेरा : http://bit.ly/2Ke7qhk 5. आया मौसम दोस्ती का : http://bit.ly/2GK6pf5 6. यारों दोस्ती बड़ी ही हसीन है : http://bit.ly/2yy0SDQ 7. दिल चाहता है : http://bit.ly/2YFaUlf 8. तू ही तो मेरी दोस्त है : http://bit.ly/2KpPb7A 9. अल्लाह वारियां : http://bit.ly/2T3W3LG 10. सूरज डुबा है यारो : http://bit.ly/2ZG9W5e 11. जाने नहीं देंगे तुझे : http://bit.ly/31mYpsl 12. हर एक फ्रेंड कमीना होता है : http://bit.ly/2LZ1vil 13. तेरा यार हूँ मैं : http://bit.ly/2Vnhhbk 14. हि दोस्ती तुटायची नाय : http://bit.ly/2YnZkM6 15. तेरी मेरी यारियां : http://bit.ly/2MxYzJb 16. झिंदगी झिंदगी : http://bit.ly/2YJTWlD न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏏 भारताचा वेस्ट इंडिजवर विजय; नवदीप सैनी चमकला LetsUp | Sports ⚡ पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत 4 गडी राखून मिळवला विजय 💁‍♂ विंडीजने दिलेले 96 धावांचे आव्हान भारताने 17.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात केले पूर्ण 👍 या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी घेतली आघाडी 🏆 गोलंदाज नवदीप सैनीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला 📍 सामन्यातील काही विक्रम : ● आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासात, भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाचे सलामीवीर शून्यावर बाद करण्याची ही पहिलीच वेळ ठरली ● आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये डावातील 20 वे षटक निर्धाव टाकणारा नवदीप सैनी हा पहिला भारतीय तर जगातील केवळ चौथा गोलंदाज ठरला 🧢 आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 20वे षटक निर्धाव टाकणारे गोलंदाज : ● जीतन पटेल (न्यूझीलंड Vs वेस्ट इंडीज, 2008) ● मोहम्मद अमीर (पाकिस्तान Vs ऑस्ट्रेलिया, 2010) ● जनक प्रकाश (सिंगापूर Vs कतार, 2019) ● नवदीप सैनी (भारत Vs वेस्ट इंडीज, 2019) न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUp News Updates ● काश्मीरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय जवानांनी पाकिस्तानचा घुसखोरीचा डाव हाणून पाडला ● अमेरिकेच्या टेक्सासमध्ये बेछूट गोळीबार, 2 ठार तर 20 जखमी; पोलिसांकडून तीन संशयित ताब्यात ● मराठी सिनेसृष्टीतील गुणी अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन ● आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा ● नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यात 4 विद्यार्थिनी वाहून गेल्या, तिघींचे मृतदेह सापडले ● राज्यसभेत कामगार वेतन विधेयकाला मंजुरी, 50 कोटी कामगारांना होणार फायदा ● अनेक मार्ग बंद झाल्याने महाबळेश्वरला जाणारी वाहतूक ठप्प, 56 गावांचा संपर्कही तुटला ● आता टिक-टॉक युजर्स आपल्या पोस्टमध्ये जिफ (GIF) फाईल देखील जोडू शकणार ● पहिल्या टी20 सामन्यात भारताचा विंडीजवर संघर्षपूर्ण विजय, गोलंदाज नवदीप सैनी सामनावीर ● अभिनेता सिद्धार्थ जाधवचं 'जागो मोहन प्यारे' हे नाटक आता चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📣 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती LetsUp | Job 💁‍♂ पदाचे नाव (स्केल) व पद संख्या ● लॉ ऑफिसर (II) : 25 ● सिक्योरिटी ऑफिसर (II) :12 ● फायर ऑफिसर (II) : 01 ● इन्फॉर्मेशन सिस्टम (IS) ऑडिटर - III) :05 ● इकोनॉमिस्ट (IV) :01 ● इकोनॉमिस्ट (II)01 ● मॅनेजर (कॉस्टिंग) - II) 03 💸 फी : General /OBC : ₹708/- (SC/ST/PWD: ₹118/-) 👍 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 19 ऑगस्ट 2019 📅 अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची मुदत : दि. 29 ऑगस्ट 2019 📍 अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : The Asstt. General Manager (IR & HRD) Bank of Maharashtra ‘Lokmangal” 1501, Shivaji Nagar Pune-411005 🗞 अर्ज व अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2LWWdE3 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏏 आज भारत-विंडीज पहिला सामना टी-20 रंगणार LetsUp | Sports ⚡ भारताची विंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिली लढत आज (शनिवारी) रंगणार 👉 भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर तीन टी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळणार 🔎 युवा खेळाडूंची चाचणी म्हणून विंडीज दौऱ्यातल्या या टी-20 आणि वन डे सामन्यांकडे पाहिले जात आहे 💫 दुसरीकडे विंडीजचा संघ टी-20 तील सर्वाधिक धोकादायक संघ असल्याने त्यांना कमी लेखून चालणार नाही 🧐 आमने-सामने इतिहास : टी-20 सामने : 11 I भारत : 5 विजय I विंडीज : 5 विजय I अनिर्णित : 1 👍 रोहितला विक्रमाची संधी : ● रोहित शर्माला टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा ख्रिस गेलच्या नावावर असलेला विक्रम मोडण्याची संधी ● गेलने 58 सामन्यांत 105 षटकार तर रोहितने 94 सामन्यांत 102 षटकार ठोकले आहेत ● आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम (2,331 धावा) रोहितच्या नावावर ⌛ सामन्याची वेळ : रात्री 8 पासून. 👉 स्थळ : सेंट्रल ब्रोवर्ड रिजनल पार्क स्टेडियम, लॉडरहिल, फ्लोरिडा. 👀 थेट प्रक्षेपण : सोनी टेन-1, सोनी टेन - 3 📍 संघ असे : 🧢 भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, कृणाल पंडय़ा, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी. 🧢 वेस्ट इंडिज : कालरेस ब्रेथवेट (कर्णधार), जॉन कॅम्पबेल, इविन लुइस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, किरॉन पोलार्ड, रोव्हमन पॉवेल, कीमो पॉल, सुनील नरिन, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, अँथनी ब्रॅम्बल, आंद्रे रसेल, खारी पाएरे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUp News Updates ● चांद्रयान-2 यानाची यशस्वी वाटचाल सुरु, नुकतीच चांद्रयान-2 ने चौथी कक्षा (orbit) यशस्वी पार केली ● जम्मू काश्मीर सरकारकडून अमरनाथ यात्रेकरु आणि पर्यटकांना काश्मीर सोडण्याची सूचना, अमरनाथ यात्रा स्थगित ---------------------- 🤩 अ‍ॅमेझॉनवर 'Super Value Day' सेल, ग्रॉसरी तसेच विविध प्रॉडक्टवर भरघोस डिस्काऊंट, 🎁 त्वरा करा, ऑफरसह खरेदीसाठी क्लिक करा : https://amzn.to/2ZoJixX ---------------------- ● जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांविरोधातील चकमकीत एक जवान शहीद, एका दहशतवाद्याला कंठस्नान ● पुरुष पालकांच्या परवानगीशिवाय आता परदेश प्रवासाला जाण्याची सौदी अरेबियातील महिलांना मुभा ● काँग्रेस अध्यक्षांना आता जालियनवाला बाग राष्ट्रीय स्मारकावर पदसिद्ध विश्‍वस्त म्हणून काम करता येणार नाही, दुरूस्ती विधेयक लोकसभेत संमत ● आयआयटी आणि रेल्वेच्या संयुक्त पथकाने सुचविलेल्या 20 पुलांची दुरुस्ती मध्य रेल्वेच्या पूल विभागाकडून पूर्ण ● राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का; मालेगाव महानगरपालिकेतील 20 नगरसेवकांनी पक्षाला दिली सोडचिठ्ठी ● विंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेतून घेतली माघार ● प्रो कबड्डी : हैदराबाद आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सामना बरोबरीत तर मुंबईचा गुजरातवर दणदणीत विजय ● अभिनेता संजय दत्तची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘बाबा’ चित्रपट ‘गोल्डन ग्लोब्ज 2020’मध्ये दाखवला जाणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🎬 कसा आहे 'बाबा'? LetsUp | Movie Review संवाद हा शब्दांच्या मर्यादांमध्ये कधीच बांधलेला नसतो, याची जाणीव करून देणारा 'बाबा' चित्रपट आज प्रदर्शित झाला. 🧐 कथा : ही गोष्ट आहे माधव आणि शंकर यांच्या नात्याची. मुलगा शंकर (8 वर्षे), माधव आणि त्याची पत्नी (दोघेही मूकबधीर) असे त्यांचे छोटेसे कुटुंब असते. पैसा नसला तरी माधव आपल्या परीने कष्ट करून शंकरला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. शंकर हा त्यांचा पोटचा मुलगा नसतो. त्याच्या एका मित्राने त्याला तो अनाथ म्हणून आणून दिलेला आहे. त्याला ऐकायला येतं पण मूकबधीर आई वडिलांसोबत राहिल्याने बोलता येत नाही. अशात एक दिवस शंकरची खरी आई पल्लवी एक दिवस तिच्या पतीसह गावडे दांपत्याच्या घरी येते. मग माधव आणि त्याची पत्नी दोघेही तिला शंकरला द्यायला नकार देतात. मग सुरू होतो तो शंकरवर कोणाचा हक्क आहे, हे सिद्ध करण्यासाठीचा कोर्टाचा लढा. तो लढा यशस्वी होतो की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल. माणसाच्या नात्यांची ओढ कित्येकदा त्याच्या रक्तापेक्षाही मायेने बांधलेली असते. ते निभावण्यासाठी शब्द नाही, संवाद महत्त्वाचा असतो, हे समजून सांगण्यात 'बाबा' यशस्वी ठरतो. दिग्दर्शकाने कथेला कुठेही सैल न सोडता त्यातल्या भावनांवर लक्ष केंद्रित केलंय. जे नक्कीच पाहण्यासारखं आहे. 🌟 रेटिंग : 3/5 🎬 कसा आहे 'खानदानी शफाखाना'? सोनाक्षी सिन्हा अभिनित ‘खानदानी शफाखाना’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. काकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सेक्स क्लिनीकची संपू्र्ण जबाबदारी सोनाक्षी कशाप्रकारे पेलते? हे दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 🧐 कथा : चित्रपटाची गोष्ट होशियारपुरमधील बेबीची (सोनाक्षी सिन्हा) आहे. सोनाक्षीच्या काकांचा (कुलभूषण खरबंदा) गुप्तरोगांवरील एक दवाखाना असतो. त्यांच्या मृत्यूनंतर हा दवाखाना ते आपली भाची 'बेबी'च्या नावाने करतात. परंतु जर हा दवाखाना तिला विकायचा असेल तर तो तिला 6 महिने चालवायला लागेल अशी जाचक अट ते मृत्यूपत्रात टाकतात. ज्या जागेवर दवाखाना उभा आहे, त्या जागेची किंमत बाजारभावाप्रमाणे एक कोटी असते. मग अपघाताने बेबी सेक्सॉलॉजिस्ट होते. या प्रवासात तिला कळतं की गुप्तरोगांबद्दल लोक खुलेपणाने बोलत नाही. आणि हा पेशा ती कसा साकारते हे या चित्रपटाचे मूळ कथानक आहे. चित्रपटातून देण्यात आलेला सामाजिक संदेश सुरेख आहे. आजच्या काळात अनेक समस्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट पाहायला हरकत नाही. 🌟 रेटिंग : 2.5/5 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💁‍♂ जाणून घ्या भारतातील विविध घटनांची पहिली सुरुवात LetsUp | Education 1) पहिले पंचतारांकित हॉटेल : ताजमहाल, मुंबई (1903) 2) पहिला मूकपट : राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती) 3) पहिला बोलपट : आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती) 4) पहिला मराठी बोलपट : अयोध्येचा राजा 5) पहिले जलविद्युत केंद्र : दार्जिलिंग (1898) 6) पहिला तेलशुद्धीकरण कारखाना : दिग्बोई (1901, आसाम) 7) पहिला आधुनिक पोलाद कारखाना : कुल्टी, प.बंगाल 8) पहिले दूरदर्शन केंद्र : दिल्ली (1959) 9) पहिली अणुभट्टी : अप्सरा, तारापूर (1956) 10) पहिले विद्यापीठ : कोलकत्ता (1957) 11) पहिले रासायनिक बंदर : दाहेज, गुजरात 12) भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा : विजयंता 13) पहिले टेलिफोन एक्सचेंज : कोलकत्ता (1881) न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💰 ‘जीएसटी’ संकलन 1 लाख कोटींवर LetsUp | National 📣 ‘जीएसटी’ने चालू आर्थिक वर्षांत पहिल्यांदाच मासिक 1 लाख कोटी रुपयांचा करसंकलन टप्पा ओलांडला 🗣 सरलेल्या जुलै महिन्यात ढोबळ वस्तू व सेवा कर संकलन 1.02 लाख कोटी रुपये नोंदले गेले असल्याचे अर्थमंत्रालयाने केले स्पष्ट 👍 आर्थिक वर्ष 2019-20 मधील पहिल्या 4 महिन्यांत प्रथमच सरकारला कर संकलनाचे अपेक्षित लक्ष्य गाठण्यात यश 👉 ही करप्रणाली लागू झाल्यापासून, कर संकलनाची 1 लाख कोटींची पातळी गाठण्याची ही तिसरीच वेळ 💫 गेल्या वर्षी याच महिन्यांत म्हणजे जुलै 2018 मध्ये जीएसटी संकलन 96,483 कोटी रुपये होते. वार्षिक तुलनेत त्यात 5.8 टक्के वाढ ✔ जुलैअखेर वस्तू व सेवा कर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांची संख्या 75.79 लाखांवर पोहोचली, या प्रणालींतर्गत एप्रिल ते जुलै 2019 दरम्यान 4.16 लाख कोटी रुपयांचे अप्रत्यक्ष कर संकलन न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUp News Updates ● देशातील पहिल्या महिला सैन्य भरती रॅलीला बेळगावात प्रारंभ, ही रॅली 5 ऑगस्टपर्यंत चालणार ● वैद्यकीय शुल्कावर लवकरच कमाल मर्यादा, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक राज्यसभेत मंजूर ● भारतात सरलेल्या एप्रिल-जून 2019 तिमाहीत सोने मागणी 13 टक्के वाढून 213.2 टनांवर गेली ● भारतीय अधिकारी आज (दि.2) घेणार भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची भेट ● राज्यसभेतील दोन जागांसाठी उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये 26 ऑगस्ट रोजी पोटनिवडणुका व निकाल ● मालेगाव बॉम्बस्फोटाची ‘इन-कॅमेरा’ सुनावणी घ्या, ‘एनआयए’ची विशेष न्यायालयात मागणी ● मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अभ्यासक्रमास यूजीसीने दिली मान्यता ● Huawei कडून आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन Huawei Y9 Prime 2019 लाँच ● प्रो-कबड्डी : दिल्लीचा गुजरातकडून धक्कादायक पराभव; दिल्लीचे गुणतालिकेतील पहिले स्थान अबाधित ● ‘जिवलगा’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, सिद्धार्थ-स्वप्निल जोशीच्या सोशल मीडिया पोस्टवरुन स्पष्ट न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🚆 खुशखबर! आता प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येणार प्रवास LetsUp । Update ⚡ रेल्वे प्रशासनाच्या नवीन नियमाची आजपासून अंमलबजावणी 💁‍♂ रेल्वेने प्रवाश्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या नव्या नियमांनुसार आपात्कालिन परिस्थितीत आता प्रवासी प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास करू शकणार आहेत. 👀 जाणून घ्या अटी : ▪ प्लॅटफॉर्म तिकिटावरून प्रवास करण्यासाठी संबंधित प्रवाशाला गार्ड किंवा टिसीचे परवानगी पत्र घ्यावे लागणार आहे. ▪ वेळेअभावी प्रवाशी ट्रेनमध्ये जाऊन नियमित प्रक्रिया पूर्ण करत प्रवास करू शकतो. ▪ रेल्वेच्या नियमानुसार हे परवानगी पत्र रेल्वेचे गार्ड, टिसी किंवा अन्य अधिकाऱ्यांकडून घेता येऊ शकते. 👉 टिसीला माहिती द्यावी लागणार : ट्रेनमध्ये चढल्यानंतर प्रवाशाला याबाबत टिसीला माहिती द्यावी लागेल. त्यानंतर सदर प्रवाशाच्या इच्छित स्थळाचे त्यांच्याकडून तिकिट बनवून घेता येईल. परंतु यासाठी केवळ 250 रूपये दंडाच्या स्वरूपात द्यावे लागणार आहेत. 💰 दंडाची रक्कम : ▪ सध्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत केवळ 10 रूपये आहे. ▪ कोणतीही व्यक्ती जाणूनबुजून या तिकिटावर प्रवास करत असेल, तर त्याला तुरूंगवारीही होऊ शकते. ▪ तसेच 1 हजार 260 रूपयांचा दंड किंवा तुरूंगवारी आणि दंड दोन्ही होऊ शकतो. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📣 कुलभूषण जाधवांना मिळणार कायदेशीर मदत LetsUp | International ⚡ आयसीजेच्या निर्णयानंतर नरमलेल्या पाकिस्तानने घेतला निर्णय 💁‍♂ हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानातील तुरुंगात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देण्यास परवानगी देण्यात आली आहे. 👍 कुलभूषण जाधव यांना मिळणारा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस भारतासाठी मोठा विजय आहे. कारण याआधी पाकिस्ताननं 15 पेक्षा जास्त वेळा जाधव यांना काऊन्सिलर अ‍ॅक्सेस नाकारला आहे. 👀 जाणून घ्या प्रकरण : कुलभूषण जाधव यांना ‘हेरगिरी आणि दहशतवादा’च्या आरोपाखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने या निर्णयाविरोधात 8 मे 2017 रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. 📍 फाशीची शिक्षा स्थगित : या खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या बाजूने कौल देत फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. कुलभूषण जाधव हे सध्या पाकिस्तानातील कारागृहात आहेत. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🐄 पशुवैद्यक क्षेत्रातील करिअरच्या संधी LetsUp l Career 🎯 भारत हा कृषिप्रधान देश आहे. विज्ञान शाखा विस्तारत असताना विद्यार्थ्यांचा ओढा अनेकदा तंत्रज्ञानाकडे अधिक दिसून येते. तसेच प्रचलित शाखा म्हणून समोर न आल्याने त्याकडे प्रवेश घेण्याचा कल दिसून येत नाही. 🧐 करिअरच्या संधी : ▪पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधरांना करिअरच्या उत्तम संधी मिळतात. ▪राज्य सरकारच्या पशुवैद्यक दवाखान्यांमध्ये नोकरी मिळू शकते. ▪खासगीरीत्याही व्यवसाय करता येऊ शकतो. ▪पाळीव प्राण्यांच्या देखभाल-तंदुरुस्तीकडे लोक काटेकोरपणे लक्ष देतात. त्यामुळे चांगल्या पशुवैद्यकांना उत्तम करिअर करता येऊ शकते. ▪पशुवैद्यकास MPSC व UPSC द्वारे राज्य व केंद्र सरकारी प्रशासकीय नोकऱ्या मिळू शकतात. ▪कृषी प्रकिया उद्योग, मोठे दुग्धप्रकिया उद्योग आदी क्षेत्रांतही संधी मिळू शकते. ▪भारतीय सैन्यामध्ये त्यांच्या विविध प्रकारच्या अ‍ॅनिमल स्कॉड व अ‍ॅनिमल फार्मससाठी दरवर्षी अधिक प्रमाणात अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना मागणी असते. ▪केंद्र व राज्य शासनाच्या पशुसंवर्धन धोरणांच्या अंमलबजावणीसाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी असते. ▪अन्न, औषध, इंडस्ट्रीतही कामाच्या संधी चांगल्या वेतनासहीत उपलब्ध आहेत. 📚 अभ्यासक्रमाविषयी: 👉 12 विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो. 👉 5 वर्षांचा पशुवैद्यक (B.V.Sc. and A.H) अभ्यासक्रम कृषी विद्यापीठांतर्गत येतो. 👉 पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (M.V.Sc) हा दोन वर्षाचा अभ्यासक्रमही आहे. 👉 पीएच.डी. अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. 💁‍♂ या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता : ✔ महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी ✔ बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज मुंबई (बिविसी) ✔ नागपूर व्हेटर्नरी कॉलेज, नागपूर (एनव्हीसी’) ✔ क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ व्हेटर्नरी सायन्सेस, शिरवळ (सातारा) (केएनपीसीव्हीएस) ✔ पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस, अकोला (पीजीआयव्हीएस) ✔ कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस, परभणी (सीओव्हीएएस) ✔ कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस, उदगीर (सीओव्हीएएस) न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📣 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ LetsUp | Update ⚡ दुष्काळग्रस्त भागातील गरीब विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा. 💁‍♂ निर्णय : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षण युवक कल्याण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. 👌राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. 💰 विद्यार्थ्यांचा खात्यात रक्कम जमा होणार : दुष्काळी भागातील 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा माफ करताना यापूर्वी न होणाऱ्या प्रात्यक्षिक, गुणपत्रिका, प्रमाणपत्र अशा सर्व शुल्कांसह संपूर्ण फी आता माफ होणार असून प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. 💫 विशेष : महसूल विभागांनी दुष्काळी गावांची यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यापूर्वी जी गावे दुष्काळी म्हणून घोषित केलेली असतील, अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरते वेळी कोणतेही शुल्क भरावे लागू नये याची दक्षता राज्य मंडळाने घ्यावी. 📍 यांना फायदा मिळणार : महाराष्ट्र शासनाच्या या फी माफीचा फायदा शासकीय, अनुदानित माध्यम शाळा, कनिष्ठ महाविद्यालय (ज्युनियर कॉलेज) च्या विद्यार्थ्यांना लागू राहणार आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

😍 खुशखबर! घरगुती गॅस सिलेंडर स्वस्त LetsUp | National 🗣 सरकारने विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची केली कपात : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 👍 आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्याने ग्राहकांना मिळाला दिलासा 👉 या नव्या दरांमुळे 14.2 किलोच्या अनुदानित गॅसचा दर आता 574.50 रुपये इतका, हा नवा दर झाला लागू 💰 दरम्यान, नव्या दराप्रमाणे प्रत्येक सिलेंडरसाठी ग्राहकाला बँक खात्यात 142.65 रुपयांचे अनुदान मिळेल 💫 गेल्या 2 महिन्यात एकूण मिळून विनाअनुदानित प्रति गॅस सिलेंडरमध्ये 163 रुपयांची कपात करण्यात आली न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🤔 तुम्हाला माहित आहे का? LetsUp | Do U Know 1) जगातील सर्वात धोकादायक भूकंप चिली (Valdivia, Chile) मध्ये आला होता. ज्याची तीव्रता 9.5 इतकी होती. 2) जगातील सर्वात सर्वात उंच महिला यओ डेफेन (Yao Defen) असून तिची उंची 7 फुट 8 इंच एवढी आहे. 3) जगातील सर्वात लांब नाक असण्याचा विक्रम मेहमत ओज़्यूरिक (Mehmet Ozyurek : 8.8 Cm) यांच्या नावावर आहे. 4) जगातील सर्वात लांब मिश्या असण्याचे रेकॉर्ड भारताच्या राम सिंग चौहान (4.29 मी) यांच्या नावावर आहेत. 5) क्रिकेटमध्ये सर्वात लांब षटकार मारण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शाहिद अफरीदीच्या नावावर आहे. त्याने 158 मी. लांब षटकार लगावला होता. 6) जगातील सर्वात महागडी भेट वस्तू "ताज महल" असल्याचे म्हटले जाते. जे बेगम मुमताजच्या स्मुत्यर्थ बांधले गेले होते. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 आता वाहतुकीचे नियम मोडणे पडणार चांगलेच महागात LetsUp | Update ✔ राज्यसभेत मोटर वाहन दुरुस्ती विधेयक-2019 प्रदीर्घ चर्चेनंतर 13 विरूद्ध 108 अशा फरकाने मंजूर झाले. 👍 केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडले. 🗣 नितीन गडकरी काय म्हणाले? : ● देशात मागील 5 वर्षात रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ● तसेच, यामध्ये होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमुळे रस्ते सुरक्षाच्या सध्याच्या कायद्यात बदल करण्याची आवश्यकता आहे. ● सरकारचा मोटर वाहन दुरुस्ती विधेयकाद्वारे राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विचार नाही. 📝 विधेयकात काय-काय? ● आता हेल्मेट न वापरणाऱ्यास 100 रूपयां ऐवजी एक हजार रुपये दंड तसेच लायसन्स तीन महिन्यांसाठी जप्त करण्यात येणार आहे. ● दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यास दोन हजारांऐवजी आता दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. ● हिट अ‍ॅण्ड रन केसमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबीयांना दोन लाखांची भरपाई देण्यात येणार आहे. ● गाडी चालवताना मोबाईलवर बोलल्यास व परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यास 5 हजाराचा दंड आकारण्यात येणार आहे. ● आता कुणालाही टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी थांबण्याची गरज पडणार नाही. कारण वाहनचालकांना मोबाईलद्वारेच टोल भरता येणार आहे. ● वाहन चालवण्याची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला घर बसल्याचं ऑनलाइन वाहन शिकत असल्याचा परवाना मिळणार आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUp News Updates ● राज्यसभेत मोटर वाहन दुरुस्ती विधेयक मंजूर, आता वाहतुकीचे नियम मोडणे महागात पडणार ● दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी लहान मुलांचा वापर; संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता ● क्यूएस क्रमवारीत विद्यार्थ्यांसाठी लंडन हे जगातील तर बंगळुरू भारतातील सर्वोत्तम शहर ● जम्मू-काश्मीरमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन अमरनाथ यात्रा येत्या 4 ऑगस्टपर्यंत स्थगित ● अझीम प्रेमजी यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे पुत्र रिशद प्रेमजी विप्रो हे झाले विप्रोचे चेअरमन ● Lenovo ने भारतात लॉन्च केला Yoga S940 लॅपटॉप, किंमत 23,990 रुपये ● अखेर रोइंगपटू दत्तू भोकनळला दिलासा, कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा हायकोर्टाने केला रद्द ● प्रो-कबड्डी : जयपूर पिंक पँथर्सची विजयाची हॅट्रीक तर यूपी योद्धाने यू-मुंबावर मिळविला विजय ● आजपासून रंगणार ‘अ‍ॅशेस’चा थरार, इंग्लंड-ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी एजबॅस्टनवर ● लवकरच बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन बॉयफ्रेंड रोहमन शॉलसह विवाहबंधनात अडकणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📅 1 ऑगस्टपासून या तीन गोष्टी स्वस्त होणार LetsUp । Update 🛵 इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त : 1 ऑगस्टपासून इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणं स्वस्त होणार आहे. जीएसटी काउन्सिलनं बॅटरीवर चालणाऱ्या कार्स आणि बाइकवर लागणारा GST कमी केलाय. इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटीचे दर 12 टक्क्यांहून कमी होऊन 5 टक्के झालेत. तर चार्जरवरचा जीएसटी 18 टक्क्यांहून कमी होऊन 12 टक्के झालाय. 🏦 'एसबीआय' च्या या सेवा मोफत : एसबीआयने ग्राहकांसाठी आईएमपीएस शुल्क रद्द केलं आहे. जे ग्राहक इंटरनेट बँकींग आणि मोबाईल पेमेंट सारखे काम करतात त्यांना उद्यापासून कोणतेही शुल्क लागणार नाही. यासोबत आरटीजीएससाठी एनईएफटी वर लागणारे शुल्क रद्द केले आहे. 🏡 स्वस्तात घर खरेदी करु शकता : तुम्ही दिल्लीत राहात असाल तर नोएडा आणि ग्रेट नोएडा इथे घर खरेदी करणं किंवा दुकान घेणं स्वस्त झालंय. या नव्या निर्णयामुळे ग्रुप हाउसिंगमध्ये 6 टक्के आणि कमर्शियलमध्ये 25 टक्के सरचार्ज रद्द केलाय. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📣 राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ LetsUp । Update ⚡ दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुखद वार्ता 💁‍♂ जनावरांसाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांना राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. 📍 मुदतवाढसाठी मागणी : छावण्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी मागणी केली होती. राज्य सरकारने ही मागणी मान्य करून त्याला मुदतवाढ दिली आहे. त्याबाबत अध्यादेशदेखील जारी केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 🧐 का वाढवली मुदत? : ▪ राज्यातील बहुतांश भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही ▪ मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहे ▪ दरम्यान, शेतकऱ्यांकडून चारा छावण्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली ▪ अखेर महसूल व वन विभागाने परिपत्रक काढून चारा छावण्यांना 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup