uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Kanalga Telegram’da o‘tish

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

Ko'proq ko'rsatish
6 624
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
Ma'lumot yo'q7 kun
Ma'lumot yo'q30 kun
Postlar arxiv
Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात 'टॉक टू एके' अभियानात अफरातफर केल्याचा आरोपावरुन सीबीआयने केला गुन्हा दाखल 👉 नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार रोखण्यासाठी सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील : वैंकय्या नायडू 👉 तामीळनाडू - जल्लीकट्टूच्या समर्थनात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये आज 31 कॉलेजला सुट्टी जाहीर 👉 जोधपूर - सलमानला दोषमुक्त करण्याच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेणार, बिष्णोई समाजाच्या वकिलांची प्रतिक्रिया 👉 गुजरात - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 63 टक्के वाढ, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केली घोषणा (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 रोम - भूमध्य सागरात निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी उलटल्यामुळे जवळपास 180 जण बेपत्ता झाल्याची संयुक्त राष्ट्र संघाची माहिती 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - भाजपा युवा मोर्चाकडून 92 उमेदवारांची यादी, आशिष शेलार यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची यादी सुपूर्द 👉 नाशिक - विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघासाठी दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, आता 22 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक 👉 पुणे - आमदार विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटनाही उतरणार राजकीय आखाड्यात, शुक्रवारी पुण्यातील मेळाव्यात ठरणार पुढील दिशा 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 कोल्हापूर - विमानतळ विस्तारीकरणासाठी दहा हेक्टर जागा हस्तांतरित करण्यासाठी दिलेला प्रस्ताव वन खात्याने फेटाळला 👉 नागपूर - सराफा सर्व्हे तसेच महाराष्ट्रात 41 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, विदर्भातील 21 तर पुण्यातील 20, नाशिकमधील 2 तसेच अकोल्यातील एका ठिकाणाचा समावेश 👉 मुंबई - 'असर'चा अहवाल जाहीर, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला अहवाल, भारताच्या तुलनेत राज्याची प्रगती चांगली 👉 नंदुरबार - बनावट कागदपत्रे सादर करून जिल्ह्यातील 29 उद्योजकांनी तब्बल सहा कोटी तीन लाख 14 हजार 862 रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघड 👉 सातारा - आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशावरील चर्चांना पूर्ण विराम दिला 🎯 खेळ घडामोडी : 👉 कटक - भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज दुसरा वन-डे सामना, सायंकाळी दव पडण्यास सुरुवात होते, आजही असेच घडले तर नाणेफेक कौल निर्णायक ठरू शकतो 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - सलमानची निर्दोष मुक्तता झाली ही बातमी ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे : सलमान खानचे वडील सलीम खान 👉 गडचिरोली - सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य लवकरच संपते : मकरंद अनासपुरे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 पेटीएमचे नवीन फिचर्स! Let's Up Techno Katta आपल्या सेवा अधिक सुरक्षित व गतीमान होण्यासाठी पेटीएमने ताज्या अपडेटच्या माध्यमातून आपल्या युजर्ससाठी विविध नाविन्यपूर्ण सुविधा प्रदान केल्या आहेत. अलीकडेच पेटीएमने ‘पेमेंट बँक’ सुरू केली आहे.15 जानेवारीपासून या बँकेस प्रारंभ झाला आहे. ताज्या अपडेटनुसार आता पेटीएम वॉलेटचे सर्व विद्यमान युजर्स हे आपोआप नवीन बँकेशी जुडणार आहेत. अर्थात पेटीएम बँकेत या युजर्सला नव्याने खाते उघडण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तसेच आगामी काळात पेटीएम युजरला बँकेच्या खात्याप्रमाणे चेकबुक, डेबिट कार्ड वापरण्याची सुविधा देण्यात येणार असून त्याच्या अकाऊंटमधील पैशांवर व्याजही मिळेल. दरम्यान, याचसोबत पेटीएमने आपल्या युजर्सला भेडसावणार्‍या विविध समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘कम्युनिटी फोरम’ही सुरू केला आहे. तसेच पेटीएमवर आता कुणीही स्वत:ला (प्रत्यक्षात नसला तरी!) व्यापारी घोषित करून 50 हजार रूपयांपर्यंतचे व्यवहार करू शकेल. अर्थात यासाठी आपल्याला पेटीएमच्या पेमेंट बँकेतील खात्याशी संलग्न होण्यासाठी आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 इंडस आणि फ्रिचार्जची नवीन पेमेंट प्रणाली आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी इंडस ऑपरेटींग सिस्टीम आणि फ्रिचार्ज या वॅलेट सेवेने एकत्रीतपणे ‘रिचार्ज 2.0’ ही नवीन पेमेंट प्रणाली विकसित केली आहे. ‘रिचार्ज 2.0’ ही इंडस ऑपरेटींग प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोनधारकांच्या उपयोगात येणार आहे. याच्या अंतर्गत कुणीही ‘इंडस डायलर’ वरून सुलभपणे रिचार्ज करू शकेल. यात बॅलन्सदेखील टाकता येणार येईल. तसेच कुणीही विविध रिचार्जची तुलना तसेच त्याने आठवडा वा महिनाभरात केलेल्या रिचार्जची माहिती सहजपणे मिळवू शकेल. याच्या मदतीने टॉकटाईम, डाटा, युजेस आदींबाबत अलर्टही मिळतील. देशात 95 टक्के मोबाईल युजर्स हे प्रिपेड कार्डचा उपयोग करतात. याचा विचार करता ‘रिचार्ज 2.0’ हे खास याच युजरबेससाठी विकसित करण्यात आले आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - नोटबंदीमुळे जीडीपीवर अल्पकाळासाठी परिणाम होईल, पण दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा निर्णय फायदेशीर ठरेल, आरबीआय गव्हर्नरांनी दिली पीएसीसमोर माहिती 👉 अहमदाबाद - काळ्याचं पांढरं करण्याच्या संशयातून गुजरातेतील प्रसिद्ध व्यावसायिक जिग्नेश भजियावालाला अटक, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी केली कारवाई 👉 नवी दिल्ली - चर्चमधून मिळणाऱ्या घटस्फोटाला कायदेशीर मान्यता देण्यास सुप्रीम कोर्टाने दिला नकार 👉 बंगळुरु - इन्फोसिसने आपल्या 8 ते 9 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन केले कमी, कंपनीचे मुख्य एचआर कृष्णमूर्ती शंकर यांनी केले स्पष्ट 👉 चेन्नई - जलिकट्टूच्या समर्थनार्थ शेकडोंच्या संख्येने जोरदार निदर्शने सुरू असताना तामिळनाडू सरकारने एक-दोन दिवसांत यासंबंधी अध्यादेश जारी करण्यात येईल, असे सांगितले आहे 👉 चेन्नई - जलीकट्टू बंदीविरोधात संपूर्ण तामिळनाडू एकवटले, या खेळावरील बंदी उठवण्यात यावी यासाठी सर्वसामान्यांसून, सेलिब्रिटी ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच उठवला आवाज 👉 बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोअर्स असणारे नेते (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 गँबिया देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून आदम बेरो यांनी घेतली शपथ, डकार दूतावास येथे झाला शपथविधी सोहळा 👉 लिबियामध्ये अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचे 80 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याचे एएफपीचे वृत्त 🎯 राजकीय घडामोडी : 👉 भाजपचा त्याग करून काँग्रेसमध्ये सामील झालेले नवज्योतसिंग सिद्धूंकडे 52.55 कोटींची संपत्ती, तब्बल 44 लाखांची घड्याळे 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणात वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर स्कॉटलंड यार्डची मदत घेता येणार नाही, सीबीआयची मुंबई हायकोर्टात माहिती 👉 मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांची जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाच्या अर्थ समितीवर निवड 👉 नाशिक पदवीधर निवडणूक 5 जणांची माघार, विठल गुंजाळ, पुरुषोत्तम रकीबे, सुरेश टाके, सुभाष डांगे, मनोज पवार यांची माघार, निवडणुकीच्या रिंगणात एकूण 17 उमेदवार 👉 भंडारा - तुमसर तालुक्यातील चिखला खाणीत झालेल्या अपघातात दिलीप सोनावणे या कामगाराचा मृत्यू 👉 कोल्हापूर - ‘कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपासात प्रगती असून चौकशी योग्य दिशेने सुरु आहे’, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 27034.50, निफ्टी : 8349.35, सोने भाव : 28,575 (प्रतितोळा), चांदी : 41,194 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 नवी दिल्ली - सॅमसंगचा 36,900 रुपयांचा गॅलक्सी सी 9 प्रो मोबाईल लाँच 🎯 खेळ घडामोडी : 👉 बीसीसीआय विरुद्ध लोढा समिती, अॅमिकस क्युरी यांनी बीसीसीआयच्या प्रशासकपदासाठी 9 सदस्यांची नावे सुप्रीम कोर्टाला सोपवली 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - सब टीव्हीवरच्या ‘एफआयआर’ या विनोदी कार्यक्रमातली चंद्रमुखी चौटाला अर्थात कविता कौशिक लवकरच रोहित बिस्वाससोबत होणार विवाहबद्ध (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 आता कर्ज पात्रता रिपोर्ट (सिबिल) मिळणार फुकट! Let's Up Current Affair रिझर्व बँकेने कर्जासाठी आवश्यक असणारा आणि तुमची पत दाखवणारा सिबिल (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिडेट) रिपोर्ट मोफत उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे. रिझर्व बँकेने हा क्रेडिट रिपोर्ट वर्षातून एकदा विनंती केल्यावर पूर्णपणे मोफत उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश क्रेडिट रेटिंग कंपन्यांना दिलेत. त्याची अंमलबजावणीही 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे. याआधी या रिपोर्टसाठी 400 ते 500 रूपये मोजावे लागायचे. आताही पैसे मोजावे लागतील मात्र तुम्ही वर्षातून एकदा तो मोफत मिळवू शकाल. त्यापेक्षा जास्त वेळा क्रेडिट हिस्ट्री रिपोर्ट तुम्हाला हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला चार्ज भरावा लागेल. सिबिल का आवश्यक? जर तुम्ही कुणाही बँकेकडे कर्ज मागणी केली तर? बँक प्रथम पाहते ज्याला आपल्याला कर्ज द्यायचे आहे त्याची पत काय आहे? ही पत पडताळण्यासाठी बँक सिबील रिपोर्टची मागणी करतात. या सिबील रिपोर्टमध्ये तुमचे गेल्या 3 वर्षातले आर्थिक व्यवहार कसे आहेत, तुम्ही काही हफ्ते किंवा क्रेडिट कार्डची देणी थकवली आहेत का? याचा तपशील असतो. त्यावरून तुमचं क्रेडिट रेटिंग ठरतं, त्यावरून तुम्हाला नवं कर्ज द्यायचं की नाही, याचा निर्णय बँका घेतात. त्यामुळे सिबिलच्या रिपोर्टमध्ये तुमचं क्रेडिट रेटिंग चांगलं नसेल तर तुम्हाला कुणीही म्हणजे कोणतीही बँक किंवा आर्थिक संस्था लोन देणार नाही. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) सिबील रिपोर्टचं काम पाहणाऱ्या सिबिलप्रमाणेच अन्य चार संस्था किंवा कंपन्या इक्विफॅक्स क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा लि, एक्स्पेरियन क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा लि आणि सीआरआयएफ हायमार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा लि. या आहेत. सिबिलने दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट रेटिंग पॉईंटची रेंज ही 300 ते 900 दरम्यान असते. त्यानुसार 80 टक्के कर्जवाटप हे किमान 750 किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट रेटिंग असलेल्या खातेदारांनाच होतं. त्यापेक्षा रेटिंग कमी आलं तर तुमच्या कर्जाची मागणी संबंधित बँकेकडून फेटाळली जाते. त्यामुळेच ऑनलाईन माध्यमातून किंवा क्रेडिट कार्ड किंवा पॅनकार्ड देऊन केलेल्या प्रत्येक व्यवहारांवर कुणाची तरी नजर असते. किंवा त्याची माहिती या क्रेडिट रेटिंग कंपन्याना मिळवता येते. अशा व्यवहारांची माहिती मिळवण्यावर सध्या मर्यादा असली तरी तुम्ही थकवलेले कर्जाचे हफ्ते किंवा क्रेडिट कार्डची देणी यामुळे तुमची ऐपत खालावू शकते. त्यासाठीच आपली पत सांभाळा, सर्व प्रकारची देणी वेळच्या वेळी फेडा कारण तरच तुम्ही नव्या कर्जासाठी पात्र ठरू शकता… (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 कोल्हापुरात सोन्याचा पाऊस पडणारं गाव...! Let's Up Special Update कोल्हापूरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर तुळशी आणि भोगावती या दोन नद्यांच्या संगमावर वसलेलं करवीर तालुक्यात बीड हे गाव. या गावात कल्लेश्वरचा माळ आणि बीड शेड परिसरात डाळीच्या आकाराची सोन्याची छोटी छोटी नाणी सापडतात. त्यामुळे या गावावर सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो, ही आख्यायिका आहे. गावातील अनेक घरातील देव्हाऱ्यात ही नाणी पुजली जातात. शेतात काम करत असताना, रस्त्याने जाताना इतकंच काय जनावराच्या शेणावर आणि शेतीच्या पानावरही अनेक लोकांना नक्षीकाम केलेले सोन्याचे छोटे मोठे तुकडे यापूर्वी सापडले आहेत आणि ते आजही सापडतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) बाराव्या शतकात शिलाहाराच्या राजधानीचं गाव हेच बीड होतं. येथील राजाने पन्हाळगड बांधला आहे अशी इतिहासात नोंद आहे. राजधानीचं गाव असल्याने गावाभोवती तटबंदी, राजवाडा, जुन्या विहिरी, वास्तू होत्या. तसेच तत्कालीन परिस्थितीत सोन्याची नाणी काढली जात होती. ही नाणी डाळीच्या आकाराची आणि विशेष म्हणजे त्यावर मुद्राही उमटवली होती. बीडमध्ये बहुतेक घरांत एक-दोन स्वरुपात ही नाणी आहेत. अर्थात त्या नाण्यात खूप श्रद्धा दडलेली आहे. काही कालावधीनंतर हे गाव लुप्त झालं, या परिसरात खोदकाम करताना सहज ही नाणी मिळाल्याने या गावात सोन्याचा पाऊस पडतो, अशी आख्यायिका रुढ झाली. बीड हे शिलाहारांच्या राजधानीचं गाव साधारण 1200 सालात अतिशय समृद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष हे, की आपल्या गावाचा हा इतिहास पुराव्याच्या निकषावर जगासमोर आणण्यासाठी गावकऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. शुद्ध सोन्याची नाणी काढणारी आणि नाण्यावर वेगवेगळे छाप उठवणारी इथे टांकसाळच होती. अशा दंतकथांवर आधारित असलेली बीडची चर्चा इतिहासात आहे. त्याची मूर्त साक्ष याच परिसरात असलेल्या शिलालेखातून मिळते. यावर इतिहासाचे अभ्यासक उमाकांत राणिंगा आणि डॉ. आनंद दामले संशोधन करत आहेत... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - 30 हजारांवरील व्यवहारांसाठी ‘पॅनकार्ड’ बंधनकारक करण्याचे सरकारच्या विचाराधीन, कॅशलेसला चालना देण्यासाठी घेणार निर्णय 👉 नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी दिल्लीचे पोलिस आयुक्त अलोक वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली 👉 नवी दिल्ली - मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्‍या एनजीओचे जवळपास 100 कोटी रुपये रिअल इस्‍टेटमध्‍ये - एनआयए 👉 शिमला - धर्मशालाला हिमाचल प्रदेश राज्याच्या उपराजधानीचा दर्जा, मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची घोषणा (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॉशिंग्टन - कोणत्याही जाती, धर्म आणि पंथातील गुणवत्ता प्राप्त लोक अमेरिकेची ताकद, भविष्यात अमेरिकेला केवळ महिला राष्ट्राध्यक्षच नव्हे तर हिंदू, लॅटीन, ज्यू राष्ट्राध्यक्षही मिळू शकतील - बराक ओबामा 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - भाजप नेत्यांच्या बेताल वक्यव्यासंदर्भात शिवसेना नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली 👉 नवी दिल्ली - भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 150 उमेदवारांची नावं निश्चित झाल्याचे वृत्त 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - जे.जे. रुग्णालयातील नेत्ररोग विभागातील विद्यार्थ्यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्याविरुद्ध केलेली तक्रार घेतली मागे 👉 नागपूर - मेयो इस्पितळाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांना एक दिवसाची पोलिस कोठडी, लाच घेतल्याप्रकरणी झाली होती अटक 👉 पुणे - 16 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) मंदार जोशी दिग्दर्शित 'लेथ जोशी' या मराठी चित्रपटाला राज्य सरकारचा 'संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा पुरस्कार 👉 कोल्हापूर - विविध प्रलंबित मागण्यांसाठी शाळा संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वतीने आज शाळा बंद आंदोलन, सुमारे 1500 शाळा बंद राहणार 👉 नाशिक - शेतामध्ये जाणार्‍या अल्पवयीन मुलीस अडवून तिच्यावर सामूहिक बलात्कार आणि धमकावल्याप्रकरणी चौघा आरोपींना प्रत्येकी 20 वर्ष सक्तमजुरी 🎯 खेळ घडामोडी : 👉 कटक - इंग्लंडविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताचा 15 धावांनी विजय, युवराज सिंग ठरला 'मॅन ऑफ द मॅच 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 लॉस अँजिलिस - बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने 2017 च्या 'पीपल्स चॉईस अवॉर्ड'मध्ये फेव्हरेट ड्रामॅटिक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला 👉 मुंबई - अभिनेत्री रती अग्निहोत्री आणि तिच्या पतीवर वीज चोरी प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, बेस्टच्या दक्षता पथकाची कारवाई (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 *’नकारात्मक‘ नाही ’सकारात्मक’व्हा...* *Let's Up Think Katta* प्रत्येकामध्ये काहीतरी आगळं-वेगळं किंवा अशक्य वाटणारं काम करण्याचीही धमक असतेच. ही प्रचंड ताकद किंवा उर्जा दडून बसलेली असते. म्हणून ती योग्यवेळी बाहेर यायली हवी हे ही तितकेच महत्वाचे... पण होतं काय, ‘तुला हे जमणार नाही’, ‘तुला हे शक्य होणार नाही’, ‘तुझ्यात तेवढी ताकद नाही’, ‘तुझ्या बुद्धीला हे झेपणार नाही.’ यासारखी ‘नकारात्मक’ टिपण्णी करणारेच जास्त भेटतात. ‘तु स्वतःला काय फार शहाणा समजतोस काय? तुला फार अक्कल आली असे वाटले तरी तो तुझा गैरसमज आहे. ‘डोन्ट बी ओव्हरस्मार्ट’अशांसारखी वाक्ये हे लोक सहजरित्या तोंडावर फेकून आपल्याला नामोहरम करत असतात. आपण करायचे नाही व दुसर्‍याला करू द्यायचे नाही ही त्यांची वृत्ती… आपल्यापैकी कित्येकांना अशी माणसे नेहमी भेटत असतात. त्यांच्याकडे ‘आपण काय करू शकतो’ यापेक्षा ‘आपण काय करू शकत नाही.’ याचीच यादी भलीमोठी असते. दुर्दैवाने आपल्या आसपास अशा प्रकारच्या ‘नकारात्मक’ मनोवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणावर असतात. समजा एखाद्याने असे काही ‘अचाट’ काम करण्याचा प्रयत्न केला व त्यात तो अपयशी ठरला तर हीच माणसे ओरडतात, ‘तरी मी त्याला सांगत होतो की, नसते धाडस करू नकोस, अंगाशी येईल! तरी मी त्याला सांगत होतो की, तु तोंडाघशी पडशील! तरी मी त्याला सांगत होतो की, हा असला येडपटपणा करू नकोस!’ असे म्हणत स्वतःच्या शहाणपणाची मिजास मारायला व स्वतःची पाठ थोपटून घ्यायला तयारच बसलेले असतात. ही अशी माणसे एखादी गोष्ट कशी यशस्वी करायची याचे मार्ग शोधत न बसता ही गोष्ट का करू नये? याची कारणे शोधत बसतात. बहुतेक वेळा अशा या ‘नकारात्मक’माणसांची सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच होते. जिथं-जिथं अशी ‘नकारत्मक’ विचारसरणीची माणसं जास्त प्रमाणात असतात तिथं-तिथं प्रगती थांबलीच म्हणून समजा. म्हणून विचार करा, ‘नकारत्मक’ विचारसरणी आपल्यावर कोणी थोपवत तर नाही ना? आणि असे असेल तर त्याचं म्हणणं ऐका पण निर्णय तुम्ही स्वतः घ्या. कारण ‘सकारत्मक’ विचारसरणीच तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जाईल...!

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात 'टॉक टू एके' अभियानात अफरातफर केल्याचा आरोपावरुन सीबीआयने केला गुन्हा दाखल 👉 नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार रोखण्यासाठी सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील : वैंकय्या नायडू 👉 तामीळनाडू - जल्लीकट्टूच्या समर्थनात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चेन्नईमध्ये आज 31 कॉलेजला सुट्टी जाहीर 👉 जोधपूर - सलमानला दोषमुक्त करण्याच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेणार, बिष्णोई समाजाच्या वकिलांची प्रतिक्रिया 👉 गुजरात - राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 63 टक्के वाढ, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केली घोषणा (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 रोम - भूमध्य सागरात निर्वासितांना घेऊन जाणारी बोट शनिवारी उलटल्यामुळे जवळपास 180 जण बेपत्ता झाल्याची संयुक्त राष्ट्र संघाची माहिती 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - भाजपा युवा मोर्चाकडून 92 उमेदवारांची यादी, आशिष शेलार यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची यादी सुपूर्द 👉 नाशिक - विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघासाठी दोन अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद, आता 22 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक 👉 पुणे - आमदार विनायक मेटे यांची शिवसंग्राम संघटनाही उतरणार राजकीय आखाड्यात, शुक्रवारी पुण्यातील मेळाव्यात ठरणार पुढील दिशा 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 कोल्हापूर - विमानतळ विस्तारीकरणासाठी दहा हेक्टर जागा हस्तांतरित करण्यासाठी दिलेला प्रस्ताव वन खात्याने फेटाळला 👉 नागपूर - सराफा सर्व्हे तसेच महाराष्ट्रात 41 ठिकाणी आयकर विभागाचे छापे, विदर्भातील 21 तर पुण्यातील 20, नाशिकमधील 2 तसेच अकोल्यातील एका ठिकाणाचा समावेश 👉 मुंबई - 'असर'चा अहवाल जाहीर, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केला अहवाल, भारताच्या तुलनेत राज्याची प्रगती चांगली 👉 नंदुरबार - बनावट कागदपत्रे सादर करून जिल्ह्यातील 29 उद्योजकांनी तब्बल सहा कोटी तीन लाख 14 हजार 862 रुपयांचे अनुदान लाटल्याचा प्रकार उघड 👉 सातारा - आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेशावरील चर्चांना पूर्ण विराम दिला 🎯 खेळ घडामोडी : 👉 कटक - भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज दुसरा वन-डे सामना, सायंकाळी दव पडण्यास सुरुवात होते, आजही असेच घडले तर नाणेफेक कौल निर्णायक ठरू शकतो 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - सलमानची निर्दोष मुक्तता झाली ही बातमी ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे : सलमान खानचे वडील सलीम खान 👉 गडचिरोली - सकारात्मक व्यसनांनी माणसाचे आयुष्य घडते तर नकारात्मक व्यसनांनी मात्र माणसाचे आयुष्य लवकरच संपते : मकरंद अनासपुरे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

कांदा लागवड Let's Up Agri भारतीयांच्‍या आहारात कांद्याचा वापर सर्रास केला जातो तर कांद्याला व्यापारीदृष्ट्याही तितकंच महत्‍व आहे. कांदा पिकविणा-या राज्‍यात क्षेत्र व उत्‍पादनाच्‍या बाबतीत महाराष्‍ट्र अग्रस्‍थानी आहे. महाराष्‍ट्रामध्‍ये अंदाजे 1 लाख हेक्‍टरवर कांद्याची लागवड केली जाते. महाराष्‍ट्रामध्‍ये नाशिक, पुणे, सोलापूर, जळगांव, धुळे, अहमदनगर, सातारा कांदा पिकविण्‍याबाबत प्रसिध्‍द आहेत. 👉 हवामान : कांदा हेक्‍टरी हिवाळी हंगामातील पिक असून महाराष्‍ट्रातील सौम्‍य हवामानात कांद्याची 2 ते 3 पिके घेतली जातात. कांदा लागवडीपासून 1 ते 2 महिने हवामान थंड लागते. कांदा पोसायला लागताना तापमानातील वाढ ही कांदा वाढीस उपयुक्‍त ठरते. 👉 लागवड : महाराष्‍ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्‍टोबर, रब्‍बी हंगामात नोव्‍हेंबर ते फेब्रूवारी आणि उन्‍हाळी हंगामात जानेवारी ते जून महिन्‍यात करतात. 👉 जमीन : पाण्‍याचा निचरा होणारी भुसभूशीत जमीन व सेंद्रीय खतांनी परिपूर्ण असलेली मध्‍यम ते कसदार जमीन कांद्याला चांगली असते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 पुर्वमशागत : जमीनीची उभी आडवी नांगरणी करून व ढेकळे फोडून जमिन भूसभुशित करावी. जमीनत हेक्‍टरी 40 ते 50 टन शेणखत मिसळावे. 👉 वाण : * बसवंत 780 : खरीप व रब्‍बी हंगामासाठी ही जात योग्‍य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्‍यम ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते. * एन - 53 : ही जात खरीप हंगामासाठी योग्‍य आहे. 100 ते 150 दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लाल भडक असतो. हेक्‍टरी उत्‍पादन 200 ते 250 क्विंटल मिळते. * एन- 2-4-1 : ही जात रब्‍बी हंगामासाठी योग्‍य असून रंग भगवा व विटकरी असतो. कांदा आकाराने मध्‍यम गोल असून साठवणूकीत हा कांदा अतिशय चांगल्‍या प्रकारे टिकतो. ही जात 120 ते 130 दिवसांत तयार होते. हेक्‍टरी उत्‍पादन 300 ते 350 क्विंटल मिळते. * पुसा रेड : कांदे मध्‍यम आकाराचे विटकरी लाल गोलाकार मध्‍यम तिखट असतात. लागवडीपासून 120 दिवसात तयार होतोत. हेक्‍टरी उत्‍पादन 250 ते 300 क्विंटल मिळते. 👉 बियाण्‍याचे प्रमाण : हेक्‍टरी कांद्यासाठी 10 किलो बियाणे पुरेसे असते. 👉 लागवड : कांद्यांची रोपे, गादी वाफे तयार करणा-या क्षेत्रााची खोल नांगरट करून कुळवाच्‍या दोन तीन पाळया देऊन जमिन भुसभुशित करावी. गादी वाफा 1 मी रूंद 3 मी लांब 15 सेमी उंच करावा. वाफयातील ढेकळे निवडून बाजूला काढावीत. वाफयाच्‍या रूंदीशी समांतर अशा 5 सेमी बोटाने रेषा पाडाव्‍यात. आणि यात बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे. बी उगवून येईपर्यंत. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

_*ब्रेकिंग न्यूज*_ _*सलमानची निर्दोष मुक्तता*_ अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने मोठा दिलासा देत अवैधरित्या शस्त्रास्त्रं बाळगल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 18 वर्षांनी हा निकाल आला आहे. यावेळी स्वत: सलमान त्याची बहीण अलविरासह न्यायालयात उपस्थित होता. 'हम साथ साथ है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, म्हणजेज 1998 साली परवाना संपलेले शस्त्र बेकायदेशीररित्या वापरल्याबद्दल जोधपूर पोलिसांनी सलमान खान विरोधात शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा नोंदवला होता. गेल्या वर्षी 9 डिसेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली होती. अखेर आज याप्रकरणी निर्णय सुनावण्यात आला. *जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/yVel0p

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - निराशाजनक कामगिरीमुळे 2 आयपीएस अधिकाऱ्यांना मोदी सरकारने केले सेवेतून बडतर्फ, 2 आयएएसही बडतर्फ होण्याच्या मार्गावर 👉 नवी दिल्ली - इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेवर घातलेल्या बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी हायकोर्टाने 23 जानेवारीपर्यंत पुढे ढकलली 👉 बंगळुर - दोन कृष्णविवरांचा आघात होऊन ते एकमेकात विलीन होऊन एकच कृष्णविवर तयार होते व त्या वेळी गुरुत्वीय लहरी बाहेर पडतात, असे भाकित करणारे जेष्ठ शास्त्रज्ञ सी. व्ही. विश्वेश्वरा यांचे निधन 👉 हैद्राबाद - रोहित वेमुलाच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर निदर्शने करणा-या विद्यार्थ्यांसह रोहित वेमुलाच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 चंद्रावर शेवटचे पाऊल टाकणा-या जीन केरनन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन, वृद्धापकाळाने त्यांची प्रकृती बिघडली होती 👉 आफ्रिका - पश्चिम आफ्रिकेतल्या गांबिया देशाचे राष्ट्राध्यक्ष याह्या जामेह यांनी केली देशात आणीबाणी जाहीर 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - वॉर्ड क्रमांक 198 मधून उच्छुक असलेल्या विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर यांना स्थानिक शिवसैनिकांचा विरोध 👉 नाशिक - विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघासाठी आज अखेरच्या दिवशी 24 उमेदवारांनी 39 अर्ज दाखल केले 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 सातारा - अभिनेते सयाजी शिंदे यांनी पांढरवाडी येथे लावलेली एक हजार झाडे अज्ञातांनी तोडली, सहा महिन्यांपूर्वी लावली होती झाडे 👉 सातारा - सात जिल्ह्यांमधून वाहने चोरणारी टोळी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड, त्यांच्याकडून वीस गुन्हे उघडकीस आले 👉 लातूर - हिरेमठ पेट्रोलपंपावरील दरोडाप्रकरणातील तीनपैकी एक आरोपी प्रभूलिंगे लखादिवे याला अटक, पोलिसांनी पाठलाग करुन केली अटक 👉 जळगाव - भडगाव येथील निशा पाटील या विद्यार्थिनीला राष्ट्रीय शौर्य बाल पुरस्काराने गौरवण्यात आले, आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेल्या एका चिमुरडीला वाचवल्यामुळे तिचा गौरव 👉 कोल्हापूर - शून्यातून उद्योगविश्‍व उभारून औद्योगिक क्षेत्रात आगळावेगळा ठसा उमटवणारे ज्येष्ठ उद्योगपती बापूसाहेब जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन 🎯 खेळ घडामोडी : 👉 हैदराबाद - हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेले नामांकन फेटाळण्यात आल्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाखल केली याचिका 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पहिला मराठी चित्रपट व्हेंटिलेटर नंतर 'काय रे रास्काला' या दुसऱ्या मराठी चित्रपटाची निर्मीती करणार (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - बँक खात्यातून आठवड्याला 24 हजार रुपये काढण्याची मर्यादा कायम, पण चालू खात्यातून आठवड्याला 50 हजार रुपये काढण्याची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली 👉 नवी दिल्ली - जीएसटीची अंमलबजावणी लांबवणीवर, 1 एप्रिलऐवजी 1 जुलैपासून लागू होणार जीएसटी : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती 👉 चेन्नई - तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी AIADMK पक्षाच्या सरचिटणीस शशीकला नटराजन 29 जानेवारीला विराजमान होणार असल्याची शक्यता 👉 पणजी - विधानसभा निवडणूकीसाठी 11 मार्च रोजी मतमोजणी होणार असल्याने 11 मार्च पासून होणारी बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 मेक्सिको - येथील समुद्रकिनारी असलेल्या ब्लू पॅरट नाइट क्लबमध्ये सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सवात गोळीबार, या गोळीबारात चार जणांचा मृत्यू 🎯 राजकीय घडामोडी : 👉 गोवा - प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची अरविंद केजरीवाल यांना नोटीस, 19 जानेवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश 👉 मुंबई - सेना भवनात युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न, युवा सेनेसाठी महापालिका निवडणुकीत कोणताही राखीव कोटा नाही 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी निवृत्त सनदी अधिकारी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय 👉 मुंबई - नोटाबंदी आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष 18 जानेवारी रोजी मुंबई आणि नागपूर येथील रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाला घालणार घेराव 👉 नागपूर - इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये यांना पंधरा हजारांची लाच घेताना अटक 👉 यवतमाळ - येथील सुकनेगाव येथे बाजीराव महाराज महोत्सवानिमित्त आयोजित महाप्रसाद कार्यक्रमातून शेकडो भाविकांना अन्नातून विषबाधा 👉 नाशिक - शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई जैसे थे ठेवण्याचे महानगरपालिकेला आदेश, मुंबई उच्च न्यायालयात आज झाली सुनावणी 👉 मुंबई - मुंबई विद्यापीठात पहिले डिजिटल लॉकर मुकेश अंबानी यांच्या नावाने सुरू करणार, कुलगुरू संजय देशमुख यांची घोषणा 🎯 खेळ घडामोडी : 👉 आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धत रॉजर फेडररची विजयी सलामी, जर्गेन मेल्झरवर 7-5, 3-6, 6-2, 6-2 अशी मात, फेडररचं व्यावसायिक टेनिसमधले पुनरागमन विजयाने 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - फोटोमध्ये केलेली बनवाबनवी आणि फोटोशॉपचा वापर करत काही जणांनी सलमान खानचं बनावट वोटर आयडी कार्ड बनवून त्यावर 64 वर्ष वय दाखवलं (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Update 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले, पेट्रोलच्या किंमतीत 0.42 पैशांनी तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपया 03 पैशांनी वाढ 👉 नवी दिल्ली - आम्हाला नियंत्रण रेषा आणि सीमेवर शांतता हवी आहे, मात्र शत्रूंकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास सडेतोड उत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही - लष्कर प्रमुख बिपिन रावत 👉 नवी दिल्ली - अधिकाधिक लोकांनी कॅशलेस व्यवहार करावेत, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लकी ड्रॉ योजनेतील सोडतीमध्ये आतापर्यंत देशातील 45 जण झाले लखपती 👉 केरळ - येथील कोझीकोड जिल्ह्यात दोन ठिकाणांहून 52.5 लाख रुपयांच्या 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या 👉कोलकाता - पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध असलेल्या गंगासागर यात्रेत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 इस्लामाबाद - चीनने पाकिस्तानला दोन बोटी दिल्या असून चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या समुद्रीमार्गाच्या सुरक्षेसाठी यांचा उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - नवज्योत सिंह सिध्दूंचा राहूल गांधीच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश, अमृतसरमधून निवडणुक लढवण्याची शक्यता 👉 मुंबई - कपटी आणि चाणाक्ष मित्रांपासून सावध राहा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला 👉 गडचिरोली - गडचिरोली नगर परिषदेचे नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक प्रशांत खोब्रागडे व माधुरीताई खोब्रागडे यांनी केला भाजपात प्रवेश 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - 31 जानेवारी ऐवजी 6 मार्चला मुंबईत मराठा मोर्चाच आयोजन करण्यात येणार, राज्यातील विविध जिल्ह्यातील संयोजकांची मुंबईत बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला 👉 मुंबई - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला खेरवाडी जंक्शनजवळ अपघात, सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत नाही 👉 सातारा - अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी आणि भारतीय संविधानाला कोणताही धक्का लावला जाऊ नये, अशा मागण्यांसाठी साताऱ्यात बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला 👉 पुणे - भविष्यात देशातील प्रमुख पोस्ट कार्यालयांद्वारे पासपोर्ट देण्याचे विचाराधीन, पासपोर्ट मोबाईल व्हॅन सुरू करण्यात येणार - परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्वर मुळे 🎯 खेळ घडामोडी : 👉 पुणे - पहिल्या वनडेमध्ये भारताची इंग्लंडवर 3 विकेटने मात, विराट कोहली-केदार जाधवच्या झुंझार शतकामुळे भारताने पार केला 351 धावांचा टप्पा 👉 मुंबई - 14 व्या मुंबई मॅरेथॉनवर आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व, 42 किलोमीटरच्या फुल मॅरेथॉनच्या आंतरराष्ट्रीय गटात टांझानियाचा अल्फन्सो सिंबूने पटकावला प्रथम क्रमांक 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रदान (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - सरकारने केले नवे सुरक्षित पॅन कार्ड जारी, यात क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोडसारखे अनेक सुरक्षा फिचर्स आहेत 👉 नवी दिल्ली - 27 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 15 मंत्र्यांच्या संपत्तीत 2016-16 मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत वाढ, तर मोदी यांच्यासह 10 मंत्र्यांच्या संपत्तीत झाली घट 👉 नवी दिल्ली - विजेचा जास्त वापर करणाऱ्यांना लवकरच कमी बिल भरावे लागणार, वीजेचा वापर वाढावा यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात येणार 👉 बिहार - गंगा नदीत नाव उलटून 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत, पतंग उत्सव आटोपून परतत असताना घडली दुर्घटना 👉 भोपाल - राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि कार्यालयांना मध्यप्रदेश सरकारने राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्याचा आदेश 👉 चंदिगड - पंजाबचे माजी मुख्यमंत्री तामिळनाडूचे माजी राज्यपाल सुरजितसिंग बर्नाला (91) यांचे निधन (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 इस्लामाबाद - तब्बल 436 किलो वजन असलेला पाकिस्तानी हल्क अरबाब खैझर हयात सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल, अरबाबला डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये जाण्याची इच्छा 🎯 राजकीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांची मुलगी गुरकंवल कौर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, त्या आधी काँग्रेसमध्ये होत्या 👉 मुंबई - शिवसेनेची आता मुंबईत आक्रमक जाहिरातबाजीला सुरूवात, #DidyouKnow ही नवी टॅगलाईन यानिमित्ताने समोर आली आहे 👉 मुंबई - काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची सोमवारी मुंबईत टिळक भवनात होणार बैठक, राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यावर होणार चर्चा 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - एअर इंडियामध्ये 225 कोटींचा सॉफ्टवेअर घोटाळा झाल्याचे समोर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या आरटीआयनंतर हा घोटाळा उघडकीस आला 👉 सांगली - भिलवडी बलात्कारप्रकरणी एक आरोपी (शांत ऊर्फ हिमेश सोंगटे) अटकेत, यामध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याची पोलिसांनी व्यक्त केली शक्यता 👉 उस्मानाबाद - तुळजापूर येथील बिअर बारवर पोलिस पथकाची धाड, लाखाचा गुटखा जप्त, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू 👉 सिंधुदुर्ग - मिठबाव येथे गाडी जाळण्याचा प्रयत्न, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल, राजकीय वैमनस्यातून प्रकार घडल्याचा आरोप 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 नवी दिल्ली - सॅमसंगने गॅलक्सी J सीरिजचे J2 Ace (किंमत 8 हजार 490 रुपये) आणि J1 4G (6 हजार 890 रुपये) हे दोन स्मार्टफोन भारतात केले लाँच 👉 मुंबई - अॅमेझॉनवर महात्मा गांधींचा फोटो असलेली चप्पल विक्रीसाठी ठेवण्यात असल्याने पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे 🎯 खेळ घडामोडी : 👉 पुणे - भारत इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील आज पहिला सामना पुण्यात रंगणार 👉 नवी दिल्ली - पीव्ही सिंधूच्या नेतृत्वाखाली चेन्नई स्मॅशर्सने मुंबई रॉकेटसवर 4-3 ने विजय मिळवून 2017 प्रिमीयर बॅडमिंटन लीगचे जेतेपद पटकावले 👉 मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला धमकीचे निनावी पत्र पाठवल्या प्रकरणी एका आरोपीला अटक 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकचे शुटिंग सुरु, रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार, राजकुमार हिराणी यांनी ट्विट करून दिली माहिती 👉 मुंबई - जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविण्यात आले (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयात खटले निकालात काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी सध्या सुमारे 60,500 खटले प्रलंबित 👉 नवी दिल्ली - आयोजकांनी आवश्यक त्या परवानग्या घेतल्या नसल्याने दिल्लीत उद्या होणारा सनबर्न कार्यक्रम रद्द - दिल्ली पोलीस सूत्र 👉 आम्ही कोणाच्याही विरोधात नाही तर हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी व सशक्तीकरणासाठी काम करत आहोत - मोहन भागवत 👉 तामिळनाडू - मदुराईत जल्लीककट्टूच्या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांचा लाठीचार्ज, 30 जणांना ताब्यात घेतले (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 पाकिस्तानने वझिरिस्तानमधून शेकडो पश्तून मुलींचे अपहरण करून त्यांना लाहोरमध्ये देहविक्रयासाठी गुलाम बनवून ठेवले - उमर खत्तक, पश्तून अॅक्टिविस्ट 🎯 राजकीय घडामोडी : 👉 अकोल्यात स्वबळावर तर राज्यात डाव्यांसोबत लढणार, मनपा, जिल्हापरिषद निवडणूकीसाठी भारीप-बमसंची रणनिती - प्रकाश आंबेडकर यांची घोषणा 👉 औरंगाबाद येथील एमआयएमचे विद्यमान आमदार इम्तियाज जलील सोलापूरात, एमआयएम सोलापूरची आगामी महापालिका निवडणूक लढवणार 👉 पणजी - आम आदमी पक्षाने गोवा विधानसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला, कॅसिनोमुक्त गोवा हा आपचा प्रमुख निवडणूक मुद्दा 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 रत्नागिरी - दापोली तालुक्यातील दाभोळ येथे गुप्त धनासाठी खोदकाम करणाऱ्या 11 जणांना अटक, जुन्या घरात सुरू होते खोदकाम 👉 मुंबई - सनबर्न फेस्टिवलमध्ये फ्रेंच डीजे डेव्हिड गेटाचा कॉन्सर्ट उद्या होणार, मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळाल्याचा आयोजकांचा दावा 👉 सोलापूर - सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील जन्मशताब्दी वर्षानिमित्त रिओ पॅराऑलिम्पिक विजेता सुरज जाधव यास 3 लाख रूपयाचे बक्षीस देऊन गौरव 👉 अहमदनगर - सर्जेपुरा भागात दुचाकीवरून जाणा-या तरुणाचा गळा मांजाने कापला, काही तरुणांनी जखमी तरुणास खासगी रुग्णालयात केले दाखल 🎯 खेळ घडामोडी : 👉 इंदोर - रणजी स्पर्धेच्या फायनल सामन्यात मुंबईचा गुजरातकडून पराभव, गुजरातने रणजी चषक तब्बल 45 वेळा नावावर करणाऱ्या मुंबईला 5 विकेट्सनी चारली धूळ 👉 काही वेगळं आहे असं वाटत नाही, मी अजूनही तसाच आहे, मला फक्त कर्णधार करण्यात आलं आहे इतकंच - विराट कोहली 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉलिवूडपट 'ट्रिपल एक्सः रिटर्न ऑफ झेंडर केज' सिनेमा अखेर आज बॉक्स ऑफिसवर झळकला (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 जम्मू काश्मीर - सांबा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा अंधाधूंद गोळीबार, चार ते सहा दहशतवादी असल्याचा संशय, गोळीबारानंतर दहशतवादी फरार 👉 नवी दिल्ली - लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफीझ सईदने जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली 👉 नवी दिल्ली - बीएसएफ जवानाने जेवणाच्या दर्जाबाबत केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले नाही, गृहमंत्रालयाचा पंतप्रधान कार्यालयाला अहवाल 👉 नवी दिल्ली - चायनीज मांजावरील बंदी कायम, सर्वोच्च न्यायालयाने चायनीज मांजा वापरण्याची परवानगी नाकारली (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 हाँगकाँग - दुस-या महायुद्धाला सुरुवात झाल्याची बातमी सगळ्यात आधी ब्रेक करणा-या क्लेअर हॉलिंगवर्थ या महिला पत्रकाराचे वयाच्या 105 व्या वर्षी निधन 🎯 राजकीय घडामोडी : 👉 युती न करण्याचा काही कार्यकर्त्यांचा आग्रह, पण 25 वर्षाबरोबरच्या मित्राला सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न - रावसाहेब दानवे 👉 राज्यभरात आघाडी शक्य असली, तरी मुंबईत मात्र आघाडी अशक्य, काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाची तीच भूमिका असल्याने राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली - मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 औरंगाबाद - आरटीईनुसार खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया सोमवारपासून राबविण्यात येणार 👉 मुंबई - आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलल्या 👉 मुंबई - मुंबई मॅरेथॉन अडचणीत, महापालिकेची आयोजकांना नोटीस, 5 कोटी रुपये तात्काळ न भरल्यास कोर्टात खेचण्याचा आयुक्तांचा इशारा 👉 मुंबई - छगन भुजबळ वैद्यकीय उपचार प्रकरण, विशेष ईडी कोर्टाने डॉ. तात्याराव लहानेंना दोषी ठरवलं, अंजली दमानिया यांच्या याचिकेवरील निर्णय 👉 मुंबई - मुंबई महापालिकेप्रमाणेच मुंबई पोलिसांनीही सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी नाकारली, सनबर्नला मुंबईतला कार्यक्रम रद्द करावा लागणार 🎯 खेळ घडामोडी : 👉 लंडन - लंडन स्कूल ऑफ मार्केटिंगकडून जगातील 30 महागड्या खेळाडूंची यादी प्रसिद्ध, महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली या दोन भारतीय खेळाडूंचा समावेश 👉 पाकिस्तान - वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने T-20 मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यास दिला नकार, सुरक्षेच्या कारणास्तव दिला नकार 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 राज्यस्थान - पिंकसिटी म्हणून ओळखल्या जाणा-या जयपूर शहरामध्ये आजपासून तिस-या 'राजस्थान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल'ला सुरुवात होणार 👉 जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरमधील न्यायालयाने अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू आणि निलमला 25 जानेवारी पूर्वी न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 जम्मू-काश्मीर - श्रीनगरमध्ये लाल चौकाजवळ कोर्ट रोड येथे मोठी आग, अनेक दुकाने, दोन बँकांच्या इमारती आगीच्या भक्ष्यस्थानी 👉 उत्तर प्रदेश - शामली येथे मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि दारुगोळा जप्त, बेकायदा शस्त्र बनवणाऱ्या फॅक्टरीवरही छापा 👉 नवी दिल्ली - सरकारकडून डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रोख रकमेवर कर लावला जाण्याची शक्यता 👉 नवी दिल्ली - अर्थसंकल्प पुढे ढकलण्याबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 20 जानेवारीला सुनावणी 👉 नवी दिल्ली - एखाद्या सैनिकाला काही तक्रार असेल तर तो निनावी पत्राद्वारे ती करू शकतो, आम्ही त्याची ओळख जाहीर करणार नाही : लष्करप्रमुख रावत 👉 नवी दिल्ली - कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयचा विशेष न्यायालयात अहवाल सादर, पुढील सुनावणी 23 जानेवारीला 👉 नवी दिल्ली - 10 वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांना बंदी प्रकरणी अवजड उद्योग मंत्रालय राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात 👉 नवी दिल्ली - सायरस मिस्त्री यांच्या वादग्रस्त हकालपट्टीनंतर आता टाटा सन्सच्या अध्यक्षपदी यापुढे एन. चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली आहे 👉 नवी दिल्ली - कोंबड्यांच्या झुंजीशी संबंधित याचिकेवर त्वरित सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 👉 नवी दिल्ली - अॅमेझॉनने एका दिवसात लेखी माफी मागून सर्व वादग्रस्त उत्पादने मागे घेतली : विकास स्वरुप, परराष्ट्र व्यवहारमंत्रालय प्रवक्ता (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॉशिंग्टन - एच-1बी आणि एल1 व्हिसाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर उपायांसह विविध प्रकारची पावले उचलली जातील : सिनेटर जेफ सेशन 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - जिल्हा परिषद प्रचाराला सर्वांनाच जावं लागेल आणि ग्रामीण भागात सभा घ्यावाच लागतील.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी मंत्र्यांची कानउघडणी केली 👉 मुंबई - ‘राज्यभरात आघाडी शक्य असली, तरी मुंबईत मात्र आघाडी अशक्य आहे : संजय निरुपम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष 👉 मुंबई - भाजप-शिवसेनेच्या युतीवर संक्रांतीचं सावट, 15 जानेवारीनंतरच युतीसंदर्भातील चर्चेला होणार सुरूवात, सूत्रांची माहिती 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - बिहारचे सिंघम आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेले मराठमोळे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची मुंबईत बदली, अँटी नार्कोटिक सेलमध्ये उपायुक्तपदी होणार रुजू 👉 नाशिक - पिंपळगाव बसवंतमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 3 युवकांचा जागीच मृत्यू, कंपनीत कामावर जात असतानाच या तिघांना लक्झरीने उडवले 👉 औरंगाबाद - चिकलठाणा पोलिस स्टेशन हद्दीतील साई मंदिरामागे तरुणाची (अमोल साबळे वय, 32 वर्षे) कारमध्ये हत्या 👉 पुणे - शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी 25 किंवा 26 जानेवारीला जाहीर करू - खासदार श्रीरंग बारणे 👉 चंद्रपूर - सरपण आणण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने झडप, हल्ल्यात महिलेचा मृत्यू, सिंदेवाही तालुक्यातील शिवणी येथील घटना 👉 अहमदनगर - राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी घेतले शिर्डीत साईबाबांचे दर्शन 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 27238.06, निफ्टी : 8400.35, सोने भाव : 28,367 (प्रतितोळा), चांदी : 40,970 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 मुंबई - मोटो जी5 प्लसचे फोटो आणि फीचर्स लीक, फोनमध्ये 5.5 इंच फूल एचडी 1080×1920 पिक्सल डिस्प्ले, ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम, 3080 mAh बॅटरी आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज असणार आहे 🎯 खेळ घडामोडी : 👉 पुणे - धोनीने केले विराट कोहलीचे कौतुक, सर्व प्रकारची मॅच जिंकण्याची क्षमता आता या टीममध्ये आहे - एम. एस. धोनी 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - अभिनेत्री कंगना राणावतला ‘तनू वेड्स मनू 3’ मधून डिच्चू देण्यात आला आहे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

आज राजमाता जिजाऊ जयंती… Let's Up Special Update आपल्या मातीच्या स्वाभीमानासाठी अन् अभिमानासाठी शेतकर्‍यांसाठी, कष्टकर्‍यांसाठी लढणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज अन् छत्रपती संभाजीराजे यांना घडविणार्‍या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा आज जन्मोत्सव... खरंच राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र आपणा सर्वांस अत्यंत प्रेरणादायी असेच आहे. जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्‍वास, इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे... राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले. जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला. केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती. शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम, मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. त्यामुळे तानाजी, येसाजी, कान्होजी, शिवाजी, बाजी पालसकर, मुरारबाजी, बहिर्जी, कावजी, नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊमातेनं आपले मात्रुप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले. त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत. स्वराज्यावर अनेक संकट आली, अफ़जलखान, दिलेरखान, शाईस्तेखान, सिद्धी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. संकटसमयी जिजाऊ लढणार्‍या होत्या, रडणार्‍या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले. शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते. कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या, घोड्यावर बसा, गडकोट-किल्ले पायदळी घाला, शत्रुचा नि:पात करा, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे, मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले. आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी, मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे. राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत, शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ, तप, शांती, उपवास करीत बसल्या नाहीत. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, चातुर्य पणाला लावावे लागते, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. यावर जिजाऊंचा दृढ विश्‍वास होता. जिजाऊ प्रयत्नवादी होत्या. शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले. जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे. शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे. विखुरलेला समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले. त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला. सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं ,विकासाचं, प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले. जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा. प्रतिकुल परिरिस्थितीत जिजाऊंनी हतबल, निराश न होता मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंची हिंमत आजच्या महिलांमध्ये यावी,एवढीच जिजाऊ चरणी प्रार्थना करूया... (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://goo.gl/W2a1Ty जॉईन लेट्स अप ऑन व्हॉटस्अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

photo content

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी 👉 जवानांना निकृष्ट अन्न प्रकरण, जेवणाच्या दर्जाबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, 4-5 दिवसांत सगळ्या पोस्टमधून जेवणाच्या दर्जाबाबत अहवाल येईल : बीएसएफ 👉 500 आणि 1000 रुपये चलनातून काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केलेल्या ‘सूचने’मुळेच घेतला - RBI 👉 RBI च्या केंद्रीय मंडळाने 2000 रूपयांच्या नोटा जारी करण्याचा प्रस्ताव मे 2016 मध्येच मंजूर केला होता - RBI 👉 नोटबंदी लागू झाल्यापासून 34 दिवसांत सुक्ष्म आणि लघु उद्योगांत काम करणा-या 35 टक्के लोकांच्या नोक-या गेल्या, महसुलातही पन्नास टक्क्यांनी घट 👉 60 लाखांहून अधिक बँक खात्यांमध्ये प्रत्येकी 2 लाखांहून अधिक रक्कम जमा, नोटाबंदीनंतर 3 ते 4 लाख कोटी रुपये अघोषित संपत्ती बँकांमध्ये जमा - केंद्रीय अर्थमंत्री, अरुण जेटली 👉 छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा रक्षकांनी केला 4 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद 👉 राष्ट्रीय ग्राहक मंचाने मलेशियन एअरलाइन्सला एका कंपनीला 1 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे दिले आदेश जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अ‍‍ॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://goo.gl/JIfsvG 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी: 👉 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जैरेड कशनर होणार व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती 🎯 राजकीय घडामोडी : 👉 शासकीय जाहिरातीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह अन्य नेत्यांचेही फोटो वगळण्यात येणार, निवडणूक आयोगाचा निर्णय 👉 कोणाचा प्रस्ताव आल्यास महापालिका निवडणूकीत युतीबाबत विचार करणार - राज ठाकरे 👉 लोकसंख्येसंबंधी वादग्रस्त विधान करुन आदर्श अचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाची भाजप खासदार साक्षी महाराज यांना नोटीस 👉 महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोवा सुरक्षा मंच आणि शिवसेना यांची गोवा विधानसभा निवडणुकीसाठी युती 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 लातूर - येथील आनंदवाडी या संपूर्ण गावाचा अवयवदानाचा संकल्प, आनंदवाडी गावाचे देशभरातून कौतुक 👉 पुणे - अमली पदार्थ विरोधी पथकाने पावणे 3 लाखाचे कोकेन, एमडी जप्त, नायजेरीयन तरुणाला अटक, बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 👉 परभणी - पाथरी येथे मुलीच्या छेडछाडीवरून वाद, घटनेच्या निषेधार्थ शहरातील बाजारपेठ बंद, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी 👉 नाशिक - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची 57 लाख रक्कम गहाळ केल्याप्रकरणी सभापती देवीदास पिंगळे यांना उपनिबंधकांची नोटीस 🎯 व्यापार घडामोडी 👉 मुंबई शेअर बाजार: सेन्सेक्स: 26899.56, निफ्टी: 8288.60, सोने भाव: 28,068 (प्रतितोळा), चांदी: 40,610 (प्रतिकिलो) 👉 बँक ऑफ बडोदाकडून (बीओबी) ग्राहकांना खूशखबर, व्याजदरात 0.7 टक्क्याने कपात, नवा व्याजदार 8.35 टक्के 👉 डिसेंबर महिन्यात कारच्या विक्रीमध्ये 8.14 टक्क्यांनी घट, प्रवासी वाहनांच्या विक्रीत 1.36 टक्क्यांनी घट 👉 अदानी समूह पुढील 5 वर्षात गुजरातमध्ये 49 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार : गौतम अदानी 🎯 खेळ घडामोडी: 👉 भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला निनावी पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी, मदिनीपूर पोलीस आयुक्ताकडे केली तक्रार 👉 सुप्रसिद्ध फुलबॉल पटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला पुन्हा एकदा फिफा प्लेअर ऑफ इयरचा पुरस्कार देण्यात आला आहे 🎯 मनोरंजन घडामोडी: 👉 अभिनेता जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल भाजपाचा प्रचार करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जाण्याची शक्यता 👉 दिग्गज अभिनेता ओम पुरी यांची महत्वाची भूमिका असलेला 'राम भजन झिंदाबाद' या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://telegram.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)