uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 766 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 593-o'rinni va Hindiston mintaqasida 11 939-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 766 obunachiga ega bo‘ldi.

13 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -26 ga, so‘nggi 24 soatda esa 19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 12.63% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 8.01% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 266 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 704 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 14 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 766
Obunachilar
+1924 soatlar
+537 kunlar
-2630 kunlar
Postlar arxiv
photo content
+9

photo content

🔵राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020🔵 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️परीक्षा वेळ -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12 -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05 ◼️परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी.(तशी योजना असल्यास) ◼️परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? »प्रवेशपत्र »आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. »त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे. »झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात. »नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(मास्क) »हातमोजे(हँडग्लोज) »फेस शिल्ड »हँड सॅनिटायझरची पशवी/बॉटल (पारदर्शक असावी) »किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) »दोन-तीन पाणी बॅाटल »मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग »आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा »परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. »किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा. »परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास) »दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना परीक्षा केंद्र सोडून बाहेर जाण्यास मनाई आहे. ◼️उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? »परीक्षेचे नाव व वर्ष  »परीक्षा क्रमांक »बुकलेट क्रमांक »विषय सांकेतांक-पेपर:-1=035, पेपर:-2=036 »प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी ) »स्वत:ची सही ◼️परीक्षेच्या वेळी हजेरीपटावर ती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे. »पर्यवेक्षकांची सही »शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे. 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले

🔵राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020🔵 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️परीक्षा वेळ -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12 -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05 ◼️परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी.(तशी योजना असल्यास) ◼️परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? »प्रवेशपत्र »आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. »त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन रंगीत झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे. »झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन रंगीत झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात. »नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(मास्क) »हातमोजे(हँडग्लोज) »फेस शिल्ड »हँड सॅनिटायझरची पशवी/बॉटल (पारदर्शक असावी) »किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) »दोन-तीन पाणी बॅाटल »मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग »आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा »परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. »किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा. »परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास) »दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना परीक्षा केंद्र सोडून बाहेर जाण्यास मनाई आहे. ◼️उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? »परीक्षेचे नाव व वर्ष  »परीक्षा क्रमांक »बुकलेट क्रमांक »विषय सांकेतांक-पेपर:-1=035, पेपर:-2=036 »प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी ) »स्वत:ची सही ◼️परीक्षेच्या वेळी हजेरीपटावर ती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे. »पर्यवेक्षकांची सही »शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

🟧भारताचे चीनशी संबंध गुंतागुंतीचे - मुरलीधरन भारत आणि चीन यांच्यातील संबंध गुंतागुंतीचे असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या संवेदनांचा व आशा-आकांक्षांचा आदर करण्याचे ठरवले असून त्यावरच संबंधातील पुढील दिशा अवलंबून असेल, असे भारताने बुधवारी म्हटले आहे. परराष्ट्र मंत्री मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले, की चीनशी भारत चर्चा सुरू ठेवणार आहे. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अजून इतर अनेक प्रलंबित प्रश्न पूर्व लडाख भागात आहेत. दोन्ही देशांनी संघर्षाच्या क्षेत्रातून सैन्य माघारी घेण्याचे मान्य केले आहे. भारत व चीन यांच्यातील संबंधांवर पूर्वीच्या वाटाघाटींचा भंग झाल्याने काही परिणाम झाला आहे काय, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आला होता. त्यावर मुरलीधरन यांनी म्हटले आहे, की गेल्या वर्षी एप्रिल, मे महिन्यापासून चीनने जैसे थे परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेकदा केले होते. भारताच्या सैन्य दलांनी त्याला चोख उत्तर दिले होते. चीनच्या बाजूने करण्यात आलेले जैसे थे परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न भारताला अस्वीकार्य होते. या घडामोडींनी दोन्ही देशातील शांततेला बाधा आली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पश्चिम भागात काही घडामोडी झाल्या. सरकार नेहमी पूर्व लडाखला पश्चिम क्षेत्र असे संबोधत आले आहे.

🟧ICCच्या क्रमवारीत ‘किंग’ कोहलीचा नवा पराक्रम. अहमदाबाद येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारताचे स्टार फलंदाज अपयशी ठरले. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताला हार पत्करावी लागली असली तरी, विराट कोहलीचे चाहते सुखावले आहेत. मागील काही दिवसांपासून विराटची बॅट शांत होती. मात्र, मागील दोन डावात विराटने अर्धशतके ठोकत टीकाकारांची तोंडे बंद केली. या कामगिरीसोबतच विराटने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. अशी कामगिरी करणारा विराट जगातील पहिलाच फलंदाज - नव्याने जाहीर झालेल्या फलंदाजांच्या आयसीसी टी-20 क्रमवारीत विराट पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचे आता या यादीत 744 गुण जमा झाले आहेत. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथम आणि कसोटीत पाचव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो अव्वल-5 फलंदाजांमध्ये आहे. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. दुसरीकडे इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दोनदा शून्यावर परतलेला भारतीय सलामीवीर के. एल. राहुलला या क्रमवारीत तोटा सहन करावा लागला आहे. टी-२० क्रमवारीत तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वल स्थानी विराजमान आहे. त्याच्याकडे 894 रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा आरोन फिंच दुसऱ्या तर, पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे.

🟧एच. के. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना’ याची सल्लागार समिती भारत सरकारने ‘स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना’ (SISFS) याच्या अंमलबजावणी आणि देखरेखीसाठी एक तज्ञ सल्लागार समिती तयार केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे एच. के. मित्तल ही या समितीचे अध्यक्ष असतील. समितीच्या इतर सदस्यांमध्ये DPIIT, नीती आयोग, जैवतंत्रज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग आणि स्टार्टअप परिसंस्थेमधील तज्ञांचा समावेश आहे. ▪️‘स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना’ (SISFS) स्टार्टअप उद्योग क्षेत्रासाठी समर्पित असा 1000 कोटी रुपयांचा ‘स्टार्टअप इंडिया बीज निधी’ तयार करण्यात आला आहे. स्टार्टअप उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवणे हा या निधीमागचा हेतु आहे. त्यामुळे नवोदित उद्योजकांना त्यांच्या नवकल्पनांचा पाठपुरावा करण्यात मदत मिळणार. ▪️स्टार्टअप उद्योगाची व्याख्या स्टार्टअप ही अशी एक संस्था आहे ज्याची पाच वर्षाहून अधिक काळासाठी भारतात नोंदणीकृत नाही आणि ज्याची वार्षिक उलाढाल कोणत्याही आर्थिक वर्षात 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक नाही. तंत्रज्ञान किंवा बौद्धिक संपदेद्वारे प्रेरित असलेली नवीन उत्पादने किंवा सेवांच्या अभिनव, विकास, उपयोजन किंवा व्यवसायीकरणाच्या दिशेने कार्य करणारी ही एक संस्था आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या व्यवसायाचे विभाजन / पुनर्निर्माण करून ही संस्था तयार केली गेली नसावी.मागील आर्थिक वर्षात उलाढाल 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्यास किंवा स्थापनेच्या तारखेपासून 5 वर्ष पूर्ण केली असल्यास संस्थेला स्टार्टअप समजले जात नाही. आंतर-मंत्रीमंडळाकडून प्रमाणपत्र मिळविल्यानंतर स्टार्टअप कर लाभासाठी पात्र ठरते.एच. के. मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली ‘स्टार्टअप इंडिया बीज निधी योजना’ याची सल्लागार समिती.

🟧डॉ. हर्ष वर्धन: ‘स्टॉप टीबी पार्टनर्शिप’ मंडळाचे नवे अध्यक्ष भारताचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांची ‘स्टॉप टीबी पार्टनर्शिप’ मंडळाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. हर्ष वर्धन यांना या पदावर जुलै 2021 पासून तीन वर्षांच्या मुदतीसाठी नेमण्यात आले आहे. ▪️‘स्टॉप टीबी पार्टनर्शिप’ विषयी. ‘स्टॉप टीबी पार्टनर्शिप’ ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. ही संस्था एक सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी जगभरात कार्य करते. संस्था क्षयरोगाविरूद्धच्या लढाईत जगभरातील कर्त्यांना संरेखित करण्याचे काम करते. संस्थेची स्थापना वर्ष 2000 मध्ये झाली. संस्थेचे सचिवालय जिनिव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे. ▪️क्षयरोगाविषयी हा रोग प्राचीन काळापासून जगातल्या अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक असलेल्या ‘TB बॅसीलस’ नामक जिवाणूचा शोध लागला. क्षयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णाला डॉट्स (DOTS) प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.

🟧 "प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी”: आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून आरोग्यासाठी एकल अक्षय राखीव निधी. आरोग्यासाठी “प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी” (PMSSN) हा एकल अक्षय राखीव निधी निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ‘वित्त कायदा 2007’ याच्या कलम 136(ब) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून हा निधी उभारण्यात येणार आहे. ▪️ योजनेची वैशिष्ट्ये हा सार्वजनिक खात्यात आरोग्यासाठी अक्षय राखीव निधी आहे.आरोग्य आणि शिक्षण उपकरातला आरोग्याचा वाटा निधीमध्ये जमा केला जाईल.निधीमधल्या जमा रकमेचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या खालील योजनांसाठी उपयोग केला जाईल. आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आयुषमान भारत - आरोग्य आणि वेलनेस केंद्रे (AB-HWCs) राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY) आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्तीसाठी सज्जता आणि आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रतिसाद शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दिशेने कोणताही भविष्यातला आराखडा किंवा योजना तसेच ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये ठेवण्यात आलेली उद्दिष्टेनिधीचे प्रशासन आणि देखभाल हे काम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सोपवण्यात आले आहे. कोणत्याही वित्तीय वर्षात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अशा योजनासाठीचा खर्च सुरवातीला निधीमधून करण्यात येईल त्यानंतरचा खर्च सकल अर्थसंकल्पीय सहाय अंतर्गत करण्यात येईल.

🟧मिशन सागर-4”: INS जलश्व जहाज मदत घेऊन कोमोरोस देशात पोहचले. भारतीय नौदलाने चालविलेल्या ‘मिशन सागर-4’चा एक भाग म्हणून “INS जलश्व” हे जहाज अन्नधान्य घेऊन कोमोरोस देशाच्या अंजौयन बंदरावर पोहोचले. जहाजाने 1000 मेट्रिक टन तांदूळ पाठविण्यात आला आहे. या मोहिमेमधून भारत सरकारकडून आपल्या मित्र देशांना नैसर्गिक संकटे आणि कोविड-19 महामारीच्या काळात अन्नधान्याची मदत करण्यात येत आहे. कोमोरोस हे हिंद महासागरातील आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍याजवळील एक गरीब बेट-राष्ट्र आहे. कोमोरोस आफ्रिका खंडातील तिसरा सर्वांत छोटा देश आहे. मोरोनी ही कोमोरोसची राजधानी आहे. कोमोरियन फ्रॅंक हे राष्ट्रीय चलन आहे. ▪️पार्श्वभूमी भारत सरकारच्या “सेफ्टी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रीजन अर्थात सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास (SAGAR)” धोरणाच्या पार्श्वभूमीवर, ‘मिशन सागर’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला मे-जून 2020 मध्ये प्रारंभ झाला. त्यानुसार भारताने मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मेदागास्कर आणि कोमोरोस येथे अन्नधान्याची आणि औषधांची मदत पाठविण्यात आली. आपल्या सागरी शेजारी देशांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि मित्रत्वाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी त्या देशांना संकटकाळामध्ये मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून ‘मिशन सागर’ हे अभियान चालवले जात आहे. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र कल्याण मंत्रालय यांच्या समन्वयातून ही मोहीम पार पाडण्यात येत आहे.

🟧जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ भारतात. जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील आहेत, दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर आहे, असे आयक्यूएअर या स्विस संघटनेने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. तथापि, दिल्लीतील हवेच्या दर्जात २०१९ ते २०२० या कालावधीत १५ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे, असेही अहवालामध्ये म्हटले आहे. हवेच्या दर्जात सुधारणा झाली असली तरी दिल्ली हे १० व्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे आणि जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे, असे अहवालामध्ये म्हटले आहे. जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असल्याने प्रदूषित शहरांच्या श्रेणीत भारताचे स्थान अद्याप कायम आहे. दिल्लीसह गझियाबाद, बुलंदशहर, बिसराख जलालपूर, नोइडा, ग्रेटर नोइडा, कानपूर, लखनऊ, मेरठ, आग्रा आणि मुझफ्फरनगर त्याचप्रमाणे राजस्थानातील भिवारी, फरिदाबादर्, ंजद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक आणि धरुहेरा आणि बिहारमधील मुझफ्फरपूर ही अन्य २१ शहरे प्रदूषित आहेत. सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत चीनमधील झिनजिआंगचा समावेश आहे त्यापाठोपाठ भारतातील नऊ शहरांचा समावेश आहे. गझियाबाद हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. भारतामध्ये हवेचे प्रदूषण प्रामुख्याने वाहतूक, स्वयंपाकासाठी जाळण्यात येणारा बायोमास, वीजनिर्मिती, उद्योग, बांधकाम आणि कचरा जाळणे यामुळे होत आहे.

🟧पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मुख्य सल्लागार पी.के.सिन्हा यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के. सिन्हा यांनी आज राजीनामा दिला आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सिन्हा यांना सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलं होतं. भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७७ च्या तुकडीचे ते अधिकारी होते. त्यांनी या अगोदर पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी म्हणूनही काम केलेलं ऐआहे. याशिवाय ते ऊर्जा मंत्रालयात सचिवपदी देखील कार्यरत होते. तसेच, त्यांना चार वर्ष मंत्रीमंडळ सचिव म्हणूनही काम केलंलं आहे. सिन्हा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवलेली आहे. तसेच, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून अर्थशास्त्रात पदव्युत्तर परीक्षा देखील पास केलेली आहे. याशिवाय सेवाकाळात त्यांनी लोक प्रशासनात पदव्युत्तर पदविका आणि सामाजिक विज्ञान विषयात एम.फिल देखील पूर्ण केलेलं आहे. त्यांनी उत्तर प्रदेश राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये विविध महत्वांच्या पदावर काम केलेलं आहे.

🟧भारतीय भूदल स्वदेशी “मोबाइल इंटीग्रेटेड नेटवर्क टर्मिनल (MINT)” प्रणाली खरेदी करणार भारतीय भूदल स्वदेशी “मोबाइल इंटीग्रेटेड नेटवर्क टर्मिनल (MINT)” प्रणाली खरेदी करणार आहे. ▪️ठळक बाबी. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत ही खरेदी केली जाणार आहे. “मोबाइल इंटीग्रेटेड नेटवर्क टर्मिनल (MINT)” प्रणालीमुळे भारतीय भूदलाची कार्यक्षम संपर्क क्षमता वाढेल. ते एक सहज हाताळण्याजोगे, हलके, एकात्मिक संपर्क उपकरण आहे. ही उपकरण उपग्रहाच्या माध्यमातून माहिती पाठवू वा प्राप्त करू शकते.

🟧सर्वच बँकांचे खासगीकरण नाही - अर्थमंत्री सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे खासगीकरण केले जाणार नाही. तसेच खासगीकरण होत असलेल्या बँकांमधील कर्मचारी व ठेवीदारांचे हित जपले जाईल, अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी दिली. ‘आयडीबीआय’सह अन्य दोन सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली असून, सरकारी हिस्सेदारी कमी करण्यासाठी १.७५ लाख कोटी रुपयांची निर्गुंतवणूक केली जाणार आहे. बँकांच्या खासगीकरणाविरोधात देशातील बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस आंदोलन केले. या पाश्र्वभूमीवर सीतारामन यांनी महत्त्वाचे विधान केले. देशाच्या र्आिथक विकासाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी मोठ्या बँकांची गरज असून खासगीकरणाचे धोरण विचारपूर्वक राबवले जात असल्याचेही सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

🟧बोरिस जॉन्सन एप्रिलअखेरीस भारतात. हिंद- प्रशांत सहकार्यातील संधींचा अंदाज घेण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे एप्रिल अखेरीस भारतात येणार आहेत. युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर त्यांचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असून हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहकार्यामुळे नवीन संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. जॉन्सन हे प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे म्हणून जानेवारीतच भारतात येणार होते पण करोनामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला होता. जॉन्सन यांनी अलीकडच्या काळात संरक्षण, सुरक्षा खात्यांचा आढावा घेऊन काही निष्कर्ष काढले असून ब्रेग्झिटोत्तर परराष्ट्र धोरणावरही विचार केला आहे. जागतिक पातळीवर ब्रिटनला पुन्हा नव्याने वेगवेगळ्या क्षेत्रांत उभे करण्याचे आव्हान त्यांच्या पुढे आहे. हिंद-प्रशांत क्षेत्राला परराष्ट्र धोरणात महत्त्व देण्यात आले असल्याचे सूचित होत आहे. किंबहुना हा भाग भूराजकीय केंद्राच्या भूमिकेत आहे. ब्रिटनने आसियान देशांच्या आर्थिक संघटनेतही भागीदारी केली असून त्यात भारत हा संवाद भागीदार आहे. यावर्षी क्वीन एलिझाबेथ कॅरियर पहिल्यांदा नाटो देशांसमवेत तैनात करण्यात आली असून ब्रिटनने असोसिएशन ऑफ साऊथ इस्ट एशियन नेशन्स या देशांच्या संघटनेशी भागीदारीसाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत. एप्रिल अखेरीस जॉन्सन भारतात येत असून युरोपीय समुदायातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा हा पहिलाच मोठा आंतरराष्ट्रीय दौरा आहे. भारत व ब्रिटन यांच्या विस्तारित व्यापार भागीदारी हा एक हेतू यात असून तो मुक्त व्यापार कराराच्या आधीचा टप्पा आहे.

🟧मधमाश्यांकरवी हत्ती-मानव संघर्षाला आळा घालण्यासाठी KVICच्या RE-HAB प्रकल्पाचा प्रारंभ खादी व ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 15 मार्च 2021 रोजी मानव-हत्ती यांच्यामधला संघर्ष कमी करण्यासाठी “मधू-मक्षिका कुंपण” तयार करण्याचा अनोखा प्रकल्प हाती घेतला आहे. मधमाशांचा वापर करून मानवी वस्त्यांवर होणारे हत्तींचे हल्ले संपुष्टात आणावे आणि मनुष्य व हत्ती दोहोंमधील प्राणहानी कमी करावी हे “RE-HAB” (Reducing Elephants-Human Attacks using Bees) प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यासाठीचा मार्गदर्शक प्रकल्प 15 मार्च 2021 रोजी खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांच्या हस्ते कर्नाटकातील कोडागू जिल्ह्यातील चेलुर गावाभोवतालच्या चार ठिकाणी उभारण्यात आला. नागरहोळे राष्ट्रीय अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पाच्या सीमांवरील असे भाग जिथे सातत्याने मानव-हत्ती संघर्ष घडत असतात, त्या ठिकाणांवर हा प्रकल्प उभारला आहे. खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या राष्ट्रीय मधु योजनेअंतर्गत RE-HAB हा उप-प्रकल्प आहे. मधु योजना ही मधमाश्यांची संख्या, मधाचे उत्पादन व मधुमक्षिका-पेट्या तयार करून त्याद्वारे मधमाश्या-पालकांचे उत्पन्न वाढवण्यासाठीची योजना आहे. RE-HAB हा प्रकल्प याच मधमाश्यांच्या पेट्या विवक्षित ठिकाणी लावून त्यांच्याद्वारे हत्तींचे हल्ले रोखण्यासाठी आहे. ▪️खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) विषयी खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) हे एक वैधानिक मंडळ आहे, ज्याअंतर्गत ग्रामीण विकासात गुंतलेल्या इतर संस्थासह समन्वयाचे ग्रामीण भागात खादी व इतर ग्रामोद्योगांच्या विकासासाठी कार्यक्रमांचे नियोजन, जाहिरात, आयोजन व अंमलबजावणी करण्यास सदैव कार्यरत असते. KVIC ची स्थापना 1956 साली झाली आणि त्याचे मुंबईमध्ये मुख्यालय आहे.

🟧 परकीय चलनसाठ्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर भारताचा परकीय चलनसाठा (forex reserves) जगात चौथ्या क्रमांकाचा ठरला आहे. भारताने याबाबतीत रशियाला मागे टाकले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिलेल्या माहितीनुसार, 5 मार्चला भारताचा परकीय चलनसाठा 580.3 अब्ज डॉलरवर होता. चीनकडे सर्वात जास्त परकीय चलनसाठा आहे, त्यानंतर जपान आणि स्वित्झर्लंड या देशांचा क्रम लागतो आहे. चीनजवळ जगातील सर्वाधिक 3.1 महादम (ट्रिलियन) डॉलर परकिय चलनसाठा आहे. ▪️परकीय चलनसाठा. परकीय चलनसाठ्याला 'राखीव चलन (Reserve Currency)' असेही म्हणतात. यात परकीय चलनाच्या स्वरूपात साठा ठेवला जातो. प्रत्येक देशाची केंद्रीय बँक ही रक्कम औपचारिक रित्या साठा म्हणून जमा करत असते. अधिक परकिय चलनसाठा असलेल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली प्रतिमा असते. कारण आंतराराष्ट्रीय व्यापारात या चलनसाठ्यावरुन ठरणाऱ्या प्रतिमेचा चांगला उपयोग होतो. अधिक परकिय चलनसाठा असणारा देश परराष्ट्रीय व्यापारात चांगला भाग प्राप्त करतो. सर्वाधित परकिय चलनसाठा हा अमेरिकन डॉलरमध्ये ठेवला जातो, कारण अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वाधिक व्यवहारात वापरले जाणारे चलन आहे. थेट गुंतवणूक, त्याचबरोबर शेअर बाजारात झालेली गुंतवणूक याचा विचार करून परकीय चलन विनिमय दरानुसार या साठ्यांचे मूल्यांकन केले जात असते. परकीय चलन साठा केंद्रीय बँकासाठी महसूल मिळविण्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहेत, जे परकीय सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवितात आणि आंतरराष्ट्रीय चलन निधी (IMF) आणि इतर सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक करतात. परकिय चलनसाठ्यामध्ये परदेशी चलन, गोल्ड रिझर्व्ह, SDR आणि IMF कोटा डिपॉसिट, ट्रेझरी बिल, बॉन्ड आणि इतर सरकारी सिक्यूरीटीज समाविष्ट असतात.

📊 इकॉनॉमिक फ्रीडम निर्देशांक २०२१ ✔️ प्रकाशक : हेरिटेज फाउंडेशन 🇮🇳 भारताचे स्थान : १२१ वे ५६.५ गुणांसह 🔝 पहिले पाच देश व त्यांचे गुण 🇸🇬 ०१) सिंगापूर (८९.०९ गुण) 🇳🇿 ०२) न्यूझीलंड (८३.९ गुण) 🇦🇺 ०३) ऑस्ट्रेलिया (८२.४ गुण) 🇨🇭 ०४) स्वित्झर्लंड (८१.९ गुण) 🇮🇪 ०५) आयर्लंड (८१.४ गुण) ✔️ काही महत्त्वाचे देश व त्यांचे स्थान 🇬🇧 ०७) ब्रिटन (७८.४ गुण) 🇺🇲 २०) अमेरिका (७४.८ गुण) 🇯🇵 २३) जपान (७४.०१ गुण) 🇮🇱 २६) इस्त्रायल (७३.८ गुण) 🇩🇪 २९) जर्मनी (७२.५ गुण) 🇷🇺 ९२) रशिया (६१.५ गुण) 🇿🇦 ९९) दक्षिण आफ्रिका (५९.७ गुण) 🤝 भारताचे शेजारील देश व त्यांचे स्थान 🇨🇳 १०७) चीन (५८.४ गुण) 🇧🇩 १२०) बांग्लादेश (५६.५ गुण) 🇱🇰 १३१) श्रीलंका (५५.७ गुण) 🇦🇫 १४६) अफगाणिस्तान (५३ गुण) 🇵🇰 १५२) पाकिस्तान (५१.७ गुण) 🇳🇵 १५७) नेपाळ (५०.७ गुण) 🇰🇵 शेवटचा क्रमांक : उत्तर कोरिया (१७८वा) .

🔵राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020🔵 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️परीक्षा वेळ -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12 -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05 ◼️परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी.(तशी योजना असल्यास) ◼️परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? »प्रवेशपत्र »आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. »त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन रंगीत झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे. »झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन रंगीत झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात. »नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(मास्क) »हातमोजे(हँडग्लोज) »फेस शिल्ड »हँड सॅनिटायझरची पशवी/बॉटल (पारदर्शक असावी) »किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) »दोन-तीन पाणी बॅाटल »मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग »आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा »परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. »किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा. »परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास) »दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना परीक्षा केंद्र सोडून बाहेर जाण्यास मनाई आहे. ◼️उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? »परीक्षेचे नाव व वर्ष  »परीक्षा क्रमांक »बुकलेट क्रमांक »विषय सांकेतांक-पेपर:-1=035, पेपर:-2=036 »प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी ) »स्वत:ची सही ◼️परीक्षेच्या वेळी हजेरीपटावर ती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे. »पर्यवेक्षकांची सही »शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा! 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले