uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 724 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 599-o'rinni va Hindiston mintaqasida 11 969-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 724 obunachiga ega bo‘ldi.

10 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -87 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.98% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.78% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 364 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 275 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 724
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-177 kunlar
-8730 kunlar
Postlar arxiv
🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

🟪मँचेस्टर सिटी अंतिम फेरीत. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मँचेस्टर सिटीने मंगळवारी मध्यरात्री ऐतिहासिक विजयाची नोंद करताना प्रथमच चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीत धडक मारली. रियाद महरेझने नोंदवलेल्या दोन गोलमुळे सिटीने उपांत्य फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेनवर २-० अशी मात केली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सिटीने गेल्या आठवडय़ात झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील लढतीत सेंट-जर्मेनला २-१ असे नमवले होते. त्यामुळे एकूण ४-१ अशा गोलफरकासह त्यांनी अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. चॅम्पियन्स लीगमध्ये सलग सात सामने जिंकणारा सिटी हा इंग्लंडमधील पहिलाच संघ ठरला आहे. त्यांनी मँचेस्टर युनायटेड आणि आर्सेनल यांच्या सलग सहा विजयांच्या विक्रमाला मागे टाकले. आता २९ मे रोजी होणाऱ्या जेतेपदाच्या लढतीत सिटीसमोर रेयाल माद्रिद किंवा चेल्सी यांच्यापैकी एकाचे आव्हान असेल. केव्हिन डीब्रुएनेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सिटीसाठी पॅरिसमध्येच जन्मलेल्या महरेझने अनुक्रमे ११व्या आणि ६३व्या मिनिटाला गोल केले. सिटीने यंदाच्या हंगामात लीग चषक स्पर्धेचे जेतेपद मिळवले असून प्रीमियर लीगमध्येही त्यांचे विजेतेपद जवळपास सुनिश्चित झाले आहे. त्यामुळे चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी जिंकून अजिंक्यपदाची हॅट्ट्रिक साकारण्याची सिटीकडे सुवर्णसंधी आहे.

🟪इस्रायलमध्ये सरकार स्थापण्यात नेतान्याहू यांना अपयश. इस्रायलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहिलेले आणि सध्या राजकीय संकटाने वेढले गेलेले बिन्यामिन नेतान्याहू यांना ठरवून दिलेल्या मुदतीत सरकार स्थापन करण्यात अपयश आले आहे. यामुळे २००९ सालापासून सुरू झालेली त्यांची अखंडित कारकीर्द संपवण्याची संधी त्यांच्या विरोधकांकडे चालून आली आहे. ७१ वर्षीय नेतान्याहू यांच्यावर भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांसाठी खटले सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये झालेल्या चौथ्या निवडणुकांचेही निकाल निर्णायक न ठरल्यामळे, अध्यक्ष रुवेन रिव्हलिन यांनी गेल्या ६ एप्रिल रोजी त्यांना सरकार स्थापनेसाठी जुळवाजुळव करण्यास सांगितले होते. रिव्हलिन यांनी नेतान्याहू यांना सरकार स्थापनेसाठी दिलेली मुदत मंगळवारी मध्यरात्री संपली. तोवर आघाडी स्थापन करण्याबाबत काहीही प्रगती न झाल्यामुळे देशातील राजकीय कोंडी आणखी लांबली आहे.

🟪मराठा आरक्षण रद्द मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा महाराष्ट्र सरकारचा ‘सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग कायदा २०१८’ सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने बुधवारी रद्दबातल ठरवला. पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचे समर्थन करणारी कोणतीही असामान्य परिस्थिती दिसत नसल्याने हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण, न्या. एल. एन. राव, न्या. हेमंत गुप्ता, न्या. एस. अब्दुल नाझीर, न्या. एस. रवींद्र भट या पाच सदस्यीय घटनापीठाने बुधवारी हा ऐतिहासिक निकाल जाहीर करताना आरक्षणासंदर्भातील अनेक मुद्देही स्पष्ट केले. इंद्रा साहनी विरुद्ध केंद्र सरकार या १९९२ च्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित केली होती. मराठा समाजाच्या आरक्षणाचा आधार असलेल्या एम. सी. गायकवाड आयोगाने ५० टक्क्यांची ही मर्यादा ओलांडून मराठा आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती स्पष्ट केलेली नाही. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवत दिलेल्या निकालातूनही अपवादात्मक परिस्थितीची स्पष्टता होत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

🟪आर. एम. सुंदरम: ICAR-भारतीय तांदूळ संशोधन संस्थेचे नवीन संचालक रमण मीनाक्षी सुंदरम यांची ICAR-भारतीय तांदूळ संशोधन संस्थेच्या (ICAR-IIRR) संचालकपदी नियुक्ती झाली. आर. एम. सुंदरम एक वैज्ञानिक आहेत, जे तांदूळ संशोधनाशी जुळलेल्या जैवतंत्रज्ञान, आण्विक प्रजनन आणि जीनोमिक्स क्षेत्रात कार्य करतात. त्यांनी तांदळाच्या ‘सुधारित सांबा महसूरी’ नामक एका वाणाचा विकास केलेला आहे. 👉भारतीय तांदूळ संशोधन संस्था (ICAR-IIRR) विषयी Bhaरतीय तांदूळ संशोधन संस्था ही भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) याच्या अंतर्गत कार्य करणारी एक प्रमुख संस्था आहे, जी तांदूळ / भात उत्पादनाच्या क्षेत्रात संशोधन कार्ये चालविते. संस्थेची स्थापना 1965 साली झाली. संस्था तेलंगणा राज्यातील हैदराबाद जवळ राजेंद्रनगर येथे आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) ही कृषी क्षेत्रात संशोधनात्मक कार्ये करणारी संस्था आहे. संस्थेचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. परिषदेची स्थापना 16 जुलै 1929 रोजी झाली.

🟪कोविडविषयक संशोधन कार्यावर लक्ष केंद्रित करा. आयुर्वेद व अन्य भारतीय चिकित्सा प्रणालीच्या शैक्षणिक संस्थांनी पूर्णपणे कोविडविषयक संशोधन कार्यावर लक्ष केंद्रित करावे, अशी सूचना आयुष मंत्रालयाकडून आली आहे. आयुर्वेद, युनानी, सिद्ध व तत्सम भारतीय उपचार पद्धतीचे नियमन करणारी देशातील सर्वोच्च संस्था असणाऱ्या भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने कोविड अनुषंगिक विशेष बैठकीत काही निर्णय घेतले व आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अध्यापन, रुग्णालय सेवा व जनजागृतीपर उपक्रमाबाबत चिकित्सा परिषदेने सर्व आयुर्वेदिक व तत्सम संस्थांसाठी सूचना केल्या आहेत. त्यानुसार, भारतीय उपचार प्रणालीच्या महाविद्यालयात ऑनलाईन माध्यमातून अध्यापन करण्याची अपेक्षा ठेवतानाच त्याचा कार्यक्रम सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पदव्युत्तर पातळीवर शोधप्रबंधपर तसेच संशोधन पातळीवर कोविड महामारीवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याची सूचना आहे. आयुर्वेद व योगा शाखेने रुग्णालय व्यवस्थापन पातळीवर गृह विलगीकरणासाठी आवश्यक ती पावले टाकावी, राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या अनुषंगाने कोविड रुग्णावरील उपचारासाठी एकात्मिक भूमिका ठेवावी, केंद्र किंवा राज्य शासनाने या शाखेचे महाविद्यालय किंवा रुग्णालय अधिग्रहित केले असतील तर त्याचा अहवाल चिकित्सा परिषदेकडे दर सोमवारी सादर करावा, कोविडची परिस्थिती पाहून महाविद्यालयातर्फे ऑनलाईन मार्गदर्शन तसेच बाह्य रुग्ण विभाग सुरू केले जाऊ शकतात, टेली मेडिसीनबाबत आयुषतर्फे सुधारित मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित केली जातील. भारतीय चिकित्सेच्या सर्व महाविद्यालयांनी जिल्हा किंवा स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोविड काळजी केंद्र तसेच कोविड आरोग्य केंद्र स्थापन करण्याबाबत प्रशासनाशी समन्वय साधावा, स्थानिक प्रशासनाच्या रितसर परवानगीने ही महाविद्यालये लसीकरण कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. भारतीय चिकित्सेच्या महाविद्यालयांनी त्यांची सर्व संसाधने कोविडविषयक जनजागृती करण्यासाठी उपयोगात आणावे, महाविद्यालयांनी समुपदेशक किंवा मानसिक रोग तज्ज्ञांची सेवा घेऊन परिसरातील लोकांचे समुपदेशन करावे, अशीही सूचना आहे.

🟪‘जी ७’ परिषदेच्या भारतीय शिष्टमंडळातील दोघांना करोना येथे ‘जी ७’ देशांच्या शिखर परिषदेसाठी भारताच्या वतीने परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेल्या शिष्टमंडळात दोघांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता उर्वरित कार्यक्रमाची फेरआखणी करण्यात येत असून थेट भेटीचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, काल सायंकाळी आमच्या शिष्टमंडळातील दोन जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासाठी दक्षतेचा भाग म्हणून आपण पुढील सर्व कार्यक्रम आभासी पद्धतीने पार पाडणार आहोत. ‘जी ७’ देशांची बैठकही याच पद्धतीने आपण पार पाडू. डॉ. जयशंकर हे ‘जी ७’ बैठकीला उपस्थित राहणार नाहीत ते आभासी पद्धतीने या बैठकीला संबोधित करतील, असे कोविड सोपस्कारानुसार आता ठरवण्यात आले आहे. ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डॉमनिक राब यांच्यासमवेत गुरुवारी जयशंकर यांची केंट येथे चर्चा होणार होती पण आता ती आभासी पातळीवर होणार आहे. जयशंकर हे सोमवारी लंडनमध्ये आले असून त्यांना डॉमनिक राब यांनी निमंत्रण दिले होते. भारतीय शिष्टमंडळ अजून लंडनमधील लँकेस्टर येथील ‘जी ७’ बैठकीसाठी गेलेले नाही. राब यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलिया, भारत, कोरिया, दक्षिण आफ्रि केतील आमचे मित्र तसेच आग्नेय आशियातील देश यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती पाहता हिंद प्रशांत क्षेत्राला ‘जी ७’ बैठकीत महत्त्व आहे.

🟪अ‍ॅथलेटिक्स चाचणी स्पर्धाचे यशस्वी आयोजन. जुलै महिन्यात होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्स प्रकारातील शर्यतींचे योग्य प्रकारे आयोजन करता येईल, असा विश्वास जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे प्रमुख सबास्टिअन को यांनी व्यक्त केला. जपानमधील सॅपपोरो येथे बुधवारी अर्ध-मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता लवकरच पूर्ण मॅरेथॉन आणि अन्य शर्यतींच्या आयोजनासाठीही जागतिक संघटना प्रयत्नशील आहे. यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धामध्ये कोणते अडथळे येऊ शकतात, यांचा अंदाज येईल आणि त्यावर उपाय शोधून मुख्य ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धा कोणत्याही अडचणींशिवाय संपन्न होतील, अशी माहिती को यांनी दिली. येत्या रविवारी आणखी एक चाचणी स्पर्धा रंगणार असून को स्वत: त्या स्पर्धेची पाहणी करून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे अहवाल सुपूर्द करणार आहेत. ‘‘जपानमधील फक्त दोन टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ऑलिम्पिकपूर्वी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अ‍ॅथलिट्सचे लसीकरण व्हावे, अशी आमची इच्छा आहे. येथील सद्य:स्थितीची आम्हाला जाणीव आहे. मात्र ऑलिम्पिकमुळे जपानसह संपूर्ण विश्वात नवचैतन्य संचारेल,’’ असेही को यांनी सांगितले.

🟪अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचा 'चेकमेट कोविड इनिशिएटिव्ह' उपक्रम. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF) या संस्थेने 4 मे 2021 रोजी बुद्धीबळ समुदायाला मदत करण्यासाठी 'चेकमेट कोविड इनिशिएटिव्ह' याचा प्रारंभ केला. या उपक्रमाच्या माध्यमातून संस्था महामारीच्या काळात संस्थेकडे नोंदणीकृत असलेले खेळाडू, लवाद, आयोजक, प्रशिक्षक आणि सेवानिवृत्त खेळाडू यांना आर्थिक मदत पुरविणार आहे. तसेच स्पर्धांसाठी परदेशात जाणाऱ्या खेळाडूंना लसीकरणासाठी देखील मदत करणार आहे. 👉अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघ विषयी अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघ ही बुद्धिबळ या क्रिडाप्रकारासाठीची भारतातील केंद्रीय प्रशासकीय संस्था आहे. संस्था भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे नियोजन करते. संस्थेला जागतिक बुद्धीबळ महासंघाने (FIDE) मान्यता दिली आहे. संस्थेची स्थापना 12 डिसेंबर 1958 रोजी झाली. संस्थेचे मुख्यालय चेन्नई (तामिळनाडू) येथे आहे.

🟧Simplified चालू घडामोडी डायरी YEARBOOK 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️विद्यार्थी प्रिय असलेले आपले YEAR BOOK महाराष्ट्रात सर्वत्र उ
🟧Simplified चालू घडामोडी डायरी YEARBOOK 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️विद्यार्थी प्रिय असलेले आपले YEAR BOOK महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com Thank-you👍👍

photo content

photo content
+9

photo content
+9

📍📍महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून Simplified Publications चे नवीन पुस्तक लवकरच......📍📍 🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैश
📍📍महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून Simplified Publications चे नवीन पुस्तक लवकरच......📍📍 🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪आकस्मिक आरोग्य सेवांची उपलब्धता वाढवण्यासाठी बँकांना 50,000 कोटी रुपयांची तरलता सुविधा. कोविड-19 संसर्गाच्या दुसऱ्या लाटेविरोधात देशाच्या संघर्षाला पाठबळ देण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 5 मे 2021 रोजी अनेक उपाययोजनांची घोषणा केली. कोविड संबंधित आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि सेवा यामध्ये वाढ करण्यासाठी, आकस्मिक आरोग्य सेवा सहजतेने उपलब्ध होण्यासाठी शक्तिकांत दास यांनी रेपो दराने तीन वर्ष कालावधीसाठी 50,000 कोटी रुपयांच्या मुदत तरलतेची घोषणा केली आहे. 31 मार्च 2022 पर्यंत ही कर्जपुरवठ्याची सोय उपलब्ध राहणार आहे. या सुविधेच्या अंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकांना विशेष प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. ▪️इतर घोषणा सूक्ष्म, लघु आणि इतर असंघटित क्षेत्रातील संस्थांना आणखी पाठबळ देण्यासाठी प्रत्येक कर्जदाराला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी रेपो दराने तीन वर्षांची 10,000 कोटी रुपंयाची रेपो परिचालन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नव्याने निर्माण झालेली आव्हाने लक्षात घेता लहान वित्तीय बँकांना 500 कोटी रुपयांपर्यंतचे आकारमान असलेल्या सूक्ष्म वित्तीय संस्थांना नव्याने कर्ज देण्याची आता परवानगी देण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्राशी अद्याप जोडले न गेलेल्या MSME उद्योगांना बँकिंग प्रणालीत समाविष्ट करण्यासाठी उत्तेजन देण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी 2021 मध्ये देण्यात आलेली सवलत आता 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. बँका आता त्यांच्या अनुत्पादक मालमत्तांकरिता विशिष्ट तरतुदीं लागू करण्यासाठी त्यांच्या 31 डिसेंबर 2021 रोजी लागू असलेल्या बदलत्या तरतुदींचा 100 टक्के वापर करू शकतील. राज्य सरकारांना देण्यात आलेल्या ओव्हरड्राफ्ट सुविधेत मंजूर दिवसांची मर्यादा 36 दिवसांवरून वाढवून 50 दिवस करण्यात आली आहे. या सवलतीच्या वापरासाठी सलग 14 दिवसांची मंजूर संख्या वाढवून 21 दिवस करण्यात आली आहे.

photo content

🟪पी. व्ही. सिंधू आणि मिशेल ली: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ‘बिलीव्ह इन स्पोर्ट्स’ मोहिमेचे अॅथलिट दूत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) ‘बिलीव्ह इन स्पोर्ट्स’ मोहिमेचे अॅथलिट दूत म्हणून भारताची पी. व्ही. सिंधू आणि कॅनडाची मिशेल ली यांचे नामांकन जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) दिले आहे. पी. व्ही. सिंधू आणि मिशेल ली या दोघी जागतिक बॅडमिंटन महासंघ (BWF) याच्या ‘आय अॅम बॅडमिंटन’ मोहिमेसाठीच्या वैश्विक दूत / अ‍ॅम्बेसेडर देखील आहेत. स्पर्धेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) 2018 सालापासून ‘बिलीव्ह इन स्पोर्ट्स’ मोहीम राबवत आहे. मोहिमेमधून खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी यांच्यादरम्यान भ्रष्टाचारविरोधात जागृती निर्माण केली जाते. ▪️आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) विषयी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) हे जागतिक ऑलिम्पिक चळवळीचे सर्वोच्च प्राधिकरण आहे. लुसाने (स्वित्झर्लंड) शहरात संस्थेचे मुख्यालय आहे. IOC दर चार वर्षांनी जागतिक स्पर्धांचे आयोजन करते. ते उन्हाळी आणि हिवाळी ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यासाठी जबाबदार आहे. IOC याची निर्मिती पिअरे डी कौर्बर्टिन यांनी 23 जून 1894 रोजी केली आणि डेमेट्रीओस विकेलस यांची प्रथम अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. त्याचे 105 सक्रिय सदस्य, 32 मानद सदस्य, 2 प्रतिष्ठित सदस्य (सेनेगल आणि अमेरिका) आहेत.

🟪भारत लवकरच 5G होणार; Jio, VI, Airtel करणार चाचण्या, चायनिज कंपन्यांना मात्र बंदी. भारत आता लवकरच 5G नेटवर्क सुविधेचा लाभ घेणार आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या संप्रेषण मंत्रालयाने आता भारतात 5G नेटवर्कच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. या चाचण्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल तसंच व्हिआय(VI) या कंपन्या सहभागी होणार असल्याचं समोर येत आहे. ह्या चाचण्या कधीपर्यंत चालतील याबद्दल मात्र अद्याप काहीही स्पष्ट झालेलं नाही. या चाचण्यांसाठी कोणत्याही चायनिज कंपन्यांना परवानगी नसल्याचं अधिकाऱ्यांनी सीएनबीसी या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून भारतातल्या 5G सेवेसंदर्भात हालचाली सुरु होत्या. मात्र, 5G चाचण्या घेण्यासंदर्भातल्या परवानगीची प्रतिक्षा कंपन्यांना लागून राहिली होती. रिलायन्स जिओने यापूर्वीच आपण स्वदेशी 5G नेटवर्क उभारणार असल्याबद्दल पुष्टी केली होती. स्वतःची 5G उपकरणं बनवण्यावरही काम सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. संपूर्णपणे भारतात विकसित झालेलं जिओचं 5G नेटवर्क हा मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धोरणांचा एक भाग आहे. भारतातलं 5G नेटवर्क हे १८००, २१००, २३००, ८००, ९०० मेगाहर्ट्झ वारंवारितेच्या पट्ट्यांवर काम करणार आहे. मात्र हे वारंवारितेचे पट्टे सर्विस प्रोव्हाइडरनुसार बदलू शकतात.

🟪स्थलांतर व चलनशीलता भागीदारी याबाबत भारत आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 5 मे 2021 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत भारत आणि ग्रेट ब्रिटन (उत्तर आयर्लंड सहीत) यांच्यात स्थलांतर आणि चलनशीलता भागीदारी यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास मंजुरी देण्यात आली. विद्यार्थी, संशोधक आणि कुशल व्यावसायिकांसाठी व्हिसा वाटप करण्याची प्रक्रिया उदार करत त्यांच्या चलनशीलतेला प्रोत्साहन देणे त्याचबरोबर अनियमित स्थलांतर आणि मानवी तस्करीशी संबंधित मुद्य्यांवर उभय बाजूनी सहकार्य दृढ करण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. भारतीय विद्यार्थी, शिक्षणतज्ञ, संशोधक, व्यावसायिक आणि आर्थिक कारणांसाठी स्थलांतरित तसेच दोन्ही देशांच्या आर्थिक विकासात, जात, धर्म किंवा लिंग लक्षात न घेता विविध प्रकल्पात योगदान देऊ इच्छिणाऱ्या सर्वाना या सामंजस्य कराराचा लाभ होणार आहे. परराष्ट्र कार्य मंत्रालय या सामंजस्य कराराच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, संयुक्त कार्यकारी गट यंत्रणेद्वारे बारकाईने देखरेख ठेवणार आहे. ▪️ग्रेट ब्रिटन (UK) विषयी ग्रेट ब्रिटन हा यूरोपातील वायव्येकडील द्वीपरूप देश आहे. देशामध्ये उत्तर आयर्लंड व आइल ऑफ मॅन व चॅनेल आयर्लंड सोडून इंग्लंड, वेल्स व स्कॉटलंड यांचा समावेश होतो. ग्रेट ब्रिटनच्या दक्षिणेस इंग्लिश खाडी, पश्चिमेस सेंट जार्जची खाडी, आयरिश समुद्र, नॉर्थ चॅनल व अटलांटिक महासागर, उत्तरेस अटलांटिक महासागर व पूर्वेस उत्तर समुद्र आहे. लंडन ही या देशाची राजधानी आहे. पौंड हे राष्ट्रीय चलन आहे