uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 711 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 599-o'rinni va Hindiston mintaqasida 11 969-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 711 obunachiga ega bo‘ldi.

10 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -87 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.98% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.78% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 364 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 275 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 711
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-177 kunlar
-8730 kunlar
Postlar arxiv
🟪अमेरिकेची भारताला ५० कोटी अमेरिकी डॉलरची मदत अमेरिकेने भारताला आतापर्यंत ५० कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक किमतीची करोनासंबंधीची मदत केली असल्याचे व्हाइट हाऊसने बुधवारी सांगितले. इतर देशांना ८ कोटी लशी पुरवण्याबाबत आपण लवकरच निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले. ‘अमेरिकेचे संघराज्य सरकार व राज्य सरकारे, अमेरिकी कंपन्या, संस्था व नागरिक यांच्याकडून मिळालेल्या योगदानापोटी अमेरिकेने भारताला आतापर्यंत ५० कोटी अमेरिकी डॉलरहून अधिक किमतीची कोविडविषयक मदत केली आहे’, असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन प्साकी यांनी आभासी पत्रकार परिषदेत सांगितले. बायडेन प्रशासन आता करोना महासाथीमुळे प्रभावित झालेल्या दक्षिण आशियातील इतर देशांना मदत पुरवण्याच्या दृष्टीने काम करत आहे. आरोग्यविषयक मदतसामुग्री, प्राणवायू, एन-९५ मुखपट्ट्या, जलद नैदानिक चाचण्यांच्या किट्स आणि औषधे सात विमानांतून आतापर्यंत रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती प्साकी यांनी दिली अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या ६ कोटी आणि इतर तीन मान्यताप्राप्त लशींच्या २ कोटी अशा करोना प्रतिबंधक लशींच्या ८ कोटी मात्रा पुरवण्याबाबत सध्या आम्ही मध्यस्थता प्रक्रियेच्या माध्यमातून काम करत आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

🟪महात्मा गांधींच्या संगमनेर भेटीला शंभर वर्षे पूर्ण लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर देशातील काँग्रेस पक्षाचे नेतृत्व महात्मा गांधींकडे गेले. टिळकांच्या कामाला पुढे नेण्यासाठी महात्माजींनी टिळक स्वराज्य फंडाची घोषणा केली आणि त्यासाठी देशव्यापी दौरा आखला. या दौऱ्याचा एक भाग म्हणून महात्मा गांधी संगमनेरला आले होते. या घटनेला उद्या (२१ मे ) १०० वर्षे पूर्ण होत आहेत. शंभर वर्षांनंतर देखील महात्मा गांधी यांच्या विचाराच्या स्मृती संगमनेरकरांनी दिलेल्या मानपत्राच्या रूपाने जतन करून ठेवल्या आहे. संगमनेरातल्या काकासाहेब पिंगळे, बापूसाहेब पारेगावकर, तुकाराम निऱ्हाळी, गंगाधर दळवी, मुरलीधर जयरामदास मालपाणी, जगन्नाथ दळवी, गणेश सखाराम सराफ, लालसाहेब पीरजादे, शिवनारायण नावंदर, बाबुराव ठाकूर, शंकरराव संतवकील आदी पुढारी मंडळींनी महात्मा गांधींना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले. गांधीजींनी ते स्वीकारले आणि २१ मे १९२१ रोजी महात्मा गांधी नाशिकहून थेट संगमनेरात पोहोचले. संगमनेरच्या भूमीला महात्मा गांधी यांचे पाय लागल्याने संगमनेरकर आनंदित झाले होते. गांधी त्या दिवशी शहरातील श्रीचंद वीरचंद गुजराती यांच्याकडे मुक्कामाला थांबले होते. या वेळी त्यांच्यासोबत महादेवभाई देसाई हे देखील होते.

🟪युव्हेंटसला इटालियन चषकाचे जेतेपद युव्हेंटसला या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नसली तरी मोसमाअखेरीस त्यांनी अ‍ॅटलांटाचा २-१ असा पराभव करत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. युव्हेंटसचे हे इटालियन चषकाचे १४वे तर अव्वल खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोचे पहिले जेतेपद ठरले. दुजान कुलुसेवस्की याने ३१व्या मिनिटाला युव्हेंटसचे खाते खोलल्यानंतर अ‍ॅटलांटाने रस्लन मलिनोवस्की (४१व्या मिनिटाला) याच्या गोलमुळे सामन्यात बरोबरी साधली. मात्र फेडेरिको चिएसा याने ७३व्या मिनिटाला निर्णायक गोल करत युव्हेंटसला जेतेपद मिळवून दिले. मोसमातील दुसरे जेतेपद पटकावल्यानंतर आंद्रिया पिलरे यांनी युव्हेंटसच्या प्रशिक्षकपदी कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली.

photo content
+4

photo content
+9

photo content
+9

🟪इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष थांबवण्यासाठी बायडेन यांचा दबाव पॅलेस्टिनी लोकांशी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक चकमकी थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्राायलवरील दबाव वाढवला आहे. दिवसअखेरपर्यंत तणाव लक्षणीयरीत्या कमी व्हावा ही आपली अपेक्षा त्यांनी बुधवारी इस्राायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संवादात बोलून दाखवली. बायडेन यांनी नेतान्याहू यांना ‘युद्धविरामाच्या मार्गाने जाण्यास’ सांगितल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. या युद्धात दोनशेहून अधिक लोक ठार झाले असल्याने बायडेन यांच्यावर याहून अधिक काही करण्याचा दबाव आहे. अमेरिकेचा मित्र असलेल्या इस्रायलला युद्धविरामासाठी थेट साकडे घालण्याचे त्यांनी बुधवारपर्यंत तरी टाळले होते. त्याऐवजी ‘शांत व सखोल’ कूटनीतीवर बायडेन प्रशासन भर देत आहे.

▪️मोठा निर्णय! आता घरातच करु शकता करोना चाचणी; पुण्यातील कंपनीच्या टेस्ट किटला मान्यता करोना चाचणी करण्यासाठी आता रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरातही रॅपिड अँटिजन किटच्या सहाय्याने करोना चाचणी करु शकता. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएआर) घरच्या घरी करोना चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान याचा वापर कसा आणि कोणी करावा यासंबंधी आयसीएमआरकडून मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्यात आली आहेत. आयसीएमआरने निर्णय जाहीर करताना ज्यांना लक्षणं आहेत तसंच जे प्रयोगशाळेतील चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांनीच याचा वापर करावा असं स्पष्ट केलं आहे. सरसकट चाचणी करु नका असा सल्ला आयसीएमआरने दिला आहे. “पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रत्येकाला ट्रू पॉझिटिव्ह म्हणून ग्राह्य धरलं जाईल आणि पुन्हा चाचणी करण्याची गरज नाही. लक्षंण नसणारे जे रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये निगेटिव्ह आले आहेत त्यांनी तात्काळ आरटीपीसीआर टेस्ट करुन घ्यावी,” असं आयसीएमआरने सांगितलं आहे.

🟪जागतिक मधमाशी दिवस: 20 मे. दरवर्षी 20 मे या दिवशी ‘जागतिक मधमाशी / मधुमक्षिका दिवस’ साजरा करतात. मानवी जीवनात मधमाशीचे महत्व पटवून देण्याकरिता जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटना (UN FAO) याच्या पुढाकाराने हा दिवस पाळला जातो. 2021 सालाची संकल्पना - "बी एंगेज्ड – बिल्ड बॅक बेटर फॉर बीझ". मधमाशीपालन क्षेत्रातले प्रणेते अँटॉन जानिया यांचा जन्म 20 मे 1734 रोजी झाला होता. त्या व्यक्तीच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ▪️मधमाशी. हायमेनॉप्टेरा गणाच्या क्लीस्टोगॅस्ट्रा उपगणातील एपॉयडीया या अधिकुलात कीटकांच्या सुमारे 20 हजार जाती आहेत. त्यांपैकी मधमाशी हा एक कीटक होय. या अधिकुलाचे तेरा कुलांमध्ये विभाजन केले आहे. यांपैकी एपिडी या कुलात मधमाश्यांचा समावेश होतो. एपिस हा मधमाश्यांचा मुख्य वंश होय. या वंशातील सर्व मधमाश्यांना नांगी असते. या मधमाश्यांचे दोन विभाग करता येतील. पहिल्या विभागात प्रकाशात एकच पोळे बांधणाऱ्या एपिस डॉरसॅटा व ए. फ्‍लोरिया या मधमाश्या, तर दुसऱ्या विभागात जास्त फण्या असलेली आणि अंधारात, झाडांच्या ढोल्यांत किंवा दगडांच्या कपारीत पोळी बांधणाऱ्या ए. मेलिफेरा व ए. इंडिका या जातींच्या मधमाश्या समाविष्ट आहेत. निरनिराळ्या जातींच्या मधमाश्यांच्या आकारमानात खूपच फरक आहे. ए. फ्लोरिया ही मधमाशी आकारमानाने सर्वांत लहान आहे. हिची लांबी 8 ते 13 मि.मी. असते. ए. डॉरसॅटा ही मधमाशी 18 ते 21 मि.मी. लांब असते. पूर्ण वाढ झालेल्या मधमाशीच्या शरीराचा रंग काळा किंवा तपकिरी असतो.

🟪करोनामुळे आशिया कप २०२१ स्पर्धेचं आयोजन रद्द करोनामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित केल्यानंतर आता आशिया कप २०२१ स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं आहे. जून महिन्यात आशिया कपचं श्रीलंकेत आयोजन करण्यात आलं होतं. मात्र करोनाचं संकट पाहता आयोजकांनी स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली. मागच्या वर्षी ही स्पर्धा पाकिस्तानात होणार होती. मात्र तेव्हाही ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. ‘करोना व्हायरसचं संकट पाहता आम्ही स्पर्धेचं आयोजन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पुढचे दोन वर्ष ही स्पर्धा होणार नाही. कारण आशिया कपमधील संघाचं दोन वर्षांचं नियोजन ठरलं आहे. त्यामुळे २०२३ विश्वचषकानंतर या स्पर्धेचं आयोजन होईल.’ असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डीसिल्वा यांनी सांगितलं.

🟪जागतिक कसोटी अंतिम सामन्याच्या नियमावलीची भारताला प्रतीक्षा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना अनिर्णीत राहिला किंवा बरोबरीत सुटला किंवा पावसामुळे खेळाचे नुकसान झाले, तर कोणते निकष लावले जातील, या प्रश्नांच्या उत्तरांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) प्रतीक्षा आहे. साऊदम्पटन येथे १८ ते २२ जून या कालावधीत होणाऱ्या अंतिम सामन्याची नियमावली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर करावी, अशी मागणी ‘बीसीसीआय’ने केली होती. येत्या काही दिवसांत ‘आयसीसी’कडून ही नियमावली स्पष्ट होऊ शकेल. ‘‘हा द्विराष्ट्रीय कसोटी सामना नाही. त्यामुळे नियमावली स्पष्ट होण्याची नितांत आवश्यकता आहे. सामना अनिर्णीत राहिला, बरोबरीत सुटला किंवा दोन्ही संघांचा किमान एकही डाव पूर्ण न होता पावसामुळे अधुरा राहिल्यास कोणते निकष लावण्यात येतील, हे स्पष्ट करण्याचे आवाहन ‘बीसीसीआय’ने केले आहे.

🟪केरळमधील पिनरायी विजयन मंत्रिमंडळ २१ सदस्यांचे केरळमधील पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) मंत्रिमंडळ २१ सदस्यांचे राहणार असून, त्यात ३ महिला असतील. प्रथमच निवडून आलेल्या काही जणांनाही मंत्री करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन, तसेच यापूर्वीच्या एलडीएफ सरकारमध्ये मंत्री असलेले के. कृष्णमूर्ती (जद-एस) व ए.के. शशिंद्रन (राकाँ) हे तिघेच नव्या मंत्रिमंडळात कायम राहणार आहेत. सत्ताधारी आघाडीतील महत्त्वाचे भागीदार असलेले माकप व भाकप या दोघांनीही पूर्वीच्या सरकारमधील आपल्या कुणाही मंत्र्याला कायम न ठेवण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळात प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेल्या जद(एस) व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मात्र पूर्वीच्या मंत्र्यांनाच पुन्हा संधी देण्याचे ठरवले आहे. नव्या मंत्र्यांची खाती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. सेंट्रल स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या एका साध्या कार्यक्रमात नवे मंत्रिमंडळ शपथ घेणार आहे.

▪️पुण्यातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध
▪️पुण्यातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध

📍प्रकाशनपूर्व सवलतीत आजच आपली प्रत नोंदवा📍 *19 मे पासून सर्वत्र उपलब्ध* *🔰Simplified कृषिशास्त्र 🔰* » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. 5) भारताच्या व महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार अद्ययावत आकडेवारी. *लेखिका* *स्वाती थोरात* *M.Sc. (Agri), L.L.B.* *सहायक राज्यकर आयुक्त* *संकल्पना* *डॉ. अजित थोरबोले* *(उपजिल्हाधिकारी)* *‼️पुढील लिंकवर क्लिक करून आजच आपली प्रत नोंदवा‼️* 👇👇👇👇👇👇 *www.simplifiedcart.com* www.simplifiedcart.com 19 मे पासून सर्वत्र उपलब्ध!

🟪BRICS रोजगार कार्यकारी गटाची पहिली बैठक भारताच्या अध्यक्षतेत संपन्न नवी दिल्लीत 11 मे आणि 12 मे 2021 रोजी BRICS रोजगार कार्यकारी गटाची पहिली बैठक आभासी माध्यमाद्वारे पार पडली. 🔻ठळक बाबी या बैठकीचे अध्यक्षपद भारताचे कामगार व रोजगार सचिव श्री अपूर्व चंद्रा यांनी भूषवले. वर्ष 2021 साठी भारताने BRICS गटाचे अध्यक्षपद स्विकारले आहे. BRICS देशांमधे सामाजिक सुरक्षा कराराला प्रोत्साहन देणे, कामगारांसाठी बाजारपेठ निर्माण करणे, कामगार शक्तीत महिलांचा सहभाग वाढवणे, घड्याळी तासावर काम करणाऱ्या कामगारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे चर्चेतील प्रमुख मुद्दे होते. गटाचे सदस्य देश असलेल्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनीधींच्या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था (ISSA) या संघटनांचे प्रतिनीधी देखील या बैठकीत उपस्थित होते. 🔻बैठकीतले मुद्दे सामाजिक सुरक्षा करारावर संबंधित देशांनी संवाद आणि चर्चा करावी. त्यावर हस्ताक्षर करण्याची प्रक्रिया पुढे न्यावी यावर सदस्य देशांचे एकमत झाले. तर त्यासाठी लागणारे तांत्रिक सहकार्य करण्याची तयारी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था यांनी दर्शवली. यासाठी नंतर बहुपक्षीय आराखडा तयार करावा असेही सदस्य देशांनी ठरवले. सामाजिक सुरक्षा करारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या कामगारांना आपले लाभ स्वदेशी पोहचवण्यात मदत होईल. त्यामुळे त्यांना पैशाचे नुकसान टाळता येईल. पुढे त्यांना काम करत आहेत त्या देशाकडून आणि स्वदेशाकडूनही योगदानाबाबत सवलत मिळेल. कामगार शक्तीत महिलांच्या सहभागावरही यावेळी मंथन झाले. महिलांना यासाठी प्रोत्साहन द्यावे आणि त्यांना सन्मानाने काम करणयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी यावर सदस्य देशांनी वचनबद्धता व्यक्त केली. याशिवाय असंघटीत क्षेत्रातल्या महिला मजूरांना सामाजिक सुरक्षा कवचही दिले जावे तसेच कोविड 19 चा महिला कामगारांच्या सहभागावर झालेला परिणाम यावरही चर्चा झाली.

🟪लसीकरण मोहिमेचा दुसऱ्या लाटेत फायदा- पंतप्रधान मोदी. करोना योद्धय़ांसह लसीकरण मोहीम सुरू करण्याच्या धोरणाचा करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फायदा झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. ९० टक्के आरोग्य व्यावसायिकांनी यापूर्वीच पहिली मात्रा घेतली असल्यामुळे लशींनी बहुतांश डॉक्टरांची सुरक्षितता निश्चित केली असल्याचे ते म्हणाले. चाचणी असो, औषधांचा पुरवठा असो की विक्रमी वेळेत नव्या पायाभूत सोयींची उभारणी असो, हे सर्व अतिशय वेगाने होत असल्याचे मोदी यांनी डॉक्टरांच्या एका गटाशी दूरसंवादाच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. विरोधी पक्ष सरकारच्या लसीकरण कार्यक्रमावर टीका करत असताना आणि सरकारने करोना महासाथीची दुसरी लाट वाईट रीतीने हाताळल्याचा त्यांनी आरोप केला असताना मोदी यांनी हे विधान केले आहे. प्राणवायूची निर्मिती आणि पुरवठा यांच्या आव्हानांवर मात करण्यात येत आहे. उपचारात एमबीबीएस विद्यार्थ्यांना सामावून घेणे, तसेच ग्रामीण भागात आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांची सेवा घेणे यांसारखे मनुष्यबळ वाढवण्याच्या उपायांमुळे आरोग्य यंत्रणेला अतिरिक्त मदत मिळाली असल्याचेही ते म्हणाले.

🟪RBI अ‍लर्ट: २३ मे रोजी ‘ही’ सुविधा काही तासांसाठी असणार बंद. देशात सध्या मोठ्या प्रमाण डिजिटल बँकिंग पर्याय उपलब्ध आहे. सहज सोप्या पद्धतीने डिजिटल माध्यमांतून देवाणघेवाण केली जाते. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील आहे. या दरम्यानं डिजिटल व्यवहारासंदर्भात आरबीआयने एक सूचना जारी केली आहे. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी काही अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे २३ मे रोजी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. एनईएफटी सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी रात्री १२ ते २३ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार आहे. त्यामुळे या वेळेत पैशांचा व्यवहार करता येणार नाही. जवळपास १४ तास ही सेवा बंद असणार आहे. अपग्रेड दरम्यान बँक खातेधारकांना त्याचे अपडेट मिळतील असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. १८ एप्रिल २०२१ रोजीही असंच अपग्रेडशन करण्यात आलं होतं.

🟪चॅम्पियन्स लीग फुटबॉल - बार्सिलोनाच्या महिलांना जेतेपद. बार्सिलोनाच्या महिलांनी अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन करत चेल्सीचा ४-० असा धुव्वा उडवून महिला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या जेतेदावर पहिल्यांदाच नाव कोरले. पुरुष आणि महिलांमध्ये चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावणारा बार्सिलोना हा पहिला क्लब ठरला आहे. गेल्या आठवडय़ात महिलांच्या सुपर लीगचे जेतेपद पटकावल्यामुळे चेल्सीचा संघ आत्मविश्वासात होता. पण बार्सिलोनाने जलद गतीने एकमेकांकडे चेंडू सोपवणे आणि चेंडूवर सर्वाधिक ताबा मिळवत चेल्सीच्या खेळाडूवर दडपण आणले. पहिल्याच मिनिटाला चेल्सीच्या मेलनी लेउपोल्झच्या स्वयंगोलमुळे बार्सिलोनाला आघाडी घेता आली. त्यानंतर पहिल्या सत्रातच आणखी तीन गोल करत बार्सिलोनाने या सामन्यावर वर्चस्व गाजवले. अ‍ॅलेक्सिया पुटेल्लास (१४व्या मिनिटाला), आयताना बोनमाटी (२०व्या मिनिटाला) आणि कॅरोलिन हन्सेन (३६व्या मिनिटाला) यांनी गोल करत बार्सिलोनाच्या विजयात योगदान दिले. चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावणारा बार्सिलोना हा स्पेनमधील पहिला क्लब ठरला. याआधी सात वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या लिऑनने या स्पर्धेवर अधिराज्य गाजवले होते.