uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 766 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 593-o'rinni va Hindiston mintaqasida 11 939-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 766 obunachiga ega bo‘ldi.

13 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -26 ga, so‘nggi 24 soatda esa 19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 12.63% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 8.01% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 266 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 704 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 14 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 766
Obunachilar
+1924 soatlar
+537 kunlar
-2630 kunlar
Postlar arxiv
#AnswerKey 🟧राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका पेपर 1

🟧भारताच्या केंद्रीय लोकसेवा आयोग आणि अफगाणिस्तानच्या स्वतंत्र प्रशासकीय सुधारणा आणि नागरी सेवा आयोग यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील यूपीएससी अर्थात  केंद्रीय लोकसेवा आयोग आणि अफगाणिस्तानचा आयएआरसीएससी अर्थात स्वतंत्र प्रशासकीय सुधारणा आणि नागरी सेवा आयोग यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यास मंजुरी दिली आहे. या सामंजस्य करारामुळे यूपीएससी आणि आयएआरसीएससी यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील. दोन्ही देशांमधील संबंधित संस्थांना विविध नेमणुका करताना येणारे अनुभव आणि विशेष ज्ञान यांचे परस्परांमध्ये आदानप्रदान सुलभतेने करता येईल. ▪️सामंजस्य करारातील महत्त्वाचे मुद्दे: नागरी सेवा संबंधित निवड आणि भरती प्रक्रियेत विशेषतः यूपीएससी आणि आयएआरसीएससी यांच्या कामातील आधुनिक दृष्टिकोनाबाबतच्या अनुभवांचे आदानप्रदान पुस्तके, हस्तलिखिते यांच्यासह गोपनीय नसलेल्या अन्य माहिती साहित्याचे आणि विशेष ज्ञानाचे आदानप्रदान करणे. लेखी परीक्षेची तयारी करणे आणि संगणकावर आधारित भरती परीक्षा तसेच ऑनलाईन परीक्षा यांच्या परिचालनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करताना आवश्यक असलेल्या  विशेष नैपुण्याची माहिती एकमेकांना करून देणे. अर्जांची जलदगतीने छाननी करून त्यावर निर्णय घेण्यासाठी एक खिडकी यंत्रणा राबविल्यानंतर आलेल्या  अनुभवांचे एकमेकांशी आदानप्रदान करणे. परीक्षा पद्धतीमधील विविध प्रक्रिया कार्यान्वित होताना येणारे अनुभव आणि त्या कार्यान्वयनासाठी आवश्यक विशेष ज्ञान यांची माहिती परस्परांना देणे. अधिकाऱ्यांसाठी ओरशिक्षण सत्र आयोजित करणे. विविध सरकारी संस्थांनी त्यांना दिलेल्या क्षमतेच्या कार्यकक्षेत विविध पदांसाठी भरती करताना राबविलेल्या प्रक्रिया आणि पद्धती यांच्या निष्कर्षाच्या अनुभवांचे आदानप्रदान करणे.

🟧सैन्यदलात नव्या शस्त्रास्त्रांचा समावेश. भारतीय सैन्यदलात नवी लढाऊ विमाने आणि शस्त्रास्त्रांचा समावेश करणे ही एक सातत्याने सुरु असलेली प्रक्रिया आहे. या प्रक्रीयेअंतर्गत सैन्यदलात समाविष्ट करण्यात आलेल्या काही महत्वाच्या शस्त्रास्त्रांची माहिती खालीलप्रमाणे :- भारतीय लष्कर:           (i) चिता हेलिकॉप्टर.           (ii) अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (ALH) मार्क 0/I/II/III.           (iii)  अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (शस्त्रास्त्र प्रणाली अंतर्भूत [WSI]).           (iv)  20 मीमी टूरेट गन–ALH प्लॅटफॉर्म युक्त (WSI)           (v)  70 मीमी टूरेट गन – ALH प्लॅटफॉर्म युक्त (WSI).         ▪️भारतीय नौदल :           (i)  डोर्नियर 228 लढावू विमान           (ii)  अत्याधुनिक हलकी हेलिकॉप्टर्स (ALH MK III)           (iii) चेतक हेलिकॉप्टर्स           (iv)  P81 लढाऊ विमान ▪️भारतीय हवाई दल: (i) राफेल लढाऊ विमाने (ii) हलकी लढाऊ विमाने (iii) C-17 आणि C-130 वाहतूक लढाऊ विमाने. (iv) चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर्स सैन्यदलात LCH आणि LUH श्रेणीची हेलीकॉप्टर्स समाविष्ट करुन “आत्मनिर्भर भारताला” प्रोत्साहन देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत,सरकारने संरक्षण क्षेत्रात विविध उपकरणे आणि इतर वस्तूंच्या निर्मितीसाठी 523 औद्योगिक परवाने जारी केले आहेत.संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

🟧भारतीय रेल्वेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे. क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे 686 स्थानकांवर बसविण्यात आले आहेत. क्लोज सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रवासी आरक्षण केंद्रावर तसेच मुख्य रेल्वे स्थानकांच्या इतर भागात ऑनलाईन देखरेख केली जाते . कोणतीही बेकायदेशीर / संशयास्पद कृती आढळल्यास त्वरित कारवाई केली जाते. सध्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे होणाऱ्या देखरेखीचा उपयोग करून व्यक्तींच्या प्रवेशाला प्रतिबंध केला जात नाही,  मात्र , संशयास्पद / आक्षेपार्ह कृती करत असलेल्या व्यक्तींवर पाळत ठेवली जाते आणि आवश्यकतेनुसार हस्तक्षेप केला जातो. रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग व ग्राहक व्यवहार, अन्न आणि  सार्वजनिक वितरण मंत्री श्री पीयूष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या  लेखी उत्तरात ही माहिती दिली

▪️जागतिक हवामान दिन: 23 मार्च दरवर्षी 23 मार्च या दिवशी जगभरात ‘जागतिक हवामान दिन’ साजरा करतात. 2021 सालाचा जागतिक हवामान दिन "द ओशन, अवर क्लायमेट अँड वेदर" या संकल्पनेखाली जगभरात साजरा करण्यात आला आहे. ▪️जागतिक हवामान संघटना (WMO) विषयी. जागतिक हवामान संघटना (World Meteorological Organisation -WMO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक आंतर-शासकीय संघटना आहे. 1873 साली ‘आंतरराष्ट्रीय हवामान संघटना’ या नावाने संस्था कार्यरत झाली होती. पुढे या संस्थेच्या जागी दिनांक 23 मार्च 1950 रोजी WMO याची स्थापना झाली. हवामान खात्याशी संबंधित WMO ही एक वैश्विक संघटना आहे आणि 191 देश व प्रदेश याचे सभासद आहेत. WMO पृथ्वीची वातावरणीय परिस्थिती आणि व्यवहार, महासागरांसोबतचे संबंध, हवामान आणि परिणामस्वरूप जलस्त्रोतांच्या वितरणासंबंधी माहिती याबाबतीत संयुक्त राष्ट्रसंघाची अधिकृत संस्था आहे. जगभरात हवामानावर लक्ष ठेवणारी ‘वर्ल्ड वेदर वॉच’ ही प्रणाली सुरु असून ती आंतरराष्ट्रीय सहकार्याचे प्रतीक मानली जाते.

🟧भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या बाजूला 600 हून अधिक ठिकाणी सोयीसुविधा विकसित करेल. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांच्या अनुभवात सुधारणा व्हावी यादृष्टीने प्रवासी आणि ट्रक चालक या दोघांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्याकडून आगामी पाच वर्षात 22 राज्यातील राष्ट्रीय महामार्गावरील 600 हून अधिक ठिकाणी जागतिक स्तरावरील ''रस्त्याच्या कडेला सुविधा'  विकसित केल्या  जाणार आहेत. यापैकी 2021-22 मध्ये 130 मार्गांवर या सुविधा विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. 120 मार्गावर अशाप्रकारच्या सुविधा विकसित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने निविदा मागविल्या आहेत. योजनेनुसार विद्यमान आणि आगामी काळात बांधण्यात येणाऱ्या महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर प्रत्येकी 30-50 किलोमीटरवर रस्त्याच्या कडेला या सुविधा विकसित केल्या  जातील. या सुविधांमध्ये  इंधन स्थानक, इलेक्ट्रिक चार्जिंगची सोय, उपहारगृह , किरकोळ दुकाने , एटीएम, आंघोळीच्या  सुविधेसह शौचालय, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, दवाखाना, स्थानिक हस्तकला वस्तूंचे व्हिलेज हाट इत्यादी सोयी प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. देशभरात एकत्रित मिळून 3,000 हेक्टर जागेवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्त्याच्या बाजूने या सुविधा विकसित करेल. या सुविधा गुंतवणूकदार, विकासक, ऑपरेटर्स आणि किरकोळ विक्रेत्यांना मोठ्या संधी देतील. सध्या, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विद्यमान महामार्गांवर रस्त्याच्या बाजूने सोयी सुविधांचा  विकास आणि संचलन सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून करीत आहे. या रस्त्याच्या कडेला विकसित केल्या जाणाऱ्या  सोयी-सुविधा  प्रवाशांचा महामार्गावरील प्रवास अधिक सुखावह तर करतीलच परंतु महामार्गाचा  वापर करणाऱ्यांसाठी  विश्रांती आणि अल्पोपहाराची पुरेशी सुविधा देखील उपलब्ध करतील.

🟧पुढील भारतीय सरन्यायाधीश म्हणून न्या. एन. व्ही. रमण यांच्या नावाची केंद्र सरकारला शिफारस भारतीय सरन्यायाधीश (CJI) न्या. शरद बोबडे यांनी न्या. नुथलापति वेंकट रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. ▪️ठळक बाबी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ 23 एप्रिल 2021 रोजी संपुष्टात येत आहे. 18 नोव्हेंबर 2019 रोजी न्या. बोबडे यांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतली होती. ते भारताचे 47 वे सरन्यायाधीश ठरले होते. न्या. शरद बोबडे यांच्यानंतर एन. व्ही. रमण हे सर्वाधिक ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश बोबडे यांनी उत्तराधिकारी म्हणून रमण यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे. न्यायमूर्ती रमण यांचा कार्यकाळ मुख्य सरन्यायाधीश म्हणून एक वर्ष आणि चार महिने असा असणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी सर्वांत जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती केली जाते. ▪️एन. व्ही. रमण विषयी एन. व्ही. रमण यांचा जन्म आंध्रप्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. ते 64 वर्षांचे आहेत. त्यांनी 10 फेब्रुवारी 1983 पासून वकिलीला सुरुवात केली. न्यायमूर्ती रमण यांनी संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये विशेषज्ञ प्राप्त केलेले आहे. ▪️भारतीय सरन्यायाधीश भारतीय सरन्यायाधीश (किंवा भारतीय प्रधान न्यायाधीश -CJI) हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आहेत. या पदावर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्तींना संधी देण्याची परंपरा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्याच्या संदर्भात तरतूद आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 145 आणि ‘सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे नियम-1966’ अन्वये, भारतीय सरन्यायाधीश सर्व न्यायाधीशांना एखाद्या प्रकरणासंबंधी कामकाजाचे वाटप करू शकतात. न्या. एच. जे. कानिया (26 जानेवारी 1950 ते 6 नोव्हेंबर 1951) हे प्रथम भारतीय सरन्यायाधीश होते.

🟧शफाली, राजेश्वरीमुळे भारतीय महिलांचा शानदार विजय युवा सलामीवीर शफाली वर्मा (३० चेंडूंत ६० धावा) आणि अनुभवी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड (३/९) यांच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिला संघाने तिसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी आणि ५४ चेंडू राखून धुव्वा उडवला. पण आफ्रिकेने ही मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेला २० षटकांत ७ बाद ११२ धावाच करता आल्या. राजेश्वरीने अ‍ॅनेक बोश (०) आणि लिझेल ली (१२) या धोकादायक सलामी जोडीला लवकर माघारी पाठवून भारताच्या विजयाची पायाभरणी केली. प्रत्युत्तरात भारताची सध्याची सर्वोत्तम फलंदाज शफालीने सात चौकार आणि पाच षटकारांची आतषबाजी करताना स्मृती मानधनासह (नाबाद ४८) पहिल्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी रचली. त्यामुळे भारताने विजयी लक्ष्य ११ षटकांतच गाठले. राजेश्वरी सामनावीर, तर शफाली मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली.

📹 मराठी चित्रपट आनंदी गोपाळला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019   दिग्दर्शक समीर विद्वंस यांच्या आनंदी गोपाळ या चरित्रात्मक चित्रपटाने सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला आहे.  या चित्रपटाची कथा ही आनंदी गोपाळ आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांच्याभोवती फिरते ज्यांनी तिला वैद्यकीय अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात पेनसिल्व्हेनियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेल्या 1886 मध्ये त्यांनी एमडी पदवी प्राप्त केली. भाग्यश्री मिलिंद हिने आनंदी गोपाळ यांची तर ललित प्रभाकर याने तिच्या पतीची भूमिका साकारली आहे.

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. At Rs. 400/- 200/- (50% OFF) https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks
+1
👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content
+9

नुकत्याच पार पडलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत Simplified चालू घडामोडी या पुस्तकातील 18+ प्रश्नांचा समावेश 👆👆👆

photo content
+7

photo content
+9

📅 आज २४ मार्च : जागतिक क्षयरोग दिन 📌 थीम २०२१ : " The Clock Is Ticking " 📌 थीम २०२० : " It's Time To End TB " 📌 थीम २०१९
📅 आज २४ मार्च : जागतिक क्षयरोग दिन 📌 थीम २०२१ : " The Clock Is Ticking " 📌 थीम २०२० : " It's Time To End TB " 📌 थीम २०१९ : " It's Time " 📌 थीम २०१८ : " Wanted : Leaders For A TB-Free World " 📌 थीम २०१७ : " Unite To End TB " 📌 थीम २०१६ : " Unite To End TB " 📌 थीम २०१६ : " Gear Up To End TB ". 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

🟧केन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांसोबत करार. केन-बेटवा नदी जोड प्रकल्पासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांच्या सरकारांसोबत सामंजस्य करार झाला. ▪️केन-बेटवा नदी जोड प्रकल्प जलसंपदा मंत्रालयाकडून तयार केलेल्या राष्ट्रीय दृष्टीकोन योजना (National Perspective Plan -NPP) अंतर्गत, राष्ट्रीय जल विकास प्राधिकरण (NWDA) कडून हिमालयीन नद्याअंतर्गत 14 आणि द्वीपकल्पाच्या नद्याअंतर्गत 16 नदी जोड प्रकल्पांना ओळखले गेले आहे. त्यापैकी, केन-बेटवा नदी जोड प्रकल्प हे प्रथम ठरले आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या प्रदेशाअंतर्गत येणार्‍या केन-बेटवा नदी जोड प्रकल्पाला भारत सरकारने राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित केले आहे. तसेच या प्रकल्पाअंतर्गत मध्यप्रदेशामधील पन्ना व्याघ्र संवर्धन प्रकल्पाला आणल्या गेले आहे. या प्रकल्पामध्ये पन्ना व्याघ्र संरक्षण क्षेत्राचा सुमारे 8,650 हेक्टर चा भूभाग समाविष्ट आहे. बेटवा ही यमुना नदीची उपनदी आहे जी, उत्तर भारताच्या प्रदेशात मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश मधून वाहते. तर केन नदी ही सुद्धा यमुना नदीची उपनदी आहे, जी मध्य भारताच्या बुंदेलखंड प्रदेशातली मोठी नदी आहे आणि मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश मधून वाहते. ▪️प्रकल्पाचे स्वरूप. प्रकल्पामध्ये 230 किलोमीटर लांबीचा कालवा आणि धरणांची मालिका आणि केन आणि बेटवा नद्यांना जोडणारेमाकोडिया आणि धौधन धरणे तयार केले जाणार आहे.यामधून मध्यप्रदेशातील3.5 लक्ष हेक्टर आणि बुलंदखंड सह उत्तर प्रदेशामधील14,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पर्यावरणाच्या संदर्भात, हा प्रकल्प व्याघ्रअभयारण्यात असणारा पहिला नदीचा प्रकल्प बनणार. हे मध्यप्रदेशातील पन्ना व्याघ्रअभयारण्यजे मॉडेल व्याघ्र-संवर्धन राखीव म्हणून प्रसिद्ध आहे, त्याचा सुमारे 10टक्के भाग सामावून घेईल. 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟧राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा - भवानी देवीला राष्ट्रीय विजेतेपद. टोक्यो ऑलिम्पिकला पात्र ठरलेली पहिली भारतीय तलवारबाज सीए भवानी देवी (तमिळनाडू) हिने राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भवानीने नवव्यांदा स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. दिल्ली पब्लिक स्कूल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत भवानीने महिलांच्या वैयक्तिक सॅबर प्रकारातील अंतिम लढतीत केरळच्या जोश्ना जोसेफला १५-७ असे पराजित केले. उपांत्य लढतीत भवानीने के. अनिताचा १५-४ असा सहज पाडाव केला. त्याआधी, भवानीने स्पर्धेस दिमाखदार सुरुवात करताना पहिल्या गटसाखळी सामन्यात जसप्रीत कौरला (जम्मू आणि काश्मीर) १५-२ असे सहज हरवले. परंतु भवानीचा तेलंगणाच्या बेबी रेड्डीने कस पाहिला. भवानीने ही चुरशीची लढत १५-१४ अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भवानीने पंजाबच्या जगमीत कौरला १५-७ असे हरवून उपांत्य फेरी गाठली होती. याचप्रमाणे सेनादलच्या कुमारसन पद्म गिशो निधीने गतविजेत्या करण सिंगला (राजस्थान) हरवून पुरुषांच्या सॅबर प्रकारातील वैयक्तिक विभागात विजेतेपद जिंकले. करण सिंगने नुकत्याच बुडापेस्टला झालेल्या पुरुषांच्या ‘सॅबर वर्ल्डकप’ स्पर्धेत भारतीयांमधील सर्वोत्तम कामगिरी केली होती. या २० वर्षीय नवोदित गुणवान तलवारबाजाने जागतिक क्रमवारीत १९व्या असलेल्या कोन्स्टन्टाईन लोखानोवला नमवून बाद फेरीत प्रवेश मिळवला होता. पण या कामगिरीची पुनरावृत्ती राष्ट्रीय स्पर्धेत करण सिंगला करता आली नाही आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.