uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 765 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 593-o'rinni va Hindiston mintaqasida 11 939-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 765 obunachiga ega bo‘ldi.

13 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -26 ga, so‘nggi 24 soatda esa 19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 12.63% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 8.01% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 266 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 704 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 14 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 765
Obunachilar
+1924 soatlar
+537 kunlar
-2630 kunlar
Postlar arxiv
🟪आंबोली (हिरण्यकेशी): महाराष्ट्रातील पाचवे जैविक विविधता स्थळ घोषित महाराष्ट्रातील सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील 2.11 हेक्टर एवढ्या क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी” (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्राला ‘जैविक विविधता वारसा स्थळ’चा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या महसुल व वन विभागाकडून हा दर्जा देण्याविषयीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. ▪️ठळक बाबी शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते. या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी हा एक रंगीबेरंगी लहान मासा आहे, जो भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असलेल्या पाण्यात वाढतो. ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी घेतला. वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेषकरून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे वारसाचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे. यापूर्वी राज्य सरकारने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे.

🟪पुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (६८) यांनी सोमवारी एका कायद्यावर स्वाक्षरी केली असून त्यामुळे त्यांचा २०३६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रशियात गेल्या वर्षी झालेल्या मतदानानुसार रशियामध्ये घटनादुरुस्तीवर औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात आले, त्यानुसार पुतिन यांना आणखी दोन वेळा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी होता येणार आहे. पुतिन गेल्या दोन दशकांपासून सत्तेवर आहेत. सध्याची अध्यक्षपदाची मुदत २०२४ मध्ये संपुष्टात येणार असून पुन्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत सहभागी व्हावयाचे की नाही याचा निर्णय नंतर घेण्यात येईल, असे पुतिन यांनी म्हटले आहे. नियमित कामकाजावर लक्ष ठेवण्याऐवजी आपल्या सहकाऱ्यांना आपला वारसदार कोण, याकडे लक्ष देण्यापासून दूर ठेवण्यासाठी अध्यक्षपदाच्या मुदतीचा कालावधी वाढविणे गरजेचे होते, असे पुतिन यांनी म्हटले आहे. पुतिन यांनी स्वाक्षरी केलेला कायदा सोमवारी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

🟪नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हा ‘मनरेगा’त राज्यात दुसरा करोना टाळेबंदीच्या काळात देशभरात कुशल व अकुशल कामगार रोजगारासाठी भटकंती करत होते. असंख्य कामगारांचा रोजगार हिरावला गेला. अशा स्थितीत नक्षलवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्याने मात्र टाळेबंदीच्या काळातच सलग एक वर्ष ३४.५७ लाख मनुष्यदिन निर्मिती करत वर्षभरात १ लाख ९२ हजार ३४४ अकुशल कामगारांच्या हातांना काम दिले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून त्यांना हा रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे नक्षलवादाच्या हिंसाचारात होरपळणारा गडचिरोली जिल्हा मनरेगात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला. मनरेगाच्या या ‘गडचिरोली पॅटर्न’चे राज्यात सर्वत्र कौतुक होत आहे. संपूर्ण देशात मार्च २०२० मध्ये वर्षभर टाळेबंदी होती. अशा वेळी कित्येक मजुरांच्या हाताला काम नव्हते. रोजगारासाठी देशात सर्वत्र कुशल व अकुशल कामगार भटकंती करत होते. अशा कठीण काळात गडचिरोली जिल्ह्याने मिळालेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त मनुष्यदिवस मजुरांना काम दिले. २०२०-२१ या वर्षात जिल्ह््यात प्रत्यक्ष कार्यरत २ लाख ९३ हजार १०१ मजुरांपैकी १ लाख ९२ हजार ३४४ मजुरांच्या हातांना काम देण्यात आले. मनरेगामध्ये ६०:४० अशी अकुशल व कुशल कामांची टक्केवारी ठरवलेली असते. त्यानुसार, ७५९४.२६ लाख रुपये अकुशल स्वरूपाच्या कामावर, तर १५२४.६७ लाख रुपये कुशल स्वरूपाच्या कामावर झाला. त्यानुसार हे प्रमाण (८४:१६) असे येते. सन २०२०-२०२१ करिता गडचिरोली जिल्ह््यात २४.५१ लाख मनुष्यदिन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च २०२१ अखेरीस जिल्ह््याने ३४.५७ लाख मनुष्यदिन निर्मिती केली आहे. लक्ष्यांकाच्या तुलनेत ही १४१.०७ इतकी उद्दिष्टपूर्ती आहे. मागील पाच वर्षांत प्रथमत: इतके महत्तम उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आले आहे. जॉब कार्डची संख्या १ लाख २४ हजार ४८७ आहे. २ लाख ९३ हजार १०१ कार्यरत मजूर आहेत. २०२०-२१ या वर्षात १ लाख ९२ हजार ३४४ मजुरांना रोजगार देण्यात आला. यातून जिल्ह््यात ३४ लाख १९ हजार ३६६ मनुष्यदिवस निर्माण करण्यात आले. एकूण उद्दिष्टाच्या तब्बल १४१.०७ टक्के अधिकचे काम पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे.

🟪राष्ट्रीय सागरी दिन: 5 एप्रिल 5 एप्रिल 2021 रोजी बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने 58 वा राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला. यावर्षी भारत सरकारच्या आत्मनिर्भर भारत या योजनेशी साधर्म्य साधणारी, “कोविड-19च्या पुढे शाश्वत नौवहन” ही राष्ट्रीय सागरी दिनाची संकल्पना होती. 58 व्या राष्ट्रीय सागरी दिनाच्या संस्मरणार्थ एका ई-स्मरणिकेचे मांडवीय यांनी प्रकाशन केले, तसेच राष्ट्रीय सागरी दिन समारंभ समितीच्या वतीने पारितोषिक वितरणही केले. नौवहन महासंचालक, या सोहळ्याच्या अध्यक्षपदी होते. ▪️इतिहास भारतीय ध्वज फडकावीत एस.एस.लॉयल्टी या मेसर्स सिंदीया स्टीम नेव्हीगेशन कंपनीच्या व्यापारी जहाजाने पहिल्यांदा मुंबई ते लंडन असा प्रवास 5 एप्रिल 1919 रोजी केला, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतात. प्रथम राष्ट्रीय सागरी दिन 1964 साली पाळण्यात आला. भारताला सुमारे 7516 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे. देशात केंद्र सरकारच्या नियंत्रणात एकूण 182 बंदरे आहेत, त्यापैकी ‘मेजर पोर्ट’ हा विशेष दर्जा असलेली 12 बंदरे आहेत. ही बंदरे “भारतीय बंदरे अधिनियम-1908” अन्वये प्रशासित केली जाते. “मेजर पोर्ट ट्रस्ट अधिनियम-1963” हे प्रमुख बंदरांसाठी प्रशासकीय कार्यचौकट निश्चित करते.

🟪आदिवासी मंत्रालयाची “संकल्प से सिद्धी” – व्हिलेज अँड डिजिटल कनेक्ट मोहीम आदिवासी कार्य मंत्रालयाने “संकल्प से सिद्धी” – व्हिलेज अँड डिजिटल कनेक्ट मोहीम हातात घेतली आहे. ▪️ठळक बाबी भारतीय आदिवासी सहकारी विपणन महासंघ (TRIFED) हा उपक्रम राबवित आहे. हा उपक्रम 1 एप्रिल 2021 पासून आरंभ करण्यात आला. उपक्रमाच्या अंतर्गत नेमण्यात आलेली 150 पथके येत्या 100 दिवसांत देशातल्या विविध प्रदेशात प्रत्येकी 100 खेड्यांना भेट देणार आहेत. एकूण 1500 खेड्यांना भेट दिली जाणार आहे. या खेड्यांमधली वन धन विकास केंद्रे कार्यान्वित करणे हे या मोहिमेचे प्राथमिक उद्दीष्ट आहे. या पुढाकाराने संपूर्ण देशभरात आदिवासी समुदयांच्या परिसंस्थेचे संपूर्ण रूपांतर होण्यास मदत होईल.

🟪चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशात २० कोटी मतदार बजावणार हक्क; मोदींचं चार भाषांमध्ये ट्विट " तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये आज एकूण ४७५ विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून अण्णाद्रुमूक आणि एलडीएफ सरकारचं भवितव्य ठरणार आहे. तर दुसरीकडे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. आसाममध्ये हा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. तामिळनाडूत सहा कोटी मतदार बजावणार हक्क - तामिळनाडूत २३४ विधानसभा जागांसाठी मतदान होणार असून सहा कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यावेळी ३९९८ उमेदवारांचं भवितव्य मतदानपेटीत बंद होणार आहे. मतदानाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच अभिनेता रजनीकांत यांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय कमल हासन आपल्या मुलींसोबत पोहोचले होते. मोदींचं आवाहन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मतदारांना रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी खासकरुन तरुणांना विनंती केली आहे. तामिळनाडू, केरळ, आसाम, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरीमधील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदींनी चार भाषांमध्ये ट्विट केलं आहे. तामिळनाडूत २३४, केरळमध्ये १४०, आसाममध्ये ४०, पश्चिम बंगालमध्ये ३१ आणि पुद्दुचेरीत ३० जागांसाठी आज मतदान होत आहे. विधानसभा निवडणुकांसोबतच मल्लपूरम आणि कन्याकुमार या दोन जागांसाठीदेखील मतदान होत आहे.

🟪दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांचं राज्यपालांना पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर आज(सोमवार) गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला चौकशीचे आदेश दिले असून, १५ दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर याबाबत निर्णय झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उत्पादन शुल्क आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला आहे. तसेच, इथून पुढे गृहमंत्रालयाची जबाबदारी आता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राहणार असल्याचेही कळवले आहे. तर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा कार्यभार आता हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर, उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

🟪 MPSC आयोगाकडून 11 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या "महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020" बाबत आज आल
🟪 MPSC आयोगाकडून 11 एप्रिल 2021 रोजी होणाऱ्या "महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020" बाबत आज आलेली सूचना ▪️परीक्षा 100% होणारच हे जवळपास निश्चित झाले आहे. ▪️अभ्यास करत रहा Wish You Good Luck 👍

photo content
+2

photo content
+6

photo content
+9

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

🟪माय जीओव्ही डॉट इनच्या सहकार्याने ट्रायफेडकडून “ बी द ब्रँड ऍम्बॅसॅडर ऑफ ट्राईब्स इंडिया” आणि “बी ए फ्रेंड ऑफ ट्राईब्स इंडिया” स्पर्धांचा प्रारंभ   भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघाने(ट्रायफेड) माय जीओव्ही डॉट इन या नागरिक- सरकार संवाद मंचाच्या सहकार्याने “ बी द ब्रँड ऍम्बॅसॅडर ऑफ ट्राईब्स इंडिया” आणि “बी ए फ्रेंड ऑफ ट्राईब्स इंडिया” या दोन मनोरंजक स्पर्धा सुरू केल्या आहेत. आदिवासी कला, संस्कृती आणि जीवनशैली यांना प्रोत्साहन देण्याच्या मुख्य उद्देशाने या स्पर्धा सुरू करण्यात आल्या आहेत. “ बी द ब्रँड ऍम्बॅसॅडर ऑफ ट्राईब्स इंडिया” या स्पर्धेअंतर्गत देशभरातील ग्राहकांकडून आदिवासी उत्पादनांशी संबंधित अनुभवकथन मागवले आहे. या कथनामध्ये सदर उत्पादन वापराबाबतचा त्याचा/ तिचा अनुभव अधोरेखित केला पाहिजे आणि हे उत्पादन त्यांनी कोणत्या ठिकाणी/ दुकानातून खरेदी केले त्याचा तपशील असला पाहिजे. हे कथन 30 सेकंदांपासून 5 मिनिटांपर्यंतच्या व्हिडिओंच्या स्वरुपात असणे गरजेचे आहे. या आदिवासी उत्पादनांमध्ये पुरुष किंवा महिलांची वस्त्रप्रावरणे, दागिने, विविध प्रकारची सामग्री, चित्रे, कलात्मक धातूकाम, टेराकोटा आणि भांडी, सुशोभीकरणाच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि सेंद्रीय पदार्थ, वेत आणि बांबूच्या वस्तू, स्टेशनरी, लाकडी सामान, घरातील वस्तू, पक्वान्ने इत्यादींचा समावेश असू शकेल याविषयीची माहिती पाठवणाऱ्यांनी ती यूट्युबवर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या लिंकच्या स्वरुपात पाठवणे आवश्यक आहे.

🟪प्रमोद भगतला तीन पदके जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या प्रमोद भगतने दुबई पॅराबॅडमिंटन स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एक कांस्य अशी एकूण तीन पदके मिळवली. याचप्रमाणे क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या सुकांत कदमने दोन रौप्यपदके कमावली. ‘एसएल४’ गटात प्रमोदने एकेरीत कुमार नितेशवर २१-१७, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. त्यानंतर दुहेरीत मनोज सरकारच्या साथीने सुकांत कदम आणि नितेश कुमार जोडीचा २९ मिनिटांत २१-१८, २१-१६ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत प्रमोदने पाला कोहलीच्या साथीने कांस्यपदक मिळवले. ‘एसएल३’ गटात एकेरीच्या अंतिम फेरीत फ्रान्सच्या लुकास मॅझूरकडून २१-१५, २१-६ अशा फरकाने पराभव पत्करल्याने सुकांतला उपविजेतेपद मिळाले.

🟪एक करोना रुग्ण सापडला तर आजूबाजूची २० घरं होणार सील; योगी सरकारचा निर्णय उत्तर प्रदेशमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यामध्ये लसीकरण वाढवण्यात आलं आहे. तसेच राज्य सरकारकडून लोकांच्या जनजागृतीचेही प्रयत्न सुरु आहेत. मास्क, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन ही त्रिसुत्री वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र आता योगी सरकारने यापुढे एक पाऊल टाकत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलायत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी करोनाचा रुग्ण आढळेल त्याच्या आजूबाजूची २० घरं कंनटेनमेंट झोन म्हणून जाहीर केली जातील. ही २० घरं सील केली जातील. करोनाचा प्रादुर्भाव इतर लोकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. एकापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळल्यास ६० घरं सील केली जातील. राज्यातील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहून हे नवे नियम लागू करण्यात आलेत. शहरी भागांमध्ये करोना रुग्ण आढळून आल्यास २० घरं सील केली जातील आणि त्या भागाला कंटेनमेंट झोन असं जाहीर केलं जाईल. एकाहून अधिक रुग्ण आढळून आल्यास ६० घरं सील करुन त्यांना कंटेनमेंट झोन जाहीर केलं जाईल. या ठिकाणी बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला जाता येणार नाही किंवा तेथील कोणत्याही व्यक्तीला बाहेर येता येणार नाही. १४ दिवसांसाठी हे नियम लागू असतील, असं एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

🟪पुतीन यांची लोकप्रियता कायम; रशियामधील ‘सर्वात देखणा पुरुष’ होण्याचा मिळवला मान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देशातील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळेच रशियातील सर्वात देखणा पुरुष अशी नवी ओळख पुतीन यांना मिळाली आहे. हजारो जणांचा समावेश असणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये ६८ वर्षीय अविवाहित पुतीन हे सर्वात सुंदर पुरुष ठरलेत. सुपरजॉब डॉय आरयू नावाच्या वेबसाईट रशियन जनतेला देशातील कोणती व्यक्ती सर्वात सुंदर वाटते यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेकांनी पुतीन यांच्या नावाची निवड केल्याचं पहायला मिळालं. सर्वेक्षणातील १८ टक्के पुरुषांनी तर १७ टक्के महिलांनी पुतीन यांची निवड केली. रशियन जनतेच्या मनात आजही पुतीन हेच देशातील सर्वात सुंदर व्यक्ती असल्याचं चित्र या सर्वेक्षणातून दिसून आल्याचं वेबसाईटने सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे. मॉस्को टाइम्सने सुपरजॉबच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या सर्वेक्षणामध्ये पुतीन यांच्या लोकप्रियतेसमोर सर्वच रशियन कलाकार, नेते आणि खेळाडून फिके पडल्याचं पहायला मिळालं. मासे पकडताना, घोड्यावर स्वार झालेले पुतीन यांचे अनेक फोटो वेळोवेळी समोर आलेत. या फोटोंमध्ये पुतीन हे शर्टलेसच दिसून येतात. एका मुलाखतीमध्ये पुतीन यांनी आपल्याला या शर्टलेस फोटोंबद्दल लज्जास्पद असं काही वाटतं नाही, असं एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. या फोटोंमध्ये पुतीन यांना एक शक्तीशाली व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला. २२ मार्च ते एक एप्रिल दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येकाला एका प्रश्नांची यादी देण्यात आली होती. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १९ टक्के पुरुषांनी स्वत:लाच रशियामधील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं मत दिलं होतं. तर १८ टक्के महिलांनी रशियामध्ये सुंदर पुरुषच नाहीयत असं मत दिलं होतं.

🍀🍀महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध; अशी आहे नियमावली🍀🍀 🌼राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश आणि नियमावली उद्या सरकारकडून काढण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 🌼राज्य मंत्रिमंडळाने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येणार. 🌼हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. 🌼आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.

🔲 १७वी लोकसभा निवडणूक ▪️महिला खासदारांची संख्या : ७८ 👩‍🦰 आंध्रप्रदेश : ०४ 👩‍🦰 आसाम : ०१ 👩‍🦰 बिहार : ०३ 👩‍🦰 चंदीगड : ०१ 👩‍🦰 छत्तीसगड : ०३ 👩‍🦰 गुजरात : ०६ 👩‍🦰 हरियाणा : ०१ 👩‍🦰 झारखंड : ०२ 👩‍🦰 कर्नाटक : ०२ 👩‍🦰 केरळ : ०१ 👩‍🦰 मध्यप्रदेश : ०४ 👩‍🦰 महाराष्ट्र : ०८ 👩‍🦰 मेघालय : ०१ 👩‍🦰 नवी दिल्ली : ०१ 👩‍🦰 ओडिशा : ०७ 👩‍🦰 पंजाब : ०२ 👩‍🦰 राजस्थान : ०३ 👩‍🦰 तमिळनाडू : ०३ 👩‍🦰 तेलंगणा : ०१ 👩‍🦰 त्रिपुरा : ०१ 👩‍🦰 उत्तरप्रदेश : ११ 👩‍🦰 उत्तराखंड : ०१ 👩‍🦰 पश्चिम बंगाल : ११

🟪भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू अमेरिकेतही भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू आता अमेरिकेतील एका रुग्णातही सापडला असून स्टॅनफर्ड हेल्थ केअरच्या दी क्लिनिकल व्हायरॉलॉजी लॅबमधील नमुन्यांच्या तपासणीत तो आढळून आला आहे. दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणू भारतात पहिल्यांदा आढळून आला होता. त्यामुळे करोनाचा प्रसार जास्त वेगाने वाढत आहे. स्टॅनफर्ड रुग्णालयाच्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रात सॅनफ्रान्सिस्को बे या भागात हा विषाणू सात रुग्णांत सापडला असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे पण त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. एका रुग्णात मात्र तो सापडला आहे. स्टॅनफर्ड हेल्थ केअर स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेच्या प्रवक्त्या लिसा किम यांनी सांगितले की, अमेरिकेत भारतातील दुहेरी उत्पर्वितनाचा विषाणू पहिल्यांदाच सापडला आहे. भारतातील उत्परिवर्तित विषाणूत एल ४५२आर हे उत्परिवर्तन दिसून आले आहे, दुसरे उत्परिवर्तन इ ४८४ क्यू हे आहे. एकाच ठिकाणी अमायनो आम्लांमध्ये दोन उत्परिवर्तने झाली असून ती पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका व नंतर ब्राझीलमध्ये दिसून आली होती. सध्या अमेरिकेत हा विषाणू सापडला आहे तो विमानाने आलेल्या एखाद्या प्रवाशातून पसरला असावा. डॉ. बेन पिन्स्की यांनी सांगितले की, हा विषाणू वेगाने पसरतो. लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यानंतर विषाणूचा धोका कमी होत जाईल. दरम्यान, ब्रिटनमध्ये सापडलेल्या बी ११७ उत्परिवर्तनाचा समावेश असलेल्या विषाणूचे ३० टक्के कोविड रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत, असे ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे अधिष्ठाता आशिष झा यांनी सांगितले.