uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 724 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 599-o'rinni va Hindiston mintaqasida 11 969-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 724 obunachiga ega bo‘ldi.

10 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -87 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.98% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.78% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 364 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 275 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 724
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-177 kunlar
-8730 kunlar
Postlar arxiv
🟪भारतीय रिझर्व्ह बँक जागतिक ‘नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) याचा भाग बनली. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ‘सेंट्रल बँक्स अँड सूपरवायजर्स नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) या आंतरराष्ट्रीय जाळ्याचा एक भाग बनली आहे. फायनॅन्स ‘नेटवर्क फॉर ग्रीनिंग फायनॅनशीयल सिस्टम’ (NGFS) हा देशांच्या केंद्रीय बँका आणि पर्यवेक्षकांचा एक समूह आहे, जो आर्थिक क्षेत्रातील परिसंस्था आणि हवामानविषयक जोखीम व्यवस्थापनाच्या विकासामध्ये हातभार लावण्यासाठी उत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यास आणि योगदान देण्यास इच्छुक आहे. याची स्थापना डिसेंबर 2017 मध्ये ‘पॅरिस वन प्लॅनेट समिट’ यादरम्यान करण्यात आली होती. ▪️भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे. RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी. डी. देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

🟪जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन: 3 मे. जगभरात दरवर्षी 3 मे रोजी ‘जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन’ पाळला जातो. पत्रकारिता, त्याचे महत्त्व आणि त्याबाबतची जनमानसात जागृती निर्माण करणे हा या दिनाचा हेतू आहे. तसेच, पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि त्याचे संरक्षण करणे याबाबत जगभरातल्या देशांच्या प्रत्येक सरकारला आठवण करुन देणे हा प्रमुख उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे. 2021 साली जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन "इन्फॉर्मेशन अॅज ए पब्लिक गुड" या संकल्पनेखाली पाळला गेला आहे. ▪️इतिहास. संपूर्ण जगामध्ये 1991 साली पहिल्यांदा अफ्रीका खंडाच्या देशांमधल्या पत्रकारांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याबाबत पहिल्यांदा जाहीर भूमिका घेतली. त्यांनी 3 मे हा दिवस जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जावा याबाबत जाहीर मागणी केली होती. ही मागणी ‘विंडहोक घोषणापत्र’ (Declaration of Windhoek) या नावाने ओळखली गेली. याला प्रतिसाद म्हणून 1993 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 3 मे हा दिवस “जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन” म्हणून पाळण्याला मान्यता देण्यात आली. 1948 साली घोषित मानवी हक्कांच्या सार्वत्रिक जाहीरनामाच्या कलम 19 अन्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार राखून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कर्तव्याची सर्व सरकारांना जान करून देण्यासाठी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे महत्त्व याविषयी जागृती निर्माण करण्याकरिता हा दिन पाळला जातो.

🟪जगातील सर्वात मोठ्या विमानाची दुसरी चाचणी यशस्वी. अमेरिकेच्या स्ट्रेटोलॉंच कंपनीचे तयार केलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानाने त्याचे दुसरे चाचणी उड्डाण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. ही चाचणी कॅलिफोर्निया येथे घेण्यात आली. चाचणीदरम्यान विमान 14,000 फूट (4,267 मी) उंचीवर ताशी 199 मैल एवढ्या सर्वोच्च गतीपर्यंत पोहोचले होते. विमानाची वैशिष्ट्ये. विमानाच्या पंखांच्या विस्ताराची एकूण लांबी 385 फूट (117 मीटर) आहे. विमान उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी वापरले जाऊ शकते. विमानाचे शरीर कार्बन-कंपोजिट पदार्थाने तयार केले गेले आहे. विमान 550,000 पौंड (250 टन) एवढे भार वाहू शकते. विमानामध्ये एकूण सहा इंजिन बसविण्यात आले आहेत.

❗️❗️केंद्राचे लसधोरण आरोग्यहक्कास बाधक.❗️❗️ ☑️केंद्र सरकारचे लसीकरण धोरण हे जनतेच्या आरोग्यहक्कास बाधक असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे सरकारने लसधोरणात बदल करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एल. नागेश्वर राव आणि एस. रवींद्र भट यांच्या खंडपीठाने केंद्राला दिले आहेत. ☑️करोनाच्या आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असून, रविवारी न्यायालयाने आदेशपत्राद्वारे महत्वाच्या शिफारशी व निर्देश दिले. आरोग्य हा राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ चा अविभाज्य आहे, याकडे लक्ष वेधत न्यायालयाने लसधोरणात बदल करण्याचे केंद्राला निर्देश दिले. रुग्णांकडे स्थानिक निवासाचा दाखला वा ओळखपत्र नसले तरी, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापासून वा अत्यावश्यक औषधांपासून वंचित ठेवता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत दोन आठवड्यांत राष्ट्रीय धोरण निश्चिात करण्याचे आदेश केंद्राला दिले असून या धोरणाचे देशातील सर्व रुग्णालयांना पालन करावे लागेल. ☑️अहमदाबादमध्ये करोनाच्या रुग्णाला विशिष्ट रुग्णवाहिकेतून न आणल्याचे कारण देत रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला होता. आता हा नियम गुजरात प्रशासनाने रद्द केला आहे. काही ठिकाणी निवासाचा दाखला नसल्याचे कारण देत करोना रुग्णांवर उपचार करण्यास रुग्णालयांनी नकार दिला होता. रुग्णालयांसंदर्भातील धोरणातील विसंगतीची दखल घेत, रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबत देशभर समान सूत्र लागू करण्याचा आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.

🟪टी. रवी शंकर: भारतीय रिझर्व्ह बँकेचे चौथे उपगव्हर्नर टी. रवी शंकर यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ठळक बाबी. 2 एप्रिल 2021 रोजी टी. रवी शंकर यांनी पदाचा कार्यभार सांभाळला. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी केली गेली आहे. त्यांची नियुक्ती बी. पी. कानुनगो यांच्या जागी झाली.वर्तमानात, भारतीय रिझर्व्ह बँकेचे इतर तीन उपगव्हर्नर - महेश कुमार जैन, मायकेल पात्रा, राजेश्वर राव. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) विषयी. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. RBIचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे.RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उपगव्हर्नर नियुक्त केले जातात. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.

भारतीय नौदलाची ‘समुद्र सेतू द्वितीय’ मोहीम. 🔶कोविड-19 विरूद्धच्या देशाच्या लढ्यात साथ देण्यासाठी आणि ‘समुद्र सेतू द्वितीय’ या मोहिमेचा एक भाग म्हणून, विविध देशांमधून द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनने भरलेले क्रायोजेनिक कंटेनर आणि संबंधित वैद्यकीय उपकरणे देशात आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या सात नौका तैनात करण्यात आल्या आहेत. 🔶भारतीय नौदलाच्या INS कोलकाता, INS कोची, INS तलवार, INS तबर, INS त्रिकंद, INS जलश्व आणि INS ऐरावत तैनात करण्यात आल्या आहेत. 🔴 ठळक बाबी... 🔶INS कोलकाता व INS तलवार हा पर्शियन आखातात तैनात केलेला पहिला जहाजांचा ताफा होता ज्यांना त्वरित या कामासाठी वळविण्यात आले आणि त्यांनी 30 एप्रिल 21 रोजी मनामा (बहरीन) बंदरात प्रवेश केला. 🔶INS तलवार हे 40 मेट्रिक टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन देशात परतले आहे. INS कोलकाता वैद्यकीय पुरवठा मिळवण्यासाठी दोहा (कतार) येथे रवाना झाले आहे आणि त्यानंतर द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी ते कुवेतला मार्गस्थ होईल. 🔶पूर्वकिनारपट्टीवर, INS ऐरावत यालासुद्धा या कामासाठी वळविण्यात आले आहे, तर गेल्या वर्षी समुद्र सेतू मोहिमेदरम्यान महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या INS जलश्व याची देखभाल दुरुस्ती करून या मोहिमेच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी त्याला तैनात करण्यात आले आहे. 🔶द्रवरूप ऑक्सिजन टाक्या आणण्यासाठी INS ऐरावत सिंगापूरमध्ये दाखल होणार आहे आणि अल्प मुदतीच्या सूचनेनुसार वैद्यकीय साठा आणण्यासाठी INS जलाश्व यालाही त्या प्रांतात सज्ज ठेवण्यात आले आहे. 🔶अरबी समुद्रात तैनात INS कोची, INS त्रिकंद आणि INS तबर या दुसर्‍या तुकडीलाही राष्ट्रीय प्रयत्नात सामील करून घेण्यात आले आहे.दक्षिणी नौदल कमांडमधून INS शार्दुल या मोहिमेमध्ये 48 तासात सामील होण्यासाठी सज्ज आहे. 🔴 समुद्र सेतू मोहीम... 🔶समुद्र सेतू मोहीम 2020 साली भारतीय नौदलाने सुरू केली होती. या मोहिमेच्या अंतर्गत, कोविड-19 च्या उद्रेकात शेजारच्या देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 4,000 भारतीय नागरिकांना यशस्वीरित्या मायदेशी आणण्यात आले होते.

🟧Simplified चालू घडामोडी डायरी YEARBOOK 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️विद्यार्थी प्रिय असलेले आपले YEAR BOOK महाराष्ट्रात सर्वत्र उ
🟧Simplified चालू घडामोडी डायरी YEARBOOK 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️विद्यार्थी प्रिय असलेले आपले YEAR BOOK महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com Thank-you👍👍

photo content
+6

photo content
+9