uz
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Kanalga Telegram’da o‘tish

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali MPSC SIMPLIFIED(official) analitikasi

MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 33 714 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 603-o'rinni va Hindiston mintaqasida 11 963-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 33 714 obunachiga ega bo‘ldi.

09 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -73 ga, so‘nggi 24 soatda esa -1 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 9.76% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.78% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 3 289 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 1 275 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 10 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

33 714
Obunachilar
-124 soatlar
-197 kunlar
-7330 kunlar
Postlar arxiv
◼️ सिम्प्लिफाईड Comprehensive GS+CSAT राज्यसेवा सराव प्रश्नसंच ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📒सिम्प्लिफाईड पब्लिकेशनच्या या पुस्तकाची "प्रथम आवृत्ती" Ebook (Pdf) स्वरूपात सर्वत्र मोफत उपलब्ध 📍MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 साठी अत्यंत उपयुक्त सराव प्रश्नसंच. 📍GS+CSAT च्या Comprehensive प्रश्नपत्रिका. 📍सर्व प्रश्नांचे सखोल परीक्षाभिमुख विश्लेषण. 📍अल्पावधी तयारीसाठी व Revision साठी उपयुक्त. ✍डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ✍नागेश नवनाथ पाटील BA.Ded. M.A.(Pol.Sci) ◼️Buy Simplified Publication Online Book Store👇 www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com Contact - 8788639688 ◼️Join करा Simplified Discussion Group👇 @simplified_publication

━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.si
━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

🟪सदानंद मोरे साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वाकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून डॉ. श्रीधर तथा राजा दीक्षित यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. डॉ. मोरे यांच्या शिवाय महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर साहित्य क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या २९ सदस्यांना पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत नियुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वाकोश निर्मिती मंडळावर विविध क्षेत्राशी निगडित अध्यक्ष व ३० सदस्य अशा एकूण ३१ सदस्यांची ५ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर मंडळाची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. त्यानुसार डॉ. राजा दीक्षित यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.

🟪मेरी कोम, साक्षी अंतिम फेरीत. सहा वेळा जगज्जेतेपद पटकावणारी भारताची अव्वल बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम तसेच साक्षी (५४ किलो) यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करत आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. मात्र सिमरनजित कौर (६० किलो), मोनिका (४८ किलो), जस्मिन (५७ किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन यांचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने मोंगोलियाच्या लुटसैखान अल्टानसेतसेग हिच्यावर ४-१ असा विजय प्राप्त केला. यासह अव्वल मानांकित मेरीने किमान रौप्यपदक निश्चित केले आहे. मेरी कोमला अंतिम फेरीत कझाकस्तानच्या नझीम कायझाबायचा सामना करावा लागेल. पहिल्या फेरीत काहीशी सावध सुरुवात करणाऱ्या मेरीला अल्टानसेतसेग हिने जोरदार ठोसे लगावले. पण हार न मानता मेरीने दुसऱ्या फेरीत जोमाने पुनरागमन केले. मेरीच्या आक्रमक खेळाला अल्टानसेतसेगकडे उत्तर नव्हते. तिसऱ्या फेरीतही मेरीने वर्चस्व गाजवत ही लढत जिंकली. दोन वेळा युवा जगज्जेती ठरलेल्या साक्षी हिने कझाकस्तानच्या अव्वल मानांकित दिना झोलामान हिचे कडवे आव्हान ३-२ असे परतवून लावले. तिला जेतेपदासाठी उझबेकिस्तानच्या सितोरा शोगदारोव्हा हिच्याशी लढत द्यावी लागेल. लालबुआतसैहीने (६४ किलो) कुवैतच्या नौरा अल्मुतारीला सहज हरवत अंतिम फेरी गाठली.

🟪29 मे आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांती सैनिक दिवस दरवर्षी 29 मे या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांती सैनिक दिवस’ साजरा करण्यात येतो. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यात बलिदान देणाऱ्या गणवेशधारी आणि नागरी कर्मचार्‍यांच्या अमूल्य योगदानाबद्दल श्रद्धांजली म्हणून पाळला जातो. 2021 साली "द रोड टू ए लास्टिंग पीस: लीव्हरेजिंग द पॉवर ऑफ यूथ फॉर पीस अँड सेक्युरिटी" या संकल्पनेखाली ‘आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रसंघ शांती सैनिक दिवस’ पाळण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली शांती मोहीम 29 मे 1948 रोजी इस्त्रायल आणि अरबी शेजारी देशांच्या दरम्यान झालेल्या ‘आर्मिस्टीस’ करारावर नजर ठेवण्यासाठी मध्य-पूर्व क्षेत्रात पाठविण्यात आली होती. शीतयुद्धाच्या काळात वैश्विक स्थैर्य राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात 1948 सालापासून आतापर्यंत 3900 शांती सैनिकांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आहे. ▪️संयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. 1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे. संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे. UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश. ▪️संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत - UN महासभा (General Assembly) UN सुरक्षा परिषद (Security Council) UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC) UN सचिवालय UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणिUN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे). संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत - जागतिक बँक समूह जागतिक आरोग्य संघटना (WHO) जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program) संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO) संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund –UNICEF) 1948 साली स्थापना झालेले संयुक्त राष्ट्रसंघ शांती मोहीम (UN peacekeeping) याचे नेतृत्व डिपार्टमेंट ऑफ पीसकिपिंग ऑपरेशन्स (DPKO) हा विभाग करतो आणि यामधून संघर्षाने ग्रस्त असलेल्या देशामध्ये दीर्घकाळ शांततेसाठी परिस्थिती निर्माण करण्यासाठी कार्य केले जाते. मोहिमेमधील शांतीरक्षकांमध्ये (ब्ल्यू बेरेट किंवा ब्लू हेलमेट) सैनिक, पोलीस अधिकारी आणि नागरिक यांचा समावेश असतो. UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आणि अधिकार दिला आहे.

🟪१३८ व्या जयंती निमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या’ बायोपिकची घोषणा. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणारं व्यक्तीमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर. खरं तर स्वातंत्र्य लढात सावकरांच्या असलेल्या योगदानावर आजवर अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. सावरकरांचे देशात जितके समर्थक आहेत तितकेच टीकाकार. अशातच सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केलीय. या सिनेमातून सावरकरांबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा संदीप या सिनेमातून करणार आहेत. संदीप सिंह यांनी सिनेमाचा फर्स्ट लूक देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. “स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणं अजून बाकी आहे. वीर सावरकरांना लवकरच भेटा.”असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलंय. पुढे संदीप म्हणाले, “एकीकडे सावकरांचा आदर केला जातो तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. मला वाटतं त्यांच्याबद्दल लोकांना फारसं माहित नसल्याने असं होतं. मात्र स्वातंत्र्य लढ्याचा ते महत्वाचा भाग होते ही गोष्टी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात आणि प्रवासात डोकावण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ” असं संदीप सिंह म्हणाले आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान देणारं व्यक्तीमत्व म्हणजे विनायक दामोदर सावरकर. खरं तर स्वातंत्र्य लढात सावकरांच्या असलेल्या योगदानावर आजवर अनेकांनी वेगवेगळे दावे केले आहेत. सावरकरांचे देशात जितके समर्थक आहेत तितकेच टीकाकार. अशातच सावरकरांच्या १३८ व्या जयंती निमित्ताने बॉलिवूड निर्माते संदीप सिंह यांनी सावरकरांच्या बायोपीकची घोषणा केलीय. या सिनेमातून सावरकरांबद्दल माहित नसलेल्या अनेक गोष्टींचा उलगडा संदीप या सिनेमातून करणार आहेत. संदीप सिंह यांनी सिनेमाचा फर्स्ट लूक देखील त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. “स्वातंत्र्याच्या इतिहासाची पूर्ण गोष्ट जाणून घेणं अजून बाकी आहे. वीर सावरकरांना लवकरच भेटा.”असं कॅप्शन त्यांनी फोटोला दिलंय. पुढे संदीप म्हणाले, “एकीकडे सावकरांचा आदर केला जातो तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका होते. मला वाटतं त्यांच्याबद्दल लोकांना फारसं माहित नसल्याने असं होतं. मात्र स्वातंत्र्य लढ्याचा ते महत्वाचा भाग होते ही गोष्टी कुणीही नाकारू शकत नाही. त्यांच्या आयुष्यात आणि प्रवासात डोकावण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ” असं संदीप सिंह म्हणाले आहेत.

🟪‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ औषधी आता भारतातही; एका आठवड्यात रुग्ण होऊ शकतो बरा करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक प्रभावी औषधी वापरण्यावर भर दिला जात असून, यात आता एका औषधाची भर पडली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोना झाल्यानंतर वापरण्यात आलेलं औषध भारतातही उपलब्ध झालं आहे. ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ असं या औषधाचं नाव असून, केंद्र सरकारने याला परवानगी दिली आहे. त्यामुळे करोना रुग्ण एका आठवड्यात बरा होऊ शकतो. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे. इंडिया टुडेनं याबद्दलची वृत्त दिलं आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारात ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता. ट्रम्प यांच्यावर वापरण्यात आल्यानंतर हे औषध चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता भारत सरकारनंही याच्या वापराला परवानगी दिली असून, हैदराबादमधील एआयजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी विषयी महत्त्वाची माहिती दिली. एआयजी रुग्णालयाने ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’चा उपचारात वापर करणं सुरू केलं आहेत. त्याचबरोबर नव्या म्युटेशनवर ते किती प्रभावी आहे, यावरही व्यापक स्वरूपात अभ्यासही केला जात आहे, असं रेड्डी म्हणाले. “या औषधाच्या वापरामुळे करोना रुग्ण एका आठवड्यातच आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह होऊ शकतो. करोनाच्या डबल म्युटेशनवर ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ किती प्रभावी आहे, याचा आम्ही एआयजीमध्ये अभ्यास करत आहोत,” असं रेड्डी म्हणाले.

🟪10 अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती. भारताच्या राष्ट्रपतींनी,  भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 217 च्या कलम 1)  ने बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करीत,  एस / श्री न्यायमूर्ती अविनाश गुणवंत घरोटे, नितीन भगवंतराव सूर्यवंशी, अनिल सत्यविजय किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव, मुकुंद गोविंदराव सेवलीकर, वीरेंद्रसिंह ज्ञानसिंह बिष्ट, देबद्वार भालचंद्र उग्रसेन, श्रीमती मुकुलिका श्रीकांत जवळकर, सुरेंद्र पंढरीनाथ तावडे आणि नितीन रुद्रसेन बोरकर या मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांची, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यासंदर्भातील अधिसूचना आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने जारी केली.

🟪गोव्यातील पणजी येथे प्रादेशिक स्तरावरील डाक अदालतचे आयोजन.   गोवा विभागाचे  पोस्टमास्टर जनरल यांच्या वतीने ,दिनांक 21 जून रोजी 2021  दुपारी 12:00 वाजता, 48 व्या प्रादेशिक स्तरावरील  डाक अदालतचे पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी 403001  येथे आयोजन करण्यात आले आहे..   या डाक अदालत द्वारे गोवा विभागातील, ज्यावर 6 आठवड्यांत तोडगा निघालेला नाही, अशा प्रकारच्या पोस्टविषयक सेवांबाबतच्या गाऱ्हाणे  / तक्रारी तक्रारी  निकाली काढल्या जातील. मेल, स्पीड पोस्ट, काउंटर सर्व्हिसेस, सेव्हिंग्ज बँक आणि न भरणा झालेल्या मनी ऑर्डरबाबतच्या तक्रारींचा यावेळी विचार केला जाईल. उपस्थित केलेल्या तक्रारीत, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार केली गेली होती त्याची तारीख, नाव आणि  पदनाम यासारख्या बाबींचा तपशील नमूद केलेला असावा. इच्छुक ग्राहक टपाल सेवांबद्दल आपली तक्रार दोन प्रतींमधे, श्री रमेश प्रभू, सचिव,टपाल सेवा आणि सहायक संचालक टपाल सेवा, पोस्टमास्टर जनरल कार्यलय, गोवा विभाग,  पणजी 403001 या पत्त्यावर  पाठवू शकतात. तक्रार पाठविण्याची अंतिम तारीख 11 जून 2021 ही आहे   टपाल सेवा,ही प्रत्येक नागरीकाच्या जीवनाला स्पर्श  करणारी सेवा असून  देशाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पोस्ट विभाग आपल्या ग्राहकांना  संपूर्णपूणे समाधानकारक सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना, दळणवळणातील अंतर आणि सेवेतील त्रुटी अधूनमधून घडतात ज्यामुळे गाऱ्हाणी आणि तक्रारी वाढत असतात. अशा गाऱ्हाणी / तक्रारींचे प्रभावी पद्धतीने निवारण करण्यासाठी विभाग वेळोवेळी टपाल अदालतीचे आयोजन करत असतो, जिथे विभागातील अधिकारी समाधान न झालेल्या  ग्राहकांना भेटतात, त्यांच्या तक्रारींबद्दल तपशील गोळा करतात आणि लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.  

🟪माध्यान्ह भोजन योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळणार.🖱🖱 या निर्णयाचा लाभ 11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांना होणार या योजनेसाठी 1200 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची तरतूद. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल  ‘निशंक’ यांनी माध्यान्ह भोजन योजनेसाठी पात्र सर्व विद्यार्थ्यांसाठीच्या एका विशेष कल्याणकारी योजनेअंतर्गत, या योजनेत अंतर्भूत पदार्थ बनविण्याच्या खर्चापोटी 11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या योजनेमुळे माध्यान्ह भोजन योजनेला उत्तेजन मिळेल. केंद्र सरकारने या आधी घोषित केलेल्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने’अंतर्गत सुमारे 80 कोटी लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला प्रती व्यक्ती 5 किलो धान्याचे मोफत वितरण करण्याच्या योजनेच्या व्यतिरिक्त ही विशेष योजना राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे शालेय मुलांच्या पोषण पातळीचे संरक्षण होण्यास मदत होईल आणि महामारीच्या या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांची प्रतिकारशक्ती सुरक्षित राखण्यास पाठबळ मिळेल. केंद्र सरकार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना 1200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी पुरविणार आहे. देशभरातील 11 लाख 20 हजार सरकारी तसेच अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या  सुमारे 11 कोटी 80 लाख विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या एकदाच अमलात येणाऱ्या या विशेष कल्याणकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.  

🟪बी.१.६१७ विषाणूचा ५३ देशांमध्ये फैलाव भारतात सर्वप्रथम आढळलेला कोविड-१९ विषाणूचा बी.१.६१७ हा प्रकार आता ५३ देशांमध्ये आढळून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. गेल्या सात दिवसांत भारतात करोनाच्या नव्या प्रकरणांमध्ये २३ टक्क््यांची घट झाली आहे, मात्र तरीही ही संख्या जगात सर्वाधिक असल्याचेही या संघटनेने नमूद केले आहे. गेल्या आठवडाभरात करोनाची नवी प्रकरणे आणि करोनामृत्यू यांची संख्या जगभरात कमी होऊन, ४ कोटी १ लाख नवी प्रकरणे आणि ८४ हजार मृत्यूंची नोंद करण्यात आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे १४ टक्के व २ टक्क््यांनी कमी आहे, असे २५ मे रोजी प्रकाशित करण्यात आलेल्या डब्ल्यूएचओच्या महासाथविषयक ताज्या आकडेवारीत म्हटले आहे. बी.१.६१७ विषाणू हे बी.१.६१७.१, बी.१.६१७.२ आणि बी.१.६१७.३ अशा तीन वंशात (लायनेज) विभागलेले आहेत. ‘हू’च्या आकडेवारीत बी.१.६१७ प्रकाराच्या तीन वंशांच्या निरनिराळ्या देशांत आणि भागांत २५ मे रोजी असलेल्या अस्तित्वाची माहिती देण्यात आली आहे.

photo content
+8

photo content
+9

esakal | व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होतील भविष्यात "एमपीएससी'च्या मुलाखती ! https://www.esakal.com/maharashtra/in-future-mpsc-interviews-will-be-conducted-by-video-conference

"सिम्प्लिफाईड कृषिशास्त्र" Online पद्धतीने या पुस्तकाचा नुकताच प्रकाशन समारंभ संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी, प्राध्यापक, लेखक, लेखिका, विद्यार्थी मित्र-मैत्रिणी आपण आपला बहुमल्य वेळ देऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन दिले, शुभेच्छा दिल्या त्याबद्दल अाम्ही आपणा सर्वांचे मनापासून आभारी आहोत. Wish All The Best Thank You!👍 Simplified Publication www.simplifiedcart.com