uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку 👈

मराठी व्याकरण - शब्दसंग्रह By अर्जुन शेलार

मराठी व्याकरण - शब्दसंग्रह By अर्जुन शेलार

Відкрити в Telegram

🔸स्पर्धा परीक्षांसाठी अत्यावश्यक मराठी व्याकरण व शब्दसंग्रहाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाईल. तसेच आयोगाच्या 2011 ते 2019 मधील विविध परीक्षांना विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले जाईल. 🔸By-अर्जुन शेलार ( Interviewed by MPSC )

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
793
Підписники
Немає даних24 години
Немає даних7 днів
Немає даних30 днів
Архів дописів
#भाषासूत्र, दै.लोकसत्ता 🎯 #विमोचन या शब्दापासून मराठीला सुटका हवी! ‘त्या लेखकाच्या नव्या पुस्तकाचा ग्रंथविमोचन समारंभ एका श्रेष्ठ साहित्यिकाच्या हस्ते पार पडला.’ या वाक्यातील ‘ग्रंथविमोचन समारंभ’ ही शब्दयोजना सदोष आहे. या शब्दातील मोचन (नाम, नपुसकलिंगी) हा संस्कृत शब्द आहे. या शब्दाचा अर्थ आहे- स्वतंत्रता, मोकळीक, मुक्तता, सुटका, मुक्ती. ‘मोचन’ या नामातील मूळ धातू आहे- मोच (सं)- मुच्- मोचणे. या क्रियापदाचा अर्थ आहे- मोकळा करणे, सोडणे, मुक्त करणे. मोचन या शब्दाला ‘वि’ हा उपसर्ग लागला की, सिद्ध होतो शब्द- विमोचन. विमोचन (नाम, नपुसकलिंगी) अर्थ- सुटका, मोकळीक, मुक्ती, मुक्तता. ‘वि.’ हा उपसर्ग लागल्याने ‘मोचन’ या शब्दाच्या अर्थात काहीही वेगळेपण नाही, हे आपल्या लक्षात येईल. उलट, मोचन या शब्दाच्या अर्थात भर पडते. ग्रंथविमोचन समारंभ या वरील वाक्यातील शब्दाचा अर्थ होईल- ग्रंथाची मुक्तता किंवा सुटका करण्याचा समारंभ. हा समारंभ नव्या पुस्तकाची सुटका किंवा मुक्तता करण्यासाठी नाही, तर या नव्या ग्रंथाचे (पुस्तकाचे) प्रकाशन करण्यासाठी आहे. ‘ग्रंथविमोचन’ हा शब्द अत्यंत दोषपूर्ण आहे. प्रकाशन (संस्कृत नाम, नपुं.) अर्थ- प्रसिद्ध करणे, प्रकाशित करणे. प्रकाशक (नाम, पुल्लिंगी) अर्थ- प्रसिद्ध करणारा, पुस्तके, ग्रंथ इ. लिखित साहित्य प्रसिद्ध करणारा. एखाद्या भाषेत प्रकाशनऐवजी विमोचन, ‘ग्रंथप्रकाशन’ ऐवजी ग्रंथविमोचन असा शब्द रूढ असला, तरी मराठी भाषेत ‘ग्रंथप्रकाशन’ हेच योग्य रूप आहे. परभाषेतील शब्दांचे मराठीत (संस्कृताप्रमाणे) वेगळेच अर्थ असतील, तर रूढ असलेले योग्य शब्द मराठी भाषकांनी, लेखकांनी का नाकारावेत? ‘वि’ हा उपसर्ग लागून मराठीत अनेक शब्द उपलब्ध आहेत. मात्र ‘वि’ या उपसर्गामुळे प्रत्येक शब्दाचा विरुद्ध अर्थ होतोच असे नाही. काही शब्द पाहा- विरुद्धार्थी शब्द- विसंगत, विरस, विरूप, विवस्त्र, विवर्ण, विसंवाद, विस्मरण, वियोग, विधर्मी, विषम इ. शब्दाला ‘वि’ उपसर्ग लागून त्याचा अर्थ थोडा अधिक व्यक्त करणारे- विविध, विशुद्ध, विकास, विख्यात, विनाश, विश्रुत, विजय, विघातक, विनम्र इ. 🖊 यास्मिन शेख ============== संकलक- नितीन अर्जुन खंडाळे - चाळीसगाव दिनांक- २६ सप्टेंबर २०२२

उंटाच्या तोंडात जिरे = उंटाच्या आकाराच्या तुलनेत त्याला खूपच कमी खायला मिळणे म्हणजे - उंटाच्या तोंडात जिरे. त्यावरूनच जिथे एखाद्या गोष्टीची जास्त गरज असताना खूपच कमी गरज पूर्ण करणे , असा अर्थ घेता येतो. - अर्जुन शेलार. Join @MPSCMarathi09

यापूर्वी आयोगाने 'भगिनीमंडळ' हा शब्द तत्सम म्हणून बरोबर दिला आहे. 'भगिनीमंडळ' हा सामासिक शब्द आहे. यातील 'भगिनी' हा शब्द स्वतंत्रपणे विचारात घेतल्यास तत्सम आहे. मंडळ हा शब्द स्वतंत्रपणे विचारात घेतला तर तो मात्र तत्सम येणार नाही कारण संस्कृतमध्ये 'ळ' हा वर्णच नाही. त्याचप्रमाणे, 'कमळ' हा शब्द 'तत्सम' नाही.

⭕️♦️⚠️DMER 2023 प्रश्नपत्रिका PDF 🔥DMER फार्मसी प्रश्नपत्रिका 1

5 ) शुद्ध शब्दांचा योग्य गट ओळखा a ) नैऋत्य , निघृण , निर्भत्सना ; b ) ऊर्मी , उष्ण , उग्र ; c ) विशिष्ट , उत्कृष्ट , सुष्ट ; d ) प्रिती , पिडा , भिती
Anonymous voting

#भाषासूत्र, दै.लोकसत्ता 🎯 #वाक्प्रचारांमधील_दृष्टांत मराठीमध्ये संस्कृतमधून आलेले काही न्याय हे वाक्प्रचार म्हणून रूढ झाले आहेत. येथे ‘न्याय’ याचा अर्थ ‘दृष्टांत’ किंवा समर्पक उदाहरणातून सुचवलेला बोध होय. ‘काकतालीय न्याय’ याचा मराठीत रूढ अर्थ आहे, कावळा बसायला नि फांदी मोडायला एक वेळ येणे. ‘बोलाफुलाची गाठ’ हा वाक्प्रचारदेखील हाच अर्थ व्यक्त करतो. याचा सूचित अर्थ आहे, एखादी गोष्ट अचानक/ कर्मधर्मसंयोगाने घडणे. घुणाक्षरन्याय याचाही अर्थ असंकल्पित घटना असा आहे; कारण घुण नावाचा कीटक लाकूड कोरतो, तेव्हा त्यात एखाद्या अक्षराची आकृती उमटल्याचा भास होतो. शुकनलिकान्याय- पोपट पकडण्यासाठी पारधी एक नळी टांगून ठेवतात. ती नळी फिरत असते. पोपट त्या नळीवर बसतो नि नळी फिरल्यावर तो खाली येऊन उलटा टांगला जातो. पंख असल्याचे विसरून तो भीतीने नळी पायात घट्ट धरतो. एकंदरीत आपल्या क्षमतांचा विसर पडल्यामुळे येणारी असहायता यातून व्यक्त होते. शलाकापरीक्षा करणे, हा वाक्प्रचारही दृष्टांतासारखाच आहे. शलाका म्हणजे सळई. कोश अथवा ग्रंथ असतो, तेव्हा त्यात एक सळई घालून, कोणतेही पान उघडून, ते वाचून त्याची परीक्षा करतात. यावरून याचा अर्थ होतो, थोडा अंश पारखून एकूण अंदाज घेणे. ‘शितावरून भाताची परीक्षा’ याचा अर्थदेखील हाच आहे. ‘हंसक्षीरन्याय’ कधीतरी आपल्या वाचनात आलेला असतो. दूध आणि पाणी एकत्र असेल तर हंस हा पक्षी दूध तेवढे पितो आणि पाणी वेगळे काढतो, अशी समजूत आहे. बरे- वाईट एकत्र असताना त्यातील चांगले तेवढे निवडणे, यात अभिप्रेत आहे. ‘नीरक्षीरविवेक’ हा वाक्प्रचारही यातूनच आला आहे. ‘देहलीदीपकन्याय’ यात देहली (संस्कृत शब्द) म्हणजे उंबरठा. उंबरठय़ावर दिवा ठेवला असता त्याचा उजेड दोन्ही बाजूंना पडतो. त्यामुळे जेव्हा एखादा शब्द दोन्हीकडे सारखाच लागू पडतो, तेव्हा याचा वापर करतात. असे विविध दृष्टांत लोकभाषेत रूढ होऊन वापरले जात असतात. त्यांतून अलंकरणाबरोबरच अनुभवातून आलेले शहाणपणही सूत्ररूपाने संक्रमित होत असते. 🖊डॉ. नीलिमा गुंडी ============== संकलक- नितीन अर्जुन खंडाळे - चाळीसगाव दिनांक- २३ नोव्हेंबर २०२२

समानार्थी शब्दांचा योग्य गट पर्यायातून ओळखा. Join - @MPSCMarathi09
Anonymous voting

सर ,प्रश्न पत्रिका क्रमांक 6 प्रश्न क्रमांक 11 भरत वाक्य म्हणणे आपण स्पष्टीकरण दिल्यानुसार व या पुस्तकातील संदर्भानुसार याचे सर्वात अचूक उत्तर सुरुवात करणे असे असावे असे वाटते

महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 नुसार खालीलपैकी कोणत्या कलमानुसार पात्र व्यक्तीस नियत कालमर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क मिळाला आहे ?
Public voting

सर यावर काही प्रतिक्रया😂😂

हे कुठून आलया या ग्रुप वर😂 काढा ह्याला

उत्तरतालिका - मराठी व्याकरण / शब्दसंग्रह / उतारे By अर्जुन शेलार. _____ संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2021

व्याकरणाच्या दृष्टिकोनातून तर माहीत नाही पण जरा common sense वापरला तर उत्तर येऊ शकतय