ru
Feedback
𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

𝗧𝗛𝗘 𝗦𝗧𝗘𝗘𝗟 𝗙𝗥𝗔𝗠𝗘 𝗢𝗙 𝗠𝗣𝗦𝗖

Открыть в Telegram

💫 "WE ARE HERE TO MAKE EDUCATION AFFORDABLE"

Больше
6 971
Подписчики
-224 часа
-17 дней
+1730 день
Архив постов
Repost from N/a
सुरुवातीच्या दिवसांपासून आपल्यावर सतत टीका होत आहे, गेल्या काही दिवसांमध्ये तर ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्यामुळे आपण आज आपल्याकडून शेवटचं स्पष्टीकरण देत आहोत.🤝 एवढे दिवस आपण काही बोललो नव्हतो, गेल्या 2 दिवसात आपण एकच टीकेचं उत्तर दिलं आणि विरोधकांना घाम फुटला,😁 काही telgram चॅनेल वाले पण अचानकच सूर बदलले, इतरांनी केलं तर योग्य, आम्ही उत्तर दिले तर चूक हेच सिद्ध करण्यावर जोर लावला, असो, आपण सुरुवातीपासूनच, जेव्हा काही लोक परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आंदोलन करत होते तेव्हापासूनच आपण ह्या परीक्षा योजनेवर प्रश्नचिन्ह उभे केले होते, आवाज उठवला होता. ( तेव्हा आपली मागणी चूक म्हणणारे, आज मुलाखतीला पात्र न झाल्यामुळे , आता मागणी योग्य आहे हे म्हणताना ह्यांना लाज वाटत नसेल का ? असा प्रश्न पडतोय) आमच्या ReExam केस बद्दल आणि आमच्या हेतू बद्दल प्रश्न उभा करणारे कदाचित हे विसरत आहेत की, सुरवातीपासून आम्ही petioner मिळून स्वतःहून खिशातून पैसे खर्च करून केस दाखल केली, MAT मध्ये केस, HC मध्ये Stay मिळवण्यासाठी interim relief बाबत सुनावणी हे सगळं करेपर्यंत आपण कोणाकडून पैसे घेतले नव्हते, त्यानंतर विद्यार्थ्यांचे कॉल msg होते की, सुरुवातीला आम्हाला माहिती असते तर आम्ही सुधा petioner झालो असतो, पण आम्ही आता अर्थीक सहाय्य करू, सिनिअर advocate लावुया, तेव्हा आपण crowd funding सुरू केली. शेवटी, ह्याच सगळ्या गोष्टींवर आमच्यावर प्रश्न चिन्ह उभा करणारे, टीका करणारे, आज मात्र स्वतः सुद्धा तेच करत आहेत, आणि ह्यावर कळस म्हणजे, आमच्याच केस च्या मिळालेल्या जजमेंट ला घेऊन, परस्पर आम्हाला कल्पना न देता हे लोक, एका petioner च्य नावाने वेगवेगळ्या वकिलांना भेटून , वेगळे वेगळे Telgram वर वादळ वारे ग्रुप बनवून विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. ह्यांचा मूळ उद्देश एकच आहे , ReExam केस ला नुकसान पोहचवणे, जर असे नसते तर ह्यांना एकत्रित काम करण्यास काहीच अडचण नसायला हवी होती, सुरुवातीपासून आपण एकदम स्पष्ट होतो की, केस साठी जे फायद्याचं असेल आपण ते सगळं करणार, पण, तरी सुद्धा कोणतीच चर्चा न करता, आपल्याला पूर्व कल्पना न देता परस्पर ह्यांनी हे सगळं सुरू केलं, ज्यामध्ये ह्यांचा हेतू नक्की काय ? हे आता सगळ्यांनाच समजत आहे. गेल्या काही दिवसात आम्हाला सुद्धा केस पासून, किंवा कामावर फोकस करण्यापासून हे दुर्लक्षित करू पाहत आहेत , आणि त्यामुळेच आपण आज एक व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी स्पष्ट करत आहोत. सुरू असलेल्या ' so called controversy ' आणि टीकेवर आमचे हे शेवटचे उत्तर असेल, कारण, ह्यामध्ये सामान्य विद्यार्थी भरडला जातोय , अस्वस्थ होतोय, आता ह्यानंतर आमच्यावर कितीही टीका करा, काहीही बोला, आमच्याकडून कोणतेच उत्तर येणार नाही 😉 इथून पुढे आमचे फक्त केस च्या कामावर फोकस असणार, आणि ह्या ग्रुप वर फक्त केस बद्दल योग्य ती माहिती शेअर होणार. ' Telegram' हे फक्त संवादाचे साधन आहे, आणि त्याचा वापर सुद्धा आपण फक्त संवाद , updates, केस बद्दल खरी आणि योग्य माहिती सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी करणार. इतर गोष्टींसाठी आपल्याकडून शून्य रिऍक्शन असेल, कारण, गोंधळात टाकणारे तर सगळीकडेच असतात, स्पष्टता मात्र प्रामाणिक लोकं असलेल्या ठिकाणीच दिसत असते. आपण टाकलेल्या केस चा नंबर आहे, O.A. 482/2025 Bhagwat Jokare Vs Mpsc . तर, भागवत जोकारे कोण? ही केस टाकणारी व्यक्ती कोण आहे? आपण कोणाला पैसे देत आहोत? ह्या केस चे नेतृत्व कोण करत आहे ? पुढे जाऊन जर काही अडथळा आल्यास आपण कोणाला जाब विचारणार ? तर ह्यासाठी खाली हा व्हिडिओ शेअर करत आहोत. सदर Video मध्ये स्वतः भागवत जोकरे सर आहेत आणि त्यांनी पूर्ण स्पष्टीकरण दिलेले आहे. पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो, सध्या telgram विश्वातील सुरू असलेल्या Noise आणि controversy साठी आपले हे शेवटचे उत्तर असेल 🤝

ROHIT VIRAT सोबत 2027 मध्ये MPSC जुनी गॅंग आपण देखील निवृत्ती घेतली तर चालेल..... तो पर्यंत आता एकच गोष्ट लक्षात ठेवा "आता थांबायचं नाही"😊

PLAN मध्ये थोडा बदल कराव लागेल आता😊 आपल्याला अभ्यास 13 डिसेंम्बर 2026 पर्यंत करावं लागेल लास्ट Group C mains (पूर्व पास झाला
PLAN मध्ये थोडा बदल कराव लागेल आता😊 आपल्याला अभ्यास 13 डिसेंम्बर 2026 पर्यंत करावं लागेल लास्ट Group C mains (पूर्व पास झाला तर नाहीतर त्याच्या आधी सुद्धा MPSC तुन सुटका होऊ शकते ) यानंतर तुम्ही MPSC ला टाटा बाय बाय केलं तरी चालेल (आणि 2027 च्या कुंभमेळ्यात नागासाधू होऊन गायब झाला तरी काही प्रॉब्लेम नाही 😂) पण COMEBACK करण्यासाठी शेवटची संधी आहे..... 2026 ऍड मोठी असेल ऑल सरळसेवा MPSC घेणार आहे COMEBACK YEAR 🔥🔥🔥 (जे MPSC सोडायचा विचार करत होते त्यांच्यासाठी आहे )

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

गट ब मुख्य 2025 मे महिन्यात
गट ब मुख्य 2025 मे महिन्यात

Sir हे सर्वांपर्यंत पोहचवा
Sir हे सर्वांपर्यंत पोहचवा

Phone pay / G pay = 8484893668 ( Trambak G. Kadam) टीप : 👆हे नाव दिसले तरच पेमेंट करा. याव्यतिरिक्त आमचे कुठलेही अकाउंट नाही
Phone pay / G pay = 8484893668 ( Trambak G. Kadam) टीप : 👆हे नाव दिसले तरच पेमेंट करा. याव्यतिरिक्त आमचे कुठलेही अकाउंट नाही.

सर्वांनी आपल्याला एकदा पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळत असेल तर... प्रत्येकानी सरळसेवेचा एक फॉर्म भरला असे समजून एक exam ची फीस या चांगल्या कामासाठी देयाला काहीच हरखत नाही.

Repost from N/a
सर्वांनी हा वकालतनामा वाचून घ्यावा
सर्वांनी हा वकालतनामा वाचून घ्यावा

सर्वात प्रथम सर्व ग्रुप जॉईन झालेल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे धन्यवाद. आपल्याला मदत केलेल्या सर्व टेलिग्राम ॲडमिन्सचे ही धन्यवाद. — आपण हा ग्रुप विद्यार्थ्यांचे मुद्दे योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी बनवलेला आहे. आपण 4 मुद्दे घेणार आहोत. त्यातील आज इथे फक्त पहिला मुद्दा स्पष्ट करणार आहोत, बाकी 3 मुद्दे दिवाळीनंतर घेणार आहोत. — पहिला मुद्दा = संयुक्त नागरी सेवा 2024 कोर्ट केस (राज्यसेवा व इतर संवर्ग ). Retrospective Reservation, old hall ticket, NCL, Category change after submission of form आणि इतर बऱ्याच मुद्द्यांविरोधात आपल्यातील काही विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा अगोदरच MAT मध्ये धाव घेतली. मात्र MAT मध्ये योग्य रीतीने draft बनविला गेला नाही. त्यामुळे जुन्या REEXAM टीमला तिथे न्याय मिळाला नाही. MAT ची ऑर्डर 17 सप्टेंबर 2025 रोजी मिळून सुद्धा उच्च न्यायालयांमध्ये जुन्या REEXAM टीमने धाव घेतली नाही. त्यामुळे त्यातील काही APPLICANT नी आपल्याकडे मदत मागितली. राज्यसेवेतून Gazetted पोस्ट मिळवण्याचे सर्वांचे स्वप्न असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतात व त्यातही ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न ची राज्यसेवा आहे. या applicant सोबतच हजारो विद्यार्थी आपल्याला मदत मागत होते. त्यामुळे आपण या मुद्द्यावर लढायचे ठरवले आहे. आपण अनेक घटनातज्ञ, retired judge, आणि प्रतिष्ठित वकिलांचा अगोदर सल्ला घेतला आहे. जवळपास सर्वांनीच तुमचे मुद्दे व्हॅलिड आहेत व तुम्ही केस जिंकू शकता असा सल्ला दिला. फक्त तुम्ही Eminent senior advocate लावा असे सांगितले. मग आम्ही सर्वांनी मुंबई उच्च न्यायालयातील काही प्रतिष्ठित वकिलांशी meeting केली. लढायचे असेल तर पूर्ण ताकदीने लढायचे ठरविले. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयामधील सर्वात Top चे असे व FORMER ADVOCATE GENERAL OF MAHARASHTRA STATE (महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता) असलेले विजयसिंह थोरात सर व त्यांच्या संपूर्ण टीमला आपण Approach केले. आपण त्यांना केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्याला अतिशय कायदेशीर पद्धतीने दिली. मग आम्ही सर्वांनी माजी महाधिवक्ता विजयसिंह थोरात सरांना या केससाठी Appoint केले आहे. त्यांनी आपला वकालतनामा स्वीकारला आहे. आपण जितके Top चे वकील लाऊ तितकी त्यांची Fees जास्त असते. थोरात सर आणि त्यांच्या टीम मधील इतर वरिष्ठ वकिलांची per hearing ची fees खूपच जास्त आहे. आपण खूप विनवणी करून सरांनी 12 लाख रुपयात केस घेतली आहे. तरीही ही अमाऊंट खूप जास्त असल्याने आपण Crowd Funding घेण्याचे ठरविले आहे. मागचा अनुभव पाहता असे दिसून आले की पैसे घेणाऱ्या टीमने दररोज किती पैसे जमा झाले याचा हिशोब दिला नाही. तसेच Total Bank Statement न टाकता काही ठराविक पेमेंटचेच स्क्रीनशॉट टाकले आहेत. यामुळे यात कोणी पैसे खात आहे का असा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो. आपण या ग्रुप वर दररोज किती पैसे जमा झाले याचे सर्व Bank Statement व Total टाकणार आहोत. पूर्णपणे Transparancy ठेवणार आहोत. एक–एक रुपयाचा आपण हिशोब देणार आहोत. आपण आपल्या Crowd Funding साठी च्या अकाउंटचे डिटेल्स खाली देत आहोत. आमचे सांगणे एवढेच आहे की, आपण केस नक्कीच जिंकणार आहोत. आयुष्य नेहमी नेहमी संधी देत नाही. राज्यसेवा परत देण्याची तुम्हाला ही संधी मिळत आहे. तुमच्यासाठी कोणीतरी लढत आहे. तुम्ही काही रुपयांसाठी ही संधी सोडू नका. आम्ही Former Advocate general विजयसिंह थोरात सरांचा वकालतनामा जोडत आहोत. आपण वकिलांची फौज उभा केली आहे. – विजयसिंह थोरात – माधव थोरात – 2 Senior Counsellor ही टीम लढणार आहे. पैसे जमा झाल्यानंतर एका तासात आपण आपली केस बॉम्बे High court मध्ये mention करून घेणार आहोत. कारण आपली एक टीम मुंबईत आहे. आयुष्यातील ही शेवटची संधी समजा. https://t.me/Studentsjusticeunion

2026 मागणीपत्र कार्यवाही सुरु आहे.
2026 मागणीपत्र कार्यवाही सुरु आहे.

अतिमहत्त्वाचे.... मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत शासनाने उमेदवारांना काही काळासाठी प्रशिक्षण दिले,तसेच काही काळासाठी कालावधीसुद्धा वाढवला होता. आता सदर उमेदवाराची मागणी ही आहे की, त्यांना कायमस्वरूपी करा. सदर मागणी चुकीची आहे.यात काहीही तथ्य नाही.शासनाने यांची मागणी पूर्ण करू नये. लाखो उमेदवार रात्र- दिवस अभ्यासिकेत बसून आपल्या रक्ताच पाणी करत आहेत. शासनाने त्यांची मागणी पूर्ण केल्यास पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केले जाईल. शासनास विनंती की, कायमस्वरूपी नोकरभरतीची जाहिरात काढून स्पर्धा परीक्षाद्वारे उमेदवारांना नोकरी दिली जावी... नम्र विनंती...🙏

13 Oct. International Day for Failure 🔥🔥🔥 ये तो अपना दिन है 😁😁😁

Tweet, Retweet करा... forword,send करा. सोशल मीडियामध्ये खूप ताकद असते..👍🙏
Tweet, Retweet करा... forword,send करा. सोशल मीडियामध्ये खूप ताकद असते..👍🙏

MPSC क्षेत्रातील अभूतपूर्व क्रांती अनुभवण्यासाठी 🔥🔥🔥 Join and Share 🔥🔥 💥💥💥💥💥 https://t.me/Studentsjusticeunion

Repost from N/a
वादळापूर्वी नेहमीच शांतता असते ....🔥 महाराष्ट्र नागरी सेवा (संयुक्त) परीक्षा 2024 पुन्हा... 😉