ru
Feedback
अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर कोल्हापूर

अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर कोल्हापूर

Открыть в Telegram

कोल्हापूर महालक्ष्मी माताचे नित्य दर्शन

Больше
2 266
Подписчики
-124 часа
-77 дней
-2130 день
Архив постов
🌺 ll नारायणी ll 🌺 HD And Full screen
🌺 ll नारायणी ll 🌺 HD And Full screen

🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज अधिक ज्येष्ठ शुक्लपक्ष एकादशी पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५२, बुधवार, दि.
🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज अधिक ज्येष्ठ शुक्लपक्ष एकादशी पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४८, शिवशके_३५२, बुधवार, दि.२७ मे २०२६ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे काकडारती व सुप्रभात पूजा सर्वमंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थसाधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि | नारायणि नमो§स्तुते || श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर, कोल्हापूर "करवीरनगरी" 🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺 🌻🚩 आज कमला एकादशी व्रत 🚩🌻

करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी)

🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज वैशाख शुक्लपक्ष द्वितीया रोजी पराभवनाम विक्रम_संवत_२०८३, शालिवाहन शके १९४७, शिवशके_३५२, रविवार, दि.१९_मार्च_२०२६ रोजी करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीची बांधण्यात आलेली नित्य महालंकार महापूजा... सर्वमंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थसाधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि | नारायणि नमोस्तुते || श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर, कोल्हापूर "करवीर_नगरी"       आई अंबाबाईचा उदो उदो 🦚🪔🪔🪔🪻🙏🪻🪔🪔🪔🦚 💰🪙 अक्षय्य तृतीया 🪙💰 महात्मा बसवेश्वर जयंती भगवान श्री परशुराम जयंती

🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज वैशाख शुक्लपक्ष द्वितीया पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४७, शिवशके_३५२, रविवार, दि.१९ एप
🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज वैशाख शुक्लपक्ष द्वितीया पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४७, शिवशके_३५२, रविवार, दि.१९ एप्रिल २०२६ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे काकडारती व सुप्रभात पूजा सर्वमंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थसाधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि | नारायणि नमो§स्तुते || श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर, कोल्हापूर "करवीरनगरी" 🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺 💰🪙 अक्षय्य तृतीया 🪙💰 महात्मा बसवेश्वर जयंती भगवान श्री परशुराम जयंती

अक्षय्य तृतीया निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
अक्षय्य तृतीया निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा

𖣔॥*श्री महालक्ष्मी प्रसन्न॥𖣔 ❂!! अक्षय्य तृतीया !!❂ सर्व हिंदूना अक्षय्य तृतीया निमित्त मंगलमय शुभेच्छा !! •✥!! अक्षय्य तृतीया (वैशाख शुद्ध तृतीया) हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. 'अक्षय्य' म्हणजे ज्याचा कधीही क्षय (ऱ्हास) होत नाही, असा दिवस. या दिवशी केलेले दान, पूजा आणि शुभ कार्य (उदा. सोने खरेदी) दीर्घकाळ सुख-समृद्धी देतात, अशी श्रद्धा आहे. !!✥• !! अक्षय्य तृतीया साजरी करण्याची मुख्य कारणे !! !! समृद्धी आणि नवीन सुरुवात !! या दिवशी केलेल्या खरेदी किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात चिरकाल टिकणारी व वाढणारी असते, असे मानले जाते.!! ✦!! भगवान परशुराम जयंती !!✦ या तिथीला भगवान विष्णूचा सहावा अवतार, भगवान परशुराम यांचा जन्मदिवस मानला जातो.!! ✦!! महाभारताशी संबंध !!✦ पांडवांना वनवासात असताना श्रीकृष्णाने 'अक्षय्य पात्र' याच दिवशी दिले होते, ज्यातून कधीही न संपणारे अन्न मिळत असे. ✦!!वेद व्यास आणि गणपती!!✦ या पवित्र तिथीलाच महर्षी व्यासांनी महाभारताची रचना करण्यास सुरुवात केली होती आणि गणपतीने ती लिहिली होती.!! ✦!! गंगावतरण !!✦ मान्यता आहे की याच दिवशी गंगा नदी पृथ्वीवर अवतरली होती.!! ✦!! अक्षय्य फल!!✦ या दिवशी केलेले दान आणि पितृ तर्पण अक्षय्य (अविनाशी) फल देते.!! थोडक्यात, सुख, समृद्धी, नवीन खरेदी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. •✦✿॥करवीर निवासिनी आई अंबाबाईचा उदो उदो॥✿✦• ┅═══◉❁✿☬✿❁◉═══┅

🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज चैत्र कृष्णपक्ष पंचमी पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४७, शिवशके_३५२, मंगळवार, दि.०७ एप्र
🙏🌺 !! अंबामाता उदो उदो !! 🌺🙏 आज चैत्र कृष्णपक्ष पंचमी पराभवनाम संवत्सर शालिवाहन शके १९४७, शिवशके_३५२, मंगळवार, दि.०७ एप्रिल २०२६ करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) देवीचे काकडारती व सुप्रभात पूजा सर्वमंगल मांगल्ये | शिवे सर्वार्थसाधिके || शरण्ये त्र्यंबके गौरि | नारायणि नमो§स्तुते || श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर, कोल्हापूर "करवीरनगरी" 🌺🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺

श्री अंबाबाई (महालक्ष्मी ) रथोत्सव २०२६ ( चैत्र पौर्णिमा)

श्री अंबाबाई (महालक्ष्मी ) रथोत्सव २०२६ ( चैत्र पौर्णिमा ) जगदंबेचा रथोत्सव म्हणजे फक्त एक धार्मिक समारंभ नसतो तर तो कोल्हापूरच्या सगळ्या संस्कृतीची एक झलकच असतो. संध्याकाळी चार वाजले की हळूहळू महाद्वार रस्ता गुजरी भावसिंगजी रस्ता भवानी मंडप म ल ग हायस्कूल, मिरजकर तिकटी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग ( नूतन मराठी विद्यालय ते बिनखांबी गणपती मंदिर) महाद्वार रस्ता हा सगळा मार्ग लोक स्वयंस्फूर्तीने बंद करतात, आपापल्या परीने सडा घालून पाणी मारून स्वच्छ करून घेतात आणि हा सगळा मार्ग क्षणात अनेक रंगावलीकारांच्या कॅनव्हास च रूप घेतो. जसं जसा अंधार पडू लागतो तसा विद्युत रोषणाई ने सगळा परिसर उजळून निघतो. सुंदर सजवलेला आणि एरव्ही रामाच्या पाराजवळ असलेला रथ ( यंदा जुना रथ जीर्ण झाल्याने नव्या सागवानी लाकडात घडवलेला सुंदर रथ तयार केला आहे नुकताच तो जगदंबा चरणी अर्पण करण्यात आला) आणून महाद्वारावर उभा केला जातो. एकीकडे रथाची सजावट सुरू होते तर दुसरीकडे रथोत्सवाचा मार्ग रांगोळ्यांनी सजलेला असतो ते बघायला भाविकांची दाटी होते. आठच्या सुमाराला चोपदारांची ललकारी होऊन सनई ताशांच्या निनादात श्रीपूजक अंबाबाई ला रथावर घेऊन येतात. तिच्या पाठोपाठ हवालदार खांडेकर जाप्त्यावरचे पारंपरिक दागिने घेऊन हजर होतात. मग सुरू होतो त्रिभुवन सुंदरी चा शृंगार . दृष्ट लागण्यासारखं रूप पूजारी आपल्या हाताने साकारतात. एव्हाना नऊ वाजत आलेले असतात. भक्तांच्या घरच्या आरत्या यायला सुरुवात होते. पुजारी आरती ओवाळून प्रसाद देतात. आता रथाचे जू धरून भाविक विशेषतः युवा वर्ग उभा असतो. इतक्यात साडे नऊ ला तोफेची सलामी होते आणि नवकोट नारायणी. श्रीमहालक्ष्मी अशी चोपदारांची ललकारी घुमते आणि रथ चालू लागतो. गुलालाची उधळण अंबामाता की जय चा घोष अखंड सुरू होतो. या रथाला जिथे भाविक विनंती करतात तिथे थांबून भाविकांची आरती स्विकारली जाते. हळूहळू रथ पुढे सरकतो तशी आतषबाजी रोषणाई आसमंत उजळून टाकत असते. वाद्यांचा निनाद, स्तोत्रांचे स्वर धुपाचा दरवळ वातावरण भारून टाकतो . गुजरी कॉर्नर च्या चौकातून रथ अलगद गुजरीत वळवला जातो. संपन्न नगरीतून वैभवाची देवता आशिर्वादाची खैरात करत निघते. पुन्हा भावसिंगजी रस्त्याला रथ येतो आता जगदंबे च नवं रूप समोर येतं एका सार्वभौम राज्य स्थापन करणाऱ्या छत्रपतींच्या राजधानीची शौर्यशाली वैभवशाली नगरदेवता! रथ नगारखाना ओलांडून भवानी मंडपात येतो . महाराज छत्रपतींचा चोपदार महाराजांच्या नावाची ललकारी देतो पाठोपाठ हुजूरस्वारीच आगमन होतं . महाराज देवीचं पंचोपचार पूजन करतात आरती होते. आणि पुन्हा ललकारी होऊन रथ मार्गस्थ होतो . आता म.ल.ग हायस्कूल बालगोपाल तालिम मिरजकर तिकटी मार्गे रथ नूतन मराठी शाळेसमोर येतो. पाठकांच्या घरासमोर रथ येताच चोपदार रोषणनाईक रथावरुन उतरतात आणि रंकोबाच्या देवळात जातात. इथ रंकभैरव कोल्हापूर चा कोतवाल जणू अंबाबाई च्या निरोपाचीच वाट बघत सदरेवर बसलेला असतो. महालक्ष्मी च्या चोपदारांनी ललकारी देताच रंकोबा आपल्या देवळात जातो. पुन्हा दर्शन करून हा लवाजमा बिनखांबी गणपती कडे जातो तिथही अशीच पंचोपचार पूजा ललकारी होऊन चोपदार रथावर येतात. आता रथ महाद्वारावर आणला जातो. मध्यरात्र होते पण उत्साह तोच असतो. वांगी बोळाचा कोपरा ओलांडताच रथाला वेग येतो. आणि त्याच गतीत रथाचे जू महाद्वारासमोर ठेवले जातात. कदम घराण्यातील स्त्रीया पारंपारिक मानाप्रमाणे दृष्ट काढतात. एव्हाना श्रीपूजक पालखी घेऊन येतात. रथावरून उतरलेली महालक्ष्मी(अंबाबाई)पालखीत बसते. एवढ्या रात्री दिपमाळा उजळलेल्या असतात. परंपरेप्रमाणे अगस्तींच्या दिपमाळेला प्रदक्षिणा करून सात टप्प्यांवर गायन सेवा घेऊन अंबाबाई सदरेवर येते. भक्तांना आशिर्वाद देते तोफेची सलामी होताच मंदिरात जायला निघते. पालखी बालदत्ताजवळ क्षणभर थांबते नैवेद्याच्या पूर्ण पानानं देवीची ओवाळणी होते आणि आई गाभाऱ्यात जाते कापूरारती शंखतीर्थ होऊन सोहळा संपतो तो मनामधे या रथोत्सवाच्या स्मृती ठेवूनच मातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीक

रघुकुल शिरोमणि भगवान श्री राम.. मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम जन्मोत्सव सोहळा अर्थात श्री राम नवमी निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा

करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिरातील गुढीपाडवा.. गुरुवार, दि.१९ मार्च २०२६ श्री करवीर निवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिर कोल्हापूर गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा

गुढी पाडवा व हिंदू नववर्ष निमित्त सर्व हिंदू बंधु भगिनींना मंगलमय शुभेच्छा..!! चैत्र शुद्ध प्रतिपदा शालिवाहन शके १९४८ प्रारंभ आज भगवान श्री राम व देवी चैत्र नवरात्र उत्सव प्रारंभ

धर्मवीर बलिदान मास पुष्प सत्तावीस आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी लिखित श्लोक होत्या अनंत आपदा, जरी भोवताली | संभाजी धर्म जगले, रणी धैर्यशाली || संदेश भीती कधींना, शिवली मनाला | जगदंब आशिष तसा, तव दे आम्हांला || श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 🚩