ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Interview

MPSC Interview

Открыть в Telegram

या चँनेल वरती आयोगाने घेतलेल्या सर्व परीक्षांच्या मुलाखतींच्या transcript उपलब्ध आहेत.मुलाखतीच्या तयारीस एक दिशा मिळावी इतकाच हेतु. - अभिजीत हजारे ( ना. तहसीलदार )

Больше
7 289
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
photo content
+9

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

photo content
+1

* MPSC MAINS 2020 : SELF STUDY PLAN * वरील नियोजन हे उदाहरण म्हणून दिले आहे ..तुम्ही त्यात तुमच्या priority नुसार बदल करावा . * वरील नियोजनातील part I हा 40 - 45 दिवस रोज study plan मध्ये असेल ..part II मध्ये विषय बदलत जातील फक्त .. * schedule explain करण्यासाठी मी एक 15 मिन voice chat आज दुपारी 2 वाजता @mpscdecoded या telegram वर घेईल Voice chat @ 2pm (today ) On @mpscdecoded telegram channel - Rupesh Jadhav

photo content

✅ राज्यसेवा मुख्य - 2020 ✅ MPSC MAINS - GS II & III REVISION BATCH वैशिष्ट्ये : * GS II & III चे Topic by Topic , Daily Revision * सातत्य आणि output वर आधारित 100 + गुण मिळवण्याची शाश्वती * Conceptual Clarity आणि आवश्यक fact /आकडेवारी lecture मधेच पाठ करून घेण्यावर भर * शेवटच्या दिवसात Revision करण्यासाठी topicwise micronotes दिल्या जातील . * घटकांचे weekly revision session * या बरोबरच खालील गोष्टींवर भर दिला जाईल - PYQ मधील सर्व facts - topic wise इतर पुस्तकातून value addition - विषयानुसार आवश्यक चालू घडामोडी कालावधी - 40 - 45 days रोज : 1 - 1 तासाचे 2 lecture 14 सप्टेंबर पासून सुरुवात Fees - 2200 - new students - 1800 - swayam students ➡️ By रुपेश जाधव * राज्यसेवा मुख्य 2018 - GS II - 117 गुण प्राप्त * GS - III - 4 year Teaching Experience ✅✅ 🥇Polity part 2 (कायदे ) यातील तुमचा एकही मार्क जाणार नाही 🥇या विषयाला तयारीत वेगळा वेळ देण्याची गरज पडणार नाही

Let's understand .... * How to Decode Syllabus * Trusted book References * To The Point Preparation Through PYQ Analysis * Logic Behind - Solving Difficult Questions * How To Predict Questions on Syllabus Topics * Exam Hour's Planning & Mindset .... By Topper's 💡GS IV - ECONOMICS * प्रसाद चौगुले सर उपजिल्हाधिकारी (महाराष्ट्रात प्रथम - 2019) * अजिंक्य खरात सर उपशिक्षणाधिकारी (GS - IV,100 गुण -2018) 💡GS II : POLITY * समाधान घुटुकडे सर उपजिल्हाधिकारी (GS - II,114 गुण - 2019) * रुपेश जाधव सर राज्यसेवा मुलाखत (GS - II,117 गुण - 2018) 📲 Contact : 9049279221/ 9011112026 📱msg @shreejadhav15 @MRahulkumar

MPSC PLUS app तुम्हाला या अँप वर काय काय मिळेल ? ^ 2012 ते 2020 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव ^
MPSC PLUS app तुम्हाला या अँप वर काय काय मिळेल ? ^ 2012 ते 2020 पर्यंत आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नांचा पुन्हा पुन्हा सराव ^ आयोगाच्या मागील सर्व प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात ^ दररोज combined आणि राज्यसेवा परीक्षेसाठी सराव टेस्ट ^ प्रत्येक विषयातील toppers चे मार्गदर्शन व्हिडिओ पहाता येतील ^ दररोज च्या परिक्षाभीमुख चालू घडामोडी अँप ची लिंक : https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus

🟡 राज्यसेवा mains चे सर्व प्रश्न ( मराठी आणि इंग्रजीत) सोडवण्यासाठी आजच download करा Practice ! Practice !! Practice !!! ...........download करा........ https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus दररोज परिक्षाभीमूक प्रश्न सोडवण्यासाठी जॉईन करा Join @mpscdecoded

MPSC PLUS APP महाराष्ट्रातील एकमेव practice अँप MPSC/ PSI / STI / ASO साठी खूप महत्त्वाचे : 🌕 MPSC MAINS प्रश्न आणि राज्यसेवा ,PSI , STI, ASO पूर्व परीक्षा संबंध !!! ❇️ राज्यसेवा मुख्य चा आवाका खूप मोठा आहे तसेच त्यातील प्रत्येक घटकावर आयोगाने मागील 8 वर्ष्यात खूप सारे प्रश्न विचारले आहेत.त्यामुळे पूर्व परीक्षेला  त्या TOPIC वर येणारा प्रश्न mains मधील  प्रश्नातूनच येण्याची शक्यता जास्त असते .  🏆 राज्यसेवा मुख्य परीक्षेत असे बरेच टॉपिक आहेत ज्यावर पूर्व परीक्षेला नेहमी प्रश्न येतात . ⭐️ अश्या सगळ्या टॉपिक वरील प्रश्न तुम्हाला सोडवता यावेत आणि तुमचा score वाढायला मदत व्हावी म्हणून MPSC PLUS अँप 10 दिवसासाठी FREE करण्यात आले आहे . 🥇🥇 आजच download करा आणि त्यावरील घटकानुसार सर्व प्रश्न सोडवा अँप download करण्यासाठी link https://play.google.com/store/apps/details?id=com.prarup.mpscplus दहा दिवसांसाठी सर्वांना free / मोफत access देत आहोत..जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्न पाहायला आणि सोडवायला भेटतील..... 🏅 Free access for 10 days 🏅 🥁 तुमच्या सर्व mpsc /PSI / STI / ASO करणाऱ्या गरजू सहकाऱ्यांना हा msg नक्की forword करा .. धन्यवाद .... 🙏भरपूर सराव करा 🙏

म करायला सुरुवात केली. त्याची सुरुवात बोथा गावापासून झाली बोथ्रा गांव जंगलाच्या एकदम टोकावर असलेलं एक छोटास गाव; मोलमजुरी व शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेल गाव. 2019 पाणी फाउंडेशन च्या वॉटर कप स्पर्धेमध्ये मृदा व जलसंधारणाच्या बाबतीतील वाटर कप स्पर्धेमध्ये या गावाला सहभागी होण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि पाणी फाउंडेशन च्या पूर्ण टीमने प्रेरीत केले. आम्ही सर्व आदिवासी बांधवांन सोबत एक होऊन जात एक नवा जोश लोकांमध्ये भरला आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपवला त्याशिवाय सौर दिवे, सौर संच, शोषखड्डे, गावाच्या तलावातील गाळ काढणे आणि गावाला वॉटर कप स्पर्धेमध्ये अव्वल आणण्यासाठी आमच्या पूर्ण टीमने गावकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून एक दिलाने श्रमदान केले त्याचा परिपाक म्हणून या गावाचा तालुक्यातून पहिला क्रमांक आला आणि पंधरा लाख रुपयाचे पारितोषिक या गावाने पटकावले. गावकऱ्यांचा पुण्याला पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला त्यावेळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा परिक्षेत्रातील टीमने केलेल्या सहकार्याचा उल्लेख करण्यात आला पंचक्रोशीत आनंदाचं वातावरण निर्माण झालं . हे यश मला अधिकच ऊर्जा व स्पुरन देऊन गेलं. 2017 व 2018 मध्ये या गावाच्या जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं दिसून आलं होतं परंतु 2019मध्ये हे प्रमाण वन विभागाच्या आणि गावकऱ्यांच्या सहकार्याच्या भावनेमुळे अतिशय कमी प्रमाणावर येऊन थांबले. 2019 व 2020 मध्ये उर्वरित गावात देखील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्री रेड्डी सर आणि गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक श्री विनोद शिवकुमार सर यांच्या मार्गदर्शनात ढाकणा परिक्षेत्राच्या टीमने अशीच लोकाभिमुख कामे केली त्यामुळे लोकांचे आम्हाला मोठ्या प्रमाणावर सहकार्य लाभण्यास सुरुवात झाली. गावातील अपप्रवृत्ती चे लोक काही अवैध करायला जात त्याबाबत त्याच गावातील लोक आम्हास पूर्वसूचना देऊ लागले त्यामुळे बर्याच अवैध बाबिंना आम्हाला आळा घालता आला. 2020 या वर्षात ज्या गावाच्या हद्दीतील जंगलांना आग लागणार नाही त्या गावांना रुपये 10000 पहिला टप्पा व रुपये 15000 दुसरा टप्पा अनुक्रमे 15 एप्रिल व 15 जूनला देण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने बक्षीस निधीतून गावातील अति महत्त्वाची व आवश्यक कामे करून उर्वरित निधीतून एलपीजी गॅस वितरण करण्याचे लोक चर्चेतून ठरवले त्या अनुषंगाने सन 2020 मधील वर हंगामात वनपरिक्षेत्रातील आग जी की 2017 मध्ये 1007.8 हेक्टर, 2018 मध्ये 704.2 हेक्टर, 2019 मध्ये 516 हेक्टर होती ती 2020 मध्ये 8.46 हेक्टरवर आली या आगी मधील घटना ह्या शेतातील काडीकचरा जाळतांना लागल्या होत्या. स्थानिकांच्या साहाय्याने व प्रशिक्षित आग रक्षकांनी ही आग अगदी कमी वेळेत आटोक्यात आणली विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागली त्यांना गावातील लोकांनी पंचायत बसून ठणकावले व इतरांना देखील अशी आग लागणार नाही याबाबत काळजी घेण्याचे सांगितले अन्यथा गावस्तरावर कारवाईचा इशारा दिला. हा सामाजिक दबावच आम्ही तीन वर्षापूर्वी सुरुवात केलेल्या लोकसहभागातून वनसंरक्षण व वनसंवर्धन या ध्येयाचा यशस्वी परिपाक म्हणावा लागेल. काय योगायोग आहे बघा ना आज विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी गडगाभांडुम गावात जेव्हा एलपीजी वितरण केले तेव्हा साधारण 65-70 वर्षाची एक आजी अगदी आनंदाने आणि भरल्या डोळ्यांनी बोलू लागली की आयुष्यात पहिल्यांदाच चुलीच्या त्या असह्य आणि दाहक काळ्या धुक्यावर विजय मिळवून आज त्या आजी स्वच्छ LPG गॅस घरात प्रज्वलित करणार होत्या. हा केवळ गॅस नसून प्रतीक आहे आजच्या विजयादशमीच्या दिवशी वनसंरक्षणाचे व वनसंवर्धनाचे सिमोलंघनच त्या 227 कुटुंबातील (भांडुम-42, दाभिया-18, बोथ्रा-40, सावर्या-20, डोलार-32, बोरिखेडा-10, ढाकणा-32 आणि गडगाभांडुम-33 ह्या वर्षी एकुण 227 वाटप केलेले LPG) महिलांच्या डोळ्यातील आनंदांचे, लहानग्यांच्या स्वच्छ श्वासांचे, त्या काजळी युक्त धुरांच्या लोळापासुन मुक्तीचं, आरोग्याचं, सुखाचं, समृद्धीचं, तिमिराकडून तेजाचं येणार्या दसरा-दिवाळी साठी माझ्या आदिवासी बांधवांना आनंदाची आणि आरोग्यदायी जाईल आणि त्यात माझ्या वनविभागाचा मुंगी एवढा का होईना वाटा असेल यापेक्षा हॅपी दसरा आणि दिवाळी ती कोणती? हिरालाल रमेश चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ढाकणा.👣🐾 Join us @mpscdecoded

ना मोठा आघात पोहोचला आहे. सध्या कोरोणाच्या काळात आपण सर्वांनी जाणलं असेलच की आपली फुफ्फुसे स्वस्थ तर आपण सुरक्षित अन्यथा ऑक्सिजनची कृत्रिम कितीही सिलेंडर लावून पण वेदनादायी मृत्यूला हरवणे अवघड होऊ शकते. त्यामुळे पर्यावरणाची हानी करणार्या वनवणव्यांच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करण्याचं मी ठरवलं. याचा अभ्यास करत असताना मला हे लक्षात आलं वणव्यांच व्यवस्थापन करत असताना स्थानिक लोकांना वनसंरक्षण व वनसंवर्धन मोहीमेत आपण जोपर्यंत सहभागी करून घेत नाही तोपर्यंत आपल्या प्रयत्नांना यश मिळणं अवघड आणि त्रासदायक सुद्धा आहे त्यामुळे स्थानिक चांगल्या लोकांच सहकार्य मिळेनं अतिशय मोलाच व मार्गदर्शक ठरू शकत, कारण जेव्हा वन विभाग अवैध बाबी रोखण्यासाठी काम करत असतात त्यावेळी काही अपप्रवृत्ती चे व गुन्हेगारी वृत्तीचे लोक वनविभागाला त्रास देण्याच्या हेतूने आणि वरील उल्लेखित अवैध बाबी करण्याच्या उद्देशाने जंगलांना विविध ठिकाणी हेतुपुरस्कर आग लावतात ज्यामुळे जंगलांचं व तेथील निसर्गसंपदेची आतोनात हानी होते. सन 2018 सालची आग मला खूप काही शिकवून गेली. त्यावर्षी लागलेले वणवे विजवण्यासाठी माझे वरिष्ठ अधिकारी, मी ,माझे क्षेत्रीय कर्मचारी, आग रक्षक दल हे गेलो असता त्या भयंकर आगीच्या ज्वाळा गवताची मोठमोठी कुरणे, महाकाय झाडे जळताना, पशु-पक्षी, प्राणी, कीटक, सरपटणारे जीव यांना तडफडताना व मरणयातना भोगत असताना आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना पाहिले आहेत. शक्य ते जंगलक्षेत्र व तेथील वन्यजीव वाचवण्याचा आम्ही आतोनात प्रयत्न केला परंतु आगीमध्ये बरच काही भस्मसात झालं. ते आगीचे लोळ आज ही डोळ्यासमोर आले की हृदय कोरडंखाट पडतं ते निसर्ग संपत्तीच बेचिराख होण बुद्धीला आणि मनाला बधीर करून जात. 46℃- 47℃ अंशाच्या रणरणत्या प्रखर उन्हात जंगलातल्या आगीपर्यंत डोंगर-दऱ्या चढून आठ-दहा किलोमीटरची केलेली पायपीट आणि त्या आगी वर पोहोचल्यावर आपल्या कवेत घेऊ पाहणार्या त्या अक्राळविक्राळ आगीच्या लाटांना विझवण्याचा आमचा प्रयत्न सुरू व्हायचा. कधी सरसर् जळणार गवत क्षणार्धात वाऱ्यासोबत आम्हाला गाठायचं तर कुठे बांबूच्या रांज्याचे फटाफट् फुटणारे आवाज तर कुठे महाकाय वृक्षांनी त्याआगी समोर सपशेल टेकलेले गुडघे आणि आगीतुन आकांताने टाहो फोडणारे प्राणी-पक्षी; खूप विदारक आणि सून्न करणार चित्र. माणसाने स्वतः आपल्या विनाशाला दिलेले हे आमंत्रणच म्हणा हव तर. हे वणवे सुंदर अशा या जंगलांना आणि त्याच्या निसर्गसौंदर्याला अतिशय निष्ठुरतेने विद्रूप, कुरूप आणि बेचिराख करून ठेवतात. बऱ्याच माझ्या मित्रांना किंबहुना जंगलाच्या बाहेरील लोकांना आमची नदी-नाल्यांना मधील व व हिरव्यागार वनराईने मधील फोटो बघून वाटत काय मजेशिर नोकरी आहे. बरेच महाशय म्हणतात 'Forest Service' म्हणजे "For Rest" असं वाटतं परंतु मित्रांनो अशा जंगलातल्या एखाद्या आगीवर येऊन आग विझविण्यच काम एकदा कराच म्हणजे कळेल वन वणवा काय असतो. विना पाणी, जेवण कधीकधी दोन-दोन तीन-तीन दिवस जंगलात भर उन्हात त्या मरणासन्न आगिच्या ज्वाळांचा दाह सहन करत जेव्हा आग विझव्हावी लागते तेव्हा असं वाटतं की शरीरातल सगळं पाणी कोणीतरी शोषून घेतले आहे, आतड्यांना डझनभर गाठी मारल्या आहेत, पायांचे चालून-चालून दगड झाले आहेत, थेंब-थेंब पिवळीधम्मक होणारी दहापूर्ण ती.... समजून घ्या मी काय म्हणतोय आणि तेव्हाच मी ठरवलं हे सगळं थांबायला हवं. लोकसहभाग, प्रभावी क्षेत्रीय दिवसाची आणि रात्रीची गस्त, सॅटेलाईट मॅप आणि क्षेत्र संचालक कार्यालयाकडून कार्यान्वित फायर अलर्ट या तंत्रज्ञान याचा प्रभावी वापर, आगीवर पोहोचण्यासाठी चे रस्ते, प्रशिक्षित क्षेत्रीय कर्मचारी व आगरक्षक, वणवे विझवण्यासाठी आवश्यक सर्व साहित्य व सामग्री आणि आग लागल्यानंतर ती विजवण्यासाठीचा रिस्पॉन्स टाईम ही माझी फॉरेस्ट फायर थांबवण्यासाठीची प्रमुख आयुधं मी ठरवली होती आणि त्या अनुषंगाने तयारी देखील केली. लोकसभागा व्यतिरिक्त इतर सर्व बाबी या वन विभागाच्या प्रत्यक्ष नियंत्रणातील होत्या त्यामुळे त्यांचा योग्य व नियोजनपूर्वक वापर हा वणवे थांबवण्यासाठी मोलाचा ठरणार होता. दुसर्या बाजूला लोक सहकार्य व स्थानिकांची मदत हा घटक अप्रत्यक्ष नियंत्रणातील परंतु सर्वात महत्वाचा घटक असल्याचं मला जाणवलं त्या अनुषंगाने मी विश्लेषण करायला सुरुवात केली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना ही माझ्यासाठी या लोकसहभागाचे कुलूप उघडण्याची जादूची किल्ली ठरली. नावातच जन-वन विकास म्हणजेच लोकसहभाग व सहकार्याने वनसंवर्धन व वनसंरक्षण हे या योजनेमागचे मूळ ध्येय व उद्देश. याला अनुसरूनच ढाकणा परिक्षेत्रातील माझ्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार ढाकणा, सावर्या, भांडुम, दाभिया, बोरीखेडा, गडगाभांडुम व बोथ्रा या गावातील स्थानिक लोकांना विश्वासात घेत का

#वनसंरक्षण_वनसंवर्धनाचे_सीमोल्लंघन!🐾👣 आज सकाळी श्री. योगेश जावरकर वनरक्षक बोरीखेडा यांचा फोन आला ते मला म्हटले सर आज गडगाभांडुम गावात आपल्याला डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंतर्गत 33 LPG गॅस वाटप करायचे आहेत, मी म्हटलो ठीक आहे. त्या अनुषंगाने मी अकरा वाजता गडगाभांडुम गावात पोहोचलो गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पारावर गावातील वरिष्ठ मंडळी, लेकरं आणि महिला जमल्या होत्या. समोरच एलपीजी गॅस च्या टाक्या, शेगडी आणि इतर साहित्य ठेवलेलं होतं. सर्व लोक उत्साहात आणि आनंदात दिसत होते. यावर्षी ज्या गावातील जंगल क्षेत्रात 'वनवणवा' म्हणजेच 'फॉरेस्ट फायर' (Forest Fire) लागणार नाही त्या गावासाठी रुपये पंचवीस हजाराचे बक्षीस जाहीर केले होते त्या बक्षीस रकमेतून आणि डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या समितीमधिल रकमेच्या साह्याने सदर एलपीजी वितरण करण्यात येणार होते याचा अर्थ 'जंगलात आग पेटली नाही म्हणून घरात आज गॅस पेटणार होता'. काय योगायोग आहे बघा ना आज दसरा म्हणजे विजयादशमीचा दिवस चांगुलपणाचा वाईटावर विजय, सकारात्मक शक्तींचा अपप्रवृत्तींवर विजय आजचे सीमोल्लंघन काही खास आणि औरस होतं हे सीमोल्लंघन होतं वनसंरक्षणाचं, वनसंवर्धनाचं, लोकसहभागाचं, आरोग्याचं, सुखाचं, समृद्धीचं चैतन्याचं, आनंदाचं. पण हे काही एवढं सहजासहजी झालेल नाही हा. मला अजूनही आठवतंय वनपरिक्षेत्र अधिकाऱी पदाच प्रशिक्षण पूर्ण करून माझ्या प्रथम नियुक्ती जानेवारी 2018 मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा वन परिक्षेत्रात झाली होती, तेव्हा सर्वत्र आगरेषा कापणे-जाळणे (फायर लाईन जलाई कटाई) चे कामे सुरू होती. जंगलांमध्ये जे वनवे लागतात ते रोखण्यासाठी जलाई कटाई हा एक प्रतिबंधात्मक उपाय वन व्यवस्थापनाचा भाग म्हणून दरवर्षी साधारण जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत युद्ध पातळीवर चालू असतो, कारण 15 फेब्रुवारी ते 15 जून हा आग हंगाम सुरू होणार असतो याला आम्ही 'फायर सीजन' म्हणतो. फायर सीजन मध्ये सर्वच वनयोद्धे त्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना पासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच अतिशय अलर्ट असतात आणि यावेळेस मोठी सुट्टी देखील नाकारली जाते. वनपरिक्षेत्र अधिकारी पदाच प्रशिक्षण सुरू असताना वनवणव्यांन बद्दल परीक्षेच्या दृष्टीने तेवढा अभ्यास केला होता परंतु प्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्याची माझी ही पहीलीच वेळ होती. कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर लगेच पंधरा दिवसांनी म्हणजे 5 फेब्रुवारी 2018 ला माझं लग्न असल्याने मी महिनाभराच्या अर्जित रजेचा अर्ज उपवनसंरक्षक श्री विनोद शिवकुमार सरांकडे घेऊन गेलो मला वाटलं स्वतःचं लग्न आहे त्यामुळे सुट्टी हमखास मिळेल परंतु माझा एक महिन्याच्या सुट्टीचा अर्ज बघून शिवकुमार सर संतापले आणि मला खडसावत म्हणाले, "आपको मालूम नही क्या फायर सिझन शुरू होने वाला है, अभी कैसे शादी निकाला आपने?" शिवकुमार सर अतिशय कडक शिस्तीचे व हाडाचे जंगल प्रेमी त्यामुळे त्यांचा राग स्वाभाविक होता. मी म्हटलं, "सर शादी की तारीख पोस्टींग मिलने से पहिले ही फिक्स हो गई थी." मग ते थोडे शांत झाले आणि म्हटले, "15 दिन की छुट्टी मिलेगी." मी आधिच थोडा घाबरलेलो होतो त्यांच्याकडे बघून हळूच मान डोलवत हो म्हटलं आणि केबिनच्या बाहेर आलो, तेव्हा मला कळलं होतं की फायर सीजन ही वन विभागातील अतिशय महत्त्वाची व अतिशय 'Seriously' घेण्याची बाब आहे. मी पंधरा दिवसांनी सुट्टी संपून आलो तोपर्यंत जलाई कटाईच काम अलमोस्ट संपलं होतं. ब्लोअर मशीन, गाड्यांची दुरुस्ती, पाणीचे केन, पेट्रोलचे कॅन, वनवणवा विझवण्यासाठी आवश्यक साहित्यची अंगारी मजूर जुळवाजुळव व साफसफाई करत होते. 2018 मध्ये ढाकणा येथे विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे (STPF) वनपरिक्षेत्र अधिकारी श्री गणेश गिरी साहेब यांचा हा तिसरा अंगार सिझन होता त्यामुळे वनववणवा व त्याच्या व्यवस्थापनाबाबत त्यांना चांगली माहिती होती. वनवणव्या बाबत व त्याच्या व्यवस्थापणा बाबत मी गिरी सरांकडून बऱ्याच बारीक-सारीक बाबी जाणून घेतल्या आणि त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. संपूर्ण जगातील वन विभागानं समोर अवैध वृक्षतोड, शिकार , बेसुमार वनचराई, वनजमिनीवरील अतिक्रमण, अवैध व चुकीच्या पद्धतीने वनौपज गोळा करणे याबरोबरच वनवणवा ही एक प्रमुख आणि अतिशय गंभीर समस्या आहे.जंगलातील वणवे हे 99% मानवनिर्मित असतात. आपण सर्व जाणताच गेल्या काही वर्षात अमेझॉनच्या जंगलातील आग, ऑस्ट्रेलियातील जंगलातील भीषण आग, उत्तराखंडच्या जंगलातील आग आणि जगाच्या इतर विविध क्षेत्राततील जंगलांना मोठ्या प्रमाणावर आगी लागल्या आहेत व त्यात असंख्य जीवजंतू, प्राणी, पक्षी, किटक, झाडेझुडपे आणि इतर विविध निसर्गसंपदा ही विपुल प्रमाणात भस्मसात झाली आहे. त्यामुळे ह्या वनवणव्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र कमी होत असल्याने पृथ्वीची ही जी फुफ्फुसे आहेत त्यां

@mpscdecoded 💁‍♀ फक्त परिक्षाभिमुख माहिती व प्रश्नांच्या सरावासाठी असलेले बेस्ट टेलिग्राम चॅनेल 💁‍♂ दररोज 40 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव व स्पष्टीकरण ( सध्या 1500+ प्रश्न उपलब्ध) 👮‍♀ आयोगाच्या परीक्षांसंदर्भात महत्वपुर्ण माहिती तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी जीएस आणि सीसँट साठी विविध अधिकाऱ्यांच्या स्ट्रेटेजी चँनेल वर उपलब्ध. Join us @mpscdecoded Please forward this message to your friends and ask them to join this channel.

SHANTANU SONAWANE BE PRODUCTION PANEL - GAVAI SIR What knowledge u get in production engg Use of 6 sigma in afforestation .. explain with example What about ur final year project ( Minute minute question) Gavai sirs question completed M2 Again explain ur project How to find age of diff tree .. How to find volume of tree( sir gave me bisllery bottle and asked suppose it is log ..now find it🙄 Which org calculate forest area Technology to calculate forest area Carbon sinks in forest 3 Woods used as a timber Woods used for making PAPER commercialy State animal of Maha🙈🙈 Trees in Himalaya Forest cover tree cover -- v. Detail