cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

PSI MAINS ONLY

या चॅनेलवर PSI मुख्य परीक्षा oriented साहित्य दिले जाते. आतापर्यंत 1900+ प्रश्न upload केलेले आहेत. मुलाखतीला उपयुक्त साहित्यसुद्धा चॅनेलवर आहे. आपले YouTube channel 👇👇 https://youtube.com/channel/UC-8ovaz6CxJGSJdyTXm6zXg

Больше
Рекламные посты
8 497
Подписчики
-824 часа
-737 дней
-20130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

ही पोस्ट टाकण्याचा उद्देश एवढाच की परीक्षा तोंडावर आलेली असताना अश्या बातम्या येतात आणि नाही म्हंटल तरी कुठे ना कुठे आपल्या शेवटच्या दिवसांतील अभ्यासाची गती कमी पडते.अर्थात हे सर्व जण आपल्या चांगल्या साठीच प्रयत्न करत आहेत.परीक्षेनंतर चा होणारा अभूतपूर्व गोंधळ,न्यायालयीन अडचणी टाळण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत.त्याबद्दल शंका नाही आणि खरंच त्यांचं कौतुक करावं तितकं थोड... परंतु ह्या सगळ्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे वाटायला लागत की परीक्षा पुढे जाणार बहुतेक...मग त्याच त्या गप्पा रंगतात सगळीकडे..आणि मग आपण यात आणखी अडकत जातो.... परंतु लक्षात घ्या की आयोगाचं notification येत नाही तोपर्यंत परीक्षा त्याच दिवशी होणार आहे.म्हणजे अवघ्या 16 दिवसांवर परीक्षा आली आहे. इथून पुढे एकूण एक क्षण आपल्यासाठी महत्वाचा आहे.डोळे मिटून एक क्षण जरा परीक्षेच्या आदल्या दिवसाचा विचार करा..... त्यादिवशी आपल्याला हे वाचू का ते वाचू होत....बऱ्याच गोष्टी आठवत नाहीये असं वाटतं...मग अश्यावेळी वाटत की अरे यार आणखी एक तास मिळाला असता ना तर माझ अमुक अमुक Revise झाला असता...त्यावेळी एका एका तासाची किंमत कळते...मग होतो पश्र्चाताप...मी उगीच टाईम पास केला तेव्हा..वगेरे वैगेरे...परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते... मुळात लक्षात घ्या..आपल्याला परीक्षा पुढे जावं असं का वाटतं??? कारण आपल्याला वाटत की परीक्षा पुढे गेली ना की इतका अभ्यास करेल की विचारू नका...परंतु मुळात ज्यांना पूर्व परीक्षा उत्तीर्ण व्हायची आहे त्यांच्यासाठी हे 16 दिवस खूप आहेत..मग त्यांचा कितीही अभ्यास राहिलेला असो....त्यामुळे परिक्षा पुढे जाईल असा विचार करण्यापेक्षा स्वतः ला ठणकावून सांगा की उरलेले दिवस मी माझा 1000% देईल... एक challange म्हणून घ्या..EGO वर घ्या...म्हणजे तुम्हाला ही अभ्यास करायला प्रेरणा मिळेल....अस ही पूर्व परीक्षा अभ्यासाहून तुमच्या मानसिकतेची,त्या 2 तासातील संयमाची परीक्षा आहे.नाहीतर परीक्षाच मुळात समजलेली नसेल तर 160 दिवस दिले तरी कमी पडतील... माझा स्वतः च अनुभव सांगतो... अजून हि आठवतंय..2022 ची मुख्य होती...पूर्व परीक्षेतील Pitutary Gland च्या प्रश्ना मुळे तब्बल 11-12 याचिका कोर्टात प्रलंबित होत्या..मुख्य परीक्षा पुढे जाणारच अस सर्व telegramमय वातावरण झालेलं...मला पूर्व मध्ये 135+ गुण असून केवळ परीक्षा पुढे गेली की अभ्यास करू अश्या मानसिकतेत कधी गेलो कळाल पण नाही..मग एकदा आशा लागली की ती जात नाही...सारखं सारखं वाटत की परीक्षा पुढे जायचं notification येईल..आज येईल,आता येईल...HC ने ही तारीख वर तारीख दिली...शेवटी परीक्षेचा आदला दिवस उजाडला..आणि काय झालं....दुपारी 3 वाजता मुलांच्या विरोधात निकाल लागला.. नेहमी प्रमाणे मुलांचं काहीही न एकता रेटून नेण्यात आल....परीक्षा ठरलेल्या दिवशीच झाली..मी 4 मुख्य,2 मुलाखती चा अनुभव असून काहीही अभ्यास न केल्यामुळे,केवळ परीक्षा पुढे जाणार आणि मग अभ्यास करू अश्या मानसिकतेत गेलो,आणि केवळ मुलाखतीला पात्र होता आल,अंतिम पद मिळालं नाही. आज ही त्याचा खूप पश्चाताप होतो...सर्वात मोठी जाहिरात होती आणि ज्यांनी ज्यांनी telegram बंद ठेऊन अभ्यास केला. त्या मुलांनी 1-2 मुख्य मध्ये वर्ग -1 चे पद काढलेत.... 2021 च्या मुख्य च्या वेळचा ही असाच अनुभव आहे.. Profile मध्ये मुलांनी चुकून कमी उंची भरलेली असल्यामुळे त्यांना मुख्य ला फॉर्म भरताना DySp पदाला अपात्र दाखवत होत...मग अश्या बऱ्याच मुलांनी त्यांना पात्र करण्यात यावं म्हणून प्रयत्न केले...त्यांच्याच नियमातील तरतुदी आहेत की उमेदवाराची उंची हा बदलणारा घटक आहे...हेही दाखवून देण्याचा प्रयत्न झाला....सरळ सरळ तांत्रिक चूक असून काहीही एकूण घेण्यात आले नाही...त्यांना अपात्रच धरल..त्यांच्या पैकी कोणी DySp पद मिळू शकेल इतका गुण असणारा नव्हता बहुदा...नाहीतर मग त्याने कोर्टात धाव घेतली असती आणि परत तोही निकाल रखडला असता... असो..सांगायचं उद्देश एवढाच की आयोगाने ने ठरवलंच असेल तर ते परीक्षा 21 लाच घेणार मग काही झालं तरी.... शेवटची objective असल्यामुळे आता तर ही बहुतेकांच्या आयुष्यातील शेवटची संधी आहे....नंतर मग आयुष्यभर पश्र्चाताप करायची वेळ येईल... त्यामुळे अभ्यास करा....मी वर सांगितल्या प्रमाणे चॅलेंज म्हणून घ्या....शेवटी परीक्षा पुढे जाईल की नाही..हे मी सांगू शकत नाही. परंतु एक गोष्ट खात्रीने सांगू शकतो की... "हे 16 दिवस तुम्हाला पूर्व चांगल्या लीड ने उत्तीर्ण होण्यासाठी more than enough आहेत..." बाकी तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे... मोलाची घडी जाते वांयांविण | न मिळे मोलं धन देता कोडी || जागा होई करी हिताचा उपाय | तुका म्हणे हाय करीसी मग || -STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत) ✅Join:https://t.me/mpscvastad
Показать все...
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

सदरील चॅनल वर खालील अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात- ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW) शुभम खरात(STI,RS INTERVIEW) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI)

आता पर्यंत आपल्या telegram channel @MPSCvastad वर परीक्षेचे Prediction,cut offs.. इ.अशी एक ही पोस्ट टाकलेली नाही.ही पहिलच वेळ आहे आणि ते टाकण्याचा एकच उद्देश.....
Показать все...
आपल्या चॅनल वर अधिकाऱ्यांनी सर्व विषयांच्या त्यांच्या Detail strategies with PYQ topics upload केल्या आहेत.येणाऱ्या Combine पूर्व आणि राज्यसेवा पूर्व साठी उरलेल्या दिवसांमध्ये उजळणी करताना ह्या strategies चा नक्की उपयोग होईल. 1.गणित बुद्धीमत्ता Strategy 👉https://t.me/mpscvastad/1341 2. विज्ञान Strategy ✅Part 1. 👉https://t.me/mpscvastad/1282 ✅Part 2. 👉https://t.me/mpscvastad/1315 3. इतिहासाची Strategy 👉https://t.me/mpscvastad/1296 4. प्राचीन मध्ययुगीन इतिहास strategy 👉https://t.me/mpscvastad/1238 5. राज्यशास्त्र Strategy 👉https://t.me/mpscvastad/1257 6. अर्थशास्त्र Strategy 👉https://t.me/mpscvastad/1254 7. भूगोल Strategy 👉https://t.me/mpscvastad/1235 6. चालू घडामोडी Strategy 👉https://t.me/mpscvastad/1248 7. CSAT Strategy 👉https://t.me/mpscvastad/1261 8. Combine पूर्व तारीख समोर नसताना मानसिकता कशी हाताळावी 👉https://t.me/mpscvastad/1269 9.शेवटच्या एका महिन्यात राज्यसेवा पूर्व ची उजळणी कशी करावी? 👉https://t.me/mpscvastad/1361 10. राज्यसेवा पूर्व PYQ topic list PDF 👉https://t.me/mpscvastad/1362 वस्ताद अधिकारी टीम- 🚨ऋषिकेश कराळे (STI,3 राज्यसेवा मुलाखत) 🚨शुभम खरात सर (STI, राज्यसेवा+PSI मुलखात) 🚨शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) 🚨प्रसाद चौधरी(ACST) 🚨दर्शन पाखरे(STI,ASO) 🚨आशिष म्हस्के(STI,ABDO) 🚨अभिलाष सगळे(STI) ✅Join :https://t.me/mpscvastad
Показать все...
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

✨Combine 2024 पूर्व: गणित आणि बुद्धिमत्ता A to Z Startegy- गणिताचे पूर्वी 15 प्रश्न विचारले जात असतं.पूर्वी गट ब पूर्व पेपर set करताना साधारणतः 6-6-3 (सोपे-मध्यम-अवघड)अशा पद्धतीन प्रश्न विचारले जात.परंतु आता मात्र 2023 पासून गट ब आणि क पूर्व एकत्र झाल्यामुळे 20 प्रश्न येत असून जवळच जवळ सर्वच प्रश्न गट क पूर्व सारखे one liner,formula based दिसतात.त्यामुळे आता Maths-Reasoning (MR) प्रचंड scoring झाले असून तुमची lead ठरवण्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्व पूर्ण आहे.गणित हा सर्वात Predictable विषय असून 20 पैकी 10-15 Topics आपण आजच सांगू शकतो.तरीही आपण त्याकडे चालढकल करतो आणि इतर अवघड, unpredictable विज्ञान सारख्या विषयात Phd करत बसतो.अशी अक्षम्य चूक करू नका.काही झालं तरी दररोज गणित करा. या msg मध्ये PYQs सह इतर बऱ्याच tips सांगणार आहोत.त्यामुळे शेवट पर्यंत वाचा. 🔺कोणत्या Topics ला जास्त लक्ष द्यावे...⁉️ आयोगाने COMBINE पूर्व 23 नंतर पुढील 6 पेपर मध्ये MR चे एकूण 104 प्रश्न विचारलेले आहेत. यात गट ब मुख्य -22 (SR-STI-PSI-ASO), गट ब मुख्य -23, गट क मुख्य 23 चे पेपर आहेत. या 104 प्रश्ना मधून वारंवार हमखास विचारले जाणारे…

✅Combine 2024 साठी भूगोल विषया ची strategy काय असावी? (By STI शुभम सर): मित्रांनो भूगोल विषयावर 10 प्रश्न (पूर्वी 15 प्रश्न) येतात ज्यातील 60-70% प्रश्न one liner तसेच जोड्या लावा या type मधे येतात.60+plus score करण्या साठी भूगोल ला जास्तीत जास्त बरोबर येणं गरजेचं आहे.खालील दिलेलं chapters तुम्ही व्यवस्थित केले तर नक्की तुम्हाला फायदा होईल 1. महाराष्ट्र ची प्रशकीय रचना - राज्याच क्षेत्रफळ, उत्तर दक्षिण विस्तार,इतर राज्यांना लागून असलेली जिल्हे, जिल्ह्याचा स्थापना, प्रशासकीय विभाग आणि त्यातील जिल्हे तालुक्यांची संख्या, जिल्ह्याचा क्षेत्रफळ नुसार क्रम, etc 2. प्राकृतिक भूगोल - पश्चिम घाट त्याचा विस्तार तसेच त्यातून उगम पावणाऱ्या पूर्व न पश्चिम वाहिनी नद्या, कोंकण नद्या च्या मुखावरील खाड्या,विविध घाट ते कोणत्या शहरना connect करतात त्यांचा उत्तर दक्षिण क्रम, तसेच प.घाट मधील शिखरे आणि त्यांची उंची etc 3. महाराष्ट्रतील नद्या - उगम,लांबी, उपनद्या ,त्यांची वाहण्याची दिशा, काठा वरील शहरे,कोणत्या जिल्ह्याच्या सीमा त्या बनवतात etc 4. हवामान - यातील मूलभूत संकल्पना जसे सापेक्ष आद्रता, सम विषम हवामान,आरोह प्रतिरोध आवर्त पर्जन्य,कृत्रिम वर्षा, पर्जन्य परीवर्तनशीलता, हवामान विभागणी , जास्त पर्जन्य ठिकाणे, कोपन त्रिवर्था विभागणी etc 5.जलसिंचन - तलाव धरण ते त्यांचे जिल्हे, त्याना दिलेली नाव , आंतर राज्य प्रकल्प etc 6. वनसंपत्ती - वनाचे प्रकार त्यांची वैशिष्टे , महाराष्ट्र तील राष्ट्रिय उद्याने न अभयारण्य त्यांची जिल्हे, tiger reserves etc 7. खनिज संपत्ती : खनिज असणारी जिल्हे न तालुके, तसेच खनिजांचे उप्रकार, बॉक्साइट कोळसा लोहखनिज यांचं आढळणारी ठिकाणे, औषणिक प्रकल्प, अणुऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा प्रकल्प etc 8. उद्योग : कापड , काच , औषध उद्योग ,संरक्षण उद्योग, उद्योग related संस्था midc mssidc , पंचतरकिंत औद्योगिक वसाहती etc 9. रस्ते : राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग त्यांचे क्रमांक त्यावर असणारी शहरे, समृद्धी प्रकल्प, कोंकण रेल्वे, MIHAN प्रोजेक्ट 10.पर्यटन - किल्ले, समुद्र किनारे,लेण्या,गरम पाण्या ची झरे,धबधबे, धार्मिक स्थळे, राज्यातील WHS ठिकाणे 11. महाराष्ट्राची लोकसंख्या - जास्त कमी लोकसंख्या शहरे, घनता,लिंग गुणउत्तर, लोकसंख्या धोरण etc 12. आदिवासी - राज्यातील आदिवासी न त्यांचे स्थान, PTG जमाती, नृत्य न उत्सव 13. Last but not least PYQ analysis.... कमीत कमी मागील 4 वर्षांचे combine पूर्व paper बघणे daily ✍️STI शुभम खरात सर (राज्यसेवा मुलाखत 22) ✅इतर अधिकारी टीम- 🚨ऋषिकेश कराळे (STI,3 राज्यसेवा मुलाखत) 🚨शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) 🚨प्रसाद चौधरी(ACST) 🚨दर्शन पाखरे(STI,ASO) 🚨आशिष म्हस्के(STI,ABDO) 🚨अभिलाष सगळे(STI) ✅यापूर्वी चॅनल वर Polity,चालु घडामोडी, अर्थशास्त्र,प्राचीन मध्ययुगीन इतिहास यावर अधिकाऱ्यांनी अश्याच detail strategy upload केलेल्या आहेत.त्यापण बघून घ्या. ✅Next A to Z Startegy - विज्ञान soon. ➖👇🔺𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 🔺👇➖ Join👉 https://t.me/mpscvastad
Показать все...
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

सदरील चॅनल वर खालील अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात- ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW) शुभम खरात(STI,RS INTERVIEW) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI)

Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23 मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून average गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.(https://t.me/mpscvastad) 👉ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला PYQ analysis+ PYQ info तोंड पाठ जरी केली तरी पुरेस आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये आलेला जर्मन सिल्व्हर चा प्रश्न PYQ होता आणि त्यात 3-4 प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेले दिसतात. 👉गट ब मुख्य पेपर-2 आणि गट क मुख्य पेपर-2 मध्ये विचारलेल्या विज्ञानाच्या प्रश्नांचे Analysis ही नक्की करा.संयुक्त पूर्व 23 पेक्षा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी होती.या 2 पेपर मध्ये प्राणी वर्गिकरणावर 4-5 प्रश्न आलेले दिसतात.गट ब मुख्य मध्ये तर स्टेट बोर्ड मधून As it is 3 प्रश्न आलेले जे याधीच आपण ग्रुप वर with proof post केलेलं.ते तुम्ही या लिंक वर बघू शकता.👉https://t.me/mpscvastad/1022 ✅जीवशास्त्र | Biology: 1.प्राण्याचे वर्गीकरण 2.वनस्पती वर्गीकरण (वरील दोन्ही वरील PYQ Expln PDF ग्रुप वर upload केली आहे👉https://t.me/mpscvastad/1023) 3. ग्रंथी संप्रेरके आणि विकरे 4. पोषण द्रव्ये 5. रोग लक्षणे आणि चिन्हे (यात जीवाणूजन्य, विषाणूजन्य,कवके,असंसर्ग जन्य यांचा अभ्यास) ✅रसायनशास्त्र | Chemistry 1. अणू आणि त्याची रचना 2. आवर्तसारणी 3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण 4. खनिजे आणि धातुके 5. किरणत्सारीता आणि आण्विक रसायनशास्त्र 6. कार्बनी संयुगे ✅भौतिशास्त्र | Physics 1.प्रकाश 2.ध्वनी 3.विद्युत धारा 4.ऊर्जा,कार्य व शक्ती 5. गती आणि बल 6. प्रकाश,भिंग,आरसे 7.किरणोत्सारीता 👉Science चे स्टेट बोर्ड मधील One liner Problems ही चांगले करा.त्यात जे फक्त फॉर्म्युला टाकून एक दोन स्टेप मध्ये सोडवायचे छोटे छोटे problems आहेत बऱ्याचदा तेच आलेले दिसतात. 👉विज्ञान विषय अभ्यासताना मुलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला तरच तो विषय समजून गुण येतात.या साठी अभ्यास करताना जी संकल्पना समजली नाही ती youtube वर search करून Video स्वरूपात बघितली तर चांगली लक्षात राहील (उदा.Cell structure).YT वर बऱ्याच channel वर वरील सर्व topics मोफत उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल. 🚨सर्वात महत्वाचे........❌ 👉बरेच जण मला msg करतात की सर विज्ञानात गुण मिळत नाही,खूप टेन्शन आलंय.जेव्हा त्यांच्याशी बोलणं होत तेव्हा प्रत्यक्षात अस जाणवत की त्यांना मुळात गणितात 8-10 गुण असतात,Polity मध्ये 7-8 गुण असतात. लक्षात घ्या विज्ञान तुमची लीड किती असणारे? हे ठरवणार नाही. ते गणित बुध्दिमत्ता आणि polity ठरवणार आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये पूर्व गणित one liner होत.मुलांनी त्यात 18-19 गुण पण घेतले आहेत. विज्ञानात कमी गुण मिळतात म्हणून आता त्यात PHD च करतो अस ही काही जन ठरवतात.परंतु तस करू नका.त्यात किती जरी अभ्यास केला तरी अमुक अमुक गुण मिळतीलच हे सांगता येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतः ला 2 प्रश्न विचारा. 1. मला गणित बुद्धिमातेत किमान 15 पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत ना? इतका आत्मविश्र्वास आलंय ना? 2. मला Polity मध्ये 12+ गुण मिळणार आहेत ना? या 2 प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर पहिले 2 विषय focus करा. कारण ते predictable आहेत आणि input output ratio ही खूप high आहे. 👉विज्ञानाला घाबरायच काही कारण नाही... Combine पूर्व 23 ला बरेच जण प्रश्न बघून घाबरून गेले.मुळात त्याच कारण हे आहे की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायची मानसिकता.वर सांगितल्या प्रमाणे कमीत कमी वेळात अभ्यास करून Avg गुण मिळवायचे ध्येय ठरवा.जास्त टेन्शन घेऊ नका. बाकी गणित,polity,Geo,Eco,His आहेच score करायला.💯 ✍️STI ऋषी सर (3 राज्यसेवा मुलाखत) ✅इतर सर्व विषयांच्या Strategies Mpscvastad चॅनल वर Upload केल्या आहेत ते बघून घ्या. ✅विज्ञानाच्या स्टेट बोर्ड PYQ Compilation एकदा बघुन घ्या.👉https://t.me/mpscvastad/1058
Показать все...
🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद|𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝🎖️

सदरील चॅनल वर खालील अधिकारी त्यांच्या Strategies,Notes, इ. Share करतात- ऋषिकेश कराळे(STI,3 RS INTERVIEW) शुभम खरात(STI,RS INTERVIEW) शुभम पाचंग्रिकर(CO-1,RFO,STI) प्रसाद चौधरी(ACST) दर्शन पाखरे(STI,ASO) आशिष म्हस्के(STI,ABDO) अभिलाष सगळे(STI)

माननीय आयोगाने Opting Out ही system च मुळात जास्तीत जास्त विदयार्थी निकालात समाविष्ट व्हावेत, एका विद्यार्थ्याने एकापेक्षा अधिक post असतील तर एकच निवडावी या चांगल्या उद्देशाने सुरू केली आहे. विद्यार्थी मित्रांना यासाठी प्रोत्साहन दिले तर ते नक्की Opt out चा स्तुत्य निर्णय घेतील अशी अपेक्षा असते. तसे  ते सहकार्य ही करतात.. निकालात आलेल्या प्रत्येकाने सहानुभूती पूर्वक विचार केला तर एखाद्याचा आयुष्याचं कल्याण होऊ शकत हा त्याचा शुद्ध हेतू... आपणास एखादी पोस्ट मिळते ही कौतुकाचीच बाब आहे, पण ; तुमच्याच सोबत अभ्यास करत असणारा तुमचा एखादा मित्र शून्य मार्कने पोस्ट पासुन वंचित राहतो, किंवा एखादया GR च्या गुंत्यामुळे त्याला पोस्ट मिळत नाही, किँवा आयोगाने विविध पदांचे निकाल क्रमाने लावले नाहीत म्हणून त्याची संधी हुकते या सगळ्या बाबी ध्यानात घ्यायला हव्यात.. आज निकालामध्ये असणाऱ्या अधिकारी  मित्रांनी संवेदनापूर्वक या बाबी लक्षात घ्यायला हव्यात ; कदाचित तुम्हाला एखादा मार्क कमी असता किंवा शुन्य मार्क कमी असताना ही फक्त GR मुळे तुमची पोस्ट नसती तरीही आपण हाच विचार केला असता का? याचा खूप सद्भावनेने विचार करायला हवा.. अधिकारी आपण नंतर होतो, आधी आपण माणूस असतो... आणि माणसाला च संवेदना असतात..! त्याच जागृत राहिल्या तरच आपल "माणूसपण" दिसत...! त्यामुळे हा सगळा अट्टाहास असतो... गुरू ठाकूर फार सुन्दर म्हणतात , जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना...! तेवत्या राहो सदा, रंध्रातूनी संवेदना....! --आपलाच wating ला असणारा एक विद्यार्थी 😔 🙏🙏🙏
Показать все...
तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावासाठी सर्वांचे धन्यवाद.... तुमची निवड झालेला दिवस हा एक वेगळाच असतो.... त्या दिवशी तुम्हाला आतापर्यंतचा सगळा प्रवास आठवत राहते.........काही तरी खूप मोठ मिळाल्याचा आनंद असतो. नैराश्य, एकांत, हतबलता असे हजारो क्षण जे आपण एकट्याने झेललेले असतात..... त्या क्षणांचे सार्थक झालेले असते. मी आणि माझा मित्र आयुष्याला कधी कधी खूप शिव्या द्यायचो...... कारण आयुष्यात काही प्रसंग असे घडायचे कि त्याच्यावर उपाय फ़क्त एकच दिसायचा आणि तो म्हणजे एक यश..... MPSC तून एक पोस्ट...... एक result...... तुम्ही चालत राहिल कि वाट सापडत राहते..... घरी पैसे मागायची लाज वाटायची तेव्हा मला telegram ची हि वाट सापडली...... यावर test series घेऊन मी आपला ख़र्च भागवला...... त्यानंतर मला लिपिक टंकलेखक म्हणून नोकरी लागली आणि आता शेवटी dream post PSI....... तुम्ही पण तयारी सुरू ठेवा, हजारो अपमानाचा बदला एक result काढून घेता येते.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
झालो रे PSI🙏🙏🙏🙏
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🔴Combine पूर्व 24, तसेच राज्यसेवा पूर्व 24 ची तयारी करताना सर्वात प्रथम पूर्वीच्या पेपर चे PYQ Analysis करणे गरजेचे आहे,जेणेकरून उरलेल्या दिवसांचे योग्य नियोजन करता येईल. 🫵त्यासाठी हा video एकदा बघाच👀 https://youtu.be/bSeger9bJMc https://youtu.be/bSeger9bJMc https://youtu.be/bSeger9bJMc https://youtu.be/bSeger9bJMc 🔴Video by - STI ऋषीकेश कराळे (3 राज्यसेवा मुलाखत) 👉एका तासाचे नियोजन जमत नाही. गणिताला वेळ पुरत नाही. 👉अभ्यास तर झालेला आहे परंतु दरवेळी काही मार्क्स ने Prelims जाते,काय करावं कळत नाही. 👉बऱ्याच जणांना परीक्षेच्या भीतीपोटी आत्मविश्वास खचतो,नवीन प्रश्न बघितला की काही सुचत नाही. 👉अश्या सगळ्या समस्यांवर रामबाण एकच video. 👉वेळ वाचवण्याचं अचूक तंत्र. 👉1 तासाचे Mirco management. 👉Paper Setter च्या दृष्टीने प्रश्नांकडे कसे बघायचे? 👉कसा मी 40 वरून 65 plus Score वाढवला? 👉My strategy Detail Explanation. 🔴Mind Programing technique म्हणजे काय? 👉Combine पूर्व 2021,2022 च्या PYQ Explanation through वरील सर्व गोष्टी with Proof सांगितलेल्या आहेत. 🎖️𝐌𝐏𝐒𝐂 वस्ताद | 𝐌𝐏𝐒𝐂 𝐕𝐚𝐬𝐭𝐚𝐝™🎖️
Показать все...
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.