🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Открыть в Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Больше1 858
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
९.३५ AM अंकगणित live
https://youtu.be/ZkOVWPWzjuc
26 февр. 2021, 22:38
26/02/2021 ची सुनावणी ✅️
आरोग्य विभागाच्या 54 विविध पदांसाठी एकाच दिवशी दिनांक 28/02/2021 रोजी परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरुद्ध मा. उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल असलेल्या प्रकरणात दिनांक 26/02/2021 रोजी सुनावणी झाली. सुनावणीमध्ये ऍड. विष्णु यादवराव पाटील व ऍड स्वप्नील तावशीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सदरच्या निर्णयाचा फटका राज्यातील लाखो उमेदवारांनी ज्यांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी फीस भरून अर्ज केले आहेत त्यांना बसणार असल्याने सदरचा निर्णय तात्काळ रद्द होणे जरुरी आहे व परीक्षा एका दिवशी न घेता विविध तारखांना घेण्यात यावी अशी विनंती केली. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर तातडीने पदे भरण्याची आवश्यकता असल्याने तसेच परीक्षेच्या अगदी तोंडावर त्यात काही बदल करणे शक्य नसल्याचे शासनामार्फत सांगण्यात आले. न्यायालयाने एकाच दिवशी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर व चुकीच्या जाहिरातीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सदर परीक्षेबाबत योग्य तो निर्णय घेण्याबाबत न्यायालयाने शासनास आदेशित केले आहे. आता शासन यावर काय निर्णय घेते याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
ऍड. विष्णु यादवराव पाटील
उच्च न्यायालय, औरंगाबाद.
26 февр. 2021, 21:43
९.३५ LIVE BATCH.
https://youtu.be/e2MnOT9-HOI
25 февр. 2021, 23:00
पुडूचेरीत राष्ट्रपती राजवट लागू
केंद्रीय मंत्रिमंडळाने पुडूचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याविषयीच्या प्रस्तावाला त्याची मान्यता दिली आहे. पुडूचेरी केंद्रशासित प्रदेशातील कॉंग्रेस पक्षाच्या नेतृत्वात असलेल्या सध्याच्या सरकारने पुडुचेरी विधानसभेत विश्वास प्रस्तावाचे मत गमावल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने 24 फेब्रुवारी 2021 रोजी हा निर्णय घेतला.
मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्याही पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा केलेला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रपती राजवटीत पुडूचेरीचे उपराज्यपाल तमिलसाई सौंदरराजन सरकारचे काम पाहतील.
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
कलम 356 नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचे प्रतिवृत्त प्राप्त झाले, अथवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून अशा प्रकारची संकटकालीन घोषणा करू शकतात. तसेच घोषणा दुसऱ्या अध्यादेशाद्वारे समाप्तही करू शकतो.
संसदेने अशा घोषणेला मान्यता दिल्यानंतरच तिचा अंमल फक्त सहा महिने इतका असतो. परंतु संसद या घोषणेला पुन्हा पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता देईल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. अशा प्रकारे या घोषणेचा अंमल तीन वर्षापर्यंत राहू शकतो.
प्रत्येक वेळी एक वर्ष असे लागोपाठ तीन वेळा मान्यता दिल्यास तीन वर्षे तिचा अंमल राहू शकतो. त्याचे परिणाम असे की, ही घोषणा करताच राष्ट्रपती राज्य सरकारची सर्व सत्ता (उच्च न्यायालय कार्य सोडून) स्वतःकडे घेतात किंवा राज्यपालांकडे सोपवतात.
संसदेकडे राज्यविधिमंडळाची कार्ये सोपवू शकतात, किंवा स्वतःच्या आदेशानुसार कोणत्याही अधिकाऱ्यांना करावयास सांगू शकतात.
लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश देऊ शकतात. या घोषणेच्या पूर्ततेसाठी प्रासंगिक अथवा आनुषांगिक व्यवस्था राष्ट्रपती करू शकतो.
परंतू उच्च न्यायालयाची सत्ता स्वतःकडे अगर दुसऱ्याकडे देऊ शकत नाही. या सर्व परिस्थितीमध्ये घटकराज्याच्या विधानसभेचे विसर्जन करू शकतो.
25 февр. 2021, 22:20
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव
संन्याशाचा उठाव : 1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक
चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला
हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम
जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू
खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई
संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू
खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग
कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर
🔹दक्षिण भारतातील उठाव -
पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास
म्हैसूरमधील शेतकर्यांचा उठाव : 1830 - म्हैसूर
विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर
गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर
रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड
रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत
भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824
केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर
फोंडा सावंतचा उठाव : 1838
भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश
दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी
25 февр. 2021, 21:21
ज्या उमेदवारांना संकेतस्थळावरुन प्रवेश पत्र प्राप्त करण्यासाठी अडचणी येत आहेत त्यांनी याबाबतच्या मार्गदर्शनासाठी admitcardissue@gmail.com या ईमेल आयडीवर सर्व माहिती पाठवावी.
24 февр. 2021, 11:14
