ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

Открыть в Telegram

Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy

Больше
1 858
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
देशात एका दिवसात २० लाख जणांचे लसीकरण 🌼आठ मार्च रोजी देशात वीस लाख लोकांना एकाच दिवशी करोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत २.३ कोटी लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे. 🌼कोविड १० लसीकरण मोहिमेच्या ५२ व्या दिवशी २० लाख १९ हजार ७२३ जणांना लस देण्यात आली. त्यातील १७ लाख १५ हजार १८० लाभार्थ्यांना २८,८८४ सत्रांमध्ये पहिली मात्रा देण्यात आली. ३ लाख ४ हजार ३४३ आरोग्यसेवकांना व आघाडीवर काम करणाऱ्या लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली. १७ लाख १५ हजार ३८० लाभार्थ्यांमध्ये १२ लाख २२ हजार ३५१ लाभार्थी हे वयाच्या साठीवरील असून २ लाख २१ हजार १४८ जण हे ४५ ते ६० वयोगटातील सहआजाराचे लोक आहेत. 🌼आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार कोविड १८ लसीकरण मोहीम १६ जानेवारीला सुरू झाली होती. गेल्या चोवीस तासांत २० लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी सात वाजेपर्यंत २,३०,०८,७३३ लोकांना ४,०५,५१७ सत्रांत लस देण्यात आली असून आरोग्य कर्मचाऱ्यात ७०,७५,०१९ जणांना पहिली मात्रा तर ३७,३९,४७८ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली. आघाडीच्या कर्मचाऱ्यात ६२,९२,३१९ जणांना पहिली मात्रा तर ३ लाख ३५ हजार ९७२ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ४५ वर्षांवरील सात लाख १८० लाभार्थी असून त्यांना पहिली मात्रा दिली आहे. साठ वर्षांवरील सहआजाराच्या ४३ लाख ७४ हजार १४५ जणांना लस देण्यात आली आहे. 🌼महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या राज्यांत कोविड रुग्ण संख्या वाढत आहे. २४ तासांत सापडलेले ८४.०४ टक्के रुग्ण त्या राज्यातील आहेत. २४ तासांत १५ हजार ३८८ नवीन रुग्ण सापडले असून महाराष्ट्रात ८७४४, केरळात १४१, तर पंजाबमध्ये १२२९ नवीन रुग्ण आहेत. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यांत रुग्णसंख्या वाढली आहे. दिल्ली, गुजरात, कर्नाटक, हरयाणा, महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब व मध्य प्रदेश या राज्यांत रुग्ण संख्या वाढत आहे. १ लाख ८७ हजार ४६२ रुग्ण उपचाराधीन असून हे प्रमाण एकूण रुग्णांच्या १.६७ टक्के आहे. @Mpscmaha1
10 мар. 2021, 21:25

(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ? उत्तर- २४ डिसेंबर. (०२) सायकलचा शोध कोणी लावला ? उत्तर- मॅकमिलन. (०३) 'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ? उत्तर- पांडूरंग सदाशिव साने. (०४) भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ? उत्तर- १९२० मध्ये. (०५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ? उत्तर- सोलापूर. (०६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ? उत्तर- वड. (०७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ? उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन. (०८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ? उत्तर- विंबलडन. (०९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ? उत्तर- २० मार्च १९२७. (१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ? उत्तर- C₁₂H₂₂O₁₁ (११) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ? उत्तर- दादासाहेब फाळके. (१२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ? उत्तर- रूडाल्फ डिझेल. (१३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ? उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी (१४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ? उत्तर- २७० ते २८० ग्रॅम. (१५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ? उत्तर- ४ सप्टेंबर १९२७. (१६) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ? उत्तर- पुणे. (१७) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ? उत्तर- जेम्स वॅट. (१८) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ? उत्तर- राम गणेश गडकरी. (१९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ? उत्तर- ८ जुलै १९३०. (२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ? उत्तर- C₆H₁₂O₆ (२१) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ? उत्तर- त्याग आणि शौर्य. (२२) टेलिफोनचा शोध कोणी लावला ? उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल. (२३) ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ? उत्तर- रानकवी. (२४) अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ? उत्तर- २९ आॅगस्ट. (२५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ? उत्तर- २७ मे १९३५. (२६) न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ? उत्तर- किवी. (२७) ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ? उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन. (२८) मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ? उत्तर- विवेकसिंधू. (२९) 'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ? उत्तर- सुनील गावस्कर. (३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ? उत्तर- महात्मा फुले. (३१) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ? उत्तर- व्हाइट हाऊस. (३२) अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ? उत्तर- ब्रेल लुईस. (३३) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?* उत्तर- अरूणा ढेरे. (३४) 'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ? उत्तर- पी. टी. उषा. (३५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ? उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम. (३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ? उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची (३७) महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ? उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप (३८) देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ? उत्तर- कोल्हापूर. (३९) श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते ? उत्तर- प्र.के.अत्रे (४०) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ? उत्तर- 1990 (४१) तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ? उत्तर- कावेरी नदी. (४२) पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ? उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग. (४३) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ? उत्तर- कृष्णाजी केशव दामले. (४४) अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? उत्तर- अॅथेलेटिक्स. (४५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ? उत्तर- २५ डिसेंबर १९२७. (४६) सात टेकड्याचे शहर कोणते आहे ? उत्तर- रोम. (४७) डायनामाइटचा शोध कोणी लावला ? उत्तर- आल्फ्रेड नोबेल. (४८) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ? उत्तर- ह. ना. आपटे. (४९) 'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ? उत्तर- सायना नेहवाल. (५०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ? उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा. @ntpc21
10 мар. 2021, 21:23

https://youtu.be/6-byiw6Z68s पेपरला जाता जाता धावता आढावा. एकदा हा व्हिडीओ बघाच .... आज सकाळी 11.45 am LIVE.
08 мар. 2021, 23:56