Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 110
Подписчики
-224 часа
-247 дней
-3430 дней
Архив постов
4 111
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
अचूक आणि अद्ययावत मतदार यादी, विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा आधार!
विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) 2026 अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, निवडणूक आयोगाने मतदार यादीत नसलेल्या पात्र नागरिकांची तसेच पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नव्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.
#Maharashtra #SIR #ElectionCommission
06 окт., 13:13
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे राज्यभरातून आलेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक दिशानिर्देश केले.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
06 окт., 13:12
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे राकेश ढोमसे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
06 окт., 13:11
4 111
बृहन्मुंबई महापालिकेच्या बांधकाम विभागात बांधकाम आराखड्यांच्या छाननीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भविष्यात मानवी हस्तक्षेप कमीत कमी करून किंवा शून्य मानवी हस्तक्षेपाच्या दिशेने ही प्रक्रिया नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, त्यामुळे मुंबईतील व्यवसाय सुलभतेला चालना मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #ParticipateMumbai
06 окт., 13:09
4 111
CMO Maharashtra Tweets:
‘पार्टिसिपेट मुंबई’च्या माध्यमातून सीएसआर भागीदारीला नवी दिशा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे नागरी सहभाग आणि सीएसआर सुलभीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'पार्टिसिपेट मुंबई' या उपक्रमाचे लोकार्पण केले.
‘पार्टिसिपेट मुंबई’ हा केवळ सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधी उभारण्याचा मंच नसून सरकार, महापालिका, कॉर्पोरेट आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन विकासासाठी काम करण्याचे व्यासपीठ आहे. 'समग्र' संस्थेबरोबरच्या सामंजस्य करारामुळे महापालिकेच्या सेवा वितरण व्यवस्थेत सुधारणा, प्रशासकीय प्रक्रिया सुलभ होण्यास व कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. या दोन्ही उपक्रमांमुळे मुंबईच्या विकासाला लोकसहभाग आणि गतिमान प्रशासनाची जोड मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईच्या विकास प्रक्रियेत नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञांचा सहभाग वाढविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘पार्टिसिपेट मुंबई’ हा भागीदारीचा नवा डिजिटल मंच सुरू केला आहे.
‘पार्टिसिपेट मुंबई’ हा सहभागाचा मंच
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पार्टिसिपेट मुंबई’ हा 'सर्वांनी एकत्र येऊन समाजातील शेवटच्या घटकासाठी काय करू शकतो’ यासाठीच्या सहभागाचा मंच आहे. महापालिकेला ज्या क्षेत्रात भागीदारीची आवश्यकता आहे, अशा विविध प्रकल्पांची माहिती या मंचावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, रोजगार, पर्यावरण, उद्याने, सौंदर्यीकरण, गरिबी निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कंपन्या, स्वयंसेवी संस्था किंवा नागरिकांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पाची निवड करता येणार आहे.
एखाद्या संस्थेला विशिष्ट क्षेत्रात काम करायचे असल्यास त्यांची स्वतःची योजना देखील या मंचावर मांडता येणार आहे. त्यामुळे महापालिका आणि सामाजिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यातील दरी कमी होऊन विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
‘सीएसआरमध्ये पैसा नव्हे, परिणाम महत्त्वाचा’
कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वासाठी (सीएसआर) किती निधी खर्च झाला, यापेक्षा त्यातून किती लोककल्याण झाले आणि कोणता परिणाम साधला, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
सीएसआरच्या माध्यमातून काम करणाऱ्या संस्थांकडून सरकारला नवीन तंत्रज्ञान, आधुनिक व्यवस्थापन पद्धती, प्रभावी निरीक्षण व्यवस्था आणि लवचिक कार्यपद्धती मिळते. सरकारच्या पारंपरिक प्रशासकीय प्रक्रियांमध्ये काही मर्यादा असतात. त्यामुळे सरकारी यंत्रणा आणि सीएसआर भागीदार यांची सांगड घातल्यास अधिक परिणामकारक काम होऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील कुपोषणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज
मुंबई महापालिकेने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि पोषण या क्षेत्रांतही अधिक परिणामकारक हस्तक्षेप करण्याची गरज आहे. शहरातील काही भागांत कुपोषण, बालकांमधील खुंटलेली वाढ आणि कृशता यांसारख्या समस्या अद्याप दिसून येतात. विशेषतः झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांमधील मुलांपर्यंत पोषण पोहोचविण्यासाठी सीएसआर भागीदारीचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. पोषणाचा थेट संबंध मुलांच्या मेंदूच्या विकासाशी, शिक्षणातील कामगिरीशी आणि रोगप्रतिकारक क्षमतेशी आहे. त्यामुळे पोषणाच्या क्षेत्रात प्रभावी हस्तक्षेप केल्यास पुढील पिढीच्या विकासावर त्याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘समग्र’सोबत प्रशासकीय प्रक्रियांची पुनर्रचना
बृहन्मुंबई महापालिका प्रशासन अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी ‘समग्र’ संस्थेसोबत करण्यात आलेला सामंजस्य करार हा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रशासन हीच विकास आणि परिवर्तनाची प्रमुख यंत्रणा असल्याने सरकारी प्रक्रिया काळानुसार बदलणे आवश्यक आहे. आजही अनेक सरकारी प्रक्रिया जुन्या पद्धतीने सुरू आहेत. अनेक वर्षांपूर्वी तयार झालेल्या प्रक्रिया आजच्या काळात तशाच पद्धतीने राबविणे योग्य नाही. आज नागरिकांना तात्काळ सेवा आणि समस्यांचे निराकरण अपेक्षित आहे. त्यामुळे प्रशासनातील अनावश्यक टप्पे कमी करून ‘बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग’ करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्य सरकारने नागरिकांसाठी सुमारे 1100 सेवा ऑनलाइन उपलब्ध केल्या आहेत. यापैकी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या सुमारे 45 ते 47 सेवा व योजनांच्या वितरण प्रक्रियेत सुधारणा केल्यास 90% नागरिकांना अधिक वेगवान आणि चांगली सेवा देता येईल, असे निदर्शनास आले आहे. या प्रक्रियेचे पुनर्रचनाकरण अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
‘एआय’च्या माध्यमातून बांधकाम परवानगी प्रक्रियेत बदल
06 окт., 13:09
4 111
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'पार्टिसिपेट मुंबई'च्या माध्यमातून येत्या काळात समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक प्रकल्प हाती घेण्यात येतील.
'पार्टिसिपेट मुंबई' के माध्यम से आने वाले समय में समाज के सर्वांगीण विकास को गति देने वाली कई महत्वपूर्ण एवं प्रभावी परियोजनाएं शुरू की जाएंगी।
('पार्टिसिपेट मुंबई' प्रकल्पाचे लोकार्पण | मुंबई | 6-10-2026)
#Maharashtra #Mumbai #ParticipateMumbai
06 окт., 12:11
4 111
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
'पार्टिसिपेट मुंबई' हे सामाजिक आणि कॉर्पोरेट संस्थांना एकत्र आणून समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी कार्य करणारे प्रभावी व्यासपीठ आहे.
'पार्टिसिपेट मुंबई' सामाजिक एवं कॉर्पोरेट संस्थाओं को एक साथ लाकर समाज के अंतिम व्यक्ति के विकास के लिए कार्य करने वाला एक प्रभावी मंच है।
('पार्टिसिपेट मुंबई' प्रकल्पाचे लोकार्पण | मुंबई | 6-10-2026)
#Maharashtra #Mumbai #ParticipateMumbai
06 окт., 12:08
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे मराठवाडा जनविकास परिषद, ठाणे यांच्या वतीने अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹5,01,111 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
06 окт., 11:41
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे 'अनकट लेगसी – अ व्हेन्यू विथ अव्हेन्यूज' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षास प्रारंभ झाल्यानिमित्त सन्मानचिन्ह देण्यात आले.
#Maharashtra #DevendraFadnavis #DadasahebPhalkeChitranagari #GoldenJubilee
06 окт., 11:15
4 111
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे आज वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांनी भेट घेतली. नुकतेच 'रिफोकस वर्ल्ड अवॉर्ड 2025' या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धेत पाटील यांनी सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैजू पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
06 окт., 11:08
