ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 139
Подписчики
+224 часа
-137 дней
-4130 день
Архив постов
CMO Maharashtra Tweets: महाराष्ट्रात पायाभूत सुविधांना मोठा वेग; ₹18,130 कोटींच्या मेट्रोसह 3 द्रुतगती महामार्गांच्या कामांना मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. मुंबई मेट्रो मार्गिका 5अ, टप्पा 1 आणि टप्पा 2 अशा एकूण ₹18,130.55 कोटींच्या कामांना आणि नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली, नागपूर-चंद्रपूर या 3 महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांच्या कामांच्या भूसंपादनासाठी लागणारे कर्ज हुडकोकडून घेण्यास तसेच नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी टप्पा 2 मधील ₹1063 कोटींच्या कामांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. मुंबई मेट्रो मार्गिका 5अ, टप्पा 1 आणि टप्पा 2 या मार्गिकेची लांबी 34.21 किमी आहे, ज्यामध्ये 19 स्थानकांचा समावेश आहे. टप्पा 1 कापूरबावडी ते धामणकर नाका, टप्पा 2 धामणकर नाका ते दुर्गाडी, मार्गिका 5-अ दुर्गाडी - कल्याण – उल्हासनगर या प्रकल्पामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागातील सुमारे 69,00,000 लोकांना फायदा होणार असून प्रवासाचा वेळ 40-50% कमी होईल. या प्रकल्पासाठीच्या आवश्यक परवानगीसाठी केंद्र शासन व संबंधित विभागाकडे गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी दिले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या 3 द्रुतगती महामार्ग प्रकल्पांचे 'प्रकल्प कार्यान्वित करण्याचे वेळापत्रक' निश्चित करण्याच्या सूचना तसेच निविदा प्रसिद्धी, निविदा अंतिम करणे आणि प्रकल्प पूर्णतेचा कालावधी निश्चित करावा. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाकरिता हुडकोकडून कर्ज उभारण्याच्या प्रस्तावावर वित्त विभागाशी समन्वय साधून तातडीने मार्ग काढावा. विदर्भातील दळणवळण आणि उद्योगांना चालना देण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने 6 वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्गाची एकूण लांबी 162.577 किमी असून, प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत ₹19,582.19 कोटी आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ₹3162.18 कोटींच्या खर्चास, भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग 94.241 किमी लांबीच्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ₹931.15 कोटी, तर 204.799 किमी लांबीच्या नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ₹2353.94 कोटींच्या प्रशासकीय खर्चाला मंजुरी देण्यात आली. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे तसेच भाविकांसाठी वाहनतळ, पाणीपुरवठा, विद्युतविभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, मुख्य नियंत्रण कक्ष यासाठी ₹1063 कोटींच्या कामांच्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली असून ही कामे गतीने पूर्ण निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मंत्री उदय सामंत आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 22 एप्रिल 2026 मेट्रो मार्गिका-5 अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/198504/ एल-निनोचा प्रभाव लक्षात घेऊन पाणी जपून वापरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/198491/ महाराष्ट्रात २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; १ लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/198525/ मंत्रिमंडळ निर्णय https://mahasamvad.in/198501/ #Maharashtra #DevendraFadnavis

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Strengthening Connectivity, Enabling Growth Across Maharashtra Chaired a meeting of the Cabinet Committee on Infrastructure at Mantralaya, Mumbai today, approving a series of key projects to strengthen connectivity and drive inclusive growth across Maharashtra. Approved works worth ₹18,130.55 crore for Mumbai Metro Line 5A (Phase I & II). Also approved securing a loan from HUDCO for land acquisition for three key expressways, Nagpur–Gondia, Bhandara–Gadchiroli, and Nagpur–Chandrapur. Further, approved works worth ₹1,063 crore under Phase II for the Nashik–Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela 2027. Mumbai Metro Line 5A, spanning 34.21 km with 19 stations, will benefit approximately 69,00,000 citizens by enhancing connectivity across Thane, Bhiwandi, Kalyan, and Ulhasnagar, while reducing travel time by 40–50%. Approved ₹3162.18 crore for land acquisition of the 162.577 km Nagpur–Gondia Expressway (total project cost: ₹19,582.19 crore), ₹931.15 crore for the 94.241 km Bhandara–Gadchiroli Expressway, and ₹2,353.94 crore for the 204.799 km Nagpur–Chandrapur Expressway. Directed that infrastructure works for the Nashik Simhastha Kumbh Mela be expedited to ensure world-class facilities for devotees. The approved ₹1,063 crore proposals cover key services including parking, water supply, electricity, healthcare, solid waste management, and a main control centre, with strict timelines for completion. DCM Eknath Shinde ji, Minister Chandrashekhar Bawankule, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Uday Samant and other senior officials were present. #Maharashtra #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2046994819881517394?s=20

Cabinet Decisions 22-04-2026.pdf2.50 MB

➡️ मंत्रिमंडळ निर्णय 1 मंत्रिमंडळ निर्णय : महसूल विभाग ____ ➡️ मंत्रिमंडळ निर्णय 2 मंत्रिमंडळ निर्णय : उच्च व तंत्रशिक्षण विभाग ____ ➡️ मंत्रिमंडळ निर्णय 3 मंत्रिमंडळ निर्णय : महसूल विभाग ____ ➡️ मंत्रिमंडळ निर्णय 4 मंत्रिमंडळ निर्णय : नगर विकास विभाग ____

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ निर्णय : नगर विकास विभाग #Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Boosting High-Tech Industries and Employment Chaired a meeting of the Cabinet Sub-Committee of the Industries Department at Mantralaya in Mumbai today. Approved special incentives for 18 major projects worth ₹2,56,137.01 crore to attract large-scale investments and accelerate job creation across the State, with the potential to generate over 1 lakh direct and indirect employment opportunities. These proposals focus on thrust sectors and high-technology industries, including renewable energy (solar cells, modules, ingots, wafers), green technology (green steel and ammonia), advanced manufacturing (electronics, lithium-ion batteries, and EV components), strategic sectors (aerospace and defence), and heavy industry (steel and gas-to-chemical manufacturing). The projects will significantly boost industrial development across Konkan, Vidarbha, Marathwada, and other regions, strengthening local economies while driving technical innovation, advancing R&D, and building robust supply chains. They will also empower MSMEs and enhance employment opportunities for local youth through expanded skilling and training initiatives. DCM Eknath Shinde ji, Minister Uday Samant and other senior officials were present. #Maharashtra #IndustrialDevelopment #Mumbai https://x.com/Dev_Fadnavis/status/2046988963748208826?s=20

CMO Maharashtra Tweets: महाराष्ट्रात उद्योगक्रांती! ₹2.56 लाख कोटींच्या गुंतवणुकीतून लाखो रोजगारांची निर्मिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यातून सुमारे 1,00,000 हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. या बैठकीमध्ये थ्रस्ट सेक्टर तसेच उच्च तंत्रज्ञानावर आधारित सोलर सेल, मॉड्युल, इन्गॉट, वेफर्स, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अवकाश व संरक्षण साहित्य, लिथियम-आयन बॅटरी, इलेक्ट्रिक वाहन निर्मिती/साहित्य, स्टील व गॅस-टू-केमिकल निर्मिती अशा विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यासाठीच्या 18 प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. ✅नाशिकमधील व्हर्च्युओसो कॉम्प्रेसर्स प्रा. लि. ₹800 कोटींची गुंतवणूक करून 500 जणांना रोजगार. ✅अमरावती येथे टेंबो डिफेन्स प्रोडक्ट प्रा. लि. ₹1000 कोटींची गुंतवणूक. ✅छत्रपती संभाजीनगरमधील नायडेक ग्लोबल अप्लायन्सेस इंडिया प्रा. लि. ₹1000 कोटींची गुंतवणूक करून 1000 नवीन रोजगार. ✅पुण्यातील शिरूर भागात जबिल सर्किट इंडिया प्रा. लि. ₹1500 कोटींच्या गुंतवणुकीतून 3000 रोजगार निर्मिती. ✅गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात हरिओम पाईप इंडस्ट्रीज लि. ₹3135 कोटींची गुंतवणूक करून 8000 रोजगार निर्मिती. ✅अहिल्यानगरमध्ये निबे स्पेस ₹4000 कोटींच्या गुंतवणुकीसह 1000 रोजगार निर्मिती. ✅पुण्याच्या तळेगाव भागात युरोबस इंडिया प्रा. लि. ₹4200 कोटींची गुंतवणूक आणि 12,000 रोजगार निर्मिती. ✅चंद्रपूरमध्ये मिलियन स्टील प्रा. लि. ₹256.01 कोटींच्या गुंतवणुकीतून 360 रोजगार निर्मिती. ✅भंडारा जिल्ह्यात अशोक लेलँड लि. ₹10,000 कोटींची मोठी गुंतवणूक करून 1000 रोजगार निर्मिती. ✅नागपूरच्या बुटीबोरी येथे ॲकमे क्लीनटेक सोल्युशन प्रा.लि. ₹11,400 कोटींची गुंतवणूक करून 7000 रोजगार निर्मिती, तर याच कंपनीचा रायगड व पालघरमधील ग्रीन स्टील प्रकल्पात ₹11,000 कोटींची गुंतवणूक आणि 2500 रोजगार निर्मिती. ✅नागपूरमधील सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस लि. ₹12,780 कोटींच्या गुंतवणुकीतून 6825 रोजगार निर्मिती. ✅ग्लोब फोर्ज लिमिटेड कंपनी अहिल्यानगर व धाराशिवमध्ये ₹15430 कोटींची गुंतवणूक करून 3600 रोजगार निर्मिती. ✅रायगड येथे बालासोर अलॉयज लि. ₹17,479 कोटींची गुंतवणूक आणि 3200 रोजगार निर्मिती. ✅छत्रपती संभाजीनगरमध्ये गोदावरी न्यु एनर्जी प्रा. लि. ₹27,515 कोटींची गुंतवणूक करून 4000 रोजगार निर्मिती. ✅रायगड व पालघरमध्ये ॲकमे क्लीनटेक प्रा.लि. चा ग्रीन अमोनिया प्रकल्प ₹37,800 कोटींची गुंतवणूक करून 4500 रोजगार निर्मिती. ✅गडचिरोलीत रश्मी मेटलर्जिकल इंडस्ट्री प्रा. लि. ₹40,000 कोटींची भव्य गुंतवणूक आणि 20,000 रोजगार निर्मिती. ✅ एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन लि. कडून रायगडमध्ये ₹56,852 कोटींची गुंतवणूक करून 25,000 रोजगार निर्मिती. या प्रकल्पांमुळे कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागांमध्ये औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच तांत्रिक नवकल्पना, संशोधन-विकास आणि मजबूत पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही याचा लाभ होणार आहे. याशिवाय, स्थानिक कामगारांसाठी प्रशिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Devendra Fadnavis - Статистика и аналитика Telegram-канала @devendragfadnavis