ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 122
Подписчики
-124 часа
-87 дней
-3530 день
Архив постов
photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'नेर नागरी सहकारी पतसंस्था' यांच्या वतीने पतसंस्थेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप झाडे यांच्यासह परमेश्वर येवले, गजानन कुलकर्णी, शशांक चुबळे यांनी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,11,111 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले! #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

CM Shri Devendra Fadnavis Tweets: From Legacy to Living Inspiration: Shaping a Year of Impact for Krantisurya Mahatma Jyotiba Phule’s Bicentenary Birth Anniversary Chaired a meeting of the committee constituted to plan the celebrations of the bicentenary birth anniversary year of Krantisurya Mahatma Jyotiba Phule today. The bicentenary will be celebrated from 11 April 2026 to 10 April 2027. With an emphasis on carrying his ideas forward, directed the implementation of a year-long calendar of programs based on his life and work. Instructed each department included in the constituted committee to organize at least two to three programs. The planning for such inspirational programs should be submitted by April 15. The Zilla Parishad school in Khanwadi (Taluka Purandar, District Pune), the native village of Krantisurya Mahatma Jyotiba Phule, has been transformed to preserve his legacy. Directed that the bicentenary year should commence on April 11 with the inauguration of the Khanwadi Zilla Parishad school, equipped with CBSE education and modern facilities. For this purpose, instructed the formation of a sub-committee under the constituted committee to ensure the successful implementation and monitoring of year-long programs. Literature based on the life and work of Krantisurya Mahatma Jyotiba Phule should be translated into multiple languages so that people from different linguistic backgrounds can access it in their own language. Also directed that the programs organized by the School Education Department should include participation from private schools. All suggestions from ministers and departments should be consolidated and necessary action taken accordingly. These efforts will ensure that the legacy of Krantisurya Mahatma Jyotiba Phule is preserved and continues to inspire generations. DCM Eknath Shinde ji, DCM Sunetratai Pawar, Minister Chandrashekhar Bawankule, Minister Adv. Ashish Shelar, Minister Atul Save, Minister Jaykumar Gore, Minister Chhagan Bhujbal, Minister Sanjay Shirsat, Minister Dadaji Bhuse, Minister Aditi Tatkare and senior officials were present. #Maharashtra #MahatmaPhule200 https://x.com/Dev_Fadnavis/status/2039305974998294967?s=20

CMO Maharashtra Tweets: क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व विचार जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालय, मुंबई येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 हा कालावधी द्विशताब्दी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत असल्याचे सांगत, यानिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य व विचार पुढील पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची मोठी संधी असल्याचे नमूद केले. तसेच, त्यांच्या कार्यावर आधारित विविध कार्यक्रमांची वार्षिक दिनदर्शिका तयार करून वर्षभर कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्याचे निर्देशही दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गठीत समितीमध्ये संलग्नित विभागाने किमान 2 ते 3 कार्यक्रमांचे आयोजन करावे. अशा प्रेरक कार्यक्रमांचे नियोजन 15 एप्रिलपर्यंत मांडण्यात यावे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव खानवडी (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील त्यांच्या स्मृती जपणाऱ्या जिल्हा परिषद शाळेचा कायापालट करण्यात आला आहे. या द्विशताब्दी जयंती वर्षाची सुरुवात 11 एप्रिल रोजी सीबीएससी शिक्षण, आधुनिक सुविधांनी सुसज्ज खानवडी जिल्हा परिषद शाळेच्या लोकार्पण कार्यक्रमाने करावी. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे करण्यासाठी गठीत समितीअंतर्गत वर्षभर कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच, या कार्यक्रमांचे संनियंत्रण करण्यासाठी उपसमितीची निर्मिती करावी. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित साहित्यसंपदेचा बहुभाषिक अनुवाद करण्यात यावा, जेणेकरून संबंधित भाषिक नागरिकांना त्यांच्या भाषेत साहित्य उपलब्ध होईल. शालेय शिक्षण विभागाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये खासगी शाळांचाही सहभाग सुनिश्चित करावा. तसेच, प्रत्येक मंत्री व विभागाने दिलेल्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री संजय शिरसाट, मंत्री दादाजी भुसे, मंत्री आदिती तटकरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MahatmaPhule200

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त) #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 'RuPay On-The-Go' एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण केले. या योजनेअंतर्गत प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content