LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - रक्तदान करण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्यांदा व्यापक नियम आणि अटी केल्या निश्चित, त्यानुसार आता सतराव्या नव्हे, अठराव्या वर्षी करता येईल रक्तदान
● नवी दिल्ली - कर विभागाने निर्यातदारांचे 7 हजार कोटींचे थकीत जीएसटी रिफंड केले जारी, निर्यातदारांचे 14 हजार कोटींचे रिफंड होते थकीत
● पणजी - गोवा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार शांताराम नाईक यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे निधन, ते 73 वर्षांचे होते
● मुंबई - राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप मागे; परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी कामगार संघटना यांच्या बैठकीत सकारात्मक तोडगा
● मुंबई - पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे त्यांच्याकडील कृषी व फलोत्पादन खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी जाण्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविले
● पुणे - महाराष्ट्राचा ७० टक्के भाग मान्सूनने व्यापला; आज राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाचा अंदाज; हवामान खात्याची माहिती
● रिलायन्स जिओ 4 जी चा डाऊनलोड स्पीड एप्रिल 2018 मध्ये झाला कमी तर एअरटेलचा स्पीड थोडा वाढला असल्याचे ट्रायच्या अहवालात नमूद
● सॅन फ्रान्सिस्को - दोन दशकाहून अधिक काळ लोकप्रिय ठरलेल्या 'याहू'ची चॅट व मेसेंजर सेवा पुढील महिन्यात 17 जुलैनंतर पूर्णपणे बंद होणार
● आशिया कपमध्ये भारताच्या महिला संघाने पाकिस्तानवर सात विकेट्सने विजय मिळवत फायनलमध्ये दिली धडक
● नवी दिल्ली - अमेरिकन दूरचित्रवाणी कार्यक्रम क्वांटिकोमध्ये भारतीयांबाबत दाखवण्यात आलेल्या आक्षेपार्ह चित्रणाबाबत प्रियांका चोप्राने मागितली माफी
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚡ आता व्हॉट्सअॅपवरील फेक मेसेज ओळखता येणार!
LetsUp I Update
व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणले आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवरील फॉरवर्ड मेसेज ओळखता येणार आहेत. त्याद्वारे संबंधित मेसेज फॉरवर्ड केलेला आहे की टाईप करून पाठवण्यात आला आहे हे कळणार आहे.
व्हॉट्सअॅपने हे फीचर अॅण्ड्रॉईड बीटा (2.18.179) व्हर्जनमध्ये लाँच केले आहे. यूजर्सने व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज फॉरवर्ड पर्याय निवडून इतरांना पाठवला असेल तर, त्या मेसेजच्या वरच्या भागात 'फॉरवर्डेड' असा उल्लेख असणार आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीला मेसेज पाठवला आहे, तिला तो फॉरवर्ड मेसेज असल्याचे समजेल. मात्र, मेसेज कॉपी आणि पेस्ट करून पाठवला असल्यास त्यावर 'फॉरवर्डेड' असा उल्लेख नसेल.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚡ दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी
# ताज्या बातम्यांसाठी 👉 LetsUp.in
महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल यंदा 89.41 टक्के लागला आहे. परंपरेप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल 91.97 टक्के इतका लागला आहे. तर 87.27 टक्के मुले पास झाली
👉 विभागवार निकाल खालीलप्रमाणे :
▫ कोकण : 96%
▪ कोल्हापूर : 93.88%
▫ पुणे : 92.08%
▪ मुंबई : 90.41%
▫ औरंगाबाद : 88.81%
▪ नाशिक : 87.42%
▫ अमरावती : 86.49%
▪ लातूर : 86.30%
▫ नागपूर : 85.97%
🌐खालील वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकता.
▫ www.mahresult.nic.in
▪ www.sscresult.mkcl.org
▫ www.maharashtraeducation.com
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🤔 आता दिवस होणार 25 तासांचा!
LetsUp I Update
पृथ्वीवरचा प्रत्येक दिवस आता 25 तासांचा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना काम पूर्ण करण्यासाठी थोडा अधिक वेळ मिळणार आहे तर आळशी लोकांना आराम करायला एक तास जास्त मिळणार आहे.
सुमारे 1.4 अब्ज वर्षांपूर्वी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता. पृथ्वीचे परिवलन आणि चंद्र यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. चंद्र त्यावेळेस पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्यामुळे तेव्हा दिवस केवळ 18 तासांचा असायचा म्हणजे पृथ्वीला स्वतःच्या आसाभोवती फिरून एक चक्र पूर्ण करायला केवळ 18 तास पुरेसे असायचे.
चंद्र जसजसा पृथ्वीपासून दूर जाऊ लागला तसा परिवलनाला वेळ जास्त लागू लागला आणि आज चंद्र ज्या अंतरावर आहे त्यावरुन पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायला 24 तास लागतात. पण संशोधकांनी आता हे लक्षात आणून दिलंय की, चंद्र पृथ्वीपासून अजूनही दूर जातंच आहे. त्यामुळे पृथ्वीच्या परिवलनाची गतीही हळूहळू मंदावत जाईल. साहजिकच परिवलानासाठी म्हणजे एका दिवसासाठी लागणारे तासही वाढणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚡ व्हॉट्सअॅपवर लवकरच प्रेडिक्टीव्ह अपलोड फिचर
LetsUp I Update
लवकरच व्हॉट्सअॅपवर प्रेडिक्टिव्ह अपलोड या नवीन फिचरची भर पडणार आहे. हे फिचर फोटो अपलोडींगशी संबंधित आहे. यात कोणत्याही चॅट किंवा ग्रुपमध्ये फोटो सेंड करण्याआधी तो व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर अपलोड होईल. यानंतर संबंधीत चॅट किंवा ग्रुपमध्ये याला सेंड करणे सोपे होणार आहे.
प्रेडिक्टीव्ह अपलोड फिचर सिंगल आणि मल्टीफोटो या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. तथापि हे सध्या प्रयोगात्मक अवस्थेत असल्यामुळे याचा सध्या वापर करण्यासाठी युजरला त्याचा कॅमेरा अथवा फोटो गॅलरीतील किमान 12 फोटोंना सिलेक्ट करावे लागणार आहे. या प्रतिमा संपादीत (एडिट) करून कोणत्याही चॅट ग्रुपमध्ये पाठविण्याआधी याला व्हाटसअॅपच्या सर्व्हरवर पाठविले जाणार आहे.
यामुळे एडिट केलेले फोटो हे क्षणार्धात संबंधीत चॅट किंवा ग्रुपमध्ये सेंड करता येणार आहे. सध्या अँड्रॉईड व आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी याला सादर करण्यात आले आहे. लवकरच व्हाटसअॅपच्या सर्व युजर्ससाठी याला लागू करण्यात येणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - आरबीआयने 2018-19 या वर्षाचं तीसरे पतधोरण केले जाहीर, रेपो दरात पाव टक्क्यांनी वाढ केल्याने महागाईही वाढण्याची चिन्हं
● नवी दिल्ली - केंद्रीय कॅबिनेटने ग्रामीण डाक सेवकांच्या वेतनात केली तिप्पट वाढ, 1 जानेवारी 2016 पासून लागू होईल वाढ
● नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखर उत्पादकांना केंद्राकडून साडेआठ हजार कोटींचं पॅकेज
● नवी दिल्ली - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी आणि कथित नक्षली संबंधावरुन अटक करण्यात आलेल्या राणा जेकब याला ट्रान्झीट रिमांड; 8 जून रोजी पुणे कोर्टात करणार हजर
● मुंबई - एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के वाढ, येत्या 15 जूनपासून नवे दर लागू होणार, एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे निर्णय
● मुंबई - अमित शाह-उद्धव ठाकरेंमधील भेट सकारात्मक, येणाऱ्या दिवसांत अजून 2 ते 3 बैठका होण्याची शक्यता
● मुंबई - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनाही मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
● व्हॉट्सअॅपवर लवकरच प्रेडिक्टीव्ह अपलोड हे फिचर येणार, याच्या मदतीने युजरला फोटो शेअरिंगमध्ये सुविधा मिळणार
● क्रिकेटपटू विराट कोहलीचा जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत 83 वा क्रमांक, तो 24 दशलक्ष अमेरिकेन डॉलर्स कमावत असल्याचा फोर्ब्जचा अंदाज
● सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'काला' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज, प्रदर्शनापूर्वीच 'काला'ने तब्बल 230 कोटी रुपयांची केली कमाई
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
👌 राज्यातील अंगणवाड्या होणार डिजिटल
LetsUp I Update
राज्यातील 30 जिल्ह्यांमधील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रांमध्ये "राष्ट्रीय पोषण मिशन' राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाड्या डिजिटल होण्यास मदत होणार आहे.
या मिशनअंतर्गत अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन, लहान मुलांचे वजन-उंची घेण्यासाठी आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रामुख्याने बालकांमधील कुपोषण व रक्तक्षयाचे प्रमाण कमी करणारा हा प्रकल्प राज्यात 2018-19 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या हा प्रकल्प 30 जिल्ह्यात राबविण्यात येणार असून 2019-20 मध्ये उर्वरित सहा जिल्ह्य़ांमध्येही राबविण्यात येणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🚩 शिवाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक सोहळा
LetsUp I Update
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांचा 345 वा राज्याभिषेक सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होत आहे. यासाठी केवळ राज्यातूनच नाही तर देशभरातून लाखो शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.
किल्ले रायगडावरील वातावरण शिवमय झालं आहे. ढोलताशांचा गजर सुरू आहे. लवकरच पालखी मिरवणूक निघणार आहे. तसेच रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल, संभाजीराजे यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर राजसदरेवरून पालखीचे शिवसमाधिकडे प्रस्थान होईल तेथे समाधी दर्शनानंतर या दिमाखदार सोहळ्याची सांगता होईल.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚡ आता एटीएम व्यवहार आणि चेकबुकवर GST नाही!
LetsUp I Update
▫ बँक एटीएममधून पैसे काढणं किंवा चेकबुक यांसारख्या ग्राहकांच्या निःशुल्क सेवांचा जीएसटीमध्ये समावेश नाही
▪ क्रेडिट कार्डचं बिल उशिरा भरल्यानंतर लागणाऱ्या शुल्कावर जीएसटी आकारण्यात येणार आहे
▪ अनिवासी भारतीयांकडून विमा खरेदीवरही जीएसटी लागणार आहे
▪ महसूल विभागाने बँकिंग सेवा, विमा आणि शेअर यावर जीएसटी लागण्यासंबंधित पुन्हा-पुन्हा विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर उत्तर देत दिले स्पष्टीकरण
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
_*LetsUp News Updates*_
● नवी दिल्ली - बँक एटीएममधून पैसे काढणं किंवा चेकबुक यांसारख्या ग्राहकांच्या निःशुल्क सेवांचा जीएसटीमध्ये समावेश नाही
● नवी दिल्ली - आयडीबीआय, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, सेंट्रल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलीनीकरण करून सरकार एक मोठी बँक बनवू शकते
● नवी दिल्ली - गेल्या सहा वर्षात 1.26 टक्केच वाढले देशातील जंगल, केंद्रीय पर्यावरणमंत्री हर्षवर्धन यांची माहिती
● कोलकाता - रेल्वे विभागाच्या निर्णयानुसार, 2022 पर्यंत सर्व लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांची गती 25 किमी प्रतितास वेगाने वाढवली जाणार
● मुंबई - ‘NEET’ 2018चा निकाल जाहीर, कल्पना कुमारी ऑल इंडिया रँकमध्ये पहिली तर नांदेडचा कृष्णा देशात सातवा
● मुंबई - शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यायला हवी, प्रश्न मार्गी लागेपर्यंत शेतकऱ्यांनी मागे हटू नये; शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
● मुंबई - पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून पत्ता कट केल्यानंतर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिला राजीनामा
● आता भीम अॅपवरून पैशांच्या देवाण-घेवाणीसह विविध प्रकारांचे बील्स भरण्याची सुविधा देखील ग्राहकांना अपडेटच्या माध्यमातून प्रदान
● फ्रेंच ओपन स्पर्धेतून सेरेना विल्यम्सची माघार, दंडाच्या दुखापतीमुळे घेतला निर्णय, सेरेनाने माघार घेतल्याने शारापोव्हा उपांत्यपूर्व फेरीत दाखल
● केकेआर संघाचा स्टार खेळाडू शुभमन गिल हा बॉलिवूड स्टार शाहरुख खानची मुलगी सुहानाचे क्रश असल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🎬 'संजू'चं पहिलं 'बढीया' गाणं रिलीज
LetsUp I Video
अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट 'संजू' चं पहिले गाणे 'मैं बढिया, तू भी बढिया...' रिलीज झाले आहे. हे गाणे सोनम कपूर आणि रणबीरवर चित्रीत करण्यात आले आहे. या चित्रपटातील हे पहिलच गाणं आहे. हे गीत सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांनी गायले आहे.
व्हिडिओ पाण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/f4Emwd
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
_*LetsUp News Updates*_
● नवी दिल्ली - नोटबंदीनंतर जवळपास 73 हजार अनोंदणीकृत कंपन्यांनी बँक खात्यात 24 हजार कोटी रुपये केले जमा
● नवी दिल्ली - देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ मणिपूरमध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला राष्ट्रपतींची मान्यता
● नवी दिल्ली - रेल्वेसेवा देण्यास उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांची बढती रोखण्याचा इशारा रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी सर्व विभागातील प्रमुखांना दिला
● कोलकाता - पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांना होमवर्क दिले जाऊ नये यासाठी केंद्र सरकार संसदेत विधेयक आणण्याच्या तयारीत
● मुंबई - भडकलेल्या इंधन दरांमुळे निर्माण झालेली महागाई नियंत्रणात आणण्यास रिझर्व्ह बँक रेपो दरात वाढ करण्याची शक्यता
● नागपूर - 'एचएमटी'सह तांदळाचे विविध वाण शोधणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे (76) यांचे दीर्घ अाजाराने निधन
● पुणे - मान्सून एक दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल होणार, दोन दिवस मराठवाड्यासह राज्यात पूर्वमोसमी
● गुगलने स्थानिक बाबींना प्राधान्य देणारे अर्थात 'हायपर लोकल' या प्रकारातील नेबरली हे अॅप भारतीय ग्राहकांसाठी केले सादर
● जागतिक क्रमवारीतील नंबर वन कसोटी गोलंदाज कागिसो रबाडा याची दक्षिण आफ्रिकेचा या वर्षाच्या सर्वोत्तम क्रिकेटर पुरस्कारासाठी निवड
● संजय दत्तचे बायोपिक 'संजू'चे पहिले गाणे 'मैं बढिया, तू भी बढिया...' झाले रिलीज
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
_*LetsUp News Updates*_
● नवी दिल्ली - जीएसटी अंतर्गत इंट्रा स्टेट ई-वे बिल आज 3 जूनपासून देशभरात बंधनकारक असणार
● नवी दिल्ली - यूपीएससीकडून सनदी सेवांसाठी आज रविवारी 2018 ची प्राथमिक परीक्षा घेतली जाणार, परीक्षा दोन टप्प्यांत होणार
● नवी दिल्ली - स्टेट बँकेने मार्जिनल कॉस्टवर आधारित कर्ज दरांमध्ये (एमसीएलआर) 0.10 टक्के वाढ करण्याचा घेतला निर्णय
● लखनौ - उत्तर भारतामध्ये पुन्हा एकदा धुळीच्या वादळाने घातले थैमान, या वादळाने घेतला 25 जणांचा बळी
● एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, पीसीबी गटात अभिजित कदम राज्यात पहिला, तर पीसीएम गटात आदित्य अभंग राज्यात अव्वल
● मुंबई - शेतकऱ्यांनी सरकारला 7 जूनपर्यंत मागण्या मान्य करण्याचा दिला अल्टिमेटम, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शहरांचा दूध आणि भाजीपाला पुरवठा थांबवण्याचा निर्णय
● बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज चौथा स्मृतिदिन, गोपीनाथ गडावर मोठा जनसागर उसळणार
● सॅमसंगने खास सिनेमागृहांसाठी फोर-के क्षमता असणारा अतिविशाल आकारमानाचा एलईडी डिस्प्ले केला लाँच, या माध्यमातून प्रेक्षकांना अत्युच्च अनुभूती घेता येणार
● ठाणे - पाच-सहा वर्षांपासून क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असल्याची चित्रपट अभिनेता-निर्माता अरबाज खानकडून कबुली
● अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच डिजिटल दुनियेत डेब्यू करणार, नव्या वेबसीरिजमध्ये ती रहस्यमय भूमिकेत दिसणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚡ जिओची नवी ऑफर; 2750 रुपयांचा मिळणार कॅशबॅक
LetsUp I Update
रिलायन्स जिओतर्फे Samsung Galaxy J2 2018 आणि Samsung Galaxy J7 Duo खरेदीवर जबरदस्त ऑफर देण्यात येत आहे. या दोन स्मार्टफोन्सपैकी तुम्ही कुठलाही एक स्मार्टफोन खरेदी कराल तर तुम्हाला जिओ कडून 2750 रुपयांचा कॅशबॅक तसेच 100 GB 4G डेटा ही देण्यात येणार आहे.
हा कॅशबॅक तुमच्या 'MyJio Account' मध्ये क्रेडिट केला जाईल. या ऑफरचा लाभ केवळ रिलायन्स जिओचे युजर्स व नवा सॅमसंग गॅलेक्सी J2 2018 किंवा सॅमसंग गॅलेक्सी J7 ड्युओ खरेदी करणाऱ्यांना मिळणार आहे.
👉 Samsung Galaxy J2 2018 वर ऑफर काय?
▫ 2,750 रुपयांचा कॅशबॅक 50-50 रुपयांचे 55 व्हाऊचरमधून मिळणार
▪ 100 GB 4G डेटाचा लाभ 10-10 GB च्या डेटा व्हाऊचरमधून मिळणार
▫ ऑफरचा लाभ केवळ 30 सप्टेंबर 2018 पर्यंत घेता येणार
▪ ही ऑफर केवळ 198 रुपये किंवा 299 रुपयांच्या प्लानमध्ये मिळणार
👉 Samsung Galaxy J7 Duo वर ऑफर काय?
▫ 2,750 रुपयांचा इंस्टंट कॅशबॅक 50-50 रुपयांचे 55 व्हाऊचरमधून मिळणार
▪ ऑफरचा लाभ केवळ 30 सप्टेंबर 2018 पर्यंत घेता येणार
▫ कॅशबॅकसाठी 198 रुपये किंवा 299 रुपयांच्या प्लानने रिचार्ज करावे लागणार
▪ डबल इंटरनेट डेटासाठी 198 किंवा त्याहून अधिकचे रिचार्ज करावे लागणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
_*LetsUp News Updates*_
● नवी दिल्ली - देशातील बेनामी संपत्ती धारकांच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकारकडून बक्षिस योजना सुरू, काळा पैसा, बेनामी संपत्तीविषयी माहिती दिल्यास 5 कोटींचे बक्षीस
● नवी दिल्ली - देशभरात गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ, अनुदानीत सिलेंडर अडीच रुपयांनी तर विनाअनुदानीत सिलेंडरमध्ये 48 रूपयांची वाढ
● नवी दिल्ली - जीएसटीच्या माध्यमातून मे महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या तिजोरीत 94,016 कोटी रुपयांचा महसूल जमा
● नवी दिल्ली - कर्नाटकात सरकार स्थापन केल्यानंतर आठवड्याभरापासून मंत्रिमंडळाचा ताटकळलेला विस्तार 6 जून रोजी होणार
● 1993 मुंबई स्फोटातील आरोपी अहमद मोहम्मद लंबूला अटक, गुजरात एटीएसची कारवाई, एटीएस लवकरच त्याला मुंबई सीबीआयच्या हवाली करणार
● अन्य युरोपियन देशांप्रमाणे डेन्मार्कमध्येही बुरखा आणि निकाब परिधान करण्यावर बंदी, डेन्मार्कच्या संसदेने बुरखा आणि निकाब बंदीचा कायदा केला मंजूर
● मुंबई - एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना 32 ते 48 % वेतनवाढ, परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली घोषणा
● ठाणे - आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात ठाणे खंडणीविरोधी पथकाने अभिनेता अरबाज खानला बजावले समन्स
● भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी गुगल इंडियातर्फे देशभरात गुगल सर्च कॉन्फरन्सचे आयोजन, यामध्ये भाषीक कंटेंटेमधील संकेतस्थळे, सर्च टर्म्स, एसईओ आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार
● हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी अ.ब.क या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚡ शेतकरी आजपासून 10 दिवस संपावर!
LetsUp I Update
सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी राष्ट्रीय किसान महासंघ, किसान क्रांती जनआंदोलन आणि किसान एकता मंचाने आजपासून (शुक्रवार) दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे.
राष्ट्रीय किसान महासंघाने देशभरातील 22 राज्यांमध्ये हे आंदोलन पुकारले आहे. त्या अंतर्गत पुणे, मुंबईसह सर्व प्रमुख शहरांना एक जूनपासून भाजीपाला, दूधासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित केला जाणार आहे. या संपात राज्यातील अनेक शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
_*LetsUp News Updates*_
● नवी दिल्ली - केंद्र सरकारने महाराष्ट्रातील 15 शहरांमध्ये 13,506 घरांच्या बांधकामांना दिली मंजुरी, या प्रकल्पावर 643 कोटी खर्च केले जाणार
● नवी दिल्ली - रेल्वेत आता विंडो तिकीट बुक करणाऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनाही पर्याय निवडण्याची सोय मिळणार
● सिंगापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंगापूरमध्ये भारतीय रुपे कार्ड अॅप केले लाँच; ते म्हणाले, भारताने जगासाठी द्वार उघडले
● इस्लामाबाद - पाकिस्तान सरकारने माजी अध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांचे राष्ट्रीय ओळखपत्र आणि पासपोर्ट केले स्थगित, देशद्रोहाच्या खटल्यात विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई
● बालासोर - अत्याधुनिक पिनाका रॉकेटची चाचणी यशस्वी, या राॅकेटची मारक क्षमता 40 किमीहून 70 किमीपर्यंत वाढली
● मुंबई - यापुढील कोणत्याही निवडणुकीत युती नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा
● मुंबई - राज्यातील उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल लागला असून, नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार
● व्हॉट्सअॅपवरील पेमेंट प्रणाली आता सर्व भारतीय युजर्सला वापरता येणार, याबाबत लवकरच होणार घोषणा
● पॅरिस - स्पॉनिश क्लब रियाल माद्रीदला सलग तिसऱ्या वर्षी वर्ल्ड कप जिंकून देणारा प्रशिक्षक झिनेदीन झिदानने आपल्या पदाचा दिला राजीनामा
● मुंबई - सलमान खानच्या बहुप्रतिक्षित आगामी 'रेस 3 चित्रपटातील 'अल्लाह दुहाई है' या गाण्याचा टीझर रिलीज
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
📣 भारतात सायबर हल्ल्यांचे प्रमाण सर्वाधिक
LetsUp I Update
जगभराचा विचार केला असता, भारतात तब्बल 48 टक्के सायबर अटॅक होत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फ्रॉड होत आहे. आरएसए या रिसर्च संस्थेने ऑनलाईन फसवणुकीबाबतचा जानेवारी ते मे 2018 दरम्यानचा अहवाल नुकताच जाहीर केला. त्यात याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
भारतातील एकंदरीत ऑनलाईन फ्रॉडपैकी एकंदरीत 65 टक्के फसवणुकीची प्रकरणे ही स्मार्टफोनच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. यात स्मार्टफोन अॅप्लीकेशन अथवा मोबाईल ब्राऊजरचा वापर करण्यात येत आहे. अर्थात एकंदरीतच सायबर गैरव्यवहाराचा विचार केला असता अमेरिका आणि रशियानंतर भारताचा क्रमांक लागत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
कोणतेही आमीष दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण देखील भारतात वाढले आहे. यात कॅनडा व अमेरिकेनंतर भारताचाच क्रमांक आहे. यानंतर ब्राझील, नेदरलँड, कोलंबिया, स्पेन, मेक्सिीको, जर्मनी व दक्षीण आफ्रिकेत फिशींगचे प्रकार होत आहेत. भविष्यातही हाच ट्रेंड कायम राहू शकतो. त्यामुळे युजर्सने ऑनलाईन विश्वात वावरतांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता असल्याचे देखील अहवालात सूचित करण्यात आले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
_*LetsUp News Updates*_
● नवी दिल्ली - देशात सरासरीच्या 97 टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज, विभागाकडून मान्सूनचा दुसरा अंदाज जाहीर
● मॉस्को - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची सिंगापूर येथे 12 जून रोजी भेट होणार
● मुंबई - बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे 60 हजार कोटींचा फटका, संपाचा आज दुसरा दिवस
● केरळ - 1 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलवरील कर रद्द करण्याचा निर्णय केरळ सरकारने घेतला, 1 जूनपासून अंमलबजावणी
● मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर, राज्यातून रोहितकुमार राजपूत प्रथम
● मुंबई - भारतात 6.25 लाख मुले दररोज धूम्रपान करतात, टोबॅको अॅटलासने केलेल्या सर्वेक्षणाअंती जाहीर झालेल्या अहवालातून आले समोर
● मुंबई - पीक विम्याची रक्कम 7 जून आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विमा कंपन्यांना आदेश
● अॅपल कंपनीने आपल्या आयओएस या ऑपरेटींग सिस्टीमची नवीन आवृत्ती सादर करण्याचे दिले संकेत, यात एनएफसी तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढविण्यात येणार
● मेलबोर्न - अष्टपैलू मिशेल मार्शकडे या वर्षअखेर होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी आॅस्ट्रेलिया अ संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले
● मुंबई - भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यावर आधारित 'रंगीला राजा' चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत दिसणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🏏 नाणेफेकीची परंपरा बंद होणार नाही : आयसीसी
Letsup I Sports Update
आयसीसी क्रिकेट समितीच्या बैठकीत महत्त्वाच्या बाबींवर सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता शिवीगाळ, बॉल टॅम्परिंग, मॅचफिक्सिंग यांसारख्या गोष्टींमध्ये दोषी सापडलेल्या क्रिकेटपटूंना कठोर कारवाईचा सामना करावा लागणार आहे.
क्रिकेटला कलंकित करणाऱ्या घटनांसाठी नवा नियमही तयार करण्यात येणार आहे. कसोटीमधून नाणेफेक रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली होती. मात्र नाणेफेक ही कसोटी क्रिकेटचा अविभाज्य घटक असल्यामुळे ती यापुढेही कायम राहणार आहे. परदेशी संघांच्या पारड्यात नाणेफेक जिंकल्याचा निर्णय थेट टाकण्यात येणार नाही.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
